प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक
ज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय?’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो. अनेकदा प्रमाण म्हणजे बहुतेकांना प्रत्यक्ष प्रमाणच अपेक्षित असते. व त्यातून वितंडवाद निर्माण होत राहतो, ह्यासाठी थोडे प्रत्यक्ष प्रमाणाचे विवेचन अयोग्य ठरणार नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक प्रमाणे वेगवेगळ्या संप्रदायांनी मानलेली आहेत. तरी त्यातील प्रमुख तीन म्हणजे , प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. ह्यातील फक्त प्रत्यक्ष प्रमाणालाच चार्वाकवादी कवटाळून बसलेले असतात. व तर्कदुष्टता करत असतात. त्याचे कारण आपण पाहणार आहोत.
सर्व आधुनिक विज्ञान हे ’अनुमान’ ह्या प्रमाणावर प्रामुख्याने आधारित आहे. कारण गणितीय सिध्दांत हा ह्या विज्ञानाचा बेस आहे. गणित अनुमानाशिवाय दुसरे काही नसते. अणुच्या घटकांचा शोध अनुमानानेच लागत गेला. प्रत्यक्ष एलेक्ट्रोन,प्रोटोन कोणाला दिसत नव्हते. डार्विनची अख्खी थेअरी जनुकीय समानते वरुन केलेले अनुमान नाही तर दुसरे काय ? इथे ही मास्यांचे , पक्षांचे अनुकुलन होतांना कोणी ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही. बिग बन्ग थेअरी, कृष्णविवरांचा सिध्दांत ही खगोलीय अनुमाने आहेत. नारळीकरांना कृष्णविवर इंद्रियांना अनुभवायला आले असे घडलेले नाही. तेथे ते अनुमानाचाच आधार घेतात तरी ज्योतिषाला विरोध करतान मात्र ग्रहांचा परिणाम मनुष्यावर कसा होतो हे मला प्रत्यक्ष दाखवा म्हणून हट्ट धरतात. हे निव्वळ काही वैज्ञानिकच नाही तर प्रत्येक चार्वाकवादी (पुरोगामी/अंधश्रध्दा विरोधक) असाच दुराग्रह धरत असतो. ह्यामागील खरी गोम काय आहे ते आपण बघू.
ईश्वराने जगत निर्माण केले हे एक हेत्वाभास नसलेले अनुमान आहे. जसे प्रकाश हा किरणांच्या स्वरुपात आहे का द्र्व्याच्या स्वरुपात आहे हे जसे अनुमान आहे तसे. किंवा अणुच्या केंद्रका भोवती एलेक्ट्रोन फिरतो हे जसे अनुमान आहे. एलेक्ट्रोन्च्या निर्मितीचे किंवा त्याहून ही सूक्ष्म असलेल्या सब-एटोमिक पार्टिकल्सचे कारण सांगता येत नाही म्हणून एलेक्ट्रोनचे अस्तित्व कोणी नाकारत नाही. तसेच ईश्वराच्या जगत निर्मितीच्या अनुमानाबद्दल ही आहे. असा सरळ तर्क न स्वीकारता. बिग बन्ग, अमिनो असिड, इ. कल्पना चार्वाकवाद्यांना स्वीकाराव्याशा वाटतात. अंतिम कारण असणारे अनुमान श्रेष्ठ का चक्राकार फिरणारे अनुमान योग्य ह्याचे उत्तर निरनिराळ्या तत्ववेत्यांनी दिले आहे. हे सर्व वेगवेगळ्या संस्कृतीतले आहेत. वैदिक नाहीत. कांट, आरिस्टोटल, प्लॆटो, डेकार्ट हे वैदिक नाहीत.
