राम आणि रामायण - एक अराजकीय चर्चा

गेल्या काही दिवसात आधी रामसेतू आणि आता श्रीरामांच्या अस्तित्वावरून भारताच्या सामाजिक, राजकीय आणि बर्‍याच अंशी भावनिक विश्वात खळबळ उडाली आहे. रामसेतू मानवनिर्मित की नैसर्गिक या चर्चेत रामायण घडले की नाही, श्रीराम अस्तित्वात होते याचे पुरावे नाहीत असे सरकारतर्फे जाहीर केले गेले. जनतेच्या प्रचंड रोषाची कल्पना आल्याने ही भूमिका तातडीने मागे घेणे सरकारला भाग पडले.

ही झाली या प्रकरणाची पार्श्वभूमी, पण याच्या राजकीय पैलूंपेक्षा ऐतिहासिक आणि इतर गोष्टींवर प्रकाश पडावा म्हणून ही चर्चा.

  • रामायणात वर्णलेले प्रसंग घडल्याचे काही पुरावे आहेत का?
  • रामायण जर एक काव्यच असते, तर भारतासारख्य खंडप्राय देशात माहितीच्या आदानप्रदानाची काही साधने नसताना ही कथा अगदी तळागाळापर्यंत कशी पोहोचली आणि हजारो वर्षे कशी टिकून राहिली?
  • रामायणाची आणि रामचरित्राची कालनिश्चिती करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे का?

या चर्चेच्या अनुषंगाने इतरही काही ऐतिहासिक, सामाजिक प्रश्न असल्यास अवश्य मांडावेत.

आपला
(रामरत) वासुदेव

लेखनविषय: दुवे:

Comments

हं

खरे आहे. ह्या बाबतीत शास्त्रीय संशोधन होऊन एकदाचा निकाल लावला पाहीजे. पण काही घाइ नाही आहे .

बाकी निकाल काही लागो, आपले संसदपटू देशापूढील् आत्ताच्या आधीक महत्वाच्या प्रश्रांची उपाय योजना करण्यात ताबडतोब लागोत.

लोकसंख्येच्या अनुषंगाने होणारा असंतूलीत विकास हा संतुलीत होण्यास, देशातील उत्पादने, साधनसंपत्ती व लोकांचे जीवनमान सुधारणे ह्याकडे लक्ष देण्यास आधीक प्राधान्य देण्यात यावे.

तसेच जे रामभक्त आहेत् त्यांना विनंती की नका पाठपुरावा करु ह्या विषयाचा रामाचा शास्त्रीय पुरावा मिळाल्यास तो देखील सामान्य भारतीय बनून जाइल, मग झालीका पंचाइत, हेच रामराज्य समजून रहावे लागेल्.

सहजराव

सहजराव,

आपण प्राधान्याविषयी अगदी उचित मुद्दे मांडले आहेत पण दुर्दैवाने तो या चर्चेचा विषय नाही.

तसेच जे रामभक्त आहेत् त्यांना विनंती की नका पाठपुरावा करु ह्या विषयाचा रामाचा शास्त्रीय पुरावा मिळाल्यास तो देखील सामान्य भारतीय बनून जाइल,

वैज्ञानिक दृष्टीने आपल्या इतिहासाचा पडताळा घेणे कधीही चांगलेच आहे. यातून काहीही निष्पन्न होवो, श्रीरामाचे भारतीय जनतेच्या भावनिक विश्वात असलेले स्थान नेहमीच अभेद्य राहील. कारण "असल्याचे पुरावे मिळाले नाहीत म्हणजे नसल्याचे पुरावे मिळाले असे होत नाही"

आपला
(तर्कसंगत) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

मला वाटले

या चर्चेच्या अनुषंगाने इतरही काही ऐतिहासिक, सामाजिक प्रश्न असल्यास अवश्य मांडावेत

मला वाटले की आत्ता काही घाइ नाही आहे. आपण आपले पोट भरून, निवांत ढेकर देत, चर्चा करतोय पण मला वाटते की पोट भरलेल्या जनतेच्या "प्रचंड रोषामूळे" सरकारचे उपाशी जनतेकडे दुर्लक्ष् नको म्हणून् माझा प्रतिसाद.

असो. जाऊ दे तुमच चालू द्या. मी जरा जेवून् घेतो. :-)

उपयोगी दुवा

वरील चर्चेच्या अनुषंगाने ऑर्कुटवरील या दुव्यातील अनिल यांचा रिप्लाय कदाचित उपयोगी पडेल.

धन्यवाद, पुरातत्त्व खाते

कल्याणीताई,
अनिलमहोदयांच्या विचारांचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. पण या विचारांच्या समर्थनार्थ त्यांनी काही संदर्भ दिले असते तर चांगले झाले असते.
ते विचार वाचताना सहज लक्षात आले की न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र हे पुरातत्त्व खात्याने बनवले नसून न्याय खात्याने बनवले होते आणि पुरातत्त्व खात्याच्या प्रमुखांनी फक्त स्वाक्षरी केली होती. पुरातत्त्व खात्याने रामसेतू संबंधी संशोधन अद्याप केले नाही असे समजते.
आपला
(आभारी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

सोक्ष-मोक्ष

जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मते ही संरचना मानवनिर्मित आहे असे म्हणण्यात काही तथ्यांश नाही. तांत्रिक माहितीत रस असलेल्यांनी हा लेख वाचावा.

(लेखात बरेच अनोळखी शब्द्द आल्याने, लेख 'तांत्रिक'! असावा. ;) )

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

काव्य

'रामायण' महाकाव्य असावे.

राम ही ऐतिहासिक व्यक्ती असली (असे सिद्ध झालेच समजा) तरी देखील तिचे देवत्व किंवा रामायण कथेतील सारे वर्णन सत्य असेलच असे नाही.

खरा राम कोण / कसा होता ही केवळ शैक्षणिक उत्सुकता आहे, त्याचा पिढ्या न पिढ्या असलेल्या मान्यतांवर विपरीत परिणाम होऊ नये. रामाचे ऐतिहासिक व्यक्तिमत्व देवस्वरूप नसले म्हणून रामायण परिकथेतील नायकाला कमी लेखण्याचेही कारण नाही किंवा अशी व्यक्ती असल्याचे सिद्ध झाल्याने रामाचे देवत्व अधिक उत्कट होईल असे मानण्याची ही गरज नाही.

हे कसेही असले तरी सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या शक्याशक्यतेचा विचार 'आजची' परिस्थिती आर्थिक/पर्यावरणाशी संबंधित (सांस्कृतिक/राजकीय नव्हे) पुरताच मर्यादित ठेवावा. राजकारणा वा धर्माशी त्याची गल्लत करावयाचे कारण नाही.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

सहमत

'रामायण' महाकाव्य असावे

रामायणाविषयी पुरातत्वशास्त्राचे इतर काही पुरावे आहेत का हे जाणून घ्यायला आवडेल. (उदा. अयोध्येचे अवशेष) रामसेतूचा पुरावा कितपत ग्राह्य आहे हे ही महतवचे आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

रामसेतू हाये

नासावाल्यांनी सांगीतलं की काही तरी हाये ,
त्यो रामसेतूच हाये.
रामसेतूच्या भावनेशी खेळनं म्हण्जी संघावाल्यांना रेडीमेड मलीदा हाये.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

वा!व्वा!

वासुदेवराव,

अस्मादिकांचा आवडता विषय मांडलात. वेळ झाला की सविस्तर प्रतिसाद देते.

चांगला विषय!

वासुदेवराव,

विषय चांगला आहे. सविस्तर उत्तरे नंतर देईन, पण खाली काही पटकन सुचले ते:

रामायणात वर्णलेले प्रसंग घडल्याचे काही पुरावे आहेत का?

माहीत तरी नाही. तसे वाचले देखील नाही. एक गोष्ट नक्की त्या वेळची सर्व स्थाने आजही आहेत. रामाच्या आयोध्येपासून ते लवा च्या लवपूर (आजचे "लाहोर") पर्यंत.

रामायण जर एक काव्यच असते, तर भारतासारख्य खंडप्राय देशात माहितीच्या आदानप्रदानाची काही साधने नसताना ही कथा अगदी तळागाळापर्यंत कशी पोहोचली आणि हजारो वर्षे कशी टिकून राहिली?

विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यात अजून एक मुद्दा आहे.

रामायणाची आणि रामचरित्राची कालनिश्चिती करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे का?

बर्‍याच जणांनी केला आहे. मला वाटते वर्तकांनी पण केला आहे. असा कालनिर्णय करणारे त्या कथांमधील खगोलशास्त्रीय माहीतीवर करत असली तर विचार करण्यासारखे वाटतात. इतर नाही.

