शिळ्या कढीला ऊत

महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मणविरोधी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या मंडळींमध्ये प्रा. हरी नरके यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. नरके यांचे विचार आणि भाषा आ.ह. साळुंखे, पार्थ पोळके आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्याइतके आक्रमक नसले तरी त्यांचे गोत्र तेच. 'विरोध ब्राह्मण्य या प्रवृत्तीला आहे, ब्राह्मण या माणसाला नव्हे' हे वाक्य आणि हा विचार तर आता चुरगाळून उकीरड्यावर फेकून दिला पाहिजे. या मंडळींचा विरोध हा सरळसरळ ब्राह्मण लोकांनाच आहे. आतापर्यंत हा छुपा अजेंडा होता, पण आता खेडेकरादि मंडळी अधिक थेट, अधिक स्पष्ट झालेली दिसतात.'दुर्जनांचा नाश' करणे हे आपले ध्येय असणारे एक संघटना आणि तिचे प्रकाशन यांतील विनोद जसे खदाखदा हसवणारे असतात, तसेच काहीसे पुरुषोत्तम खेडेकर या भद्रपुरुषाने सुरु केलेले दिसते. एरवी असे लिखाण बहुजन समाजाच्या टाळ्या (आणि ब्राह्मण समाजाचे दुर्लक्ष) मिळवून जाते. पण नरकेंसारख्या त्या मानाने मवाळ वृत्तीच्या व्यक्तीला हे पचवणे जड जाते आहे असे दिसते. नुकताच लोकप्रभेच्या अंकात हा लेख वाचनात आला आणि वाचून भरपूर मनोरंजन झाले. ही शिळी कढी आता आटून आटून पातेल्याच्या तळाशी आता निव्वळ करपट अशी खरपुडी राहिली आहे. तथापि निखळ हास्य दुर्मिळ झालेल्या दिवसांत असले काही उपलबद्ध करुन दिल्याबद्दल खेडेकरांचे आभार मानले पाहिजेत. नरकेंना बाकी अशी खिलाडूवृत्ती दाखवता आलेली दिसत नाहे. त्यामुळे त्यांनी खेडेकरांवर अपयश, अपराधगंड आणि मानसिक असंतुलन असे आरोप केले आहेत. नरकेंना 'हलकेच घ्या' असा संदेश कुणीतरी पोचवला पाहिजे. लोकप्रभेच्या पुढच्या अंकाची प्रतिक्षा तर आहेच.

लेखनविषय: दुवे:

Comments

जांभई

लेख आणि त्याचा विषय हे दोन्ही बघून एक मोठी जांभई आली.
चन्द्रशेखर

+१

+१

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

द्वेष

'विरोध ब्राह्मण्य या प्रवृत्तीला आहे, ब्राह्मण या माणसाला नव्हे' हे वाक्य आणि हा विचार तर आता चुरगाळून उकीरड्यावर फेकून दिला पाहिजे. या मंडळींचा विरोध हा सरळसरळ ब्राह्मण लोकांनाच आहे. आतापर्यंत हा छुपा अजेंडा होता,

शोषण करणारा तो ब्राह्मण असा पवित्रा काही लोकांनी घेतला आहे. ब्राह्मण व ब्राह्मण्य या शब्दांच्या कसरती करत सतत द्वेषाची आग तेवत ठेवणे हाच भाग यात असतो. आमचा विरोध ब्राह्मणांना नसुन ब्राह्मण्याला आहे असे ठेवणीतील वाक्य या लोकांच्या बोलण्यात नेहमी असतात. आमचा विरोध सनातनी वृत्तीला आहे असे ते म्हणत नाहीत.अशा लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यातील काही प्रसंग यासाठी कारणीभूत असावेत.
या पुर्वी उपक्रमावर झालेली ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार ही चर्चा यानिमित्ताने वाचता येईल
प्रकाश घाटपांडे

समस्त मराठा समाज

लेखकास (पक्षी श्री.सन्जोप राव) नम्र विनंती की प्रथम त्यानी 'हरी नरके हे पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणविरोधी चळवळीचे नेतृत्व करतात' हा समज आपल्या विचारातून काढून टाकावा. कोल्हापूर, सांगली, सातारा इथे कॉ.गोविंद पानसरे, एन.डी.पाटील आणि दिलिप पवार यांच्या अध्यक्षतेखाली दोनचार फुटकळ सभा घेऊन टाळ्याखाऊ वाक्ये फेकली म्हणजे प.महाराष्ट्रातील झाडून सारा "मराठा+कुणबी" समाज त्यांच्या मागे वावटळीसारखा गेला असा बिलकुल अर्थ होत नाही. संविधानाने देशाच्या नागरिकाला विचार-अभिव्यक्ती अंतर्गत जे काही स्वातंत्र्य दिले आहे त्याचाच परिपाक म्हणून हे स्वयंघोषित नेते आपल्या अंतस्थ हेतूचा कार्यभार साधत असतात.

