मेहंदी लावली म्हणून.

सध्या पुण्यात एक गोष्ट गाजत आहे. दस्तूर नावाच्या शाळेत काही मुलींनी मेहंदी लावली म्हणून शाळेतून ७ दिवसासाठी काढण्यात आले. काही जागृत कार्यकत्यांनी त्यात हस्तक्षेप केला म्हणून शाळेने ही कारवाई मागे घेतली.

या दरम्यान शाळेने या सर्व विद्यार्थींना शाळेबाहेर उन्हातान्हात उभे केले होते आणि बरीच दमदाटी केली असेही वृत्त आहे.

मागेही कधीतरी कुंकु लावले, गजरा लावला, मेहंदी काढली म्हणून कारवाई झाल्याचे आठवते.

यात नेमके कोणाचे चूकत आहे? यात लहान मुलांना वेठीस धरले जात आहे असे मला वाटते.

Comments

उद्देश कळला नाही बॉ !

शाळेत कानातले घालून येऊ नये,पायात चांदीचे चैन घालू नये, दागिणे घालू नये, असे म्हणण्यामागे कोणी वेगळे वाटू नये आणि कोणी कोणापेक्षाही उच्च कनिष्ठ असे वाटू नये म्हणून असे प्रयोग ते करीत असावे असे वाटते. पण मेहंदीच्या बाबतीत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेचा काय उद्देश असावा ते मात्र कळत नाही बॉ !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काहीच वावगं नाही..

मागेही कधीतरी कुंकु लावले, गजरा लावला, मेहंदी काढली म्हणून कारवाई झाल्याचे आठवते.
यात नेमके कोणाचे चूकत आहे? यात लहान मुलांना वेठीस धरले जात आहे असे मला वाटते.

शाळेत जाणार्‍या मुलींनी कुंकू लावणे, गजरा माळणे, मेहेंदी काढणे यात व्यक्तिश: मला तरी काहीच वावगं वाटत नाही. अर्थात, शाळेच्या 'कोड ऑफ कंडक्ट ऍन्ड डेर्सकोड' या सदरात जर वरील गोष्टी बसत नसतील तर मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी हे नियम पाळले पाहिजेत असं वाटतं!

तरीही वरील कारणांवरून मुलींना वेठीस धरणे केव्हाही गैरच आहे आणि अश्या वेठीस धरणार्‍या संबंधितांना चांगले फटकावूनच काढले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे...

तात्या.

कसले कोड

आहो तात्या कसले आहे कोड आन कसले कंडक्ट... आपल्या सारख्या सरळ माणसांची दिशाभूला आहे यात.

माझ्या भाच्यांच्या शाळेत सुद्धा हे असले प्रकार झाले होते. मुलींच्या टिकल्या, बांगड्या वर बंदी आली होती. स्वतः मास्तरडे मात्र गळ्यात क्रॊस घालून असत. त्यांचा तो पाद्री-हेडमास्तर तर पाद्र्यांच्या वेषात असे. त्याला असा आम्ही पालकांनी मिळून असा फैलावर घेतला की विचारु नका. झाला सरळ गाढवीचा. आता त्याने नवीनच नाटक काढले आहे. दिवाळीच्या सुटीत काही तरी प्रोजेक्ट आहे म्हणे. त्यानुसार मुलांना बायबलातील नाटकावर प्रशिक्षण घेण्यासाठी एका प्रशिक्षण केंद्रात (तेही दुसया एका चर्च मध्ये) जायचे आहे व ते नाटक ख्रिसमसला साजरे करायचे आहे. भयंकर बाब म्हणजे यात भाग न घेणारे विद्यार्थि सामाजिक विषयामध्ये "अनुत्तिर्ण" होणार आहेत. आग्याच्या फोकाने फटके मारले पाहिजेत या असल्या शिक्षण-व्यावसायिकांना.

आपला,
(उद्विग्न) भास्कर
आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

कॉन्व्हेन्ट

>मुलींच्या टिकल्या, बांगड्या वर बंदी आली होती.
पाल्यांच्या सांस्कृतिक हक्कांबद्दल जागरूक पालकांनी पाल्यांना सुसंस्कृत शाळांत घालावे.

>स्वतः मास्तरडे मात्र गळ्यात क्रॊस घालून असत.
कॉन्व्हेन्टच्या मास्तराच्या गळ्यात क्रॉस असायचाच. नसता तर मनपा शाळा नं. ४ नसते म्हटले ?

>(तेही दुसया एका चर्च मध्ये)
दुसर्‍या म्हणजे? ही शाळा देखील चर्चच आहे काय? असेल तर पाद्री असायचेच.

>भयंकर बाब म्हणजे यात भाग न घेणारे विद्यार्थि सामाजिक विषयामध्ये "अनुत्तिर्ण" होणार आहेत.
हा बाकी अतिरेक आहे.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

जागरूक पालक

>पाल्यांच्या सांस्कृतिक हक्कांबद्दल जागरूक पालकांनी पाल्यांना सुसंस्कृत शाळांत घालावे.
--- हीच तर खरी गोम आहे. आजकाल पालकांचाच असा बुद्धिभ्रम झालेला असतो की कॉन्व्हेन्टच्या अथवा कॉन्व्हेन्ट-विचारसारणीच्या शाळेत शिकल्यानेच जणू मुलांचे भले होणार नाहीतर त्यांच्या जीवणाचे मातेरे. अशा पालकांना या शिक्षण व्यावसायिकांनी आपल्या जाळ्यात चांगलेच ओवले आहे.

>स्वतः मास्तरडे मात्र गळ्यात क्रॊस घालून असत.
कॉन्व्हेन्टच्या मास्तराच्या गळ्यात क्रॉस असायचाच. नसता तर मनपा शाळा नं. ४ नसते म्हटले ?
--- (उत्तर खाली दिले आहे)

>(तेही दुसया एका चर्च मध्ये)
दुसर्‍या म्हणजे? ही शाळा देखील चर्चच आहे काय? असेल तर पाद्री असायचेच.
--- ती शाळा एका चर्चने चालवलेली आहे पण त्यांना सरकारी अनुदान मिळते. त्यामुळे पाद्र्याला मुख्याध्यापक बनवन्यापेक्षा जाहिरात-मुलाखटती प्रक्रियेतून त्यांनी तो घ्यायला पाहिजे. पण ते तसे का नाही हे एक कोडेच आहे. दुसरे उदाहरण घ्या, त्याच शहरात एका हिंदू धार्मिक संस्थेने चाललवलेली शाळा आहे. त्या शाळेत मात्र गुरुपौर्णिमा व सरस्वतीपुजा सक्तिची करता येऊ शकत नाही असे त्या शाळेच्या सुत्रांकडून कळते. असे दुटप्पी धोरण का असावे?

