उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
रामसेतू आणि राजकारण
अभियंता
September 27, 2007 - 11:35 pm
सध्या सेतूसमुद्रम् प्रकप्लाला अनुसरुन रामसेतू या विषयावर अनेक ठिकाणी चर्चा झडत आहेत. प्रसारमाध्यमांकडे तर याशिवाय कुठलाच विषय दिसत नाही. तसेच एखादे चर्चेचे गुर्हाळ (सध्यातरी इथे काहीच करु शकत नाही) इथेही चालावे असे वाटते.
रामसेतू मानवनिर्मित आहे की नाही, या प्रकल्पाचा खरेच काही फायदा आहे की नाही याविषयी जाणकारांनी आपले मत येथे द्यावे हा या चर्चेचा उद्देश आहे.
आपला
(रामभक्त) अभियंता
अनिरुद्ध दातार.
दुवे:
Comments
वेळ मिळेल तेंव्हा
येथे पहा.
संपादकीय - साधना सप्टेंबर २००७
या आठवड्याचा साधना अंक इथे पहा. राममंदिर ते रामसेतू.
प्रकाश घाटपांडे
रामसेतु व भारतीय
राम म्हणजे मनुष्य का देव? राम खरोखर होऊन गेला काय? राम ने सेतु बांधला काय? वगैरे प्रश्न निरर्थक आहेत. खरे प्रश्न आहेत, कालवा केला तर फायदे व तोटे काय होतील? वेळ व इंधन किती वाचेल? जलचर सुख ने राहू शकतील किंवा नाही? वनस्पती, पक्षी या वर काय परिणाम होईल? दुष्परिणाम पेक्षा फायदा जास्त होईल काय? दुष्परिणाम कमी करता येतील काय?
राजकारणी स्वत: च्या फायद्या साठी या विषय चा उपयोग करुन घेत आहेत. एक तरी राजकारणी असा दाखवा की ते मध्ये राम चे सर्व नाही परंतु काही गुण आहेत. जनता ला मुर्ख बनवणे व मते पदरात पाडुन घेणे या पलिकडे ते कसला ही विचार करत नाहीत. राजकारणी लोक पासुन सावध राहणे हे जनता ने शिकले पाहिजे. आधी राम मंदिर आता राम सेतु या चा गजर करत आहेत.
जनता ने हे ऒळखुन ते कडे दुर्लक्ष केले पाहिजे. विकास साधणे करता काय उपयोगी पडेल ते पाहिले पाहिजे. निदान महाराष्ट्र मध्ये असा राजकीय पक्ष पाहिजे की जो जनता चे प्रश्न जाणेल. जनता चे प्रशिक्षण करेल. जनता ला विकास च्या मार्ग ने नेईल. जनता ला सर्व प्रकार चे भेद नष्ट करत एकजुट करेल. धर्म, जात, पैसा, प्रतिष्ठा वगैरे चे भांडवल न करता सर्व जनता एकत्रित पणे करुन विकास मार्ग ने नेईल.
असा कोणी राजकारणी आहे? असा कोणी पक्ष आहे? नसेल तर निर्माण करा. श्री कृष्ण ने सांगितले प्रमाणे जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा अशी व्यक्ती निर्माण होते (श्री कृष्ण ची वाट पाहु नका. श्री कृष्ण चे तत्वज्ञान जाणा. श्री कृष्ण ने दाखवले ला मार्ग ने वाट चाल करा.) जनता ने इच्छा शक्ती दाखवणे हे या करता आवश्यक आहे.
पुढील चर्चा या अनुषंग ने होईल अशी आशा आहे.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
राम नको, कृष्णाचे तत्वज्ञान....
सेतूसमुद्रम् काय आहे, हे आम्हाला माहित नाही . पण राम आणि कृष्ण आम्हाला माहित आहेत, त्या आमच्या श्रद्धा आहेत आणि त्या कोणी तोडत असेल तर कोणत्या तरी पक्षाला त्याची मदत होणार आहे इतकेच आम्हाला माहित आहे.राजकारण आणि राजकारणी कळत असूनसुद्धा विकासापेक्षा देव,धर्म, या देशात महत्वाचे असल्याने, आम्ही रामनाम जपाने वानर या स्थापत्यविशारदांनी केलेल्या प्रयत्नाने तयार केलेला रामसेतू आमचे प्राण गेले तरी बेहत्तर पण आम्ही सेतुसमुद्रमच्या प्रकल्पाला विरोध करु हे आमचे भारतीय म्हणून आद्य कर्तव्य समजतो ! ;)
अवांतर :) जनहितवादी साहेब, रामापेक्षा आपले कृष्णाच्या तत्वज्ञावर प्रेम दिसते. यानंतर आपल्याला समुद्रातून द्वारका नगरीचा शोध घ्यायचाय तेव्हा विचारांचा सूर असाच राहू द्या म्हणजे झालं ! :)
राम आणि कृष्ण आमच्या श्रद्धा आहेत
नमस्कार प्राध्यापक डॉ.दिलीप बिरुटे,
जेवण झाले वाटते. पुरण पोळी, श्रीखंड, बासुन्दी असा काही बेत होता वाटते. मी राम भक्त. श्रीकृष्ण वर अपार श्रधा. एके दिवशी पुरण पोळी, श्रीखंड, बासुन्दी वर ताव मारला. नंतर राम आठवला. म्हणतात ना आधी पोटोबा मग विठोबा. मी ला हे एकदम पटले. तर काय सांगत होतो?
हा मी राम भक्त. तेव्हा विचार केला, राम चा एक तरी गुण अंगी बाणवावा. लक्षात आले राम १४ वर्षे अरण्य मध्ये राहिले. म्हटले मी पण १४ वर्षे नाही तर निदान १४ दिवस अरण्य मध्ये राहणार. लगेच अंग वरील कपडे वर गडचिरोली गाठले. तेथे च थोडे बहुत अरण्य शिल्लक आहे असे कोठे तरी वाचले होते. तेथे पोहोचलो, लोक चे आयुष्य पाहिले व मी चा विचार डळमळू लागला. सर्व लोक राक्षस नी वेढले ले. कोण स्वतः ला नक्षलवादी म्हणतो तर कोणी रक्षण कर्ता. दोन्ही चा उद्देश एकच 'लोक ना लुबाडणे व् स्वतः मौजमजा करणे. लोक बिचारे दरिद्री. परंतु, विकास योजना खाली भरपुर पैसा येतो. जो तेथे काम करतो तो खंडणी देतो. ते ची तो काम च्या पैसे मध्ये आगाऊ तरतुद करतो. राक्षस च्या कथा ऐकल्या व अवसान घालवुन बसलो. लोक ना राम बद्दल विचारले. सांगणे चा प्रयत्न केला. ना कोणी सांगितले ना मी चे ऐकुन घेतले. सर्व चे घोष वाक्य एकच खायला द्या. पक्का निश्चय केला हा गुण मी ला पेलवणार नाही. मग विचार केला की मेळघाट जावे. तेथे परिस्थिती थोडी वेगळी. परंतु, घोष तोच. पुरता निराश झालो. परंतु चिकाटी सोडली नाही. सरळ यवतमाळ गाठले. तेथे तर काय आक्रीत. प्रत्येक गावात रोज प्रेत यात्रा. कोठे रोग ची साथ ऐकली नव्हती. विचारले माणसे का मरत आहेत? उत्तर एकच 'कर्ज फेड करणे अशक्य झाले म्हणुन आत्महत्या'. आत्महत्या का तर निदान त्या मुळे शासन मदत करेल व कर्ज फिटेल. लोक संख्या नियंत्रण चा शासन ने शोधले ला हा नवीन मार्ग असावा.
अपुर्ण
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
ब्लॅक ह्यूमर
ही शैली मोठी परिणामकारक असू शकते. आणखी लिहा, जनहितवादी!
ही शैली मोठी परिणामकारक असू शकते.
ध्यन्यवाद
बटणे आपटणे वेळखाऊ आहे. तरी पण लिहीत राहीन जर कोणी प्रतिसाद देईल तर.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
मागील पान वरुन पुढे चालू
मग उठलो व हिंगोली मार्गे लातूर-बीड-उस्मानाबाद चा रस्ता धरला. दुपार झाली म्हणुन झाड शोधु लागलो. लांब दूर झाड दिसले. ते ही बाभळी चे. जवळ गेलो तर झाड खाली एक म्हातारा दिसला. विचार केला थोडे थांबावे. ते शी बोलावे. पुढचा रस्ता विचार वा. जेवण ची सोय कोठे होईल का पहावे. व पुढे जावे. म्हातारबाबा मी ला पाहुन जागे वरच थोडे हलले. राम राम केला व बसा म्हणाले. बसलो.
विचार चे म्हणुन विचारले. तो ला बघुन तशी विचार णे ची आवश्यकता नव्हती. पण ते च्या उत्तर ने मी च अवाक झालो. तो म्हणला बेस चाललेय. पोर म्हमई पुन्या कडे पोट भरतात, आटवडा त चार येळ ला मी ला भाकर मिळते, आटवडा त बायकु तीन येळेला जेवते. विचारले मुले राहतात कोठे? म्हणला सकाळ धरन रात च्या पर्यंत काम असत. राती ला सडक च्या कडला झोपतात. याक च काळ्जी झोपत कुनी गाडी अंग वर घातली न्हाय म्हंजी मिळवली. पाणी बद्दल विचारले.तो ने सांगितले. न्हान हुतो तवा बा सांगायचा, विंग्रज गेला, निजाम गेला आता गंगा चे पाणी दार मध्ये यील. वारगीत आलो तवा फुढारी म्हणत क्रिस्ना शेतात यील. म्हातारा झालु आता ऐकण्यात आलय शेता शेता त तळी खोदणार. मग किती तळी खोदली? माझा प्रश्न. म्हणत्यात १० का १५. पन म्या न याक बी बगितल न्हाय. ते चे उत्तर. पोट मध्ये कावळे ओरडत होते म्हणुन आवरते घेणे च्या उद्देश ने विचारले. कोठे खाणे ची व्यवस्था होईल काय? अमुक अमुक पाटील गाव चे फुडारी हाईत. त्यं च्या कड जेवान ची सोय व्हईल. तित जावा. मी म्हातरबा ला म्हटले दोघे ही जाऊ. तो म्हटला व मला पटले की सोय पाहुणा असेल तर होईल! उठलो व पुढारी च्या घरी पोहोचलो.
तेथे जेवण ची पंगत बसली होती. मी ला बसवले व यथेच्च जेवलो. जेवण झाले वर विचारले कोठले ऑफिस मधुन आलो. मी सत्य सांगितले तर ते चा चेहरा पडला. अन्न वाया गेले असे च ते ला वाटले असावे. तो निघुन जाणार एवढे त ते ची नजर मी च्या इंग्रजी पुस्तक वर पडली. ते ने विचारले व मी ने सांगितले मी ला इंग्रजी उत्तम येते. मग ते चा चेहरा खुलला. ते म्हणाले, बघा आम्ही सर्व योजना गाव करता आणणे चा प्रयत्न करतो. योजना सगळ्या इंग्रजी त असतात. जेवढे समजते तेवढे मिळते. समजत नाही म्हणुन कित्येक योजना आणणे जमत नाही. मी ला वाटले राम चा एक तरी गुण अंगिकारणे ची संधी मिळेल. रामराज्य निदान या गाव मध्ये येईल. ते मध्ये मी चा ते मध्ये हातभार लागेल. मी लगेच होकार दिला. पुढारी महशय ते ची योजना सांगु लागले. योजना जितक्या जास्त तेवढा निधी जास्त. सर्व योजना आणल्या तर बंगला बांधुन देवु. २०/२५ एकर पाणस्थळ शेती देवु. मी ला काय बोलतो हे च समजेना. योजना आणल्या मुळे मी ला हे का मिळेल हे च डोके त शिरेना. मिष्किल पणे हसत पुढरी म्हणाले, पाहुणे तुम्ही फार भोळे दिसता. अहो योजना कागद वर. पैसे खर्च झाले की योजना पुर्ण झाली असे समजतात. आमची ओळख मुंबई काय दिल्ली दरबार पर्यंत. निम्मे अर्धे वाटुन टाकले की राहिले ते आमचे च. तुमचे काम चा मोबदला तुम्ही ला देणारच. फुकट आम्ही खात नाही व खाणार नाही. मला ऐकुन घाम आला. वाटले सिनेमा सारखे मी पण आता डॉन च्या तावडीत सापडलो. ते चे रहस्य जाणले वर तो आता जिवंत सोस्णार नाही. पळुन जाणे ही शक्य नव्हते. शेवटी विचार केला राम राम करुन राम वर भार टाकुन जावे. निघालो. प्रथम च राम पावले चा भास झाला. पुढारी ने आडवले नाही. उलट ते च्या चेहरा वर 'काय हा मूर्ख माणूस' असा भाव होता. नंतर कळले की मी ला कसले ही रहस्य समजले नाही. ही गोष्ट जगजाहीर आहे. तरी पण राम चे आभार मानुन मार्गस्थ झालो.
चालत राहिलो. दिशा बघितली नाही, रस्ता बघितला नाही. एक ठिकाणी मोठी कमान दिसली. वर बघितले तर कृषी विद्यापीठ चा फलक. ग्रामीण भाग मधले प्रसिद्ध विद्यापीठ. विचार केला की निदान येथे तरी राम चा एक तरी गुण अनुभवणे स येईल. आत गेलो तर कोणी बोलणे स तयार नाही. मग इंग्रजी चे शस्त्र बाहेर काढले व थेट प्रचार्य ची भेट घडुन आली. राम राम केला व विचारले नवीन काय संशोधन पुर्ण झाले. ते नी एक जाड पुस्तक च हात मध्ये दिले. उघडुन चाळ्ले व वाचुन खात्री झाली की खेड्यात रामराज्य येणार. शेवटी राम सापडले चा आनंद झाला. इतका की, हर्षवायु होता होता वाचलो. प्राचार्य ना विचारले हे शेतकरी ना केंव्हा मिळणार? माझी कीव करत ते म्हणाले 'हे एक दिवस चे काम नाही. गेली कित्येक वर्षे हे चालू आहे. वेळोवळी शासन कडे आम्ही अहवाल पाठवतो. पुढे काय होते ते आम च्या कक्षा बाहेर आहे. मी चा आनंद क्षणभंगुर ठरला. तरी ही नेट लाऊन विचारले की आपण प्रायोगिक शेती एखाद्या गांवात करु शकाल काय? म्हणजे एक गांव निवडा. योग्य तेवढी जमीन घ्या. शेतकरी ना गेली ५ वर्ष मध्ये जास्तीत जास्त झाले ल्या उत्पन्न ची हमी द्या. ते ना मार्गदर्शन करा. लागणारी मेहनत करुन घ्या. आपण शोधलेले बी बियाणे द्या. संशोधन प्रमाणे लागणारी खते द्या. ती शेतात वापरली जातील याची काळजी घ्या. ठरले प्रमाणे वाढीव उत्पन्न विद्यापीठाने घ्यावे. मी ची योजना सांगुन झाले वर प्राचार्य चा चेहरा पाहिला. मी ला वाटू लागले 'काही तरी मूर्ख सारखे बोललो' प्राचार्य नी दार उघडे आहे असे सांगितले व मी ने बाहेरचा रस्ता धरला.
जात राहिलो. दुथडी वाहणारा कालवा पाहिला. उगीचच वाटले येथे सुखी शेतकरी भेटेल. थोडे पुढे गेलो व एक म्हातारा दिसला. राम राम झाले वर विचारता झालो. कसे काय चालले आहे? शेती कशी आहे? मी च्या अंदाज च्या विरुद्ध उत्तर मिळाले. शेतीत काही राम राहयला नाही. बा होता तवा छानछोकी नव्हती पन खान्यापिण्याची ददाद नव्हती. सगळ शेतात पिकायच. चा पत्ती, काडीपेटी तेवडी बाजारातन आणायचो. बाकी समद शेतातल. उसान घात केला. उसाला काय म्हनायच आपल नशीब च खोट. सुरवातीला मैंदाळ पीक याच आता चौता हिश्शान पण न्हाय. उसान सगळ वांद झालय बगा. मी विचारले की उस चांगला येत नाही तर इतर पिके का घेत नाही. म्हातारा म्हटला मी एकट्यान घिवुन कस चालल? सगळी पाकरं माज्या च शेतात यतील. मग पदरात काय? मी कडे उत्तर नसले ने निरोप घेऊन पुढचा रस्ता धरला.
