मराठी पाऊल पडती पुढे..

नमस्कार,

दिनांक १५ सप्टेंबर, २००७ रोजी गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मिसळपाव डॉट कॉम हे एक नवं, मराठमोळं संकेतस्थळ आंतरजालावर दाखल होत आहे, हे जाहीर करण्यास आनंद होतो आहे. मनोगत, मायबोली, उपक्रम, मराठी गझल, माझे शब्द, यांसारख्या दिग्गज वटवृक्षांच्या सावलीतच मिसळपाव डॉट कॉम हे 'इवलेसे रोप लावियले द्वारी..' अशीच मिसळपावकारांची भावना आहे!

आंतरजालावर मराठी भाषेच्या प्रचाराच्या व प्रसाराच्या दृष्टीने हे आणखी एक नवे पाऊल ठरावे असे वाटते!

आपले साहित्य, विचार इ. मराठीतून व्यक्त करण्यासाठीचे हे एक खुले व्यासपीठ असेल. ललित लेख, वैचारिक लेख, काव्य, चर्चात्मक विषय, आदींवर येथे लिहिता येईल, त्यावर प्रतिसाद देऊन मतप्रदर्शनही करता येईल. सभासदांच्या बाबतीत अधिकाधिक लोकाभिमुख व लोकशाही पद्धतीने हे संकेतस्थळ चालवण्याकडे मिसळपाव प्रशासनाचा कल राहील असे कळते!

मिसळपाव डॉट कॉमने 'गमभन' ह्या मुक्तप्रणालीकडे विशेष ऋणनिर्देश व कृतज्ञता व्यक्त केली आहे.

इच्छुकांनी सदर संकेतस्थळाला अवश्य भेट देऊन त्याचे सभासदत्व घ्यावे, ही विनंती!

नीलकांत.

Comments

दूवा

वर मी दूवा द्यायचा विसरलो आहे. तो देत आहे.
वर मी दूवा द्यायचा विसरलो आहे. तो देत आहे.
वर मी दूवा द्यायचा विसरलो आहे. तो देत आहे.
वर मी दूवा द्यायचा विसरलो आहे. तो देत आहे.
वर मी दूवा द्यायचा विसरलो आहे. तो देत आहे.
वर मी दूवा द्यायचा विसरलो आहे. तो देत आहे.

www.misalpav.com

नीलकांत

शुभेच्छा

'मिसळपाव'ला हार्दिक शुभेच्छा. सभासदत्व घेतले :).

आम्ही वाट पाहत आहोत!

'मिसळपाव'ला माझ्यापण हार्दिक शुभेच्छा! गणेशचतुर्थीस सभासदत्व आणि तिथला श्रीगणेशायनमः करीन!

हार्दिक शुभेच्छा!

माझ्याकडूनही मिसळपावला हार्दिक शुभेच्छा!

ओनामा!

मीही सदस्यत्व घेतले!
हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छा

सभासदांच्या बाबतीत अधिकाधिक लोकाभिमुख व लोकशाही पद्धतीने हे संकेतस्थळ चालवण्याकडे मिसळपाव प्रशासनाचा कल राहील असे कळते!

हे महत्वाचे!! सदस्यत्व घेतले .

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो. एकमेकांचे स्कोअर सेटल करण्यासाठी संपादकीय अधिकारांचा वापर् होऊ नये

अरे आलो ना मी पण!

वा!!
आली रे आली!! मिस्सळ आली!!!

गुंडोपंत मिसळपावावर घाईघाईने पोहोचले आहेत. नाव नोंदणी झाली आहे!
आता मिसळीच्या प्रतिक्षेत!

"हॉटेलात आलेली माणसे" हे मस्तच आहे तात्या!

मिसळ्पाव पाहताच आवडले!
तेथे खुप धमाल येणार असे दिसते आहे!

आपला
गुंडोपंत

शुभेच्छा

मिसळपाव.कॉम निर्मीतीला श्रमदान करणार्‍या सर्वांचे अभिनंदन.

मस्त एकमेव मैफील जमवूया.

-------------------------------------------------------
काय म्हणता म्हणजे एकाच तिकीटात तिच तीन बालनाट्य?...ह.घ्या.......... नाही हो मिसळपाव इज हटके!