तिच गोष्ट खेडेकर नामक पुरुषोत्तमाची. आगखाऊ लेखन केले आणि चार टवाळखोर पोरे अवतीभवती जमा झाली म्हणून सारे राज्य माझ्या मागे आले अशा समजुतीने एका विशिष्ट मग्रुरीने आपला छ्कडा माळरानावर फिरविणार्‍या पंक्तीतील ती व्यक्ती. येणकेन प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्याच त्याच विषयावर आणि २१ व्या शतकातही जातिजातीत तेढ माजविण्याचे दर दिवशी पत्रके काढली म्हणजे समस्त मराठा त्यांच्यामागे धावला असेही मानू नये. सत्ताधारी राजकारणी लोकही 'बरा आहे एक, खाजविण्यासाठी' अशी सोयिस्कर वस्तुस्थिती पाहून या ना त्या माध्यमाद्वारे त्या विचारांना पंखा देत राहतात. शिवाय बाळासाहेब ठाकरे नावाच्या दुखण्यावर "आपल्याकडील पोतडीत" असे एक मलम त्याना हवे असतेच.

श्री.नरके यांच्या ताज्या लेखातील विचार यापूर्वीही वाचले असल्याने यात त्यानी नव्याने काय सांगितले हा एक संशोधनाचा विषय होईल आणि खुद्द खेडेकर त्याला जालीय भाषेत "फाट्यावर" मारतीलच, हे सांगण्याचीही खरे तर आवश्यकता नाही. जास्तीतजास्त काय होईल तर परत एकदा आठ-दहा 'अर्चिन्स' लोकप्रभेच्या कार्यालयात घुसून त्यांचा नेहमीचा नेमाडीछाप "उद्या पुन्हा हाच खेळ" प्रयोग करतील.

सध्याच्या वातावरणात मराठा वि. ब्राह्मण (किंवा व्हाईस व्हर्सा) हा उन्माद माजविण्याची कोणतीही गरज नसल्याने प्रत्येक सुजाण व्यक्तीला त्या विरूद्ध उभे राहणे क्रमप्राप्त आहे. ब्रिगेड वा खेडेकर (आणि ह.न.देखील) आदींच्या विचाराला 'फॅसिस्ट', 'धर्मनिरपेक्षताविरोधी', 'जातिवादी', 'ब्राह्मणीवर्चस्व विरोधी', अशी शेलकी विशेषणे वेगवेगळ्या ढंगात सादर करून जसा विरोध होणार नाही तद्ववतच त्यांच्या विचारांना सार्वजनिक संस्थळावर मोलाची बॅण्डविड्थ खर्च करून थाराही देऊ नये.

पण आता इथे हा विषय छेडलाच आहे तर एक मराठा म्हणून (आणि असे शेकड्यांनी नव्हे तर हजारोनी) मी इतकेच सांगू इच्छितो की मूळात या देशाच्या राजकारणात ज्यावेळी "हिंदुत्वा"चा मुद्दा काही राजकीय शक्तीनी ऐरणीवर आणला त्याचवेळी खेडेकरप्रणित विचारांचे बिजारोपण झाले. कुठेतरी या उपजातींना भय वाटत गेले की हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लिमांसमवेत आमचाही 'राडा' करण्याचा विचार कुठेतरी रुजतो आहे की काय ? त्यातही गेल्या दशकात विविध आर्थिक क्षेत्रातील घडामोडीमुळे मध्यमवर्गीयाच्या बॅन्क बुकांना आलेली बर्‍यापैकी सूज आणि तिला कुठेतरी खर्चायला जागा मिळावी म्हणून पद्धतशीरपणे वाढविण्यात आलेले 'धर्म महत्व'...मग ती मंदिरांची वाढती संख्या (आणि ट्रस्टची समृद्धी), प्रवासी कंपन्यांतून भरभराटीस आलेला व कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालवणारा तीर्थक्षेत्रकेन्द्री वाहतूक व्यवसाय; पोथ्या, हिंदू धर्मग्रंथाची होणारी तुफान विक्री, भजनांच्या, मंत्रांच्या नामस्मरणाच्या व पूजाविधींच्या कॅसेट्स, सीडीज् यांचा खप, यावर वरचढ म्हणजे चॅनेल्सवरील बाबा, बापू, महाराजांचा २४ तास रतीब. हे पाहता शेवटी एखाद्या विवेकी माणसाला सारच काढायचे झाल्यास हे जातीवाद किंवा जमातीवादीकरण किती मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे याचे उत्तर मिळेल. यावर उपाय तर राहू देच, पण धूर्त राजकारणी ही तेढ आणि तप्त वातावरण असेच राहावे हेच पाहत आहेच याचेच वैषम्य वाटते. नरके त्या लेखात म्हणतात, "अशा लिखाणामुळे खेडेकरांचा विविध कलमाखाली ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते." ~ होईल असे वाटते ? शक्यता फार धूसर वाटते.