जात राहिलो अगदी कोल्हापुर सांगली पासुन धुळे जळगाव, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. आधी खेडी व नंतर शहरे पालथी घातली. पण संध्याकाळ च्या जेवण ची शाश्वती असणारा माणूस अभाव ने दिसला. हे जे दिसले ते ना संध्याकाळ च काय पुढील सात पिढी ची काळजी नाही. हे कोण तर उच्चशिक्षित, व्यापारी, अडते, कारखानदार आणि हातावर कुठली तरी खूण असणारे. या खूण मध्ये खरोखरच जादू आहे. ही खूण असली तर राक्षस चा माणूस काय देव होतो. खूण कसली? अहो हात चा पंजा, कमळ, विळाकोयता, धनुष्य बाण, घड्याळ आणखी किती तरी.
चालुन चालुन थकलो व विश्रांती करता कॅफे चा फलक पाहीला व सायबर कॅफे त घुसलो. तेथे जाम गर्दी. सगळे खुर्चीत बसुन काही तरी पाहत होते. मी ला वाटले चहा मागवणे ची नवीन पद्धत असावी. थोड्या वेळाने मी ला खुर्ची मिळाली व बसलो. अज्ञान जाहीर होऊ नये म्हणून शेजारी जसे करतात तसे करु लागलो. समोरचा पडदा जादु च्या पिटारा प्रमाणे काय काय दाखवु लागला. मन प्रसन्न झाले. विशेषतः इंडिया शायनिंग बघुन. निदान या पेटारा तील भारत खरोखरच सुंदर दिसला. किती तरी देखावे दिसु लागले. मी चहा पिणे करता आलो हे विसरुन च गेलो. जसे पुढे पाहील तसे जास्त च आनंद होत राहिला. शेअर इंडेक्स १९००० चा आकडा पार करताना, भारत ची प्रगति अमेरिके च्या दुपटी पेक्षा जास्त वेगाने होत होती, अणुबाँब बनत होते, अतिरेकी पकडले जात होते, मंदिर ला टन च्या हिशेब ने सोने दान करत होते, रेव्ह पार्टी रंगत होती, कॅसिनो मध्ये जागा मिळणे स रांग लागत होती, हॉटेल तुडुंब भरुन वाहत होती. मी चा माझे वरील विश्वास डळमळु लागला. मी आधी पाहिले ते बहुधा वाईट स्वप्न असावे. चिमटा घेऊन पाहिला. मी जागा च होतो. खात्री झाली आधी चे सर्व वाईट स्वप्न होते. तरी पण थोडी शंका होती च. मग विचार केला सरळ मुख्यमंत्री ना भेटून खरे चा शोध घ्यावा.
अपूर्ण
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
छान
पण हरित क्रांती नंतर शेती चे उत्पादन वाढले आहे, हे देखील खरे. म्हणजे काही प्रमाणात आर्थिक प्रगती होत आहे, पण ती "जनसामान्य" पर्यंत पोचत नाही. योजना काही प्रमाणात सफल होऊ शकतात हे दिसतेच, पण त्या सफल होण्यात फायदा वाटणारे सबळ असले पाहिजेत. म्हणजे सेन्सेक्स १९०००, पुणे येथील घरकिमती, वर दुथडी वाहाणारा कालवा - मध्ये कुठेतरी कोणीतरी सबळ व्यक्ती फायदा करून घेत आहे, म्हणून उत्पादन वाढते आहे.
सरकारी योजना सफल होणे हवे असेल, तर अर्थात फायदा होणारे सामान्य जन प्रबोधित आणि चळवळे व्हावेत. मुख्य म्हणजे वर चा, खंगलेला म्हातारा इंग्रजी (किंवा शासकीय मराठी) वाचणारा झाला पाहिजे. मग तो ही पाटीलघरी पाहुणा होईल. इतकेच काय, पाटील होईल.
खरे आहे
अजुन नागपुर राहिलय. ते झाले वर सविस्तर चर्चा करु. तो पर्यंत निरिक्षणे नोंदवत, टीका करत रहा.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
इति रामसेतु विचार संपूर्णः
उठलो व मुंबई च्या मार्ग ला लागलो. मुख्यमंत्री व इतर अनेक मंत्री दिल्ली ला गेले असे मंत्रालय म्ध्यए गेल्यावर समजले. पंचाईत झाली पण धीर सोडला नाही. एक मंत्री महोदय ची पाटी दिसली. तेथे शिरणे चा प्रयत्न केला, पण दार समोर एक कर्मचारी दार रोखून उभा राहिला. आता काय करावे याचा विचार करत होतो तेव्हड्यात ते कर्मचारी ने विचारले. काय साहेब चे गांव वाले हायसा काय? सरळ आत घुसताय!. हिम्मत करुन खोटे बोललो. हो म्हणालो वर पुस्ती जोडली मी तें च्या भावकीत ला च आहे. दार उघडले व आत गेलो. राम राम केला व म्हटले गाव कडचे काही प्रश्न आहेत. ऍकून घेऊन काही जमल तर बघा अशी विनंती केली. मंत्री महोदय खळ खळून हसले व म्हणाले तुमच्या मागे किती माणस आहेत? मी आजु बाजुला पाठी मागे पाहिले व म्हणालो येथे तर कोणीच दिसत नाही. पुन्हा मंत्री महोदय खळ खळून हसले व म्हणाले अहो म्हणजे तुमचे कडे मतदार किती? तुमचे सांगणे वरुन किती मत आमच्या पक्ष ला मिळतील. आधी खरे सांगावे असे वाटले पण नंतर विचार बदलला. ठोकून दिले ७/८ हजार सहज जमतील मंत्री महोदय चा चेहरा खुलला व म्हणाले आणखी २५/३० हजार जमवा. तुम्ही ला आमदार करुन टाकतो. मी पुन्हा खोटे बोललो. २५/३० काय ही कामे केली तर लाख मध्ये मते मिळतील ते ची कसली काळ्जी नको. मंत्री महोदय काम बद्दल ऍकणे स उतावीळ झाले ले दिसले. मग मी जे पहिले ते सांगणे स सुरवात केली. परंतु मी चे म्हणणे २ मिनिट ही ऍकले नाही. घंटी वाजवली. मघाचा चपरासी आला. चपरासी ला मी ला टॅक्सी त सोडाणे स सांगितले.
निराश झालो. काय करावे सुचेना. पादचारीपथ वरुन चालताना एक आशे चा किरण दिसला. नागपुर मध्ये एक सेवाभावी संस्था असले बद्दल वाचले होते. म्हटले तेथे नक्की च उपाय सापडेल. सरळ नागपुर गाठले.
मुख्यालय भव्य होते. मी ला खात्री झाली येथे उपाय सापडणार च. आत शिरलो. मी चे स्वागत चांगले प्रकारे झाले. नागपुर परिसर मधील शेतकरी आत्महत्ते त अग्रेसर आहेत म्हणून तो च प्रश्न आधी विचारणे चा विचार केला. मी चे म्हणणे पूर्ण पणे व शांत चित्त ने ऍकुन घेतले तेव्हा मी चा उत्साह द्विगुणित झाला. मी ला ते नी सांगितले की शेतकरी बांधवना मदत करणे ची तयारी पूर्ण होत आली आहे. आशा शेतकरी ची यादी ते ना पाहिजे. प्रत्येक शेतकरी चे सर्व कर्ज फेडु च फेडु शिवाय शेती करणे साठी भांडवल सुद्धा देऊ. मी इतका भारावुन गेलो की ते चे पाय धुवुन पाणी पिणे चे मी मनात ल्या मनात ठरवले. ते च्या प्रश्न ने मी मनोराज्य मधुन वास्तव मध्ये आलो. आम्ही ला ते ची यादी द्याल का? मी पटकन उठलो व म्हणले १ आठवड्यात पूर्ण यादी बनवुन परत येतो. मी ते चे पाय धरणार होतो तर ते म्हणाले पुर्ण यादी सावकाश दिली तर चालेल ५/१० नांवे आता द्या. लगेच दैनंदिनी काढली व १५ नांवे दिली व काम झाले म्हणुन आनंदी होऊन बाहेर जाणेस निघालो.