आपला,
(जागरुक) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

अनुदान

सरकार मदरश्यांनाही अनुदान देते :)

>त्या शाळेत मात्र गुरुपौर्णिमा व सरस्वतीपुजा सक्तिची करता येऊ शकत नाही असे त्या शाळेच्या सुत्रांकडून कळते.

शाळा 'गुरुकुल' स्वरुपाची नसावी किंवा 'अल्पसंख्यांकासाठीची शैक्षणिक संस्था' देखील नसावी. पुन्हा मेंदी हा बुरख्याप्रमाणे (धार्मिक पण विवादास्पद) किंवा शिखांच्या पगडी सारखा (धार्मिक) मुद्दा नसल्याने, तुलना योग्य नाही असे वाटते.

शिवाय एखादी गोष्ट करण्याची परवानगी न देणे (जी धर्माचा अविभाज्य नाही, जसे मेंदी, गजरा, काजळ) व एखादी गोष्ट सक्तीची करणे (जी धर्मविशिष्टाशी संबंधित आहे, जसे आपल्या उदाहरणातील नाटक, क्रॉस, जे निषेधार्ह आहे.) या दोहोंमध्ये फरक आहे असे वाटते.

त्याच्या अनुदानित, असरकारी शाळांत सरस्वतीपूजन, शनिवारच्या मारुती पुजा चालत. पूजन सक्तीचे करणे म्हणजे नेमके काय हे कळले नाही. असे पूजन सारे हिंदूही करत नसल्याने ते सक्तीचे नसावे. आपल्या उदाहरणातील सक्ती सार्‍या हिंदूनाही कितपत मानवेल याबद्दल साशंकता आहे. हिंदू धर्माचे स्वरूप पाहता एखादी गोष्ट, वेशभूषा, आचारपद्धती पूर्ण धर्माची म्हणून मान्य होणे कठीण दिसते.

जाताजाता : इथे ब्रिटिश एअरवेज संबंधिचा नुकताच घडलेला पिअर्सिंग चा किस्सा आठवल्या वाचून राहात नाही.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

सांगा ना

त्याच शहरात एका हिंदू धार्मिक संस्थेने
कोणते शहर? कोणती शाळा?

स्वतः मास्तरडे मात्र गळ्यात क्रॊस घालून असत

कोणते? कधी?
माहीती पूर्ण द्याना.
नावे घ्यायला का लाजताय म्हणे?

आपला
गुंडोपंत

जालना

ती शाळा जालन्यात आहे. मास्तरांची नावे भाच्यांना विचारून सांगतो.

व्हिम

असे प्रकार परदेशात झाल्याचे वाचले होते. आयर्लँडमध्ये पोलिस दलाच्या भरतीमध्ये एका शिख तरुणाला फेटा घालण्याची परवानगी दिली नव्हती. फ्रान्समध्येही मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना अशी अडचण आली होती. भारतासारख्या "सर्वधर्मसमभाव" तत्वाच्या देशात असा प्रकार व्हावा ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्यातही मेंदी लावणे ही सणासुदीला, लग्नसराईत अत्यंत साधी आणि नेहेमी केली जाणारी गोष्ट आहे. तिला बंदी असावी हे पटत नाही. इथे हा प्रश्न उपस्थित होतो की असा जर शाळेचा नियम असेल तर त्यामागचे नेमके कारण काय? आणि जर मेंदी लावणे नियमभंगात बसते तर कुंकु लावणे, मंगळसूत्र घालणे याही धार्मिक गोष्टी आहेत, त्यांचे काय? या शाळेतील विवाहित शिक्षिकांना याची परवानगी आहे का?
नियम आपले रोजचे जगणे अधिक सुकर व्हावे यासाठी असतात. कुणा एखाद्याची/एखादीची व्हिम या एकमेव कारणासाठी जर असा विक्षिप्त नियम असेल तर तो बदलायची गरज आहे. आणि केलेला नियम बदलू नये असा कुठेही नियम नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हो

जर मेंदी लावणे नियमभंगात बसते तर कुंकु लावणे, मंगळसूत्र घालणे याही धार्मिक गोष्टी आहेत, त्यांचे काय? या शाळेतील विवाहित शिक्षिकांना याची परवानगी आहे का?
--- हो, प्राप्त माहिती नुसार त्या शाळेतल्या शिक्षिका हे सगळे करतात.

आपला,
(जागरुक) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

मेंदी

मेंदी धार्मिक नसावी. पानाप्रमाणेच ती मुसलमानांकडून हिंदूंनी उचलली असावी. मंगळसुत्राप्रमाणेच बुरख्याला धार्मिक अधिष्ठान असल्याने (?) मुद्दे तुल्यबळ असावेत.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

शिस्त

शाळेच्या शिस्तीचा हा भाग असू शकतो. विद्यार्थिंनींचे लक्ष अभ्यासात असण्यापेक्षा इतर गोष्टींमध्ये असू नये. इतर मुलींचेही लक्ष सगळ त्या मेंदीकडे ,तुझी मेंदी पाहू, तुझी जास्त् रंगली की माझी? अशी कारण असू शकतात.

अभ्यास म्हणजे काय?

मंजू ताई,

आपणास येथे "अभ्यास" म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे? केवळ पुस्तकी पोपटपंची म्हणजे अभ्यास की जीवनाच्या सर्व कांगोर्‍यांबद्दल असणारे ड्न्यान म्हनजे अभ्यास? जर द्न्यानच मिळवायचे आहे तर ते प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळत असते. मेहंदीचेच उदाहरण घ्या. बालपणी आम्ही मेहंदीच्या झाडाची पाने तोडून त्यांच्यापासून मेहंदी काढून लावायचो. त्यात खूप आनंद वाटायचा, बालसुलभ जिद्न्यासेने अनेक प्रश्न मनात यायचे. मेहंदीचेच पान का रंगते.?त्याच्यासारखेच दिसणारे डाळिंबाचे का नाही रंगत? मेहंदीची लागवड आपण कधिपासून करतो? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता कितीतरी सामन्य द्नान मला मिळाले होते.

मला सांगा, ह्या असल्या फुडतूस नियमांच्या नावाखाली आपल्या चिमुरड्यांच्या आयुष्यातून हे असे छोटे छोटे आनंद हिरावून घेण्याचा तसेच त्यांच्या बालसुलभ जिद्न्यासू वृत्तीला आळा घालून त्यांची नैसर्गिक वाढ थांबवन्याचा आपल्याला काय अधिकार आहे.

बाल मनांशी खेळणाया त्या मास्तरणीला पाठीशी घालण्या ऐवजी आपण सर्वांनी तिला लोकशाही मार्गाने चांगला धडा शिकवला पाहिजे जेणेकरुन अशा चुका पुन्हा हे लोक करणार नाहीत.

