डेटाबेस म्हणजे काय रे भाऊ?

रिलेशनल डेटाबेस असे म्हटले की दचकुन मागे फिरणा-यांची संख्या खूप आहे. ओरेकलमुळे कदाचित असे होत असेल, पण 'एसक्यूएलाईट' नावाचा अलिकडील प्रकार इतका सोपा आहे की कोणीही (हो, अगदी शाळकरी मुलगा देखील) थोड्याशा मार्गदर्शनाने हवा तेवढा विदा धुंडाळू शकतो, त्याची व्यवस्था लावू शकतो. हे वापरण्याकरता आपल्याला फायरफोक्समधील एक वाढ-घटक (extension) येथून उतरवून घ्यावे लागेल.
आपले पत्ते, फोन नंबर, बैंकबुक असे काहीही यात साठवून ठेवता येते. आपण म्हणाल त्यात काय मोठेसे? एक्सेल आहेच की. पण एक्सेल शिकणे हे नवीन माणसाला सोपे नाही. आणि जुन्या लोकांना त्यातील त्रुटी माहीत आहेत. त्या अशा...
१) एका पानावर सुमारे ६३,००० रेकॉर्ड मावू शकतात. त्याहून अधिक असले तर नवीन पान घ्यावे लागते. व असे केले तर दोन्ही पानांचा ताळमेळ घालणे कठीण होऊन बसते.
२) एका पानावरून इतर पानांवरील विदा मागवता येत नाही.
३) एकावेळी एकच माणूस त्या फाईलवर काम करू शकतो.
एसक्यूएलाईटच्या एकाच टेबलमध्ये कितीही विदा भरता येतो. एका टेबलवरून इतर टेबलमधील विदा सहजगत्या मागवता येतो. एकाच वेळी अनेक माणसे यात विदा भरण्याचे/ वाचण्याचे काम करू शकतात.

ही विदागार प्रणाली मुक्त व मोफत आहे हे वेगळे सांगायला नकोच! अधिक माहिती...
http://oksoft.blogspot.com/2007/11/sqlite-manager-best-thing-since-slice...

Comments

उपयुक्त माहीती..

धन्यवाद शंतनू,

ही माहीती खूपच उपयुक्त वाटली. (लहान गोष्टींसाठी) मायसिक्वल पेक्षा ह्याचा उपयोग नक्कीच चांगला होऊ शकेल असे दोन्ही पडताळून पाहताना वाटले.

हा विषय तांत्रीक आहे, आपल्या ब्लॉगवरील उदाहरण आहे ते भारताशी संबंधीत आहे. थोडक्यात एकाच वेळेस आम्ही तांत्रीक तांत्रीक आणि भारत भारत सहजतेने म्हणू शकलो :) क्या बात है!

एस-क्यू-एल लाईट 'च'

>> फायरफॉक्स एस-क्यू-एल लाईट सदृष
सदृष नव्हे, एस-क्यू-एल लाईट च वापरले जाते. वेगळ्या प्लगिनची गरज अशासाठी की त्याला जी. यू. आय. (ग्राफीकल यूजर इंटरफेस) यापूर्वी नव्हता. तो आता उपलब्ध आहे. म्हणजे असे पहा, 'डॉस' वापरून देखील आपण आपल्या संगणकावरील फाईल्सची व्यवस्था लावू शकतो पण बहुतेक लोक विंडोजचा एक्सप्लोअर वापरतात. तसे हे प्लगिन विदागाराचा फाईल मॅनेजर आहे असे समजा!

धन्यवाद

फार उपयुक्त माहीती आहे. घरच्या संगणकावर आजच गेल्या गेल्या वापरून बघतो :)

मी देखील

मी तशी excel ची फ्यान आहे - बारीकसारीक गोष्टींना मस्त आहे ते. पण हेही वापरून बघीन. धन्यवाद.

चुकीची माहिती

शंतनु,
चुकीची माहिती इतक्या ठाम पणे देत आहात्, तुम्ही संगणक अभियंते तर नाही? SQLLite छान आहे पण इतर् माहीती चुकीची आहे.