ते नी मी च्या खांदे वर हात ठेवुन बसवले. म्हणाले सांगतो ते व्यवस्थित ऐकुन घ्या. शेतकरी आत्मह्त्या करणार असेल तर ते ला राम करता हुतात्मा होण्यास सांगा. प्राण देणे स तयार आहे तर आमरण उपोषण करणे स तयार करा. राम सेतु राष्ट्र चा श्रद्धे चा प्रश्न आहे. हुतात्मा झाला तर वैकुंठ मिळेल. जगला वाचला तर शेती मिळेल. श्रद्धा सर्व श्रेष्ठ आहे. मी ला काही पटले नाही. मी चे विचार वेगळे आहेत. मी सांगितले व ते नी ऐकुन घेतले.
मी म्हटले राम च्या विचार आचार ची पूजा करु या. राम ने तरंगणारे दगड शोधुन पूल बांधला. हजारो वर्षात ते दगड इतःस्थतः पसरले असतील ते शोधु या. ते चा पूल इतर ही अनेक ठिकाणी आवश्यक आहे. कोकण मध्ये ४/५ किलोमिटर वरील गांव जाणे करता ४०/५० किलोमिटर चा वळसा घालुन जावे लागते. तेथे हे दगड कामी येतील. पुढे जाऊन हवेत तरंगणारे दगड शोधू. ते वापरुन लंके त जाणे स राम च्या धनुष्य सारखा पूल बांधु. राम च्या पादुका दिल्ली त ठेवु. व रामेश्वर ला जावुन रामसेतु नवा ने ऊभारु. राम नक्कीच प्रसन्न होईल व सेतु उभारणे स मदत करील. राष्ट्र चे रक्षण करील. मी ला वाटते राम ची पूजा करणे म्हटले तर फुले लागतील. राम ब्रह्मांड चा मालक. म्हणजे राम ची फुले राम ला देऊन मी पूजा कशी करु शकेन? मी राम ला मी चे काय अर्पण अरु शकतो? मी चे मते मी फक्त राम चे आचार विचार अंगी बाणवणे चा प्रयत्न करु शकतो. मी ला वाटते राम वरील श्रद्धा प्रकट करणे चा हा एकच उपाय आहे. आपण या करता मार्गदर्शन करु शकता काय? मी बोलणे थांबवले व ते नी मी ची गचांडी धरुन रस्ता वर आणुन सोडले. मी थकलो होतो. कोठे जाणे चे त्राण उरले नव्हते. तरी चालत राहिलो व रामनदी काठी आलो.
चालणे थांबवले पण विचार थांबत नव्हते. एक अंग ने मला वाटू लागले मी ला श्रद्धा म्हणजे काय हे समजत नाही. दुसरे अंग ने विचार केला की, या जगात जे मी माझे म्हणतो ते तर सर्व राम चे. मग मी राम ला काय देऊ शकतो? राम ला घर बांधुन देणे झाले तर ते साठी दगड, विटा, पाणी, आणि कित्येक गोष्टी लागतात. ते सर्व राम चे. मग ते मध्ये मी चा वाटा कोणता? राम करता घर बांधणे ची मी ची लायकी आहे काय? राम विश्व चा अधिपती. मग ते ची गोष्ट रक्षण करणे ची माझी लायकी आहे काय? मी करु शकतो काय? राष्ट्र म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? धर्मनिरपेक्षतता म्हणजे काय? अल्पसंख्य म्हणजे काय? कित्येक प्रश्न. उत्तरे सापडत नाहीत. म्हणजे जी उत्तरे मी ला सत्य वाटत आहेत ती व्यवहार मध्ये दिसत नाहीत.
राम करता मी काय करु शकतो? मी ला वाटते राम चे गुण अंगिकारणे चा प्रयत्न करु शकतो. राम ने पृथ्वी वरील काळ मध्ये प्रजा कशी सुखी राहील ते पाहिले. मी च्या आजुबाजु च्या जन ना सुख देऊ शकलो नाही तर निदान दु:ख देणार नाही. मी च्या आचार विचार मध्ये थोडे जरी संशयस्पद आढळले तर मी जन ने दिलेले पद सोडुन देईन वगैरे. राष्ट्र म्हणजे एकत्र राहणे रा समुदाय. समुदाय मध्ये कोणी ही वेगळा असु शकत नाही. या समुदाय चा धर्म एकच असु शकतो. तो म्हणजे राष्ट्रधर्म. राष्ट्रनियम अतुच्च. इतर नियम पाळेन परंतु जेथे राष्ट्र नियम शी जुळत नसेल तेथे इतर नियम बाजुला ठेऊन राष्ट्र नियम पाळेन. ईश्वर म्हणजे संपूर्ण विश्व मधील अणु रेणु जे चित्र मेंदु त येते तो च ईश्वर. मी म्हणजे ते मधील थोडे अणु रेणु चा समुह. ओघाने आले मी ईश्वर चा एक अंश. तथा कथीत धर्म म्हणजे उपासना करणे च्या पद्धती. या पद्धती मी, मी च्या मर्जी ने आचरण मध्ये आणेन. इतर नी ते वर आपत्ती आणू नये. या पद्धती आचरत असता मी कडुन इतर ना त्रास होणार नाही ती काळजी घेईन. धर्मनिरपेक्षतता म्हणजे मी इतर च्या उपासना पद्धती ला अडथळा आणणार नाही, ती मी ला पटो अगर न पटो. कोठली ही उपासना पद्धत इतर पेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ मानणार नाही. मी चे राष्ट्र मध्ये कोणी अल्पसंख्य असणार नाही. विदेशी व्यक्ती अल्पसंख्य असु शकते. परंतु, मी च्या राष्ट्र चा कोणी नागरीक अल्पसंख्य असणार नाही. जर कोणी स्वतः ला असे समजत असेल तर तो मी च्या दृष्टी कोणातुन विदेशी असेल.
विचार करत राहिलो. मी ला वारुळ ने वेढले. मी ला ते समजले नाही. कित्येक सहस्र वर्षे लोटली. राम ला वाटले मी ला वारुळ मधुन बाहेर काढावे. मी बाहेर आलो तर पाहिले सर्व सृष्टी विनाश पावली होती. राम ने सांगितले जेव्हा तू विचार करु लागला तेव्हा युद्ध ची तयारी सर्व राष्ट्रे करत होती. कालांतर ने महायुद्ध झाले. अणुबाँब फुटले. सर्व जलचर, भुचर तसेच खग विनाश पावले. वारुळ मुळे तू वाचलास. अणु उत्सर्जन आता शून्य झाले. आता पृथ्वीतल वर राहू शकतोस. आजुबाजुला बघुन भीती वाटत होती तरी निदान वरपांगी हसतमुख राहिलो. पण विचार करणे ची सवय आड आली. विचार आला अणुसंहार मधुन मी वाचलो व पृथ्वीवर पुन्हा जीवन फुलण्यास मी कारणीभुत ठरलो. असे पुढे लिहले जाईल. परंतु, पुन्ह: धर्म अवतरतील. ते मध्ये युध्ये होतील. पुन्हः संहार होईल. ते चे पाप ही मी च्या गळ्यात बांधले जाईल. मी राम ला विनंती केली. मी ला वाचव. मी ला हे पाप करणे जमणार नाही. राम कृपेने मी च्या अणु रेणु चा समुह इतःततः पसरला.
संपूर्णः
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
ज्वलंत लेख
प्रतिसाद नसून लेख करायला हवा होता.
व्यंगोक्ती ने खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न उल्लेखलेले आहेत. असे वाचून विचारी वाचक उद्विग्न आणि उद्युक्त व्हावा.
जनहित-मराठी मध्ये नपेक्षा सामान्य मराठी मध्ये ही कथा छापील प्रसिद्ध करणे जमेल का बघावे.
(जनहितवादी, परिच्छेद तुम्ही म्हणता तसे लिहावे तरी सध्या बोलतो तसे ही वाचता यावे, असे दुहेरी लिहिणे फारच कठिण जाते. कृपया पुढे लिहितो ते सामान्य मराठी चालवून घ्या.)
