गावगाडा

मराठी पुस्तके सुरु करून आता अडीच वर्षे झाली. पुस्तकांची भर हळू पडते आहे. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या सौजन्याने बाळ फोंडके व अ.पां.देशपांडे संपादित विज्ञान तंत्रज्ञान कोश, केतकरांची विज्ञानेतिहासावरची काही पुस्तके या संस्थळावर आली आहेत.

संस्थळ सुरु करतानाच एक महत्वाचे पुस्तक आणायचे होते. पण टंकनकर्त्याच्या संगणकात विषाणू शिरल्याने ते बारगळले. हे पुस्तक म्हणजे 'गावगाडा' ले. त्रिंबक नारायण आत्रे यांनी लिहिलेले पुस्तक. गावगाडा हे पुस्तक महत्वाचे असले तरी त्याचा परिचय बर्‍याच जणांना नसतो असा माझा अनुभव आहे. गावगाडाची भाषा हा एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. त्यातील शब्द हे अडचणीचे जातात. याकारणासाठी सोय म्हणून रा.वि. मराठ्यांनी गावगाडाचा शब्दकोश नावाचे पुस्तक लिहिले. (हे पुस्तक आणण्याची इच्छा आहे. स्वामित्रहक्कासंबंधी परवानगी लागेल.)

एके काळी गाव कसे असायचे याचे या पुस्तकात यथार्थ चित्रण आहे. एकंदर बारा प्रकरणात हे पुस्तक बांधले आहे.
पहिल्या प्रकरणाचे नाव भरित म्हणजे गावात जे जे भरतो ते. (गावगाडा शब्दकोश नसता तर याचा नेमका अर्थ लागला नसता. ) शब्दांची अडचण सोडल्यास भाषा सरळ आणि थेट आहे. सुरुवातीचेच वाक्य पहा. (या परिचयात मी पुस्तकातलेच काही उतारे उचलणार आहे.)

जिच्यागसभोवती कीर्दसार- वहितीला योग्य – जमीन आहे आणि जिच्या मध्येस मातब्बगर शेतकरी व पुष्कभळसे मजूर आहेत, अशा वस्तीआला गाव म्ह्णतात. गावच्या हद्दीला किंवा सीमेला शीव’’ ही संज्ञा आहे. गावाचे स्ववभावतः आणि एकमेकांपासून अलग असे दोन भाग उघड उघड पडतात. एक पांढरी’ किंवा गावठाण आणि दुसरा काळी’ किंवा रान.

गावातले वेगवेगळे विभाग काय असतात हे लेखक सांगताना.

खेडेगावांचे दोन भेद मानतात. एक मौजे आणि दुसरा कसबा. कसब (कला अगर हुन्नचर) ह्या शब्दा पासून कसबा हा शब्दक निघाला आहे. व्या‍पार, हुन्नुर व कसबी मजुरी करणारे लोक मौज्यापेक्षा कसब्यात अधिक असतात

खेडणे म्हेणजे जमीन कसणे आणि खेडू म्हयणजे जमीन कसणारा. तेव्हाय खेडूंची जी वस्तेा ते खेडे.

शब्दांची ओळख, जातींची ओळख या पुस्तकात तर आहेच. थोडाफार ऐतिहासिक मागोवाही आहे.

तैमूरची वसूलपध्द ती म्हेणून काही ठोकळ नियम होते. शेरशहाने त्याेत सुधारणा करुन जमिनीची आकारणी ठरविली. अकबर बादशहाच्याे कारकीर्दीत राजा तोडरमल ह्याने ‘‘इलाही गज’’ नावाचे जमीन मोजण्या चे प्रमाण निश्चित करुन ‘कानुगो’ (जमाबंदीचे मुख्यर कामगार) नेमले, आणि सर्व प्रांतातील जमीनीचे वर्गीकरण व वसूलआकारणी केली. ह्या वसूलपध्द तीस ‘असल-इ-जमा-इ-तुमार’ असे नाव आहे, हिलाच दक्षिणेत ‘तनखा’ म्हवणतात. पूर्वी तांब्या चा टक्काम घेत होते. त्यालऐवजी रुप्यालचे तनखा नावाचे नाणे घ्यातवे असे ठरविले म्ह्णून ह्या पध्द तीचे नाव तनखा असे पडले.

