शंकराचार्य: इतिहासातील एक फार मोठी शोककथा?

कॉम्रेड श्री. ग. सरदेसाई ह्यांचे एक पुस्तक आहे "भारतीय तत्त्वज्ञान: वैचारिक आणि सामाजिक संघर्ष." ह्या पुस्तकातल्या "स्मृतिकारांपासून शंकराचार्यांपर्यंत" ह्या प्रकरणात त्यांनी शंकराचार्यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यात ते लिहितात, 'शंकराचार्यांचे स्वतःचे जीवन हा एक मूर्तिमंत आत्मविरोध आहे. जगाला संपूर्णपणे मिथ्या मानणारा हा माणूस अहोरात्र त्याच जगाला मिथ्यात्व पटविण्यासाठी धडपडला. निवृत्ती आणि संन्यासमार्गाचा आग्रहाने पुरस्कार करणारी ही व्यक्ती दैनंदिन सामाजिक जीवनातून कधीच निवृत्त झाली नाही. पूजा आणि आराधना यांच्या ग्राम्य विधींनी विरोध करणाऱ्‍या आणि ब्रह्मरूप होण्यासाठी ज्ञानमार्गाची महती गाणाऱ्‍या या पुरुषाने "भज गोविंदं, भजगोविंदं, भज विश्वेषं मूढमते" ही ईश्वरपूजेची रूढ शिकवण सामान्य लोकांना दिलीच... ... तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात शंकराचार्यांवर प्रच्छन्न बौद्ध असण्याचा आरोप केला जातो तो खोटा नाही. महायान बौद्धांचा शून्यवाद आणि शंकराचार्यांचा अद्वैतवाद यांतील अंतिम सत्याची कल्पना एकच आहे. शंकराचार्यांचे ब्रह्म हे शून्य म्हणजे निव्वळ पोकळी आहे. दर्शनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष जीवनाला इतके मिथ्या मानणारे शंकराचार्य समाजधारणेच्या क्षेत्रात हिंदू धर्मव्यवस्थेचे तितकेच कडवे समर्थक आणि प्रचारक होते. इतकेच नव्हे तर आग्रही संघटक होते. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी देशाच्या चार टोकांना त्यांनी चार मठ प्रस्थापित केले. ते आजही आहेत. त्यांच्या अधिपतींना अजून शंकराचार्य म्हणतात. समाजव्यवस्थेच्या म्हणजे चातुर्वर्ण्याच्या प्रश्नावर शंकराचार्यांना मनुस्मृती शिरोधार्य होती. मनूची वचने म्हणजे औषध आहेत ही त्यांची उक्ती प्रसिद्ध आहे. शूद्रांच्या प्रश्नांवर तर मनुस्मृतीचे एक एक वाक्य त्यांनी आपल्या लिखाणात उचलून धरले आहे. इतकेच नव्हे, तर मनुस्मृती वेदवाक्यावर आधारलेली असल्यामुळे तिला यत्किंचित विरोध करणे हा वेदविरोध आहे, असे स्पष्ट मत त्यांनी दिले आहे. शंकराचार्य वेदप्रामाण्याला निस्सीमपणे उचलून धरणारे होते हे सर्वांनाच माहीत आहे."

त्यात ‏शेवटी त्यांनी म्हटले आहे,"शंकराचार्यांच्या एकूण कार्याचे मूल्यमापन केल्यास त्यांनी हिंदू तत्त्वज्ञान आणि हिंदू समाजव्यवस्था अधिक तर्कशुद्ध (rationalise) करून त्या समाजव्यवस्थेची पकड अधिक भक्कम केली हाच निवाडा द्यावा लागतो. गुप्तांच्या काळात जे प्रत्यक्षात घडले होते, ते शंकराचार्यांनी आपल्या बुद्धीने आणि संघटनाकौशल्याने पाषाणासारखे करून टाकले. शंकराचार्यांची अजस्र बौद्धिक शक्ती आणि कार्यक्षमता ही आपल्या देशाच्या इतिहासातील एक फार मोठी शोककथा आहे."

तर,

  • ‏शंकराचार्यांचा अवतार झाला नसता तर समाजव्यवस्था अधिक समताधिष्ठीत झाली असती काय?
  • ‏शंकराचार्यांचा अवतार झाला नसता तर हिंदू धर्म नामशेष झाला असता काय?
  • शंकराचार्यांची दार्शनिक भूमिका आणि हिंदूधर्मशास्त्रचा पुरस्कर्ता ह्या भूमिकेत भेद होता का? भेद असल्यास का होता?

कृपया, सहभाग घ्यावा. मते मांडावी.

Comments

अन्यत्र चर्चेचा दुवा

तात्पुरता अन्यत्र चर्चेचा दुवा देतो : (शंकराचार्य/भज गोविंदम् वर चर्चा)

श्री. विकास यांचे उद्धरण उपयुक्त आणि पुढील चर्चेस आवाहन म्हणून देतो "शंकाराचार्य म्हणजे प्रच्छन्न बुद्ध असे म्हणतात."

शंकराचार्यांचा अवतार झाला नसता तर समाजव्यवस्था अधिक समताधिष्ठीत झाली असती काय?

‏असे काही म्हणता येत नाही. त्या काळातल्या समाज/अर्थव्यवस्थेकरिता शंकराचार्यांनी दिलेली धार्मिक वागणुकीची समर्थने पथ्यावर पडली.

शंकराचार्यांचा अवतार झाला नसता तर हिंदू धर्म नामशेष झाला असता काय?

बहुधा नाही. शंकराचार्यांच्या आधीच बौद्ध धर्माला अवकळा आली होती, असे चिनी भिक्खूंच्या लेखनातून कळते. शंकराचार्यांच्या आधीपासून भारतातल्या अनेक ठिकाणी वैदिक-हिंदू राज्ये-साम्राज्ये उदयाला आलेली होती.
मुसलमान राजांची आक्रमणे आणि त्यांनी भारतात केलेली धर्मांतरे ही शंकराचार्यांच्या नंतर आली. त्यांच्याबाबत शंकराचार्यांच्या कार्याचा काय फायदा झाला, याबाबत माहिती कळली तर हवी आहे. शंकराचार्यांच्या परंपरेतून चालत राहिलेले चार मठ आणि साधूंचे दहा आखाडे यांनी या राजकीय उलाढालींमध्ये कसे आणि काय लक्ष घातले याबाबत ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे काय?

शंकराचार्यांचे प्रमुख तात्त्विक खंडन हे अन्य वैदिक दार्शनिक परंपरांचे होते (म्हणजे सांख्य, वैशेषिक वगैरेंचे खंडन). त्यांनी अतिशय तीक्ष्ण आणि बिंदुगामी प्रकारे केलेले हे खंडन ते जन्मलेच नसते तर आपल्याकडे आज नसते. पण ते माहीत नसलेल्यांचाच हिंदू धर्म आज कित्येक शतके बहुसंख्य आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातील तांत्रिक झगमगाटाने हिंदूधर्माच्या रूढींवरती काही विशेष फरक पडला नाही. खुद्द त्यांच्या धार्मिक वर्तनावरती काही फरक पडला नसावा, असेच वाटते.

शंकराचार्यांची दार्शनिक भूमिका आणि हिंदूधर्मशास्त्रचा पुरस्कर्ता ह्या भूमिकेत भेद होता का? भेद असल्यास का होता?

भेद तर होता. हिंदू धर्मातील अन्य दार्शनिकांची, आणि अन्य धर्मातील दार्शनिकांचीही भरपूर उदाहरणे बघता वाटते, की असा भेद सोयिस्कर असावा. पण तरी थोडासा कोड्यात पाडणारा आहे.

अन्य भारतीय दार्शनिक शाखांच्या पंडितांच्या रोजच्या धार्मिक व्यवहारात काहीच फरक पडला नाही. या अंतर्गत विरोधाच्या बाबतीत शंकराचार्य एकटे नाहीत. ज्या संतांच्या दैनंदिन व्यवहारात फरक पडला, ते सिद्धांती म्हणून महत्त्वाचे नाहीत...

अशा प्रकारचा गमतीदार प्रकार कॅथोलिकांपैकी थॉमस ऍक्वायनास [इंग्रजी उच्चार] - दुवा - याच्यामध्ये सुद्धा दिसतो. तत्त्वचर्चेत तल्लख तर्कशुद्धता आणि धर्मशास्त्रातील रूढींबाबत गतानुगतिकता यांचे चमत्कारिक मिश्रण त्याच्यात दिसते.

विवेकानंदांची दार्शनिक भूमिका आणि हिंदूधर्मशास्त्राचा पुरस्कार या दोन्ही गोष्टी शंकराचार्यांशी समांतर असाव्यात. (विवेकानंदांनी जातिव्यवस्थेचे धर्मशास्त्रीय समर्थन केले, ती मुलाखत मी वाचलेली आहे. परंतु ते अद्वैतवादी सुद्धा होते.) शंकराचार्यांच्या मानाने विवेकानंदांनी लिहिलेले साहित्य, आणि संवाद/प्रश्नोत्तरे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. कदाचित त्याचा अभ्यास उपयोगी पडू शकेल. हा अंतर्विरोध विवेकानंदांनी आपल्या विचारसरणीत कसा सामावून घेतला? याबद्दल कोणाला माहिती देता येईल काय?