माझी उत्तरे

रामायणात वर्णलेले प्रसंग घडल्याचे काही पुरावे आहेत का?

ठोस पुरावे नाहीत. पुरातत्त्व खात्याकडे ही रामायणकालीन ऐतिहासिक जागा म्हणून दाखवण्यासारखे जतन केलेली स्थळेही नाहीत. याचा अर्थ राम ही व्यक्ती नव्हती असे नाही. काही पुराणांच्या आधारे मी भारतवर्षात घडलेल्या राजांचा एक चार्ट तयार करते आहे. त्यात रामापर्यंतची वंशावळ सहज दिसेल. ती जनमेजयापर्यंत वाढवत नेता येईल. (तसे हे काम अतिशय किचकट असून त्याला अनेक अडचणी आहेत. तो चार्ट उपक्रमावर टाकून येथील तज्ज्ञांकडून त्यातील शंका/ अडचणी/ प्रश्न विचारण्याचा मानस आहे.)

रामायण जर एक काव्यच असते, तर भारतासारख्य खंडप्राय देशात माहितीच्या आदानप्रदानाची काही साधने नसताना ही कथा अगदी तळागाळापर्यंत कशी पोहोचली आणि हजारो वर्षे कशी टिकून राहिली?

रामायण हे नि:संशय काव्य आहे. वाल्मिकि या महाकवींनी रचलेले. तो इतिहास नाही कारण त्या महाकाव्यात काव्याचे नियम पाळलेले आहेत, इतिहासाचे नाहीत पण याचा अर्थ त्यातील संदर्भ खोटे आहेत असा नाही. माहितीच्या आदानप्रदानाची साधने नव्हती हे देखील खरे नाही. तत्कालिन राजांकडील विद्वान, ब्रह्मवृंद हे काम चोख करत. याला कारण मौखिक ज्ञानप्रसार. यावर एक लेख उपक्रमावर टाकला होता तो येथे पुष्टी देईल.

रामायणाची आणि रामचरित्राची कालनिश्चिती करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे का?

अनेकांनी केला आहे. विकास यांनी म्हटल्याप्रमाणे वर्तकांनी केला आहे. मध्यंतरी मनोगतावर एकांनी केल्याचा दावा केला होता. दिल्लीतील एका प्राध्यापिकेने २-३ वर्षांपूर्वी तो केल्याचा दावा केला होता. (दुर्दैवाने अशा विषयांत कोणाला आवड असते किंवा हे विचार मांडण्याची संधी मिळेल याची कल्पना त्यावेळेस नसल्याने मी हा दुवा साठवला नाही पण टाईम्समध्ये आल्याचे आठवते.) अदमासे सात ते साडेसात हजार वर्षांपूर्वीचा काळ विद्वानांच्या मते निश्चित होतो. यांत अनेक मते मतांतरे आहेत.

kings

वर उल्लेख केलेल्या चार्टचा एक तुकडा येथे लावत आहे. वाचायला त्रास झाल्यास क्षमा मागते.

ऐतिहासिक स्थळांविषयी अनास्था

ठोस पुरावे नाहीत. पुरातत्त्व खात्याकडे ही रामायणकालीन ऐतिहासिक जागा म्हणून दाखवण्यासारखे जतन केलेली स्थळेही नाहीत.

सक्षम पुरावे नाहीत हे तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. आधारासाठी आवश्यक अश्या ऐतिहासिक वास्तू आता दिसत नाहीत हेही सत्य आहे. पण याला अनेक कारणे आहेत. जगात जी काही प्राचीन ऐतिहासिक स्थळे, अवशेष, स्मारके शिल्लक आहेत ती कमी लोकवस्ती, निर्जन (कधीकधी निर्जलही) प्रदेशात आहेत किंवा त्यांच्या महत्त्वाविषयी आणि ती जतन करण्याविषयी आसपासाच्या लोकांत जागृती आहे. भारतात असलेली दाट लोकवस्ती, जागेचा अभाव शिवाय इतर कारणे जसे की गुप्तधनाची शक्यता आणि एकूणच ऐतिहासिक अवशेषांविषयी असलेली अनास्था (श्री. आजानुकर्ण याविषयी आपल्या प्रवासवर्णनांतून लिहीत असतात) ही प्रमुख कारणे सांगता येतील. याशिवाय वारंवार झालेली परकीय आक्रमणे, आक्रमकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबरोबरच असलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाकांक्षा यामुळे एतद्देशीय जनतेच्या भावनांवर, मान्यतांवर आघात करण्यास प्रवृत्त झालेले आक्रमक आणि त्या नादात त्यांनी हेतुपूर्वक केलेले ऐतिहासिक स्थळांचे नुकसान ही देखील महत्त्वाची कारणे आहेत.

रामायण हे नि:संशय काव्य आहे.

काव्य खरेच. वास्तविक पाहता चर्चाप्रस्ताव लिहिताना माझ्याकडून ही चूक झाली. वस्तुतः "रामायण जर एक काव्यच असते, तर .." ऐवजी "रामचरित्र जर एक काव्यच (म्हणजे काल्पनिकच) असते, तर ... " असे हवे होते.

भारतीय राजवंशाविषयी सुरू असलेल्या अभ्यासाला शुभेच्छा. तुमचे निष्कर्ष वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत.

आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

आपला
(आभारी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

सक्षम पुरावे

सक्षम पुराव्यांबद्दल तुम्ही लिहिले ते खरे आहे. अर्थातच, तुत-आँख-आमुनचे पिरॅमिड, खजिना आणि ममी आहे म्हणून तो प्राचीन इजिप्तात राजा होता असे नियम भारताला लागू असण्याची गरजही नाही. महाकाव्यातून, पुराणांतून असे अनेक संदर्भ (पुरावे हा शब्द टाळते) मिळतात ज्यावरून अनुमान ठरवता येते.

एकंदरीतच, अशा विषयांबद्दल सर्वांच्या मनातील अनास्था र्‍हासाला कारणीभूत आहे.

भारतीय राजवंशाविषयी सुरू असलेल्या अभ्यासाला शुभेच्छा. तुमचे निष्कर्ष वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत.

धन्यवाद. मी ही करण्यास उत्सुक आहे फक्त वेळेची वानवा आहे. :)

ऑ!...... भारत् हा एक् महान् देश् आहे. हे पटले......

सक्षम पुराव्यांबद्दल तुम्ही लिहिले ते खरे आहे. अर्थातच, तुत-आँख-आमुनचे पिरॅमिड, खजिना आणि ममी आहे म्हणून तो प्राचीन इजिप्तात राजा होता असे नियम भारताला लागू असण्याची गरजही नाही.
? ऑ:
भारत् हा एक् महान् देश् आहे. हे पटले......
इतिहास् आणि लोककथा यात् गल्लत् होतेय्.
लोककथा इतिहासावर् आधारीत् असु शकतात्.....असतीलच् असे नव्हे
एकंदरीतच, अशा विषयांबद्दल सर्वांच्या मनातील अनास्था र्‍हासाला कारणीभूत आहे.

रामायणकालीन् सापडलेल्या वस्तुंची कोणतीही शाहनिशा झालेली नाही. हे खरे . ऍडम्स् ब्रीज् चा कालावधी हा हडप्पन संस्क्रुती पूर्वीचा आहे. हडप्पन् संस्क्रुती मधे रामा बद्दल् काही संशोधीत् झालेले नाही.
महाभारतातील् लढाई ही भारतिय इतिहासामधली पहिली लढाई आहे की जी जमीनी साठी मालमत्ते साठी झाली .नागरी संस्क्रुती स्थापीत् होत असल्याचे हे प्रदर्शक् लक्षण् आहे.( संदर्भ् :डिस्कव्हरी ऑफ् ईन्डीया.....पं. ज नेहरु)
य निकषावर् रामायणाकडे पाहीले तर रामायण कालीन लढाई मध्ये तर् दगड् धोन्डे असली शस्त्रे वापरली गेली आहेत्.
दुसरे म्हणजे रामायण् कालीन लोक् झाडांची पाने/ साली वस्त्रे ( वल्कले) म्हणुन् वापरत् होते .कंद् मुळे खात् होते
महाभारतात् पांडव वनवासात सुद्धा नागरी वस्त्रे वापरत् होते.द्रौपदी अन्न शिजवत् होती. लोक् वाडे बांधत् होते. रामायणात् कोठी बांधकामाचा बांधत् असल्याचा उल्लेख् नाही
रामाचे वर्णन् अजानुबाहु असे आहे..अजानुबाहु म्हणजे गुडघ्यापर्यन्त् लांब् हात् असलेला ( हे वर्णन् आदी मानवाला सुद्धा लागु होत् नाही)
(मला कोणाच्याही धार्मिक् भावना दुखवायच्या नाहीत्....)
याच् कालावधीत् रावणाकदे विमान् होते...त्चाच्याकडे विमानतळ् होते असे सबसे तेज् खबर् देणारे सांगतात्........अर्थात् सक्षम पुराव्यांबद्दल तुम्ही लिहिले ते खरे आहे. अर्थातच, तुत-आँख-आमुनचे पिरॅमिड, खजिना आणि ममी आहे म्हणून तो प्राचीन इजिप्तात राजा होता असे नियम भारताला लागू असण्याची गरजही नाही.
असे असल्यावर सगळेच् डोळस् तर्क् फोल् ठरतात्.
एकंदरीतच, अशा विषयांबद्दल सर्वांच्या मनातील अनास्था र्‍हासाला कारणीभूत आहे.
म्हणजे नक्की काय्? आस्था माणसाला अन्ध् बनवते...अनास्था ;उदासीन् बनवते.
पुरावे नसतील तर् सनतन् प्रभाती विचारांपासुन् मुक्त् होउन् संदर्भांकडे डोळसपणे पहावे हे योग्य.

