बिधान बरुआ केसः लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपली ओळख बदलणे आवश्यक आहे का?

मित्रहो, बिधान बरुआची केस आतापर्यंत सर्वांना माहित झाली आहे. आता लोकप्रभेतील हा लेख वाचा. http://www.lokprabha.com/lokprabha/20120525/cover_story.htm

सोयीसाठी लेखातील काही भाग खाली चिकटवत आहे.

ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. रविन थत्ते त्यांच्याकडच्या एका प्रकरणाचं उदाहरण देतात. एक अतिशय सुंदर दिसणारी, प्रमाणबद्ध शरीराची मुलगी त्यांच्याकडे आली आणि तिने त्यांना लिंगबदल करून मुलगा होण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. ज्या वेळी तिने ही लिंगबदलाची अपेक्षा व्यक्त केली तेव्हा तिने आपलं एका मुलीवर प्रेम असल्याचं स्पष्ट केलं. पहिल्यांदा जेव्हा ती मुलगी डॉ. थत्ते यांना भेटली तेव्हा तिच्यासोबत तिची गर्लफ्रेंडही होती. नंतर प्रत्येक वेळी ती गर्लफ्रेंड सोबत होती. लिंगबदलाची इच्छा व्यक्त केलेली मुलगी दृढनिश्चयी होती आणि तिने त्याप्रमाणे लिंगबदल करून घेतलं. मात्र लिंगबदलानंतर जेव्हा मुलगा बनलेल्या तिने जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्या गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांनी लग्नाला विरोध केला. त्यानंतर त्या गर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं. ज्या मुलीसाठी डॉ. थत्तेंकडे आलेल्या मुलीने लिंगबदल केला ते कारण तिच्या आयुष्यातून नाहीसं झालं.. मुलगा बनलेल्या त्या मुलीची स्थिती आज काय आहे याबद्दल कोणाला काहीच ठाऊक नाही..

लोकसत्तेमध्ये काही तरुणांच्या मुलाखती येथे वाचा.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227...

आता काही प्रश्नः

आपल्या शरीराचे काय करावे याचा पूर्ण हक्क आणि अधिकार व्यक्तिला असावा का? असे असल्यास आत्महत्येस विरोध का? इच्छामरणास विरोध का? लिंगबदल केल्याने शरीरातील पहिली व्यक्ती मारून टाकली असे म्हणता यावे का? अशी आपलीच जुनी ओळख (आयडेन्टिटी) मारता येणे शक्य आहे का?

Comments

कठिण आहे

कठिण परिस्थिती आहे. कथा बहुधा दु:खद आहे.

(अर्थात हादेखील प्रश्न आहे - ही गर्लफ्रेंड हेच एकुलते एक कारण होते काय? अवांतर : हेडविग अँड दि अँग्री इंच आठवला.)

(ऐकीव माहिती) लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात धोरण असे असते की सल्ला-मसलतीचा लांबलचक काळ शस्त्रक्रियेच्या आधी असतो. (बहुधा अनेक वर्षांचा काळ.) शस्त्रक्रियेपूर्वी होर्मोन-उपचारापुरता "लिंगबदल" वगैरे काही काळापर्यंत करतात. जेणेकरून या काळात लिंगबदल कायमस्वरूपी नसतो. वगैरे.

(ट्रान्स-अमेरिका चित्रपट बराच माहितीपूर्ण होता.)

> आपल्या शरीराचे काय करावे याचा पूर्ण हक्क आणि अधिकार व्यक्तिला असावा का?
अंततोगत्वा होय. असे माझे वैयक्तिक मत आहे.

> असे असल्यास आत्महत्येस विरोध का?
अंततोगत्वा माझा आत्महत्येस विरोध नाही.

> इच्छामरणास विरोध का?
माझा इच्छामरणास विरोध नाही.

> लिंगबदल केल्याने शरीरातील पहिली व्यक्ती मारून टाकली असे म्हणता यावे का?
नाही.

> अशी आपलीच जुनी ओळख (आयडेन्टिटी) मारता येणे शक्य आहे का?
? ओळख ही आयुष्यभर सारखी बदलत असते. ही बाब लिंगबदल न-करणार्‍यांच्या बाबतीत - म्हणजे सर्वांच्या बाबतीत. त्यामुळे आदल्या ओळखीशी आजच्या ओळखीचा बराचसा संबंध असतो, आणि काहीसा फरकही असतो. उदाहरणार्थ, एक अजाण बालक म्हणून माझी पूर्वी ओळख होती, आणि आता तशी ओळख नाही. पण बालक-धनंजयच्या ओळखीचा बराचसा भाग प्रौढ-धनंजय (तारीख आजची) या व्यक्तीतही दिसते. त्यामुळे बालक-धनंजयची ओळख मारली गेली आहे की नाही?

लोकप्रभेतील लेख

लोकप्रभेतील लेख माहितीपूर्ण वाटला.

आपल्या शरीराचे काय करावे याचा पूर्ण हक्क आणि अधिकार व्यक्तिला असावा का?

नसावा पण काही बाबतीत अपवाद असू शकतील.

असे असल्यास आत्महत्येस विरोध का?

कारण तो क्षणिक निर्णय असू शकेल, तुमच्या जीवनावर इतरांचे जगणे अवलंबून असेल, एखादा तुम्हाच्यावर असा निर्णय घेण्यास दबाव आणत असेल अशी अनेक कारणे देता येतील. आत्महत्येला माझा विरोध आहे, काही अपवाद वगळून.

इच्छामरणास विरोध का?

वरील कारणांमुळेच, अपवाद वगळून विरोध आहे. मागे एका चर्चेत कारणे दिली होती.

लिंगबदल केल्याने शरीरातील पहिली व्यक्ती मारून टाकली असे म्हणता यावे का? अशी आपलीच जुनी ओळख (आयडेन्टिटी) मारता येणे शक्य आहे का?

वयानुसार माणसात बदल घडून येतो. कधी कधी हा बदल इतका तीव्र असतो की लहानपणीचे मित्र कालांतराने भेटले की त्यांना ओळखताही येत नाही. त्यामुळे त्या व्यक्ती मेल्या असे म्हणता येत नाही परंतु हे ही आहे की वयानुसार माणसात जो नैसर्गिक बदल घडतो, केशरचनेत फरक, वेशभूषेत फरक इ. शरीराला कष्ट न देता केलेले बदलही माणसाची ओळख बदलू शकतात. त्यात त्या माणसाची स्वतःची आयडेंटिटी नष्ट करायची इच्छा असतेच असे नाही पण लिंगबदल करणार्‍याची तशी इच्छा (स्वतःची आयडेंटिटी नष्ट करण्याची) असू शकते.

असो.

लिंगबदलासाठी उत्सुक असलेल्या इच्छुकांना समुपदेशन आणि मानसिक मदत द्यावी. जी कारणे मी आत्महत्त्येसाठी दिली आहेत तीच कारणे लिंगबदलासाठीही थोड्याफार प्रमाणात लागू होऊ शकतात.

चित्रविचित्र टॅटू लावताना अनेकदा या लोकांना त्याचा पश्चात्ताप कसा होत नाही किंवा कंटाळा कसा येत नाही असा प्रश्न पडतो. अर्थातच, कंटाळा येत असावा किंवा पश्चात्ताप होत असावा म्हणून टॅटू मिटवण्यासाठी आणखी पैसे खर्च केले जातात. (तरीही ते व्रण आणि खुणा दिसतातच) इथे अद्याप तसे होणेही कठीण आहे.

बिधान बरुआची केस इतकी प्रसिद्ध झाली आहे की जरी या मुलाच्या हातात पैसे नसले तरी काही प्रायोजक उभे राहतील. त्याचा सर्व खर्च उचलतील आणि बहुधा लवकरच त्याला एखाद्या रिऍलिटी शोमध्येही आणतील.

समाजाचा स्वार्थ

उत्पादनक्षमता वाढविण्यात हातभार लावणार्‍या सर्वच कृतींना विवेकी समाज कायदेशीर मान्यता देईल. विविध प्रकारच्या विवाहांना अनुमतीचा विचारही अशाच हिशोबाने करण्यात येतो. बहुतेक सर्वत्र, आत्महत्या त्याच कारणासाठी अवैध असते आणि मूत्रपिंडदान मात्र वैध असते (देश/धर्म यांसाठी जीव धोक्यात घालणे मात्र केवळ वैधच नसते तर supererogatory, उदात्त असते). लिंग आयुष्याइतका इनएलियनेबल गुण नसला तरी बराच गंभीर आहे. समुपदेश, इन्फॉर्म्ड कन्सेन्ट, इ. सोपस्कार काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे.
आता, विवाहासाठी, इ. जोडीदार सुचविणार्‍या संस्थळांवर "जन्मापासून हेच लिंग आहे" असे प्रत्येक जाहिरातदात्यास स्पष्ट करावे लागेल ;)

सद्य ओळख

>बिधान बरुआ केसः लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपली ओळख बदलणे आवश्यक आहे का?

सद्य ओळखच चुकीची आहे असे मत असल्यास आवश्यकता असू शकेल.

हार्डवेअर बदलण्यासारखे आहे

प्रदीर्घ समुपदेशनानंतरच लिंगबदलाची प्रक्रिया/शस्त्रक्रिया होत असते. काही अपवाद वगळता (म्हणजे बेकायदेशीर कामासाठी जसे आत्मघाती हल्ल्यासाठी शरीर वापरणे) आपल्या शरीराचे काय करावे ह्याचा अधिकार प्रत्येकाला असावा. असे असले तरी एखादा इरिवर्सिबल बदल करणे म्हणजे कसेसच वाटते. पण शेवटी ज्याची त्याची मर्जी. लिंगबदलाचा तसा ओळखीशी (आयडेन्टिटी) तसा संबंध लावता येईल असे वाटत नाही. लिंगबदल म्हणजे फक्त हार्डवेअर बदलणे झाले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर