मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांची शोकांतिका

थोर औलिया चित्रकार आणि पंढरपूरचे सुपुत्र मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांचे नुकतेच ९ जून रोजी लंडन येथील एका रुग्णालयात वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. हा अनवाणी हिंडणारा खालिस हिंदुस्तानी कलावंत माणूस अगदी मनसोक्त आणि वादांनी वेढलेले आयुष्य जगला. हुसैन ह्यांनी ७०च्या सुरवातीला काही सरस्वतीची आणि इतर देवदेवतांची निर्वस्त्र चित्रे काढली होती. त्यांच्या ह्या चित्रांचे भांडवल ९०च्या दशकात हिंदुत्ववाद्यांनी केले. त्याच्या चित्राच्या प्रदर्शनांवर संधी मिळेल तशी आणि तिथे हल्ले केले. त्यांच्यावर गावोगावी ९००च्या वर खटलेही दाखल केले. परिणाम असा झाला की, नव्वदीतले हुसैन अखेरच्या काळात मायदेशी परतू शकले नाही.

हुसैनसारख्या थोर कलावंताला वृद्धापकाळात परागंदा व्हावे लागले. मायदेशापासून दूर लंडनात त्यांचा मृत्यू झाला. तर प्रश्न आणि चर्चेचा मुद्दा असा की, हे असे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय? असे का व्हावे? हुसैन ह्यांचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे ? आपला देश नक्की कुठे चालला आहे?

मक़बूल फ़िदा हुसैन
मक़बूल फ़िदा हुसैन

जाता-जाता:
मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून शशी थरूरसारख्यांचे प्रयत्न चालू होते. किमान मरणोपरान्त हा सन्मान हुसैन ह्यांना मिळायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का?

Comments

निषेध

तेथे बाकी सर्व ब्लॉग, चर्चासंस्थळांचे दुवे देण्यात आले आहेत परंतु त्या आयडीने उपक्रमच्या धाग्याचा दुवा मात्र दिलेला नाही. बाकी, प्रहारमध्ये सामनाची भूमिका कशी?

हेहेहे

मजेदार आहे लेख. त्यातील काही दुवे भयंकर मनोरंजन करणारे आहेत. पण समीक्षाताईंनी तुमच्या धाग्यांचा उल्लखे करायला हवा होता. त्यांची तुमच्याशी नेटकी खुन्नस तर नाही :)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बेटर् लेट् दॅन् नेव्हर्

म्हातारा फारच् उशिरा खपला म्हणून् आनंद् न होता दु:खच् अधिक् झाले.
स्त्रियांमध्ये जशी राखी सावंत् तसे पुरुषांमध्ये एम. एफ. हुसेन असे म्हणावेसे वाटते.
पण् शेवटच्या दिवसांमध्ये ते तडफडत् होते हे कळल्यावर् थोडेसे बरे वाटले.
पाली झुरळेवाला रिप्लाय् आवडला.

मक्बुल् फिदा हुसैन्.

मक्बुल् फिदा हुसैन् हा एक् विचित्र चित्रकर् होता.ज्या धर्मात् नारिला पुर्न् झाकुन् थेवतात् त्या धर्मात् हा जन्मला हेच् दुर्दैव् आहे.त्या धर्मातिल् जे नियम् (कायदे) त्या मनसाने पाललेच् नाहित् म्हनुन् त्याचा त्याच्ताजीवनाचा अन्त् असा वाइत् झाला असावा. ज्या धर्मात् नारिचा कोनताच् शरिराचा भाग् उघदा बघत् नाहित् त्या धर्मतिल् मनसने दुसर्या धर्माचि अशि वितम्बना करवी याचे दुख् वातते. ही चूक् मान्य करता येत् नाहिच्.याला त्याचि चूक् माहित् होती म्हनुनच् हा मानुस् या देशातुन् पलुन् गेला असावा. अशा नालायकाला भारत् रत्न देउन् त्या रत्नाचा अपमान् तरी करन्याची चूक् कोनिही करु नये.तो भारत् रत्नचा अपमान् होइल्.तसेच् समस्त् नारी जातीचही अपमान् होइल्.त्याने स्वताच्या किवा इतर् धर्माच्या देवीन्ची अशी बायकान्ची चित्रे का बरे नाही काधली.देवा याला माहीत् होते की हा काय् चूक् करीत् होता म्हनुन् याला माफ् करू नकोस्. दत्तात्रय् जाधव् कोथरुद् पुने.

 
^ वर