मेहंदी लावली म्हणून.

सध्या पुण्यात एक गोष्ट गाजत आहे. दस्तूर नावाच्या शाळेत काही मुलींनी मेहंदी लावली म्हणून शाळेतून ७ दिवसासाठी काढण्यात आले. काही जागृत कार्यकत्यांनी त्यात हस्तक्षेप केला म्हणून शाळेने ही कारवाई मागे घेतली.

या दरम्यान शाळेने या सर्व विद्यार्थींना शाळेबाहेर उन्हातान्हात उभे केले होते आणि बरीच दमदाटी केली असेही वृत्त आहे.

मागेही कधीतरी कुंकु लावले, गजरा लावला, मेहंदी काढली म्हणून कारवाई झाल्याचे आठवते.

यात नेमके कोणाचे चूकत आहे? यात लहान मुलांना वेठीस धरले जात आहे असे मला वाटते.

Comments

काहीतरी

कहीतरीच आहे हे.
आमच्या शाळेत सगळे चालायचे.
आम्ही तर चित्रकलेच्या तासाला मेंदीही काढलीये
दिवसही बदललेत आता.
त्यावेळी इंग्रजी शाळेतल्या मैत्रिणींना माझा हेवा वाटत असे.

-शिवानी

दिवसही बदललेत..

सहमत. एकीकडे, जगाच्या बरोबरीने जात इंग्रजी शिक्षण हवे म्हणायचे व बरोबरीने संस्कृतीही जपली पाहिजे म्हणायचे म्हणजे अनावश्यक ठिणग्या उडायच्याच. :)

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

शाळा

सर्व चर्चा परत वाचली. त्यात माझा प्रतिसाद (गरज नसताना) जरा कठोर होता असे जाणवले. असे का याचे कारण शोधले तर लक्षात आले की शाळा हा प्रकार मला कधीही आवडला नाही. कारण दुर्दैवाने शाळेत जावेसे वाटावे असे तिथे काहीही नव्हते. शिक्षक शिक्षा करतील ही भीती, शिस्त मोडेल याची भीती, उत्तर चुकेल ही भीती, परीक्षांची भीती, रिझल्टची भीती, त्यात आपला क्रमांक वर्गात कितवा येणार याची भीती. एकूणात शालेय प्रवास हा भीतीदायक होता. सर्वांचे असेच होत असेल असे माझे म्हणणे नाही. (किंबहुना झाले नसल्यास चांगलेच आहे). हल्लीच्या आधुनिक काळात पालक आणि शिक्षक अधिक जागरुक झाले आहेत, त्यामुळे नवीन शिक्षणपद्धती अवलंबिल्या जाणे अपेक्षित आहे.

इथे काळाच्या फार पुढे असणारे एक व्यक्तिमत्व आठवते, गुरूदेव रविंद्रनाथ टागोर. शंभर वर्षांपूर्वी शांतिनिकेतन ही अफलातून कल्पना त्यांनी अमलात आणली आणि सफल करून दाखवली. या संदर्भात पुलंच्या वंगचित्रेमधला एक उतारा आठवतो, त्यांचे शांतिनिकेतनचे प्रथमदर्शन.

"डॉ. भूदेवबाबूंशी ठरवल्याप्रमाणे त्यांचे झाड शोधीत निघालो. थंडी चांगलीच होती. असल्या थंडीत झाडाखाली बसण्यापेक्षा शेकोटीभोवती वर्ग भरवले पाहिजेत. मी आश्रमाच्या त्या तपोवनात शिरलो. आम्रकुंजातल्या झाडाझाडाखाली वर्ग भरले होते. गुरूजन जटाजूटधारी नव्हते आणि छात्र-छात्री वल्कले नेसले नव्हते एवढाच काय तो फरक. एरवी मला तिथे सगळ्या शकुंतला, प्रियंवदा, महाश्वेता, निपुणिका, मालविका, चित्रलेखाच दिसत होत्या. कण्व, शार्ङ् रव आणि एखादी वृद्ध गौतमीही दिसत होती. हल्ली शांतिनिकेतनच्या आश्रमात आश्रमहरिणींची संख्या अधिक आहे. इतके वर्ग चालले होते, परंतु कुठे कोलाहल वाटत नव्हता. हिरवळीवर गुरूजींपुढे अर्धचंद्राकार पंगत करून बसलेला छात्रगण. सकाळच्या कोवळ्या उन्हात हिरवळीवरचे दवबिंदू चमकत होते. मुलामुलींच्या अंगावरील लोकरी स्वेटर्सशी स्पर्धा करणारे डेलियाचे ताटवे. डेलीयाच्या इतक्या विविध जाती यापूर्वी मी कधीही पाहिल्या नव्हत्या. आयुष्याची पहिली अकरा बारा वर्षे निसर्गाच्या सार्‍या लीला पाहात पाहात विद्या संपादन करणार्‍या त्या मुलांचा मला हेवा वाटला. एरवी शाळा म्हणजे कोंडवाडे, अंधारकोठड्या."

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर