माकारेना

कालेजात असताना कधीतरी आशा, किशोर यांच्या जोडीला पल्याडचे संगीतही कानावर पडू लागले. तेव्हा एम्टीव्ही वगैरेची भानगड नव्हती, त्यामुळे तेव्हा भारतात लोकप्रिय असलेल्या आबा, बोनी एम, ब्रायन ऍडम्स यांचा त्यात समावेश होता. नंतर केबल, आंतरजाल अवतरल्यावर निवडीत वैविध्य आले. मग काही मंडळी वेगवेगळ्या कारणांमुळे आवडू लागली.

एरिक क्लॅप्टन हा एके काळचा रॉक जगताचा बादशहा. १९९१ मध्ये त्याचा चार वर्षांचा मुलगा अपघातात मरण पावला. ह्या असह्य आघातानंतर एरिक अज्ञातवासात गेला. त्याच्या चाहत्यांना तो परतेल की नाही याची धास्ती पडली होती. तब्बल नऊ महिन्यांनंतर एरिक संगीतजगतात परतला, टीअर्स इन हेवन हा अल्बम घेउन. त्याच्यासाठी हे गाणे म्हणजे एका तहेचा कॅथार्सिस होता. या गाण्याचे शब्द, संगीत आणि एरिकचा आवाज या सर्वांमागे असलेली मुलाच्या विरहाची अतीव वेदना गाणे ऐकताना जाणवते. त्याच्या गाण्यातील शब्द बरेचदा लक्षवेधक असतात. त्याने स्टिंगबरोबर गायलेल्या इट्स प्रॉबबली मी या गाण्याचे कडवे पहा

व्हेन युअर बेली इज एम्टी
अँड द हंगर सो रिअल
यू आर टू प्राउड टु बेग
अँड टू डंब टु स्टील

इतके सुंदर गाणे लेथल वेपन सारख्या गल्लाभरू चित्रपटात वाया जावे ही एक शोकांतिका.

इलेक्ट्रिक गिटारचा शोध लागल्यानंतर रॉक अँड रोलमध्ये क्रांती झाली. आता असे एक वाद्य उपलब्ध होते ज्याला गायकांच्या बरोबरीचे अस्तित्व होते. जिमी हेंड्रिक्स, संताना आणि एरिक क्लॅप्टनसारख्या उस्तादांच्या हातामध्ये इलेक्ट्रिक गिटार गाऊ लागली. याचे एक उदाहरण, एरिक क्लॅप्टन आणि मार्क नॉफलर यांचे गाणे, लेला (चित्रफीत क्रः १). या गाण्यात दोन गायक आहेत, एक एरिक क्लॅप्टन आणि दुसरी मार्कची गिटार.

डायर स्ट्रेट्स हा मार्क नॉफलर या ब्रिटीश संगीतकाराचा ग्रुप ८० च्या दशकादरम्यान लोकप्रियतेच्या शिखरावर होता. मार्कचा आवाज ज्याला साहेबाच्या भाषेत ग्रफ व्हॉइस म्हणता येईल असा आहे. तो इलेक्ट्रिक गिटार इतरांप्रमाणे स्ट्रायकर न वापरता बोटाने वाजवत असे. साधे शब्द, मन वेधून घेणार्‍या चाली आणि गिटार, सॅक्सोफोन, पियानो यांचा अफलातून वापर ही या ग्रुपचे वैशिष्ट्ये. त्यांच्या युअर लेटेस्ट ट्रिक या गाण्यातील सॅक्सोफोन पीस इतका लोकप्रिय झाला की वाद्यांच्या दुकानात सराव म्हणून तो वाजवत असत. मार्कचे व्हीडीओ बघितले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे गाताना न चुकता डोकावणारे त्याचे खट्याळ स्मित. त्या काळात बरेचसे ग्रूप समाजावर, इतरांवर चिडलेले असत आणि हे त्यांच्या गाण्यातही दिसे. शिवाय ही त्याकाळची फ्याशनही होती. याउलट डायर स्ट्रेट्सची गाणी बघताना एक शांत, प्रसन्न वातावरण जाणवते. यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे बर्‍याचदा गाणे संपल्यावर गिटार, सॅक्स, पियानो यांची मनसोक्त जुगलबंदी. त्यांच्या गाण्यांचे विषय आणि मूडस यांचा आवाका भन्नाट आहे. ब्रदर्स इन आर्म्स युद्धात सापडलेल्या सैनिकांवर, रोमिओ अँड ज्यूलिएट* सध्याच्या प्रेमयुगुलांवर, कॉलिंग एल्व्हिस* मध्ये टेलिफोन अन्सरिंग मशीनचा अतिरेक तर सो फार अवे सरळसरळ विरहगीत.

