महाभारत - परत पुढे चालू - घटोत्कच

चर्चेमध्ये महापराक्रमी उपक्रमींचा महाभारत हा एक जिव्हाळ्याचा विषय. आज एका मित्राने विरोपाने काही माहिती पाठवली. हि माहिती भीमपुत्र घटोत्कच बद्दल आहे. ती जशीच्या तशी येथे देतो आहे.

सुचना: यामध्ये माझा कोणताही वैयक्तिक दावा नाही. माहितीची देवाण घेवाण या एकमेव हेतुने हि माहिती येथे देत आहे.

माहिती

एका आंग्ल दैनिकामध्ये आलेली बातमी

छायाचित्रे

१.

२.

३.

अवांतरः जर हे खरे असेल. तर हे भारत सरकारला स्वतः करायला नको वाटले याचा खेद वाटतो. धर्म, इतिहास वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या तरी संशोधनाच्या दृष्टीने सरकारने पहायला काय हरकत असावी?

Comments

अविश्वसनीय

चाणक्य,
बातमीबद्दल धन्यवाद.
महाजालावर शोधताना हा दुवा सापडला.
http://www.rationalistinternational.net/article/20041001_en.html
या घटनेची सत्यता पारखयला हवी.

अवांतर : प्रतिसाद संपादित करताना दुवादानाची कळ गायब झाली.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

गुगल शोध

गुगल शोध केल्यास काही अनुदिन्यांवर आणखी काही छायाचित्रे पहायला मिळतात.

मराठीत लिहा. वापरा.

प्रथम पाहणी

वरून माझ्या मनात विचार आले.

१. सांगाडा काही हजार वर्षांपूर्वीचा असल्यास नको तेवढ्या सुस्थितीत आहे.
२. सांगाडा जमिनीपेक्षा खूप खाली नाही, ६-८ फूटच खोल वाटतो. तो अशा स्थितीत पहुडला आहे की कोणीतरी आत्ताच झोपवून गेले. ;-)

बाकीचे निष्कर्ष यावर बातम्या वाचूनच द्यावे लागतील. फोटो मात्र जबरा आहेत.

प्रश्न

१. खड्डा २ पातळ्यांमध्ये दिसतो आहे. कदाचित ६-८ फूटांपेक्षा थोडा जास्त वाटतो.
२. जर डायनासोरची अंडी सुस्थितीत असु शकतात तर सांगाडा का नाही?

कृपया याची नोंद घ्या की शोध लावणारा मी नाही अथवा, हे खरे आहे असे सांगायचा आमचा हट्ट नाही.

मराठीत लिहा. वापरा.

हम्म!

१. खड्डा २ पातळ्यांमध्ये दिसतो आहे. कदाचित ६-८ फूटांपेक्षा थोडा जास्त वाटतो.

प्राथमिक अंदाज बाजूची माणसे आणि यंत्र यांच्या उंचीवरून लावला. १०-१२ फूट असूही शकेल.

२. जर डायनासोरची अंडी सुस्थितीत असु शकतात तर सांगाडा का नाही?

अंडी असली तरी त्यांचे स्वरूप फॉसिलाइज्ड असते. तसेच, भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेता पाऊस, जमिनीची धूप, पूर यांतून हजारो वर्षांपूर्वीची १०-१२ फूटाखालील सांगाडा सुस्थितीत राहणे कठीण वाटते.

मीही संशोधक नाही हो. सहज, मनात प्राथमिक विचार आले ते नोंदवले, आणखी माहिती शोधूया की.

जमिनीची धूप

प्राथमिक अंदाज बाजूची माणसे आणि यंत्र यांच्या उंचीवरून लावला. १०-१२ फूट असूही शकेल.

बरोबर वाटते..

भारताची भौगोलिक स्थिती लक्षात घेता पाऊस, जमिनीची धूप, पूर
कदाचित सांगाड्यावर १० फूटाचा मातीचा थर असावा आणि जमिनीची धूप झाल्याने तो उघडा पडला आहे...???

घटोत्कचावर कर्णाने शक्तिशाली अशी वासवी शक्ती सोडली होती ....आणि पडताना सुद्धा घटोत्कच उंचावरून कौरव सैन्यावर पडला होता..तेव्हा जसाच्या तसा सांगाडा राहणे अवघड आहे...

अभिजित

शोधूया

आणखी माहिती नक्किच शोधुयात. अर्थात धर्मनिरपेक्ष भारतात असा काही शोध खरच लागला तरी त्याला मान्यता कितपत मिळेल याची शंका आहेच. हा येथे येउन हा येशू चा वा पैंगबराचा सांगाडा आहे असे सिद्ध करायचा प्रयत्न केल्यास तो नक्कि यशस्वी होइल. कारण

१. हे धर्म शव पुरतात.
२. तसे हे दोन धर्म हिंदू धर्मा इतके जुने नाहीत. त्यामुळे सर्वात जवळचा इतिहास त्यांचा आहे त्यामुळे एवढ्यावर सापडलेला सांगाडा अहिंदू असण्याची शक्यता जास्त.
३. तसेच आमच्या राजकारण्यांना मताची गरज आहे.

मी ही माहीती विरोपा मधून आली आहे हे पुर्वीच सांगितले आहे. तसेच शोधल्यास महाजालावर नक्किच काही मिळेल. याला संदर्भ कुठेच दिसत नाहीत हे खरेच आहे. मुळातच आमच्या इतिहासाचा आम्ही लिहिलेला असा कोणताच संदर्भ आमच्याकडे नाही. त्यामुळे ठोस पुरावे मिळाल्याशिवाय सत्यता समजणे अवघडच आहे. घटोत्कचाचे वर्णन एवढे एकच काय ते साम्य आहे.

हा सांगाडा ज्याचा कोणाचा असेल त्याचा असेल पण राक्षसी आकाराचा आहे.

या निमित्ताने काही प्रश्न समोर येतात ते असे.
१. भारतात संशोधनासाठीचे मग ते इतिहास असो वा नैसर्गिक उर्जा स्त्रोतासाठी उत्खनन किती झाले आहे वा होते?
२. माझ्या वाचनात जेवढे काही असे भारतातल्या उत्खनना संबंधी आले आहे ते काही बांधकामा निमित्त असेच आलेले आहे. भारतात एवढे कमी उत्खनन का?
३. हा सांगाडा जर अमेरिकेत मिळाला असता तर तो कोणाचा आहे असा प्राथमिक निष्कर्ष काढला असता?
४. या सांगाड्याचा महाभारत काळाशी संबंध जोडायचा झाल्यास काय सिद्ध होणे गरजेचे आहे?

मराठीत लिहा. वापरा.

मुद्दे..

१. हे धर्म शव पुरतात.
२. तसे हे दोन धर्म हिंदू धर्मा इतके जुने नाहीत. त्यामुळे सर्वात जवळचा इतिहास त्यांचा आहे त्यामुळे एवढ्यावर सापडलेला सांगाडा अहिंदू असण्याची शक्यता जास्त.
३. तसेच आमच्या राजकारण्यांना मताची गरज आहे.

हे तीनही मुद्दे पटण्याजोगे आहेत. Irrespective of this article, हिंदुंच्या बाबतीत कसलेही निर्णय, पुरावे, निकाल याबाबतचे सरकारातले मत हे हात राखूनच आणि कुणा निधर्मीच्या धोतराला धक्का तर लागणार नाही ना, याची काळजी घेऊनच दिले जाते! ;)

आपला,
(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक लहानसा स्वयंसेवक) तात्या.

उत्क्रांतीवाद

ज्यांना सखोल माहित आहे त्यांना याबाबत अधिक माहिती पुरवता येईल असे वाटते. मी फार खोलात वाचलेले नाही परंतु कपिसदृश कोणतीही जमात इतकी प्रचंड असल्याचे आठवत नाही.

चू. भू. दे. घे.

निऍन्डरथल

निऍन्डरथल ही मानवाची प्रजाती (जी पुढे नष्ट झाली) ती होमो सॅपियनस्न पेक्षा धिप्पाड होती असे माहितीपटात पाहिल्याचे स्मरते. यांची उंची साधारण ९ फूट वगैरे असावी. (अर्थात ही माहिती टिव्हीवरील व डिस्कव्हरी ची. याची घटोत्कचाशी तुलना करण्याचा प्रयत्न मुळीच नाही.)

अवांतर : यती/हिममानवाच्या अस्तित्वाबद्दल व आकाराबद्दलही काही दावे आहेत. पण त्यात फारसे तथ्य असेल असे वाटत नाही.