माफ करा मला द्न्यान हा शब्द टंकित करणे जमत नाहीये.

आपला,
(उद्विग्न) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

का रंगते?

>मेहंदीचेच पान का रंगते.?

प्रश्न शैक्षणिक उत्सुकतेपोटी विचारला आहे. गैरसमज नसावा. याविषयी कविकल्पना बर्‍याच असाव्यात पण उत्तराबद्दल वाचायला आवडेल.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

मेंदी रंगते कारण..

तुम्ही हे वाचले असेलच.

अप्रस्तुत

>आपणास येथे "अभ्यास" म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे?

'मेंदी लावू दिल्याने देखील शाळेच्या अभ्यासाबद्दलच्या अपेक्षा बदलणार्‍या आहेत' असे न वाटल्याने मुद्दा पटला तरी अप्रस्तुत वाटला.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

मेंदी, कंकू, बांगड्या इ.

(काही किरकोळ अपवाद वगळता)ज्या वस्तूंचा शाळेच्या गणवेशात समावेश नाही त्यांचा वापर कुठल्याही शाळेत निषिद्ध असतो. सर्व विद्यार्थी सारखेच दिसावेत, त्यांच्या पोषाखात, 'फॅशन'मध्ये फरक असू नये हा मूळ साधा हेतू आहे. हा नियम शिक्षकांना लागू नाही, कारण त्यांना गणवेश नाही. तरीसुद्धा अनेक मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षिकांना पंजाबी पोषाक घालता येत नाहीत. त्या इतर शिक्षिकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या दिसू नयेत, हा उद्देश. प्रवासाला सोईस्कर म्हणून अनेक शिक्षिका घातलेला पंजाबी पोषाख शाळेत आल्यावर बदलतात. असे नियम असण्यात शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे भलेच असते.
मेंदीचा रंग उतरेपर्यंत मुलींना शाळेत प्रवेशबंदी न्याय्य आहे. पालकांना माहीत असून केवळ खोट्या संस्कृती -अभिमानाने ते ही आगळीक करतात. --वाचक्‍नवी

+१ मस्त.

सुरेख प्रतिसाद.
आजकाल कशाने भावना दुखतील सांगता येत नाही.

पिंपरी चिंचवडचे नाव न्यू पुणे करण्याचे योजल्याने आमची पण भावना दुखावली गेली आहे. याचे प्रायश्चित्त म्हणून हे नवे बारसे सुचवणार्‍या अजित पवारांचे नाव न्यू शरद पवार असे करणे सयुक्तिक ठरेल. याशिवाय पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने निगडी-आकुर्डी-कासारवाडी-दापोडी-भोसरी-वाल्हेकरवाडी-थेरगाव-सांगवी-काळेवाडी परिसरासह संयुक्त पिंपरी-चिंचवड हे स्वतंत्र राज्य करुन त्याची राजधानी चिंचवड ष्टेशन येथे करण्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत.


आम्हाला येथे भेट द्या.

चिंचवड?

याला आमचा विरोध आहे. पिंचवड नावाचे एक नवीन नाव अगोदर जगाच्या नकाशावर कोरावे, त्या गावची वेगळी संस्कृती आहे असे पुन्हा पुन्हा सांगून, लिहून, छापून, भाषणे देऊन, मोर्चे काढून, घोषणा देऊन सिद्ध करावे आणि ते मग शहर पिंपरी-चिंचवड देशाची राजधानी म्हणून घोषित करावे. चिंचवड ष्टेशनला राजधानी म्हणून आम्ही कदापीही खपवून घेणार नाही.--वाचक्‍नवी

संयुक्त पिंपरी चिंचवड

पिंपरी आणि चिंचवड ही दोन्ही गावे इतर लहानसहान गावांच्या सोबत आधीपासूनच जगाच्या नकाशावर आहेतच. मोरया गोसावी, चाफेकर बंधू, संत तुकाराम, आझम पानसरे, काळूराम शिंदे आणि गजानन बाबर ही इथल्या मातीची सुपुत्रे. भारतात जशी विविधतेत एकता आहे तशी पिंचवडमध्ये निगडी-आकुर्डी-कासारवाडी वगैरे गावे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. तिथल्या गावकर्‍यांनी मोठ्या मनाने परिसराचे नाव पिंपरी चिंचवड करण्यास परवानगी (आधीच) दिली आहे.

एका बाजूला बिग बाजार, क्रोम, ऍडलॅब सारखी आधुनिक तीर्थक्षेत्रे (तिथे पे पार्किंग असल्याने आम्ही गाड्या रस्त्यावरच पार्क करतो!) व दुसर्‍या बाजूला आनंदनगर झोपडपट्टीत गणपती-नवरात्र-दहीहंडी-काळूराम शिंदे वाढदिवस आदी महत्त्वाच्या सणांच्या दिवशी रात्री १० पर्यंत २०० स्पीकर्स लावून रस्त्यावर चालणे-बोलणे अवघड करणारे संस्कृतीजतन असा जुन्या नव्यांचा हृद्य संगम दुसरीकडे कुठे पहायला मिळेल?

आता काल भुईतून उगवलेले न्यू. शरद पवार ऊर्फ अजित दादा आणि आयुक्त दिलीप बंड यांनी गावाचे नाव बदलण्याचा खटाटोप कशासाठी करावा? आम्हालाही श्री. बंड यांचे नाव आवडत नाही म्हणून त्यांचे नाव बदलण्याचा आम्ही आग्रह धरतो का?

नाव बदलण्याने काय फरक पडणार आहे? निष्कारण कागदपत्रांचे पुनर्मुद्रण करावे लागेल. लोकांना दुकानावरच्या पाट्या बदलाव्या लागतील. बशींचे फलक बदलावे लागतील. त्यापेक्षा ते पैशे दुसरीकडे वापरावेत. अन्यथा संयुक्त पिंपरी चिंचवड मागणी अटळ आहे.

जय मोरया गोसावी, जय चाफेकर बंधू, जय पिंपरी चिंचवड!


आम्हाला येथे भेट द्या.

