स्पिरीट

मुंबईतल्या स्फ़ोटानंतर मुंबईतले जनजीवन पहिल्या पानावरुन पुन्हा सुरू झाले. दरवेळेस याला मुंबईचे स्पिरीट म्हणतात. पण खरंच हे स्पिरीट आहे का मुंबईकरांचा नाईलाज, असहाय्यता, ऎन्ड सो ऑन... आज कामावर गेले नाहित तर त्यादिवसाच्या कमाईच काय? आणि भारताने निवडून दिलेले मंत्रीमहोदय(चिदंबरम) जर म्हणत असतील कि दहशतवादी हल्ले रोखणे कठीण आहे (सोर्स-स्टार माझा) तर आमच्यासारख्या सामान्याचं काय हो. यापेक्षा अफ़गाणिस्तानात राह्यलेलं काय वाईट?
अजुन एका मान्यव्रांचं काय म्हण्ण आहे पहा,
"अमेरिकेतही ह्ल्ले होतातच" ---मा श्री राहुल गांधी >> सोर्स-- स्टार माझा
अमेरीकेतही असेच जनजीवन मुंबई स्पिरीटने सुरू होते का? कि तिथे काही वेगळी प्रतिक्रिया असते? जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा प्लीज.

अवांतर-- अजुन एक अतिरेकि बिचा-या मुंबैच्या मागे लागला आहे तो म्हंजे पाउस.

Comments

बापरे

बापरे!!!
उघड उघड मंत्री अशी शरणागती पत्करत असतील तर सामान्य माणसाने जायचे कुठे? उद्या संपूर्ण अंदागोंदी माजेल की अशाने.

अमेरीकेत एकच हल्ला झाला - ट्वीन टॉवर्स वर त्यानंतर कुठे काही झालं. तो राहुल गांधी कोणत्या फूटपटीनी मोजतो आहे देशाची सुरक्षितता?

समज

>>अमेरीकेत एकच हल्ला झाला - ट्वीन टॉवर्स वर त्यानंतर कुठे काही झालं.

हा समज तितकासा खरा नाही.

नितिन थत्ते

स्पिरीट

अख्खे इस्रायील गेले अनेक वर्षे लढत आहे तरी देखील तिथले जीवन चालू आहेच, मुंबई अशी कोण लागून गेली? :)

सगळीकडे माणसे सारखीच असतात, हातावर पोट किंवा स्मरणशक्ती कमी असलेली माणसे चटकन मार्गाला लागतात, उपायच नसतो.

राजकारणी देखील सगळीकडे सारखेच असतात, त्यांना बहुदा तसे असावेच लागते.

काही लोक 'स्पिरीट' घेऊन कामाला लागतात हे मात्र दिसते. ;)

दोन पैसे

अमेरीकेतही असेच जनजीवन मुंबई स्पिरीटने सुरू होते का? कि तिथे काही वेगळी प्रतिक्रिया असते

अमेरिकेत दहशतवादी हल्ले झालेल्या शहरात मी राहिलेलो नाही. मी असतांना अमेरिकेत दहशतवादी हल्लाही झालेला नाही, प्रयत्न मात्र झालेले आहेत. अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळून लावल्यानंतर माध्यमांतून सतत त्याची चर्चा केली जाते. इकडेही लोक 'स्पिरिट' वगैरे (इकडचा कौतुकेपणाच भारतातील माध्यमांनी ढापलेला दिसतो.) बोलतात. लोक मुंबैप्रमाणेच कामाला लागतात. अशा हल्ल्यांनंतर भारताप्रमाणेच आक्रस्ताळ्या प्रतिक्रिया येथेही उमटतात. पण कोणी सर्व अमेरिकन लोकांना 'षंढ' वगैरे म्हटल्याचे ऐकिवात नाही.

मग जाऊया की अफगानिस्तानात

अफगानिस्तानातल्या आणि मुंबईतल्या परिस्थितीत फारसा फरक नसेल तर मग जाऊया की अफगानिस्तानात.

उघड उघड मंत्री अशी शरणागती पत्करत असतील तर सामान्य माणसाने जायचे कुठे?