१. एक्सेल् २००३ - ६५५३५ रेकॉर्ड बसतात - ६३००० नव्हे. - २००७ च्या एक्सेल मध्ये हि कमतरता नाही.
२. एक्सेल मध्ये एका पानावरची विदा इतर् पानांवर बघु शकतात. "excel formulas" असे त्याला म्हणतात.
३. एक्सेल मध्ये एकावेळी बरेचजण काम पण करु शकतात - "Sharing Options" बघा.

आणि जर "Google Spreadsheet" वापरुन् बघाल तर अशा कशाचीही गरज पडणार नाही.

मी मराठी माणूस

तरी एक्सेलचे तोटे

माझ्याकडे नवीन कोणी काम करायला आले की त्यांना विदा ठेवायला एक्सेल आवडते. पण एक्सेलमध्ये (वापरणार्‍याच्या चुकीमुळे) विदा बिघडणे कधीतरी होतेच. वापरणार्‍याला चूक करण्यास कमीतकमी संधी देणे, तरी माहीतगाराला काय वाटेल ते करू देणे कळीचे.
मी शक्यतोवर माझ्याबरोबर काम करणार्‍यांना ऍक्सेसचे नुसते तक्ते का होईना, वापरण्यास उद्युक्त करतो.
माझे बहुतेक काम एका तक्त्याच्या (फ्लॅट डेटाबेस) त्या मानाने छोट्या विदागारात चालते ( बहुतेककरून १०-२० मेगाबाईट, जास्तीत जास्त १००-२०० मेगाबाईट). त्यामुळे मी संशोधनकामाचे विदे माझ्या सांख्यिकीच्या प्रणालीला (स्टॅटिस्टिकल प्रोग्रॅमला) सहज भेटतील असेच, त्या प्रणालीच्या खास विदागारात ठेवतो. पण तो वापर बहुतेक लोकांना उपयोगाचा नाही.
तरी आजकाल जनुकांचे बृहद्-विदे वापरण्याची वेळ आली की आमच्या येथील त्या बाबतीतल्या तज्ञाकडे जातो. स्वतःच्या कुवतीबाहेर शंका उत्पन्न झाल्यास - सल्ला घ्यावा, हेच खरे!

आमचे डेटाबेसवाले तेच वापरतात

आमचे जनुकांचे मध्यवर्ती विदागार सिक्वेल वापरते.

यासाठी

वापरणार्‍याला चूक करण्यास कमीतकमी संधी देणे, तरी माहीतगाराला काय वाटेल ते करू देणे कळीचे.

Matlab वापरून पाहिले आहे का? तुमच्या विद्यापीठात तर उपलब्ध असेलच.

मॅट्लॅब पूर्वी वापरत असे

हल्ली स्टेटा वापरतो.

काही प्रश्न

१. ओडीबीसी ड्राइव्हर् उपलब्ध आहेत का ?
२. आन्सी सीक्वल ला पुर्ण सपोर्ट आहे का ? त्याची स्वत:ची वेगळी सबसेट असलेली सीक्वल आहे का ? असेल तर् डॉकुमेन्टेशन उपलब्ध आहे का ?
३. लायससिंग इश्यु ? (डेव्हलप्मेंट + डिस्ट्रिबुशन)
४. ही प्रणाली फाइल बेसड आहे का सर्वर बेसड् ?