संदर्भ

>>विवेकानंदांनी जातिव्यवस्थेचे धर्मशास्त्रीय समर्थन केले, ती मुलाखत मी वाचलेली आहे. परंतु ते अद्वैतवादी सुद्धा होते.

ही मुलाखत कुठली त्याचा दुवा किंवा संदर्भ देता येईल का?

धन्यवाद.

धर्मशास्त्रीय समर्थन

"ही मुलाखत कुठली त्याचा दुवा किंवा संदर्भ देता येईल का?"

~ या मतास दुजोरा देत आहे. मलाही ही मुलाखत वाचावयास आवडेल. मात्र याचवेळी हेही लिहित आहे की, त्यानी कलकत्याहून महेन्द्रनाथ गुप्त याना (१७ ऑगस्ट १८८९) लिहिलेल्या एका पत्रात लिहिले होते, "आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जातिविभाग हा वंशगत मानलेला आहे याबद्दल मला शंका नाही... मी स्वतः या जातिविभागाच्या बाबतीत कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचा नाही, कारण जातिभेद ही एक सामाजिक संस्था असून् तो गुण- कर्मप्रसूत आहे हे मला ठाऊक आहे. या सर्व बाबतीत गुरुकृपेने माझे काही निश्चित विचार बनलेले आहेत, पण आपली विचारसरणी जर मला कळली तर माझी काही मते दृढ होतील व काहीतील चुका दुरुस्त करता येतील..." इ. इ.

अर्थात यावरून स्वामीजी जातिव्यवस्थेचे [वा भेदाचे] पुरस्कर्ते होते असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. ९ एप्रिल १८९४ च्या न्यू यॉर्कहून श्री.पेरूमल याना पाठविलेल्या एका पत्रात विवेकानंदांनी रोखठोकपणे म्हटले आहे की, "जेव्हा एक जात आणि एक वेद राहतील, जेव्हा समग्र जगतात शांती व समन्वय यांची स्थापना होईल तेव्हाच सत्ययुग येईल असे मला वाटते."

विवेकानंदांचे गुंतागुंतीचे मत

मला मूळ वाचलेली मुलाखत सापडली नाही, पण ही सापडली :
फेब्रुवारी १८९७ची मुलाखत, दुवा
(वरील दुवा विकिसोर्सवरील "विवेकानंदांच्या समग्र वाङ्मया"तील आहे. अधिक वेळ मिळाल्यास अधिक शोधता येईल.)
या मुलाखतीत :
(अ) एकीकडे त्यांचे म्हणणे आहे, की भारतात धर्माधिष्ठित ऐहिक शिक्षणाने सर्वच मनुष्यांना ब्राह्मण करावे. हे धोरण नेमके काय आहे, ते मला समजलेले नाही, तरी ढोबळमानाने यात काहीतरी पटण्यासारखे आहे, असे वाटते.

In India, from caste we reach to the point where there is no caste. ... The plan in India is to make everybody a Brahmin, the Brahmin being the ideal of humanity.

(आ) पण दुसरीकडे समाजातील ज्ञानाची परंपरा कायम ठेवण्यासाठी भूतकाळातली जातिव्यवस्था आवश्यक होती, परिपूर्ण नसली, तरी चांगली होती. ती नसती, तर ज्ञानाची परंपरा नष्टच झाली असती.

Indian caste is better than the caste which prevails in Europe or America. I do not say it is absolutely good. Where would you be if there were no caste? Where would be your learning and other things, if there were no caste?

मुद्दा (अ) आणि मुद्दा (आ) हे एकाच परिच्छेदात आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा ताळा नीट जुळत नाही. ज्या कारणासाठी भूतकाळात ही व्यवस्था आवश्यक आणि चांगली होती हे इतके स्पष्ट आहे, ती कारणे आज बदलली आहेत काय? बदलली नसतील तर (अ)मधील धोरणांचा पुरस्कार करण्याचे समर्थन पटत नाही. आणि जर (अ) मध्ये म्हटलेले खरे असेल :

The plan in India is to make everybody a Brahmin... If you read the history of India you will find that attempts have always been made to raise the lower classes.

विवेकानंदांच्या इतिहासवाचनाप्रमाणे (अ)मधील धोरणे पूर्वापारपासूनचीच आहेत. तर मग (आ)मधील जातीचा चांगलेपणा हा पूर्वापारच्या धोरणांच्या विरोधात टिकून राहिलेला आहे.

एकुणात विवेकानंदांना आजच्या परिस्थितीत काय फरक करायचा आहे - त्यांच्या मते इतिहासातील जातीमुळे झालेले फायदे टिकून राहावेत, असे काय वर्तमानकालीन धोरण त्यांच्या मनात आहे?

त्या काळात हिंदू धर्मात सुधारणा करणार्‍यांबाबत विवेकानंदांचा चांगला अभ्यास असावा. त्या काळातील सुधारकांबाबत ते म्हणतात :

All the modern reformers take to European destructive reformation, which will never do good to anyone and never did. Only once was a modern reformer mostly constructive, and that one was Raja Ram Mohan Ray.

- - -
विवेकानंदांच्या लेखनाची ही एकच झलक आहे. (अर्थात मी आधी वाचलेली मुलाखत आता सापडली नाही, म्हणजे जातीच्या कर्मसिद्धतेच्या समर्थनार्थ अजून एकतरी मुलाखत कुठेतरी उपलब्ध असली पाहिजे.) कदाचित त्यांच्या स्वतःच्या सुधारणेच्या आराखड्याचे तपशील त्यांनी दिलेले असतील. किंवा राममोहन राय यांच्या सुधारणा कुठल्या प्रकारे ग्राह्य होत्या, पण बाकी सर्व सुधारकांच्या सुधारणा कशा प्रकारे चुकलेल्या होत्या याबद्दल त्यांनी अधिक विश्लेषण दिलेले असेल.
याच मुलाखतीत विवेकानंदांनी कर्मकांडांचे (रिच्युअल्सचे) काहीसे समर्थन केलेले आहे (जातीबाबत बोलताना दुय्यम मुद्दा म्हणून). अन्यत्र वेदान्ती तत्त्वज्ञान आणि कर्मकांडे यांची तात्त्विक सांगड त्यांनी कुठेतरी घातलेली असेल.
विवेकानंदांच्याइतके विपुल साहित्य - विशेषतः प्रश्नोत्तर स्वरूपाचे - शंकराचार्यांचे नाही. शिवाय विवेकानंदांच्या चर्चेतील सामाजिक/तात्त्विक/कर्मकांडविषयक गोष्टी या सर्व आपल्या काळाच्या जवळच्या आहेत. तरी साम्ये खूपच आहेत.
असे असल्यामुळे शंकराचार्यांच्या मानसिकतेची झलक मिळण्यासाठी प्रवेश म्हणून विवेकानंदांचे आत्मविश्लेषण अभ्यासता येईल.

आणखी एक विस्तृत दुवा

गुंतागुंतीच्या मताचे स्पष्टीकरण करून देणारा आणखी एक विस्तृत दुवा :
(स्क्रिबडी दुवा : पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ८० पासून जातिसंस्थेवरचा लेख)
हाच लेख थेट पानावरती, दुवा.

लेख स्फूर्तिदायक आहे खरा. पण गोंधळात पाडणारा आहे.

तरी बिगर-ब्राम्हणांनी (संस्कृत शिकावे आणि) आध्यामिक/सांस्कृतिक शिक्षण आपणहून घ्यावे, हे स्फूर्तिदायक आहेच. (पण बिगर-ब्राम्हणांनी यावेगळे चळवळीचे मार्ग चोखळू नये, असा सल्ला मात्र स्फूर्तिदायक नाही.)

पटले नाही

हे सगळे अवांतर होते आहे असे वाटते. कारण शंकराचार्य आणि विवेकानंद हे दोघे हिंदूंचे संघटक होते पण वेगवेगळ्या काळातले. शिवाय वरील मूळ शंकराचार्यांशी संबंधित चर्चेमध्ये आत्मविरोधाची जी उदाहरणे आहेत त्यापैकी बर्‍याच मुद्यांबाबतीत आत्मविरोध विवेकानंदांच्या वागण्यात दिसत नाही. उदा. निवृत्ती आणि संन्यासमार्गाचा लोकांसाठी आग्रहाने पुरस्कार त्यांनी कधी केला असे दिसत नाही.

तरी इथे काही थोडे अधिक लिहीते. तुम्ही म्हटली आहे ती मूळ मुलाखत वाचायला अधिक आवडली असती. तरी वर तुम्ही जो दुवा दिला आहे त्या मुलाखतीत सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या नसल्या तरी विवेकानंदांना सर्व ब्राह्मण हवेत म्हणजे नक्की काय हे समजणे अवघड नाही. याच मुलाखतीत ते म्हणतात -
The tyranny of the minority is the worst tyranny in the world. (मायनॉरिटी याचा इथला अर्थ तातडीने रीफॉर्म हवे असणारे लोक) Therefore, instead of frittering away our energies on ideal reforms, which will never become practical, we had better go to the root of the evil and make a legislative body, that is to say, educate our people, so that they may be able to solve their own problems.