याखेरीज बर्‍याच गायकांची गाणी कुठल्यातरी वैशिष्टयामुळे लक्षात रहातात. डेझर्ट रोझमध्ये स्टिंग आणि चेब मामी यांची इंग्रजी आणि अरेबिक अशी अफलातून द्विभाषीय जुगलबंदी, थिंग्ज हॅव चेंज्ड मध्ये बॉब डिलनचे सहजसुंदर शब्द, जिम मॉरिसनच्या द एंड मधील गिटारीचे सूर, नथिंग एल्स मॅटर्स मधला भव्य ऑर्केस्ट्रा, इट मस्ट हॅव बीन लव्ह* च्या शेवटी पियानोच्या जोडीला रॉक्झेटचा फिरता आवाज. याउलट ब्रूस स्प्रिंगस्टीनचे अप्रतिम स्ट्रीट्स ऑफ फिलाडेल्फिया ऐकताना आठवते फिलाडेल्फिया चित्रपटात टॉम हॆंक्सने साकारलेली एड्स रुग्णाची अजरामर भूमिका (चित्रफीत क्र. २).

[टीप : पुढील परिच्छेदात धांगडधिंगा आहे. :-)]
सहाव्या, सातव्या शतकामध्ये पाश्चात्य संगीतावर चर्चचा पगडा होता. या काळातील संगीताचा प्रमुख भाग म्हणजे चर्चमध्ये गायला जाणारा मास. याला प्लेन चांट म्हणत असत, कारण यात कुठल्याही प्रकारचा ठेका नसे. असे का? यामागचे कारण मनोरंजक आहे. कुठल्याही गाण्यात वेधक ठेका असेल तर आपली नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते? जी रंगीलाच्या सुरुवातीला रेहमानचे संगीत ऐकताना उर्मिलाची असते तीच. आपल्याला नाचावेसे वाटते. आणि नाचताना कंबर हलवणे त्याकाळी निषिद्ध मानले जात असे. ठेक्याबद्दल बोलायचे तर दक्षिण अमेरिकन संगीतकारांचा उल्लेख करायलाच हवा. आणि लगेच आठवतो रिकी मार्टीन आणि त्याची मुहेर स्पेसल (स्पॆनिशमध्ये मुहेर : स्त्री) मरिया किंवा व्हेनएव्हर म्हणत दिलखेचक नृत्य करणारी शकिरा. जोडीला आहेत माकारेना, केचप साँग, मनी फॉर नथिंग, डेफ लेपर्ड.

शेवटी एक वैधानिक इशारा. ही गाणी १००% वैयक्तिक आवडीनिवडींवर आधारित आहेत. ही आवडली तर चांगलेच, नाही आवडली तरी हरकत नाही. पण इतक्या वर्षांच्या श्रवणभक्तीनंतर एक सांगावेसे वाटते. बर्‍याचदा जे संगीत पहिल्यांदा ऐकायला थोडे विचित्र वाटते, ते नंतर आवडू लागते. हा सिद्धांत स्पॅनिश, इटालियन गाणी किंवा बेथोवन, विवाल्दी यांच्या शास्त्रीय संगीताच्या बाबतीत खरा ठरला आहे. आता चिनी संगीतावर पडताळून बघायचा मानस आहे कारण जेवढे चिनी संगीत ऐकले आहे, ते फारच वेगळे वाटले.

विसू : १. या लेखात "दुवेच दुवे चोहीकडे" आहेत कारण या प्रकारचा लेख नुसत्या शब्दात मांडून उपयोग नाही. वेळ आणि आवड असेल त्याप्रमाणे यांचा आनंद लुटावा हीच अपेक्षा आहे. ऐकताना हेडफोन असले तर अजून चांगले.
२. दुवे मुख्यत: श्रवणभक्तीसाठी आहेत, * खूण असलेल्या गाण्यांच्या चित्रफिती कैच्या काही आहेत :-)

Comments

चीनी

वा वेगळाच लेख. आवडला.
माकरेना मस्तच होते!

असो, कंट्री संगिताचा यात काही उल्लेख आला नाही.
याचीही एक वेगळीच जादू आहे.
नुसतीच गिटार नि (भसाडा?) आवाज,
पण साधी सोपी सरळ भाषा वे वैशिष्ट्य मानायला हरकत नाही.
शिवाय (बरेचदा)सामान्य आयुष्यावर भाष्य. 'कंट्री रोडस टेक मी होम' सारखे घराची आठवण देणारे काही. तसेच रेडियो मोठ होता त्या काळाला संबोधणारे, "लिसन टू द रेडियो"
वगैरे.

चीनी संगित वेगळेच आहे!
त्यातही ते वाद्यातून पहिल्या आघाता नंतर लांबवत जाणार ध्वनी काढतात ते छान वाटते ऐकायला.
कधी कधी मला ते भारतीय संगीताच्या जवळ जाणारे वाटते.