एक शंका अशी : शेवटचा राम-धर्म चा संदर्भ बाकी लेखाशी थेट लागत नाही. बाकी लेख भर असे वर्णन आहे की आपल्या सामाजिक आणि लोकशाही संस्था कुचकामी ठरत आहेत. म्हणजे पाटीलकी, कृषी शिक्षण, राज्य शासन, सेवाभावी संस्था या सर्व गोष्टी इतक्या किडल्या आहेत, की लेखक हतबल झाला आहे. पण जे बिघडले आहे, ते का बिघडले आहे त्याच्याकडे लेखकाने बोट दाखवावे अशी माझी इच्छा होती. रामाच्या नावाचा दुरुपयोग आणि धर्माचा विपर्यास हे या समाजाला लागलेल्या किडीचे कारण आहे असे लेखकाचे मत आहे काय? पण त्याचा पूर्वकथनाशी संबंध फक्त नागपूरच्या सेवाभावी संस्थेशी लागतो. पाटीलकीशी आणि राज्यशासनाच्या भ्रष्टाचाराशी लेखाच्या अंतर्गत संबंध लागत नाही.
माणसाने अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बदल करावा असा काहीसा अस्फुट संदेश वारुळातून येत होता असा मला भास झाला, पण इथे तर तपस्वी वाल्मिकी चे तप पूर्ण होईपावेतोवर जगाचा नाश झाला होता. म्हणजे अंतर्मुख होऊन कार्यहीन होणे हे लेखकाच्या मताच्या विपरीत आहे असे दिसते.
असो. सडेतोड प्रश्न विचारणे एवढे काम केले तरीही प्रबोधक साहित्य प्रभावी ठरले असे आपण म्हणू शकतो. ते जनहितवादींनी येथे चांगल्या प्रकारे साधले आहे. त्या डिवचणीने पुढे कोणी उत्तराप्रत पोचेल.
सामना
मी ला वाटते राम वरील श्रद्धा प्रकट करणे चा हा एकच उपाय आहे. आपण या करता मार्गदर्शन करु शकता काय? मी बोलणे थांबवले व ते नी मी ची गचांडी धरुन रस्ता वर आणुन सोडले. मी थकलो होतो. कोठे जाणे चे त्राण उरले नव्हते. तरी चालत राहिलो व रामनदी काठी आलो.
सामन्यातील मास्तर (श्रीराम लागू) आठवला. ते ( निळू फुले ) पण आठवला.
विचार आला अणुसंहार मधुन मी वाचलो व पृथ्वीवर पुन्हा जीवन फुलण्यास मी कारणीभुत ठरलो. असे पुढे लिहले जाईल. परंतु, पुन्ह: धर्म अवतरतील. ते मध्ये युध्ये होतील. पुन्हः संहार होईल. ते चे पाप ही मी च्या गळ्यात बांधले जाईल. मी राम ला विनंती केली. मी ला वाचव. मी ला हे पाप करणे जमणार नाही. राम कृपेने मी च्या अणु रेणु चा समुह इतःततः पसरला
मी राहिलो, ते गेले. माझ्या परिने मी केले. आता रामा जबाबदार तू च.
धनंजय ने दिलेले " ब्लॅक ह्युमर" हे साहित्य प्रकाराचे नाव
अगदी सार्थ आहे.
प्रकाश घाटपांडे
नजरचूक
(श्रीराम लागू)शाळामास्तर 'पिंजर्या'तला, पत्रकार (निळू फुले) सामन्यातला.--वाचक्नवी
रामसेतु
राम खरोखरीच होऊन गेला की नाही, त्याने नलाकरवी सेतू बांधून घेतला की नाही या गोष्टी दुय्यम आहेत. येशू ख्रिस्ताच्या आणि गौतम बुद्धाच्या अस्तित्वाचेसुद्धा विश्वसनीय वस्तूच्या स्वरूपातील पुरावे नाहीत असे नुकतेच सध्या कार्यरत असलेल्या एका पुराण वस्तू संशोधन खात्यातील अधिकार्याला दूरदर्शनवरील मुलाखतीत सांगताना ऐकले.
इथे प्रश्न फक्त पर्यावरणाचा आणि व्यवहार्यतेचा आहे. श्री. विकास यांनी वर दिलेला दुवा सांगतो की, या विषयावर भरपूर चर्चा अगोदरच झाली आहे. त्यातल्या एका पोटदुव्यावर 'टाइम्ज"मधील एक लेख आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे रामसेतू तोडून कालवा बांधणे आर्थिक दृष्ट्या श्रेयस्कर नाही . कालव्यातून मोठ्या बोटींची वाहतूक संभाव्य नाही. समुद्राचा प्रवाह नको तितका जोरात वाहू लागला की तिथल्या वाळूत असलेले (जगातील एकमेव असे?)थोरियमचे प्रचंड साठे वाहून जातील अणि आपल्या भविष्यकाळातील अणुशक्तीचा एक स्रोत दूर समुद्रात कायमचा गाडला जाईल याचा विचार कुणाच्याही प्रतिसादात मला आढळला नाही. समुद्रातले मासे आणि इतर जलचर यांच्यावर रामसेतू तोडण्याचा विपरीत परिणाम होईल हे अनेकांनी सांगायचा प्रयत्न केला पण सरकारी प्रचार फक्त श्री राम आणि त्याचे ऐतिहासिक असणे यावरच केन्द्रित झाल्याने सत्य सतत दडपले जात आहे.
ह्या रामसेतू ऊर्फ ऍडम्ज ब्रिज ला पर्याय म्हणून अनेक मार्ग सुचवण्यात आले असले तरी केवळ आंतरराष्ट्रीय दडपणाखाली रामसेतू तोडण्याचा अट्टहास सरकार करीत आहे असे ऐकून आहे. इथे कालवा बांधण्याने भारतापेक्षा इतर देशांचा जास्त फायदा आहे. अंतर कमी झाल्याने इंधनाची बचत झाली तरी वेळाची फारशी बचत होत नाही हे अनेकांनी आकडेवारी देऊन दाखवायचा प्रयत्न केला आहे, ह्याचा विचार करताना कुठलाही राजकीय नेता दिसत नाही. तमिळनाडूच्या राजकर्त्यांना रामाचे महत्त्व जितके कमी होईल तेवढी जास्त मते मिळतील, हे रामस्वामी नायकरांपासून होऊन गेलेल्या द्रविड मुन्नेत्र आणि इतर द्रविडपक्षीय नेत्यांना समजले आहे, त्यामुळे त्यांचे रामसेतूबद्दलच्र विचार आर्यपुरुषाला न शोभणारे म्हणून दुर्लक्षित करावेत. --वाचक्नवी
रामायण आणि रामाचे असणे.
ज्ञानेश्वरी आहे त्या अर्थी ज्ञानेश्वर होऊन गेले. त्यांचे वंशज नाहीत. त्यांनी वापरलेल्या वस्तू नाहीत. म्हणून ज्ञानेश्वर नव्हते असे कोणी म्हणते? रामायण आहे म्हणजी वाल्मीकी होते. म्हणजे त्यांचा आश्रम होता. त्यात त्यांनी लिहिल्याप्रमाणे सीता आणि लवकुश असावेत. राम हा रघूचा पणतू, सूर्यवंशातला शहात्तरावा राजा. त्याच्यानंतर हा वंश रामायणाच्या बाहेर चालू राहिला. १७० वा वंशज खारवेल जैन नावाचा. याचा काळ इ.स.पू. १८४ आणि इ.स.पू १७२ याच्या दरम्यान, म्हणजे पुष्यमित्र शृंग या ऐतिहासिक व्यक्तीच्या काळात. त्यामुळे त्याचा पूर्वज राम नव्हता कशावरून?. राम होऊन गेला हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा-- एखाद्या भांड्यातून हवा काढून घेतली की आत प्राणवायू नाही हे जसे मेणबत्ती पेटवून सिद्ध करता येते तसे-- राम नव्हताच ह्याचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न कुणी केला आहे? तो करावा, आणि राम नव्हता हे सिद्ध झाले की राम होता हे सिद्ध करायची गरज नाही--वाचक्नवी
कसे?
>एखाद्या भांड्यातून हवा काढून घेतली की आत प्राणवायू नाही हे जसे मेणबत्ती पेटवून सिद्ध करता येते..
कसे?
दुय्यम
>राम खरोखरीच होऊन गेला की नाही, त्याने नलाकरवी सेतू बांधून घेतला की नाही या गोष्टी दुय्यम आहेत
!