शिक्षण देणे त्यांनी महत्त्वाचे समजले आहे हे वरील आणि खालील परिच्छेदांतून दिसून येईलच. त्यांनी इतरत्र काय म्हटले आहे ते थोडेफार श्री. अशोक पाटील यांनी दिलेच आहे. इतर त्यांनी न दिलेले काही असे - (विवेकानंद यांचे हरीपाद मित्र यांना पत्र, जाने. १८९४)

अमेरिकेतील स्त्रियांबद्दल ते पुढील प्रमाणे म्हणतात आणि त्यातच पुढे इतर जातीविषयक विचार येतात ते असे (सैल भाषांतर):
"येथील स्त्रिया किती निर्मळ आहेत. विशी-पंचविशीच्या आत येथे फारच थोड्या स्त्रियांची लग्ने होतात, त्या जणू पक्ष्यासारख्या मुक्त असतात. त्या बाजारहाट करतात, शाळेला, कॉलेजला जातात, पैसे मिळवतात, आणि सगळ्या प्रकारची कामे करतात. ज्या श्रीमंत घरातील स्त्रिया आहेत त्या गरीबांची सेवा करताना दिसतात. आणि आपण काय करतो? ११ व्या वर्षी न चुकता मुलींची लग्ने करून देतो जेणेकरून त्या वाईट मार्गाला लागू नयेत. आपला मनू काय म्हणतो? मुलींना मुलांप्रमाणेच प्रेमाने आणि काळजीपूर्वक सांभाळावे, शिकवावे. मुलांनी ३० व्या वर्षीपर्यंत ब्रह्मचर्य बाळगून मग लग्न करावे अशी शिकवण असली तर मुलींनीही ब्रह्मचर्य बाळगणे, शिक्षण घेणे हे आवश्यक ठरावे. पण आपण काय करतो? आपण आपल्या स्त्रियांची स्थिती सुधारू शकतो का?? तरच आपल्याला गती आहे नाहीतर आपण आहोत तसेच मागासलेले राहू.

आज आपल्याकडील कोणी कनिष्ठ जातीत जन्माला आला तर तो संपला, गेला, त्याला काहीच आशा उरली नाही! कसला जुलूम आहे हा. (टायरनी). या देशात (अमेरिकेत) प्रत्येक व्यक्तीला शक्यता आहेत, संधी आहेत आणि आशा आहे. आज गरीब असला तरी तोच माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो, शिकू शकतो, आदराला पात्र होऊ शकतो. भारतात आपण दरिद्री आहोत म्हणून आरडाओरडा करतो, पण भारतात किती सेवाभावी संघटना आहेत? किती लोक गरीबांच्या दु:खाने कळवळतात? आपण माणसे तरी आहोत का? आपण काय करतो गरीबांना पोटापाण्यास मिळावे म्हणून, त्यांचा उत्कर्ष व्हावा म्हणून? आपण त्यांना स्पर्श करत नाही, आपण त्यांचा संपर्क टाळतो. आपण माणसे आहोत का? आज हे हजारो ब्राह्मण आज कनिष्ठ, पददलित लाखोंसाठी काय करत आहेत? "आम्हाला स्पर्श करू नका", हे एकच त्यांच्या तोंडी आहे. यांच्या हाती आपला पुरातन धर्म किती कुजका झाला आहे! .. इ.

यातील कोणते विचार जुनाट आहेत असे म्हणता येईल? आणि असले तरी आत्मविरोध नक्की कुठे आहे? जातीविरोध करताना तुम्हीच दिलेल्या त्यांच्या लेखात असे म्हटले आहे की This Brahmana, the man of God, he who has known Brahman, the ideal man, the perfect man, must remain, he must not go. And with all the defects of the caste now, we know that we must all be ready to give to the Brahmanas this credit, that from them have come more men with real Brahmana-ness in them than from all the other castes. We must be bold enough, must be brave enough to speak their defects, but at the same time we must give credit that is due to them.
..... Therefore, it is no use fighting among the castes. What good will it do? It will divide us all the more, weaken us all the more, degrade us all the more. The solution is not by bringing down the higher, but by raising the lower up to the level of the higher.

विवेकानंदांची ओळख संघटक आणि प्रचारक म्हणून आहे. समाजात रूजलेल्या विचारसरणीनुसार उच्च आणि कनिष्ठ जातींना त्यांनी दिलेले सल्ले (संस्कृत भाषेचा अभ्यास आता कोणीच विशेष करत नाही हे वगळता) नक्की काय आणि कितपत चुकीचे आहेत? त्यांचे वाक्य असे आहे - Therefore, it is no use fighting among the castes. What good will it do? It will divide us all the more, weaken us all the more, degrade us all the more. या हेतूने त्यांनी बिगर ब्राह्मणांना Do not seize every opportunity of fighting the Brahmana असा सल्ला दिला आहे.त्यांची भिती समाजात फूट पडण्याची आहे, त्यातून तो दुर्बळ होण्याची आहे. The only way to bring about the leveling of castes is to appropriate the culture, the education which is the strength of the higher castes. ब्राह्मणांना दिलेला सल्ला असा - It seems that most of the Brahmanas are only nursing a false pride of birth; and any schemer, native or foreign, who can pander to this vanity and inherent laziness, by fulsome sophistry, appears to satisfy more.

Beware Brahmanas, this is the sign of death! Arise and show your manhood, your Brahmana-hood, by raising the non-Brahmanas around you - not in the spirit of a master - not with the rotten canker of egoism crawling with superstitions and charlatanry of East and West - but in the spirit of a servant.

आपणही उच्चपदस्थांमध्ये उठता बसता येईल असे बारकावे मुलांना शिकवत असतो, शिक्षण देत असतो. आपल्यापेक्षा जे अधिक सक्सेसफुल आहेत, यशस्वी आहेत त्यांच्याकडून काही गुण घ्यावे असे म्हणणे यात गैर काय आहे? ते करत असताना ब्राह्मणांचा आदर करावा, अन्याय सहन करावा असे काही त्यांनी म्हटलेले नाही. कुठचीही चळवळ दाबून टाकण्याचा प्रयत्न तर त्यांनी केला नाही?

नक्की कसला आत्मविरोध तुम्हाला त्यात जाणवला?


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

तितके अवांतर नाही

प्रत्येक काळात फरक असतो, आणि साम्ये असतात. (विवेकानंदांचा काळ वेगळा, वगैरे, माझेच मुद्दे आहेत. इतिहासातील जवळची व्यक्ती समजून मग काळानुरूप विश्लेषण बदलत जात प्राचीन व्यक्ती समजू शकेल. ही पद्धत सामान्य आहे. वडील आपल्याशी कसे वागतात हे मनापासून समजले, तर आजोबा वडलांशी कसे वागतात हे समजायला मदत होते. वडलांचा आणि आजोबांचा काळ वेगळा होता, तरीसुद्धा ही मदत होतेच. कारण वडलांचे वागणे समजण्यासाठी खूप सामग्री असते, आजोबांचे वागणे समजण्यासाठी त्या मानाने थोडी सामग्री असते.)

- - -
(मला वाटते, की तुमचा असा गैरसमज आहे, की मी विवेकानंदांना एक वाईट व्यक्ती म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी काही लोकांना असे वाटले की मी शंकराचार्यांना एक वाईट व्यक्ती म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करत होतो. हे दोन्ही गैरसमजच आहेत. शंकराचार्यांनी ऐहिक ज्ञान हे कामाचे नसल्याचे म्हटले, ते प्रामाणिक असले, तरी समाजाच्या फायद्याचे नव्हते. विवेकानंदांना त्यांच्या मार्गावेगळ्या समाजसुधारणा सर्व फुटीरवादी वाटल्या हे त्यांचे मत प्रामाणिक होते, पण समाजाच्या फायद्याचे नव्हते. हा विभूतींनी प्रत्येकी एकहाती नुकसान केलेले नाही. पण या बाबतीत ते गतानुगतिक होते. त्यांच्या अन्य बाबतीतल्या कर्तृत्वामुळे त्यांच्या गतानुगतिक अंशाचाही काहीसा परिणाम झाला, इतकेच. यावेगळी अनेक चांगली शंकराचार्यांनी आणि विवेकानंदांनी केली, हे मला माहीत आहे. ज्या बाबतीत सहमती आहे, त्या बाबतीत विवेकानंदांची खूप उद्धरणे दिली तरी चर्चेला अवांतर आहेत.)

- - -कदाचित अवांतर ---

ते करत असताना ब्राह्मणांचा आदर करावा, अन्याय सहन करावा असे काही त्यांनी म्हटलेले नाही. कुठचीही चळवळ दाबून टाकण्याचा प्रयत्न तर त्यांनी केला नाही?

त्यांचे सरकार नव्हते! कुठलीही चळवळ दाबून टाकायची यंत्रणा त्यांच्याकडे होती असे नव्हे. (शंकराचार्यांकडे तरी होती का?) हे वाक्य लिहिण्याचा संदर्भ काय?

अशा परिस्थितीतील व्याख्याने आणि विचार सांगणार्‍यांचा "अमुक करू नका, ते योग्य नाही" असे म्हणण्यापुरताच विरोध असतो.

तुम्ही मला विचारता :

कनिष्ठ जातींना त्यांनी दिलेले सल्ले (संस्कृत भाषेचा अभ्यास आता कोणीच विशेष करत नाही हे वगळता) नक्की काय आणि कितपत चुकीचे आहेत?

हे चुकीचे नसून स्फूर्तिदायक असल्याचे मी म्हटलेले आहे. या प्रश्नाचे प्रयोजन वर उल्लेखलेला गैरसमज असावा.

वरील दुसर्‍या दुव्यातील विस्तृत लेखातील चर्चा अशी आहे :

To the non-Brahmana castes I say, wait, be not in a hurry. Do not seize every opportunity of fighting the Brahmana, because as I have shown; you are suffering from your own fault.

संस्कृत/सांस्कृतिक शिक्षण मिळवावे हा सकारात्मक मार्ग सांगितला आहे खरा. पण चूक खुद्द बिगरब्राम्हणांची म्हणून सांगितलेली आहे. यावेगळा भांडणे करण्यालायक कुठलाही दोष त्यांना दिसला नाही.

कुठल्यातरी भांडणांबाबत त्यांना माहिती होती याबाबत माझ्या वरच्या दुव्यात आपल्याला कळते : राजा राममोहन रायांव्यतिरिक्त कुठल्याही समाजसुधारकाने चांगले काम केलेले नाही, असे त्यांचे मत ते सांगतात. त्यांच्याबाबत दोष "डिस्ट्रक्टिव्ह" आहे, हा सांगितला आहे खरा : "फूट पडू नये" हे तत्त्व त्यांना सर्वात महत्त्वाचे होते, असा तुमचा मुद्दा सुयोग्य विश्लेषणाचा आहे. (मात्र भांडणे करूनही सुधार झालेत, आणि दीर्घ काळात बघितले, तर फूट पडली नाही, हे आपले ऐतिहासिक निरीक्षण आहे. हाइंडसाईट २०-२० म्हणा.)

"फूट पडू नये" म्हणून जी उद्धरणे तुम्ही देता, त्यांच्यातच अधूनमधून कसे भांडू नका, त्याचे वर्णन येते :

Why do you now fret and fume because somebody else had more brains, more energy, more pluck and go than you?

दुसर्‍या कोणापाशी तुमच्यापेक्षा अधिक बुद्धी, उत्साह आणि धमक आहे याबद्दल तुम्ही कसचे रुसवे धरता (फ्रेट) आणि धुसमुसता (फ्यूम)?
त्या काळातल्या बिगरब्राह्मणांची ही तक्रार होती काय - कोणापाशी आपल्यापेक्षा अधिक बुद्धी, उत्साह आणि धमक आहे?

Instead of wasting your energies in vain discussions and quarrels in the newspapers, instead of fighting and quarreling in your own homes - which is sinful...

वरील जळफळाटाबाबतच जर वर्तमानपत्रांत पोकळ चर्चा आणि भांडणे होत असती, तर ते पाप असल्याचा निर्वाळा आपण समजू शकतो.
पण जो काही इतिहास आपल्याला ठाऊक आहे, त्यावरून आपण हे म्हणू शकतो काय की बिगरब्राम्हण त्या काळात वर्तमानपत्रांत आणि घरात भांडत असत, ते ब्राम्हणांकडे बुद्धी-उत्साह-धमक अधिक असल्याचा जळफळाट होता?

आता असे लोक असतीलही - असतीलच. पण अन्यायाविरुद्ध समाजसुधार करण्यात वर्तमानपत्रांत चर्चा करणार्‍यांपेक्षा खूपच कमी प्रमाणात. आता असे असेलही की त्यांना राममोहनरायांव्यतिरिक्त एकही आज-अन्यायविरोधक-मानतो-असा सुधारक माहीत नसेल. पण ही कल्पना पटण्यासारखी नाही. मात्र ज्यांना आपण आज अन्यायविरोधी मानतो, त्या सुधारकांना ते मत्सरी-भांडकुदळ (अथवा नको अशी फूट पाडणारे) असे ते मानत असावेत. (आजचेच बघा ना : आपल्याला कितीतरी लोक असे म्हणताना सापडतात की १९०० साली वर्तमानपत्रात भांडणारे लोकहितवादी चांगले करत, पण आज २०००च्या वर्तमानपत्रात फक्त मत्सरी आणि फुटीर राजकारणच होते. ही मते प्रामाणिक असतात. तसेच १९०० काळातही "१८०० काळातले सुधारक ते खरे, आजचे ते मत्सरी" हे मत प्रामाणिक असेल.)

जे काय त्यांचे मत आहे, त्या दृष्टीने त्यांचे हे लेखन प्रामाणिक आहे याविषयी कुठलीच शंका नाही. पण हे मत गतानुगतिक होते.

मी आधी वाचलेली मुलाखत नसली, तरी वर दिलेल्या मुलाखतीच तुम्ही बघू शकता, की भारतातील बहुसंख्यांच्या ("मासेस"च्या) पीडेचे कारण पूर्वजन्मीचे कर्म आहे. लगेच त्याच परिच्छेदात जातिविषयक चर्चा करतात.

जातिभेदातील अन्यायाचा, विशेषतः अस्पृश्यतेचा विवेकानंदांना तिटकारा होता, हेदेखील प्रामाणिकच आहे. परंतु :

The older I grow, the better I seem to think of caste and such other time-honored institutions of India. ...
We believe in Indian caste as one of the greatest social institutions that the Lord gave to man. ...
Caste should not go; but should be readjusted occasionally. ...

मी आधी वाचलेली मुलाखत सापडली नाही, तरी विवेकानंदांनी जातिव्यवस्थेच्या कुठल्याशा प्रकाराचे धर्मशास्त्रीय समर्थन केले याबाबत आश्चर्य वाटायला नको. (लॉर्ड ने दिलेली, रिऍडजस्ट केलेली... जे काय असो.)

- - - कदाचित अवांतर पूर्ण - - -

पुनश्च वरील चर्चाप्रस्तावाकडे येऊया :
विवेकानंद (अ) त्यांच्या भाषणांमध्ये कित्येकदा मनूच्या स्मृतीतील दाखले प्रमाणे म्हणून देतात. ऐहिक बाबतीत अनेक ते धर्मवाक्ये प्रमाण मानत. फक्त त्यांना पटलेल्या काही बाबतीत रूढीत बदल त्यांना हवा होता, मग त्यासाठी धर्मशास्त्रातील प्रमाणे ते शोधून काढत. (आ) तत्त्वज्ञानाचे म्हणावे, तर वेदांतातील मायेच्या मिथ्यत्वाबद्दल त्यांची जाण खूप आहे.
म्हणजे (अ) स्मृतिवाक्यांचा अगदी सत्य म्हणून पुरस्कार आणि (आ) सगळ्याच गोष्टींच्या मिथ्यत्वाचा तात्त्विक पुरस्कार या दोन्ही गोष्टी त्यांच्या विचारसरणीत एकाच वेळी राहू शकत होती. हा अंतर्विरोध होय. हा अंतर्विरोध शंकराचार्यांच्या अंतर्विरोधाशी समांतर आहे.

प्रथम

चर्चाप्रस्ताव शंकराचार्यांवरून आहे. त्यामुळे तुम्ही चर्चाप्रस्तावाकडे येऊ या असे म्हणता तेव्हा नक्की कोणाच्या चर्चाप्रस्तावाकडे यायचे? तुमच्या का धम्मकलाडू यांच्या? शिवाय विवेकानंदांबद्दल अंतर्विरोधाचा मुद्दा तुम्ही मुख्य मुद्दा केला आहेत. पण वास्तविक चर्चाप्रस्ताव हा अंतर्विरोधाशी केवळ निगडीत नाही. तेही विवेकानंदांच्या नाही.

माझे मत हे अवांतर आहे याचे कारण असे की कितीही साम्ये आणि फरक असले तरी व्यक्ती दोन आहेत. दामोदर कोसंबी यांच्या विचारांचा धर्मानंदांशी संबंध असला तरी धर्मानंद म्हणजे दामोदर नव्हेत. त्यांच्या मतांमध्ये नुसतीच भिन्नता नसून विश्लेषणाच्या पद्धती आणि प्रेरणा वेगळी आहेत. शंकराचार्यांबाबत विवेकानंद असे म्हणतात की त्यांच्याकडे बुद्धासारखी तेजस्वी बुद्धी होती, पण बुद्धाचे हृदय नव्हते. तेव्हा व्यक्तींमध्ये फरक असायचेच.

चळवळीबद्दल - चळवळ दाबून टाकणे हे लाक्षणिक अर्थाने घ्यावे. तुमच्या "बिगर-ब्राम्हणांनी यावेगळे चळवळीचे मार्ग चोखळू नये, असा सल्ला मात्र स्फूर्तिदायक नाही." या वाक्यावरून वरील वाक्य लिहीले होते. विवेकानंदांकडे ती शक्ती असती तरी चळवळ दाबली नसती असे मला वाटते. अर्थात त्यांनी फक्त परस्परांमध्ये न भांडण्याचा सल्ला दिला आहे हे मुख्य म्हणायचे होते. राज्यशकट योग्य काम करीत नाही म्हणून आवाज केल्यास ते आवाज शांतताभंग करतात अशा प्रकारचे मत अलिकडेच एका चर्चेत आलेले दिसले. कठीण प्रसंग आहे, पण शांत रहा, राज्यशकटाकडून दिसली नाहीत तरी कामे होत आहेत अशा पद्धतीचे मतही दिसून आले. या विचाराशी सुसंगत अशीच वरील सामोपचाराची भाषा आहे, फक्त ती विवेकानंदांची आहे. (ही भाषा जेव्हा लगेच बदल तातडीने हवे असतात तेव्हा पचनी पडत नाही असे तुमच्या आणि माझ्या अनुभवांवरून दिसून येईल. ) विवेकानंदांच्या काळी राज्य बहुतांशी ब्रिटिशांकडे होते. ब्राह्मणांचे नव्हते किंवा भारतीय राजांचेही विशेष नव्हते. त्यामुळे समाजातील वर्तमानपत्रातून भांडणार्‍या दोन्हीकडच्या (शूद्र/ब्राह्मण) नेत्यांना /शिक्षितवर्गाला उद्देशून हा उपदेश आहे हे लक्षात यायला हवे.