थोडक्यात दोघांच्याही विचारामागे समस्त मराठा समाज एकमुखी खडा आहे, असे त्यांच्या लिखाणातून/विचारातून ध्वनीत होत असेल तर ते चुकीचे आहे, इतकेच एक मराठा म्हणून मी इथे सांगू इच्छितो.

(जाताजाता : वरील प्रतिसादात श्री.प्रकाश घाटपांडे यानी मत प्रकटले आहे, "शोषण करणारा तो ब्राह्मण असा पवित्रा या लोकांनी घेतला आहे." ~ इथे 'या लोकांनी' याचा व्यापक अर्थाने पूर्ण मराठाकुणबी समाज असा होऊ शकतो. तसे जर त्याना म्हणायचे नसेल तर थेट 'खेडेकर विचारी मंडळींना' असा कृपया बदल करण्यात यावा अशी मी श्री.घाटपांडे याना विनंती करीत आहे. धन्यवाद.)

अप्रतिम प्रतिसाद

श्री. पाटील यांना या प्रतिसादानिमित्त एक दणदणीत स्टँडिंग् ओव्हेशन दिले पाहिजे. उपक्रमावर आणि आणखीन एका संस्थळावर लिखाण् करणार्‍या आमच्या एका खास 'खेडेकरी' दोस्ताला आम्ही हा प्रतिसाद् जरूर् वाचायला देणार्.

उत्तम प्रतिसाद

देशाच्या राजकारणात ज्यावेळी "हिंदुत्वा"चा मुद्दा काही राजकीय शक्तीनी ऐरणीवर आणला त्याचवेळी खेडेकरप्रणित विचारांचे बिजारोपण झाले.

ह्यामुळे अनेक अविचारांचे बिजारोपण झाले त्यापैकी एक म्हणजे खेडकरप्रणित विचार असावा. आजही अमेरिकन न्यूज च्यानेलवाले, 'पाकिस्तानला 'हिंदू' भारतापासुन धोका असल्याने, आयएसाआय वगैरे संस्था पोसाव्या लागतात' अशी विधाने करतात तेव्हा भारताची 'सेक्युलर' ही ओळख हिंदुत्ववादी शक्तींनी पुसुन टाकली आहे असे वाटते.

"पाकिस्तानला 'हिंदू' भारतापासुन धोका असल्याने"

छे हो.
भारत अगदि कट्टर "सेक्युलर" वगैरे असतानाच तीन् युद्धे झालीत् ना?(४८,६५,७१)
आता "हिंदुत्ववाद्यांमुळे" धोका वगैरे सगळं झूट आहे. भारतातुन हिंदुत्ववादी नामशेष झाले(किंवा व्यवस्थितपणे नामशेष केले गेले ) तरी आपले शेजारी काय सीमावर्ती राज्यांवरचा हक्क सोडुन् देतील असे काही आहे काय्?
उग्गाच ती अमेरिकन माध्यमे काय म्हणतील, त्यांना काय् वाटेल म्हणुन इथल्यांनी त्यांची मते बदलायची का काय्?
ह्याउलट भारतीय माध्यमे काय् म्हणतात ह्याची तो ओबामा कधीतरी खरोखरीच काळजी करेल काय्?
(हिंदुत्ववाद्- सेक्युलर झगड्यात पडु इच्छित नाही, फक्त शक्यता सांगाविशी वाटली. )

मूळ लेखाबाबतः- लेखकाशी सहमत.

--मनोबा

शक्यता

भारत अगदि कट्टर "सेक्युलर" वगैरे असतानाच तीन् युद्धे झालीत् ना?