आपला
(जुने पाने संगित तुकडे आठवत बसणारा...)
गुंडोपंत

सहमत

गुंडोपंत,
आपल्याशी पूर्ण सहमत आहे. वैधानिक इशार्‍यात म्हटल्याप्रमाणे गाणी वैयक्तिक आवडीनिवडीनुसार निवडली आहेत, पण बरीच मोठमोठी मंडळी नाहीत. कंट्री रोड्सचा जॉन डेन्व्हर नाहिये, शिवाय याच संगीतप्रकारातील अलिकडची एक अप्सरा शनाया ट्वेनही नाहिये (हिची गाणी पाहीली की आमच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात म्हणून सध्या मेडीकल ग्राउंडसवर बघायला बंदी आहे. :) ) कंट्री म्युझिकची आपण दिलेली वैशिष्ट्ये एकदम पटली. गिटार, साधी भाषा आणि बर्‍याचदा एखाद्या रोजच्या विषयावर गाणे. याशिवाय जॅझ, ब्लूज यांचा उल्लेखही नाहिये. बीटल्सचा उल्लेख न केल्याचे पाप इतर पापांबरोबर एकदमच फेडीन म्हणतो.

चिनी संगीताबाबत बरीच उत्सुकता आहे. इथे दोन-चार चिनी हाटेलं आहेत, तिथे जाण्याचा योग आला की त्यांना काहीतरी पेशल संगीत लावायची फरमाइश करतो :) बर्‍याचदा थोडासा भारतीय संगीताचा भासही होतो.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

शनाया ट्वेन

हिची गाणी पाहीली की आमच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात म्हणून सध्या मेडीकल ग्राउंडसवर बघायला बंदी आहे. :)

आता माझं तसं काही होत नाही ;-) पण "यू'र स्टिल द वन" अतिशय आवडतं. दाद दिल्याशिवाय राहावलं नाही म्हणून उपप्रतिसाद प्रपंच.

हे जूड, "यू'र स्टिल द वन"

खूप आवडतात. छान लेख, जरा उशीरच झाला बघायला.

वा

राजेंद्रजी वर उल्लेख केलेली काही गाणी माझ्या कल्लेक्शन मधे आहेत.

सध्या मला अधून मधून हे गाणे हिंदी सिनेमातील आहे, ते ऐकायला आवडते. मला टीपीकल पंजाबी किंवा टीपीकल हीप हॉप, रॅप आवडत (समजत / झेपत) नाही पण ह्या गाण्याची ऍरेंजमेंट का बीट का मोजके शब्द आवडतात की काय, बरे वाटते. हम तुम

हिंदी

सहजराव,
सध्याच्या नवीन हिंदी गाण्यांशी संपर्क बर्‍यापैकी तुटला आहे, पण मलाही हिप हॉप किंवा रॅप फारसे झेपत नाही. रेहमान किंवा शंकर अहसान वगैरेंची गाणी आवडतात. अन्नु मलिक मात्र अजिबात झेपत नाही :)
बाकी संगीताचे एक विशेष आहे, कुठल्याही प्रकारचे, कोणत्याही भाषेतले असू दे, जर आवडीचे असेल तर त्याच्याइतके चांगले रिलॅक्सेशन नाही. कदाचित म्हणूनच संगीत आवडत नाही असा माणूस भेटणे जवळजवळ अशक्य आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वेगळा लेख

वा! मराठी संकेतस्थळावर हा लेख पाहून वेगळं वाटलं. लेखात व्यक्त केलेल्या बहुतांश गोष्टींशी सहमत

माझ्या वैयक्तिक आवडीनुसार,

ऍबा (माझी आवड नं.१) आणि बोनी एम सोबत ब्रायन ऍडम्सऐवजी बीटल्स यायला हवं होतं असं वाटतं. ;-) आणि ब्रायन ऍडम्ससारख्या गुणी गायकासोबत बिली जोएल, एल्टन जॉन, रॉड स्टेवर्ट वगैरे.

काही आवडत्या रॉक बँड्समध्ये पिंक फ्लॉयड, क्वीन, R.E.M. इ. इ. इलेक्ट्रिक गिटार म्हटलं तर AC/DC आणि एरोस्मिथही आठवतात.

लॅटीनो सिंगर्समध्ये मराया कॅरे आणि मॅडोनाला गाळता येत नाही. त्यांच्या गाण्यांवर लॅटिनो छाप नसली तरी.

याशिवाय, टिना टर्नर, लिओनल रिची, प्रिन्स आणि कितीही नाही म्हटलं तरी मायकेल जॅकसनला विसरायला होत नाही. 'द वे यू मेक मी फील' दिवसातल्या कोणत्याही वेळी अजूनही ऐकावसं वाटतं.

माझी वैयक्तिक आवड सेलिन डीऑन! अँड द पावर ऑफ लव्ह! ;-)

बर्‍याचदा जे संगीत पहिल्यांदा ऐकायला थोडे विचित्र वाटते, ते नंतर आवडू लागते. हा सिद्धांत स्पॅनिश, इटालियन गाणी किंवा बेथोवन, विवाल्दी यांच्या शास्त्रीय संगीताच्या बाबतीत खरा ठरला आहे.

हम्म! माझा आवडता ग्रीक संगीतकार वेंगालिसबद्दल मला तसं कधीच वाटलं नाही, त्याला पहिल्यांदा ऐकले तेव्हापासून अखंड प्रेमात आहे. ;-)

त्याच्या संगीताचा अप्रतिम नमुना येथे ऐकता येईल.

चिनी संगीत भारतीय संगिताशी खूप मेळ खाते. मीही चिनी रेस्टॉरंटमध्येच ऐकले आहे. खूपच सुरेल वाटले. अगदी हिंदी चित्रपटांना शोभेशी गाणी. एकदा चिनी रेस्टॉरंटमध्ये 'कुछ कुछ होता है|' ची गाणीही ऐकली होती.

सहमत

सहमत आहे. गुंडोपंतांना लिहिल्याप्रमाणे इतके दिग्गज राहिले आहेत की त्यांच्या फ्यान्सना कळले तर माझ्या नावाने रश्दीसारखा एखादा फतवा निघायची शक्यता आहे. :)

बीटल्सचे हे ज्यूड,
पिंक फ्लॉयडची बरीच गाणी,
क्वीनचे अंडरप्रेशर तर मला भयानक आवडते.
एरोस्मिथचे आय डोंट वाँट टू मिस अ थिंग.
मायकेल जॅक्सनचे बॅड माझे आवडते आहे,
एल्टन जॉनचे सॅक्रीफाइस आणि
कँडल इन द विंड.
केनी लॉगिन्सचे डेजर झोन
बर्लिनचे टेक माय ब्रेथ अवे
युरोपचे फायनल काउंटडाउन

पण खरे आहे दुर्दैवाने बरेच, बरेच संगीतकार लेखात नाहीत. जागा मर्यादित आणि संगीतविश्व अमर्याद!

>एकदा चिनी रेस्टॉरंटमध्ये 'कुछ कुछ होता है|' ची गाणीही ऐकली होती.
:))) हिंदी-चिनी भाई भाई

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सायमन अँड गारफंकेल

यांचे सिसिलिया

बिली जोएलचे वी डिडन्ट स्टार्ट द फायर, अपटाऊन गर्ल आणि बाकीचीही बरीचशी. निवड करणं कठिण आहे.

बिली जोएलचेच

पियानो मॅन
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

द रिव्हर ऑफ ड्रिम्स

बीजीस्

बीटल्स सोबत बीजीस् (Bee Gees) ही येते.

गुंडोपंतांना लिहिल्याप्रमाणे इतके दिग्गज राहिले आहेत की त्यांच्या फ्यान्सना कळले तर माझ्या नावाने रश्दीसारखा एखादा फतवा निघायची शक्यता आहे.

माझ्या आवडत्या बादशहाला एल्विस प्रीसलीला विसरल्याबद्दल येईल हो काढता फतवा! :))) ह. घेणे. 'लव मी टेंडर,लव मी स्वीट' दिवसाच्या कोणत्याही प्रहरी फिट!

आणि फॉलिंग इन लव्ह विथ यू तर अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम! (मूळ दुवा मिळाला नाही. पण इतका खोल आवाज शोधून सापडणार नाही.)

फिल कॉलिन्सही कधी कधी आवडतो. १९८५ पासून पाश्चात्य संगिताशी संबंध जुळले. तेव्हाचे सुडिओ मस्तच्! अनदर डे इन पॅराडाईजही!

तसंच १९८५ मधले टेक ऑन मी

राहिलेले गायक, संगीतकार प्रतिसादांतून भरून काढता येतील. :)

एल्विस

वॉज द किंग !!
नक्क्कीच !! आणि शनाया ट्वेनच्या "यू'र स्टिल द वन" बरोबर देखिल सहमत.
मराया कॅरेचं माझं आवडतं आहे "हीरो" !!
रिकी मार्टिन आणि एन्रिके इग्लेसिआस !! ऐकण्याइतकंच बघायला आवडतात, किंबहुना बघायलाच जास्त :-))

कायली

मराया कॅरीवरून कायली मनोग आठवली. हिची गाणीसुद्धा बघायला जास्त आवडतात :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

जे लो

या सगळ्या लॅटिनो सिंगर्समध्ये जे लो ला कसे विसरलो? :)) न्यूयॉर्कमध्ये वाढूनही तिच्या आवाजातला लॅटिनो ठसका कायम जाणवतो. विशेषतः तिच्या चित्रपटांत.

कायली मनोगचे लोकोमोशन मस्तच!
तशी मला चंदेरी केसांची आणि लाल चुटुक ओठांची ग्वेन स्टेफानीही आवडते. ;-)

खरेच की

>या सगळ्या लॅटिनो सिंगर्समध्ये जे लो ला कसे विसरलो? :))

या अपराधाला क्षमा नाही :)
जे लो १००% लतिनो आहे. तिचा उल्लेख यायलाच हवा.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

रे चार्ल्स आणि स्टिवी वंडर

आय जस्ट कॉल्ड आणि पार्टटाईम लवर्समुळे स्टीवी वंडर प्रसिद्ध झाला तरी मला रे चार्ल्स अधिक आवडतो. अगदी हिट द रोड जॅकही!

