सचिनचे शंभरावे शतक

सचिनचे शंभरावे शतक लटकल्यापासून कोट्यावधी भारतीयांच्या मनाला घोर लागला आहे. मला तर ह्या काळजीने दिवस रात्र झोप येत नाही.मग हा वेळ उपक्रम सारख्या माहितीपूर्ण स्थळावर काढला जातो. इथले लेख आणि चर्चा वाचुन वाचुन मला एक वेगळाच विचार मनात आला. ह्याचे बरेच श्रेय घासकडवींच्या लेखनाला जाते. सचिन हा अतिशय श्रद्धाळू आणि भक्तिभाव मानणारा खेळाडू आहे. त्याचे अध्यात्मिक गुरू सत्यसाई बाबा गेल्यावर ढसाढसा रडणारा त्याचा चेहरा तुम्हाला आठवत असेलच. तर असा अध्यात्मिक गुरू अचानक जगातुन नाहिसा झाल्यावर त्याचा थेट परीणाम भक्तांवर दिसून येतो का? सत्यसाईबाबांच्या मृत्यू होईपर्यंत सचिन आणि पर्यायाने भारतीय संघाचे बरे चालले होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सचिनचे शतक लटकलेले असून भारतीय संघाच्या इज्जतीचा पंचनामा झाला आहे. हा केवळ योगायोग आहे की खरंच ह्याचा काही परस्पर संबंध असावा.
उपक्रमावरील नास्तिकांनी लगेच टिका करण्यापूर्वी लक्षात घ्यावे:

प्रश्न असा आहे, सत्यसाईबाबांचा हा इफेक्ट सिद्ध झालेला आहे का? त्यावर किती विदा आहे? कल्पना करा की प्रत्येक खेळाडूच शतक होण्याचं काहीतरी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशन आहे. या डिस्ट्रिब्यूशनवर सत्यसाईंचा हात असेल तर ते त्या खेळाडूच्या बाबतीत थोडंसं बदलतं. आणि मग सचिनसारखे सत्यसाई भक्त खेळाडू ९९व्या शतकाला लटकताअत. मूलभूत प्रश्न असा आहे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशनच्या (ज्याला आपण सत्यसाई म्हणू) भक्तिने ते बदलतं या विश्वासामुळे जर खरोखरच ते बदलत असेल तर कार्यकारणभावच गोत्यात येत नाही का? मग विदा गोळा करून तपासून कसं बघणार? कारण त्यासाठी हा विश्वास मोजण्याचे काहीतरी बिश्वासार्ह मानदंड हवेत. म्हणजे मग पुन्हा तुम्हाला लॅक ऑफ एव्हिडन्स वगैरेसारखी सरकमस्टान्शियल पुराव्यांवर केस उभी करावी लागते.

व्हेअर इज द स्मोकिंग गन?

थोडक्यात सत्यसाईंच्या निधनाचा आणि सचिनच्या शतकाचा संबंध नाही असे दाखवणारा कोणताही विदा नाही. पण आहे असे दाखवणारा विदा मात्र मी दिला आहे.तेव्हा विचार करा आणि प्रतिसाद मांडा

लेखनविषय: दुवे:

Comments

हा खेळ संख्यांचा - नव्याण्णव

उणे ते माझे, अपश्रेय ते माझे, आणि उत्तम ते, श्रेय ते, इतरांचे, या भावाने श्रद्धाळू माणूस आपल्या बाबतीत घडणार्‍या वाईट गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या कर्मांना देतो, तर चांगल्या गोष्टींचे श्रेय देवाला/ दैवाला/ गुरुला देतो. हा भाव आहे.
सचिनला निर्बुद्ध, अप्रामाणिक, स्वार्थी म्हणणे योग्य नाही, असे मला वाटते.

योगायोग

"एका डब्यात इथल्या दहा एक चर्चांचे शब्द घालुन डबा जोरात हलवल्यास असला लेख बाहेर पडू शकतो" ह्या निष्कर्षाला हा लेख विदा म्हणून वापरला जाउ शकेल.

पण ह्या लेखातील मतितार्थाला आक्षेप आहे, असे शतक हुकण्याची वाईट घटना सचिन बरोबर घडणे ही एक यदृच्छेने घडणारी गोष्ट असावी, कारण सत्यासाई असताना देखील २००६-२००७ मध्ये ह्या देवाला खराब पॅचमधून जावे लागले, हा अतर्क्य योगायोगच असावा.

सचिनला निर्बुद्ध, अप्रामाणिक, स्वार्थी म्हणणे योग्य नाही, असे मला देखील वाटते.

देवाला रिटायर करायला हवे

माझ्यामते सचिनच्या आहारातील तुपाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हे घडले असावे. अर हो पण सचिन तर देव आहे. असो. देवाला रिटायर करायला हवे. असो, असो.

ह्यानिमित्ताने शतक किती लहान असावे ह्यावरही चर्चा व्हायला हवी. म्हणजे किमान किती वेळ आणि किती चेंडू खेळून काढायला हवे. किती षटकार हवे, किती चौकार हवे वगैरे. ह्या चर्चेतून काही निष्पन्न झाल्यास शतकात शंभरच धावा हव्यात का, हा मुद्दा उरतोच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छे छे...

त्याने असा तूप् वगैरेचा असा अजिबात विचार न करता बेबंदपणे आहार सुरु ठेवला असता, बेसुमार् वाटेल ते खात गेला असता तर लवकरात लवकर टम्म ढेरपोट्या बनलेल्या सचिनने लागलिच शंभर धावा पळून काढल्याच असत्या की. आहार नियंत्रण वगैरे सारख्या क्षुल्लक,दुर्लक्षणीय गोष्टीकडे म्हणूनच सुदृढ रहायचे आहे अशा कुठल्याही व्यक्तिने किंवा विशेषतः खेळाडूंनी अजिबात लक्ष देउ नये हेच उत्तम. त्याची कारकिर्दच नाही का अशी मनमुराद व अनियंत्रित खाण्यामुळेच तब्बल दोनेक दशके चालली. त्यांचे ते फिजिओ अन् ट्रेनर उगीच आपले काहीतरी तब्येतीबद्दल बडबडत असतात झालं. बोलु देत बापडे.

--मनोबा

तुपाला काय घाबरायचे!

ते सगळे ठीक आहे हो. पण सचिनचे शतक होत नाही आहे ना. त्याचे काय? असो. "जेव्हा एकूण अन्नाची उपलब्धता कमी असेल तेव्हा अधिक कॅलरी देणारे पदार्थ उत्तम समजले जात असावेत. समृद्धीच्या काळात ते तितकेसे योग्य नाहीत. म्हणजे मेळघाटातील कुपोषित बालकांना या पदार्थांना घाबरायचे कारण नाही." हे श्री. नितिन थत्ते ह्यांचे वक्तव्य इथे आठवले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तूप

"लाडवां"मध्ये फार तूप वापरले गेल्याने त्याला तूप मिळत नसेल.

सचिन शतक काढत नाही म्हणजे काय? त्याला दोन धम्मकलाडू द्यायला हवे.

अवांतर : आमच्या गावी रायवळ आंबे विकायला आदिवासी बाया येत असत. त्यांच्याशी घासाघीस करताना आमची आजी त्यांना "शेकडा कितीचा?" असे विचारी. त्यांचा शेकडा सहसा १०५ ते ११० च्या दरम्यान व्हेरी होत असे. १०० पेक्षा कमी मात्र नसे.

नितिन थत्ते

अवांतर आंबे

सचिन शतक काढत नाही म्हणजे काय? त्याला दोन धम्मकलाडू द्यायला हवे.