रयतवारी पद्धती मलिक अंबरने आणली. (जी नंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या अखत्यारीतल्या प्रदेशात अमलात आणली.) त्या बद्दल लेखक लिहितात.

इ. सन १६0७ ते १६२६ च्या दरम्या न निजामशाहीमधील सुप्रसिध्दू मुत्स द्दी, चांदबिबीचा विश्वासू नोकर, आणि खडकी उर्फ औरंगाबाद शहर वसविणारा मलिकंबर ह्याने दक्षिणची शेतवार पाहणी व मोजणी करुन प्रतवारी बसविली आणि जमिनीच्या उत्पवन्नाजप्रमाणे २/५ हिस्साक घासदाण्यालच्या रुपाने वसूल घेण्याचा खुद्द गावाशी ठराव केला व वसुलाची जबाबदारी पाटलावर टाकली. इ. सन १६१४ च्या पुढे त्यारने काही ठिकाणी दरसालच्यान वास्तलविक उत्प.न्नाखच्याठ मानाने १/३ नगरी वसूल घेण्यााचा प्रघात सुरु केला. त्याने प्राचीन ग्रामसंस्थां चे पुनरुज्जीमवन केले, कुणब्यां ना मिरासपत्रे देऊन म्ह्णजे जमिनीचे मालक बनवून त्यां ना जमिनीच्यान खरेदी-विक्रीचे हक्का दिले आणि पाटील, कुलकर्णी व इतर ग्रामाधिकारी आणि बलुतदार ह्यांची वतने मिरास म्हीणजे वंशपरंपरेची करुन दिली. त्यांने गावाला पड जमिनीतून वनचराई, गायराने काढून दिली आणि उरली जमीन ती गावासंबंधी’’ किंवा गाव वर्दळ’’ म्हउणून गावाच्याण दिमतीला लावून दिली.

पुस्तकात एक प्रकरण आहे त्याचे नाव फसगत.

गावगाडा म्हणजे एकंदर गावचे एकत्र कुटुंब; त्यात कुणबी हा कारभारी, स्थायिक वतनदार हे कुटुंबीय आणि फिरस्ते सोयरे किंवा इष्टमित्र असा घाट दिसून येतो. वेळी अवेळी परदेशस्थ-प्रवासी आमच्या गावगडयाचे फार स्तुतिपाठ गात आले आहेत आणि त्यावरून आम्ही आपली अशी समज करून घेतो की, एके काळी आमचा गावगाडा म्हणजे मानवी चातुर्याची पराकाष्ठा होती आणि आता इमानदार, वतनदार, जातधंदे, वतने नाहीशी होत चालल्यामुळे त्यात बिघाड झाला आहे.

लेखकाला सामाजिक राजकीय तत्वज्ञान आहे. विषमतेचा भाग, शहर-गावातील आर्थिक हितसंबंध याविषयी लेखकाने लिहिले आहे.

