हानामी (花見) : साकुरा
हानामी (花見) : साकुरा
हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ.
वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत.
जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~
साकुराचा बहर
हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.
साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.
हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव :)
बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य
माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन (आइ.टी. झिन्दाबाद) हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. o:)
Comments
उपक्रमावर स्वागत
सुरेख फोटो. गेल्यावर्षी डीसीला हा बहर अनुभवला होता.
उपक्रमावर स्वागत आहे. उपक्रमावर माहितीपूर्ण, वैचारिक वगैरे लेख लिहिले जातात, अर्थात, चित्र हे हजार शब्दांच्या बरोबरीचे असल्याने छाया/प्रकाश चित्रांचाही विभाग आहेच. तुमच्याकडून उपक्रमावर अधिक लेख येतील अशी आशा करते.
हेच म्हणतो
हेच म्हणतो. येऊ द्या. चित्रे सुरेख आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मदत
नवा लेख टाकताना विभाग तपासले होते, पण छाया/प्रकाश चित्रांचा विभाग दिसला नाही :(
उपक्रमावर नविनच असल्यामुळे जरा मार्गदर्शन मिळाले तर नविन लेख चपखल विभागात टाकायला मदत होइल.
बाकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
- सोकाजी
छायाचित्रणाचा समुदाय
सोकाजीराव,
उपक्रमावर विषयांच्या वर्गवारीप्रमाणेच समुदायही उपलब्ध आहेत. चित्र, लेख यांचे संपादन करताना तळाशी ते दिसतात. समुदायाचे सदस्यत्व घेऊन तुम्ही छायाचित्रणाची वर्गवारी करू शकता.
छायाचित्रणाचा समुदाय येथे बघा.
विभाग
प्रवास
विरंगुळा
अनुभव
आस्वाद
प्रवासवर्णन
हे विभाग सुद्धा असंबद्ध नाही वाटत.
||वाछितो विजयी होईबा||
छान चित्रे
साकुरा बहर आवडला.
साकुरा
साकुरा आवडला. सकारात्मकपणे कसे जगावे हे अशा लोकांकडून शिकावे. अर्थात सकारात्मकपणेच जगले पाहिजे असे काही नाही!
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है
वा
वा.
चित्रे २ आणि १४ विशेष आवडली.
(आजकाल बर्याच कॅमेर्यांमध्ये मॅक्रो/सुपर मॅक्रो घेता येतो, त्यामुळे अशा चित्रांत उठाव येण्यासाठी कलात्मकता पणास लावावी लागते.)
शेवटचे विहंगम दृश्य छानच आहे. परंतु मधल्या काचेमुळे आलेली धुवट झाक पोस्टप्रोसेसिंगने सुधारण्यासारखी आहे काय?
उपक्रमावर स्वागत आहे.