भारत पाकिस्ताचा झगडा हा पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच सुरू आहे पण त्यावेळी पाकिस्तानचा 'हिंदू' भारताशी झगडा सुरू आहे असे परदेशी प्रसार माध्यमे म्हणत नसावीत. आजकाल तसे म्हंटले जाते. अर्थात हा त्यांचा इग्नोरन्स असला तरी मधल्या काळात हिंदुत्ववादी शक्तींनी केलेले प्रकार 'सेक्युलर' प्रतिमा डागाळणारेच होते.

उग्गाच ती अमेरिकन माध्यमे काय म्हणतील, त्यांना काय् वाटेल म्हणुन इथल्यांनी त्यांची मते बदलायची का काय्?

अमेरिकन माध्यमे काय म्हणतील ह्याची अजिबात पर्वा नसावी पण त्यांच्या बरळण्याला पुष्टी देणारे भारताचे वर्तन नसावे असे वाटते. असे काहीसे मत नोंदवायचे होते.

सहमत

तिच गोष्ट खेडेकर नामक पुरुषोत्तमाची. आगखाऊ लेखन केले आणि चार टवाळखोर पोरे अवतीभवती जमा झाली म्हणून सारे राज्य माझ्या मागे आले अशा समजुतीने एका विशिष्ट मग्रुरीने आपला छ्कडा माळरानावर फिरविणार्‍या पंक्तीतील ती व्यक्ती. येणकेन प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्याच त्याच विषयावर आणि २१ व्या शतकातही जातिजातीत तेढ माजविण्याचे दर दिवशी पत्रके काढली म्हणजे समस्त मराठा त्यांच्यामागे धावला असेही मानू नये. सत्ताधारी राजकारणी लोकही 'बरा आहे एक, खाजविण्यासाठी' अशी सोयिस्कर वस्तुस्थिती पाहून या ना त्या माध्यमाद्वारे त्या विचारांना पंखा देत राहतात. शिवाय बाळासाहेब ठाकरे नावाच्या दुखण्यावर "आपल्याकडील पोतडीत" असे एक मलम त्याना हवे असतेच.

प्रतिसाद आवडला.

सध्याच्या वातावरणात मराठा वि. ब्राह्मण (किंवा व्हाईस व्हर्सा) हा उन्माद माजविण्याची कोणतीही गरज नसल्याने प्रत्येक सुजाण व्यक्तीला त्या विरूद्ध उभे राहणे क्रमप्राप्त आहे. ब्रिगेड वा खेडेकर (आणि ह.न.देखील) आदींच्या विचाराला 'फॅसिस्ट', 'धर्मनिरपेक्षताविरोधी', 'जातिवादी', 'ब्राह्मणीवर्चस्व विरोधी', अशी शेलकी विशेषणे वेगवेगळ्या ढंगात सादर करून जसा विरोध होणार नाही तद्ववतच त्यांच्या विचारांना सार्वजनिक संस्थळावर मोलाची बॅण्डविड्थ खर्च करून थाराही देऊ नये.

१०० टक्के सहमत. वचक बसविण्याच्या दृष्टीने द्वेष पसरविणाऱ्यांविरुद्ध लगेच कारवाया केल्या पाहिजे.

हरी नरके ह्यांची उशीरा काही होईना डोळे उघडलेले आहेत. हल्ली त्यांनी ब्रिगेडविरुद्ध आघाडीच उघडली आहे. ( त्यांचा लोकप्रभात ह्यापूर्वी छापून आलेला 'दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण' हा लेख वाचावा.) ब्रिगेडच्या राजकारण हे डीएमके (देशमुख-मराठी-कुणबी) काँप्लेक्सचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी आहे असे दिसते. आणि ह्याचा धोका ब्राह्मणांपेक्षा इतर बहुजनांना आणि दलितांना अधिक जाणवतो आहे.

मी इतकेच सांगू इच्छितो की मूळात या देशाच्या राजकारणात ज्यावेळी "हिंदुत्वा"चा मुद्दा काही राजकीय शक्तीनी ऐरणीवर आणला त्याचवेळी खेडेकरप्रणित विचारांचे बिजारोपण झाले.

अगदी अगदी. एकीकडे ब्रिगेडला विरोध करणारे दुसरीकडे हुसैन ह्यांच्या निधनांतर आनंद व्यक्त करतात ह्यातच सगळे आले. काय बरोबर की नाही अप्पा जोगळेकर?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कुणास ठाऊक् ?

एकीकडे ब्रिगेडला विरोध करणारे दुसरीकडे हुसैन ह्यांच्या निधनांतर आनंद व्यक्त करतात ह्यातच सगळे आले. काय बरोबर की नाही अप्पा जोगळेकर?
कुणास ठाऊक् ? असेलसुद्धा. नालायक् माणूस् मेल्यावर् पुष्कळ् चांगली माणसे आनंद् व्यक्त् करत् असतात् हे माहितेय्.