आधुनिक चार्वाकवादी ह्यांपेक्षा स्वत:ला बुध्दिमान समजत असतील तर त्यांची दुर्बुध्दी त्यांना लखलाभ असो. ईश्वराला विरोध करण्याचे कारण एकच अनैतिक जगण्याकरता त्यांना ईश्वर नकोसा होतो. हे कारण छुपे असते. ह्यांना नीतिनियम नको असतात , आपली बुध्दि अहंकाराने ग्रस्त आहे हे त्यांना मान्य नसते, मृत्यूच्या अनामिक भीतिने ते सतत पछाडलेले असतात , कदाचित नरक असेल तर आपल्याला तिथे असह्य छळ सोसावा लागेल ह्याची त्यांच्या अंतर्मनामध्ये भीती असते(पूर्वजन्मीच्या नरकभोगाची ही आठवण ही असू शकते). अशा सगळ्या न्यूनगंडातून ते आम्हाला ईश्वर दाखवा, स्वर्ग दाखवा, आत्मा दाखवा असे प्रश्न करू लागतात. साधे ज्योतिषाचेच पहा. कुणी ही ज्योतिषी हे मान्य करेल की ज्योतिष हे ग्रहांचि स्थिति व त्याचे मानवांवर होणाऱ्या परिणाम ह्यातील अनुमानांवर आधारित आहे. ग्रहांचे कोणते ही किरण नाहीत जे मानवावर पडून परिणाम करतात. चाओस थेअरी ज्यांना परिचित असेल ते जाणतील की विश्वातील प्रत्येक छोट्या घटनेचा अनेक मोठ्या घटनांशी संबंध असतो. ह्या दृष्य अनुमानाच्या आधारेच भविष्या सांगितले जाते. त्यासाठी मग , पत्रिका, हात, संख्याशास्त्र,पत्ते इ. वापरले जातात. दृश्य अनुमान व भविष्याच्या सिध्दतेचा त्याला मिळणारा आधार ह्यावर ज्योतिष शास्त्र आधारित आहे. हे समजुन न घेता ग्रह लाखो किमी दूर आहेत, ते मनुष्यावर परिणाम कसा करतील , परिणाम होताना आम्हाला का दिसत नाही असे अनेक कुतर्क करत राहतात. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होतो हे निर्विवाद अनेकांनी सिध्द करून ही ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते.कारण एकच धर्माविषयी आकस !
चार्वाकवाद्यांचे सतत एकच टुमणे असते. आम्हाला पाहायला द्या. एखाद्या प्रतिबंधित प्रयोगशाळेत जायला ही पात्रतेची आवश्यकता असते. कुणीही वेडगळ उठून तिथे जाउ शकत नाही. व मला प्रत्यक्ष दाखवाच म्हणू शकत नाही. तसेच स्वर्ग पाहाण्यासाठी ही काही पात्रतेची आवश्यकता आहे, योगातल्या सिध्दी मिळवण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे. पण पात्रता न मिळवता मला दाखवाच म्हणणारे , अणुभट्टीत शिरुन मला माझ्या शरिरावर किरणोत्सर्ग दाखवा म्हणणाऱ्या पेक्षा जास्त शहाणे नसतात. कर्मसिध्दान्त, ईश्वर, आत्मा, परलोक, ह्या भक्कम अनुमानाने सिध्द केलेल्या गोष्टी आहेत. चार्वाकवाद्यांची तर्काने ह्यांचे खंडंन करण्याची कुवत नसते(ह्यांचे सर्व तर्क हेत्वाभासस्वरुप असतात). मग ते मला प्रत्यक्ष दाखवाची रट लावतात. ज्योतिषांना ज्योतिष सिध्द करा म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:च्या सवंगड्यांबरोबर कृष्णविवरांची यात्रा करुन , बिग बन्ग थेअरीला प्रत्यक्ष करावे व नंतर येऊन ज्योतिषाच्या सिध्दतेच्या गोष्टी बोलाव्यात.
साधे सूक्ष्मजीव पाहायला जर सूक्ष्मदर्शक लागतो, तर पारलौकिक गोष्टी पाहायला असाच पारलौकिक दर्शक लागेल हे ह्यांना समजू नये काय ? पण विज्ञाननिष्टेच्या नावाखाली सोयीस्करपणा करणाऱ्यांना कोण समजाउ शकेल ? ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने त्यांनी आधी समजून घ्यावीत व मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे. पण हे करण्यासाठी त्यांना चार्वाकवाद सोडावा लागेल त्याचे काय ?