बाकी भांडणे होऊन फूट पडली नाही असे तुम्ही म्हणता. मला तर आज वर्तमानपत्रांमधून जे कळते त्यावरून फूटच फूट पडलेली दिसते. दादोजी कोंडदेव, शिवधर्म इ. वरून होणारा गदारोळ काय सांगतो? ऍट्रॉसिटी ऍक्ट का लावावा लागतो? आज अजूनही जातीय पतपेढ्या का असतात? काही लोकांमध्ये आमच्यावर अन्याय झाला ही भावना अजूनही तीव्र आहे, अन्याय केला त्यांच्यामध्ये पूर्वजांच्या पिढ्यांनी केलेल्या चुकांसाठी आम्ही का नावे ठेवून घ्यायची, अशी भावना आहे. आम्ही-तुम्ही हे खूप वाढलेले आहे. राजकीय/सामाजिक सगळ्या क्षेत्रांमध्ये धोरणे ठरवताना, सहकारी निवडताना, कार्यकर्ते निवडताना जातीयता आडवी येते असे दिसते. असो. असे असूनही प्रगती आहे असे म्हणणे असले तर ते मला मान्य आहे, पण ते करत असताना फूट पडली नाही हे धाडसी विधान वाटते.

बाकी माझे काय समज/गैरसमज असतील ते आपण बाजूला ठेवूया. ते महत्त्वाचे नाहीत, चर्चाप्रस्तावाच्या दृष्टीने आणि तुमच्याही दृष्टीने महत्त्वाचे नाहीत.

तुम्ही म्हणता विवेकानंद तुम्हाला गोंधळात पाडणारे दिसले आहेत. स्पष्ट लिहीले नाही म्हणून खणून प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणता "ह्या विभूतींनी प्रत्येकी एकहाती नुकसान केलेले नाही. पण या बाबतीत ते गतानुगतिक होते. त्यांच्या अन्य बाबतीतल्या कर्तृत्वामुळे त्यांच्या गतानुगतिक अंशाचाही काहीसा परिणाम झाला, इतकेच." म्हणजे हे तुमचे मत आहेच की ते गतानुगतिक होते किंवा त्यांच्या हाती एकाहाती नसेना का पण नुकसान झाले. मग हे नुकसान काय झाले तेही स्पष्ट लिहावे. जेव्हा तुम्ही स्पष्ट लिहू शकत असतानाही गोंधळात पाडणारे, आवरणाखाली झाकलेले असे गुळमुळीत काही लिहीता तेव्हा माझ्या मते तुम्ही त्यांना वाईट व्यक्ती सिद्ध करण्यापेक्षाही हे अजून वाईट ठरते आहे कारण लोक त्यातून हवे ते अर्थ काढणार आहेत. शिवाय धनंजय यांनी वाचलेले आहेच त्यामुळे आपल्याला वाचण्याची गरज नाही असे समजणारे लोकही असू शकतील. :) (यासाठीच मी म्हटले की हा विषय येथे अवांतर आहे).

तुम्ही इथेही अनेक मते दिली आहेत.
>>ऐहिक बाबतीत अनेक ते धर्मवाक्ये प्रमाण मानत. फक्त त्यांना पटलेल्या काही थोड्या बाबतीत बाबतीत रूढीत बदल त्यांना हवा होता, मग त्यासाठी धर्मशास्त्रातील प्रमाणे ते शोधून काढत.
आधी हे लक्षात घेऊ की -
*त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला.
*त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्या कामाबद्दल कौतुक केले.
*त्यांना अस्पृश्यता मान्य नव्हती.
*कनिष्ठ जातींना शिकवले पाहिजे. ब्राह्मणांनी सेवाभावाने विद्येचे भांडार उघडे केले पाहिजे अशी त्यांची वाक्ये आहेत.
रामकृष्णांना अवतार म्हणण्यास आणि त्यांच्याबद्दल चमत्काराच्या गोष्टी पसरवण्यास त्यांचा विरोध होता.
त्यांचे वाक्य आहे we talk foolishly against material civilization. The grapes are sour.

आता हे झाले. यापुढे त्यांना कुठच्या अनेक रुढींत बदल नको होता हे कळू शकेल का? किंवा त्याकाळाच्या मानाने यातील नक्की कोणते बदल हे मोठे नव्हते?

मी वर म्हटले आहे की विवेकानंद संघटनाचे काम करत होते. अशा व्यक्तींना सगळ्या तर्‍हेच्या माणसांना घेऊन पुढे जायचे असते. बाकी सोडा, एक संकेतस्थळ चालवताना किती तर्‍हेच्या लोकांबरोबर काम करावे लागते याची उदाहरणे आपल्यासमोर आहेतच की. हे मुद्दाम खोडसाळपणा करण्यासाठी लिहीलेले वाक्य नाही, केवळ जाणीव करून द्यायला लिहीले आहे की त्यांना समन्वयाची गरज भासली. तुम्हाला ती आजमितीला महत्त्वाची वाटत नाही, याचा अर्थ त्यांची प्रेरणा चुकीची होती असा होत नाही.

तुम्ही विचारता - त्यावरून आपण हे म्हणू शकतो काय की बिगरब्राम्हण त्या काळात वर्तमानपत्रांत आणि घरात भांडत असत, ते ब्राम्हणांकडे बुद्धी-उत्साह-धमक अधिक असल्याचा जळफळाट होता?" घरात कोणी सारखी तक्रार करू लागले की आपण कधीतरी असे बोलतो (मी ऐकलेले आहे) की तू सारखी तक्रार करते आहेस पण (गधडे) तुला कोणी अडवले होते अमूक काम करण्यापासून? तू का इनीशिएटिव घेतला नाहीस?" निदान माझ्या घरात माझ्या सततच्या तक्रारी ऐकल्यावर हा रिस्पॉन्स येत असे :)
ह्या वाक्याचा अर्थ जबाबदारी झटकणे आहे असा नसून ती थोडी तक्रार करणार्‍यावरही टाकली. बोलताना वरिष्ठ जातीतील त्यांना वाटणारे गुणही सांगितले गेले असावेत. त्याचा असा विपर्यास केला जाऊ नये कारण त्यांनी अनेक ठिकाणी ब्राह्मणांना नावे ठेवली आहेत. "There is an old superstition in Bengal that if the cobra that bites, sucks out his own poison from the patient, the man must survive. Well then, the Brahmana must suck out his own poison. "

येथे ब्राह्मणांना सापाची उपमाही मिळाली आहे, ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये.
समन्वयाच्या वेळी दोन्ही बाजूंच्या काही उणीवाही सांगितल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको.

याहून अधिक इथे लिहीता येणार नाही ते माझ्याकडून अजूनच अवांतर होईल, तेव्हा सध्यासाठी थांबते.

धम्मकलाडूंना चालवू दे

विवेकानंदांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला, वगैरे चांगल्या गोष्टी केल्या. हे तुम्ही मला लक्षात ठेवायला सांगत आहात, म्हणजे मला लक्षात नाही असे गृहीत आहे. "गुंतागुंत" म्हणजे "१००% वाईट" असे म्हणत असल्याची तुमची गैरसमजूत मी घालवली नाही. दिलगीर आहे. दुसरा कुठला मराठी शब्द बापरावा याबद्दल विचार करत आहे.

म्हणजे हे तुमचे मत आहेच की ते गतानुगतिक होते किंवा त्यांच्या हाती एकाहाती नसेना का पण नुकसान झाले. मग हे नुकसान काय झाले तेही स्पष्ट लिहावे. जेव्हा तुम्ही स्पष्ट लिहू शकत असतानाही गोंधळात पाडणारे, आवरणाखाली झाकलेले असे गुळमुळीत काही लिहीता तेव्हा माझ्या मते तुम्ही त्यांना वाईट व्यक्ती सिद्ध करण्यापेक्षाही हे अजून वाईट ठरते आहे कारण लोक त्यातून हवे ते अर्थ काढणार आहेत

.
विवेकानंदांनी त्यांच्या काळातल्या कुठल्याही बंडखोर सुधारकाला साहाय्य केले नाही. इतकेच नव्हे, तर त्यांना एकजात विध्वंसक म्हटले. स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला, पण विधवाविवाहाबाबत "गरजेचे नाही" म्हटले. (वरील निबंधांतच ही माहिती मिळेल.) स्वतःच्या काळात होणारे बंडखोर सुधार विध्वंसक आहेत, म्हणून विरोध करण्यालायक आहेत, असा विचार करणार्‍या समाजाच्या भागाला याच गोष्टी म्हणणारा तेजस्वी व्यक्ती अधिक सबळ करतो. समाजातील प्रमुख व्यक्ती (पण जे शासक नाहीत) हे अशाच प्रकारे समाजावर परिणाम करतात. याच प्रकारे फायदाही करतात, आणि याच प्रकारे नुकसानही करतात. (तुमच्या मते "नुकसान" म्हणजे काय असते? स्वतः हिंगण्याला जाऊन कुठल्या विधवेचा विवाह जाऊन मोडणे? किंवा फायदा म्हणजे काय असतो? स्वतः कुठल्या पोटजातीबाहेराच्या स्त्रीशी लग्न करणे? हे दोन्ही त्यांनी केले नाही. तरी दोन्ही बाबतीत ठाम मते प्रदर्शित केली, आणि पहिल्याचे नुकसान आणि दुसर्‍याचा फायदा एकहाती नव्हे तरी त्यांच्याकडे पोचवला तर बरे.)