अत्यंत अवांतर :
१. कुठल्याही सजीवासाठी आकार ही फार महत्वाची बाब आहे. हत्तीच्या आकाराची मुंगी किंवा मुंगीच्या आकाराचा हत्ती जमात म्हणून तग धरू शकणार नाही असे आणखी एका कार्यक्रमात पाहिल्याच्ये स्मरते. मनुष्याचा आकार आजच्या आकाराहून फार वेगळा असल्यास त्याच्या मेंदूचा 'इतका' विकास झाला नसता असे मानण्यास जागा आहे असे वाटते.
२. 'हा' घटोत्कच काय खात असावा बरे? उपासमारीने तर मेला नसेल ??

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

८ फूट - ९ फूट

निऍन्डरथल ही मानवाची प्रजाती (जी पुढे नष्ट झाली) ती होमो सॅपियनस्न पेक्षा धिप्पाड होती असे माहितीपटात पाहिल्याचे स्मरते. यांची उंची साधारण ९ फूट वगैरे असावी.

अगदी हल्लीचे अनेक बास्केटबॉलपटूही साडे सात ते ८ फूट असतात. :)

(येती-सॅसक्वाच स्पेशालिश्ट)प्रियाली

अति-अति-अति अवांतरः

८ फूट - ९ फूट विचार करताना जमैकन कॅलिप्सो गायक हॅरी बेलाफोन्टची आणि बनाना बोट या अत्यंत सुप्रसिद्ध गाण्याची आठवण सक्काळीच झाली. गाणे येथे ऐकता येईल, चोरी ओळखा. (सक्काळी यापेक्षा बरा विडिओ मिळता तर बरे वाटले असते, असो.)

दुवा

राजेंद्रांच्या दुव्यावरुन वाटते की हा मुद्दाम पुरलेला पुरातन पुरावा(प्लान्टेड एव्हिडन्स) असावा.
सांगाडा नको इतक्या सुस्थितीत वाटतो हे मात्र खरे. माणूस झोपला किंवा युद्धात पडला तर इतका शवासन स्थितीत पडणार नाही. आता फ्युनरलच्या आधी त्याच्या नातलगांनी त्याला तसे सरळ झोपवले असले तर गोष्ट वेगळी.
(वाईट वाटते की असे पुरावे निर्माण करण्याने खरोखर असे काही संशोधन करणार्‍यांवरचाही विश्वास डळमळीत व्हायला लागतो.)

विना संदर्भ

वरील माहीती अथवा छायाचित्रे वाचून/पाहून इतकीच टिपण्णी करावीशी वाटते की यात एक ही संदर्भ नाही. बातमीचा भाग वृत्तपत्रातील कात्रण वाटू शकेल असा आहे पण तो कुठल्या वृत्तपत्रातील आहे, बातमी कुणाकडून आली (रॉयटर्स, एपी, पीटीआय इत्यादी), बातमीची तारीख काहीच दिसत नाही. "Hindu Voice" असे जरी रोमन लिपीत लिहीले असले तरी ते नंतर लिहील्यासारखे त्याच्या अक्षराच्या साच्यामुळे वाटते.

छायाचित्रे पण त्या बातमीशी संलग्न दिसत नाहीत कारण जर ती बातमी खर्‍या वृत्तपत्रातील म्हणावी तर ती कृष्णधवल आहे आणि ही चित्रे मात्र रंगीत. शिवाय परत ती कुठून आली हे कळत नाही. तुर्तास आपण (चाणक्य यांनी) ती त्यांच्या "पिकासा"च्या माहीती पानावर ठेवून त्याचा वेब ऍड्रेस दिला आहे. मला वाटते हे सर्व कुठल्या तरी फिरत्या इ-मेल मधील आहे. माझी एक सर्वांना विनंती आहे: आपण जर तसे आत्ता करत नसाल तरच - जेंव्हा इथे (उपक्रमवर आणि खरे म्हणजे कुठेही) बाहेरचे जालावरील चित्रे म्हणून चिकटवाल तेंव्हा त्याचा संदर्भ जालावरील पत्ता देयला विसरत जाऊ नका. त्यामुळे त्या बातमीतील विश्वासार्हता वाढते, स्त्रोत समजतो आणि जर काही चुकीचे असले तर ते पण इतरांकडून समजू शकते (मी तसे माझ्या लेखात करायचा प्रयत्न केला आहे).