"शरणागती" शब्द जरा टोकाचा वाटतो. "रस्त्यावरचे अपघात पूर्णपणे टाळले जाऊ शकत नाही" असे कुठल्याही देशातला वाहातुकमंत्री तुम्हाला सांगेल. ही शरणागती नव्हे. वाईट प्रसंगांचे प्रमाण (शून्य नव्हे तरी) कमीतकमी व्हावे असे प्रयत्न चालू ठेवावेच लागतात.

गेल्या फेब्रुवारीमध्ये यू.एस.चे उपराष्ट्रपती बायडेन म्हणाले की यू.एस. वरती दहशतवादी हल्ले शक्य आहेत. तरी अजून यू. एस सरकारने शरणागती पत्करल्याचा आरोप काही थोडे लोकच करतात. (पण काही थोडे लोक असा आरोप करतात, हे खरे आहे.)

अमेरीकेतही असेच जनजीवन मुंबई स्पिरीटने सुरू होते का? कि तिथे काही वेगळी प्रतिक्रिया असते?

होय, जनजीवन सुरू होते. मात्र त्या-त्या गावाला त्या-त्या गावाचे स्पिरिट म्हणतात. म्हणजे न्यू यॉर्कच्या बाबतीत न्यू यॉर्कचे स्पिरिट वगैरे. प्रतिक्रिया थोड्याबहुत तशाच असतात. शोक, संताप...

आपल्या बुडाखाली....

अमेरिके मधे ९/११ नंतर हल्ला झाला की नाही या पेक्षा आपल्या बुडा खाली वर्षानुवर्ष काय जळतय या कडे लक्ष द्यायला हवं.

स्पिरिट वगैरे

पण खरंच हे स्पिरीट आहे का मुंबईकरांचा नाईलाज, असहाय्यता, ऎन्ड सो ऑन... आज कामावर गेले नाहित तर त्यादिवसाच्या कमाईच काय?

पुण्याला ब्लास्ट झाला होता, हैद्राबाद आणि दिल्लीत होतात तेव्हा काय ती शहरे बंद पडतात/ पडली का? की तेथे षंढ लोक राहतात? प्रत्येकजण पोटापाण्यासाठी घराबाहेर पडतोच. त्याला स्पिरिट म्हणता येत नाही. काल बॉम्बस्फोट झाला असल्याने आज तो बहुतांशी होणार नाही कारण सुरक्षा व्यवस्था चांगली आहे अशा आशेने कदाचित अधिक माणसेही घराबाहेर पडत असतील कोणजाणे.

मात्र, मिडियाने उगीचच उचलून धरलेला शब्द आहे असे मी म्हणणार नाही. मिडियाने तो चुकीच्या मार्गाने नेला आहे/ दिशाभूल केली आहे असे मात्र म्हणेन. बॉम्बस्फोट झाल्यावरही तेथे थांबून जखमींना मदत करणारे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणारे, रक्तदानासाठी धावून जाणारे लोक होते.

मला स्वतःला २००५ च्या पावसात अडकल्याचा अनुभव आहे. त्यावेळी रात्रीच्या वेळेस काही कॉलेजातील मुले आपापल्या घरांतून उतरून रस्त्यावर आली होती. तिथल्या बायकांना आणि मुलांना आपापल्या घरी घेऊन गेली. रस्त्यावर अडकलेल्यांना ग्लुकोजची बिस्किटे, पाणी वगैरे पुरवण्याचे काम त्यांनी केले. मला, माझ्या आईवडिलांना आणि मुलीला सोडायला ही मुले एक दोन किमी आमच्याबरोबर आली. हे नक्कीच मुंबईचे स्पिरिट आहे. कोणाला मानायचे नसेल तर माझं काहीच म्हणणं नाही.

आमच्यासारख्या सामान्याचं काय हो. यापेक्षा अफ़गाणिस्तानात राह्यलेलं काय वाईट?

मी तुमच्या बुरख्याचा खर्च उचलायला तयार आहे. कधी निघताय? ;-)

अमेरीकेतही असेच जनजीवन मुंबई स्पिरीटने सुरू होते का? कि तिथे काही वेगळी प्रतिक्रिया असते?

