गूढचिकित्सामंडळ

लोकभ्रम या रा.ज. गोखले यांच्या पुस्तकातील "गूढचिकित्सामंडळ" विषयी माहिती. पुस्तकाचा परिचय येथे दिलेला आहेच

GodhaChikitsamandal 23
GudhaChikitsaMandal 24
GudhaChikitsaMandal 25
GudhaChikitsaMandal 26
GudhaChikitsaMandal 27

प्रकाश घाटपांडे

लेखनविषय: दुवे:

Comments

शंका - चिकित्सा

या संस्थेची/मंडळाची स्थापना १९३० च्या दसर्‍यालाच का झाली असावी?





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

मुहुर्त?

या संस्थेची/मंडळाची स्थापना १९३० च्या दसर्‍यालाच का झाली असावी?

म्हणजे साडेतीन मुहुर्तातील दसरा हा मुहुर्त का पकडला? असेच ना?
खालील मुद्दे विचारात घ्या
१) १९३० काळातील समाजमनाची मानसिकता लक्षात घ्या.
२) हे ज्या समाजासाठी करायच त्या समाजमनाचा विचार करायला हवा.
३) समाजातील विचारांची दरी कमी करण्यासाठी काही तडजोड ही करावी लागते तरच समाज तुमचे ऐकून तरी घेईल.
४) ही व्यावहरिक सोयीचा भाग आहे . समाजाला फटकारत , तत्वच्युती म्हणून हस्तीदंती मनोर्‍यात बसून स्वतःला विद्वान समजण्याने समाज प्रबोधनापासून तुटून पडतो. गाडगेबाबा देखील फटकारत पण वागण्या बोलण्यातून ते समाजाला ते आपल्यातले वाटायचे.
५) आजही भारतात उदघाटन सोहळयात संगंणकाला नारळ फोडतात. पण त्यामुळे संगणक बिघडणार नाहीत अशी श्रद्धा नसून कळत नकळत रुढी परंपरा एकदम तोडण्यात सर्वसामान्यांचे जरा मन कचरतेच. त्यावेळी तुम्ही त्याचा दुवा आणि वाहक दोन्ही असता.
६) शामभट्ट् व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत (१८९३)चा पुस्तक परिचय आपण येथे वाचला असेलच. त्यात न्या. रानड्यांनी दिलेला अभिप्राय जरुर वाचावा.
७) नरहर कुरुंदकरांचे "जागर" हे पुस्तक आपल्याला नक्कीच अंतर्मुख करते. ते म्हणतात कि माझा देवावर विश्वास नाही, माझा धर्मावर विश्वास नाही पण माझ्या सभोवती असलेले असंख्य लोक ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांच्या पासून तुटून जाण्यावरही माझा विश्वास नाही.
अवांतर- आजही पुरोगामी संघटनात (विशेषकरुन अंनिस) मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कशाला म्हणायचे यावर वादंग झडतात.

प्रकाश घाटपांडे

शामभट आणि बटो

या पुस्तकाचा परिचय आज पहिल्यांदा वाचला . त्यावरची माझी प्रतिक्रिया-माझा खालचा प्रतिसाद काढून टाकला तरी चालण्यासारखे आहे.
दुसरी प्रतिक्रिया--या पुस्तकाच्या काही प्रती विकत घेऊन (वाटल्यास सोळा सोमवार करून) अकरा जणांना वाटल्यास स्वर्गप्राप्ती होईल.. --वाचक्‍नवी

नवीन ओळख - जुन्या विषयाची -जुने संदर्भ !!

आजच्या काळात या संस्थेच्या कार्याविषयी फार् माहीती नाही. पण विज्ञानाधिष्ठीत आणि समाजजागरूक करण्यासाठी काम यांनी केले असे वाटते.
प्रसाद

