उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
लाल मशिद प्रकरण आणि मुशर्रफ
वासुदेव
July 11, 2007 - 3:40 pm
इस्लामाबादेतील लाल मशिदीत चाललेल्या संघर्षाकडे सर्व जगाचे डोळे लागून राहिले होते. मुशर्रफांची परिस्थिती इकडे आड (धर्मांध लोकांचा रोष) तिकडे विहीर (जागतिक स्तरावर मलिन प्रतिमा) अशी झाली आहे अशी टिप्पणी बर्याच तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मुशर्रफांनी यापैकी पाकिस्तानाची प्रतिमा उजळ राहील असा मार्ग निवडला.
- एकूणच लाल मशिद प्रकरण आणि त्याची हाताळणी याबद्दल आपल्याला काय वाटते?
- यामुळे पाकिस्तानातील धर्मांध शक्तींना अधिक उत्तेजना मिळून अंतर्गत कलह वाढेल का?
- ज्या जागतिक समुदायासाठी मुशर्रफांनी हा मार्ग निवडला त्यांच्याकडून मुशर्रफांना काही ठोस फायदा होईल का?
- मुशर्रफांवर होणारे प्राणघातक हल्ले वाढतील का?
- आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मुशर्रफ कोणत्याही मार्गाने राष्ट्राध्यक्ष राहणार नाहीत तेंव्हा काय होईल?
कृपया आपल्याला काय वाटते ते अवश्य कळवावे.
आपला,
(शेजारधर्मी) वासुदेव
दुवे:
Comments
माकडीणीची गोष्ट
बादशहा विचारतो, "बिरबल इन्सान को सबसे प्यारा क्या होता है?" बिरबल म्हणतो, "अपनी जान". मग ती माकडीणीची गोष्ट आहे ज्यात ती नाका पर्यंत पाणी आल्यावर डोक्यावर ठेवलेल्या पिल्लाला टाकून देते आणि स्वतःचा जीव वाचवते वगैरे.
माकडीण बिचारी खरेच असे करेल का ते माहीत नाही पण माणसे आणि त्यातही राजकारणी नक्कीच तसे असतात. (काही महीन्यांपुर्वी गोठलेल्या थंडीत स्वतःच्या पिल्ल्लाला वाचवणार्या माकडीणीचा सकाळ की म.टा. मधे फोटो आला होता).
मुशारफच्या बाबतीतही तेच आहे. या लोकांना आत्ता पर्यंत सांभाळले त्यांची जडण-(बि)घडण केली. त्यांचे इस्लामाबादेतील उद्योग काही नवीन नाहीत. पण आता सर्वत्र स्वतः विषयी जेंव्हा दंगली होवू लागल्या तेंव्हा लोकांचे लक्ष वळवायला ह्या भस्मासुराचा उपयोग होतो आहे.
बाकी इंदीरा गांधीच्या बाबतीत शिख चळवळीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होतो. पुढे मात्र त्यांनी मुशारफप्रमाणे नाही पण स्वतःची चूक सुधारण्याचा प्रयत्न ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळेस केला. नंतर त्यांचा परीणाम त्यांना भोगावा लागला पण त्याला त्यांची तयारी होती. त्यांच्या हत्ये नंतर जेंव्हा माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंना प्रतिक्रीया विचारली, तेंव्हा ते म्हणाल्याचे आले होते की, "बुरे काम का बुरा नतीजा". मोरारजींच्या या प्रतिक्रीयेत तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे आहेत.
बुरे काम का बुरा नतीजा
"बुरे काम का बुरा नतीजा". मोरारजींच्या या प्रतिक्रीयेत तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे आहेत.
किंवा, मोरारजींनी नुकताच "चाचा भतीजा" हा चित्रपट पाहिला असावा. कारण त्यात "बुरे काम का बुरा नतीजा, क्यूं भई चाचा, हां भतीजा" असे गाणे आहे.
- तथागत
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
माहीतीपूर्ण नकाशा
सकाळ मधे खालील माहीतीपूर्ण नकाशा दिला आहे:
क्या इनका इरादा पाक है?
वासुदेव राव, चांगला विषय सुरू केलात. तसा हा विषय प्रतिक्रियेसाठी फारच विचित्र वाटतो आहे.