चालू द्या

एकाचवेळी

१) हिटलरवर प्रेम करणे
२) हिंदुत्ववादाचे समर्थन करणे
२) ब्रिगेडला विरोध करणे
३) हुसैन मेल्यावर आनंद व्यक्त करणे
४) आरक्षणाला विरोध करणे

....
वगैरे वगैरे केवळ जोगळकरांसारख्यांच्या जमातीलाच शक्य आहे. चालू द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अतिशय सहमत

हाच तो दुट्टपि पणा

एकाचवेळी
१) हिटलरवर प्रेम करणे
२) हिंदुत्ववादाचे समर्थन करणे
२) ब्रिगेडला विरोध करणे
३) हुसैन मेल्यावर आनंद व्यक्त करणे
४) आरक्षणाला विरोध करणे

वगैरे वगैरे केवळ जोगळकरांसारख्यांच्या जमातीलाच शक्य आहे. चालू द्या

हुसेन'जी' गेल्यावर आनंदाने नाचणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे.

ओ व्ह र रे टे ड

खेडेकर हा एकंदरच (समर्थकांकडून तसेच विरोधकांकडूनही) ओव्हररेटेड माणूस आहे. त्याच्या बाष्कळ बडबडीची सांगोपांग चिकित्सा करणारे लेख लिहिणे हा वेळेचा आणि उर्जेचा अपव्यय आहे. अर्थात नरके यांचा लेख हा चिकित्सा करण्याच्या उद्देशापेक्षा 'आंबेडकरी चळवळ हायजॅक' होण्याच्या भीतीतून आलेला आहे असे दिसते आहे.
एकंदर अनुल्लेखाने मारण्यालायक माणूस आणि लेख.

गांभिर्य

श्री खेडेकर या व्यक्तिच्या गरळीस गांभिर्याने घेण्याचे काही कारण दिसत नाही पण इतक्या नंगटपणे एखाद्या जातीच्या किंवा जातीविरोधाच्या छत्राखाली समुदाय जमा करण्याच्या वृत्तीकडे गांभिर्याने पाहिले जावे, असे वाटते. अशा वृत्तींची बीजे हिंदुत्वासारख्या चळवळींमुळे रोवली गेली हे गृहीतक असल्यास तर काळजीपूर्वक तपासले पाहीजे किंवा निष्कर्ष असल्यास त्यामागील आधार स्पष्ट केला गेला पाहीजे. मागे एका चर्चेत मांडलेले मत पुन्हा एकदा येथे देत आहे.

मराठा सोडून महाराष्ट्रात प्रामुख्याने वंजारी, माळी, धनगर या जाती राजकियदृष्ट्या सशक्त आहेत. मी लहानपणापासून मराठा कुटूंबांत जातीय अस्मितेला गोंजारण्याची वृत्ती पाहत आलो आहे. या इतर जातींची राजकिय-आर्थिक प्रगती अनेक वर्षे सत्तेत असलेल्या मराठ्यांना सलते. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसारख्या पेरिफेरल संघटनांना फारसा पाठींबा नाही हे मान्य करणे मला जड जात आहे. पण अशा संघटनांना (मराठा महासंघ वगैरे) फारसा राजकिय वरदहस्त मिळत नसे तो आजकाल मिळू लागला आहे, असे माझे मत होत आहे.

तेथेच वाढत्या शहरीकरणाचे मतांवर होणार्‍या परिणाम म्हणून या वृत्तीस खतपाणी घातले जात आहे असेही मत मांडलेले आहे.

रा काँ..

या सार्‍या ब्राह्मणद्वेषाच्या मागे शरद पवार, अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे. हीच मंडळी साळुंखे, खेडेकर वगैरेंच्या करवी ब्राह्मणद्वेषाचे रीतसर पालनपोषण करत आहेत..

आपला,
(बहुजनसमाजवादी चित्पावन) तात्या अभ्यंकर.

तात्या पटलं नाही हं....

तात्या,चर्चेचा प्रस्ताव आणि प्रतिसाद वाचले नाहीत परंतु तुमच्या प्रतिसादातल्या ब्राह्मणद्वेषामागे राष्ट्रवादी पक्ष आहे, असे जे मत आहे ते पटले नाही हं.

अवांतर : बाकी, तुम्ही कुठे अहात राव. वर्ष झाले फोन नाही काही नाही.:(

-दिलीप बिरुटे

 
^ वर