पुणे गणेश दर्शन

आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच.

चला आता पुण्याचा फेरफटका मारू.

अभिजित
लिखाणात कमीत कमी २५ शब्द हवेत म्हणून ही सिग्नेचर(?) टाकली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

त्या दिवशी फक्त मानाचे गणपती पाहून परत आले होते, आता सगळे पहायला मिळाले धन्यवाद
दिवस-रात्र तिकडेच होतात काय?
(ह्या वर्षी जरा उत्साह कमी वाटला का हो?)

उत्साह

मी पहिल्यांदाच मिरवणूक पाहिली त्यामुळे आधीच्या तुलनेत सांगू शकत नाही. सकाळी १०.३० ला रमणबाग पथकाने सुरुवात झाली तेव्हापासून रात्री १२ पर्यंत बघितली. नंतर त्राण नव्हते.

पण माणसे उभी राहायला जागा नव्हती . लक्ष्मी आणि टिळक रस्ता गर्दीने आणि ढोलपथकांनी फुलला होता.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

वा!

वा अभिजितराव, चित्रे अगदी भन्नाट आहेत. तुमच्याबरोबर आम्हीही गर्दीत उभे होतो की काय असे वाटले :)

आजानुकर्णांची (म्हणजे त्यांनी काढलेली) चित्रेही सुंदर आहेत.

सुंदर

चित्रे झकास आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी तुलनेने कमी नैसर्गिक प्रकाशात काही चित्रे फारच सुंदर आली आहेत.


आम्हाला येथे भेट द्या.

बरोबर

नैसर्गिक प्रकाशातच चित्रे जबरदस्त सुंदर येतात. फ्लॅश वापरण्याचा मोह कटाक्षाने टाळावा. त्यापेक्षा शटरस्पीड आणि ऍपरचर नियंत्रित करावे. अर्थात असे करू देणारा कॅमेरा हवा.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

???

शटरस्पीड आणि ऍपरचर नियंत्रण? ही काय भानगड असते?
फोटो काढण्याच्या तंत्रावर अभिजित किंवा आजानुकर्ण यांनी एखादा लेख लिहावा अशी विनंती आहे, बाकी त्यातील "कला" ही काही शिकवून येण्यासारखी गोष्ट नाही.

शटरस्पीड वगैरे

शटर स्पीड म्हणजे कॅमेर्‍याचे शटर किती वेळ उघडले जावे याचा वेग. मिली सेकंदात वगैरे मोजत असावेत. ऍपरचर म्हणजे उघडीप कितपत व्हावी याचे मोजमाप.

ज्याचे चित्र घ्यायचे त्या वस्तुची स्थिरता, प्रकाशयोजना यावर या दोन्ही ठरत असाव्यात. कमी प्रकाशात अधिक शटर स्पीड वापरणे श्रेयस्कर ठरावे.

अर्थात हे सारे एस. एल. आर. वगैरे कॅमेर्‍यांसाठी ठीक आहे. बहुदा डिजिटल वाली मंडळी (त्याच्याप्रमाणे) ऑटो मोडमध्ये अडकून राहतात. :)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

शिवाय तिपाई स्टँड वापरावा

रात्रीच्या वेळी नैसर्गिक प्रकाशात छायाचित्रे (?प्रकाशचित्रे?) टिपताना एक तर ऍपेर्चरचे छिद्र खूप मोठे करावे लागते (त्याने एक विवक्षित अंतर सोडून बाकी सर्व वस्तू अस्पष्ट होतात - "टाईट डेप्थ ऑफ फील्ड" - हे हवे असले तर छान, नको तर गोची), किंवा छिद्र खूप वेळ उघडे ठेवावे लागते (शटर स्पीड खूप हळू करावे लागते). १/६० सेकंदपेक्षा साधारण मनुष्य हात स्थिर ठेवू शकत नाही, त्यामुळे चित्र पुन्हा बिघडते.

कॅमेरा बसवायचा तिपाई स्टँड तसा खूप स्वस्त असतो, आणि तुमचा कॅमेरा खूप महाग असेल तर हा क्षुल्लक खर्च तुम्ही जरूर करावा! मग हात थरथरण्याचा काही फरक पडत नाही, आणि छिद्र वाटेल तेवढे लहान-मोठे करून ते वाटेल तितका वेळ उघडे ठेवले तर चालते.

नैसर्गिक प्रकाशातली चित्रे सुंदर दिसतात, म्हणून हा सगळा खटाटोप.