मुहूर्त

लग्नाचा मुहूर्त का पाहतात? वधूवर आणि त्यांच्या पक्षातील नातेवाइकांचा किंवा मित्रमंडळीतील एकाचा जरी मुहूर्तावर विश्वास असला तरी मुहूर्त पाहणे भाग असते. कारण समजा मुहूर्त न पाहता किंवा, तथाकथित अशुभ मुहूर्तावर कार्य केले आणि लग्नात वा त्यानंतरच्या काळात एखादी वाईट घटना घडली तर त्याचे खापर 'केवळ मुहूर्त न पाहता लग्न केले म्हणून असे झाले' असे ऐकावे लागते. जी माणसे समाजापासून फटकून असतात त्यांनी मुहूर्त न पाहण्याचा किंवा मुद्दाम 'अशुभ मुहूर्तावर' खुशाल कार्य आरंभावे. कारण त्यांना बोलणारे कुणी नसेलच.
दुसरी गोष्ट. जर कार्य आरंभायचेच असेल तर ते (शुभ?) मुहूर्तावर का सुरू करू नये? त्यात काय नुकसान आहे? मनाचे समाधान तर होईल!
दुसरे असे की, महाराष्ट्रातल्या पंचांगातला मुहूर्त दुसर्‍या राज्यातल्या पंचांगात अशुभ असू शकतो. उदाहरणार्थ अमावास्या दक्षिणी भारतात शुभ मानली जाते. मला वाटते १५ ऑगस्ट १९४७ रोजी अमावास्या होती.(चूभूद्याघ्या). ही गोष्ट अनेकांना माहीत नसल्याने त्यांचा काहीच तोटा होत नाही.
सत्यनारायण ही मुळात साचापीरची पूजा आहे हे समजून काय फरक पडणार आहे? बरेच दिवसात आपल्याकडे कुठलाही समारंभ झालेला नाही, पाहुणेराहुणे आलेले नाहीत, कुणा परक्याचे पान उष्टावले गेले नाही असे वाटत असेल तर सत्यनारायणाची सोय आपल्या समाजाने करून ठेवली आहेच, तिचा फायदा घ्या. ब्राह्मणाला दक्षिणा आणि थाळीत जमलेले धान्य, शिधा, जेवण आणि थोडासा खुर्दा मिळेल आणि आपला एक दिवस भेटीगाठीत आनंदात जाईल. तेही आपले काहीही नुकसान न होता. काय वाईट आहे?--वाचक्‍नवी

छान माहिती

घाटपांडे साहेबांनी नेहमी प्रमाणे त्यांच्या पोतडीतून छान माहिती काढली आहे. १९३० मधील पुण्यातल्या सामाजिक संस्थेबद्दल वाचायला मिळाले, आनंद वाटला. केलें, गेलें सारख्या शब्दांवरचे अनुस्वार त्या काळातल्या पुण्यातील मराठीचा परिचय देतात.

त्या संस्थेच्या कार्यबद्दल माहिती देता आली तर बघावे ही विनंती.

आपला,
(वाचक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

धन्यवाद! आणि विगमननिगमन

मस्त! प्रकाशराव, धन्यवाद!
(आभारी) ऋषिकेश

एक शब्द अडला: विगमननिगमन पद्धत कोणती / म्हणजे काय?

विगमन निगमन

विगमन-Induction
निगमन- Deduction

अवांतर- मला फक्त अर्थाचा अंदाज होता. शब्दशः माहित नव्हता. त्यासाठी मी वरदा बुक्सच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशाचा आधार घेतला.

प्रकाश घाटपांडे

माहिती

१९३० साली म्हणजे ७६-७७ वर्षांपूर्वी या मंडळींनी फारच उद्योग केलेले दिसतात :-) पुस्तकही सुरेख तयार केलेले दिसते आहे.

पण आजही त्यांचे काम अपूर्ण आहे अशी परिस्थिती आहे.

आजही पुरोगामी संघटनात (विशेषकरुन अंनिस) मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कशाला म्हणायचे यावर वादंग झडतात.

असे का म्हणे? का एकमत होत नाही?

समाज - जुना - आत्ताचा आणि नवा

प्रकाशरावांचा वरचा प्रतिसाद वाचला. मनापासुन पटला नाही. पण काहि मुद्दे मांडायचे आहेत आणि म्हणुनच उपप्रतिसाद न लिहिता नवा प्रतिसाद लिहितो आहे.