क्वचित असे घडते की, गुन्हेगार जातींच्या लोकांनी प्रामाणिकपणाने उद्योग करण्याचे मनात आणिले तरी त्यांना कोणी जवळ करीत नाही. ते गुन्हा करतील आणि आपल्याला प्रायश्चित्त द्यावे लागेल, अशी लोकांना भीती वाटते. कानफाटया नाव पडल्यामुळे कोठे काही गुन्हा झाला की यांना पोलिसचे बोलावणे यावयाचे. ते गेले म्हणजे कामाची खोटी होते, ही त्यांना कामावर ठेवण्यात दुसरी अडचण होय. पूर्वी गुन्हेगार जातींच्या मागे हजेरी असे व तिजमुळे त्यांना उद्योग पत्करणे कठीण जाई. मुसलमानांच्या मागे हजेरी नाही म्हणून ती चुकविण्यासाठी हजेरीतला एक भिल्ल मुसलमान झाला व त्याने नाव बदलले असे एका गावी आढळले. गुन्हेगार जातींच्या लोकांप्रमाणे शिक्षा भोगलेल्या भल्या जातींच्या लोकांनाही कोणी कामावर ठेवीत नाहीत. असले इसम बेकार होऊन उपाशी मरण्यापेक्षा तुरूंगात जाऊन पोट भरण्याचा हेतू धरून मुद्दाम गुन्हे करतात. कामधंदे मिळवून देऊन गुन्हेगारांना समाजाचे उपयुक्त घटक बनवावे व पुन्हा गुन्हा करण्याकडे त्यांची प्रवृत्ती होऊ नये म्हणून त्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या आश्रयाने एक संस्था मुंबईस निघाली आहे. भरपूर लोकाश्रय मिळून तिची फत्ते होवो! या कामी आज गाठचा पैसा जातो असे जरी कोणाला वाटले दूरदृष्टीने पाहता हे कोणालाही अंदाजता येईल की, गुन्हेगारांना प्रामाणिक कामगार बनविण्यात खर्च होणारा पैसा त्यांच्या चोर्याोदरोडयांच्या ऐवजाच्या मानाने काहीच नाही व त्यांचे पिढीजाद गुन्हे बंद होण्यातच सर्वांचे शाश्वत हित आहे. पारशी कर्ण टाटाशेट यांनी लक्षावधी रूपये देऊन मुक्तिफौजेमार्फत गुन्हेगार जातींच्या वसाहती करण्यास सुरूवात केली आहे व सरकारही प्रांतोप्रांती सदर संस्थेला ढळत्या हाताने पैसे पुरवित आहे. हिंदू, मुसलमान, आर्य, ब्रह्मो वगैरे धर्मांनी पुढे सरसावून ह्या पुण्य कृत्याला कंबर बांधली तर त्यांना ह्या कामी मुक्तिफौजेपेक्षाही सत्वर व परिणामकारक यश येईल. सरकारने कैकाडी लोकांना सोलापूर जिल्ह्यात निरनिराळ्या गावी जमिनी देऊन बैलांसाठी तगाईही दिली. तथापि एकमेकांना भेटण्याच्या बहाण्याने ते गावोगाव चोर्यास मार्या करीत, अशी शेतकर्यांयची तक्रार होती. विजापूर ती यशस्वी होण्याचा संभव आहे.

चर्चा करण्यासारखे वाद करण्यासारखे या पुस्तकात बरेच सापडेल. पण मुख्यतः भरपूर माहिती सापडेल. कित्येक वाक्ये उद्धृत करण्यासारखी आहेत. गावागाड्याचा इतिहास, आजची स्थिती आणि पुढची होणारी वाटचाल याचा वेध लेखकाने घेतला आहे. आज हे पुस्तक लिहून जवळपास १०० वर्षे होत आहेत. समाजव्यवस्थेचे एक चित्रण या पुस्तकात तर आहेच. याच बरोबर वाटचाल कशी करावी याबाबत लेखकाने लिहिले आहे. ही वाटचाल लेखक म्हणतो तशी झाली की नाही, चित्रण योग्य होते की नाही यावर आता विचार करायला हवा.

तरी गाव-गाडयाने धरलेली वाट बरोबर आहे किंवा नाही? नसल्यास कोठे व कशी दिशाभूल झाली, याचा निर्णय देण्यासाठी अधिकारी मार्गोपदेशकांना नम्रतेने फूल लावून त्यांचा शकुन मिळेपर्यत तूर्त येथेच तो सोडू या.

प्रमोद

Comments

छान

छान!
वरील परिचयात उद्धृत केलेल्या उतार्‍यांत काही टंकनदोष आहेत, ते मुळातल्या पीडीएफ मध्ये नाहीत. हे चांगले.
पीडीएफमध्ये मूळ लेखकाचे नाव दिलेले आहे. त्याच बरोबर मूळ प्रकाशनतारीख (नवसंस्करण झाले असेल, तर ती तारीख) आणि मूळ प्रकाशकाचे नाव/गाव दिले तर चांगले होईल.

प्रकाशन

पुस्तकाचे प्रकाशन बहुदा १९१५ सालचे आहे. माझ्याजवळ सध्या पुस्तकाची प्रत नाही मिळाल्यावर त्याबद्दल जास्त लिहीन. (ही माहिती पुस्तकाच्या पी.डी.एफ. मधे टाकायचा विचार आहे.)

वरील उतारे मी माझ्या जवळच्या वर्ड प्रोसेसर फाइल मधून कॉपी-पेस्ट केले. हे करताना माझ्या लक्षात आले की त्यात रिकाम्याजागा, अनावश्यक काने-मात्रे येतात. यातील काही मी काढून टाकले पण काही राहिले.

हा प्रश्न युनिकोड आणि वर्ड प्रोसेसर्स मधे आहे. मी असे पाहिले की एखादा शब्द सुधारताना ज्यावेळी बॅकस्पेस किंवा डिलीट केले तर सर्व काही खोडले जाईलच असे नाही. पण प्रोसेसर्स सर्व आलबेल असल्यासारखे प्रदर्शित करतो. तीच दूषित जागा एच् टी एम् एल् करायला गेलो की त्यातील लपलेल्या जागा काने मात्रे अगम्य अक्षरे आणि जास्तीच्या ओळी दिसायला लागतात. कदाचित संगणकीय प्रणालीत एखादी फिल्टरसम प्रणाली लिहून हा प्रश्न सुटेल. पण सध्या आमच्या कडे तसे लिहिणारी व्यक्ति नाही.

कदाचित याच कारणाने आम्हाला एच् टी एम् एल पद्धतीने देण्यास अडचण भासत असावी. आम्ही एखाद्या फाईलचे सेव ऍज एच् टी एम् एल केले की फाईल साईझ अतोनात वाढतो आणि ही अक्षरे त्रास द्यायला लागतात. (तसेच शंतनु यांचा स्पेलचेक ही व्यवस्थित चालत नाही.)

या तांत्रिक कारणावर उपाय सापडल्यास सर्व पुस्तके पीडीएफ आणि एच टी एम् एल पद्धतीत देण्याचा विचार आहे. इथून मदत मिळाली तर आनंदाने घेऊ.

प्रमोद

एक उदाहरण

आय. आय. टी ने बनविलेल्या या पुस्तकाच्या कोणत्याही पानावर जाऊन व्ह्यू - सोर्स पाहता येईल.

http://www.cfilt.iitb.ac.in/soundarya/index.html

यात खाली दिलेली लाईन सगळ्यात महत्त्वाची आहे.
META content="text/html; charset=utf-8" http-equiv=Content-Type

आपण नोटपॅड वापरत असाल तर सेव्ह करताना फाईलचे नाव "डबल कोट" मध्ये देऊ शकता. असे.. "pustak.html" आणि एनकोडिंग एन्सीचे युटीएफ-८ करायला विसरू नका. आता ही फाईल आपण आपल्या सर्वरवर अपलोड केली की सर्व मजकूर अगदी व्यवस्थित दिसेल. सर्चदेखील करता येईल. आय.आय.टीने तसा प्रयोग येथे केला आहे...

http://www.cfilt.iitb.ac.in/~corpus/marathi/

येथे कोणताही शब्द लिहिला की त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकातून संबंधित मजकूर स्क्रीनवर दिसतो. अतिशय उत्तम आणि निर्विवादपणे उपयोगी प्रयोग केलेल्या आय. आय. टीने हे कसे केले आहे ते मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे!