Comments
असहमत
इंद्रियांचा अनुभव हेही मेंदूचे अनुमानच असते. उदा., एकाच व्यक्तीच्या दोन डोळ्यांना वस्तूंचे आकार, रंग वेगवेगळे दिसतात तरीही "ही तीच वस्तू" असे अनुमान मेंदू काढतो. मेंदू अनुमाने काढत नसता तर भ्रम या अनुभवाला अस्तित्वच नसते.
असा काहीही हट्ट मी धरत नाही. तुम्हीच हायपोथेसिस मांडा आणि तुम्हीच त्याच्या चाचणीसाठी कष्ट घ्या. तुमच्या हायपोथेसिसप्रमाणेच तुमच्या प्रयोगाची निरीक्षणे आली (असे आम्हाला दिसले) तर तुमचा सिद्धांत मान्य करूच.
मुळीच नाही, ते तुमचे गृहीतक आहे.
तुम्ही (सुद्धा) नक्की कटणार?
ईश्वर सांगतो ते नैतिक की नैतिक असते तेच ईश्वर सांगतो?
मान्य असते.
नॉट ऑल्वेज, जेव्हा स्मरते तेव्हाच भीती वाटते. अनामिक भीती म्हणजे काय? भीती वाटण्याला मी 'नावे ठेवत' असतो की नाही तो मुद्दा वेगळा परंतु मी भीतींची नामकरणे कधीच केलेली नाहीत. नाम प्राप्त झालेल्या भीतींची काही उदाहरणे आहेत काय?
आम्ही जाऊ तेथे नरक बनवू अशी वदंता आहे.
बाकी, "नरक असेल तर आपल्याला तिथे असह्य छळ सोसावा लागेल" ही भीती धार्मिक बनण्यासाठी मुळीही उपयोगी नाही. त्या भीतीला 'पास्कलचा धूर्तपणा' म्हणतात आणि तो चूक आहे (चूक ठरविणारा एक युक्तिवाद येथे दिला होता).
काय वाट्टेल तो आधार वापरा, परंतु भाकिते तर करून दाखवा!
परिणाम होतो हे कोणीही सिद्ध केलेले नाही म्हणून स्वीकारले गेलेले नाही.
आकस या शब्दाचा नेमका अर्थ काय? अर्थ काहीही असला, आणि आम्हाला आकस असल्याचे आम्ही मान्य केले (बहुतेक करूच असे वाटते) तरी त्याच्यामुळे आम्ही ज्योतिष्याला विरोध करीत असल्याचा आरोप अमान्यच असेल.
आम्हाला तुम्ही "अणुभट्टीत शिरुन मला माझ्या शरिरावर किरणोत्सर्ग दाखवा म्हणणाऱ्या पेक्षा जास्त शहाणे" म्हटले नाही तरी चालेल, तुमच्या प्रमाणपत्राची आम्हाला आवश्यकता नाही. "प्रमाण दाखव" म्हटले की दाखविलेच पाहिजे.
बाकी, कर्मसिध्दान्त, ईश्वर, आत्मा, परलोक, ह्या भक्कम अनुमानाने सिध्द केलेल्या गोष्टी मुळीच नाहीत. ती गृहीतके आहेत.
आम्हाला समजते. 'पारलौकिक दर्शक' अस्तित्वात असल्याचेच तुम्ही सिद्ध केले नाही सबब तुम्हाला पारलौकिक गोष्टी बघता येऊ शकतील हा दावा आम्ही नाकारतो आहे.
हाहाहा!
सक्काळी सक्काळी चांगली करमणूक झाली. ईश आपटे हे सध्या नेटावरले माझे आवडते लेखक आहेत. ;-)
काही विशेष आवडलेली वाक्ये:
वेचक वाक्ये
एवढा मोठा लेख आणि भरपूर मोठा पहिला प्रतिसाद बघताना जरा बावरायला झाले होते. ही चार वाक्ये वाचली आणि गीतासार नावाचे छापलेले चार मुद्यांचे भित्तीपत्र वाचल्याची मौज आली.
लेख अजून वाचून व्हायचाय. पण वेचक निवाड्यातून त्याचा चांगला परिचय झाला.
प्रमोद
उपयोगी सारांश परिचय
उपयोगी सारांश परिचय! धन्यवाद.
