न्यूटनचा चौथा नियम...

विज्नाननिष्ठ माणसाचीपण अंधश्रद्धा असू शकते.

जगाचा अंत २०६० मध्ये होणार; सर आयझॅक न्यूटन यांचे भाकीत (हा सीएनएन चा दुवा)

Ref: cnn.com

जेरुसलेम, ता. १८ - आधुनिक पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्राचे जनक असलेले थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी सन २०६० मध्ये जगाचा अंत होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. त्यांनी सन १७०४ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात हे भाकीत लिहिले आहे. ...
जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठात सध्या "न्यूटन्स सिक्रेट्‌स' नावाचे एक प्रदर्शन भरले आहे, त्यात या पत्राचा समावेश आहे. शास्त्रीय हस्तलिखितांचा संग्रह असणाऱ्या एका धनाढ्य व्यक्तीने न्यूटन यांची ही हस्तलिखिते हिब्रू विद्यापीठाला प्रदान केली आहेत. विद्यापीठाने १९६९ मध्ये ही पत्रे मिळाल्यानंतर प्रथमच ती जाहीर प्रदर्शनात मांडली आहेत.

Ref: esakal

एरवी बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या या शास्त्रज्ञाने हे भाकीत बायबलमधील एका पुस्तकाच्या आधारे वर्तविले आहे. "बुक ऑफ डॅनिएल' या पुस्तकातील काही ओळींचा आधार घेऊन न्यूटन यांनी या पत्रात म्हटले आहे, की पश्‍चिम युरोपात सन ८०० मध्ये रोमन साम्राज्याची स्थापना झाली; त्यानंतर १२६० वर्षांनी जगाचा अंत होईल.

न्यूटन यांनी सतराव्या शतकात केंब्रिज विद्यापीठात केलेल्या संशोधनाद्वारे, आधुनिक विज्ञानाचा पाया घातला गेला, असे मानले जाते. अर्थात न्यूटन यांनी त्या काळातील काही अंधश्रद्धांचेही पालन केल्याचे दिसून येते. त्यांनी १६७० च्या दरम्यान धातूंचे रूपांतर सोन्यात करणाऱ्या "अल्केमी'वर संशोधन करण्यात चार वर्षे घालविली होती.

जगाचा अंत अमुक वेळी होणार, अमक्‍या काळात होणार, अशी भविष्यवाणी अनेकदा वर्तविली गेली आहे. मात्र, न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञाचा संबंध या विषयाशी प्रथमच आलेला दिसत आहे. त्यामुळेच हिब्रू विद्यापीठातील त्यांचे पत्र हा अनेकांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.

Comments

ग्रँड मास्टर

अशा (अंध)विश्वासांमुळेच न्यूटनला 'प्रेअरी ऑफ झायॉन'चे ग्रँडमास्टर पद मिळाले असावे असे वाटते. ;-) ह. घ्या.
(प्रेअरी ऑफ झायॉन ही एक फसवणूक असावी असे मला सध्यातरी वाटते.)

बातमी आवडली

अर्रर्र!

प्रायरी (प्रेअरी म्हणजे भलतंच! क्षमस्व! चटकन आठवत नव्हतं.) ऑफ झायन

दा विंची कोड मधली गुप्तसंस्थाच.

प्रेअरी ऑफ झायॉन

(प्रेअरी ऑफ झायॉन ही एक फसवणूक असावी असे मला सध्यातरी वाटते.)

डी विन्ची कोड जेंव्हा चित्रपट म्हणून आला तेंव्हा त्यावर बरेच तसे आरोप झाले. त्याबाजूने मी काही कार्यक्रम पण पाहीले होते. पण "प्रेअरी ऑफ झायॉन" काहीतरी असावे असे वाटते.
आपण "Eyes Wide Shut" हा टॉम क्रूज - निकोल किडमनचा चित्रपट पाहीला आहे का ते माहीतनाही पण त्यातपण "प्रेअरी ऑफ झायॉन"चा उल्लेख जरी केला नसला तरी त्यापद्धतीची गूप्त संस्था उच्चभ्रूंमधे अस्तित्वात असल्याचे दाखवले होते. फक्त चित्रपटातील भर हा जास्त त्यातील "स्त्री-पुरूष" संबंधावरच होता...

प्रायरी ऑफ झायॉन

अशी एखादी गुप्तसंस्था असायला हरकत नाही परंतु दा विंची कोडमध्ये ही संस्था येशूच्या गुपीताचे संरक्षण करत होती असे लिहिले आहे आणि त्याच्या ग्रँड मास्टर्समध्ये ज्या मोठमोठ्या नावांचा समावेश आहे तो एक बनाव आहे, आणि तो अगदी हल्ली हल्ली फॅब्रिकेट केला गेला आहे असे तज्ज्ञांनी सध्यातरी सिद्ध केले आहे. (तसे, सध्या सिद्ध झाले म्हणून ते कालांतराने खोटे पाडले जाणार नाही किंवा वेगळे पुरावे समोर येणार नाहीत असे नाही.)

अवांतरः "Eyes Wide Shut" हा टॉम क्रूज - निकोल किडमनचा चित्रपट पाहीला आहे का ते माहीतनाही,
नाही पाहिला, बरा असेल तर बघून टाकिन म्हणते. :)

आईज वाईड शट

अवांतरः "Eyes Wide Shut" हा टॉम क्रूज - निकोल किडमनचा चित्रपट पाहीला आहे का ते माहीतनाही,
नाही पाहिला, बरा असेल तर बघून टाकिन म्हणते. :)

आम्ही तो चित्रपट पाहून चित्रपट गृहातून बाहेर् आलो तेंव्हा तसाच बाहेर् आलेल्या एका अमेरिकन युवकाने स्वतःचे डोके भिंतीवर आपटून घेतले (वेळ वाया घालवला म्हणून).

नंतर ६-७ वर्षांनी डी विन्ची वाचल्यावर (बघितल्यावर नव्हे) त्यात (Eyes Wide Shu मधेt)काय दाखवले होते आणि काय सांगायचे होते याचा थोडा अम्दाज आला.

तो चित्रपट लहान मुले आजूबाजूला असताना बघण्याचा नाही. त्यातील एका दृश्यात - स्त्री-पुरूष संबंध दाखवताना मागे "गीतेतले श्लोक" (काहीही संबंध नसताना) म्हणलेले घेतले होते, त्यामुळे त्यावरून जरा आरडाओरडा झाला होता...

दिशाभूल

मी कालच ही बातमी सीएनएनवर वाचली. सकाळमधील आपण दिलेली बातमी पाहून धक्का बसला. म्हणून पुन्हा मूळ बातमी पाहिली. मला समजते ते असे -

न्यूटन महोदय असा निष्कर्ष काढतात की जगाचा अंत २०६० च्या आधी नक्कीच होणार नाही. जगबुडी लवकरच होणार अशी बोंबाबोंब करणार्‍यांच्या प्रचाराला लोकांनी बळी पडू नये आणि पवित्र भाकितांवरील लोकांचा विश्वास उडू नये यासाठी त्यांनी हा खटाटोप केला होता असे दिसते.

संबंध

ज्यु असण्याच्या संबंधामुळेही काही लोक सदैव चर्चेत असतात.
'काही लोकांना' त्यांचा 'तो' संबंध सदैव प्रकाशात राहणे महत्वाचे वाटते. त्यामुळे एका खास जमातीचे लोकच हेच जगाला पुढे नेत आहेत अशा आशयाचे संदेश सतत देता येत राहू शकतात. (आणी इतर जगात बुद्धीची कमीच आहे की काय असा आभास निर्माण करता येवू शकतो! ;) ) त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवली जावू शकते.
अशा लोकांच्या हातात जर माध्यमांची मालकी असेल किंवा त्यामध्ये मोठा हस्तक्षेप असेल तर असे करणे सोपेही होत जात असावे.
हाच नियम आपण लिखाळ यांनी दिलेल्या भारतीय हे मूळ भारतीयच आहेत युरोपिय नाहीत हे आज पटवून द्यावे लागते आहे; हे त्या दुव्यातही पाहिलेच असेल. अशा प्रकारे आजही 'मिडिया व्हाईटनिंग' चा अनुभव तर आपण रोजच घेत आहोत.
('मिडिया व्हाईटनिंग' यावर अनेक विद्यापीठांमध्ये निबंध सादर केले गेले आहेत. या विषयी लिहिता येईल पण अगत्य नाही म्हणून थांबतो.)
या शिवाय हे पत्र लिहिण्याच्या काळात धर्म आणी विज्ञान या गोष्टी वेगवेगळ्या त्या काळात मानल्या जात होत्या का?
हे वेगळेपणाची रेष कधी जन्माला आली?

आवांतरः धर्म हा खर्‍या अर्थाने गटेंबर्गने छापखाना आणल्यानंतर नियमांत अडकला. कारण छापील झाल्याने एकाच धर्मग्रंथाचे स्टँडर्डायझेशन चा प्रयत्न झाला. हे पटते का?

(वरचा माझा(?) विचार हा काँस्पिरसी थेयरी चा भाग आहे का?)
आपला
गुंडोपंत

हम्म

मलादेखील सी एन् एन् च्या बातमीतून एकलव्य यांच्यासारखेच वाटले. पण बी. बी. सी. आणि ए. बी. सी. यांच्या या बातम्या पहा..

बी.बी. सी ने सी एन् एन च्या आधीच ही बातमी - २००३ मध्ये (एका बीबीसीच्याच लघुपटासंबंधी ) २०६० मध्ये जगाचा अंत होणार असे म्हणून दिली आहे. अर्थात २००३ मध्ये हे वाचल्याचे आठवत नाही.

ही पहा

एबीसी ची ही गेल्याच काही दिवसातील बातमी..

कोणाची बातमी खरी ते जगलो वाचलो तर आपसूकच कळेलच म्हणा - २०६० मध्ये!!

चित्रा

आधार

या निष्कर्षाचा आधार काय होता हे कळाल्यास बरे होईल. प्रथमदर्शनी तरी न्यूटनसारखा माणूस असे करु शकेल यावर विश्वास बसणे कठीण आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

काळजी करण्याचे कारण नाही!

न्यूटनच्या वरील विधानामुळे काय होणार अशी आपल्याला काळजी वाटत असल्यास खालील बातमी (इ-सकाळ, २२-जून-२००७) वाचल्यास काळजी करण्याचे कारण नसल्याचे समजेल!

न्यूटनचे जगाच्या अंताचे भाकीत चुकीचे - घैसास गुरुजी

पुणे, ता. २२ - भारतीय पंचांगशास्त्राचा भरभक्कम दाखला देत "जगाचा अंत २०६० मध्ये होणार,' हे सर आयझॅक न्यूटन यांचे भाकीत चुकीचे असल्याचा दावा "वेदभवन'चे संचालक वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी केला. .........
""या भाकिताला कोणताही सबळ आधार नाही; उलट पिढ्या न्‌ पिढ्यांची परंपरा असलेल्या पंचांगशास्त्रातील गणिती ताळेबंद लक्षात घेता, आणखी चार लाख २६ हजार आणि ८९२ वर्षे तरी जगाचा अंत नाही,'' असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठात आयोजित केलेल्या "न्यूटन्स सिक्रेट्‌स' प्रदर्शनात सन १७०४ मध्ये न्यूटनने लिहिलेले पत्र असून, त्यात हे भाकीत केलेले आहे. वृत्तपत्रांमधून हे भाकीत प्रसिद्ध झाल्यानंतर पंचांगशास्त्राच्याआधारे आणि गणिताचा ताळेबंद मांडून घैसास गुरुजींनी न्यूटनचे हे भाकीत खोटे असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात "सकाळ'ला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ""हे भाकीत म्हणजे "गणपती दूध पितो'च्या बातमीसारखे आहे.''

भारतीय पंचांगशास्त्र जगात श्रेष्ठ असल्याचे नमूद करून घैसास गुरुजींनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी वेद, उपवेद, युगांचा गणिती हिशेब पंचांगांच्या आधारे समजावून सांगितला. तसेच या गणिताला भागवत ग्रंथातील उल्लेखही कसा लागू होतो, ते स्पष्ट केले. ""ज्याने सृष्टी निर्माण केली, तोच तिचा नाशही करणार आहे, मात्र त्याचे गणित ठरलेले आहे. त्या गणिताशी आमच्या पंचांगशास्त्राचा ताळेबंद मिळताजुळता आहे, न्यूटनचे भाकीत नव्हे,'' असेही ते म्हणाले.

**********************************************
आणखी ४ लाख २६ हजार ८९२ वर्षे.
घैसास गुरुजींनी दाते पंचांगात पान ४ आणि ५ वर चार युगांच्या काळाचा केलेला गणिती हिशेब स्पष्ट केला. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी चार युगे आहेत. त्यांचा कालावधी अनुक्रमे १७ लाख २८ हजार वर्षे, १२ लाख ९६ हजार वर्षे, आठ लाख ६४ हजार वर्षे आणि चार लाख ३२ वर्षे असा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या निर्वाणानंतर कलियुग सुरू झाले. या युगाची ५ हजार १०८ वर्षे सरली असून, अजून चार लाख २६ हजार ८९२ वर्षे शिल्लक आहेत.
**********************************************

 
^ वर