१. मुश यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी नक्किच झाली आहे. ती आज ना उद्या होणारच होती. या प्रसंगी त्यांनी वर वर दाखवायला पाकिस्तानचे हित दाखवले आहे. पण नक्कि काय गौडबंगाल आहे हे मुश-बुश यांनाच माहित.
२. कट्टर मुस्लिम आता डोइजड झाले आहेत हे सत्य असले तरी अल कायदा (मुस्लिम अतिरेकी) आणि पाकिस्तान यांचे संबंध जग जाहिर आहे. प्रसिद्धी माध्यमांना जे काही दाखवले जाते हि निव्वळ धुळफेक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
३. मुश आणि बुश यांना अतिरेक्यांबद्दल कारवाइचा इतका पुळका आहे तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी-गुन्हेगार दाउद पाक मध्ये का राहू शकतो? त्यावेळी जागतिक दहशत वाद कुठे जातो?
४. हे जे काही झाले ते मुश नी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी केले आणि बुशने पाठ थोपटण्यासाठी. बुश आता एकटे पडले आहेत. टोनी ने साथ सोडली आहे अन नव्या दमाचा आणि कट्टर मुस्लिम आणि दहशतवादी राष्ट्रावर पकड असलेला साथिदार बुश कशा सोडेल? हि बातमी वाचा. त्यामुळे हि तर निव्वळ धुळफेक आहे असे मला वाटते.
५. अशा नेत्यांचा शेवट काय होतो हे जग जाहिर आहे. त्यामुळे राजकारणात हे घडत राहतेच. पाक मध्ये दुसरा मुश बुश ने आधीच हेरुन ठेवला असेल त्यामुळे मुशचे काहीही झाले तरी नवा मुश तयार असेलच.
मराठीत लिहा. वापरा.
सडेतोड मुद्दा
पण बातमी ची लिंक लागली नाही
प्रकाश घाटपांडे
टिचकी
बातमी शब्दावर डावी मुशक टिचकी मारा.
मराठीत लिहा. वापरा.
मुशी, जरा जपून!
इतिहास पुनरावृत्त होतो - हे घासून गुळ्गुळीत झालेले वाक्य.
इंदिराजींचे काय झाले हे सर्वांना माहित आहे.
मुशीबाबांनी जपून रहावे. अराजकाच्या वाटेवर पाकिस्तान या चर्चेत -
'पाकिस्तानात अराजक माजले तर' - नव्हे ते माजलेच आहे. फक्त ज्वालामुखीचा स्फोट होणे बाकी आहे. आज ऐकू येणार्या कुरबुरी त्या विस्फोटाच्या पूर्वसूचना आहेत. हा विस्फोट जेंव्हा होईल तेंव्हा अत्यंत आततायी, धर्मांध मंडळी सत्तेचा कब्जा घेतील. ज्या लष्करालाच दहशतवादी बनवले जाते त्या लष्कराकडून त्यांना विरोध होईल असे वाटत नाही. एखादा धर्मांध लष्करी अधिकारी त्याचा ताबा घेईल.
असे मी म्हटले होते. या लष्करी कारवाईनंतर मुशर्रफ साहेबांना मोठा धोका आहे.
आणि काही बरेवाईट (बरे कसले वाईटच-) झाले तर भारताला फार तोटा होईल.
धन्यवाद, नव्या घडामोडी
चर्चेत सहभागी लोकांना आणि वाचकांना धन्यवाद! विकासराव, तुम्ही परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले आहे. छायाचित्र इथे दिल्याबद्दलही धन्यवाद! चाणक्य आणि विसुनानांचेही प्रतिसादही परिस्थितीवर यथार्थ भाष्य करणारे आहेत.
या कारवाईनंतर उठलेली धूळ शमल्यानंतर आता बरेच नवे मुद्दे दिसू लागले आहेत. अमेरिका, चीन यांनी सुरूवातीला मुशर्रफांचे गोडवे गायल्यानंतर अतिरेक्यांच्या आणि जनमानसाच्या संभाव्य प्रतिहल्ल्याची भीती वाटून सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि पाकिस्तानात राहणार्या आपापल्या नागरिकांना सावध राहण्याचे सल्ले दिले आहेत. (पाकिस्तानात काही चिनी कामगारांना ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे.)