बॅक स्ट्रिट बॉईज, एनसिंक, ब्रिटनी, क्रिस्टीना ऍग्विलिरा, केली क्लार्कसन आणि आताचे एक एक प्रसिद्ध "हस्तीयां" गाळत आहे तरी क्रिस्टीना ऍग्विलिरा आवाजाची जी उंची गाठू शकते ती इतर बरीचजण गाठू शकत नाहीत. तिचे शास्त्रोक्त संगीत तिथे उपयोगी पडते असे वाटते.

अर्थात, केली क्लार्कसन ही मला अतिशय आवडते. तिचे ब्रेक अवे तर लाजवाब!

अजून काही

संताना स्मूथ आणि मारिया

सायमन अँड गारफंकेलचे मिसेस रॉबिन्सन

परवाच म्यूझिक अँड लिरिक्स हा चित्रपट पाहिला. त्यात ह्यू ग्रांटने गायकाची भूमिका केली आहे आणि यात तो स्वतः गायलाही आहे. तो इतका चांगला गातो हे कळाल्यावर धक्का बसला. यातले मला आवडलेले हे गाणे : वे बॅक इनटू लव्ह

आमच्या आवडत्या ढिनचाक बाँडपटात गाणे गाउन सुद्धा शेरल क्रो कशी काय आठवली नाही ? :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

असे म्हणू शकतो का?

की लहानपणी मुकेश, रफी, किशोर, तलत, लता, आशा (असे पटकन नाव सूचणारे गायकगण) नाही म्हणायला डझनभर संगीतकार (जोड्या जास्त) असे लिमिटेड, तसेच शास्त्रीय संगीतवाली वाद्य, कला वाटून घेतलेली काही मंडळी लक्षात असायची. पंतप्रधानमंडळी पण नेहरू, शास्त्री, इंदीरा गांधी पर्यंत मोजकीच नावे.

पण मोठे झालो, शिकलो, स्वतःचा रेडिओ, कॅसेट प्लेयर, वीकमन, सी डी प्लेयर, म्यूझीक चॅनेल मिळाला. परदेशगमन झाले तसे, संगीत, कला, खाद्यप्रकार यांचे अगणित ऑप्शन्स् उपलब्ध झाले त्यामूळे आता पुर्वी सारखे एक दोन नावे फेव्हरीटस् म्हणून सांगता येत नाहीत तसेच इतकी सारी नावे पटकन आठवत पण नाहीत. :-)

असेच मूड प्रमाणे कूठलेही गाणे आवडते (कालांतराने ते गाणे विस्मरणात पण जाते पण तेवढ्यापुरते ते आवडले असते.)

आजकाल ओपन मूड ठेवल्याने बरेच काही आवडू शकते पण खरे कधी शांतपणे काही ऐकायचे असेल तर मात्र मला सॉफ्ट म्युझिकवाली गाणीच / संगीत तुकडे आवडतात.

जर टफ डे असेल तर मॅडोना मॅडमचे हे गाणे ऐकले की शक्ती येते.

डेव्हीड अशरचे हे गाणे पण मला कधीतरी ऐकायला आवडते.

जस्टीनभाईचे हे गाणे
-----------------------------------------------------------------------------

सहमत

सहमत आहे. लहानपणी संगीतजगताशी विविधभारती हा एकमेव दुवा होता. आता परिस्थिती फारच वेगळी आहे. शोधायचे झाले तर चोहीकडून विविध प्रकारच्या संगीताचा मारा होतो आहे. म्हणूनच सगळी फेवरीट आठवली नाहीत. मन खुले असण्याचा मुद्दा मला वाटते फारच महत्वाचा आहे. बर्‍याचदा वेगळ्या प्रकारचे संगीत पहिल्यांदा ऐकताना काय हे विचित्र असे वाटते आणि ते नैसर्गिक आहे. पण एकदा त्या संगीताशी ओळख झली की हळूहळू त्यातल्या खुब्या कळायला लागतात आणि मग मजा येते :)

अर्थात मूडप्रमाणे गाणी ऐकाविशी वाटतात याच्याशी १००% सहमत आहे. माझ्या एम्पीथ्री प्लेअरवर वर दिलेली बहुतेक सर्व गाणी, शिवाय हिंदी, मराठी चित्रपट संगीत, थोडे शास्त्रीय, कुमार गंधर्वांची निर्गुणी भजने, जगजीत, गुलाम अली यांच्या गझला असा सर्व भरणा आहे. यात मूडप्रमाणे एखादा प्रकार कित्येक महिने ऐकला जात नाही. मग अचानक त्याची इतकी तहान लागते की ऐकल्याशिवाय भागत नाही :) अर्थात असे कदाचित फक्त माझेच होत असेल.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पॉप रॉक संगीताची पर्वणी

फार सुंदर!