शुभेच्छा

'मिसळपाव' ला माझ्याही शुभेच्छा....
सन्जोप राव

शुभेच्छा

लई तिखाट करु नका मिसळ, मुळव्याध व्हायची.ज्यन्ला पाहिजे त्यन्ला वरुन तिखट घाल्ता यतय.

प्रकाश घाटपांडे

हा हा हा!

हा हा हा!!

हा शब्द इथल्या संपादकांना चालत नाही... माझा मागे प्रतिसाद काढून टाकला होता. (खरंच त्रास होतो आहे वाटते! शिवाय शब्द दिसला की अजून आठवत असणार ;)) )

आपला
हलकट नि पाजी
गुंडोपंत

हे हे हे

इतरांचे तरास पघितले कि भ्या वाटतय.सोतावर कशाला वढून घ्या? उपक्रमने मिसळ पाव चे स्वागत केल्याबद्दल आभार.शाकाहारी व मांसाहारी खानावळ एकत्र ठेवल्यावर काही गिर्‍हाईक लांब पळणारच. मिसळपाव सोबत खास लोकाग्रहास्तव आम्लेट येणार, बुर्जी येणार,मच्छी येणार, मग चिकन आन मटनला कोण आडवणार? झटका येणार, हलाल येणार, बढे का येणार. मग काही लोक मिसळपाव च पार्सल मागवनार.

प्रकाश घाटपांडे

शुभेच्छा !

प्रा.डॉ. ला सक्काळीच बातमी कळाली काय आनंद झाला सांगू !
सदस्य म्हणून हॉटेलात नाव नोंदवून आलो.

( नाव कोणते घेऊ यावर आम्हाला कुठे बाहेर जायचे असले की 'ही' विचारते, काहो कोणती साडी घालू तसे माझे झाले. ;) )

दशकाचे साहित्यभान म्हणुन् मी 'मराठी'संकेतस्थळांकडे पहातो.'मिसळपावच्या टीम' ला पुढील वाटचालींकरीता हार्दिक शुभेच्छा !

अवांतर ;) मिसळपाव चे रुप खासच आहे. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातील हातात पाण्याचा तांब्या घेऊन येणारी लाज-या रुपाची आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा.

नीलकांत व तात्या दोघांचेही अभिनंदन. संकेतस्थळ सुंदर झाले आहे. आम्ही आधीच सदस्यत्व घेऊन ठेवले आहे. :)

मीही!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
सभासदत्व घेतलेय!
नीलकांत,तात्या आणि संबंधितांचे हार्दिक अभिनंदन!
मराठी संकेतस्थळांच्या दूनियेत हे स्थळ एक मैलाचा दगड ठरो!

खास तात्यासाठी संदेश: ह्याचसाठी केला होता अट्टहास! येणारा प्रत्येक दिस गोड व्हावा!
आता जबाबदारी वाढलेय. तेव्हा जरा जपून बरं का!

विश्वस्त!/लोकशाही पद्धत..

देवसाहेब,

येणारा प्रत्येक दिस गोड व्हावा!

नक्की होईल! आपल्या आशीर्वादाकरता अनेक आभार.. :)

आता जबाबदारी वाढलेय. तेव्हा जरा जपून बरं का!

ही जबाबदारी फार काळ माझ्यावर राहणार नाही. अहो मिसळपाव हे लोकांचं, लोकांसाठी, व लोकांनी चालवलेलं संकेतस्थळ असेल. ते तुम्हा सगळ्यांचं आहे, मी फक्त विश्वस्त आहे.

सुरवातीचे ३ ते ६ महिने त्याचं स्वरूप, वाटचाल, जडणघडण अगदीच नवीन असेल म्हंणून मिसळपाववर अध्यक्षीय पद्धत राहील नंतर संपादक मंडळांच्या मेंबरांसाठी (मिसळपाववर पंचायत समिती असा शब्द आहे!) लोकशाही पद्धतीने चक्क निवडणुका होतील! :)

मग चामारी काय हव्वा तो गोंधळ घाला..:))

आपला,
(विश्वस्त!) तात्या.

विश्वस्त

हे लोकांचं, लोकांसाठी, व लोकांनी चालवलेलं संकेतस्थळ असेल. ते तुम्हा सगळ्यांचं आहे, मी फक्त विश्वस्त आहे.