पाट्या बदलणे

कुठल्याही दुकानावर किंवा बसवर पिंपरी-चिंचवड अशी पाटी नसते. बॉम्बे चे मुंबई केले तरी बॉम्बे हॉस्पिटल. बॉम्बे स्टेशनरी मार्ट, बॉम्बे बझार अशा दुकानांची नावे बदलत नाहीत. पिंपरीचे किंवा चिंचवडचे नाव बदलत नाही आहे. पिंपरीची साठ वर्षाची प्राचीन संस्कृती किंवा चिंचवडची मोरया गोसावीपासूनची संस्कृती अबाधित रहाणार आहे. आजच्या सकाळमध्ये ज्यांचे मत छापून आले आहे असे श्री.संतोष चाळके(अध्यक्ष, जमीन बळकाव कृती समिती) हे म्हणतात की नाव बदलण्याने भोसरी, दिघी , बोपखेल, कळस इत्यादी गावांची संस्कृती(?) नष्ट होणार आहे आणि त्यांचे अस्तित्व(?) मिटणार आहे. इतिहासाचे अभ्यासक(?) प्र. रा. अहिरराव लिहितात की ब्रिटिशांनी केलेल्या इंडियाचे आपण भारत केले. अगाध ज्ञान! 'इंडिया' इसवी सनाच्या पहिल्या शतकापूर्वीपासूनचे नाव आहे. तेव्हा ब्रिटिश हे नाव तरी असेल का? इंग्‍लंड तेव्हा रोमन साम्राज्याचा भाग होता. जगाच्या नकाशावर पिंपरी-चिंचवड नावाचे गाव नाही हे या इतिहास‍अभ्यासकांना माहीत नाही का?

मुळात पिंपरी-चिंचवड असे नाव ठेवायला नको होते. हल्ली मोठ्या नावांची फ़ॅशनच झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर, मीरा-भायंदर, बर्वे-इनामदार, कुबल-आठल्ये इत्यादी इत्यादी. ही प्रथा लवकरात लवकर मोडून काढली पाहिजे. या गावांच्या महापालिकांची नावे अनुक्रमे कलवली महापालिका, भिनिपूर , भामिरा अशी ठेवली तर काय जगबुडी होणार आहे देव जाणे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत एक प्राधिकरण(म्हणजे ऍथॉरिटी) नावाचे कार्यालय आहे. पण हे न उमजून लोक या वस्तीलाच प्राधिकरण म्हणतात. प्राधिकरण या नावाचे पोस्ट ऑफिस नाही. पोस्ट ऑफिसचे नाव आहे-पीसीएन्‌टी. अर्थात तेच गावाचे अधिकृत नाव आहे, हे या पत्रलेखकांना माहीत नसेल तर ते त्यांचे घोर अज्ञान आहे. परवा निगडीचा पिनकोड, मला हे नाव माहीत असल्यामुळेच शोधता आला; ज्यांना नाव माहीत नसे त्यांनी कसा शोधावा? कोथरूडहून प्राधिकरण नावाची पाटी असलेली बस पुणे-मुंबई महामार्ग येईपर्यंत रिकामी असते. कारण प्राधिकरण म्हणजे काय कोण जाणे? हे गाव फारच थोडे लोक जाणतात .
तेव्हा माझे मत पिंचिंभोनिआकादिबोक या गावाचे नाव बदलून 'नवीन पुणे 'करावे..लवकरात लवकर.---वाचक्‍नवी

विनोद आणि पाट्या बदलणे

इथे आजानुकर्णांची विनोदबुद्धी दिसून येते आहे - त्याचे मुद्देसूद उत्तर देऊ नये असे वाटते. दिलखुलास हसावे!

"प्राधिकरण" वगैरे प्रकारात आपण ऐतिहासिक विनोद पाहावा, असे वाटते. मध्यप्रदेशात "महू" नावाचे गाव आहे - ते एम्-एच्-ओ-डब्ल्यू या इंग्रजी आद्याक्षरांवरून आले आहे - मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर. या असल्या गोष्टी तर्कशुद्ध नसतात. काही नावे बदललेली लोक स्वीकारतात, काही लोक स्वीकारत नाही. लोक स्वीकारतील ते नाव कसेतरी रूढ करून घ्यावे लागते. मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे (पूना चे), नवी दिल्ली (एका नव्या बांधलेल्या शहराचे), गांधीनगर, नवी मुंबई लोकांनी स्वीकारले. पण न्यू ओखला हे न स्वीकारता "नॉयडा" का स्वीकारले ते कोणास ठाऊक. "वास्को" ला संभाजीनगर असे गोव्यातले शिवसैनिकही म्हणत नाहीत.

पिंपरी चिंचवड

मी थोडी टर उडवण्यासाठी लिहिले होते. पण तुमचा विस्तृत प्रतिसाद पाहून राहवले नाही म्हणून लिहितो.

पिंपरी चिंचवडचे नाव न्यू. पुणे करण्याचे कारणे ते नाव लिहायला-छापायला गैरसोयीचे आहे असे नसून शहराचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे होण्यासाठी पुणे या नावाचा फायदा घेता येईल असे श्री. बंड यांचे म्हणणे आहे. पण शहराचे मार्केटिंग करण्यासाठी नाव बदलणे हास्यास्पद आहे असे वाटते. वाहतूक-पाणी-वीज-रस्ते या सुविधा व्यवस्थित दिल्या की आपोआप तिथे उद्योगधंदे येतील.

दहा वर्षांपूर्वी हिंजवडीचे नाव (जागतिक पातळीवर) कोणाला माहिती होते का? पिंपरी चिंचवड असे नाव असतानाही टेल्को, बजाज ऑटो, थरमॅक्स, एक्साईड आदी कंपन्या इथे आल्याच ना? (आता जात आहेत त्याचे कारण जकात वगैरे दुसरे आहे. )

पिंपरी-चिंचवड या नावाचे एक गाव नाही हे मान्य. पण पिंचिंभोनिआकादिबोक परिसरातील व बाहेरील लोकही या परिसराला पीसीएमसी किंवा पिंपरी चिंचवड असेच म्हणतात. पुणे परिसराच्या बाहेरचे लोक या परिसराला "पुणे" असेच म्हणतात. (ठाण्यातले लोक स्वतःला मुंबईकर म्हणतात तसे)

आता न्यू पुणे केल्याने काय फायदा होणार आहे? एखादे नवीन शहर वसवणार असाल तर त्याचे नाव "ठेवायला" काही हरकत नाही. आधीच असलेल्या परिसराचे नाव बदलून गोंधळ मात्र वाढेल.

कोथरूडहून प्राधिकरण नावाची पाटी असलेली बस
प्राधिकरण म्हणजे काय कोण जाणे? हे गाव फारच थोडे लोक जाणतात

प्राधिकरण म्हणजे "पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण" ही संस्था (पीसीएनटीडीए) आहे हे खूप कमी लोक जाणतात. पण त्या बसवर प्राधिकरण लिहिले हे योग्यच आहे कारण ही बस प्रामुख्याने ज्या परिसरातील लोकांसाठी आहे त्यातील ९० टक्के लोक या परिसराला "प्राधिकरण" असेच म्हणतात. जर बसवर फक्त निगडी लिहिले तर ती बस पुणे मुंबई महामार्गावरच संपेल हे स्पष्ट आहे. यमुनानगर, गंगानगर, सिंधूनगर, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात जाणारा प्रवासी कंडक्टरला "प्राधिकरणात" जाणार का? असे स्पष्ट विचारतो. त्यामुळे आधीच ही बस प्राधिकरणासाठी आहे हे स्पष्ट केल्याने एक अवांछित संवाद कमी झाला आहे.