हसण्यात हरवले होते
हसण्याच्या कल्लोळात विचार, लेखन, वाचन, इ. करण्यास वेळ मिळाला नाही. आहे इथेच, मी कुठे पार, परलोकात जाणार?
व्वा!
चांगली करमणूक झाली - सहमत
सक्काळी सक्काळी - इथे आता संध्याकाळ आहे असे माझे अनुमान आहे
विनोदी लेख
मी उपक्रम या संकेतस्थळावरचे लेखन वाचायला सुरवात केल्यापासून इतका भयंकर विनोदी लेख वाचनात आला नव्हता. अगदी व्हिन्टेज पुलं चा लेख वाचल्यसारखे वाटले. धन्यवाद इश आपटे! अशीच आमची मधून मधून करमणूक करत जा. तुम्हाला शुभेच्छा.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
कुवत नाही
प्रस्तुत लेख वाचून या विषयावर लिहिण्याची माझी कुवत नाही हे लक्षात आले. त्यामुळे आपल्या कुवतीच्या कक्षेतील 'प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षावर आधारित अनुमान' एवढ्यावरच समाधान मांडून चालावे असा सूज्ञ विचार करतो.
काही गमतीदार गोष्टी ध्यानात आल्या तेवढ्या मात्र लिहितो. गंमत ही कुवतीसापेक्ष असते असे धरून.
मागे एकदा लेखकाने तुम्हाला तर्कशास्त्र कळत असेल, विझानातल्या काही गोष्टी कळत असेल तर वाद घाला असे म्हटल्याचे आठवते. आता.
आधुनिक चार्वाकवादी ह्यांपेक्षा स्वत:ला बुध्दिमान समजत असतील तर त्यांची दुर्बुध्दी त्यांना लखलाभ असो.
........आपली बुध्दि अहंकाराने ग्रस्त आहे हे त्यांना मान्य नसते,
अशी दुसर्याची अक्कल काढणे हे लेखकाच्या लीनतेचे लक्षण म्हणायचे का?
तसेच स्वर्ग पाहाण्यासाठी ही काही पात्रतेची आवश्यकता आहे, योगातल्या सिध्दी मिळवण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे.
अशी पात्रता लेखकाने मिळवली आहे का हे अनुमानातले ज्ञान?
प्रमोद
पुलेशु
वैचारिक मतभेद चालू राहतील. लिहित राहा.
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
कोणाचे? कोणाशी?
आपटे यांच्याशी तुमचे वैचारिक मतभेद चालू राहतील असे तुम्हाला म्हणावयाचे आहे काय?
वैचारिक मतभेद चालू राहण्यासाठी मते मांडण्याचे धारिष्ट्य आणि विचारक्षमता या दोन गुणधर्मांची आवश्यकता असते. आपटे यांनी मते तर आक्रमकपणे मांडलेली दिसतात. तुम्हाला मतभेदांच्या नावाखाली भेदनीती आवडते असा आरोप होण्याआधीच कृपया तुम्हीही मते मांडा.
वा वा!!!
ज्ञानात भर घालणारा लेख. अजून येऊ देत असेच लेख. बाप रे हसून हसून जबडा निखळायची वेळ आली. पुढच्या लेखांची आतुरतेने वाट बघत आहे.
(बाकी शब्दांचे खेळ स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारे/समजणारे इथे नेहेमीच करतात तर तुम्ही का नको? चालू द्या. पुलेशु. )
लक्षणे
प्रमाण नाही दिले तरी चालेल पण निदान लक्षणे दिसली पाहिजेत असा आग्रह असतो, "कारण माहित नाही" अश्या गोष्टींसाठी एक तर्क म्हणून ह्या गोष्टींकडे बघण्यास हरकत नाही.
तर्क म्हणून बघण्यास हरकत नाही
जर्मनीतील मार्टीन ल्युथर नावाचे एक धार्मिक, श्रद्धाळू गृहस्थ रोज स्वत:ची विष्ठा खायचे. देवाने बनवलेल्या शरीरातून निर्माण होणारा हा पदार्थ अपायकारक कसा असेल? उलट देवाने इतक्या सहजतेने उपलब्ध करुन दिल्याबद्दल देवाच्या दयाळूपणाचे आभार मानून आपण तो खाल्ला पाहिजे असा 'तर्क' त्याच्या मागे असायचा. इश आपटे ह्यांचे लेखन आणि मार्टीन ल्युथर ह्यांचा तर्क दोन्ही सारखेच.