उत्तम प्रश्न

१. ओडीबीसी ड्राइव्हर्
२. आन्सी सीक्वल ला पुर्ण सपोर्ट आहे का ?
नाही. जो फरक आहे तो येथे दिला आहे. तसे पाहिले तर मायसीक्वेल, ओरॅकल, एस-क्यू-एल सर्व्हरदेखील आन्सी मानकाशी १००% प्रामाणिक नाहीत. डॉकुमेन्टेशन येथे उपलब्ध आहे तसेच माझ्या ब्लॉगवरदेखील अधिक माहिती मिळू शकेल.
३. लायससिंग इश्यु ? (डेव्हलप्मेंट + डिस्ट्रिबुशन)
यात ही प्रणाली इतर प्रणालींपेक्षा खूपच पुढे आहे. मोफत, मुक्त सोर्स. इतकेच नव्हे आपण आपल्या प्रणालीत हिला सामावून घेऊ शकता. फायरफोक्स वापरणा-यांना माहितही नाही की आपण नकळत एस-क्यू-एल लाईट वापरत आहोत.
४. फाइल बेस्ड.

धन्यवाद

उत्तम मार्गदर्शन.

उत्तम माहीती

वा,
उत्तम माहीती, अजून विस्ताराने सिक्वल व त्याचा वापर यावर एक लेख आल्यास अवडेल.
लेखाचे शीर्षक व लेख हे मात्र वेगवेगळे आहेत असे वाटले.

-निनाद

मला काही

शंतनुराव,

आपला लेख व इतरांचे प्रतिसाद वाचून आम्हीही ही 'भानगड' करण्याचा प्रयत्न केला. पण ती काही जमत नाही बॉ.
तुम्ही जरा क्रमवार मार्गदर्शन करा पाहू...
त्या 'माय यसकुएल' च्या फाईल माझा संगणक काही ओळखत नाही बहुतेक. शिवाय ते टाकायचे कसे? वापरायचे कसे?
आपल्या लेखाचे टायटल वाचून आम्हाला वाटले की आपण आम्हाला आता डाटाबेस ही भानगड समजावून देणार आहात...
पण मला तर काही कळले नाही.
डाउनलोड तर केले मी... फा फॉ. पण टाकले... त्याचे कसले कसले प्लग इन् पण टाकले आता काय करू?
कसे वापरायचे हे? चालू कुठुन करायचे?

मग त्यात काय काम करायचे?

जरा क्रमवार सांगा ना राव एकदा...

बाकी कुणाला हे जमले आहे का?
आपला
संगणकीय 'ढ'
गुंडोपंत

क्रमवार मार्गदर्शन

फायरफॉक्स प्लग-ईन इन्स्टॉल केले आहे का? नसल्यास येथून उतरवून घ्या.

एक डेटाबेस उदाहरण म्हणून उतरवून घ्या...

१) फायरफोक्स सुरू करा.
२) टूल्स मधून 'एस. क्यू. एल लाईट मॅनेजर' या पर्यायावर टिचकी द्या.
३) आता जी खिडकी उघडेल त्यात 'ओपन डेटाबेस' या चित्रावर टिचकी द्या.
४) मी वर दिलेली झिप फाईल अनझिप करून हार्डडिस्कवर कुठेतरी ठेवा. त्यातील वर्ल्ड६ या फाईलचा पाथ द्या.
५) आता वर्ल्ड६ या डेटाबेसमधील ३-४ टेबल्स डाव्या बाजूला उघडलेली दिसतील. त्यातील एकावर टिचकी मारा व त्यात माहिती भरा/ माहिती काढा. त्या टेबलवर उजवी टिचकी देऊन ते टेबल कोपी करा अथवा रिकामे करा.
६) स्वतःचा नवीन डेटाबेस तयार करण्यासाठी 'न्यू डेटाबेस' वर टिचकी देऊन त्याचे नामकरण करा. मग 'क्रिएट टेबल' या चित्रावर टिचकी देऊन आपल्याला पाहिजे तितक्या उभ्या रांगा तयार करा. डावीकडील तयार टेबलवर टिचकी देऊन 'ब्राऊज ऍन्ड सर्च' या टॅबवर टिचकी द्या. आता 'ऍड रेकोर्ड' वर टिचकी देऊन नवीन रेकॉर्ड भरा.

धन्यवाद!

वा आता कसे
अगदी पाककृतीसारखे क्रमवार जमून आले आहे. ;))

काय होते कळवतोच!
आपला
गुंडोपंत

 
^ वर