समाजमनाचा मुद्दा वर लिहिला आहे. पण समाज म्हणजे नक्कि कोणता? मुहुर्त वगैरे हे ब्राम्हण समाजाचे स्तोम असे समजले जायचे आणि आज ही जाते. मुळातच ब्राम्हण्यवाद ज्याला म्हणतात तो अशा मानसिकते मधुन पुढे आला आहे असे मला वाटते. १९३० हा तसा आजच्या समाजासाठी खुपच जुना काळ म्हणावा लागेल. बहुजन समाजाला ब्राम्हणांचे वर्चस्व कधीच मान्य नव्हते वा नाही. आणि का असावे? माझे वैयक्तिक मत असे आहे कि जे शास्त्रात म्हणुन लिहिले होते ते सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणुन देवाचे नाव जोडले गेले. तसेच अस्पृष्यता वगैरे थोतांड हे स्वच्छतेच्या पुरस्कारासाठी पुढे आले. पण ब्राम्हणांनी त्याचा गैरवापर केला. अर्थात सर्वच ब्राम्हण असे होते हे म्हणणे सर्वस्वी चुक ठरेल. मुळातच शिक्षणाचे प्रमाण कमी, मग शास्त्रीय बैठकिचा विचार तर दुरच. असे मंडळ स्थापन होताना शिक्षणाचा प्रसार/प्रचार सुद्धा तेवढाच महत्वचा होता आणि आहे. यामुळे अशा मंडळाची स्थापना करताना मुहुर्त वगैरे बघुन करणे हेच मोठे हास्यास्पद आहे.

जुन्या पिढ्यांनी भारताची लोकसंख्या भरमसाठ वाढवुन ठेवली. भारतातल्या आजच्या बहुतांश समस्यांचे मुळ हे भारताची लोकसंख्या आहे. पण या प्रश्नाकडे तेवढ्या गांभिर्याने बघण्याची मानसिकता कोणातच नाही. समाजमन पुर्वी हि तसेच होते आणि आज सुद्धा तसेच आहे. लोकसंख्येवर नियंत्रण करणे हे फक्त खुल्यावर्गातल्या मध्यमवर्गीयांचे कर्तव्य बनले आहे. त्यावर भाष्य करायला कोणीच तयार नाही. अथवा मुले होणे हि देवाची देणगी आहे हि अंधश्रद्धा आहे असे खास करुन मुसलमानांना सांगायची हिंमत अंनिस मध्ये नक्किच नाही. अथवा त्यांची या अंधश्रद्धेवर श्रद्धा आहे असे आम्ही मानतो.

अंनिस बद्दलच बोलायचे झाले तर नाव स्तुत्य आहे पण कर्म मात्र नेमके काय याचा त्यांनी अभ्यास केला तर बरे पडेल. प्रसारमाध्यमातुन जेवढे समोर येते ते पाहता अंनिस हा बुवाबाजीच्या विरोधात प्रसिद्धी मिळवणारा एक समुदाय आहे. गणेश विसर्जन नदित करु नका म्हणताना १२ महिने २४ तास चालणारे नद्यांचे प्रदुषण यांना चालते. बुवाबाजीला विरोध समर्थनीय आहे पण हिंदुंच्या भावनाना हात घालुन उगाच उथळ प्रसिद्धी मिळवणे हे निंदनीय आहे. समाजमन बदलण्यासाठी अनेक उपक्रम आहेत. लोकांना आपली कर्तव्ये, समाजसेवा म्हणजे नक्कि काय इत्यादी गोष्टी समजावुन सांगणे हे सुद्धा चांगले काम (पुण्यकर्म लिहिता आले असते पण टाळले) आहे. ज्या संघटनेत वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे नक्की काय याचाच वाद आहे त्यांची विज्ञानावर अंधश्रद्धा आहे म्हणणे फारसे चुकिचे ठरणार नाही.

भारतीय समाज तसा आळशी आहे. (हे माझे वैयक्तिक मत.) पण त्या आळसाचे अथवा स्वतःच्या कृत्याचे समर्थन करायला मग अंधश्रद्धा आहेतच. त्या अशा मंडळांमुळे अथवा संघटनांमुळे जातीले असा दावा करणे पटत नाही.

अवांतरः साईबाबांच्या शिर्डीच्या मंदिरात, १० कोटी किमतीचे ९२ किलोचे सिंहासन देणे हि अंधश्रद्धा नाहि का?