अवांतर: आपटेंना खरडवहीतून प्रोत्साहन देणारे विनायक गोरे ह्यांसारखे सदस्यही समविचारीच म्हणायचे.
हा हा हा हा!!!
हा हा हा हा!!!
धम्माल लेख आहे.. कोण रे तो उपक्रमावर हुच्च चर्चा चालतात म्हणणारा/री? इथे बघा कसली भयंकर करमणूक चालू आहे. :प्
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
तथाकथित विद्न्यानवादी
--ज्योतिषांना ज्योतिष सिध्द करा म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:च्या सवंगड्यांबरोबर कृष्णविवरांची यात्रा करुन , बिग बन्ग थेअरीला प्रत्यक्ष करावे व नंतर येऊन ज्योतिषाच्या सिध्दतेच्या गोष्टी बोलाव्यात.
--
हे च्यालेंज हे तथाकथित विद्न्यानवादी घेतील असे वाटत नाही.
घेऊ की!
दुधातून भेसळ काढून टाकणारे यंत्र बनविण्याचे चॅलेंजसुद्धा घेऊ!
त्यापेक्षा
त्या आधी ज्या दैवी चमत्काराने कुत्र्याचे शेपूट वाकडे झाले आहे ते तुमच्या विज्ञानमार्गाने कायमचे सरळ करून दाखवा पाहू.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
नाय बॉ
सार्याच रोगांवर विज्ञानाला इलाज सापडलेला आहे असे नाही ;)
क्या मारा यार...
>>>दैवी चमत्काराने कुत्र्याचे शेपूट वाकडे झाले आहे ते तुमच्या विज्ञानमार्गाने कायमचे सरळ करून दाखवा पाहू.
हा हा हा. लै भारी रे..!
-दिलीप बिरुटे
अखेर शेपूट वाकडेच!
अखेर प्रा. डॉ. बोललेच.
अखेर शेपूट वाकडेच!
आता कुणाचे हे विचारू नका.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मान्य केले
--त्या आधी ज्या दैवी चमत्काराने कुत्र्याचे शेपूट वाकडे झाले आहे---
चला, हे तरी मान्य केलेत की, दैवी चमत्कार होतात
तथाकथित विद्नानवादी
तथाकथित विद्नानवादी ह्यांना उद्देशुन आहे तो प्रतिसाद, तुम्ही त्यातलेच का?
हीच अपेक्षा होती
तथाकथित विद्नानवादी च्यालेंज घेता येणार नाही म्हणून विषय बदलतील हीच अपेक्षा होती.
बिगबँग
हल्लीच ही बातमी वाचली.
प्रमोद
अविचारी विधान
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हा सर्वच लेख अविचारी विधानांनी बरबटलेला आहे.त्यांतील एका विधानाविषयी:
श्री. आपटे यांचे :"ईश्वराला विरोध करण्याचे कारण एकच अनैतिक जगण्याकरता त्यांना (चार्वाकवाद्यांना) ईश्वर नकोसा होतो."
हे विधान अविचारी आहे.ते थोडा विचार करू शकले असते तर हे विधान असत्य असल्याचे त्यांच्या ध्यानी आले असते.
*आपल्या देशात ९५%+ लोक आस्तिक, देव धर्म मानणारे आहेत.बहुसंख्य राजकारणी नखशिखान्त धार्मिक आहेत.
*आपल्या देशात भ्रष्टाचार,फसवणुका आर्थिक घोटाळे अशा अनैतिक गोष्टीचे प्रमाण अतोनात आहे.
भ्रष्टाचारात जगातील सर्व देशांत आपला चौथा क्रमांक आहे.
*ही सगळी अनैतिक कृत्ये ५%- असलेले नास्तिक करतात काय?
* कारावासात असलेल्या गुन्हेगारांत नास्तिकांचे प्रमाण अगदी अत्यल्प (--->०)असते असे जगभरांतील सर्वेक्षणांत दिसून आले आहे.