या घटनेनंतर अल-कायदाचा एक प्रभावी नेता जवाहिरी याने मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकारवर उघड टीका करून प्रतिशोधाची भाषा केली आहे. त्याला अनुसरूनच पाकिस्तानी सैन्यावरील आत्मघाती हल्ले वाढून काही सैनिकांचा बळी गेल्याचे वृत्त आले आहे.
वेळ जाईल तशी परिस्थिती चिघळेल की शांत होईल याविषयी तज्ज्ञ लोकांत दुमत दिसून येत आहे.
आपला
(वार्ताहर) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
बीबीसीवरील चर्चा
बीबीसी या वृत्तवाहिनीवर "हॅव युअर से" नावाचा चर्चात्मक कार्यक्रम चालतो त्यात नुकताच हा विषय चर्चिला गेला. जगभरातील, विविध देशांतील लोकांचे दृष्टिकोन समजणे हा या कार्यक्रमाचा एक प्रमुख लाभ आहे.
या ठिकाणी काही प्रतिक्रिया पाहा.
http://newsforums.bbc.co.uk/nol/thread.jspa?sortBy=1&threadID=6883&start...
आपला
(आंतरराष्ट्रीय) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
बीबीसी न्यूज अवर
बीबीसीचा न्यूज अवर आज पाकीस्तानातून होता. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. एकाने (मुशारफवरील राग व्यक्त करत) सांगीतले की "आम्ही पाकिस्तानची अवस्था अफगाणिस्तान आणि इराकपेक्षाही वाईट करणार आहोत." आता या लोकांना मुशारफ "फ्रिडम फायटर" म्हणतोय का ते बघू (जसे तो काश्मिर मधील दहशतवादाला म्हणतो तसा).
पाकिस्तानचे जे काही होयचे ते त्यांच्या कर्माने होत आहे. पण आपल्या राज्यकर्तांनी त्याचे परीणाम आपल्या देशावर काय होऊ शकतात हे डोक्यात ठेवून "प्रोऍकटीव्ह" निर्णयशक्ती दाखवावी ही आशा करतो.
पाक अराजकतेकडे.
अमेरिकेचे मानले नाही तर अमेरिकेचे लष्कर पाकिस्तानात उतरेल. तसेच अमेरिकेने जी दहशतवादी राष्ट्राची यादी केली आहे.त्यात पाक आहेच.पण पाकिस्तानाचे प्रमुख अतिरेक्यांवर कारवाइ करते आहे,हा एक नाटकाचा भाग.आणि अजून तरी पाक लष्करांतील आजी-माजी अधिका-यांचे उद्योग-व्यवसायात जे हजारो अब्ज गुंतलेले आहेत.त्यात कट्टर पंथीय ही आहेत.त्यांचे हितसंबंध धोक्यात जर आले तर त्याचा परिणाम तिथे होणार आणि त्याच्यात परवेझ काय किंवा आणखी कोणी काय ? पाक मधे अराजक होईल असे आमचे मत आहे.
अवांतर : )लाल मशीदीपासून तीन कि.मि. अंतरावर परवेझ राहतात.त्यांना मशीदीत काय चालते हे पूर्णपणे ठाऊक आहे.आणि एक दिवस परवेझ संपणार आहे.पण ती गोळी कोणाची असेल.एक तर कट्टर धर्मियांची किंवा लष्करातील एखाद्या अधिका-याची.ती गोळी अमेरिकेची कधीच असणार नाही.यात शंकाच नाही.आणि याच्यातून त्यांच्यासमोर एकच मार्ग आहे,आणि तो म्हणजे भारताच्या कुरापती काढणे.आणि आम्ही फारतर सिमेपर्यंत सेना घेऊन जाऊ अन परत घेऊन येऊ.
सहमत
सहमत. एकदम सहमत...
आम्ही फारतर सिमेपर्यंत सेना घेऊन जाऊ अन परत घेऊन येऊ... हे मात्र खरेच..
मराठीत लिहा. वापरा.
समांतर
हेच आम्ही पाकिस्तानच्या कुंडलीवरुन फलज्योतिषीकिय भाषा वापरुन संदिग्ध वर्तवले असते तर ते भाकित म्हणून मान्यता पावले असते.
(कुडमुडा पोपट)
प्रकाश घाटपांडे
विषयांतर !
शरीफ साहेब पाकिस्तानात पोहोचले आणि परत निघाले एक प्रश्न पडतो जिंकणार कोण ?
पाकिस्तानी जनता की मीया मुशर्रफ ? का कोणीच नाही ?