कसला लोकशाही डायलॉग टाकलात तात्या! मात्र जनतेला हक्कासोबत कर्तव्याची पण जाणीव करुन देणे आवश्यक आहे. न्हाय हक्काला म्होर अन् करतव्याच्या टायमाला चिंगाट! ईश्वस्त पघुन् घेतीन्.

प्रकाश घाटपांडे

हे सही!

वा परकाशराव,
हक्काला म्होर अन् करतव्याच्या टायमाला चिंगाट!
भारी बोल्ला बर्का!

लिवा की राव मग याच्यावर येक 'डाकुमेंट'.
तात्या ठिवल की त्ये मिसळीच्या म्येनु कार्डावरच. म्हंजी गिराईक आलं का त्याला तवाच बरूबर कळल. मिसळ भारी पर 'म्याक बरगर खाल्यागत' आपल्या प्लेटा आपल्याल उचलाव्या लागन...

काय म्हंता?

आप्ला

गुंड्याभाऊ

निवडणुका

मिसळपाववर जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा आमचे मत गुंडोपंत, घाटपांडे साहेब आणि प्रा.बिरुटे सर ह्यांना राहील

विश्वास

वा कोलबेरा,

विश्वास दाखवल्या बद्दल धन्यवाद!
बरं वाटलं. आवडलं!

पण माझं म्हणशील तर;
मी पडलो रिक्षावाल्यांसारखा, रस्त्यांवर मारामार्‍या करणारा टपोरी/मवाली माणूस.
मला अचानक अशी संपादकीय पोलिसगीरी नाही रे जमायची!

शिवाय आपल्याला संपादकांना आवश्यक असलेली 'शुद्ध प्रमाणभाषा' पण बोलायला येत नाही बाबा! ;)
आपण पडलो "बोलीवाली" साधीसुधी माणसं.
त्यामुळे मी 'असाच एक साधा सदस्य म्हणून' बराय रे!

टपोरीपंत

भारतीय लोकशाही! :)

घाटपांडेसाहेब,

लोकशाहीवर, विशेष करून भारतीय लोकशाहीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कुठलीही हुकूमशाही फार काळ टिकत नाही, टिकणार नाही हे आम्ही पूर्वीपासूनच म्हणत आलेलो आहोत.

आम्ही स्वतः काही मराठी संकेतस्थळांच्या चालकांना व मालकांना जाहीर शिव्या दिल्या आहेत. तीच वेळ आमच्यावर येऊ नये म्हणूनच मिसळपावचा कारभार लोकनिर्वाचित पंचायत समितीच्या हातात सोपवून आम्ही मोकळे होऊ! त्यामुळे आज पासून ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीनंतर मिसळपावचं काय करायचं, कुठला प्रतिसाद ठेवायचा, कुठला उडवायचा, कुणाला प्रशासकीय अनुमती लावायची, कुणाला लावायची नाही हे सगळं सभासदांनी निवडून दिलेली पंचायत समितीच ठरवेल. अहो 'पाचामुखी परमेश्वर' असं म्हटलेलंच आहे! :)

आम्हाला स्वतःला मूलतः भरभरून लिहिणे व लोकांच्या आवडलेल्या, न आवडलेल्या साहित्याला मनमोकळा प्रतिसाद देणे यातच रस आहे!

मिसळपावच्या पंचायतीमध्ये समितीसदस्यांच्या जागा खालीलप्रमाणे असतील -

१) सरपंच
२) पोलिसपाटील
३) झेडपीचा एक मेंबर
४) शाळामास्तर

आणि

५) मंदिराचा गुरव!

:)

याबाबतची अधिक माहिती आम्ही मिसळपाववर सवडीने लिहूच!

आपला,
(कट्टर लोकशाहीवादी)
तात्या अभ्यंकर,
मिसळपाव ग्रामपंचायत.

मी शाळामास्तर व्हावे का ?

शाळामास्तराच्या पोजिशन साठी मी निवडणूक लढवनार.
हितले मास्तर लय शुद्दलेकन घालतात.

- तथागत

(पटवारी पोजिशन असेल तर सात-बारा वाटपाला पन तयार आहे.)

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

लोकशाही पद्धतीने

संपादन हा विषय जास्त सेन्सेटीव्ह वाटतो.
काही खात्रीशीर सूत्रांकडून या संदर्भात माहीती मिळाली.