कॅसीओ एक्स्लीम झेड७७

कॅसीओ एक्स्लीम झेड७७ डिजीट्ल कॅमेरा आहे माझा विथ ऍन्टी शेक फिचर. माझा हाथ नॉर्मल थरथरणे व समोरची व्यक्ती वाटेल तेवढी हलली तरी एकदम परफेक्ट स्तब्ध (म्हणजे कलेलेली व्यक्ती पणा घोस्ट किंवा हललेली आकृती नाही) फोटो येतो.

कॅमेरा

अभिजीत तुझा कॅमेरा कूठला आहे. (कंपनी, मॉडेल, मेन फिचरस्) कारण चित्रे छान आहेत. कोणाला घ्यायचा असेल तर माहीती होईल.
तुझे रेकमंडेशन काय आहे तुझ्या कॅमेराबद्दल.

मस्त

चित्रे मस्त आहेत. क्यामेरा कुठला आहे याबद्दल उत्सुक.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

कॅमेरा

माझा सोनी डी एस सी डब्लू ५ कॅमेरा

दुर्दैवाने आता हा कॅमेरा मार्केट मध्ये नाही.

यामध्ये मॅन्युअल सेटींग करता येते. १/१००० ते ३० सेकंद एवढा वेळ शटर उघडे ठेवू शकतो. कार्ल झेसची लेन्स् आहे. ३ पट ऑप्टिकल झूम आहे.

परंतू सोनीने या ऐवजी जे बाजारात आणलेले मॉडेल( S७00 ) आहे त्यात सोनीची स्वतःची लेन्स आहे आणि ७ मेगापिक्सल फोटो. या व्यतिरिक्त फारसा फरक नाही. उलट बरेच बारिकसारिक ऑप्शन्स् कमी केले आहेत. परंतू ५१२ एम्बी मेमरी स्टीक आणि कॅमेरा केस फ्री देत आहेत १० हजारात.

अभिजित...
टेक्निकल शब्दांच मराठीकरण केलं तरी वापर अवघड आहे. बघुया कसं होतं ते.

सोनी

माझ्याकडे कॅनन इओएस ७ मॅन्युअल कॅमेरा आहे. डिजीटल घ्यायचा विचार चालू आहे. सोनीचा कधी वापरला नाही. पण सोनीच्या एमपीथ्री प्लेअरने इतका त्रास दिला की सोनी ब्रँडविषयी ताक फुंकून पिण्याची परिस्थिती आली. पण तुमची छायाचित्रे आणि अनुभव वाचून ही भीती अनाठायी असावी असे वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हरकत नाही

तुमचे बजेट किती आहे आणि त्या रेंजमध्ये सर्वोत्तम फिचर्स आणि सर्विस कोण देतो त्याच्याकडे जायचं..

माझ्या कॅमेर्‍याचा सीसीडी खराब झाला होता राजगडावर. चांगलाच फटका बसला असता. पण सुदैवाने ३ वर्ष वॉरंटी होती. सोनीची विक्रीपश्चात सेवा चांगली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू कधी गचकतील् सांगता येत नाही त्यामुळे हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.

सोनी कडून चांगला अनुभव मिळाला आहे. कॅनॉन आणि निकॉनच्या भारतातील सर्विसबद्दल माहित नाही.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

सहमत

तुमचे बजेट किती आहे आणि त्या रेंजमध्ये सर्वोत्तम फिचर्स आणि सर्विस कोण देतो त्याच्याकडे जायचं..

सहमत आहे. बजेट ठरवायलाच वेळ लागतो आहे :) पण सोनीबद्दलचे तुमचे अनुभव वाचून ठरवताना नक्कीच मदत होईल.

---
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सोनीचे नवीन चांगले कॆमेरे

सोनीचे एच सेरीज मधले (२, ५, ८) सर्वच कॆमेरे वर उद्घृत केलेल्या सर्व सुविधा (झाडप-गती, छिद्र-आकार, हाताच्या कंपणांना स्थिरावणे, वगैरे) पुरवत आहेत. शिवाय किंमत सुद्धा वाजवी आहे. मला माझ्या नव्य एच२ मधली चित्रिकरण व्यवस्था सुद्धा फार छान वाटली. आगामी काही काळात कॆमकॊर्डर घेणे लोकांनी बंद केल्यास नवल नव्हे.

खूपच छान

अभिजित, पुणे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद! क्षणभर भारतात/पुण्यात जाऊन आल्यासारखे वाटले. आपल्या छायाचित्रणातील जीवंतपणा वाखाणन्याजोगा आहे. तळटिपा सुद्धा मस्तच जमल्या आहेत.

 
^ वर