महाशय, आपल्याला विनंती

उगीच कोणते तरी संदर्भ घेऊन त्यावर कोणती तरी टिप्पणे करून एखाद्याच्या मागे लागल्यासारखे करू नका. यांत तुमची शोभा जितकी होत आहे तेवढी कळण्याची सोय तरी राखून ठेवा.

पुरावे नसतील तर् सनतन् प्रभाती विचारांपासुन् मुक्त् होउन् संदर्भांकडे डोळसपणे पहावे हे योग्य.

अशाप्रकारची वाक्ये एखाद्याला चिकटवताना कृपया, थोडा विचार करा.

ही माझ्याकडून आपल्याला शेवटची विनंती समजा. मी या आधीही आपल्याला तुमच्याशी संवाद साधण्यात स्वारस्य नसल्याबद्दल कळवले होते. हे जाहीर लिहिते आणि तसे करताना बरे वाटत नाही पण व्य. नि.तून सांगून किंवा टाळून आपल्याला कळत नाही असे दिसते.

काळ

अदमासे सात ते साडेसात हजार वर्षांपूर्वीचा काळ विद्वानांच्या मते निश्चित होतो. यांत अनेक मते मतांतरे आहेत.

हा काळ निश्चित होणे आणि जागतिक इतिहासामध्ये तो नेमकेपणाने बसणे या महत्वाच्या आणि अवघड गोष्टी आहेत. सध्या माहित असलेली सर्वात जुनी संस्कृती इजिप्तमध्ये साधारण पाच-साडेपाच हजार वर्षांपूर्वी होती. या संदर्भात रामायणाचा हा काल कसा बसतो हे बघायला हवे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

असे आहे की

पाश्चात्यांना सध्या माहित असलेला इतिहास इस्त्राइल आणि इजिप्तच्या पुढे नेण्यास ते फार उत्सुक दिसत नाहीत हा एक मुद्दा येथे आहे.

सर्वात जुनी संस्कृती सुमेरियन असावी. (इजिप्शियन नसावी) हडप्पन जागांवर सर्वात जुने पुरावे इ.स. पूर्व ६००० चे आहेत असे मानले जाते (पण येथेही ठोस पुरावे नाहीत, संशोधन सुरु आहे.) तसे असल्यास ७००० वर्षांपूर्वीचा काळ चुकीचा असेलच असे नाही. (बरोबर असेल असेही नाही.)

वाचता येत नाही.

फारच लहान अक्षरे झालीत वाचता येत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्यातरी

अक्षरे लहान आहेत याची कल्पना आहे. सध्यातरी भिंग घेऊनच वाचावे लागेल. :) नाइलाज आहे.

सदर चार्ट ओपनऑफिस ड्रॉमध्ये केला कारण पावरपाईंट युनिकोड फाँट्स चालवून घेत नाही. ओपन ऑफिस ड्रॉमधून सरळ पिक्चर किंवा इमेज फाईल कशी करावी हे कळत नाही. क्वालिटी कशी सुधारता येईल यावर विचाराधीन आहे.

