उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
एकाच छापाचे गणपती
अरविंद कोल्हटकर
January 13, 2012 - 1:14 pm
एकावेळी अनेक संकेतस्थळांवर लेख प्रकाशित करावा की नाही ह्यावर सदस्यांनी निया मधल्या लाकडी पाट्या या लेखात केलेली चर्चा येथे हलवली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. मूळ लेखातील श्री. अरविंद कोल्हटकर यांनी लिहिलेल्या प्रतिसादाचा आधार घेऊन आणि त्या अनुषंगाने आलेले उपप्रतिसाद या चर्चेत वाचता येतील.
हे माहितीपूर्ण लेख येथे आणि 'ऐसी अक्षरे'वरहि येतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे अधिक वाचन होईल हे आहेच, जी गोष्ट निश्चितच चांगली आहे. त्याबरोबरच दोन अनिष्ट गोष्टीहि होतील. असे जर मोठया प्रमाणात झाले तर अशा प्रकारची सर्व संस्थळे हे एकाच छापाचे गणपति होतील. अधिक मोठा तोटा म्हणजे अभ्यासू प्रतिक्रिया दोन ठिकाणी विभागल्या जातील आणि त्यामुळे काही द्विरुक्ति आणि थोडासा विस्कळितपणा निर्माण होईल.
संस्थळांच्या नियमावलीमध्ये हे बसते काय ह्याचाहि विचार करावयास हवा.
दुवे:
Comments
द्विरुक्ति
लेख उत्तम आणि माहितीपूर्ण आहे असे म्हणतांनाच चन्द्रशेखर ह्यांना एक नम्रपणे सुचवावेसे वाटते.
त्यांचे हे माहितीपूर्ण लेख येथे आणि 'ऐसी अक्षरे'वरहि येतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे अधिक वाचन होईल हे आहेच, जी गोष्ट निश्चितच चांगली आहे. त्याबरोबरच दोन अनिष्ट गोष्टीहि होतील. असे जर मोठया प्रमाणात झाले तर अशा प्रकारची सर्व संस्थळे हे एकाच छापाचे गणपति होतील. अधिक मोठा तोटा म्हणजे अभ्यासू प्रतिक्रिया दोन ठिकाणी विभागल्या जातील आणि त्यामुळे काही द्विरुक्ति आणि थोडासा विस्कळितपणा निर्माण होईल.
संस्थळांच्या नियमावलीमध्ये हे बसते काय ह्याचाहि विचार करावयास हवा.
सहमत आहे.
बरीच मंडळी या गोष्टीशी सहमत होत नाहीत पण मी कोल्हटकरांशी सहमत आहे.
उपक्रमाच्या धोरणामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की
इतर माध्यमांतून किंवा इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेले साहित्य उपक्रमवर जसेच्या तसे प्रकाशित करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
परंतु सदस्य या कडे दुर्लक्ष करतात आणि सुचवणी केल्यावर नाराज होतात म्हणून हा क्लॉज संकेतस्थळ आणि संपादक गंभीरपणे घेत नाही असे वाटते. परंतु, सदस्यांनी थोडा विचार करावा ही मागणी अवास्तव नाही.
छापील मिडियामध्ये एकाचवेळी लोकसत्तेत आलेला लेख म.टा.मध्ये छापणे किंवा म.टा.तील लेख सकाळमध्ये जसाच्या तसा छापणे होत नाही तसे इंटरनेट माध्यमातही होऊ नये असे मला वाटते. (यांतून चौकशीवजा किंवा काही इतर चर्चा वगळता याव्या.)
अधिक लोकांनी आपला लेख वाचावा अशी इच्छा असणे योग्य आहे. लेखाच्या प्रकृतीप्रमाणे संकेतस्थळ निवडणे किंवा इतर संकेतस्थळांवरील आपल्या मित्रमंडळीला खरडी/ निरोपांद्वारे नव्या लेखाची माहिती देऊन त्यांना आमंत्रण देणे किंवा फेबुवगैरेसारख्या ठिकाणी जाहीर केल्याने एकाच ठिकाणी अनेक मंडळी येऊ शकतील.
अतिअवांतरः
मागे एका सदस्यांना विचारले होते की तुम्ही उपक्रमावर लेख न टाकता अचानक इतरत्र कसे टाकू लागला? त्यावर त्यांनी उत्तर दिले की तेथे प्रतिसाद अधिक येतात. क्वांटिटी आणि क्वालिटीमधील काय निवडायचे हा वैयक्तिक निर्णय असू शकतो.
सहमत
मुद्दे रास्त आहेत. इथे लेख दिल्यावर चंद्रशेखर काकांनी थोडावेळ तरी थांबायला हवे होते.
एकाच छापाचे गणपती
सहमत. पण उपक्रम काही त्याच छापाचा गणपती नाही. त्यामुळे काही काळ थांबून इतरत्र ( काही लहान मुलांच्या आग्रहास्तव ) लिखाण टाकणे हा मार्ग चांगला वाटतो. (तसेही चंद्रशेखर, अरविंद कोल्हटकर, धनंजय, प्रभाकर नानावटी, प्रियाली, रोचना ह्यांच्यासारख्या आमच्या आवडत्या लेखकांचे लेखन फक्त उपक्रमावरच प्रकाशित व्हावे असे वाटते.) अवांतर: उपक्रमावरील चांगले चांगले लिखाण जास्तीतजास्त लोकांपर्यत पोचावे म्हणून न्यूजलेटर सुरू करायला हवे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अभ्यासू
नियमांबद्दल म्हणत आहात ते बरोबर आहे. मी स्वतः माझे लेख सगळ्याच संकेतस्थळांवर दिलेले नाहीत, संकेतस्थळांच्या प्रकृतीप्रमाणे लेख द्यावेत असे मला वाटते. नाहीतर ते फसण्याची शक्यता अधिक.
मात्र अभ्यासू आणि जिज्ञासू सदस्य सगळीकडे आहेत असे मी कोल्हटकर यांना नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. असे अनेक सदस्य हे आपल्या पसंतीच्या संकेतस्थळांवर लिहीत असतात. किंबहुना अशा सर्व सदस्यांपर्यंत लेख पोहोचावा यासाठीच लेखक लिहीत असतात असे वाटते. जर उत्तम लेखकांचे लेख आपल्याच एकाच ठिकाणी प्रसिद्ध व्हावे असे वाटत असले तर अशा संकेतस्थळांनी सदस्यांना स्वतःकडे "रीटेन" करण्याला महत्त्व दिले पाहिजे.