अमेरिकेत मुंबई स्पिरिट कसे असेल? असलेच तर अमेरिकन स्पिरिट असेल ना! तशी २००१ ची आठवण कायम राहावी म्हणून प्रत्येक ९/११ या तारखेला आमच्या मुख्य रस्त्यांवर काही गट उभे असतात. ते त्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहता यावी म्हणून. हे एक वेगळे स्पिरिट म्हणावे लागेल.

अजुन एक अतिरेकि बिचा-या मुंबैच्या मागे लागला आहे तो म्हंजे पाउस.

निषेध! अतिरेक्यांना, राजकारण्यांना काहीही म्हणा. पावसाला काही म्हणायचं काम नाय!

बुरखा आणि पाऊस

मला स्वतःला २००५ च्या पावसात अडकल्याचा अनुभव आहे. त्यावेळी रात्रीच्या वेळेस काही कॉलेजातील मुले आपापल्या घरांतून उतरून रस्त्यावर आली होती. तिथल्या बायकांना आणि मुलांना आपापल्या घरी घेऊन गेली. रस्त्यावर अडकलेल्यांना ग्लुकोजची बिस्किटे, पाणी वगैरे पुरवण्याचे काम त्यांनी केले. मला, माझ्या आईवडिलांना आणि मुलीला सोडायला ही मुले एक दोन किमी आमच्याबरोबर आली. हे नक्कीच मुंबईचे स्पिरिट आहे

पुर्ण सहमत

मी तुमच्या बुरख्याचा खर्च उचलायला तयार आहे

एवढा महाग असतो काहो बुरखा? तिथल्या बायकांना कसं परवडत असेल ? :(

पावसाला काही म्हणायचं काम नाय!

का म्हणुन त्याला सोडायचं? नक्को तिथे बदाबदा कोसळतो आणि हवं तिथे शेतकर् याला डोळ्यातून टिपुस गाळायला लावतो.

खर्च वगैरे

एवढा महाग असतो काहो बुरखा? तिथल्या बायकांना कसं परवडत असेल ?

मी अद्याप खरेदी केलेला नसल्याने माहित नाही पण तुमच्या निमित्ताने ती खरेदी नक्की करेन. तिथल्या बायकांना कसं परवडतं हे त्यांनाच विचारा, सुवर्णाताई.

का म्हणुन त्याला सोडायचं? नक्को तिथे बदाबदा कोसळतो आणि हवं तिथे शेतकर् याला डोळ्यातून टिपुस गाळायला लावतो.

भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण आणि इतर अनेक कारणांनी जिथे जसा पाऊस पडायचा तिथे तसाच पडतो. जिथे पाऊस कमी आहे तेथे पर्यायी उपाययोजना करणे पावसाच्या हाती नसते; माणसाच्या हाती असते असे वाटते.

षंढ हलके हलके

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांच्या भावना नेहमीप्रमाणे, ठरावीक शैलीत आंतरजालावर ठिकठिकाणी उमटू लागल्या आहेत. गंध हलके हलके' सारखे सुरेख, सुकोमल, सुमधुर गीत लिहिणाऱ्यांनाही आता षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर.. असे विखारी शब्द सुचताहेत. एवढे की आमच्या एका विंडबनवीर मित्रालाही गहिवरून आले आणि त्याने "षंढ हलके हलके" असे विडंबन लिहूनसुद्धा टाकले. आम्हीच अखेर दादापुता करून त्याला कसेबसे थांबवले. असो. तर परिस्थिती फार बिकट झाली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतरही संकटांचे कोसळणे काही थांबणार नाही हे खरेच. असो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दहशतीची अपेक्षा

अगतिक वाटून लोकांनी घाबरावे, चिडावे, हीच अतिरेक्यांची अपेक्षा असते. अन्यथा, क्षयरोगाने रोजच अधिक लोक मरतात, माणसे मारून भारत निर्मनुष्य करणे हे दहशतवाद्यांचे ध्येयच नसते.
त्यामुळे, काही घडलेच नाही अशा आविर्भावात, इतरांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करून 'मुंबई स्पिरिट' दाखवून दैनंदिन व्यवहार सुरू ठेवणे हेच उत्तर सामान्य जनतेने दहशतवाद्यांना देणे योग्य ठरेल आणि मग निव्वळ 'माणसे मारण्यात' दहशतवाद्यांना उत्साह उरणार नाही असे मला वाटते.
--
संशयसिद्धांतः
सी४ ऐवजी खते वापरून, कमी क्षमतेची, चारच स्फोटके पेरण्यात आली त्यामुळे हे 'आतल्यांचेच' काम असावे असे मला वाटते. मंत्रिमंडळाची फेररचना घडताना कोणी असंतुष्ट राहिले असेल काय?