"गुळमुळीत" या शब्द वापरून तुम्ही पुन्हा "गुंतागुंत मानत नाही" हेच स्पष्ट केलेले आहे. माझ्या वरील परिच्छेदात "फायदे झालेत आणि नुकसात झाले" या विधानालाही तुम्ही "गुळमुळीत" म्हणू शकालच. पण गोंधळात पाडणारे? लोक वाटेल ते अर्थ काढतात म्हणून मी मत नाही तशा प्रकारचे खोटे लिहू?

वेदांतातील माया आणि ऐहिकाची सत्यता या दोन्ही परस्परविरोधी तत्त्वांना शंकराचार्य आणि विवेकानंद मानत मानत. मला वाटते गुंतागुंत समांतर आहे. शंकराचार्य समजायला विवेकानंद समजणे साहाय्य्क असेल, असे मला वाटते.
तुम्हाला वाटते, साहाय्यक नाही. तर असो.
चर्चा काय ती चर्चाप्रस्तावकाला चालवू दे.

जातक कथा

"येथे ब्राह्मणांना सापाची उपमाही मिळाली आहे, ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये."

~ माझा हा प्रतिसाद चित्रा यांच्या फक्त वरील विधानाशी आहे, त्याचा मूळ चर्चेशी कोणताही संबंध नाही.
सापाच्या बाबतीत असा उल्लेख झाला आहे की बंगालमध्ये [स्वामीजींच्या कालखंडात] अशी श्रद्धा आहे दंश केलेल्या व्यक्तीस वाचवायचे असेलच तर स्वतः नाग त्या व्यक्तीच्या अंगात भिनलेले विषय पुनश्च ओढून घेतो (sucks out) इ.इ.

चित्रा पुढे असे म्हणतात "येथे ब्राह्मणांना सापाची उपमाही मिळाली आहे, ह्याकडे दुर्लक्ष होऊ नये." इथे थोडासा गोंधळ वाटतो.
मूळ सापाची ती कथा 'जातक कथे' तील आहे. ज्या सापाने गावातील व्यक्तीला दंश केला आहे त्याला जिवंत ठेवण्यासाठी साधू त्या सापाला बोलावून घेतो आणि आवाहन करतो की 'हे नागराज तू हकनाक या बिचार्‍याला दंश केला आहे, तेव्हा तू माझे ऐक आणि याच्या अंगातील विष तूच परत शोषून घे म्हणजे त्याचे कल्याण होईल. असे जर तू केले नाहीस तर मग माझ्या विद्येने मी तुला अग्नीत टाकेन." यावर तो नाग उत्तरतो, "माझ्या वाटेत येणार्‍याला मी दंश करणार तो माझा धर्म आहे, त्यामुळे जरी तुम्ही मला अग्नीत टाकाल तर ते विष शोषून घेण्यापेक्षा मी अग्नीप्रवेश जास्त पसंत करीन." नागाचे हा निर्धार पाहून साधू प्रभावित होतो आणि मग स्वतःच त्या मरणोन्मुख इसमाला आपल्याकडील औषधाने बरा करतो. त्यानंतर त्या नागाला तो उपदेश करतो की, "तुझा हा जो निर्धारी बाणा आहे तो खरोखरी चांगलाच आहेस कारण तो ठेवण्यासाठी प्रत्यक्ष तू मृत्युलादेखील घाबरला नाहीस. पण असे कर, इथून पुढे हाच निर्धार तू जनकल्याणासाठी उपयोगात आणलास तर दोन्ही पक्षी ते फायद्याचेच होईल." नागालाही ते पटले आणि त्यानंतर त्याने कुणालाही दंश केला नाही....इत्यादी इत्यादी.

कथेवरून असे दिसते की, समाजातील प्रत्येक 'आडमुठ्या' घटकाला ती सापाची उपमा लागू आहे. उदा. एक "पाटील" आहे, व तो त्याच्या पाटीलकीचा गावात गैरकृत्यासाठी वापर करून एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करीत आहे हे तशा साधूला आढळले तर तो त्याला उपदेश करून हेच सांगेल की, "तुझ्या हट्टी करणीच्या विषाने अमुक एकाचा संसार देशोधडीला लागणार असेल तर वेळीच शहाणपणा दाखव आणि तूच तो संसार नव्याने उभा कर..." ~ म्हणजे त्या पाटलानेच ते विष शोषून घेतले पाहिजे. या कथेचा पुढे कुठे वापर झाला तर शेवटी सांगणारा असेच सांगेल : ...Well then, the Maratha must suck out his own poison. त्यामुळे समस्त मराठा समाजाला साप म्हटले जाते असाही समज काढता येईल.

रूपक कथेतील भाव जसाच्यातसा सद्यस्थितीतील परिस्थितीत लावताना कुठेतरी जातीय वापर आला तर ती उपमा फक्त त्याच एका जातीला लागू होईल, असे नसते.

स्वामीजींची काही जातिसंस्थाविषयक मते

We believe in Indian caste as one of the greatest social institutions that the Lord gave to man. ...
Caste should not go

'स्वामी विवेकानंद ग्रंथावली'तून चाळता चाळता मिळालेली काही जातिसंस्थाविषयक मते:

स्वामीजी, जातिविभाग आणि कर्मकांड ह्यांच्या परस्परसंबंधाविषयी आपलें काय मत आहे?
जाती सतत बदलत आहेत. कर्मकांडही सतत बदलत आहे. बाह्य अनुष्ठानेही बदलतच असतात. केवळ मूलतत्त्वच बदलत नाही. आपला धर्म जाणून घेण्यासाठी आपल्याला वेद अभ्यासावे लागतील. वेदांव्यतिरिक्त प्रत्येक ग्रंथ कालानुसार बदलतच असतो. वेदांचे शासन सर्वकाळासाठी आहे... ...जातिविभाग नाहीसा होता कामा नये. पण मधून मधून त्याची नव्याने जुळणी होत राहिली पाहिजे. जुन्या समाजव्यवस्थेत इतकी चेतनाशक्ती आहे की तिच्यातून लक्षावधी नवीन समाजव्यवस्था निर्माण होऊ शकतील. जातिविभागाचे उच्चाटन व्हावे असे इच्छिणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. जुन्या व्यवस्थेचाच नव्याने विकास करणे हीच आहे कार्याची नवीन पद्धती.

या जगांत पैशानेच युद्धे घडवून आणली आहेत आणि पैशानेच ख्रिस्ती लोकांना एकमेकांचे गळे कापावयास लावले आहे. पैशाच्या मागे लागलेल्या लोकांत मत्सर, द्वेष आणि लोभ हे दुर्गुण उत्पन्न होत असतात. रात्रंदिवस काम, घाई, गर्दी ह्याच गोष्टी या देशात दिसून येतात. जातिसंस्था माणसाला ह्या सर्व गोष्टींपासून वाचविते. तिच्यामुळे माणसाला कमी पैशात उदरनिर्वाह चालविणे शक्य होते आणि सर्वांना कामही मिळते. या जातिसंस्थेमुळेच माणसाला स्वतःच्या आत्म्याबद्दल विचार करावयाला वेळ मिळतो आणि भारतीय समाजांत आम्हाला हीच गोष्ट हवी आहे.
ब्राह्मणाचा जन्म हा ईश्वराच्या उपासनेसाठी असतो, आणि तो जितक्या उच्च उपजातीचा असेल तितकी त्यांची मानसिक बंधने जास्त असतात. जातिसंस्थेनेच आम्हाला राष्ट्र म्हणून जिवंत ठेविले आहे, आणि तिच्यांत पुष्कळ दोष असले तरी तिच्यापासून होणारे फायदे कितीतरी जास्त आहेत.

असो. ग्रंथावलीतून बघू आणखी काय मिळते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

होय

त्यांनी हेही म्हटले आहे.
"Caste is a social custom, and all our great preachers have tried to break it down... everyone made the mistake of holding caste to be a religious institution and tried to pull down religion and caste altogether, and failed.

In spite .., caste .. is now filling the atmosphere of India with its stench, and it can only be removed by giving back to people their lost social individuality. ... Trade competition with Europe has broken caste more than any teaching. "

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हे सारेच गोंधळात पाडणारे

स्वामीजींनी तेही, तसेही म्हटले आहे. स्वामीजींनी हेही, असेही म्हटले आहे. हे सारेच गोंधळात पाडणारे आहे. एकीकडे पाश्चिमात्यांचा जातिभेद हा भारतीयांच्या जातिभेदापेक्षाही वाईट असेही म्हटले आहे. दुसरीकडे जातीला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात युरोप यशस्वी झाला आहे, असेही म्हटले आहे. मांसाहाराबाबतही त्यांची मते गोंधळात पाडणारी आहेत. असो. तूर्तास एवढेच. वेळ मिळाल्यावर त्यांची आणखी काही मते टाकीन.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत

+१

आणखी एक

विवेकानंद ग्रंथावलीतून आणखी एक:

आता या जातिभेदाचीच गोष्ट घ्या. संस्कृतात 'जाती' शब्दाचा अर्थ वर्ग (species) असा आहे. हा वर्गविभाग सृष्टीचे मूळच आहे. विचित्रता अथवा जाती म्हणजेच तर सृष्टि. मी एक आहें, मी अनेक होईल,'-- एकोऽहं बहु स्याम् हें वचन विभिन्न वेदांतून आढळतें. एकता ही झाली सृष्टिपूर्व स्थिती. बहुत्व, विचित्रता म्हणजेच सृष्टी. हे वैचित्र्य नाहीसें झाल्यास सारी सृष्टीच विनाश पावेल.
जोवर एखादा वर्ग जिवंत आहे, क्रियाशील आहे तोंवर त्यांतून वैचित्र्य वा विविधता उत्पन्न होत राहणारच. ज्या क्षणीं त्यांतून होणारें हे विविधतेचे उत्पादन थांबते वा थांबविले जातें, त्या क्षणी तो वर्ग मृत्युमुखीं पडतो. अशी रीतीनेम मुळांत जातीचा अर्थ होता प्रत्येक व्यक्तीला आपला वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव वा स्वतःची प्रकृति वा जात अभिव्यक्त करण्याची स्वतंत्रता; जातीचा हा अर्थ हजारो वर्ष प्रचलित होता. अगदी अलीकडल्या ग्रंथांतून देखील विभिन्न जातींच्या एकत्र भोजनाचा वा रोटीव्यवहाराचा निषेध आढळत नाही, किंवा प्राचीन ग्रंथांत भिन्नभिन्न जातींचा आपसांत विवाह किंवा बेटीव्यवहार असल्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. तर मग भारताच्या अधःपतनाचे कारण काय? ते कारण म्हणजे जातीची ही मूळ कल्पना सोडून देणे हे होय. जाती नष्ट झाल्यास जगाचा विनाश ओढवेल असे याच अर्थाने गीतेने म्हटले आहे. आता हे अगदी खरे वाटते की, हे वैचित्र्य नष्ट झाल्यास जगाचा विनाश ओढवेल. आजच्या जाती ह्या मूळा अर्थाने जाती नव्हत, उलट त्या त्या मूळ जातीच्या उन्नतीला प्रतिबंधकच आहेत. त्यांच्यामुळे खरोखर पाहतां खऱ्‍या जातीच्या म्हणजे वैचित्र्याच्या स्वच्छंद व स्वाधीन गतीला अडथळाच झाला आहे. कोणतीही दृढमूल न झालेली रूढी, कुणालाही मिळणाऱ्‍या विशेष सवलती, वा वंशपरंपरेतून निर्माण होणारे विभिन्न वर्ग -- मग तो कोणत्याही स्वरूपाचे असेनात का -- जातीच्या स्वच्छंद गतीला अडथळा आणतात आणि ज्या क्षणी कोणत्याही देशांत हे विविधतेचे वा वैचित्र्याचे उत्पादन थांबते त्या क्षणी त्या देशाचे मरण ओढवले असे समजावे. म्हणून, माझ्या देशबांधवांनो, माझे तुम्हाला सांगणे आहे की तुम्ही या मूळ जातीला बाधा आणली, तिचा उच्छेद केला व त्यामुळेच भारताचे पतन झाले. दृढमूल झालेली उच्च कुलीनत्वाची भावना वा विशेश सवलती असलेला कोणताही वर्ग ह्या काही जाती नव्हत, तो मूळ जातीवर केलेला आघातच होय. जातीला पूर्ण वाव द्या, तिच्या मार्गांत येणारे अडथळे दूर करा, तरच आपली उन्नती होईल. आता युरोपकड पाहा, जातीला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यांत जेव्हा युरोप यशस्वी झाला आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या जातीचा विकासा करण्यांत येणारे अडथळे युरोपने जेव्हा दूर सारले तेव्हाच त्याची उन्नती झाली... ...मूल जन्मतांच ज्योतिषी त्याचें जातक वर्तवून त्याची जाती ठरवण्याचा प्रयत्न करतो हे साऱ्या हिंदूंना ठाऊक आहे. तीच खरी जात हो, तेंच खरे व्यक्तित्व होय, आणि ज्योतिषशास्त्राने त्याला मान्यता दिली आहे. या मूळ जातीला पूर्ण वाव दिल्यानेंच आपले पुनरुत्थान होऊ शकेल.

स्वामी विवेकानंदांनी उत्क्रांतिवादाचा अभ्यास केला होता आणि हर्बर्ट स्पेन्सरशी त्यांचा काही काळ पत्रव्यवहार होता, हे इथे नमूद करायला हवे.

चित्रा आणि धनंजय

मला एक मराठी दुवा मिळाला ज्यात विवेकानंद आणि विशिष्ठद्वैतवाद असा लेख आहे. तो एकदा पहावा.

भंपक

कॉम्रेड श्री. ग. सरदेसाई ह्यांचे एक पुस्तक आहे

कॉम्रेड!!! प्रश्न संपला आहे!

काही तरी करून 'हिंदू कसे वाईट' हे पटवायचे निरनिराळे मार्ग आहेत अजून काही नाही.
मग त्यासाठी सदैव प्रमुख हिंदू व्यक्तिमत्त्वांचे चारित्र्यहनन करत राहणे हा मार्ग चोखाळला जातो.
यांना हिंदूंचे काहीही आणि अश्याही स्वरूपात चालणार नाही, आवडणार नाही हे सत्य आहे. कशाला चर्वीतचर्वण करता?

सरदेसाई यांनी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यातले प्रमुख आत्मविरोध यावर काही लिखाण केले आहे का हो?

- शिवा

भंपक?

कॉम्रेड!!! प्रश्न संपला आहे!

तुमच्या दृष्टिने संपला असल्यास ठिकच.


काही तरी करून 'हिंदू कसे वाईट' हे पटवायचे निरनिराळे मार्ग आहेत अजून काही नाही.
मग त्यासाठी सदैव प्रमुख हिंदू व्यक्तिमत्त्वांचे चारित्र्यहनन करत राहणे हा मार्ग चोखाळला जातो.
यांना हिंदूंचे काहीही आणि अश्याही स्वरूपात चालणार नाही, आवडणार नाही हे सत्य आहे. कशाला चर्वीतचर्वण करता?

हे म्हणजे बगळ्याला कावळा किंवा कावळ्याला बगळा बनवण्या सारखे वाटतेय.
आय मिन जर तुमच्याकडे मुद्दे असतील तर जरुर द्या,खंडन करा.
कुणी कितीहि काहिही लिहिले,बोलले तरी कावळ्याचा बगळा होत नसतो,(किंवा उलट)
जे खरे आहे ते सत्य शास्वत आहे.ते कुणाला आवडो न आवडो ते सत्यच असणार ना.. मग का घाबरता?

सरदेसाई यांनी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यातले प्रमुख आत्मविरोध यावर काही लिखाण केले आहे का हो?

सरदेसाईना कदाचीत ते जमले नसेल, तुम्हि करा यावर लिखाण, एखादा स्वतंत्र धागा काढा आपण तिथे चर्चा करु.

खंडन

>> पूजा आणि आराधना यांच्या ग्राम्य विधींनी विरोध करणाऱ्‍या >>
शंकराचार्यांनी कनकधारा, भवानिष्टक आदि स्तोत्रातून देवीची आराधना केलेली आहे.

>> महायान बौद्धांचा शून्यवाद आणि शंकराचार्यांचा अद्वैतवाद यांतील अंतिम सत्याची कल्पना एकच आहे. >>
असेल. बुद्ध हा राजपुत्र सिद्धार्थ होता. हिंदू धर्मापासून बौद्ध धर्म वेगळा निर्माण् झाला तेव्हा हिंदू धर्मातील विचार बौद्ध धर्मात असणारच.

सौंदर्यलहरीमध्ये मूलाधार, मणीपूर चक्रे, प्रकृती, पुरुष यांचा परस्पर संबंध या काही गोष्टी वाचल्याचे आठवते. ते पुस्तक आत्ता माझ्याकडे नाही. असो. तेव्हा हिंदू धर्म हा सुपरसेट असावा आणि बौद्ध धर्म हा त्याचा सबसेट असावा. किंवां निदान दोन्हीमध्यी काही गोष्टी सामाईक असाव्यात. त्याचा अर्थ शंकराचार्य प्रच्छन्न् बौद्ध होते असा सरसकट घेतला जाऊ नये.

शोकांतिका वगैरे काही नसावी कारण स्वतः शंकराचार्य भक्ती आणि ज्ञान दोहोंचा आदर्श मिलाफ असले तरी सामान्य माणसाची कुवत ज्ञानमार्गाला जाण्याची नसते हे त्यांना नक्कीच ज्ञात असावे. त्यामुळे त्यांनी "भज गोविंदम" सांगून निदान भक्तीमार्ग दाखविला असावा.

समताधिष्ठित म्हणायचे तर त्यांनी वर्ण व्यवस्थेला खतपाणी घातल्याचा उल्लेख कधी माझ्या (तुटपुंज्या) वाचनात आला नाही.

