उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्रण - प्रकाशचित्रण
चाणक्य
April 12, 2008 - 9:56 am
अनेक छायाचित्रे पाहिली की आपल्याला आनंद होतो. अनेकदा असं वाटून जातं की मी इतके सुंदर छायाचित्र काढू शकतो का? कसे काढले असेल? कोणता कॅमेरा वापरला असेल?
मी सुद्धा एक कॅमेरा घेतो/घेते आणि सुरु करते. पण कोणता घ्यावा? फिल्म कि डिजीटल? पॉईंट अँड शुट की एस एल आर? यात नेमका फरक काय? ऍपर्चर म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याच सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी, या कलेची अनेक अंगे समजून घेण्यासाठी आणि छायाचित्रे-छायाचित्रण याचा आनंद लुटण्यासाठी हा समुदाय आहे.
छायाचित्रात-चित्रणात रस असणार्या प्रत्येकासाठी हा समुदाय आहे.
सदस्यांनी छायाचित्र-छायाचित्रण या संबंधीत माहितीपर लेख, चर्चा इत्यादी उपक्रमातून सहभाग घेणे अपेक्षीत आहे.