सदस्यांना बांधून ठेवणे
चित्रा यांचे मत चर्चेशी जुळेल याचा अंदाज होताच.
सहमत आहे. आपण उपक्रमावर गेले अनेक महिने लिहित नाही. काही विशेष कारण तर नाही? (कृपया, प्रश्न खोडसाळ नाही याची नोंद घ्यावी. इतर संकेतस्थळांवर होणारे वाद उपक्रमाला शिक्षा देणारे नसावे यावर तुमचीही सहमती असेलच पण उपक्रमावरच लिहू नये असे तर काही झाले आहे का? उत्तर वैयक्तिक असल्यास प्रश्न बाद समजावा.)
वैयक्तिक नाही
वेळ मिळत नाही आणि उपक्रमावर प्रसिद्ध करण्यासारखे स्वतंत्र लेख मी हल्ली लिहीलेले नाहीत. मात्र असे असले तरी उपक्रमावर त्यामानाने प्रतिसादही कमी दिले जाण्याची थोडी वेगळी कारणे आहेत. ही कारणे सगळ्याच संकेतस्थळांवर थोड्याफार प्रमाणात तशीच आहेत.
१. उपक्रमावर प्रसिद्ध होणारे अनेक लेख आणि वादही एकाच पद्धतीचे होऊ लागले आहेत.
२. काही चांगल्या लेखकांनी सतत होणार्या मानहानीमुळे, बुद्धीवरून केलेल्या टीकेमुळे उपक्रम सोडून दिले आहे. काही सदस्य आपल्या इच्छेने गेले असतील, पण काहींना टिकवता आले असते. हे टिकवण्याची इच्छा मला कोणातच फारशी दिसत नाही. सदस्यांमधली 'डायवर्सिटी' नकोच असल्यासारखे वाटते. मला इथे अदृष्य चाळण असल्यासारखी वाटते. जशी शाळा-कॉलेजांत चाळण असते, त्यातून विशिष्ट परसेंटेज असलेली मुले तेवढी घेतली जातात तसे वाटते. हे व्हायला माझा काहीच नकार नाही, पण अशा चाळणीतून प्रवेश मिळून मग त्यातील सदस्यांना इतरांच्या बुद्धीचा शाब्दिक उद्धार करण्यास माझा पाठिंबा नाही. उपक्रमींनी आणि उपक्रमाने असल्या शाळकरी वागण्यातून बाहेर यावे असे वाटते.
३. जेवढी उपद्रवक्षमता जास्त, तेवढा अधिक मान असे मराठी संकेतस्थळांवर अनेकदा दिसते. बाहेर कॉर्पोरेट जगात बर्याचदा असेच दिसत असते, हे समजून घेण्यासाठी मुद्दाम एखाद्या संकेतस्थळाकडे येण्याची गरज नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे इतरांची थेट त्यांच्या तोंडावर मानहानी करता येणे असा अर्थ लावल्याने कोणताही वाद दुसर्या पक्षाची बुद्धी कमी असण्यावर किंवा वाक्ताडनावर संपतो. म्हणून अंत माहिती असलेल्या या वादांमध्ये घालवण्याइतका वेळ माझ्याकडे सध्या नाही.
प्रति
हे काही काळापुरते झाले होते पण सध्या उपक्रमाचे पहिलेच पान पाहिले तर संजय, कोल्हटकर, गानू, नानावटींचे अतिशय सुरेख लेख दिसतील. तेव्हा सुदिन आले आहेत यावर थोडासा विश्वास ठेवावा. ;-)
अधोरेखित सोडता याच्याशी सहमती आहे. प्रयत्न करायचे झाल्यास ते सर्वांनी मिळून केले पाहिजेत. बरेचदा "टाइम आउट" घ्या असे सांगूनही सदस्य ऐकत नाहीत. प्रकरण चिघळवत बसतात. मला आठवते त्याप्रमाणे मी मागे कधीतरी चित्रा यांनाही टाइम आउट घेण्याबद्दल सुचवले होते. त्या प्रकरण चिघळवत नाहीत हे माहित असतानासुद्धा तेव्हा कोणाला इच्छा नाही हे खरे नाही. प्रयत्न वाढवायला हवेत आणि हे प्रयत्न कोणा एकाचे नाही तर सर्वांचे हवे हे खरे आहे.
वेळ नसणे समजू शकते. बर्याचदा अशावेळी "मी कटते. तुम्ही घाला वाद." सांगून कटावे लागते आणि तसे करणे बरे दिसते.
असो. हा स्वतंत्र चर्चेचा विषय असावा पण यावर स्वतंत्र चर्चा करावी असा पेशन्स माझ्याकडेही नाही हे खरेच आहे.
प्रकृतीप्रमाणे वावरदेखील
संकेतस्थळांच्या प्रकृतीप्रमाणे लेख द्यावेत ह्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळेच 'त्या मोरयाची कृपा' ही चर्चा उपक्रमावर आहे आणि 'एक शंका' इतरत्र. अभ्यासू आणि जिज्ञासू सदस्य सगळीकडे आहेत हेही खरेच. पण संकेतस्थळाच्या प्रकृतीप्रमाणे त्यांचा वावर असतो.
दुसरे म्हणजे संकेतस्थळांनी सदस्यांना स्वतःकडे रिटेन करण्याला महत्त्व देताना संकेतस्थळाची उद्दिष्ट्ये विसरायला नको. संकेतस्थळांनी रिटेन करायला पाहिजे असे आपण म्हणतो तेव्हा त्यात फक्त किंवा संपादक मंडळ ह्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा नको.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
एक लेख अनेक संस्थळावर टाकणे
उपक्रमच्या वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेतल्यास एक लेख अनेक संस्थळावर टाकणे हे उपक्रमीना रूचत नाही असे दिसते. पुढे काळजी घेईन. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
सगळ्याच नाही.
सगळ्याच उपक्रमींना रुचत नाही असे नाही. मला अनेक ठिकाणी लेख टाकणे योग्य वाटते. वाचकवर्ग निराळा असतो, चर्चांचा पोत ही वेगळा असतो असे वाटते. सगळेच लोक सर्वत्र सभासद असतात असेही नाहीये. लेखकाच्या आवडत्या विषयावर वेगवेगळ्या प्रकारे झालेली चर्चा निरनिराळे पैलू प्रकाशात आणू शकते. तुमचे लेख अतिशय अभ्यासपूर्ण असतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे उत्तमच आहे.
त्यामुळे तुम्ही अनेक ठिकाणी लेख टाकणे योग्यच आहे असे माझे मत आहे.