येथे लावलेला तुकडा

दक्ष प्रजापती पर्यंतचा वंशवृक्ष मिळाला. अक्षरे वाचण्याइतपत मोठी आहेत. पण तो येथे लावलेला तुकडा कोठे आहे? तो दिसला नाही.--वाचक्‍नवी

तोच तुकडा

तोच तुकडा... जो चार्ट लावला आहे तोच. (तुकडा म्हटले कारण १० जणांचीही धड नावे नाहीत. वासुदेवांनी चर्चा टाकली तेव्हा तो तक्ता टाकावासा वाटला.) हे काम करायला मला सध्या वेळ होत नाही. जसा वेळ होईल तसा तो चार्ट मोठा करून टाकेन. त्यावेळेस आपल्याला त्यात त्रुटी, चुका आढळल्या, सुधारणा दिसल्या तर अवश्य सुचवा.

थोडे अवांतर होईल पण...

थोडे अवांतर होईल पण...रामाशी संबंधीत गोष्ट असल्याने टाकतो. कृपया यावर राजकीय टिपण्णी करूया नको! पण खालील सकाळ मधील बातमी पहा, राम आहे का नाही, राम सेतू आहे का नाही (त्यावर काही पर्यावरणीय गोष्टी पण आहेत पण त्यावर जरा वाचून नक्की करून लिहीन) नेहेमी प्रमाणे सावळा गोंधळ:

व्यवस्थापन अभ्यासक्रमातून रामाचे धडे

नवी दिल्ली, ता. १८ - रामायण घडल्याचा पुरावा नाही, असा दावा केंद्र सरकारने अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर, केंद्र सरकारतर्फेच चालविण्यात येणाऱ्या व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमात मात्र रामायणातील काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे!
वनवासात जाताना रामाने भरताकडे राज्याची सूत्रे सोपविली, तेव्हा राज्यकारभार कसा करावा याचा सल्ला त्याने भरताला दिला. हा सल्ला आजच्या काळालाही लागू पडतो. सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमात हा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय संस्कृत संस्थेतर्फे हा अभ्यासक्रम चालू होणार आहे.

""चांगल्या प्रशासनाबाबत रामाने भरताला दिलेल्या सल्ल्यावर आधारित आम्ही या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. रामाने वनवास घेऊ नये, अशी विनंती भरताने केली, तेव्हा रामाने त्याला प्रशासनासंदर्भात सुमारे चारशे प्रश्‍न विचारले. चांगले प्रशासन कशास म्हणायचे? लोकांच्या तक्रारींचे निवारण कसे करायचे, आदी बाबी त्यातून स्पष्ट होतात,'' अशी माहिती कुलगुरू व्ही. कुटुंबशास्त्री यांनी दिली.

उभयतांत झालेले हे संभाषण सध्याच्या काळातही उपयुक्त आहे. याखेरीज रामायणात अनेकदा सार्वजनिक प्रशासनाबाबत राम बोलला आहे आणि त्यालाही या अभ्यासक्रमात स्थान मिळाले आहे. महाभारतात भीष्मांनी युधिष्ठिराला केलेले राज्यकारभारविषयक मार्गदर्शनही अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमाला अंतिम स्वरूप देण्यात येत असून, दूरशिक्षण पद्धतीने हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

उपदेश राजधर्माचा
... राम म्हणजे साक्षात जाणीव. तेव्हा भरताच्या मनातील राम जागृत होईल असा निरोप प्रभू श्रीरामांनी सुमंतासोबत त्याला पाठविला. भरताच्या मनातील संदेह त्यांना कळला होता. अपराधीभावामुळे तो राज्यकारभार धडपणे पाहू शकणार नाही, त्याचे मन कशातही रमणार नाही हे चित्र श्रीरामांना दिसत होते. म्हणून त्यांनी भरताला राजधर्माच्या चार गोष्टी सांगितल्या. राजपदाबरोबर अनेक सुखोपभोग येतात, मात्र त्यांचा भोग घेताना राजाने मनातून अलिप्त आणि निष्काम असायला हवे. राजाचे प्रजेवर प्रेम असायला हवे, राजाने प्रजेचे पुत्रवत्‌ पालन करायला हवे, असे राजधर्माचे मंत्र सांगून मग प्रभू श्रीरामांनी आई-वडील आणि अन्य कुटुंबीयांसाठीचे निरोप सुमंताकडे दिले...
(डॉ. श्री बालाजी तांबे लिखित श्रीराम विश्‍वपंचायतन - "उकल गीतरामायणाची' या पुस्तकातून)