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

माझे मत.

अवांतरः साईबाबांच्या शिर्डीच्या मंदिरात, १० कोटी किमतीचे ९२ किलोचे सिंहासन देणे हि अंधश्रद्धा नाहि का?

प्रश्न पैश्याचा नाही. आजही अनेक दरिद्री नारायण असतांना आपण अवाजवी खर्च करत असतो. उदा. लग्न आणि वाढदिवस इत्यादी.

या १० कोटीतुन अनेक विधायक कार्यक्रम होऊ शकले असते.

पैसा

द्वारकानाथजी हा विषय थोडावेगळा आहे. त्यात अंनिस आणि मग अंधश्रद्धा हा विषय आला. त्यामुळे चमत्कार आणि मग साईबाबा. चमत्कारांचे आणि बाबा लोकांचे एक गुढ नाते आहे. या अंधश्रद्धा आणि चमत्कारांवर होणार पैसा हा मुद्दा मी मांडला होता. प्रश्न पैश्याचाच आहे. तो हि अंधश्रद्धे आणि चमत्कारापोटी...
लग्न आणि वाढदिवस यावर खर्च होणारा पैसा, त्याचे समर्थन आणि असमर्थन याची वेगळी चर्चा होउ शकते. माझा प्रश्न हा आहे कि अंधश्रद्धा आणि चमत्कार या बद्दल टाहो फोडणारी अंनिस अंधश्रद्धेचा हा तमाशा कसा काय पाहुन घेते? खर्चाचाच मुद्दा म्हणला तर अनेक स्पर्धांमधुन एस एम एस वर खर्च होणारा पैसा सुद्धा असमर्थनीय आहे. असा एकुण पैसा मोजला तर पायाभुत सुविधांसाठी लागणारा कोट्यावधी पैसा असाच जमुन जाइल.

अतिअवांतरः दरिद्री नारायणांना पैसा देण्यापेक्षा तो पायाभुत सुविधांवर खर्च करने हे देश हितावह नाहि काय?





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

लग्न / वाढदिवस

हे आनंदाचे क्षण म्हणून साजरे केले जातात. जगभर दु:ख असताना ते वारेमाप साजरे करू नयेत असे जरी योग्य असले, तरी ते मुद्दाम अत्यंत साधेपणाने करण्यामागचा हेतू समजत नाही. का आनंदाचे प्रदर्शन अजिबातच करायचे नाही? मध्ये असे झाले की माझ्या घनिष्ठ नातेवाईकांच्या लग्नाचा वाढदिवस हा ७/११ ला आला. त्यांना त्या दिवशी तो "साजरा" करायचे सुचलेच नाही, लक्षात अर्थातच होता. पण जेव्हा दारिद्र्य आणि उपासमार रोजच आजूबाजूला दिसते तेव्हा रोजच असे राहणे कठीण जाईल. आणि मग ते व्रत म्हणून बारा महिने तेरा काळ राहिले पाहिजे. नाहीतर मुद्दाम लग्नाच्या दिवशी साधेपणा आणि इतर दिवशी काही घेणे देणे नाही असे दृष्य दिसेल. हे झालेले मी पाहिले आहे, म्हणून त्यावर लिहावेसे वाटले. असो.

अगदि मनातले बोललात चित्राताई

आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सहमत

चित्रा यांच्याशी सहमत आहे. ओढूनताणून आणलेला साधेपणा नको. शक्य असेल तर पैसे खर्च करणे म्हणजे पाप नव्हे. अर्थात हे कधी आणि कसे खर्च करायचे हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ठरते. जगात बरेच दु:ख आहे म्हणून आपण आनंदित रहायचे नाही अशा कृत्रिम आस्थेचा कुणालाच उपयोग होत नाही. समाजातील दु:खी लोकांसाठी खरेच काही करायचे असेल तर बरेच मार्ग आहेत. आपण आनंदित राहूनही हे करता येते.
इथे गांधीजींचा साधेपणा प्रत्यक्षात किती महाग होता या आशयाचे कुणाचेतरी वाक्य आठवते.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

तौलनिक

चाणक्य,

आपण अगदी तोलून-मोलून प्रतिसाद दिलात. १००% सहमत.

आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अंधश्रद्धा की सुज्ञ आर्थिक विचार?

जुन्या पिढ्यांनी भारताची लोकसंख्या भरमसाठ वाढवुन ठेवली. भारतातल्या आजच्या बहुतांश समस्यांचे मुळ हे भारताची लोकसंख्या आहे. पण या प्रश्नाकडे तेवढ्या गांभिर्याने बघण्याची मानसिकता कोणातच नाही. समाजमन पुर्वी हि तसेच होते आणि आज सुद्धा तसेच आहे. लोकसंख्येवर नियंत्रण करणे हे फक्त खुल्यावर्गातल्या मध्यमवर्गीयांचे कर्तव्य बनले आहे. त्यावर भाष्य करायला कोणीच तयार नाही.

गरीब व्यक्तीला मुले जन्माला घालण्यात आर्थिक फायदा असतो. ज्या शेतकर्‍याची स्वतःची जमीन वाटणीसाठी नाही, त्याच्या घरी अधिक मुले झाल्यास अधिक काम करणारे मिळतात. जोवर मुले मोठी होईपर्यंत जगायची शाश्वती नाही तोवर दोनापेक्षा अधिक मुले जन्माला घालणे सुज्ञपणाच.

भारताने या बाबतीत खूप प्रगती केलेली आहे.
१९७० मध्ये भारतातल्या प्रत्येक १० स्त्रियांना आयुष्यात सरासरी ५६ मुले होत होती. २००५ मध्ये भारतातील प्रत्येक १० स्त्रियांना आयुष्यात २३ मुले होतात. (युनिसेफकडून आकडे) प्रगत देशांत लोकसंख्या टिकवण्यासाठी प्रत्येक १० स्त्रियांना आयुष्यात सरासरी २१ मुले व्हावी लागतात. (कारण कितीही प्रगती केली तरी २१ मधील एक मूल दगावते.)

प्रगत देशांत आर्थिक स्थिती सुधारण्यात (यामुळे जास्त मुले वाचतात, आणि मुलांकडून काम करून लाभ होण्याऐवजी खर्च होऊ लागतो) आणि कुटुंबात कमी मुले जन्माला घालणे आर्थिक दृष्टीने व्यवहार्य होण्यास एक-दोन पिढ्यांचा कालावधी जावा लागतो. मग तोवर जन्मलेली बालके (न मरता) स्वतः जन्म देण्यास समर्थ होतात, आणि आणखी एक पिढी "हम दो हमारे दो" असून लोकसंख्या वाढते. म्हणूनच भारताची लोकसंख्या आणखी वीसेक वर्षे वाढणार आहे.

भारतातली लोकसंख्या स्थिर झाली, की ती अन्य राष्ट्रांच्या मानाने काही फार नाही. आज प्रति-वर्ग-किमी ३२९ इतकी आहे. जपानची ३३९, नेदरलँडची ३९२ तर तैवानची ६३६ आहे.

उलट लोकसंख्या घटायला लागली तर मोठेच आर्थिक संकट येऊ शकेल.

त्यामुळे भारतात लोकांनी लोकसंख्येकडे लक्ष दिले नाही हे तुमचे म्हणणे म्हणजे अगदी कैच्याकैच आहे. याबाबतीत तुम्हाला रस असेल तर भारतातील जनगणनेचा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला आहे, त्याचे परिशीलन करावे.

(का तुमचा मुख्य मुद्दा मुसलमानांना काहीतरी सांगण्याबद्दल होता? त्याही बाबतीत संख्याशास्त्राचा सम्यक विचार करून तुमच्या मुद्द्याची फेरमांडणी करावी. मुसलमानांची फर्टिलिटी हिंदूंच्या पेक्षा साधारण १०-एक वर्षांनी मागे आहे, आणि तितक्याच वेगाने उतरते आहे.)