तसाही हा लेख बहुदा तुम्ही मायबोली वर टाकला नाहीये.
फार तर 'वेगवेगळ्या कालखंडात लेख प्रसृत केले' अजूनच चांगले! :)
-निनाद
+१
+१ माझेही मत निनादसारखेच आहे.
तेव्हा मतमतांतरे ही असायचीच. तुम्हाला एकच लेख विविध संस्थळांवर टाकून अधिक माहिती किंवा विविध मते मिळतील असे वाटत असेल तर तसे जरूर करा.
ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?
लेखकाचे चिल्लरीकरण
मते मिळतील पण लेखकाचे चिल्लरीकरण होईल. त्यामुळे किमान चांगल्या लेखकांनी विविध संस्थळांवर लेख टाकू नये.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
एक मुद्दा
समजा लेखक गौण असून लेखन महत्वाचे अशी भुमिकेतुन पाहिल्यास मिळणारा प्रतिसाद हा अजमावयाचा असल्यास एकच लेख विविध चर्चा समुहात येणे चांगले नाही काय? आपला लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावा असे बहुसंख्य लेखकांना वाटते. तोच लेख इतर संकेतस्थळावर आल्यास ज्याने वाचला असेल त्याला न वाचण्याची मुभा आहेच. कदाचित येणार्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असल्याने मूळ लेखापेक्षा प्रतिक्रियांचाच आनंद घेता येतो. संकेतस्थळांच्या प्रकृतीनुसार प्रतिक्रियेत फरक असणारच. वाचकांच्या मनस्थितीवर॑ देखील प्रतिक्रिया अवलंबुन असतातच की.
एखादी गोष्ट सर्वत्र/ सहज उपलब्ध झाली कि ती चिल्लर होते काय? आमची कोठेही शाखा नाही असे म्हणण्यात असलेला गुणवत्तेचा अहंभाव हा खर तर तुच्छतावादाचा वास येणारा असतो. आमची सर्वत्र शाखा झाल्याने पाणी घालून गुणवत्ता पातळ झाली असल्याचा संशय येतो. कालानुरुप खर तर आता अनेक ठिकाणी असण्यातच शहाण पण आहे हे मार्केटिंग वाल्यांनी चांगलेच ओळखले आहे.
असो असे लेख टाकल्याने लेखाचे मार्केटिंग होते काय? असा मुद्दा घेउन परत तीच चर्चा करायला हवी काय?
प्रकाश घाटपांडे
जे आहे ते असे आहे
किमान चांगल्या लेखकांनी विविध संस्थळांवर लेख टाकू नये असे माझे मत आहे. फक्त चांगल्या लेखकांचे चिल्लरीकरण होऊ नये असे मला वाटते. (चिल्लरीकरण म्हणा गुगळीकरण/ओकीकरण म्हणा. हवा तो शब्द निवडा.) चांगल्या लेखकांकडे वाचक स्वतःहून येतात. सुमार, टुकार, रद्दी लेखकांनी दहा ठिकाणी जाऊन लेख टाकले तरी कुणी वाचत नाही. त्यामुळे प्रश्नच मिटला.
माझे अनेक परिचित मित्र उपक्रमावर वाचनमात्र असतात. आणि त्यांना यनावाला, तुम्ही आणि आधीच्या माझ्या प्रतिसादातले सगळे चांगले लेखक माहीत आहेत. असो. तुच्छतावाद म्हणा किंवा काही. जे आहे ते असे आहे. एक दर्जेदार फोरम म्हणून उपक्रमाची ओळख आहे. ती तशीच टिकून राहावी म्हणून प्रयत्न करणे चुकीचे आहे काय? इथे कुणी कुणाला इतरत्र आपले लेखन प्रकाशित करण्यापासून थांबवू शकत नाही. फक्त अपेक्षा व्यक्त करू शकतो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
तुमचे प्रतिसाद तरी निदान त्याच छापाचे आहेत.
http://mr.upakram.org/node/3619#comment-62395 इथे तुम्ही म्हणताय "सहमत. पण उपक्रम काही त्याच छापाचा गणपती नाही." पण पुन्हा वरील प्रतिसादात "चिल्लरीकरण म्हणा गुगळीकरण/ओकीकरण म्हणा" असे वाक्य टाकून इतर संस्थळांवर जसे व्यक्तिगत वार केले जातात तशीच कृती करून उपक्रमलाही त्याच छापाचा गणपती बनवित आहात. हे तरी योग्य आहे का?
राहता राहिला मूळ प्रश्न की एकच लेख एकाहून अधिक संस्थळांवर असावा काय?
त्याचे उत्तर असे की जोवर कुठलेही संस्थळ लेख प्रकाशित करण्याचे मानधन (आर्थिक मोबदला) लेखकाला देत नाही तोवर त्या ठिकाणी लेखकाने पूर्वप्रकाशित लेख टाकण्यास काहीच हरकत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. जेव्हा असे मानधन देण्याची पद्धत सुरू होईल तेव्हा आपोआप मानधनाची रक्कम अदा करतेवेळी संस्थळ लेखकाकडून त्या लेखाचे स्वामित्वहक्क विकत घेत असल्याचा करार करून घेईल आणि लेखक त्या करारातील अटींचा भंग करू शकणार नाही. लेखकाने जर असा भंग केला तर तो आर्थिक दंडास पात्र ठरेल.
सध्या तरी आर्थिक मोबदला मिळत नसल्याने व असले कुठलेही कायदेशीर करारमदार होत नसल्याने लेखकाने कितीही ठिकाणी लेख प्रकाशित केला तरी त्यावर कारवाई होत नाही. तेव्हा अशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे?
मुद्दे विचार करण्यासारखे
सगळे मुद्दे विचार करण्यासारखेच आहेत. पण एकाच छापाचे गणपती असावेत की नसावेत?
तुम्ही मला आरसा दाखवला आहे. माझे डोळे उघडले आहेत. क्षमस्व.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
म्हणजे काय्?
म्हणजे नक्की काय् होईल? समजले नाही.
-Nile
विविध संकेतस्थळांवर लेख टाकणे
विविध संकेतस्थळांवर एकच लेख टाकण्याला ना नाही. विविध संकेतस्थळांवर एकाचवेळी तो लेख टाकण्याला असहमती आहे. विशेषतः विविध संकेतस्थळांवर तेच तेच वाचक असल्याने मतांची विभागणी होते. त्यापेक्षा एका संकेतस्थळावर लेख टाकून मते जमवणे आणि कालांतराने त्या लेखाचा (पूर्वप्रकाशित) संदर्भ देऊन इतरत्र मते जमवली तर नवे वाचक मूळ चर्चा आणि त्यावेळी दिलेली मते/ प्रतिसाद हे वाचून त्यापेक्षा वेगळे किंवा अपडेटेड प्रतिसाद देऊ शकतात.
यावरून एक माझ्या निदर्शनास आले. आंतरजालावरील लेखक कंपनीची विशिष्ट संकेतस्थळांशी बांधिलकी नसते. जो स्वागत करेल मी त्याचा मेहमान ही प्रवृत्ती दिसते. ती फ्री लान्सिंग वगैरेपेक्षा वेगळी आहे. बहुधा त्यामुळेच आंतरजालावर गंभीर लिखाण किंवा चांगल्या प्रतिष्ठित लेखकांची वानवा दिसते. असो. यांत दोष सर्वस्वी लेखक कंपूचा आहे असे नाही. संकेतस्थळानेही विशिष्ट लेखन करणार्या लेखकांना प्रोत्साहन द्यायला हवे. हा बहुधा वेगळ्या चर्चेचा विषय आहे.
थोडेसे अवांतरः अनेक संकेतस्थळांचे दिवाळी अंक निघतात. उद्या एखाद्या लेखकाने माझा लेख अनेक वाचकांनी वाचायला हवा म्हणून तो प्रत्येक दिवाळी अंकात छापून आला पाहिजे असा हट्ट धरला तर संकेतस्थळे तोच लेख छापतील काय? समजा लेखकाने आपण हाच लेख अमुक तमुक संकेतस्थळालाही पाठवला आहे याची वाच्यताच केली नाही आणि तीन चार संकेतस्थळांनी तोच लेख आपापल्या दिवाळी अंकात छापला तर चालेल काय? असे झालेच तर संकेतस्थळे बहुधा त्या लेखकावर "यंत्रणेचा गैरफायदा घेणारा" असा ठपका ठेवतील आणि ऍक्शन घेतील. पण याची कल्पना असल्याने लेखक कंपनी असे करताना दिसत नाही. संकेतस्थळाकडे दिवाळीसाठी काय सुपूर्त करावे आणि काय नाही याचा कॉमन सेन्स त्यांना असतो... तर मग इतर वेळेस काय होते?
वरदा यांनी मध्यंतरी मनोगत दिवाळी अंकात प्रसिद्ध केलेले लेख कालांतराने उपक्रमावर प्रसिद्ध केले. हा त्यांचा निर्णय मला योग्य वाटतो. इतर अनेक लेखकही ही संहिता पाळताना दिसतात.
??
एकीकडे उपक्रमाचे धोरण म्हणते.
दुसरीकडे
थोडक्यात फक्त उपक्रमाकरताच लेख लिहावेत आणि द्यावेत अन्यथा ते उपक्रमावर देऊ नयेत् असे म्हणायचे आहे का?
कोणत्या संस्थळावर कोणत्या लेखाविषयी जास्त मते मिळतील हे सुस्पष्ट नाही. दोन संस्थळांवर दोन वेगळ्या प्रकारच्या चर्चा/वेगळे मतप्रदर्शन एकाच धाग्यावर घडणे नविन नाही. त्यामुळे अशा वेळी एकच धागा दोन्ही कडे टाकण्यात काही गैर् नाही.
अनेक गोष्टींना वेळेचा संदर्भ असतो. कालांतराने त्यावर चर्चा करण्यास इच्छुक असतीलच् असे नाही. शिवाय एका ठिकाणी केलेल्या चर्चेचा संदर्भ दुसरीकडे देऊन फक्त चर्चा करण्यापेक्षा दोन्ही ठिकाणी चर्चा दिल्यास काय् फरक पडतो?
वर्षातुन एकदा येणारा दिवाळी अंक आणी रोज खुले असणारे संकेतस्थळ यात फरक आहे. खास दिवाळी अंकाला म्हणून लिहलेला लेख द्यावा ही अपेक्षा तिथे ठीक आहे.
-Nile
उपक्रमाचे धोरण
नव्हे तसे म्हणायचे नाही पण दोन वाक्ये जोडून वाट्टेल ते अर्थ काढू नये असे मात्र म्हणायचे आहे. :-)
मी उपक्रमाचे धोरण लिहिलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी. वर म्हटल्याप्रमाणे लेखकांच्या वागण्यामुळे उपक्रमाचे धोरण कडकपणे राबवले जात नाही हे सर्वांच्या लक्षात एव्हाना आले असावे.
एक धागा एकाच वेळी अनेक संकेतस्थळांवर टाकणे मला गैर वाटते. (यातून काही धागे निश्चितच वगळता येतील.) नियाच्या लेखाचा संदर्भ दिला तर ऐसीवर प्रतिसाद देणारे ऋषीकेश हे सदस्य उपक्रमाचे सदस्यही आहेत. त्यांनी तेथे मत दिल्याने मतांची विभागणी झाली.
हम्म! ही एक्स्क्यूज नेहमीच दिली जाते. वेळेचा संदर्भ असणारे धागे निश्चितच वगळता येतील. तसेही चर्चा आणि लेख यांत फरक असू शकतो. सर्वच चर्चा आणि लेख काही वेळेच्या संदर्भाने नसतात. चर्चेत मत आवश्यक असते तर लेख केवळ "वा! वा! छान छान" अशा प्रतिसादांनी तरू शकतात. लेखकाला पाठीच थोपटून हव्या असतील तर मतांची पर्वा करण्याची गरज वाटत नाही. दोन्ही ठिकाणी चर्चा दिल्याचे परिणाम संकेतस्थळाची बॅक अप साइट बनणे हा असतो.
असे मला वाटत नाही. इथे प्रश्न माध्यमाचा नसून मानसिकतेचा आहे.
?
दोन्ही वाक्यांचा अर्थ काढल्यावर अजून कोणते पर्याय दिसत असतील तर ते मला सांगावे.
पण् त्यानुसार(फक्त इथे लिहलेल्या वाक्याशी निगडीत) वागावे असे तुम्ही म्हणताहात की नाही?
गैर काय् आहे हे (कोणीही) सांगावे. मला तरी अजून गैर काय् आहे हे कळले नाही.
कसल्या मतांची विभागणी झाली? इथे मत दिले आणि तिथे मत दिले म्हणजे फक्त प्रतिसादांची विभागणी होते, मतांची नाही. ऋषिकेशला जर वाटलं की त्याचे मत उपक्रमावर द्यायला हवे तर तो देईल, त्याला वाटलं ते मिसळपावर द्यावं तर तो तिथे देईल. मी तिन्ही ठिकाणी सभासद आहे, सदर लेख तिन्ही ठिकाणी आहे, मी कुठे मत दिले तर कशी विभागणी होईल आणि होणार नाही हे सांगावे.