मला कळले त्याचे सार सगळ्यात वाटून टाकणे महत्वाचे वाटले ते असे:
सुरवातीचे ३ ते ६ महिने त्याचं स्वरूप, वाटचाल, जडणघडण अगदीच नवीन असेल म्हंणून मिसळपाववर अध्यक्षीय पद्धत राहील नंतर संपादक मंडळांच्या मेंबरांसाठी (मिसळपाववर पंचायत समिती असा शब्द आहे म्हणे! :) लोकशाही पद्धतीने चक्क निवडणुका होतील! :)

यात निवडणूका होणार हे मला खरे लोकशाहीचे लक्षण वाटते!!
फक्त सुरुवातीचे अध्यक्षच 'मुशर्रफ व्हायला नको' इतकेच ;)))))

आपला
बातम्या पसरवू

गुंडो.

शुभेच्छा!

तात्या आणि नीलकांत,

मिसळपावासाठी हार्दिक शुभेच्छा! संकेतस्थळ अतिशय सुंदर झाले आहे. मिसळपावाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होवो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

(स्नेहांकित) शशांक

शुभेच्छा

मिसळपाव ला शुभेच्छा!

जरा चावट सांगतो (संवेदनाक्षम वाचकांनी डोळे मिटून घ्यावेत) -
आम्ही मागे कोल्लापूरला मित्र-मित्र बसून तिखटपणाबद्दल गप्पा मारत होतो.
"अरं, त्या ___च्यात जाऊन आलास काय्. असली मिस ऽ ळ - लोटा घेऊनच जायला लागतंय बघ"
"अरं त्याच्या पेक्षा, त्या ___ मध्ये जाऊन आलास की धारच लागतीया"
"तेच्यापेक्षा त्या ___ च्यात जायाचं म्हंजी धूरच याय् लागतोय्"
(स्पष्ट अर्थ उलगडून सांगू शकत नाही, क्षमस्व)

वरील पार्श्वभूमीवर मिसळपाव.कॉम् कसे असेल याविषयी उत्सुकता आहे.

- दिगम्भा

धूर, धार आणि तांब्या!! :))

वरील पार्श्वभूमीवर मिसळपाव.कॉम् कसे असेल याविषयी उत्सुकता आहे.

काळजी करू नका दिगम्भाशेठ! मिसळपाववर धूर, धार आणि लोटा (चुकलो चुकलो, लोटा नव्हे, तांब्या!!! :)) हे सगळं असेल...

अवांतर -

आमचे एक मामासाहेब आहेत, त्यांना आमच्या गुरुजींचं तांब्या घेऊन गायला बसणं मुळीच आवडत नाही!! :))

असो..

आपला,
(किटलीतांब्यातला!) तात्या.

मोकळ्या जागा

वरील पार्श्वभूमीवर मिसळपाव.कॉम् कसे असेल याविषयी उत्सुकता आहे.

मिसळपाववर फुल्या फुल्या आणी डॆश डॆश या मोकळ्या जागा भरल्या जातील असे वाटते.

प्रकाश घाटपांडे

त्याच्याही

शुभेच्छा..

~~ 'त्याने ' नुकतीच 'मिसळपाव' ला भेट दिली! ~~

मीस्सळ पॉव

अरे वा नविन साइट.
मस्त रे.

आपला
अण्णा

अभिनंदन आणि शुभेच्छा !

तात्या, नीलकांत आणि सहकारी,
आपल्या नव्या 'मिसळपाव.कॉम'चे हार्दीक स्वागत. आपणा सर्वांचे सुंदर सकेतस्थळाच्या निर्मीतीसाठी अभिनंदन.
मी हजेरी लावणारच हे नक्की. तिकडे आता मजा करु.
-- (शुभेच्छुक) लिखाळ.

मला फ्लोरिष्टाच्या शॉपामधल्या मुलिगत होयाचे हे ! (ती फुलराणी-पुल)

बेस्ट ऑफ लक

मी इथे नवीन आहे.
मला खुप मराठी टायपींग येत नाही.
पण मिसळपाव साठी बेस्ट ऑफ लक.
मला मिसळ आवडते.

-ऋतुजा

जत्रंला येऊ द्या की रं !

तात्याबा, मिसळपाव लयी भारी हाये.
जीद्दी मानसानं काढलंच बॉ एक् साईट बाकी त्या येलणकरला आवतनं द्यायला इसरु नकं हं !