अवांतरः
शिवाय एक गंमत म्हणजे पिंपरी चिंचवड असे नाव एका बसवर आहे. पिंपरी-चिंचवड-अप्पूघर ही ती बस. ;)


आम्हाला येथे भेट द्या.

प्रवेशबंदी न्याय्य आहे

मेंदीचा रंग उतरेपर्यंत मुलींना शाळेत प्रवेशबंदी न्याय्य आहे.

मी सहमत आहे. मुलींना उन्हातान्हात उभं राहण्याची किंवा मार खाण्याची, दमदाटी, अपमान करण्याची शिक्षा करू नये (ते कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, तसेच या प्रकारात मुलीं इतकाच गुन्हा पालकांचाही आहे) पण शाळेत प्रवेशबंदी अगदी रास्त आहे. जर शाळेचा नियम असेल की फॅशन करता येणार नाही तर करता येणार नाही. उद्या एकीने हाताला मेंदी लावली म्हणून, दुसरीने पायाला लावली, तिसरीने कोपरापर्यंत लावली आणि चौथीने त्या मेंदीचा टॅटू करून खांद्यावर लावला तर चालेल काय?

अमेरिकेतील बर्‍याच* पब्लिक स्कूल्समध्ये तुम्हाला बरेच प्रकारचे कपडे वापरता येतात आणि फॅशन करता येते. (अगदी तोकडे [वीतभरापेक्षा कमी लांबीचे स्कर्टस किंवा शॉर्ट्स], जीर्ण कपडे आणि विचित्र/ अश्लील फॅशन नाही पण मोहॉक कट, हाय हिल्स, शॉर्ट स्कर्टस, नेकलेसेस, इअरिंग्ज, चालेल इतकी तर असतेच.) सात-आठ वर्षांच्या मुली व्यवस्थित मेक-अप करून शाळेत जातात. बाजारात आलेली नवी फॅशन प्रत्येकाला मिरवण्यासाठी लागते. याचे दुष्परिणाम वेगळ्याने लिहायला नको पण अमेरिकन बाजारपेठ सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी आहे. भारतात ती परिस्थिती अद्याप नाही.

* कमी उत्पन्नाच्या भागांतील पब्लिक स्कूल्समध्ये हल्ली अमेरिकेतही गणवेश आणि शिस्तीचा समावेश केला आहे. माझ्या वैयक्तिक मतानुसार तो सर्वत्र करावा.

हम्म

ही शिक्षा जास्त करून पालकांना आहे मुलांना नाही असे वाटते. प्राथमिक आणि बालवाडी वर्गांतल्या मुलींना काय कळणार हे?

आता शाळांचे/पालकांचे प्रश्न काळाप्रमाणे बदललेले आहेत म्हणून काही प्रमाणात गणवेश वगैरे शिस्त असणे मला योग्य वाटते (किंवा मग प्रियाली म्हणतात तशी पब्लिक शाळांसारखी पद्धत -शाळेतला वेष निवडण्याचे पूर्ण मुक्त स्वातंत्र्य हवे - अधलेमधले काही नको). पण मेंदी लावली यासाठी ७ दिवस शाळेत न येऊ देणे ही शिक्षा अती झाली असे मला वाटते. शिक्षेचे स्वरूप वेगळे करता येऊ शकते. जसे मुलींना सुट्टीत हवा तसा वेळ घालवू न देता वर्गशिक्षिकांसाठी काही कामे करायला लावणे इत्यादी :-) हे एक आपले उदाहरण! पण ७ दिवस शाळेपासून लांब ठेवण्याने जी शिक्षक/मुख्याध्यापक यांसाठी पालक/मुलांच्या मनात अढी तयार होईल ती सर्वांनाच जास्त त्रासदायक असेल असे मला वाटते.

पालकांनाच शिक्षा

ही सात दिवस मुलींना घरात सांभाळण्याची पालकांना दिलेली शिक्षाच आहे. ज्यांचा गुन्हा त्यांना शिक्षा. मेंदीचा रंग जायला कमी दिवस लागत असते तर नक्की कमी शिक्षा दिली असती. सुट्टीत वर्गशिक्षकासाठी काम करणे म्हणजे वर्गशिक्षकाला सजा. ती त्याने का भोगावी? शिवाय इतर मुलींना हेवा वाटेल त्याचे काय? त्यापेक्षा पालकांना सात दिवस शाळेत बोलावून उभे रहायची किंवा काम करायची शिक्षा ठोठावली असती तरी चालले असते. --वाचक्‍नवी

योग्य वाटत नाही

एवढेच म्हणते. नियमांचे पालन केले नाही तर शिक्षा हवी, पण ती केलेल्या अपराधाएवढीच. त्याहून जास्त नको आणि कमीही नको. मी एक उदाहरण दिले तेच योग्य आहे असे नाही, पण पालकांना समज देणे योग्य आहे/ मुलींना घरी बसवणे योग्य नाही. नियमभंग केल्याबद्दल काय कारवाई होऊ शकते यासंबंधी स्पष्ट योजना नसल्यास आयत्या वेळी वाटेल ती शिक्षा फर्मावणे योग्य नाही किंवा शाळेलाच त्रासदायक ठरू शकते.

ही बातमी पहा

प्रियाली, तात्या यांच्याशी सहमत!

प्रियाली, तात्या यांच्याशी सहमत!
आजच या विषयावर मैत्रिणीबरोबर चर्चा झाली. त्यात गैर ते काय, असे वाटले. त्या शाळेत मुलांना प्रवेश मिळावा म्हणून अनेक पालक आग्रही असतात. मग त्या शाळेचे नियम काटेकोरपणे पाळायचीही तयारी हवी. अन्यथा ज्या शाळांमध्ये या सर्व गोष्टींना परवानगी असेल, त्या शाळांमध्येच आपली मुले घालावीत. मला आठवते, आमची मराठी शाळा असूनसुध्दा मेंदी, गजरा, दागिने या गोष्टींना बंदी होती, ती कडक होती , आणि त्यात कोणालाही काही वावगे वाटत नव्हते!
धर्मकारण आणि राजकारण यांच्यापासून निदान शाळा तरी मुक्त राहाव्यात असे वाटते!
स्वाती

सावधान..