कुठल्या हिंदू धर्मापासून?

हिंदू धर्मापासून बौद्ध धर्म वेगळा निर्माण् झाला तेव्हा हिंदू धर्मातील विचार बौद्ध धर्मात असणारच.

उपनिषदांच्या काळात अनेक पंथ उदयास आले. पण त्या काळच्या धर्माला हिंदू धर्म म्हणता येणार नाही. तुम्ही कुठल्या हिंदू धर्माची गोष्ट करताहात? असो. एखाद्या (तुमच्या हिंदू) धर्मापासून बौद्ध धर्म वेगळा निर्माण झाला म्हणजे काय झाले? कृपया समजावून सांगावे, ही विनंती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कुठल्या हिंदू धर्मापासून?

मलाहि हे जाणून घ्यायला आवडेल,

पुरानकालातील वैदिकधर्म म्हणजेच आताचा हिंदूधर्म असे म्हणन्याचा प्रघात आहे, अशी माझी माहिती आहे.
श्री.प्रभाकर नानावटीसर यावर अधिक प्रकाश टाकतील असे वाटते.

गृहीतक

>> पण त्या काळच्या धर्माला हिंदू धर्म म्हणता येणार नाही.>>
असे असेल तर माझ्या वाक्याला अर्थच रहात नाही कारण माझे गृहीतकच हे होते की गौतम बुद्ध हा राजपुत्र सिद्धार्थ असते वेळी हिंदू होता आणि त्याने बौद्ध धर्माची स्थापना केली. तेव्हा हिंदू धर्मातील विचार थोडेफार बौद्ध धर्मात आले. अशा रीतीने हिंदू धर्मापासून बौद्ध धर्म वेगळा झाला.

अभ्यास नसल्याने अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण आपले वाक्य खटकते. त्या काळी हिंदू धर्म नव्हता तर मग गौतम बुद्ध नक्की कोणत्या धर्माचा होता? आणि हिंदू धर्माचा उदय मग झाला तरी केव्हा? बौद्ध धर्मानंतर?

गृहीतकच चुकिचे

कारण तुम्हि म्हणता तो हिंदू धर्म तेव्हा अस्तित्वात नव्हता,
तेव्हा वेगवेगळे पंथ होते,वैदिक धर्म किंवा पंथ शैव अन वैष्णव यांचे वेगवेगळे पंथ होते.पंथ म्हणजे धर्म नाहि.
बौध्द धर्म हा साधारणतः हा इ.स.पू..५००वर्षे आहे आणि हिंदू धर्म हा ७-८ व्या शतकातला आहे.
वैदिक पंथ, शैव अन वैष्णव पंथ यांचे एकत्रीत मिश्रण म्हणजे आजचा हिंदू धर्म असे मला वाटते,
मग तुम्ही म्हणतात तसे हिंदू धर्माचा उदय त्या नंतर झाला असावा.
यापैकी गौतम बुद्ध कोणत्या पंथात होता हे सांगता येत नाही,
जाणकार यावर प्रकाश टाकतील

शक्य आहे.

धन्यवाद.

मार्ग ...

भक्तीमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे मार्ग एम. जी. रोड, जे. एन. रोड यासारखे वेगवेगळे नसतात. सविस्तर माहितीसाठी मी अन्य प्रतिसादात उल्लेख केलेले पुस्तक (वेध एका महावताराचा) अवश्य वाचा.

शंकराचार्य

शंकराचार्यप्रणीत म्हणून जी कित्येक स्तोत्रे दिसतात ती आदिशंकराचार्य ह्यांची आहेत असे आपण खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही, गेल्या बाराशे वर्षात काही शे जणांना ही उपाधि मिळाली होती त्यातील कोणाचीहि ती असू शकतील. तेव्हा त्या स्तोत्रांवर आधारित कोणताहि युक्तिवाद आदिशंकराचार्यांच्या संदर्भात पुरेसा आधार असलेला आहे असे म्हाणता येणार नाही.

अरविंद कोल्हटकर, ऑगस्ट ०२, २०११.

पास

चर्चा वाचतोय .. मत पास! :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शंकराचार्य

शंकराचार्यांची मते आणि पुरुषोत्तम खेडेकरांची मते यांच्यात विस्मयकारक साम्य दिसते आहे.
सन्जोप राव
मुत्तकोडीकव्वाडीहडा, मुत्तकोडीकव्वाSSSडीहडा
प्यार में जो ना करना चाहा, वोभी मुझे करना पडा

मत.

>>‏शंकराचार्यांचा अवतार झाला नसता तर समाजव्यवस्था अधिक समताधिष्ठीत झाली असती काय?
समताधिष्ठीत समाजाची इच्छा असणारे शंकराचार्यएवढे अजस्त्र बुद्धिमत्तेचे किंवा क्षमतेचे होऊ शकले नाहीत हे खरे कारण असावे.

>>‏शंकराचार्यांचा अवतार झाला नसता तर हिंदू धर्म नामशेष झाला असता काय?
असे वाटत नाही.

>>शंकराचार्यांची दार्शनिक भूमिका आणि हिंदूधर्मशास्त्रचा पुरस्कर्ता ह्या भूमिकेत भेद होता का? भेद असल्यास का होता?
भेद नसावा, द्वैतातून अद्वैताकडे जावे असे त्यांचे मत असावे, वर दिल्याप्रमाणे शुचि ह्यांच्या मताशी सहमत.

आदि शंकराचार्य

आदि शंकराचार्यांबद्दल मला फारशी माहिती नव्हती. या चर्चेच्या निमित्ताने थोडी वाचायला मिळाली. शिवाय चर्चेतली माहिती ती पण खूप महत्वाची मिळाली.

आदि शंकराचार्यांबद्दल त्यांची ग्रंथसंपदा सोडल्यास आणि शंकरमठांच्या परंपरेतून आलेल्या चरित्राशिवाय फारशी माहिती नसावी (विकी आणि विश्वकोशावरून मिळालेल्या माहितीनुसार.). त्यांचा काळही थोडाफार संशयात आहे. विश्वकोशात अहिताग्नी राजवाड्यांचे मत मांडले आहे. त्यानुसार शंकराचार्यांचे ग्रंथ हे संन्याशांच्या संघटनेने सन्यासमार्गाची भलामण करण्यासाठी प्रसृत केलेले असावेत. त्यांचा काल इस. पूर्व ५०९ वा इ.पू. ४४ असा दाखविला जातो. (सध्याचा जास्त मान्य काळ ७८८-८२० मॅक्समुल्लरनुसार).

विश्वकोशात असेही लिहिले आहे (खंड १७) की ब्रह्मसूत्रात त्यांनी असे म्हटले आहे की जग आणि ब्रह्म दोन्ही सत्य आहेत.

शंकराचार्यांना साक्षात शंकराचा अवतार असे काही परंपरेने मानले जाते. यात मला जो विरोधाभास दिसला तो असा की त्यांची ग्रंथसंपदा ही वैष्णववादाकडे दिसते. (भज गोविंदं आणि गीतेवरील भाष्य).

शंकराचार्यांचे एक महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेली काही (४ +) पीठे. या परंपरेतील शंकराचार्यांचा समाजावर बराच पगडा होता. (उदा. टिळकांच्या ग्रामण्य प्रकरणात शंकराचार्याचे मत घेतले होते असे काहीसे वाचल्याचे आठवते.)

त्यांनी बुद्धविचाराचा पाडाव केला का? याबाबतीत कुठलेच मत व्यक्त करता येत नसावे. मंडनमिश्र आणि शंकराचार्यांचा वाद प्रसिद्ध आहे. पण त्यात मंडनमिश्रांनी बुद्धमत मांडले नसावे असे मला जे काही वाचले त्यावरून वाटले.

आजचा हिंदू धर्म हा शंकराचार्यांना अभिप्रेत असलेला धर्म नसावा (आज कुठे ज्ञानमार्गी हिंदू धर्म आहे?). शंकराचार्यांनी भक्तिधर्माचा पुरस्कार केला असे त्यांच्या भजगोविंदं वरून वाटते. पण ते खरे आहे का?

वरील प्रतिसादात विवेकानंदांचा उल्लेख आणि चर्चा होत आहे. या दोघातील विचारसाम्य (ज्ञानमार्गाचा वा अद्वैताचा पुरस्कार) खूप दिसते. रामकृष्ण मिशन मधे (विवेकानंदांचे प्रमुख संघटन कार्य) भक्तिमार्ग ओतप्रोत भरलेला दिसतो.

थोडेसे अवांतरः दक्षिणपूर्व देशात विशेषतः इंडोनेशियात 'शंकरगुरु' (शंकराचार्यांचे वडील देखिल शंकरगुरु म्हणून ओळखले जातात.) यांच्या मूर्त्या आढळतात. जकार्ताच्या म्युजियम मधे यातील काही पाहिल्या. दक्षिणपूर्वेतील हिंदू धर्म प्रसार आणि शंकराचार्य यांचा काही संबंध आहे का याबद्दल अधिक वाचायला आवडेल.

प्रमोद

एक सन्दर्भातील एक महत्वाचे पुस्तक

आद्य शन्कराचार्य - वेध एका महावताराचा (लेखक - स. कृ. देवधर, मेघःश्याम सावकार)
अवश्य वाचा. धन्यवाद.

 
^ वर