पाश्चिमात्य अभिजात संगीताबद्दल थोडेसा फरक सुचवतो - दिलेला दुवा चँटचा नसून फोर-पार्ट-कोरल संगीताचा आहे. शिवाय संगीत जुने नसून २०व्या शतकातील एका संगीतकाराचे (क्वेर्नो) आहे. ठेका सहज धरता येतो. सुरुवातीला कंडक्टरचा हात बघा, किंवा नंतर फक्त कानांकडे लक्ष द्या. ००:१८ ची सम खासच ठसक्यात आलेली आहे. पण बाकी सर्व ठिकाणीही सम तशी स्पष्ट आहे. त्या धीम्या लयीचे नाच युरोपात आहेत, हे आलेच.

कर्नाटक संगीत जितपत देवळातल्या कार्यक्रमांमुळे टिकले, साधारण तसेच पाश्चिमात्य अभिजात संगीताबाबत. मनोरंजक "त्रुबादूर" वगैरे प्रकार चर्चच्या बाहेर, कधी राजे-उमरावांच्या आशीर्वादाने प्रगत होत होते.

धन्यवाद

धनंजयराव,
दुरूस्तीबद्दल धन्यवाद. माझ्या लक्षात आले काय झाले ते. आपले म्हणणे बरोबर आहे. लेखात दिलेला दुवा क्वेर्नोने रचलेल्या आवे मारिस स्टेलाचा आहे. आवे मारिस स्टेलाची चित्रफित शोधताना माझी थोडी गफलत झाली. आठव्या शतकात रचलेल्या प्लेन चांटचे नावही आवे मारिस स्टेला होते. याचा संदर्भ प्राध्यापक रॉबर्ट ग्रीनबर्ग यांची पाश्चिमात्य अभिजात संगीतावरील ही व्याख्याने आहेत. यातील या रचनेशी संबंधीत दोन तुकडे मी आंतरजालावर चढवीत आहे. हे उतरवून ऐकल्यास आपल्याला हा प्लेन चांटही ऐकता येईल. (दुव्यावर गेल्यावर फ्री डाउनलोडवर टिचकी मारावी. यात अडचण आल्यास कृपया सांगावे.)

दुवा १

दुवा २

प्राध्यापक ग्रीनबर्ग यांच्या मते प्लेन चांट म्हणजे ज्यावर आपल्याला नाचता येणार नाही असे संगीत. ही व्याख्याने अत्यंत रोचक आहेत. सहाव्या सातव्या शतकापासून रेनेसांस, बरोक ते आत्तापर्यंतचे पाश्चिमात्य अभिजात संगीत हा प्रवास कसा झाला याची सुंदर माहिती यात दिली आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

दुरूस्ती

या काळातील संगीताचा प्रमुख भाग म्हणजे चर्चमध्ये गायला जाणारा मास. याला प्लेन चांट म्हणत असत,

हे वाक्य अर्धसत्य आहे. प्लेन चांट चर्चमध्ये गायल्या जाणार्‍या संगीताच अविभाज्य भाग होता, मात्र हा मासमध्ये कधीच गायला जात नसे. मास हा संपूर्णपणे वेगळा विधी असे. प्लेन चांट इतर विधींचा एक भाग होता. चुकीबद्दल क्षमस्व.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सुंदर

मस्तच लेख.. गाणी ऐकत ऐकत वाचायला मिळणारे हे लेख साहजीकच खूप आवडतात!
एरीक क्लॅप्टन सारखीच ट्रॅजेडी आपल्या जगजीत सिंगच्या आयुष्यात पण झाली असे ऐकले आहे.
आपली अभिरुची आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद!
ह्यावर लिहीण्यासाठी तुमच्या पोतडीत बरेच काही आहे असे लेख वाचताना जाणवले तेव्हा अजुन एक भागही लवकरच टाका!
-कोलबेर

गाणी

कोलबेरराव,
मलाही गाणी असलेले लेख आवडतात. त्यामुळेच लिहीताना दुवा टाकण्याचा कंटाळा आला नाही. :)
जगजित सिंगच्या बाबत मीही असेच ऐकले होते. आणि त्यानंतर बरेच दिवस त्यांनी गाणे थांबवले होते असेही ऐकून आहे. बहुधा कलाकारांना असह्य भावना व्यक्त करण्याचा एक आउटलेट कलेच्या माध्यमातून मिळत असावा.
प्रोत्साहनाबद्दल अनेक धन्यवाद. यावर अजून लिहायला नक्कीच आवडेल. कसे जमते बघू या.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

चित्रा सिंह

मुलाच्या अपघाती निधनानंतर चित्रा सिंग यांनी गाणे कायमचे थांबवले असे वाचल्याचे स्मरते.

(खिन्न) तो

वाढीव माहिती इथे आहे. इथे गाणे थांबवले नसून, थांबले असा सूर आहे.

~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो! ~~

आभार

प्रतिसाद देणार्‍या संगीतप्रेमींचे मनःपूर्वक आभार.
-- राजेंद्र

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

एनिग्मा?

इथे कुणाला एनिग्मा ची गाणी आवडतात का? मला जबरदस्त आवडतात.. वेगळाच मुड तयार होतो ! पण बर्याच जणांना आवडत नाहीत. वेगवेगळ्या भाषा,वाद्ये असा मस्त संगम असतो.. असो.. ही चर्चा फार छान आहे. सगळी जुनी-नविन छान, आवडलेली,पण विस्मरणात गेलेली गाणी आठवली!