स्वाती,
प्रियालीशी सहमत आहेस तर काही प्रश्न नाही, तात्यांशी सहमत होताना मात्र त्यांचे एक मत "तरीही वरील कारणांवरून मुलींना वेठीस धरणे केव्हाही गैरच आहे आणि अश्या वेठीस धरणार्‍या संबंधितांना चांगले फटकावूनच काढले पाहिजेत" असेही आहे हे ध्यानात घे! :-)

असो. गंमत बाजूला ठेवली तरी यात माझ्या मते धर्मकारणापेक्षा शाळेचे नियम स्पष्ट नसणे (एखादी गोष्ट केलेली चालणार नाही हे ठीक आहे पण ती केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे नसणे) ही मोठी चूक आहे. अशा नियमांअभावी शाळेच्या दारावर आलेल्या लहान पोरींना परत पाठवणे यातून शाळा जरब, शिस्त दाखवत असेल, पालकांना धाक दाखवत असेल पण असे करताना काहीही साध्य होत नाही. शाळा आणि पालक यांच्यात अहंकाराची रस्सीखेच सुरू होते एवढेच - त्यात सरकारी हस्तक्षेपाची भर. ही शिक्षा देताना मुलींचाही विचार शून्य झाला आहे असे मला वाटते. तसेच काही पूर्वनियोजन नसताना आयत्या वेळी कडक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी न करता आल्याने निर्णय मागे घ्यायला लागून तोंडघशी पडणे ह्यासारखा वेडेपणा शाळेतील मुख्याध्यापकांनी तरी करू नये असे मला वाटते.

राजकारण आणि शाळा यांबद्दल बोलायलाच नको..

आमच्या शाळेत पण

केसात फुले बंदी, एक सैल वेणी किंवा लांब केस मोकळे सोडण्यास बंदी, लहान केस असल्यास फक्त काळा कापडी हेअर बॅंड,मोठे केस असल्यास दोन वेण्या व दुमडून काळ्याच रिबनी असे नियम होते.(मेंदीविषयी काही नियम असल्याचे आठवत नाही.) पण त्यांचे काही विशेष वाटले नाही.(रविवारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेचे जादा वर्ग असायचे त्यात या सर्व बंद्या झुगारुन नटले जायचे.) वाढदिवसाला (व काही कारणाने गणवेष धुवून न आल्यास/फाटल्यास) रंगीत कपडे घालण्याची परवानगी होती.
याउलट माझ्या मावसबहिणीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुलाबी गणवेश, गुलाबी हेअरबॅंड, काळे बूट, गुलाबी मोजे, टिकली इ. लावणे सक्तीचे होते असे आठवते. (हा सर्व गुलाबी अवतार दिसायचा पण छान.)

अपराधाइतकी शिक्षा?

अपराधाइतकी शिक्षा म्हणजे नेमकी किती हे ठरवणे ही फार अवघड गोष्ट आहे. आया मुलींना नेलपॉलिश नक्कीच लावू देत नसतील. तेव्हा मेंदी लावायची नाही हे समजायला काही हरकत नव्हती. जास्त शिक्षा देऊन ती पालकांनी अपील केल्यानंतर(विरोध-निषेध केल्यानंतर नाही) पुनर्विचारान्ती कमी करणे हे योग्य आहे. अशाने शिक्षा सुनावल्याचा फायदा होतो आणि जरब रहाते. परंतु नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करणार्‍र्‍या मुख्याध्यापिकेवर बेकायदा शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी देणारे‍ शिक्षणमंत्री आणि त्या बाईंना काढून टाकण्याची मागणी करणारे असिफ शेखसारखे पालक आपण खपवून घेणे हा काय न्याय आहे?------वाचक्‍नवी

कल्चरल शो ऑफ

हा प्रकार पूर्वी (८०च्या दशकात) एकदा पुण्यातच सेंट हेलेना मधे झाला होता. त्यावेळेस आठवते त्याप्रमाणे एका लहान मुलीस (साधारण ५-६ वर्षाच्या वयाची) तीने नागपंचमीची म्हणून मेहेंदी काढली होती त्या संदर्भात तीच्या हातावर छडीने मार देण्यात आला होता. तमाम पुणे (जरा नाकात, "त्यावेळचे पुणे!") खवळले आणि त्या शिक्षिकेस माफी मागावी लागली होती.

अशी शिक्षा झाली यावर चर्चा होताना ती नियमा प्रमाणे झाली म्हणून योग्य आहे का हा एक मुद्दा वर आला आहे पण दुसरा भाग असा आहे की हा नियम म्हणून योग्य आहे का? मला तरी जरा चावटपणाच वाटतो:

मेहेंदी काही "कन्व्हेन्शनल" मेकअप नाही (आणि मला खात्री आहे की तसा मेकअप "दस्तूर"खुद्द शिक्षिकापण मनापासून तोंडावर फासून शाळेत दरोज जात असतील). तो एक थोडाफार धार्मीक अर्थाने नाही पण "कल्चरल" भाग नक्कीच आहे. बहुतांशी काहीतरी प्रसंग असला तरच मुली मेहेंदी लावतात. हल्ली सणावारासाठी लावण्यापेक्षा एकतर लग्नकार्य आहे म्हणून लावणे अथवा शाळेबाहेर नाच शिकताना भरतनाट्यम् वगैरेच्या कार्यक्रमासाठी म्हणून लावणे असा प्रकार जास्त असणार. तशी आमच्या मुलीने नाचाच्या कार्यक्रमासाठी लावलेली मेहेंदी अमेरिकन शिक्षक दुसर्‍या दिवशी कौतूकाने पहातात आणि नाचाबद्दल विचारतात. तसे करण्यात त्यामुलीचे "कल्चर" काढण्यापेक्षा "विद्यार्थीनीचा" आत्मविश्वास वाढवण्याचे "शिक्षक" म्ह्णून जे कर्तव्य आहे ते पाळणे असते आणि स्वतःच्या कल्चरबद्दलचे प्रेम वाढवत त्याबद्दल इतर कल्चरच्या विद्यार्थ्यांना पण एकमेकांबद्दल आदर करायला शिकवणे हा असतो. हा आमचा अनुभव आहे.

वर द्वारकानाथ यांनी सांगीतलेल्या किस्स्यामधे केवळ धार्मीक वाटून त्याला शाळेबाहेर ठेवणे आणि विद्यार्थी-पालकांचे "ह्यूमिलिएशन" करणे आणि हळूहळू स्वतःच्या चालीरीतींबद्दल नकळत घृणा वाटायला लावणे आणि वर्गात धार्मीक आणि सांस्कृतीक तेढ निर्माण करणे हा प्रकार वाटतो. म्हणून अर्थातच शिक्षातर चूकच आहे पण नियम त्याहूनही चूक आणि आकस असलेला वाटतो.

उद्या विचार करा की एखाद्या ख्रिश्चन मुलीच्या गळ्यात क्रॉस आहे म्हणून तीला नॉन कॅथलीक/नॉन कॉन्व्हेंट स्कूल मधून असेच काहीसे नियम दाखवून काढले तर काय होईल. शिक्षा जाऊंदेत असा नियम जरी केला तर काय बोंबाबोंब होईल याचा विचार करा.