लोकसंख्या

धनंजय,
लोकसंख्या हा वेगळाचर्चेचा विषय आहे. आपला अभ्यासपुर्ण आणि आकडेवारी सहित असा प्रतिसाद चांगला आहे. आपण ज्या देशांसोबत तुलना केली आहे अथवा आकडेवारी दिली आहे ते देश आणि भारत यांची तुलना खरच होउ शकते का? लोकसंख्येच्या प्रमाणात पायाभुत सुविधा भारतात आहेत का? इतर प्रगत देशांप्रमाणे भारत सरकार वृद्धांचा, मुलांचा आणि स्त्रीयांचा ( बाळंतपणासाठी १ वर्ष पगारी रजा अथवा आठवड्यातले ४ दिवसकाम) सांभाळ करु शकते का? सध्यातरी यातील काहिच नाही हे सत्य आहे.
लोकसंख्या वाढवावी कि नाही हा मुद्दा वेगळा आहे. भारताच्या अनेक समस्यांचे मुळ भारताच्या लोकसंख्येत आहे हे चुक आहे असे मला वाटत नाही.
तुमचे म्हणणे मान्य करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुंना किमान तीन मुले व्हावीत असे जाहिर केले होते. आता हिंदुच का? कारण इतर धर्म प्रगत आहेत. त्यांनी हे समजुनच कृत्य सुरू केले आहे.
शेतकर्‍यांचेच म्हणाल तर शेतकरी हल्ली आत्महत्या करु लागले आहेत. कारणे वेगळी आहेत. पण तुम्ही म्हणता आहात त्या प्रमाणे जिथे शेती करणे अवघड आहे तिथे शेतीकाम येणार कुठुन.
यावर एक उपाय सुचतो, तो म्हणजे भारतीयांनी बेसुमार लोकसंख्या वाढवावी, जगभर पसारा वाढवावा. म्हणजे जगाचीच समस्या नष्ट होइल नाहि का?





हिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात !!
कॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात!!

लोकसंख्या आणि भारत

लोकसंख्या आणि भारत यावर काही मौलिक विचार येथे वाचता येतील.

अंशतः उत्तर

आम्हीच खरे धर्मश्रद्ध इथे बघा. काही मुद्द्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आहे. अंनिस खूप छोटी चळवळ आहे. मिडिया मुळे ती मोठी वाटते.
प्रकाश घाटपांडे

चमत्कार संशोधन केंद्र

गूढ चिकित्सा मंडळाप्रमाणे चमत्कारांचे संशोधन करणारी एखादी संस्थाही असावी. प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा तरी चमत्कार वाटावे असे अनुभव येतात. उदा. भविष्यांतील गोष्टीची पूर्वसूचना मिळणे, अशक्य वाटणार्‍या समस्येची उकल अनपेक्षितरीत्या आपल्यासमोर येणे, न जमणारी गोष्ट अचानक जमू लागणे, इत्यादि. या गोष्टी कुठल्याही बाह्यशक्तीमुळे होत नसून् आपली आपल्याला अज्ञात असलेली कुठलीतरी सुप्त शक्ति कार्यप्रवण झाल्यामुळे होत असतात. आपल्याला अज्ञात असलेली शक्ति, ज्ञातशक्तीच्या कितीतरीपट असते असे म्हणतात. अशा अनुभवांचे संकलन व विश्लेषण करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढल्यास आपल्याला आपल्या अज्ञात अंतःस्थ शक्तींविषयी ज्ञान होईल व त्यांचा जाणीवपूर्वक वापर करण्याचे तंत्र विकसित करता येईल.

संस्था

गूढ चिकित्सा मंडळाप्रमाणे चमत्कारांचे संशोधन करणारी एखादी संस्थाही असावी

.
आहे ना अमेरिकेत इथे बघा. भारतात अंनिस आहे . इथे बघा. सद्ध्य एवढे पुरे. अजून ही आहेत. काही राज्यात स्थानिक पातळिवर.
प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा

यावरून नुकतीच वाचलेली बातमी आठवली. (बातमी जरी टाइम्स ऑफ इंडियाची असली तरी खरी आहे.) ब्रिटनमधील भारतीयांना अजूनही इतर भारतीयांकडून जातिभेदाची वागणूक मिळते आहे. यावरून असे वाटते की आपल्या देशातील एक सर्वात गंभीर अंधश्रद्धा म्हणजे जात. याबद्दल अंनिस किंवा इतर संस्था काही करत आहेत का याची कल्पना नाही.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

 
^ वर