थोडे अवांतरः अशाच प्रकारची एक इ-मेल मला मॅकॉले (ज्याने "ब्राऊन स्कीन" खाली, गोरे विचार करणारी शासनव्यवस्था आणि पर्यायाने आंग्लाभिमुख शिक्षण भारतात आणले त्याच्या अजून काही (भारत/भारतीयांबद्दल) वाईट लिहीलेली एक इ-मेल आली होती. मी वाचून प्रभावीत झालो (शिवाय ती माहीतीतील माणसाकडून आली होती) आणि विचार न करता ती इतरांना पाठवली. गंमत म्हणजे एका "कड़क हिंदूत्ववादी" असलेल्या व्यक्तीनेच मग ती खरी नसावी हे अनुमान काढून मला कळवले (कारण त्या विशिष्ठ काळात मॅकॉले भारतात होता तर त्या मेल प्रमाणे तो ब्रिटीश पार्लमेंट मधे बोलला होता..) . मग जेंव्हा "ब्रिटीश पार्लमेंटचे पुरातत्व विभागातून कागदपत्रे" संदर्भम्हणून मिळाई तेंव्हा त्या इ-मेलचा फोलपणा समजला...

हे दुवे पहा

माझ्या वरील प्रतिक्रीयेत म्हणल्याप्रमाणे, तसेच राजेंद्र नी दिलेल्या दुव्याप्रमाणेच हा अजून एक दुवा पहा. तसेच कॉर्नेल विद्यापिठाने ही छायाचित्रे न्यूयॉर्कच्या हाईड पार्क जवळ काढली होती असा एक् संदर्भ आहे त्याचा हा दुवा.

अजून एक गोष्ट म्हणजे, या बातमीत म्हणल्याप्रमाणे "Empty Quarter" हा शब्द मूळ सौदीअरेवबियातील वाळवंटासाठी वापरला जातो. त्याच अर्थाने घेयचा झाला तर तो आपल्याकडे राजस्थान/गुजरात मधील वाळवंटासाठी म्हणजे "पानीपत" पासून लांब वापरलेला असू शकतो. शिवाय त्यात गवत - हिरवळ चांगली दिसत आहे तो भाग आहेच.

धन्यवाद!

एका वेगळ्याच कारणासाठी हा लेख आम्हाला आनंद देऊन गेला. चाणक्यांचे आभारी आहोत!

भारत सरकार

जर हे खरे असेल. तर हे भारत सरकारला स्वतः करायला नको वाटले याचा खेद वाटतो. धर्म, इतिहास वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या तरी संशोधनाच्या दृष्टीने सरकारने पहायला काय हरकत असावी?

मुद्दाम उठवलेल्या सनसनाटी बातमीबद्दल भारत सरकारला उगीच दोषी ठरवले गेले आहे.
--वाचक्नवी

२ सांगाडे - वेगवेगळी चित्रे!

वरील ३ चित्रांपैकी २ चित्रे सारखी आणी एक वेगळे आहे.
कवटीचा समोरील भाग नीट पाहिल्यास ते स्प्ष्ट होईल.
याशिवाय युयुत्सुंनी निर्देशल्याप्रमाणे असे चित्र बनवणे अगदीच सहज शक्य आहे!
(कुणाला हवे असल्यास, योग्य ती चित्रे मला दिल्यास मी बनवूनही द्यायला तयार आहे! ;) )

आपला
गुंड्या

सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र
(ता. क. आमचे येथे 'प्रत्यक्षात नसलेले फोटो' काढून मिळतील!)

फसवा शोध स्पर्धा

हि लिंक बघा. हे संकेतस्थळ अश्या फसव्या शोधांची स्पर्धा आयोजित करत असते. त्यावरुन कोणी तरी फोटो ढापुन अश्या प्रकारचे अफवा पसरवणारे मेल करण्यास सुरुवात केली असावी. हे सुध्धा बघा.

कुंभकर्ण

बातमी पटण्यासारखीच आहे. असो. नॅशनल जिओग्राफिक च्या 'भारतीय शाखेचे' व 'भारतीय सेनेचे' खास अभिनंदन. इतका 'मोठा' शोध दडपल्याबद्दल सरकारला शिव्यांची लाखोली.

अवांतर :
१. पण हा सांगाडा कुंभकर्णाचा असून श्रीलंकेत सापडला नाही कशावरून?
२. ब्रम्हाने तशी माणसे बनवायची बंद केली तरी अशी माणसे बनवणे चालूच ठेवलेले दिसते ;) (स्वयंनिर्देशक की काय् ते वाक्य)
३. अशावेळी सैन्याला पुढे करत, पुरातत्व खात्याला जाणूनबुजून बगल दिली जाते याचा खेद वाटतो.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~
 
^ वर