डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखतः प्रामुख्याने गांधीजी, पुणे करार

आज आंबेडकर जयंती. त्यानिमित्ताने त्यांनी बीबीसीच्या वार्ताहराला डिसेंबर १९५५ मध्ये दिलेल्या मुलाखतीच्या रेकॉर्डिंगचे दोन भाग इथे देत आहे. यात प्रामुख्याने गांधीजी, पुणे करार आणि भारताला स्वातंत्र्य कुठल्या कारणाने मिळाले अश्या गोष्टींचा उहापोह आहे. गांधीजींबद्दल बरीच स्पष्टोक्ती आहे, गंभीर आरोप आहेत. ते प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकण्यासारखे आहे. याबद्दल उपक्रमींचे मत जाणून घ्यायला आवडेल. आंबेडकरांनी त्यांचे हेच मत "आंबेडकर - गांधी तीन मुलाखती" या पुस्तकात सविस्तर दिल्याने मला त्याबद्दल कल्पना होती.

आंबेडकर मुलाखत भाग १

आंबेडकर मुलाखत भाग २

Comments

ज्या धैर्याने त्यांनी पुणे करार मोडून काढला ते कौतुकास्पद होते

गांधींचे विचार मला कधी ही पटले नाहीत. पण ज्या धैर्याने त्यांनी पुणे करार मोडून काढला ते कौतुकास्पद होते. गांधी फाळणी रोखू शकले नाहीत, पण त्यांनी दलितीस्तान मात्र निर्माण होऊ दिले नाही. पुणे करारात त्याची बीजे होती.

Wit Beyond Measure is Man's Greatest Treasure !!

तूर्तास

पहिल भाग ऐकला. गांधी हे ऑर्थोडॉक्स हिंदू होते हे पटण्यासारखेच आहे. शिवाय त्यांचे बरेचस पाठीराखे उच्चवर्णीय होते. शूद्रातिशूद्र नव्हते. ह्यावरून आठवले, की गौतम बुद्ध एकीकडे आत्म्याच्या अस्तित्वाला, ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारत असला तरी चातुर्वर्ण्याला विरोध करताना दिसत नाही. किंबहुना त्याला त्याच्या क्षत्रिय असण्याचा अभिमानच होता.

असो. चांगले दुवे.

अवांतर:
प्रत्येक वेळी शहिदांना श्रद्धांजलीची फुले वाहता-वाहता खोडसाळपणे गांधींच्या नावाने शिंकण्याचा हलकेपणा (हलकटपणा आणि हलकेपणा ह्यात फरक आहे) हल्ली फारच वाढला आहे.

तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगले दुवे

चांगले दुवे. धन्यवाद.

या विषयावर आधी

सांगोपांग चर्चा झाली होती. त्याचा दुवा खाली आहे. त्यावरून ईश आपट्यांना उत्तरे मिळतील असे वाटते. माझे मत मी तिथेच सविस्तर दिले आहे.
प्रतिसादकांचे आभार.

गांधी आणि मायावती

चांगली चर्चा

ही चर्चा विसरूनच गेलो होतो. चांगली चर्चा. धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर