एकाच छापाचे गणपती

एकावेळी अनेक संकेतस्थळांवर लेख प्रकाशित करावा की नाही ह्यावर सदस्यांनी निया मधल्या लाकडी पाट्या या लेखात केलेली चर्चा येथे हलवली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. मूळ लेखातील श्री. अरविंद कोल्हटकर यांनी लिहिलेल्या प्रतिसादाचा आधार घेऊन आणि त्या अनुषंगाने आलेले उपप्रतिसाद या चर्चेत वाचता येतील.

हे माहितीपूर्ण लेख येथे आणि 'ऐसी अक्षरे'वरहि येतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे अधिक वाचन होईल हे आहेच, जी गोष्ट निश्चितच चांगली आहे. त्याबरोबरच दोन अनिष्ट गोष्टीहि होतील. असे जर मोठया प्रमाणात झाले तर अशा प्रकारची सर्व संस्थळे हे एकाच छापाचे गणपति होतील. अधिक मोठा तोटा म्हणजे अभ्यासू प्रतिक्रिया दोन ठिकाणी विभागल्या जातील आणि त्यामुळे काही द्विरुक्ति आणि थोडासा विस्कळितपणा निर्माण होईल.

संस्थळांच्या नियमावलीमध्ये हे बसते काय ह्याचाहि विचार करावयास हवा.

Comments

जरूर

अवांतरः धन्यु! तुम्ही मोगँम्बो असाल तर मी मि. इंडिया बनतो लवकरच.

मी ड्वायलाक् मारला पण तुम्ही लवकरात लवकर "मि. इंडिया" बनाच!

---
मोगँबो, खुष हुआ।

संपादकांच्या संख्येत वाढ आवश्यक

उपक्रमावर अधिक लेख व प्रतिसाद यावेत यासाठी संपादकांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ते निर्माण होतील. त्यातही ग्यानबाची मेख अशी काहीजणांना संपादकपद चिल्लर वाटते तेथे सल्लागार मंडळ नेमावे व त्यावर अशा सदस्यांची नेमणूक करावी. एकंदर सदस्यांच्या मेडिऑक्रिटीपासून आपण वेगळे आहोत अशी भावना संपादकांना जपता येते. शिवाय शक्यतो सदस्य नेहमी संपादकांवर आरोप करत असतात. त्यामुळे संकेतस्थळाच्या अधिकारीपदावर राहूनही शिवीगाळीपासून मुक्तता होण्याचे समाधान सल्लागार मंडळातील सदस्यांना मिळते. कुटुंबातील पती व पत्नी दोघांनाही संपादकपद द्यावे भले मग त्या जोडप्यातील 'पिगी बॅक' करणार्याचे साहित्यिक वा इतर काहीही योगदान नसले तरी! - म्हणजे फ्यामिली अटॅचमेंट होते.

संपादक व सल्लागार या ओसाडगावच्या जहागिरीला कोणी विचारत नसले तरी आपण 'कमावलेले' तेवढे एकच मानाचे पद असल्याने इतर कोणी देवो न देवो पण संपादक व सल्लागार नित्यनेमाने प्रतिसादांचा रतीब घालताना दिसतात व अशा मानाच्या गणपतींकडे आशाळभूतपणे पाहणारे सदस्यही प्रतिसाद देऊ लागतात.

जमल्यास विचार व्हावा. काही संकेतस्थळांवर अशा 'आधिकारिक' धोरणामुळे अधिक ट्राफिक पाहण्यात येते असे खात्रीलायकरीत्या कळते.

अंमळ मौज

नीट चर्चा करत बसण्यापे़क्षा मंडळी एकमेकांवर दुगाण्या झाडत असलेली पाहून मौज वाटली.

 
^ वर