वगळायचं का नाही याचा अधिकार कोणाला आहे?
लेखांवर चर्चा होऊच शकत नाही असा काही नियम किंवा धोरण आहे का?
काहीही. लेखामध्येही अनेक मुद्द्यांवर चर्चा घडुन येऊ शकते आणि येते. याची उदाहरणं रोज सापडतील.
हा हास्यास्पद युक्तिवाद आहे. बॅक अप साईटवर प्रतिसादांची अपेक्षा कोणी करत नाही. ज्या अर्थी एखाद्या संस्थळावर लेखक लेख/चर्चा देतो आहे त्या अर्थी तिथल्या प्रतिसादांची अपेक्षा/आशा त्याला आहे.
-Nile
काही सुसंगत प्रश्नांची उत्तरे
दोन्ही वाक्ये जोडणे हा खोडसाळपणा आहे असे मला म्हणायचे आहे कारण पहिले वाक्य माझे नाही. ती संकेतस्थळाची पॉलिसी आहे हे मी स्पष्ट केले आहे.
नाही. एकावेळी एकच लेख सर्वत्र टाकण्यास माझी असहमती आहे असे मी म्हणत आहे. ते माझे मत परंतु उपक्रमाने आपले धोरण पाळण्याचे ठरवले तर मी त्या विरुद्ध नाही.
सॉरी! मला वेळ नाही. गैर आहे हे माझे मत वर समजावले आहे. तुम्हाला कळत नसेल तर मी दिलगीर आहे.
सध्या तसे दिलेले नसल्याने विभागणी झाली हे सत्य आहे. काय होईल आणि काय नाही याचा विचार सध्या गैरलागू आहे.
असे होऊ शकते असे म्हटले आहे कारण असे झाल्याची उदाहरणे मिळतात. असे कधीच होतच नाही असे तुमचे म्हणणे असेल तर पुढे बोलता येईल.
बॅक अपसाईट होणे हे लेखकाशी संबंधित नसून साईटवर होणारा परिणाम आहे.
बायदवे, एकेक वाक्य उद्धृत करून वाद घालणे मला बालिश वाटते आणि तसे वाद घालण्याचा मला कंटाळा येतो. तुमच्या प्रश्नांमध्ये काहीच "मीट" नसल्याने मी यापुढे उत्तरे देत बसणार नाही. तुमचे प्रश्न इतरांना अवश्य विचारावे. मी माझे मत मांडले आहे. ते घ्यावे किंवा न घ्यावे ही तुमची मर्जी. वाक्ये तोडून तोडून चुरा करत बसण्यासाठी वेळ नाही. क्षमस्व!
काहीही!
पहिले वाक्य धोरण आहे तर दुसरे तुमचे मत आहे. दोन्ही इथे प्रतिसादात तुम्ही तुमच्या भुमिकेसाठी दिले आहे. त्या अनुशंगाने उपस्थित केलेला मुद्दा खोडसाळ कसा? असो. तुम्हाला बहुदा दोघांचा संबंध कळत नसावा.
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा द्या. हा मुद्दा पूर्वीही अनेकदा चर्चिला गेला आहे, त्याचा दुवा दिला तरी चालेल.
गैर का आहे हे तुम्ही समजावलेले नाही. समजावल्यावर मला कळते की नाही ते पाहू.
बरं मग? लेखकाने का त्याचा विचार करावा? साईटच्या धोरणात लेखक आहे ना, मग झालं तर.
तुमचे मुद्देच हास्यास्पद आहेत. मुद्द्यांमध्ये काही मीट नाही हे दाखवण्याकरता मुद्द्याचे खंडन केले आहे. खंडन करताना एक वाक्य मुद्द्याला पुरले. हजार वाक्यं असली म्हणजे लगेच मुद्दे प्रगल्भ होत नाहीत.
असो. तुमच्याकडे सशक्त मुद्देच नाहीत असे माझे मत झाले आहे. तेव्हा मीही थांबतो.
-Nile
धन्यवाद
तुम्हाला माझी मते काहीही वाटल्याने एकमेकांचा वेळ वाया न घालवणे बरे! यापुढेही सर्वत्र आणि नेहमीच मी काहीही लिहिते हे समजून घेऊन आपण मला काही विचारण्याच्या भानगडीत पडू नये ही विनंती. उपकार होतील. आपण करत बसा चुरा! आय ऍम नॉट इंटरेस्टेड!
आडात नाही ते पोहऱ्यात कुठून
सहमत. असे केल्याने चांगले लिखाण येणार, अचानक वाढणार आहे काय? आणि आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ऋषिकेष आणि निनाद यांच्याशी सहमत.
मागे चंद्रशेखर फक्त उपक्रमावर लिहायचे. (काही कारणाने त्यांना इतरत्र लिहू नये असे वाटले होते असे आठवते, खात्री नाही) पण सद्ध्या ते सर्वत्र लेख प्रकाशित करत आहेत हे पाहून बरे वाटले.
एकाच छापाचे गणपती व्हायला फक्त लेखच नाही तर प्रतिसादही तसेच यायला हवेत. संस्थळांवर नजर टाकली तर यातील वैविध्य नुसते जाणवण्यासारखे नाही तर अनेकदा ठळक असते. तेव्हा ही काळजी करण्याचे कारण नाही.
चंद्रशेखर यांनी इतर कोणाचेही न ऐकता त्यांना जे योग्य वाटेल ते करावे असे मला वाटते. खरं तर इतिहासाबद्दलचे त्यांचे रंजक लेख सर्वत्र प्रकाशित व्हावेत असेच असतात.
-Nile
+१
असे मत व्यक्त करणार्या सर्वांशी सहमती आहे.
किंबहुना छापील माध्यमात जे स्वातंत्र्य लेखक आणि वाचकांना नाही ते आंतरजालावर आहे. 'सामना'त लिहीत असाल तर 'चित्रलेखा'त तेच छापता येणार नाही आणि 'मटा'तले लेख वाचायला 'मटा'च घ्यावा लागेल. गंभीर लेखांवर हलकीफुलकी टिप्पणी उपक्रमावर करता येणार नाहीच् असं नाही, पण अशा प्रतिसादांचं स्वागत उपक्रमावर होत नाही. हे स्वातंत्र्य इतर चार संस्थळांवर मिळतं. एक लेख चार निरनिराळ्या प्रकृतीच्या संस्थळांवर टाकण्याची मुभा असेल तर लेखक आणि वाचकांना आपापल्या प्रकृतीचे/ची एक किंवा जास्त संस्थळं निवडता येतात.
घाटपांडे काकांचं मतही "वेगवेगळ्या लोकांची मतं आजमावता येतात" मला पटतं. अशा मतांचा अभ्यास अनेकांना रोचक वाटतो.
प्रत्येक संस्थळाची निरनिराळी प्रकृती लेखक आणि वाचक-प्रतिसादकांमुळे बनते. मुळात संस्थळंच लेखक आणि वाचक-प्रतिसादकांमुळे बनतात. या लोकांना स्वातंत्र्य नसेल तर आंतरजालावर त्यांनी लिहावंच का? आपापले ब्लॉग्ज उघडणं आणि मराठी ब्लॉग-विश्व अशा सुविधाही उपलब्ध आहेतच की!
उपक्रमावर काय धोरण असावं हा प्रश्न उपक्रम मालकांचा आहे. धोरणाचा कितपत आदर करावा हा प्रश्न उपक्रम प्रशासनाचा आहे.
गोषवारा
एका साइटीवर लेख टाकल्यावर तो अन्य कुठेच टाकू नये असे कुणाचेच मत दिसत नाही. पण एकच लेख सगळीकडे चिकवटण्याआधी लेखकांनी थोडा वेळ जाऊ द्यावा आणि थोडा कॉमनसेन्स वापरावा असा ह्या चर्चेचा मतितार्थ म्हणता येईल. मी त्याच्याशी सहमत आहे.
जबाबदारी कोणाची
एकंदरीत चर्चेत संस्थळांचे एक छापाचे गणपती होऊ नयेत ही जबाबदारी त्यावर लेखन करणाऱ्या लेखकांवर टाकण्यात येते आहे असं दिसतंय. संपादक आणि व्यवस्थापकांची जबाबदारी काय असा प्रश्न त्यामुळे पडतो. बहुतेक संस्थळांवर त्यांचे फक्त अधिकार लिहिलेले असतात. काही ठिकाणी ते जाहीर असतात काही ठिकाणी ते अलिखित असतात. काही ठिकाणी संपादक कोण याचाच पत्ता नसतो. अशा अनागोंदीच्या कारभारातही लेखक लिहितात, आणि संस्थळ चालू रहातं याबद्दल लेखकांचे आभार मानण्याऐवजी त्यांना उपदेशाचे डोस का पाजले जातात असाही प्रश्न पडतो.
माझ्या मते जोपर्यंत संस्थळं लेखकाला मानधन वगैरे देत नाहीत, तोपर्यंत लेखकाने तेच लेखन इतर कुठे टाकलं आहे का, याबद्दल संस्थळ व्यवस्थापकांनी काही तक्रार करू नये. (तक्रार करणारे संपादक म्हणून तक्रार करत नाहीत, तर सदस्य म्हणून करतात, ही पळवाटही वापरू नये... ) धोरण म्हणून अर्थातच संस्थळ मालकांना हवं ते राबवता येतंच. पण 'आम्ही आमचं धोरण राबवत नाही तेव्हा तुम्हीच विचार करून त्याप्रमाणे वागा' वगैरे विनंत्या करणं म्हणजे दोन्ही डगरींवर पाय ठेवण्यासारखं वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
चूक
उलट जोपर्यंत लेखकांना लेख टाकण्यासाठी पैसे आकारले जात नाहीत तोपर्यंत त्यांनी 'तक्रार करू नये' वगैरे माज करू नये.
एक गोष्ट लक्षात घ्या, संकेतस्थळ मालक पैसे खर्च करतात सदस्य नाहीत. तेव्हा त्यांना जास्त लाडावून ठेऊ नये हे माझे मत. सध्या बसले असले तरी उद्या तुमचे संकेतस्थळही चालू लागल्यास तुम्हीही हेच धोरण राबवाल असा मला विश्वास वाटतो.
बरोबर
बरोबर. बहुधा साइट बसली म्हणून दुसऱ्या साइटवर ट्रोलिंग करायला वेळ मिळतो आहे असे कुणी म्हटल्यास त्यात वावगे ते काय? इथे जाहिराती करून काही फायदा होईल असेही वाटत नाही. मुळात त्यांचे बसलेले संकेतस्थळ एकाच छापाचा गणपती असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. असो. प्रत्येक मंडळाला आपला गणपती प्यारा. एकाच छापाचा असला म्हणून काय झाले! असो. इकडे ट्रोलिंग करण्यापेक्षा त्यांनी आपला गणपती सांभाळावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गैरसमज नसावा
लेखकांवर संपूर्ण जबाबदारी टाकली असा कृपया गैरसमज पसरवू नये. येथे जे लेखक लिहितात त्यांचे सदस्य आभारीच आहेत. लेखकांकडून वाचकांनी अपेक्षा करणेही संपूर्णतः रास्त आहे. चंद्रशेखर हे आमचे आवडते लेखक असल्याने त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणे अनेकांना रास्त वाटते.
यांत सर्वच संकेतस्थळे आली. :-) त्यामुळे वरील ओळी खेदजनक वाटल्या. विशेषतः आपल्याकडून. बाकी, उपदेशाचे डोस फक्त व्यवस्थापक आणि संपादकांना पाजावेत असाही कोठे लिखित किंवा अलिखित नियम नाही.
'आम्ही धोरण राबवत नाही म्हणून तुम्हीही विचार न करता वागा' असे म्हणण्यापेक्षा 'आम्ही धोरण काटेकोरपणे राबवत नसलो तरी तुम्ही विचार करून वागा' असे म्हणणे बरे दिसते. शेवटी, ज्याची त्याची समज असते.
बाकी, तेच तेच लिखाण येते ही तक्रार ऐसी अक्षरेवर काही "सामान्य सदस्यांनी" केली होती. त्यांना आपला 'संकेतस्थळे मानधन देत नसतील..." वगैरे प्रतिसाद वाचून अनेक गोष्टी उघड होतील आणि लक्षात येतील अशी आशा करते.
आपला तो बाळ्या
वरील काही प्रतिसादांमध्ये 'आपला तो बाळ्या...' ही वृत्ती दिसली आणि खेद झाला. मूळ चर्चाविषयांपेक्षा आपण ज्या ज्या संकेतस्थळाचे प्रत्यक्ष किंवा पडद्याआडून पुष्टीकरण करतो आहोत त्या संकेतस्थळांची, त्यांच्या धोरणांची भलावण करणे हे धोरण मूळ चर्चा तर भरकटत नेतेच, शिवाय कंपूबाजीलाही खतपाणी घालते, असे मला वाटते.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा
लेखकाचा पक्ष
या विषयावरील चर्चा एवढी रंगेल असे मला वाटले नव्ह्ते. इतक्या प्रकारची आणि वैविध्यपूर्ण मते येथे प्रदर्शित केली गेली आहेत की लेखकाची बाजू मांडण्याचीही गरज आहे असे मला वाटल्याने हा प्रतिसाद लिहित आहे. प्रियालीताईंनी मला आवडता लेखक बनवल्याने त्यांचे प्रथम आभार.
1. माझे बहुतांशी लेख मी माझ्या अनुदिनींवर लिहित असतो. ज्या वेळेस मला असे जाणवते की आपल्याजवळ काहीतरी नवीन माहिती किंवा चोखंदळ वाचकांना सांगण्यासारखे आहे तेंव्हाच मी सहसा उपक्रम सारख्या संकेतस्थळांकडे येतो.
2. बहुतेक सद्स्य एक गोष्ट विसरत आहेत की उपक्रम सारख्या संकेतस्थळांवर सदस्यांपेक्षा इतर वाचकांची संख्या बरीच जास्त असते. उदाहरणार्थ माझ्या निया वरच्या लेखांची झालेली वाचने बघता येतील
मिसळपाव - 1043 वाचने
उपक्रम- 439 वाचने
ऐसी अक्षरे - वाचक संख्या दिलेली नाही.
3. एक लेखक म्हणून साहजिकच आपला लेख जास्तीत जास्त लोकांनी वाचावा अशी माझी इच्छा असते. जर लेख एकाच संकेत स्थळावर टाकायचा असे ठरवले तर कोणते संकेतस्थळ निवडावे हा विकल्प अगदी बाळबोध आहे.
4. वरील तिन्ही संकेत स्थळांवर आलेले प्रतिसाद, चर्चा ही अतिशय निराळ्या अंगांनी झालेली आहे. माझी उपक्रमींना विनंती की त्यांनी या तिन्ही संकेत स्थळांवरील चर्चा जरूर वाचाव्या. म्हणजे फरक लक्षात येऊ शकेल.
5. लेख टाकताना तो कालफरक (स्टॅगर) करून टाकावा अशी सूचना आहे. परंतु लेख लिहिल्यानंतर त्याचा रिलेव्हन्स हा काही थोडा कालच मनात राहू शकतो. उदाहरणार्थ ऐसी अक्षरे मधील वाचकांच्या शंका आणखी 6 महिन्यांनी मला सोडवता येतीलच असे नाही. त्याचप्रमाणे उपक्रमवर अशी टीका झालेली मी वाचलेली आहे की दुसर्या संकेत स्थळावरील शिळे लेख टाकण्याचे काय प्रयोजन?
थोडक्यात म्हणजे मी बर्यापैकी गोंधळून गेलेलो आहे. त्यामुळे या चर्चेचे फलित काय? व माझ्यासारख्या लेखकाने भविष्यात काय करावे हा प्रश्न अनुत्तरितच राहिल्यासारखा वाटतो आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
अनेक ठिकाणी लेख टाकणे योग्यच आहे.
माझ्यासारख्या लेखकाने भविष्यात काय करावे हा प्रश्न अनुत्तरितच राहिल्यासारखा वाटतो आहे.
लेखकाच्या आवडत्या विषयावर वेगवेगळ्या प्रकारे झालेली चर्चा निरनिराळे पैलू प्रकाशात आणू शकते. तुमचे लेख अतिशय अभ्यासपूर्ण असतात. त्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे उत्तमच आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी लेख टाकणे योग्यच आहे, असे माझे मत आहे. एकाचवेळी टाकलेत तरी हरकत नाहीच! :)
-निनाद
+२
त्यामुळे अनेक ठिकाणी लेख टाकणे योग्यच आहे, असे माझे मत आहे. एकाचवेळी टाकलेत तरी हरकत नाहीच!
+२. किंबहुना एकाच वेळी टाकावेत.
खाली प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे मीही अनेक संस्थळांवर फिरत नाही / फिरणे शक्य नाही. हजारोंनी असलेल्या संस्थळांपैकी, बर्याचशा संस्थळांचा, ब्लॉग्सचा (जसे चंद्रशेखर यांचा उत्तम ब्लॉग) मला उपलब्ध असणार्या वेळेत (म्हणजे हाफिसातून :-) ) ऍक्सेस नाही. अश्यावेळी अनेक ठिकाणी लेख प्रसिद्ध झाल्याशिवाय मला लेख प्रसिद्ध झालेला कदाचित कळणारही नाही.
ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?
धागा उघडणे म्हणजे वाचणे नोहे
धागा उघडणे म्हणजे धागा वाचणे असे गृहीत धरू नये. तसेच एकच सदस्य अनेकदा त्याच धाग्याला भेट देऊ शकतो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
बघा पटतं का
माझ्या बाबत बोलायचे तर प्रत्येक लेखकामागून चार संकेतस्थळे फिरणे मला शक्य नाही. म्हणूनच आपण जेव्हा ब्लॉगवर लेख टाकता तेव्हा तो येथे टाका हे आवर्जून सांगते. हेच संजय यांनाही हल्लीच सांगितले. जसे ५० जणांच्या ब्लॉगवर ५० फेर्या मारणे माझ्यासाठी प्रॅक्टिकल नाही तसेच ४ संकेतस्थळांवर मारणेही नाही. अर्थातच, ज्यांना शक्य आहे त्यांनी ते अवश्य करावे.
लेखाशी रिलेवन्स थोडाच काळ राहू शकतो याच्याशी सहमत आहे. त्यामुळे कथा, कविता आणि लेख यांना एका पारड्यात तोलता येईलच असे नाही. लेखासाठी ६ महिने हा अवधी मोठा वाटत असेल तर किती अवधी तुम्हाला ठीक वाटतो. ७ दिवस* कसा वाटतो? समजा, एखाद्या संस्थळावर तुम्ही लेख टाकला. त्यानिमित्ताने येणारे प्रश्न आणि शंका सात दिवसांत ओसरतात असे वाटले. त्या सात दिवसांत बहुधा शंकानिरसनाच्या निमित्ताने तुम्ही अधिक खोलवर माहिती गोळा कराल किंवा प्रतिसादांतून अधिक माहिती/ संदर्भ मिळवू शकाल. या माहितीचा वापर करून आणि भर घालून तुम्ही इतरत्र याच लेखाची नवी आवृत्ती प्रकाशित करू शकता. यामुळे दोन गोष्टी होतील. लेख शिळा वाटणार नाही, ज्या वाचकांनी आधी वाचला त्यांनाही अपडेट वाचण्याची इच्छा होईल आणि तुमचे लेखही सरस होतील.