आणखीन काही प्रश्न

(१) वैज्ञानिक काळ म्हणजे ईसा अवतरित झाल्यानंतरच का ? त्याच्या आधीच काहीपण सांगितले कि त्या "कहाण्या"?
(२) कृष्णानी गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलले म्हणे, कहाणीच असणार...
(३) यमुने मधे कालिया नाग मारला ती पण कहाणीच का?
(४) अर्जुनाच्या रथा च्या छतावर हनुमान बसले होते म्हणे, कसं शक्य आहे?
(५) तुलसीदास किंवा वाल्मीकि तरी होते का, कि ह्या पण कल्पनाच?
आपला
बर्‍यापैकी गोंधळलेला
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

रामसेतू

प्रतिसादाचा आकार बघून ज्यांची पुढे वाचण्याची इच्छा मेली असेल त्यांनी कृपया तडक तात्पर्य वाचावे. :-)

रामसेतूच्या अनुषंगाने बरीच चर्चा आज देशात घडत आहे. अशा वेळी माझ्यासारख्या पिंकटाकू माणसाला आपले विचार मांडण्यावाचून कसे राहवेल. सेतूसमुद्रम् प्रकल्प करावा की न करावा या वादात जे मुद्दे वापरले जात आहेत त्यामुळे अजूनच वाद होत आहे.

१. राम होता की नव्हता: राम अगदी देव किंवा अवतार वगैरे नसला तरी एखादा जनहितदक्ष आणि शूर राजा नक्की असू शकतो. आणि वाल्मिकींनी या राजाची कथा म्हणून रामायण लिहीले असू शकते. भाट, बखरकार किंवा ऋषीमुनी वगैरे सारख्या लोकांनी रामायणात् अजून रंजकता आणण्यासाठी स्वतःच्या पदरचे दोन वाढीव शब्द रामायणात टाकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे रामायण आणि महाभारतातील ठिकाणांची नावे पूर्वापार चालत आलेली आहेत आणि त्या ठिकाणांचे तेथे असणे हा राम ही व्यक्ती होऊन गेल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो. रामायणात रावणाची लंकाच होती आणि आजही ती लंकाच आहे.

२. पुरावे मागणे: एक पूल तोही समुद्रात हजारो वर्षापूर्वी बांधला होता. आणि आज त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मागणे आणि ते मिळत नाहीत म्हणून तो पूलच किंवा तो राजाच नव्हता असे म्हणणे म्हणजे स्वतःच मत खरं करण्यासाठी केलेला आटापिटा आहे. उद्या शिवाजे महाराजांआणि पुरावे शोधण्याचं उत्तरदायित्व कोण घेणार? आणि शोधले तरी सोयीस्कर् असेल् तरच ते मान्य केले जाणार. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूचा तपास अजून चालूच आहे. अनेक अहवाल समित्या रखडलेल्या आहेत.

मग खोदकाम करावं का?: रामसेतू आधी असला तरी काळाच्या ओघात तेथे काहीच शिल्लक नाहीये. आणि जे काही आहे ते श्रद्धेच्या स्वरूपात आहे. त्यामुळे त्या जागी आडवा कालवा खोदला काय आणि श्रीलंका भारत असा पूल बांधला काय सारखंच. आधी तिथे काहीतरी होतं म्हणून आता ती जागा वापरायचीच नाही असं केलं तर पृथ्वीवर काहीच हालचाल करता येणार नाही. सेतूसमुद्रम काय
रामसेतू पाडून थोडेच बांधला जाणार आहे ? त्यामुळे श्रद्धेला ठेच वगैरे बसणे हा कांगावा वाटतो.

आता एक दुसरा मुद्दा: निसर्गाचा आदरः आपण अप्पलपोटे मानव निसर्गाचा आदर करायला कधी शिकणार? समुद्राखाली सजीव प्राण्यांची प्रचंड मोठी वसाहत आहे. आता सेतूसमुद्रम प्रकल्पामुळे ती जीवसृष्टी प्रचंड ढवळली जाणार. आतले गरम पाण्याचे प्रवाह बदलणार . बरेच प्राणी विस्थापित होणार वगैरे वगैरे वगैरे. याची काळजी कदर कुणाला आहे का? बळी तो कान पिळी या म्हणीनुसार आज आपण इतरांचे कान पिळतोय खरे पण एखाद दिवशी माणसाचा कान असा काही पिळला जाणार आहे की 'राम नाम सत्यच' होणार आहे.