मराठी शाब्दबंध (Marathi Wordnet) म्हणजे मराठीतील शब्दगत संकल्पनांचा कोश बनविण्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू असून मराठीतील एक आदर्श प्रयोग म्हणून त्याकडे बोट दाखवता येईल.

धन्यवाद काही अडचणी

तुम्ही दिल्याप्रमाणे प्रयत्न चालू आहेत.
नोटपॅड मधे फाईल घेऊन तिचे एचटीएम्एल् करता येते. पण टॅग सर्व घालावे लागतात. त्यातही काही काना मात्रा जास्तीच्या येतात. त्या तशाच दिसत राहतात. (असेच काहीसे मला आय आयटीच्या वेबसाईटवर दिसले.)
ओपन ऑफिस मधून कसे करायच. एक्स एच् टी एम् एल् म्हणून सेव्ह केले तर जोडाक्षरे सुटी दिसताहेत. (त्यात युटीएफ ८ ची सोय दिसली नाही.)
तेच इथे कॉपी पेस्ट केले तर जोडाक्षरे जुळली आहेत. पण काही भाग अधिक आला आहे. (बहुदा हा वर्डप्रोसेसरचा प्रश्न असावा.) (एच टी एम एल म्हणून करण्यास ओपन ऑफिसने नकार दिला.)

खेड्यात अव्‍वल आणि प्रधान वस्‍ती कुणब्‍यांची. तेथे अडाण्‍याच्‍या सा-या द्वारकेची एक काय ती मेढ, आणि ती कुणबी होय. ‘‘धान्‍यानामष्‍टमो भागः षष्‍ठो द्वादश एव वा आददीत’’ इत्‍यादी मनुस्‍मृती आहे, तरी राजाने रयतेच्‍या उत्‍पन्‍नाचा सहावा हिस्‍सा भागधेय (कर) म्‍हणून घ्‍यावा, असा सरसकट धारा पडला असावा. म्‍हणूनच संस्‍कृतात ‘‘षष्‍ठांशवृत्‍ती’ हा राजाचा प्रतिशब्‍द होऊन बसला. हिंदू राजांच्‍या अमलात काळी पुष्‍कळ

हेच विंडोजमधून केले तर फाईल साइज् दुप्पट होतो. पण इतर अडचणी दिसल्या नाहीत.

प्रमोद

प्रसिद्ध पुस्तक

हे पुस्तक मराठी साहित्यात सुप्रसिद्ध आहे. वेळोवेळी मराठीतल्या सर्वश्रेष्ठ शंभर पुस्तकांमध्ये त्याची गणना होत आलेली आहे. बलुतेदारीची कार्यपद्धती, महाराष्ट्राची समाजरचना,मराठीतल्या विद्यमान शब्दांच्या व्युत्पत्ती असे कितीतरी आकलन या पुस्तकावरून होते. सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकाला हे पुस्तक टाळून चालणार नाही.
जाता जाता: आमच्या स्थानिक ग्रंथालयातल्या या पुस्तकाच्या मी वाचलेल्या प्रतीत इतके मुद्रण दोष अथवा भाषाबदल नव्हते.

टंकनदोष भाषाबदल

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

जाता जाता: आमच्या स्थानिक ग्रंथालयातल्या या पुस्तकाच्या मी वाचलेल्या प्रतीत इतके मुद्रण दोष अथवा भाषाबदल नव्हते.

हे प्रश्न आमच्या पुस्तकात आहेत/असावेत याबद्दल आम्हाला जाणीव आहे. पण वानगीदाखल (व्यनिने सांगितले तरी चालेल) काही उदाहरणे दिलीत तर टंकन / मुद्रितशोधन करणार्‍यांकडे याचा पाठपुरावा करता येईल.

प्रमोद

सुंदर पुस्तक

आत्ताच पहिलं प्रकरण वाचलं. अतिशय छान लिहिलेलं आहे. काही पानं वाचूनच अनेक नवीन शब्द कळले व बऱ्याच जुन्या शब्दांची व्युत्पत्ती लक्षात आली. (उदा पांढरपेशा म्हणजे 'पांढऱ्या' मातीत राहाणारे. मला कायम ते व्हाइट कॉलर चं भाषांतर असावं असं वाटत होतं.)

