स्स्स्... : एक माहितीपूर्ण लेखन
आपली कोल्हापूरचीच मिरची सगळ्यात जास्त तिखट अशी का कोण जाणे पण माझी समजूत होती.
मे महिन्याच्या नॅशनल जिओग्राफिक मध्ये मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी स्कोविल स्केल किंवा स्कोविल हीट युनिट (SHU) हे परिमाण वापरतात अशी एक रंजक माहिती मिळाली. या विषयावर थोडं अधिक गुगलून पाहिल्यावर नागा जोलोकिया ही बांगलादेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आढळणारी मिरची ही जगात सगळ्यात जास्त तिखट असल्याचं कळलं.
खरं तर मिरची ही मूळ भारतीय नव्हे. १४९८ मध्ये भारतात आलेल्या वास्को द गामा ने त्याच्यासोबत आणलेली मिरची हीच पुढे आपल्या आहाराचा अविभाज्य भागच होऊन गेली आहे.
नॅशनल जिओग्राफिकमधल्या ह्याच लेखात मिरचीचे उपयुक्त गुणही सुंदर सांगितले आहेत. मिरची मुळे पचनाला मदत होते. Arthritis (म्हणजे सांधेदुखी का?) सारख्या रोगांवर एक उत्तम उपाय म्हणजे मिरची. श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी आहारातील मिरची अतिशय गुणकारी.
उगीच नाही "हान मर्दा आजून वाटीभर कोल्लापुरी रस्सा.. सरदी पडसं समदं पळून जाईल" असं आपण म्हणतो.
पण मिरचीची सवय नसेल तर मात्र असे हाल होतात.
टुनडू च्या सहाय्याने अशी मजेदार मराठी व्यंगचित्रं तुम्हीही करु शकता.
(मिरचीचे चित्र विकीपीडियावरून घेतले आहे.)
या व अशा इतर माहितीपूर्ण लेखांच्या वाचनासाठी आम्हाला येथे भेट द्या.
Comments
एलोपेन्यो
आमची आवडती मिरची एलोपेन्यो ;-) असे संवाद फेकते. बाकी टून डू मस्तच. मिरचीच्या माहितीपूर्ण लेखापेक्षा टूनडूची माहिती आवडली.
एलोपेन्यो वि. कोल्हापुरी
एलोपेन्यो चा SHU २,५००–८,००० हा आमच्या आवडत्या कोल्हापुरी लवंगी मिरचीपेक्षा फारच कमी असावा असे स्पष्ट आहे.
कारण कोल्हापुरी मिरचीचा ज्यूस पिणार्याची अवस्था अशी होणार हे नक्की. :)
माहिती आवडली.
योगेशराव,माहिती आवडली.पण ही मिरची आम्हाला ढोबळी मिरची वाटते आहे.ती जर असेल तर तिच्यात काही दम नसतो.कारण मिरच्या मधली ,ती जरा गरिब स्वभावाची. आमच्या गावाकडच्या हिरव्या मिरच्यांनी कानातून वाफा,डोळ्यातून गंगा,यमूना.नाकावर घाम,ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत,तीथे पावसाचे थेंबाप्रमाणे घाम,अन अधिक मिरच्याच्या सेवनामूळे,सकाळी उठण्याऐवजी पहाटे उठावं लागतं. ती हीच मिरची का?लवंगी मिरची घाटावरची. (विनोदी व्यंगचीत्र आवडले) अशीच विविधांगी माहिती येऊ द्या.
खरं तर मिरची ही मूळ भारतीय नव्हे.
हे आम्हाला काही पटले नाही, कोणत्या तरी वेदात याची माहिती आहे असे म्हणतात,म्हणे.
आमचाही समज
अशा अनुभवांमुळे आमचाही समज कोल्हापुरी मिरचीच सर्वात तिखट असा होता. अर्थात कोल्हापुरी मिरचीचा SHU स्पष्टपणे कुठे दिलेला नसल्यामुळे आपण बेनेफिट ऑफ डाऊट देऊन आपलीच (मिरची!) लाल असे म्हणूया. :)
मिरचीच्या चित्रावर जाऊ नका
चित्रात दाखवलेल्या नागा जोलोकिया या मिरचीचा तिखटपणा १,००,००० युनिट्सपेक्षा जास्त आहे.
आम्हाला परिचित असलेली थाई मिरची जिचा उल्लेख SHU सारणीत आढळतो व जी इतर भारतीय मिरच्यांप्रमाणेच तिखट असते तिचा तिखटपणा ५०००० ते १००००० इतका आहे.
ही माहिती आधुनिक काळातील वेद जे की विकिपीडिया यांवरुन घेतली आहे.
खरं तर मिरची ही मूळ भारतीय नव्हे. असे आम्ही बर्याच ठिकाणी वाचले आहे. बटाटा व मिरची या आपल्या आहाराचा पाया असणार्या दोन्हीही वस्तू या पोर्तुगीजांनी भारताला दिलेल्या भेटी. मात्र दुर्दैवाने लेखाचा दुवा आठवत नाही.