थोडक्यात "कल्चरल शो ऑफ" करण्यास मी आजीबात प्रोत्साहन देत नाही आहे. मात्र वरील घटनेत त्या मुली अथवा पालकांच्या ऐवजी शाळेनेच "कल्चरल शो ऑफ" केला असे वाटते.

अर्थात त्या सर्वावर माझे अजून एक म्हणणे आहे - की अशा शाळेत आपल्या मुलांना कशासाठी पाठवावे? पण तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकेल!

लाख मोलाचा प्रश्न.

अर्थात त्या सर्वावर माझे अजून एक म्हणणे आहे - की अशा शाळेत आपल्या मुलांना कशासाठी पाठवावे? पण तो एक वेगळा चर्चेचा मुद्दा होऊ शकेल!

तथालकथीत हिंदु लोकांना कोट्यावधीरुपयाची मंदिरे बांधण्याची आवश्यकता वाटते परंतु शाळा, दवाखाने यात मात्र त्यांना स्वारस्य नाही.

शेवटी परकिय संस्कृती धार्जिन्याशाळांना पूर्णपणे दोष देण्यात काय अर्थ आहे?

१०० टक्के सहमत

परकिय संस्कृती धार्जिन्याशाळांना आजीबात दोष देऊ नये. त्यापेक्षा तशा शाळांना समस्त् संस्कृतीप्रेमींनी बहिष्कृत् करावे. आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू नये. पुरुष आणि स्त्रीयांनी तिकडे नोकरी करू नये.

जय मराठी शाळा...

अभिजित...

सरकरी अनुदान

परकिय संस्कृती धार्जिन्याशाळांना आजीबात दोष देऊ नये. त्यापेक्षा तशा शाळांना समस्त् संस्कृतीप्रेमींनी बहिष्कृत् करावे. आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू नये.

मी जी काही माहिती बघायचा प्रयत्न केला त्यावरून असे दिसतयं की ही सरकारी अनुदानावर चालू असलेली शाळा आहे. त्यांचे मासीक शुल्क हे रू. ४ ते ७ च्या दरम्यान आहे . याचा दुसरा अर्थ असा की ज्या लोकांना खाजगी शाळा परवडत नाहीत ते तिथे जात असावेत.

आणि म्हणून जर ही शाळा सरकारी अनुदानावर चालली असेल तर सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार आहे. कारण सर्वसाधारण नियम हे सरकारी मार्गदर्शक तत्वावर बसणारे असले पाहीजेत आणि मेंदी दिसल्यास शाळेत येउन न देणे ही शिक्षा कुठल्याही आदर्शाच्या कसोटीवर उतरणार नाही. एकतर आधी म्हणल्याप्रमाणे नियमच चुकीचा. कारण परत तेच की मेंदी लावणे इतके काही "काँमन" नाही की उठसूठ दरोज लावून कोणी येईल. शिवाय ती कुणालाही परवडण्यासारखी असल्याने त्यात काही आर्थीक स्तरावरील वर्गभेद दिसणार नाही. आणि तरी देखील नियम केलाच तर एखाद्या दांडगट मुलाने शाळेत धुमाकूळ घातल्याबद्दल त्याला आठ दिवस तात्पुरते "रस्टीकेट" केल्याप्रमाणे या मुलींना शिक्षणापासून वंचीत करणे आणि एकंदरीतच शिस्तीच्या नावाखाली भिती तयार करणे हा प्रकार आततायीपणाचा आहे. त्यात आधी म्हणल्याप्रमाणे आकस दिसून येतो आणि म्हणून तर तो बंद केला पाहीजे असे वाटते.

ह्म्म्

मी ही त्यांचे नियम वगैरे वाचले. एकंदरीत् कुणीही वेगळं काही करू नये या बाबत शाळा कडक् आहे. अन्यथा शिखांनी आठवी नंतर पगडी घालणे बंधनकारक आहे आणि तीही निळी आणि आतून राखाडी कापड असावी अशा सूचनापाअपल्या मराठी शाळा स्वप्नात सुद्धा देत् नसतील.

तरी हे सरकारी अनुदान वगैरे भानगड मध्ये आणण्यापेक्षा एखाद्या पालक मेळाव्यात ज्या शिक्षिकेने/शिक्षकाने मेंदीवाल्या मुलीला हाकललं त्यांना मेंदी लावण्याने जास्त काही फरक पडत् नाही हे समजावून द्यावे. किंवा त्याच पालकमेळाव्यात शाळा प्रशासनाने आडमुठेपणाने नियम म्हणजे नियम न म्हणता त्या नियमामागचे लॉजिक/तर्क पालकवर्गाला समजावून सांगावा.

दुवा

वर दिलेला दुवा त्याच संस्थेच्या मुलांच्या हायस्कूलचा आहे, नर्सरीचा दुवा येथे मिळेल. ह्यातील माहितीच्या आधारावर ह्या शाळेच्या बाबतीत सरकारी हस्तक्षेप वगैरे चालत असले किंवा नसले हा मुद्दा वादाचा ठरत असला तरी मुख्य मुद्दा राहतोच की ही शिक्षा योग्य आहे किंवा नाही. असो.

विकास

श्री. विकास,

आपले दोन्ही प्रतिसाद मुद्देसूद आहेत. १००% पटले.

आपला,
(सहमत) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

फारच कडक शिस्तीची शाळा ..

वरचे नियम वाचून ही शाळा चांगलीच शिस्तीची दिसतीय. कदाचित जरा अतीच.. अर्थात त्याचा चांगला उपयोग होत असेल. मुलांना शिस्त लागणे यात् काहीच वावगे नाही. ( फक्त अशा शाळेत माझे मन रमले असते का? असा प्रश्न आला मनात.. ) असो.. शाळेचे नियम पाहता,मेंदी लावल्यामुळे अशी शिक्षा होणे नियमाला धरून असावे. अर्थात मला ती पटली नाही आहे.पण काय शिक्षा द्यावी याचे उत्तर् नाही माझ्याकडे !