रिटर्न टू इनोसन्स

भाग्यश्री,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एनिग्माची फारशी गाणी ऐकली नाहीत, पण रिटर्न टू इनोसन्स आवडते. त्यांच्या गाण्यातील ध्वनी फारच वेगळे असतात. बर्‍याच निरनिराळ्या कल्चरल साउंड्सचे मिश्रण वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अजून दोन नावे

वीटनी ह्यूस्टन व अलिशीया कीज् ही नावे वर आली होती का?

ह्यूस्टन - आय विल ऑलवेज ..

कीज -फॉलींग् , वूमन्स् वर्थ्

नाही

मला वाटते ही नावे वर आलेली नाहीत. व्हिटनी ह्यूस्टनदेखील आली नाही, कमाल आहे :)
सुचवणीबद्दल धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

जॉर्ज मायकेल

आता सर्वांचीच लिश्ट काढायची झाली तर व्हॅमला विसरून चालायचे नाही. ;-)

जॉर्ज मायकेलची केअरलेस विस्पर, लास्ट क्रिसमस, वेक मी अप वगैरे मस्तच.

अरे हो! आमची पॅरिसही बरी गाते.* ;-) तशी तिला पाहून लोकं गाण्याकडे फारसं लक्ष देत नाहीत म्हणे!

* जबाबदारी-अव्हेरः सदर विडिओ काहीजणांना कै च्या कै वाटेल तेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर पाहणे.

जॉर्ज

जॉर्ज मायकेलची गाणी विशेष ऐकली नाहीत. लास्ट ख्रिसमस छान आहे.
प्यारिसम्याडमबद्दल नो कमेंट ;)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

जर का पॅरीसला

पण ह्या चर्चेत आणले तर बहूदा हा रोज एकाचे नाव काढून लिहा. असे झाले आहे दिसते.

कोणीही कधीही काहीही गायला असेल तर इथे चर्चा...

कंटाळा आला.

माझी आवडती

देण्याचा मोह आवरत नाही म्हणून देतो. याचे दुवे शोधा आणि नक्की ऐका... :)

१. सर्वात आवडते रिकी मार्टीनचे "प्रायव्हेट इमोशन". याचा सुरुवातीचा तुकडा आणि गाण्याचे शब्द अप्रतिम झकास आहेत. शिवाय त्याच्या "लाईफ" या अल्बममधली पहिली दोन गाणी. आत्ता आठवत नाहीयेत. "आय डोन्ट केअर" असे काहीसे शब्द आहेत एका गाण्याचे आणि दुसर्‍याचे "आय वोन्ट डेझर्ट यू" असले.
२. स्टिंग चे "इफ आय एव्हर लूज माय फेथ इन यू" हे डेझर्ट रोज पेक्षा जास्त आवडते.
३. निर्वाना चे "ऑल अपॉलजिज"... गिटारचा तुकडा झकास
४. कलोनिअल कझिन्स चे "कृष्णा नी बेगने बारो..." केवळ अप्रतिम.
५. सरव्हायव्हर - आय ऑफ द टायगर: याचा तुकडा दूरदर्शनवर येणार्‍या क्रीडांगणमध्ये वापरत असत. मस्त आहे.. मूड गेल्यावर बूस्ट अप होतो.
६. लिट्ल लेस कन्वर्सेशन: एल्विस जेएक्सएल रिमिक्स (ब्रूस ऑलमायटी मध्ये वापरले आहे पहा)...
७. लेट्स गेट रेडी टू रम्बल (फ्रेंड्स मध्ये वापरले आहे)
८. लास केचप ची सर्व व्हर्जन्स - स्पॅनिश, स्पँग्लिश, हिप्पी, इंग्लिश, कराओके
९. लूझिंग माय रिलिजन - आर.ई.एम
१०. विल स्मिथ आणि लो बेगा (आय गॉट अ गर्ल आणि म्याम्बो नं ५ लई भारी) :))
११. एक ड्रिंकिंग साँग आहे... Chumbawamba यांचे... "वि विल बी सिंगींग... व्हेन् वि आर विनिंग" असे काहीसे... मस्त आहे.

लेख आणि प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला.


आम्हाला येथे भेट द्या.