"मिसळपाव मला घेऊ द्या की रं !
अन मलाबी जत्रला येऊ द्या की रं !!
काठीनं घोंगडं घेऊ द्या की रं !
मलाबी जत्रला येऊ द्या कीरं !!

"हम छोड चले है ! महेफील को याद आये तो मत रोना "
बाबूराव :)

वा वा

संकेतस्थळ आताच पाहिले. छान आहे, 'हॉटेलात आलेली माणसं', 'सरपंच', 'पंचायत समिती', 'संकेताक्षर' वगैरे खास आवडलं. या संकेतस्थळाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! :)

राधिका

असेच

संकेतस्थळाबद्दल अभिनंदन आणि वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

माझ्याही

शुभेच्छा! हा आलोच!

नमस्कार

नमस्कार,

तात्यांनी 'मिसळपाव डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या बांधणीचे संपूर्ण अधिकार मला दिले आहेत. मराठी भाषेचा एक प्रेमी या नात्याने मलाही हे काम करण्यास अत्यंत आनंद वाटत आहे.

आधी जाहीर केल्याप्रमाणे उद्या गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर मिसळपाव हे संकेतस्थळ सुरू होईल. परंतु फॉन्ट, आणि इतरही काही तांत्रिक गोष्टींच्या चाचण्या अजूनही सुरू आहेत आणि पुढील काही दिवस सुरूच राहतील. त्यामुळे हे संकेतस्थळ पूर्ण अद्ययावत स्वरुपात आपल्यासमोर येण्यास अजून काही कालावधी जाईल असे वाटते. तरी सर्व सभासदांनी कृपया सहकार्य करावे असे विनम्र आवाहन मी या प्रतिसादाद्वारे करत आहे.

धन्यवाद,

नीलकांत.

नीलकांतचे कौतुक!

नीलकांता,

खूप मेहनत घेतलीस हो! गेले काही दिवस तू तुझे नेहमीचे व्याप सांभाळून मिसळपावकरता केलेली धडपड मी पाहिली आहे. तुझे खरंच कौतुक वाटते!

परंतु फॉन्ट, आणि इतरही काही तांत्रिक गोष्टींच्या चाचण्या अजूनही सुरू आहेत आणि पुढील काही दिवस सुरूच राहतील. त्यामुळे हे संकेतस्थळ पूर्ण अद्ययावत स्वरुपात आपल्यासमोर येण्यास अजून काही कालावधी जाईल असे वाटते.

फॉन्ट आणि इतर गोष्टींच्या बाबतीत शशांकची मदत घे. त्याचप्रमाणे कोलबेर, सहज, प्रियाली, आजानूकर्ण यांचीही अवश्य मदत घे. हे तुमचंच संकेतस्थळ आहे लेको! तेव्हा तुम्हीच सांभाळा! :)

तात्या.

स्वागत

तात्या आणि नीलकांत,
मिसळपावचे स्वागत आणि आपल्याला आणि मिसळपावला शुभेच्छा!

एक कौतुक नक्कीच करावेसे वाटते की ठरवलेली गोष्ट तडीस नेण्यास आपण समर्थ आहात हे दिसून आले. एकवेळ तांत्रिक प्रश्न सोडवता येतात, पण पुढाकार घेऊन एखादी नवीन गोष्ट मनावर घेऊन करणे - प्रसंगी खर्च- अडीअडचणी सोसून - ह्याची उदाहरणे कमी असतात. सुरुवात खरेच चांगली झालीय, आता यापुढे मिसळपावची उत्तरोतर प्रगतीच होवो अशी शुभेच्छा!

चित्रा

सहमत

चित्राताई,

एकवेळ तांत्रिक प्रश्न सोडवता येतात, पण पुढाकार घेऊन एखादी नवीन गोष्ट मनावर घेऊन करणे - प्रसंगी खर्च- अडीअडचणी सोसून - ह्याची उदाहरणे कमी असतात.
बोलणारे खुप आहेत, करून दाखवणारे कमी!
म्हणून आप्ल्याशी पुर्ण पणे सहमत!

आपला
गुंडोपंत

अभिनंदन आणि शुभेच्छा!

नव्या संकेतस्थळाबद्द्ल अभिनंदन आणि शुभेच्छा!

 
^ वर