माहितीपलिकडे लेखकाने गावाच्या जडणघडणीविषयी ज्या टिप्पण्या केल्या आहेत त्यादेखील वाचनीय आहेत.

एकमेकांनी एकमेकाला कडकडून कवटाळले व ओढून घेतले आणि चिरकालीन विस्तृत सार्वजनिक हितसंबंध निर्माण केले असे क्वचित झाले. त्यामुळे एक राज्या जाऊन दुसरे आले म्हणून गावाच्या दिनचर्येत दिसण्याजोगा बदल झाला, किंवा गावकरी गावापलिडच्या विचारात निमग्न झाले, असे बहुधा होत नसे. ज्याप्रमाणे अनेक पिढ्या वरून आल्या गेल्या तरी उंबरा आपल्या ठिकाणीच त्याप्रमाणे राज्यांच्या अनेक तऱ्हा व उलथापालथी झाल्या तरी गावगाड्याने आपले ठिकाण सोडले नाही.

असे परिच्छेद वाचले की गावाचं व्यक्तिचित्र स्पष्ट उभं रहायला लागतं. शंभर वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती व तिच्यात आज किती बदल झाला आहे हे पाहणंही रोचक ठरतं (२ टक्के लोक लाखापेक्षा अधिक लोकवस्तीच्या शहरात. सुमारे नव्वद टक्के लोक हजारपेक्षा कमी लोकवस्तीच्या गावात व खेड्यात...)

पुस्तक सादर केल्याबद्दल धन्यवाद.

अवांतर - वरील परिच्छेद तिथून कॉपी पेस्ट केल्यावर

आ(ण rचरकाल?न 3व= तृत सावजIनक
!हतसंबंध Iनमाण केले असे f वrचत झाले. ]ामुळे एक राc य जाऊन दुसरे
आले U हणून गावN या !दनचय}त !दसo याजोगा बदल झाला, ;कंवा गावकर?
गावकO पल?कडN या 3वचारात IनमP न झाले, असे बहुधा होत नसे.
c यामाणे अनेक 3पढया व_न आ` या व गे` या तर? उंबरा आप` या
!ठकाणN या !ठकाणीच, e यामाणे राc यांN या अनेक तz हा व उलथापालथी
झा` या, तर? गावगाडयाने आपले !ठकाण सोडले नाह?.

असा दिसतो. याचं कारण काय?
राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पीडीएफ

असा दिसतो. याचं कारण काय?

तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही.
याला एक उपाय आहे तो म्हणजे पुस्तक एच् टी एम् एल् मधे आणणे. यात असलेल्या अडचणी मी धनंजययांना दिलेल्या प्रतिसादात लिहिल्या आहेत.
माझ्या मते युनिकोड अवलंबताना बरीच घिसाडघाई झाली आहे. त्यामुळे स्पेलचेक, न दिसणारी कॅरेक्टर्स, सर्च अयशस्वी होणे अशा अडचणी उभ्या आहेत. याशिवाय युनिकोडकर्त्यांनी मुद्रणव्यावसायिकांचा आणि मराठी भाषेचा विचार फारसा खोलवर केला नाही. (येथे याविरुद्ध मत काही वेळेला व्यक्त झाले आहे तरीही.)

प्रमोद

पुनर्मुद्रण

गावगाडा या पुस्तकाचे पुनर्मुद्रण वरदा प्रकाशनाने केले असून सहज मिळण्यासारखे आहे. पुण्यात कुणाला पाहिजे असेल तर माझ्याकडील प्रत मिळू शकेल.
शरद

ठाण्यातही...

आणि ठाणे परिसरात कुणाला हवे असल्यास माझ्याकडेदेखिल एक प्रत आहे.

 
^ वर