तात्पर्यः धार्मिक कारणापेक्षा मला पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सेतूसमुद्रम प्रकल्पाला केलेला विरोध पटतो. आणि मीही करतो. पैसा वाचवण्यासाठी कुणाचा म्हणजे कुणाचाही जीव घेण याहून अधमकृत्य दुसरे नाही.

अभिजित...
जय जय राम कृष्ण हरी.

अव्यवहार्य

हा प्रकल्प अव्यवहार्य का आहे, त्याचे स्पष्टीकरण येथे वाचता येईल.

स्वामी

अरेच्च्या हा तर एकदम माझ्या तात्पर्याच्या जवळपास जाणारा लेख आहे.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

छान!

अभिजितराव, तुम्ही अतिशय वास्तवदर्शी मुद्दे मांडले आहेत. पुरावे शोधण्याविषयी एका अधीच्या प्रतिसादात लिहिलेला मजकूर इथे उद्धृत करत आहे.

.... आधारासाठी आवश्यक अश्या ऐतिहासिक वास्तू आता दिसत नाहीत हेही सत्य आहे. पण याला अनेक कारणे आहेत. जगात जी काही प्राचीन ऐतिहासिक स्थळे, अवशेष, स्मारके शिल्लक आहेत ती कमी लोकवस्ती, निर्जन (कधीकधी निर्जलही) प्रदेशात आहेत किंवा त्यांच्या महत्त्वाविषयी आणि ती जतन करण्याविषयी आसपासाच्या लोकांत जागृती आहे. भारतात असलेली दाट लोकवस्ती, जागेचा अभाव शिवाय इतर कारणे जसे की गुप्तधनाची शक्यता आणि एकूणच ऐतिहासिक अवशेषांविषयी असलेली अनास्था (श्री. आजानुकर्ण याविषयी आपल्या प्रवासवर्णनांतून लिहीत असतात) ही प्रमुख कारणे सांगता येतील. याशिवाय वारंवार झालेली परकीय आक्रमणे, आक्रमकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबरोबरच असलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाकांक्षा यामुळे एतद्देशीय जनतेच्या भावनांवर, मान्यतांवर आघात करण्यास प्रवृत्त झालेले आक्रमक आणि त्या नादात त्यांनी हेतुपूर्वक केलेले ऐतिहासिक स्थळांचे नुकसान ही देखील महत्त्वाची कारणे आहेत.

निसर्गाविषयीचा आपला मुद्दा अतिशय योग्य आहे. क्षुल्लक फायद्यासाठी अविवेकाने निसर्गाचे नुकसान करणे हे दुर्दैवाने पुढरलेपणाचे आणि आधुनिकतेचे लक्षण झाले आहे.

आपला
(निसर्गप्रेमी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

रिडीफ मधील मुलाखत

सेतू समुद्रम प्रकल्पाने नॉटीकल उपयोग काही होणार नाही अशा अर्थाची भारतीय नौदलातील तज्ञाने राजकारणविरहीत मुलाखत दिली आहे. त्याने यात कोणीच नौकाशास्त्राचा (मरीन इंजिनयरींगचा) विचार करत नाही आहे म्हणून खंत व्यक्त केली आहे. जर खरेच त्यांची अराजकीय मते असतील तर विचार करायला लावणारी आहेत. येथे सर्व देत नाही, फक्त शेवटचे उत्तर देतो:

Those who support the Sethu Samudram Canal compare it to the Suez Canal and the Panama Canal and say the Sethu Samudram is the Suez of the East.

In the case of the Suez and the Panama canals, ships save thousands of nautical miles in sailing distance and hundreds of hours in sailing time vis-�-vis the Sethu Samudram where a ship will probably save a few hundred miles and at the most twohours in sailing time. This is the difference.

आणि हा वेळ वाचवण्यासाठी लागणारा सुरवातीचा खर्च लक्षात घेतला असला तरी नंतरच्या मेंटेनन्सच्या खर्चाबद्दल कोणीच बोलत नाही आहे. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे उथळ पाण्यामुळे सेतूसमुद्रम मधून जाताना वेग निम्माच होऊ शकेल इत्यादी.

हा दुवा.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

धन्यवाद

विकासराव, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या वास्तविक माहितीवर न्यायालय विचार करेल अशी आशा आहे.
आपला
(आशावादी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

ताजी बातमी

इकडे एक बातमी आहे

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

 
^ वर