भविष्यात काय करायचे या प्रश्नात गोंधळण्यासारखे काही नाही. शेवटी तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करालच. तरीही, अद्याप फोटो चढवणे वगैरे गोष्टी ज्या तुम्हाला सहज साध्य नाहीत त्या शिकून घेण्यापासून सुरुवात करता येईल.
का बुवा? तुम्हाला माहित नव्हते? :-)
* सात दिवस हे फक्त उदाहरण आहे. तुमचा रिलेवन्स किती काळ टिकतो हे तुम्हाला ठरवता येईल.
पूर्वीचेच मत परत
१. वेगवेगळ्या संकेतस्थळावर त्याच लेखावरचे प्रतिसाद वेगवेगळे असतात. काही आयडी फक्त उपक्रमावरच असतात/लिहितात त्यांचे मत इतरत्र कळत नाही. आणि याच्या उलटही.
२. लेख कालांतराने इतर संकेतस्थळांवर टाकण्यातली अडचण : नियामधील लाकडी पाट्या या नावाने सर्व संकेतस्थळावर लेख आला की तोच लेख आहे हे लगेच कळते. कालांतराने आला तर सदस्यांना/वाचकांना हा तोच लेख आहे हे कळणार नाही. आणि उगीचच उघडला जाईल.
नितिन थत्ते
एकच वाक्य लिहू इच्छितो
लेखकास योग्य वाटेल त्या सर्व ठिकाणी लिहायचे स्वातंत्र्य आहे.वाचकास ते वाचण्याचे (आणि न वाचण्याचे) पूर्ण स्वातंत्र्य आहे.
ज्यानी त्यानी आपापल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करण्यास हरकत नसावी, फक्त त्यात नाडिधाग्यांप्रमाणे समूह-अत्याचार्* होता कामा नये.
* कुणा एकट्याने आख्ख्या (विचारवंती?) समूहावर केलेला अत्याचार.
--मनोबा
माझे निरीक्षण
या चर्चेत लेखकाने एकापेक्षा अधिक संकेतस्थळांवर लेख टाकावे असे सुचवणारे सदस्य स्वतः आपले लेख एकाच संकेतस्थळावर प्रकाशित करताना दिसतात.
(उदा. अदिती यांचा सूर्य हा लेख) यावरून हे सल्ले फक्त इतरांसाठी आहेत हे कळले.
रोचक निरीक्षण
माझेही अजून एक निरीक्षण.
या चर्चेत एकापेक्षा अधिक संकेतस्थळांवर लेख टाकू नयेत असे सुचवणारे सदस्य स्वतः आपले प्रतिसाद एकाच संकेतस्थळावर प्रकाशित करताना दिसतात.
-Nile
आणखी एक निरीक्षण
बरोबर आहे. ज्यांना एक लेख सर्वत्र कॉपी-पेस्ट केलेला पटत नाही ते त्या लेखाला इतर संकेतस्थळांवर जाऊन प्रतिसाद देणार नाहीच.
या चर्चेत सर्व संकेतस्थळांवर लेख टाका असे सांगणारे सदस्यही त्या लेखाला अपवादात्मक परिस्थिती सोडून एकाच संकेतस्थळावर प्रतिसाद देतात. त्यांना आपले बहुमूल्य प्रतिसाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे असे वाटत नसावे.
डोन्ट सिंमप्लीफाय्!
"The mind sees what it chooses to see" रॉबर्ट लँगडन.
-Nile
दर्जा
कारण बाकीची संकेतस्थळे त्यांना लो ग्रेड वाटत असतील. स्नॉब्स कुठले!!
होय होय!
लो ग्रेड गोष्टी फार काळ टिकू नयेत हा थोर हेतूही असू शकतो त्यांचा. उच्चभ्रु समाजकल्याणकारी कुठले!!
-Nile
आवश्यकता
दुसर्या संस्थळाची आवश्यकताच पटलेली नसल्यास तेथे सदस्यत्वच घेतले जात नाही, तेथील एखादे लेखन आवडले तर खव/व्यनिद्वारे चर्चा करता येते. उदा., उपक्रमवर कोड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असताना कोड्यांविषयी चर्चा करण्यासाठी नव्या संस्थळाची आवश्यकताच नाही.
नावासकट उल्लेख झाल्यामुळे ...
प्रत्येकाला आपापल्या लिखाणावर हक्क असावा आणि इतरांनी ते लिखाण कुठे, किती ठिकाणी प्रसिद्ध करावं यासंदर्भात टिप्पणी केल्यास ती लेखकांना बंधनकारक असू नये (In other words लेखकांनी अशा प्रकारच्या व्यक्तिस्वातंत्र्याआड येणार्या मतांकडे दुर्लक्ष करावं) असं मला वाटतं. मी माझं लिखाण किती आणि कोण(-कोण)त्या संस्थळांवर प्रसिद्ध करावं हा माझा निर्णय असतो. असाच निर्णय घेण्याचा अधिकार सर्व लेखकांनी वापरावा.
ज्या संस्थळांना, विशेषतः सामान्य सदस्यांच्या*, व्यक्तीस्वातंत्र्य, लोकशाही इत्यादी मूल्यांबद्दल फार फिकीर नाही तिथे आपलं लिखाण प्रसिद्ध करावं हा निर्णय प्रत्येकाने घ्यावा.
*'सदस्य' असे सदस्यनाम नव्हे.
अवांतरः उपक्रमावर डार्क मॅटर, धूमकेतू असे खगोलीय आयडी पाहून मोगँबो खुष हुआ।
जाहीरात
ताई, लोकशाही वगैरेबद्दल बोलून उगी विषयापासून भरकटू नका. हास्यास्पद दिसतं. लोकशाही असलेलं कोणतंही मराठी संकेतस्थळ आज उपलब्ध नाही. तुमचंही नाही. आधी ज्या संकेतस्थळासाठी तुम्ही लिहित होता ते संकेतस्थळही लोकशाहीपासून दूर आहे. लोकशाहीच्या बाता मारून दुसर्या संकेतस्थळांना नावं ठेवली तर फक्त स्वस्त जाहीरात होते.
अवांतरः धन्यु! तुम्ही मोगँम्बो असाल तर मी मि. इंडिया बनतो लवकरच.