इतिहास
प्राचीन संस्कृत ग्रंथ म्हणजे चार वेद; त्यांची व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, छंद, शिक्षा, कल्प आदी सहा वेदांगे; अनेक ललित गद्यसाहित्य व काव्ये, पुराणे, आणि उपनिषदे; तत्त्वज्ञान, गणित, धर्मशास्त्र, कर्मकांड इत्यादी विषयांवरील पुस्तके आणि अनेक चरित्र ग्रंथ. यांमध्ये इतिहास नावाचे काहीही येत नाही. पुराणे हा इतिहास असेल तर पुढील शास्त्रवचनात त्यांचा वेगळा उल्लेख झाला नसता.
शास्त्रवचन असे आहे: इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।
त्यामुळे इतिहासग्रंथ या सर्वापेक्षा काहीतरी वेगळे असावे. प्राचीन काळापासून रामायण-महाभारत या महाकाव्यांना इतिहास म्हणत असले पाहिजेत. अर्थात बखरवाङ्मयात लिहिलेला इतिहास जसा शंभरटक्के विश्वसनीय नाही, तसाच प्रकार या काव्य़ांचा असावा.--वाचक्नवी
ज्वलंत लेख
धनंजय उवाच।
प्रतिसाद नसून लेख करायला हवा होता.
व्यंगोक्ती ने खूपच महत्त्वपूर्ण प्रश्न उल्लेखलेले आहेत. असे वाचून विचारी वाचक उद्विग्न आणि उद्युक्त व्हावा.
जनहित-मराठी मध्ये नपेक्षा सामान्य मराठी मध्ये ही कथा छापील प्रसिद्ध करणे जमेल का बघावे.
लेख करणे करता खूप टाईप करावे लागते. मी ॐ कार जोशी याना २६ बटण वर इंग्रजी प्रमाणे ५२ अक्षरे बसवणे करता विनंती केली. नंतर लक्ष मध्ये आले देवनागरी करता ६८ चिन्हे आवश्यक आहेत. म्हणजे जर देवनागरी मध्ये ५२ चिन्हे वापरणे करता प्रत्येक स्वर करता दोन ऐवजी एक च चिन्ह वापरणे हा उपाय होऊ शकतो. तसे केले तर मी चा वेग दुप्पट व कित्येक जण चा तिप्पट चौपट होऊ शकतो. मी ते ना तशी विनंती केली आहे. बघु या ते काय करतात.
'महत्त्वपूर्ण प्रश्न उल्लेखलेले आहेत' हे वाचुन आनंद झाला. चर्चा स्वार्थी राजकारणी, धर्म च्या दुराभिमानी व्यक्ती च्या तडाखे तुन सुटुन सर्व सामान्य व्यक्ती च्या आवाका मध्ये आले मुळे हा आनंद झाला. आता किती 'विचारी वाचक उद्विग्न आणि उद्युक्त' होतील हे जे चे ते चे वर अवलंबुन आहे.
'जनहित-मराठी'' ही पद्धत मी विशिष्ठ हेतु ने वापरत आहे. प्रत्यय लावणे वेळी नाम/सर्वनाम चे रुप बदल ले तर दुप्पट तिप्पट किंवा जास्त शब्द निर्माण होतात. स्पेलिंग तपासणे वेळी जास्त शब्द तपासणे गरज चे होते. नवीन शिकणार ला जास्त वेळ लागतो. सध्या मी एकटा लिहतो. जर पटले तर इतर लिहु शकतात. मी लिहले ले वाचुन वाचुन सवय होईल!
'शेवटचा राम-धर्म चा संदर्भ बाकी लेखाशी थेट लागत नाही.' मी रामधर्म म्हणजे राम चे गुण अंगिकारणे अथवा राम चे वागणे स्वतः मध्ये उतरविणे असा घेतो. राम सत्य भाषी, जन संरक्षण कर्ता, जनहित जपणारा, जन विचार समजाऊन घेणारा होता. इतर अनेक गुण राम मध्ये होते. एक धोबी च्या अक्षेप वरुन राम ने स्वतः च्या प्रिय पत्नी चा त्याग सुद्धा केला. सध्या एक तरी नेता हे गुण अंगारतो काय? नेते राम सारखे वागले तर सध्या च्या समस्या निर्माण होतील काय? जड सेतु पेक्षा स्वतः मध्ये गुण निर्माण करावे असे मी चे म्हणणे आहे. असे झाले तर समस्या राहणारच नाहीत. बघा संबंध लागतो काय?
'अंतर्मुख होऊन कार्यहीन होणे हे लेखकाच्या मताच्या विपरीत आहे असे दिसते.' मी चा उद्देश कार्य हीन होणे असा नाही. किडी वर उपाय करणे स असमर्थ वाटले मुळे चिंतन करुन उपाय शोधणे असा घेणे. प्रत्येक च्या सामर्थ्य प्रमाणे वेळ लागणार. मी चे सामर्थ्य कमी पडले. ते मुळे हजारो वर्षे लागली. हा काल काही वर्षे अथवा कीही दिवस असावा असे वाटणे संयुक्तिक आहे. ते करता हजारो व्यक्ती चा सहभाग आवश्यक आहे. मी ला उपाय सुचले. उदाहरणार्थ, निवडणुक प्रचार खर्च शासन ने करणे, निवडणुक लढवणे साठी पक्ष सदस्यत्त्व ६ वर्षे असणे (अपक्ष उमेदवार कोठल्या ही पक्ष चा ६ वर्षे सदस्य नसणे) वगैरे. जन आंदोलन कालावधी कमी करणे स हातभार लावेल.
'डिवचणीने पुढे कोणी उत्तराप्रत पोचेल.' अगदी बरोबर. मी ला सर्व माहित आहे असा दावा करत नाही. मी चे विचार व्यक्त केले. कोणी प्रभावी व्यक्ती मन वर घेईल व सुधारणा करेल अशी आशा करतो.
वाचक्नवी उवाच।
'राम खरोखरीच होऊन गेला की नाही, त्याने नलाकरवी सेतू बांधून घेतला की नाही या गोष्टी दुय्यम आहेत.'
'ज्ञानेश्वरी आहे त्या अर्थी ज्ञानेश्वर होऊन गेले. त्यांचे वंशज नाहीत. त्यांनी वापरलेल्या वस्तू नाहीत. म्हणून ज्ञानेश्वर नव्हते असे कोणी म्हणते?'
'राम नव्हता हे सिद्ध झाले की राम होता हे सिद्ध करायची गरज नाही'
'इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् ।
त्यामुळे इतिहासग्रंथ या सर्वापेक्षा काहीतरी वेगळे असावे. प्राचीन काळापासून रामायण-महाभारत या महाकाव्यांना इतिहास म्हणत असले पाहिजेत.'
वाचक्नवी अगदी बरोबर बोलले. रामसेतु राजकारणी व्यक्ती च्या तावडीत सापडला होता. तो सामान्य जन च्या आवाक्यात आला. रामसेतु करता पुरावा देणे आवश्यक नाही. गेली शेकडो वर्षे प्रत्येक पिढी त रामसेतु चे अस्तित्त्व मान्य केले आहे. इतिहास लिहणे ची पद्धत भारत मध्ये नवीन आहे. संस्कृत साहित्य ते काळ चे सत्य सांगते. प्रश्न आहे रामसेतु तोडणे हित कारक आहे का ते चे पुर्नजीव करणे आवश्यक आहे. दोन्ही कामे तराजु ने तोलुन निर्णय घेणे आवश्यक आहे.
'रामसेतू तोडून कालवा बांधणे आर्थिक दृष्ट्या श्रेयस्कर नाही'
हा मुद्दा महत्त्व चा आहे. चर्चा या अनुषंग ने व्हावी
'(जगातील एकमेव असे?)थोरियमचे प्रचंड साठे वाहून जातील'
थोरियम चे साठे एकमेव नाहित. सध्या थोरियम चा उपयोग करणे अशक्य आहे. संशोधन नंतर शक्य होईल. हा मुद्दा चर्चा करणेस योग्य आहे.
'सरकारी प्रचार फक्त श्री राम आणि त्याचे ऐतिहासिक असणे यावरच केन्द्रित झाल्याने सत्य सतत दडपले जात आहे.'
सरकारी प्रचार ऐतिहासिक असणे वर नाही. हा मुद्दा विशिष्ट राजकीय पक्ष ने ऐरणी वर आणला व सरकार चक्रव्युह मध्ये अडकले. येथे राजकीय पक्ष स्वतः च्या उद्देश मध्ये सफल झाला.
'आंतरराष्ट्रीय दडपणाखाली रामसेतू तोडण्याचा अट्टहास सरकार करीत आहे'
मी ला या चा पुरावा सापडला नाही. श्री लंका वर दडपण आणणे आमेरिका आदि राष्ट्र ना सोपे आहे. जर रामसेतु तोडले मुळे अमेरिका किंवा इतर राष्ट्र चा फायदा होणार असता तर ते नी श्री लंका वर दबाव टाकणे पसंत केले असते.
'तमिळनाडूच्या राजकर्त्यांना रामाचे महत्त्व जितके कमी होईल तेवढी जास्त मते मिळतील'
राज्य कर्ते कोणी ही असोत. ते स्वतः चा फायदा पाहणार. राम चे महत्त्व वाढले तर इतर प्रांत मध्ये दुसरे मते मिळवणार. हा प्रश्न राजकीय दृष्टी कोण मध्ये न अडकवता सामाजिक हित संबंध च्या दॄष्टी कोण मधुन हाताळणे जास्त योग्य आहे.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
रामसेतु तोडणारे व तो वाचवणे चे नाटक करणारे ना प्रश्न विचारा.
राम खरेच होऊन गेला काय? रामायण हा इतिहास आहे काय? हे प्रश्न विचारले गेले. कोणी कधी विचारले? प्रेषित होऊन गेला काय? देव ने प्रेषित ला धर्म नियम दिले काय? हे नियम अपरिवर्तनीय का आहेत? वगैरे. या बाबतीत श्रद्धा हा मुद्दा विचार मध्ये घेतला जातो. ऐतिहासिक पुरावे देणे ची मागणी होत नाही. एक पिढी कडुन दुसरी पिढी कडे दिले ला वारसा समजुन पुरावा मागणे ची गरज नाही असे समजले जाते. हा नियम रामसेतु ला का लागु होत नाही? राम आमची श्रद्धा आहे. वारसा हक्क ने मिळाले ला ठेवा आहे. म्हणुन कोणी पुरावा मागु नये असे ठणकाऊन सांगावे.
निदान या संकेतस्थळ वर हा मुद्दा जनता च्या ताब्यात आला असे वाटते. पुढे आता शासन, राज्यकर्ते, विरोधक याना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. शासन व राज्यकर्ते यानी खालील माहिती द्यावी.
रामसेतु कालवा ला विरोध करणारे ना खालील प्रश्न विचारावे त.
तुम्ही या प्रश्न मध्ये भर टाकणे आवश्यक आहे. नंतर ते दोन्ही पक्ष कडे पाठवले व उत्तर देणे स भाग पाडले तर जनता ची ताकद ते समजतील. नंतर केंव्हा ही दिशाभूल करणे चा प्रयत्न करणे पूर्वी १०० वेळ विचार करतील. एक पोष्ट कार्ड वर येथील संदर्भ दिला व कार्ड वर पत्ता लिहणे नंतर पोष्ट मध्ये टाकले तर काम होईल. सर्व वर्तमान पत्र कडे ही कार्ड पाठवणे लाभदायी ठरेल.
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
माझे विचार
जनहितवादी साहेब,
माझ्यकडे उपलब्ध असलेली माहिती मी खाली देत आहे.
१] कालवा बांधले वर दर वर्षी किती माल या मार्ग ने नेला जाईल?
आत्ता जेवढा माल बोटीतून नेला जातो तेव्हढाच माल नंतरही नेला जाईल. याला कारण असे की आत्ता ज्या टनेजकरता बोटी बांधल्या जात आहेत कालांतराने त्याहून अधिक टनेजच्या बोटी बांधाव्या लागतील. सध्याची कपॅसिटी: ३२हजार टन भविष्यातील गरज: ५५००० टन वाढ : ४१.८१टक्के त्यामुळे कालव्याचा वापर नगण्य
२] कालवा बांधले वर श्री लंका ला वळसा घालणे पूर्णपणे बंद होईल काय?
नाही. ज्या बोटी ५५००० अथवा जास्त टनेजच्या बोटी असतील, त्यांना श्रीलंकेस वळसा घालून जाणे अपरिहार्य आहे.
३] कालवा खोदणे पूर्ण झाले वर किती प्राणी स्थलांतर करतील?
आता हे प्राण्यांवर अवलंबून आहे. त्याचा अंदाज माणसाने कसा द्यावा? पण स्वत:चा जीव धोक्यात घालून राहणे कोणी पसंत करेल असे वाटत नाही.
४] हवेत तरंगणारे दगड शोधले काय? केंव्हा सापडणे ची शक्यता आहे?
दगड हवेत कधीच तरंगत नाहीत. ते पाण्यावर तरंगतात असा सर्व रामभक्तांचा दावा आहे. अशी एक् शिळा इचलकरंजीतील बाळमहाराज या नावाने परिचित असलेल्या अवलियाने शोधली आहे. कालच त्या शिळेचे दर्शन घेऊन आलो. उचलूनही बघितली. खरोखरच जड होती.
५] रामसेतु पुन्हा बांधणार काय? केंव्हा?
रामसेतू पुन्हा बांधणे केवळ अशक्य आहे. आता जर बामियानची बुद्धमूर्ती पुन्हा उभी करायची म्हटली, तर ते शक्य आहे का? जरी त्याची प्रतिकृती तयार केली तरी त्या मूर्तीचा मान तयार केलेल्या प्रतिकृतीला नक्कीच नाही मिळणार. दुसरी गोष्ट अशी कि रामसेतू हा नुसताच एक पूल नाही. रामावरील अपार श्रद्धेची ती जिवंत कृती आहे.
वानरांनी "श्रीराम" लिहिलेल्या शिळाच तरंगल्या पण खुद्द श्रीरामाने "श्रीराम" लिहिलेली शिळा मात्र बुडली हे विसरून चालणार नाही.(आणि आज एकही असा रामभक्त मिळणे दुरापास्त आहे हे ही.)
अनिरुद्ध दातार
पाण्यात तरंगणारा दगड
हा मीही हरिद्वार येथे पाहिला आहे. तिथे तो त्या दगडाचा गुण नसून गंगाजलाचा गुण असल्याची पाटी वाचली.
तो दगड प्युमिसचा असल्यामुळे आपण काही अचाट बघणार आहोत, या अपेक्षेचा भंग झाला. आमच्या घरी अंघोळीसाठी न्हाणीघरात प्युमिसचा दगड असे, आणि तो गोव्याच्या (विहिरीतून काढलेल्या) पाण्यात चांगल्यापैकी तरंगे. (आमचे गाव राजापूरपासून खूप दूर आहे, त्यामुळे आमच्या विहिरीत गंगेचे पाणी बहुदा लागत नसेल - असेलही म्हणा. पण प्युमिसचा दगड नागपूरच्या कॉर्पोरेशनच्या नळाच्या पाण्यातही तरंगतो, त्यामुळे हा गंगाजलाचा परिणाम नसावा असे वाटते.)
प्युमिसची मोठी शिळा ही जडच असते, पण तिचे विशिष्ट गुरुत्व (स्पेसिफिक ग्रॅव्हिटी) पाण्यापेक्षा कमी असते. बर्फाचे पोते उचललेल्या कोणालाही हे माहीत असते की बर्फ हा अत्यंत जड असतो. (घरी प्रीतिभोजनाचा घाट घातला तर बर्फाचे पोते विकत आणण्याची वेळ येते.) तरंगण्याच्या बाबतीत प्रश्न वजनाचा नसून विशिष्ट गुरुत्वाचा आहे.