माणसे मारणे

अगतिक वाटून लोकांनी घाबरावे, चिडावे, हीच अतिरेक्यांची अपेक्षा असते

यात त्यांचा काय लाभ असतो? कि नुसताच आसुरी आनंद?

मग निव्वळ 'माणसे मारण्यात' दहशतवाद्यांना उत्साह उरणार नाही असे मला वाटते.

माणसे मारण्या व्यतिरिक्त दुसरे पर्याय( उदा. भडकावु वर्तमानपत्रे) ते शोधून काढणार नाहित कशावरून?

स्पिरिट: प्रचार

माझे मत असे आहे की वृत्तपत्रकार/वृत्तकंपन्या इ. हा प्रकार मुंबईकरांचे स्पिरिट आहे असा प्रचार करतात.

हा प्रचार कोणासाठी केला जातो?
तो मूर्खपणातून केला जातो की कोणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली आहे? हे मात्र मला कळलेले नाही. तरी माझ्या मते कोणाच्यातरी सुपीक डोक्यातून कल्पना आली आहे.

असे काही घडल्यानंतर परत कामाला लागताना मुंबईकर स्वतःची पाठ थोपटून घेतात का? तर नाही. त्यांना नेहमीचे जगणे निभावताना जे करायचे ते करावेच लागते. भाजी/किराणा माल आणायला सहसा रानडे रोडवरच जावे लागते. कबुतरखान्यापाशीच बस मिळते. बोलणार कोणाला? ह्याला स्पिरिट म्हणणे ही सामान्य लोकांची केलेली थट्टा आहे. अनेकदा भाषा सोयीस्कर वापरली की लोक त्यामागील राग, विखार विसरून जातात. स्पिरिट म्हणायचे, हतबलता म्हणायची नाही हा ह्यातलाच एक प्रकार.

अशा प्रकारे कदाचित शांतता राखली जात असेल. काहींना, कदाचित अनेकांना, ही शांतता पथ्यावरही पडत असेल असे वाटते.

अतिरेकी हल्ले रोखणे कठीण आहे असे सर्वच म्हणतात. फरक एवढाच आहे की इतरत्र अनेक ठिकाणी तरीही हल्ले रोखले जातात असे दिसते. मुंबईत मात्र हल्ले चालूच राहतात.

स्पिरिट

असले एखाद्या शहराचे स्पिरिटबिरिट काही नसते. मुंबैकराच्या मागे रोजचे आयुष्य हात धुवून लागले आहे. त्याला उठून कामाला लागावेच लागेल. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मध्ये रेल्वेतून पडून मरणार्‍यांची संख्या बघा. त्यापुढे स्फोट काहीच नव्हेत. पण काही झाले की इमोसनल व्हायचे ही आपली मानसिकता आहे. आता पुन्हा हातात मेणबत्त्या घेऊन शांततामोर्चा कधी निघतो एवढेच बघायचे.
सन्जोप राव

स्पिरिट

पहिल्यासारखे कामाला लागणे हा काही 'स्पिरिट' या शब्दाचा अर्थ नाही. ( कोणालाही ते न करून चालणारच नाही.)
मनोधैर्य, सहनशीलता, मदत किंवा सहकार्य करण्याची मनाची तयारी, उत्साह, कर्तव्यदक्षता, समंजसपणा वगैरेंचा समावेश 'स्पिरिट' या शब्दात होतो.
मुंबईकरांचे जीवन ग्रामीण भागातल्या जीवनाच्या मानाने फार जास्त धकाधकीचे असल्यामुळे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे त्यावर जास्त प्रभाव पडतो आणि या गुणांची त्याला जास्त वेळा आवश्यकता पडते.

आपल्या देशाचे अफघाणिस्थान होऊ देऊ नका

पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, ‘आपले’ म्हणुन सोसायचे।
तंगड्यांवर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?

www.bolghevda.blogspot.com

 
^ वर