हॅहॅहॅ. त्याचा आवाज कसाही असो आणि हातचलाखी करून उपजीविका कमावणाऱ्या सच्चसाईसाठी ढसाढसा रडला म्हणून काय झालं, पण सचिन काही शेंबडा मुलगा नाही. असो. तो केवळ शतकांसाठी, रेकॉर्डबुकांसाठी खेळतो असे मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे त्याची शंभर शतके झाली काय नाही किंवा नाही झाली काय, काही फरक पडत नाही. म्हणून त्याने आताच निवृत्ती घेतलेली बरी. असो. पण आमच्या देवाची एवढी अवहेलना होताना पाहून वेदना होतात. त्यामुळे आता क्रिकेट ह्या खेळावर काही किमान 10 वर्षे तरी बंदी आणायला हवी असे माझे मत आहे.

आमच्या गावी रायवळ आंबे विकायला आदिवासी बाया येत असत. त्यांच्याशी घासाघीस करताना आमची आजी त्यांना "शेकडा कितीचा?" असे विचारी. त्यांचा शेकडा सहसा १०५ ते ११० च्या दरम्यान व्हेरी होत असे. १०० पेक्षा कमी मात्र नसे.

मला वाटतं सचिनलाही अशा अवांतर आंब्यांची गरज आहे. असो. घाईत एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

चेंडूंना (पक्षी: चेंडूफेकींना) श्रेणी देण्याची सोय उपयोगी ठरेल काय? (उदा., सरपटी चेंडूवरील चौकाराला सहा धावा मोजाव्या, इ.?)
बाकी, शीर्षकावरून मला वाटले की तुम्ही दुखवट्याचा ठराव इ. काही मांडले आहे की काय?

विनंती

चेंडूंना (पक्षी: चेंडूफेकींना) श्रेणी देण्याची सोय उपयोगी ठरेल काय? (उदा., सरपटी चेंडूवरील चौकाराला सहा धावा मोजाव्या, इ.?)

तुम्ही व्यावसायिक किंवा धंदेवाईक पंच/क्रिकेटपटू/क्रिकेट प्रशासक/सट्टेवाले आहात की काय ! (चौघांत काही फरक नाही म्हणा.) असल्यास सचिनचे शतक होत नसल्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादावर (जीडीपी) होणारा वाईट परिणाम बघता त्याचे शतक होण्यासाठी थोडे जादा प्रयत्न करा की. विश्व चषकात केला तसा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दुखवटा

शीर्षकावरून मला वाटले की तुम्ही दुखवट्याचा ठराव इ. काही मांडले आहे की काय?

नाही सध्या मूड भारताची प्रगती मांडण्याचा आहे.

लॅक ऑफ एव्हिडन्स थिअरीचा

:) कचरा केलात के हो लॅक ऑफ एव्हिडन्स थिअरीचा. मजेशीर मुक्तक/विडंबन प्रकार म्हणायचं का याला ? हे इथं टाइप केलं तर चालतं ?

नाही. सिद्ध झालेला नाही

सत्यसाईबाबांचा हा इफेक्ट सिद्ध झालेला आहे का?

नाही. सिद्ध झालेला नाही कारण विदा उपलब्ध नाही

की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्यूशनच्या (ज्याला आपण सत्यसाई म्हणू) भक्तिने ते बदलतं या विश्वासामुळे जर खरोखरच ते बदलत असेल तर कार्यकारणभावच गोत्यात येत नाही का? मग विदा गोळा करून तपासून कसं बघणार?

जर तसे खरच बदलत असेल तर कार्यकारणभाव गोत्यात येण्याची शक्यता आहे. मात्र ते खरोखरच त्या कारणाने बदलते हे सिद्ध झालेले नाही

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

विदा

सिद्ध झालेला नाही कारण विदा उपलब्ध नाही

म्हणजेच आबसेन्स ऑफ इविडन्स इज इविडन्स ऑफ आबसेन्स की काय?
माझा प्रश्न पुन्हा एकदा पाहा:
मी व्हेअर इज द स्मोकिंग गन? असा प्रश्न विचारला होता. इफेक्ट नाही हे सिद्ध करणारा विदा कुठे आहे?

गळतगे

ह्याविषयावर अद्वयानंद गळतगेंचे मत काय आहे? (बरचेसे साधर्म्य असले तरी) मला गळतग्यांचे विचार घासकडवींपेक्षा प्रभावी वाटतात.

 
^ वर