तरंगणार्या सामग्रीचा पूल बांधणे शक्यच नाही तर व्यवहार्यही आहे. बहुतेक मोठ्या सैन्यांकडे तडकाफडकी "पाँटून पूल" बांधण्याची सामग्री असते. इथे आभियांत्रिकी प्रश्न "पूल पाण्याच्या वर कसा राहील" हा नसतो (कारण तरंगणारी वस्तू पाण्याच्या वरच राहाते.) पण तरंगणार्या वस्तूंच्यावर "वजन" हे प्रेरक कार्यरत नसते. (येथे इंग्रजीत प्रेरक=फोर्स, जडत्व=मास आणि वजन=वेट यांतला फरक लक्षात घ्यावा.) तरंगणार्या वस्तूंवर सगळ्यात मोठे प्रेरक गुरुत्वाकर्षण नसून द्रवप्रवाहप्रतिरोध (व्हिस्कॉसिटी) हा आहे. तरंगणार्या वस्तूंचा मोठा पूल एकसंध राखण्यासाठी घटक जोडून किंवा बांधून ठेवण्यासाठी कमालीची मजबूत बंधने लागतात (दोर, साखळ्या, गोंद, काँक्रीट, वगैरे.)
त्यामुळे आभियांत्रिकी दृष्टीने चमत्कार हा नाही की "कोणी अनेक मैल लांबीचा पूल तरंगणार्या वस्तूंनी बांधावा". चमत्कार हा आहे, की सागराच्या प्रवाहात तो पूल एकसंध राहाण्यासाठी पर्याप्त मजबूतीच्या दोर्या, साखळ्या, काँक्रीट कसे प्राप्त केले.
इथे एक कळले नाही (कुठल्याच बातमीपत्रात ही माहिती नव्हती, आणि फोटोत तरंगणारे काहीच दिसत नव्हते) की आजकाल जो रामसेतू दिसतो (जो मूळ सेतूचा अवशेष आहे) त्याचे घटक पाषाण पाण्यात तरंगणारे आहेत की बुडालेले आहेत. तरंगणारे असतील तर प्रवाहामुळे ते सैरावैरा का जात नाहीत त्याचा अभ्यास करणे तांत्रिक दृष्टीने रोचक ठरावे. आणि जर हल्ली तरंगणारे पाषाण सापडत नसतील तर जे पाषाण हल्ली सापडतात ते मूळ वानरसेनेने रचलेले नव्हेत असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो का?
दगड
तरंगणारा दगड बेट द्वारकेलाही ठेवला आहे. त्यावरून द्वारिका बुडालीच नाही असं म्हणणार्यां सो कॉल्ड इतिहाससंशोधकांच्या तोंडाला डिस्कव्हरीच्या शोधमोहिमेमुळे चाप बसला होता ही गोष्ट आठवली.
>>जर हल्ली तरंगणारे पाषाण सापडत नसतील तर जे पाषाण हल्ली सापडतात ते मूळ वानरसेनेने रचलेले नव्हेत असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो का?
जे पाषाण सापडतात ते वर म्हटल्याप्रमाणे प्युमिसचा दगड असतो / काहि तरंगणारे वाळलेले कोरल्स असतात. (बेट द्वारकेला तर हे कोरल्स विकायला ठेवले आहेत -अर्थात तरंगणारे दगड म्हणून). त्यामुळे तसाही ता दगडांचा आणि वानरसेनेचा संबंध वाटत नाही.
(अवांतरः जड वस्तु उचलण्यावरून अजून एक आठवलं, हिमाचल प्रदेशात (धरमशाला येथे बहुतेक) एक भीमाचा दगड आहे. जर एका तगड्या पहिलवानाने जरी तो उचलायचा प्रयत्न केला तरी तो उचलला जाऊ शकत नाही. पण पाच सामान्य लोकांनी त्यावरील ठराविक जागी बोट लावलं तरी तो सहज उचलला जातो. मी हा दगड आणि भैतिकीचा चमत्कार पाहिलेला आहे. या भीमाच्या गर्वहरणाला वापरला होता म्हणे (अशीच एक् गर्व हरणाची हनुमानाची गोष्ट आहेच् :ड्) )
त्यामुळेच ही रचना तोडु नये असं माझं मत आहे. कारण..
१. जर तो खरच् मानवनिर्मीत असेल तर् हे महान तांत्रिक आश्चर्य आहे
२. जर नैसर्गिक असेल तर आणखी मौल्यवान आहे, कारण अशी नैसर्गिक रचना एकमेवाद्वितिय आहे.
पुन्हा दगड
(अवांतरः जड वस्तु उचलण्यावरून अजून एक आठवलं, हिमाचल प्रदेशात (धरमशाला येथे बहुतेक) एक भीमाचा दगड आहे. जर एका तगड्या पहिलवानाने जरी तो उचलायचा प्रयत्न केला तरी तो उचलला जाऊ शकत नाही. पण पाच सामान्य लोकांनी त्यावरील ठराविक जागी बोट लावलं तरी तो सहज उचलला जातो. मी हा दगड आणि भैतिकीचा चमत्कार पाहिलेला आहे. या भीमाच्या गर्वहरणाला वापरला होता म्हणे (अशीच एक् गर्व हरणाची हनुमानाची गोष्ट आहेच् :ड्) )
असाच दगड कात्रज घाटापाशीपण आहे असे ऐकले आहे. त्याला बारा माणसे लागतात. फक्त तो भिमाचा नसून मशिदाच्या आवारात असल्यामुळे कुठल्या तरी पिराचा आहे, इतकेच.
यात भौतीक शास्त्र आहे. थोडक्यात, एखादी जड वस्तू उचलताना सर्व बाजूने योग्य ते फोर्सेस लागले तर सोपे जाते...
भैतिकीचा चमत्कार
म्हणून तर म्हटलं भैतिकीचा चमत्कार :)
दगड
तो दगड प्युमिसचा नक्कीच नव्हता. चांगला बसाल्टसारखा(नक्की प्रकार माहीत नाही. भूगोल माझा तसा कच्चाच होता;आहे).
जर नैसर्गिक असेल तर आणखी मौल्यवान आहे, कारण अशी नैसर्गिक रचना एकमेवाद्वितिय आहे.
एकदम पटलं बुवा.
अनिरुद्ध दातार
अभियंता, ऋषिकेश, व धनंजय म्हणतात
१. पाणी मध्ये तरंगणारे दगड अस्तित्वात होते व आहेत. पाणी च्या लाट मुळे ते इतस्ततः पसरले.
२. ३२हजार टन च्या बोटी कालवा बनवले नंतर या मार्गाने जाऊ शकतात.
या वरुन तर्क ने असे म्हणता येईल की जो आपण रामसेतु समजतो तो रामसेतु नाही. जर कालवा बनला तर निदान ३२हजार टन व त्या खालील बोटी जाऊ शकतील व त्या मुळे वेळ व इंधन बचत होईल. मग विरोध अशा साठी?
प्रत्यय लावणे वेळी नाम व सर्वनाम चे
रुप बदलणे मी थांबवत आहे.
मी ची अधिक ओळख येथे आहे.
अट्टाहास का?
कालवा बनवण्यासाठी हा सेतू तोडायची गरज नाही आहे. तरीही का तोडला जावा? एक भुअंतर्गत कालवा काढुनही ही समस्या सोडवली जाऊ शकते तेही एका ऐतिहासिक/शास्त्रिय/भाविक (ज्याला जे हवं ते घ्या :) ) स्थानाला धक्का न लावता. तर कालवा त्याच सेतुमधुन काढायचा अट्टाहास का?
कालवाकालव
>एक भुअंतर्गत कालवा काढुनही ही समस्या सोडवली जाऊ शकते
भूअंतर्गत कालवा म्हणजे?
भुअंतर्गत कालवाकालव
त्या सेतुला धक्का लावण्याऐवजी भारतीय भुमीतुन (मंडपम [हे गाव रामेश्वरम आणि धनुषकोटि गावांच्या मधे आहे]गावाजवळील वाळुच्या पुळणींच्या मैदानातुन) कृत्रिम खोल कालवा काढायचा पर्याय तज्ञांनी सुचवला आहे. थोडा अधिक खर्चिक पण व्यवहारी तोडगा आहे.
या पर्यायामुळे सेतुला धक्का लागणार नाहीच पण बोटींनाही जवळचा मार्ग उपलब्ध असेल.
अवांतरः कालवाकालव शीर्षक एकदम मस्त.. खुप हसलो :))
कॅ. बालक्रिष्नन् ची मुलाखत
रिडीफ मधील 'The Sethu Samudram does not make nautical sense' ही कॅ. बालक्रिष्नन् ची मुलाखत वाचा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते कुठल्याच बाजूचे नाहीत केवळ त्याभागात आणि विषयात काम केलेले अभियंता/अभ्यासक आहेत.