सहमत

भास्कर केन्डे,
मला इथे ढोबळ अर्थाने 'अभ्यास' म्हणायचे आहे. शिक्षक माहिती सांगतात, ती मुलांनी मध्ये मध्ये प्रश्न न् विचारता ऐकणे, ही प्रक्रिया म्हणजे शाळेतला अभ्यास.
छोट्या-छोट्या गोष्टींमधुन द्न्यान् मिळवता येते - १००% सहमत.
शाळेत बुडणार्‍या अभ्यासापेक्षा कितीतरीपट सगळ्या विषयांच द्न्यान नक्कीच मिळणार् आहे हे आम्हाला नक्की माहीत होतं म्हणून शाळेनी परवानगी नाकारली तरी आम्ही मामेभावाच्या लग्नाला लोणारला (जिथे जगप्रसिध्द् उल्कापातानी झालेल खार्‍या पाण्याच् सरोवर आहे) गेलो होतो. आल्यावर् वह्या पूर्ण् केल्या होत्या त्यामुळे शिक्षा झाली नव्हती.
मेहंदी काढणे ही कला आहे ह्यात काही शंकाच नाही . पण शाळेचे नियम पालकांनी पाळलेच पाहिजे.
मनापासून आवडतं म्हणून शिक्षिकेची नोकरी करणारी माझी मैत्रीण नोकरी सोडतेय म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं. आय लॉस्ट इन्टरेस्ट हे कारण् तिनी सांगितलं. ती ८ वी ते १०ला शिकवते. कमी पगार, शाळेत् शिकवण्या व्यतिरिक्त करावी लागणारी कामं , शिकवणी वर्गातून आलेला थकला भागलेला विद्यार्थी वर्ग.... ही अशी तिची इन्टरेस्ट लॉस्ट व्हायची कारण. दोष कुणाचा हे ठरवण कठीण आहे.

मेंदी रंगली तर

मेंदी रंगावी म्हनून त्यात चिमनीचा गू घालत्यात. कात बी टाकत्यात. आन कपाळावर मेंदी रंगली की त्यो भाग्यवान म्हन्त्यात. यवढाच आमचा मेंदीचा संबंध.
प्रकाश घाटपांडे

नियमच चूक त्यामूळे शिक्षा तर महाचूक

हा मेंदी न चालण्याचा आचरट नियमच चूक त्यामूळे ही शिक्षा तर महाचूक. असले बिनडोक नियम असलेल्या शाळांचे परवाने सरकारने जप्त का करू नयेत?

का बरं?

म्हणजे यात चूक काय आहे? जर शाळेचा अमुक नियम असेल जसे, गणवेश निळा हवा. तो ढोपराच्या वर हवा किंवा खाली हवा. त्याला आचरट ठरवणारे आपण कोण? फारतर आपल्या पाल्यांना त्या शाळेत पाठवू नये पण एकदा पाठवायचे ठरवले की नियमांचे पालन करणे आलेच.

या प्रकारात असे वाटते की इतका गहजब करण्यापेक्षा पालकांनी जाऊन रदबदली केली असती तर प्रकरण मिटले असते.

ही तर पळवाट!!

जर एखादा नियम सामाजिक स्वस्थ्याच्या आड् येणारा असेल / जर् त्या नियमाने काही साध्य होत नसेल तर् हा नियम आचरटच आहे. मला मुलींनी मेंदी का लाऊ नये याच एकही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. केवळ नियम आहे म्हणून पाळण जर् योग्य असेल तर समाजसुधारणाच खुंटली म्हणून समजा. उद्या कोणीही उठून काहीही नियम बनवेल.

आणि "शाळेत पाठवू नये " असं म्हणणं म्हणंजे पळवाट झाली उपाय नव्हे!

सहमत

आपला,
(सहमत) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

पळवाट

>मला मुलींनी मेंदी का लाऊ नये याच एकही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

उत्तर नसेल, तर 'मुलींसाठी शाळेत मेंदी सक्तीची का करू नये'? हा प्रश्न विचारावा.

मेंदीने बिघडणार्‍या सामिजिक स्वास्थाकडे पाहता, शाळेकडून शिक्षणापलिकडेही बर्‍याच अपेक्षा असल्याने नियमाला निव्वळ 'आचरटपणा म्हणणे' म्हणजे पळवाट झाली, उपाय नव्हे. (उपाय मेंदी सक्तीची असलेल्या शाळेत प्रवेश होऊ शकेल.)

(म्हणजे ? असा नियम बनवलेला होता की काय ????)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

सक्ती

>मला मुलींनी मेंदी का लाऊ नये याच एकही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
>>उत्तर नसेल, तर 'मुलींसाठी शाळेत मेंदी सक्तीची का करू नये'? हा प्रश्न विचारावा.

कारण मुलींनी मेंदी लावलीपाहिजे असा देखिल युक्तिवाद कुणी केलेला नाही. कसलेतरी अतर्क्य नियम करून वर काहीही झाले तरी तो नियम आहे म्हणून पाळलाच पाहिजे हे मलातरी योग्य वाटले नाही. उद्या शाळेत मुलींनी बुरखा घालुनच आले पाहिजे असा नियम केला तर ह्याला देखिल चुकिचे समजायचे नाही का? की हा नियमच आहे हवं तर तुम्ही तुमच्या मुलींना ह्या शाळेत पाठवू नका असे म्हणायचे? की आज जर बुरख्याची सक्ती काढली तर उद्या शाळेतल्या मुली राखी सावंत आणि मल्लिका शेरावत बनुन येतील अशी भिती दाखवून त्याचे समर्थन करायचे?

सहमत..

सहमत आहे. जर असलेला नियम पाळायचाच असं काही असतं तर भारताला स्वांतंत्र्यच मिळालं नसतं... आपल्या ह्या चर्चेतील नियम पाळावेच म्हणणारी लोकं कदाचित् असं म्हणाली असती की हे इंग्रजांचे नियम आहेत ते पाळायचे नसतील तर जा देशाबाहेर!!

काय बोललात!

जर असलेला नियम पाळायचाच असं काही असतं तर भारताला स्वांतंत्र्यच मिळालं नसतं... आपल्या ह्या चर्चेतील नियम पाळावेच म्हणणारी लोकं कदाचित् असं म्हणाली असती की हे इंग्रजांचे नियम आहेत ते पाळायचे नसतील तर जा देशाबाहेर!!

खरं बोललात. उद्यापासून कशाला आजपासूनच -

१. रात्री ११ ला ध्वनीक्षेपक बंद करायचा नाही. नियम पाळायचाच असं काही असतं का? वाजवू पहाटे ३ पर्यंत.
२. रस्त्यावरचे सिग्नल पाळायचे नाहीत. नियम पाळायचाच असं काही असतं का? चालवू गाडी बेदरकार. मेले तर मरू दे दोन चार पादचारी. सलमानला काही होत नाही मग मलाच का?
३. उपक्रमावर व्यक्तिगत पातळीवर उतरायचे. नियम पाळायचाच असं काही असतं का? काढू एकमेकांची आयमाय.

-राजीव.

हं...

वाक्यातील चूक लक्षात आली.. आणि तुम्हाला मतितार्थ लक्षात आला नाही! असो. होतं असं कधी कधी.. :-) वाक्य असं वाचा
"जर प्रत्येक बनवलेला नियम डोक्याचा (म्हणजे बुद्धीचा बरं का :-) ) वापर न करता, बरोबरच आहे असं समजून पाळायचाच असं काही असतं तर भारताला स्वांतंत्र्यच मिळालं नसतं. "
नियम चुक असूच शकत नाही हे मानणं गैर आहे

 
^ वर