धन्यवाद

आजानुकर्ण,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मंबो क्रमांक ५ बर्‍याच दिवसांपूर्वी ऐकले होते, त्याची परत आठवण झाली. :)
चम्बावंबाचे नाव वाचून त्यांचे टबथंपिंग हे गाणे ही आठवले. एकेकाळी हे माझे लई फेवरिट होते. पुनश्च धन्यवाद. :) (तुम्हालाही हेच आठवत होते का?)
विल स्मिथ हे एक अजब रसायन आहे. टॅलेंट म्हणजे काय याचे उत्तर म्हणजे हा माणूस. त्याने गायक बनण्यासाठी एम आय टीची स्कॉलरशिप सोडली. तो आधी सफल गायक होता, नंतर सफल गायक ते सफल अभिनेता हा अवघड प्रवास त्याने यशस्वीरीत्या पार पाडला. आता चित्रपटांमध्येही तो गाण्याची हौस पुरी करून घेतो. उदा. मेन इन ब्लॅक.
लेखाला प्रतिसादांमुळे अधिक पूर्णता आली आहे असे म्हणावेसे वाटते. नाहीतर इतकी सुंदर गाणी कशी काय आठवली असती?
गाणी सुचवणार्‍या सर्वांचे पुनश्च आभार.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

तेच आणि शिवाय...

करेक्ट!
टबथंपिंग हेच गाणे म्हणायचे होते. याशिवाय
इफ यू वाना बी हॅपी फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ, नेव्हर मेक अ प्रेटी वूमन युअर वाईफ
फ्रॉम माय पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू, गेट ऍन अग्ली गर्ल टू मॅरी यू

हे गाणे ऐकले आहे का? मस्त आहे.

आणि हो... प्रायव्हेट इमोशन चा व्हिडिओ पहा.

रेडनेक्स ची कॉटन आईड जो वगैरे गाणी ऐकली आहेत का? एका काळात मी ही गाणी दिवसभर ऐकत असे.


आम्हाला येथे भेट द्या.

मस्त

रेडनेक्सचे हे गाणे प्रागैतिहासिक काळात ऐकले होते, बहुतेक रेडीओ मिर्चीवर असावे. परत ऐकून मजा आली.
रिकी मार्टीनचे हे गाणेही ऐकलेले आहे, बहुधा एमटीव्ही किंवा चॅनेल व्हीवर असावे.
अजून किती गाणी विस्मृतीत गेली आहेत कुणास ठाउक.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आभार

सर्किटराव,
आपला प्रतिसाद वाचल्यानंतर ट्रेसी चॅपमनचे फास्ट कार हे सुंदर गाणे आठवले.
अनेक धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

एपिलॉग : जर-तर

एरिक क्लॅप्टनची मुलाखत एनपीआर रेडिओवर ऐकली. क्लॅप्टनचे संगीत ब्लूजवर आधारित आहे. या मुलाखतीत क्लॅप्टनने सांगितले की १९५०मध्ये त्याने रेडिओवर एका मुलांच्या कार्यक्रमात हूटिंग ब्लूज हे ब्लूज प्रकारातील गाणे ऐकले आणि ते त्याला इतके भावले की तेव्हापासून त्याचा संगीतप्रवास सुरू झाला. गंमत अशी की सॅन डिएगोमधल्या सायमन पेरीने त्या कार्यक्रमात ते गाणे ऐकवण्याची विनंती केली होती. एका तहेने तो क्लॅप्टनच्या संगीत कारकीर्दीला कारणीभूत आहे हे कळाल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. (यावर त्याची प्रतिक्रिया होती, "जर तुम्हाला क्लॅप्टनचे संगीत आवडत नसेल तर तुम्ही मला दोष देऊ शकता." :) )
इथे मागे एका चर्चेत आलेला जर तरचा प्रश्न आठवतो. जर सायमन पेरीने ते गाणे ऐकवण्याची विनंती केली नसती तर?
आणि कदाचित आपल्या आयुष्यातही आपले महत्वाचे निर्णय अशा क्षुल्लक गोष्टींवर अवलंबून असले तर?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

ब्रुस स्प्रिंगस्टीन

अरे हो ह्या सगळ्या यादीत आपल "बॉर्न इन् द युएसए" वाला ब्रुस स्प्रिंगस्टीन राहीलाच की. त्याचे फिलाडेल्फिया ह्या चित्रपटातले 'स्ट्रिट्स ऑफ फिलाडेल्फिया' गाणं बघा किती छान आहे.

सहमत

मलाही हे गाणे खूप आवडते. संगीत चांगले आहेच, शिवाय यातील व्हिएतनाम युद्धावरची कमेंट्रीही प्रभावी आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

व्हिएतनाम

>>शिवाय यातील व्हिएतनाम युद्धावरची कमेंट्रीही प्रभावी आहे.

हो त्यावरुन काहीतरी काँट्रोव्हर्सी पण झाली होती. रेगनने हे गाणे ऐकून ब्रुसचा 'महान देशभक्त' असा सन्मान केला होता जेव्हा की मूळ गाणे हे अमेरिकेवर टीका करणारे आहे असे म्हंटले गेले.

अजुन दोन नवी गाणी व एक गायक

चांगली आहेत. अजुन चांगली ऐकायला मिळावी ह्या लोकांकडून

यु आर ब्युटिफूल - जेम्स् ब्लंट

यु हॅड अ बॅड डे - डॅनिएल पॉटर्

मायकेल बुबले - एक क्लासीक (जुने गाणे)

नवीन

हे तिन्ही गायक नवीन आहेत. ऐकून बघायला हवेत. दुव्यांबद्दल धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

 
^ वर