यावरून श्री.आपटे यांचे प्रस्तुत विधान खोटे आहे.
ज्याला आपल्या मताच्या समर्थनार्थ खोटे बोलावे/लिहावे लागते त्याची ती मतेच खोटी असतात.
अनैतिक वागणे व अनैतिक वागण्यासाठी तत्वज्ञान उभे करणे
अनैतिक वागणे व अनैतिक वागण्यासाठी (समर्थनासाठी)तत्वज्ञान उभे करणे ह्यांत मोठा फरक आहे जो आपणास समजत असावा अशी अपेक्षा आहे.
कोण म्हणते?
अनैतिक वागण्यासाठी"नास्तिकवादाचे" तत्वज्ञान उभे केले आहे असे कोण म्हणते? असे कोणी सिद्ध केले आहे? आपल्या या आरोपांना पुष्टी कशी द्याल बरे?
अज्ञानमूलक
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आपटे लिहितातः"अनैतिक वागणे व अनैतिक वागण्यासाठी (समर्थनासाठी)तत्वज्ञान उभे करणे ह्यांत मोठा फरक आहे.
.
हे विधान अज्ञानमूलल आहे. कारण अनैतिक वागण्याचे समर्थन करणे ही कृती अनैतिक आहे. म्हणून अनैतिक वागण्यासाठी (समर्थनासाठी)तत्त्वज्ञान उभे करणे हे अनैतिक वागणेच आहे.खोटे बोलणे,फसविणे, भ्रष्टाचार करणे यांतील प्रत्येक कृती म्हणजे अनैतिक वागणे तद्वतच अनैतिकतेच्या सनमर्थनार्थ तत्त्वज्ञान उभारणे हे सुद्धा अनैतिक वागणे.दोघांत मूलतः काहीच भेद नाही.
अतएव "अनैतिक वागणे आणि अनैतिक वागण्यासाठी तत्वज्ञान उभे करणे ह्यांत मोठा फरक आहे." हे विचारपूर्वक लिहिलेले विधान नव्हे. दृष्टी पूर्वग्रहाने दूषित झालेली असली की अशी वाक्ये लिहिली जातात.
सहमत
अनैतिक वागण्याचे समर्थन करणे ही कृती अनैतिक आहे. म्हणून अनैतिक वागण्यासाठी (समर्थनासाठी)तत्त्वज्ञान उभे करणे हे अनैतिक वागणेच आहे.
सहमत!
ईश्वर नाकारणे ही सर्वात मोठी अनैतिककृती आहे
अर्थात चार्वाकवादी जे अनैतिक वागण्याचे तत्वज्ञान उभे करतात , ते तेवढेच अनैतिक नाहीत काय ????????? ईश्वर नाकारणे हे सर्वात मोठी अनैतिककृती आहे, आस्तिकांच्या मते !!!!
आपटे, थांबा आता!
पूरे! थांबा आता!
इश आपटे आपले -
'ईश्वर नाकारणे हे सर्वात मोठी अनैतिककृती आहे, आस्तिकांच्या मते '
हे विधान, आपण ईश्वर पाहीलेला नाही, ही बाब स्पश्ट करत आहे.
आपले हे विधान आस्तिकांचे नसून नास्तिकांचे आहे. आस्तिकाची इश्वरासंबंधित मते नसतात, जे असते 'ती श्रद्धा असते' किंवा 'प्रत्यक्श अनुभूती असते.'
ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आपटे लिहितातः "अर्थात चार्वाकवादी जे अनैतिक वागण्याचे तत्वज्ञान उभे करतात , ते तेवढेच अनैतिक नाहीत काय ????????? "
..
चार्वाकांनी अनैतिकतेच्या समर्थनार्थ काय लिहिले आहे?
"यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्|" हे का? तर
जन्मभर सुखाने जगणे.कर्ज काढणे.तूप पिणे.या कृतीत एकही अनैतिक नाही.
*तूप पिणे अनारोग्यकारक असेल पण अनैतिक नाही.
*कर्ज काढणे अनैतिक नाही. ते न फेडणे अनैतिक.
*लोकांच्या धर्मश्रद्धेचा अपलाभ म्हणजे गैरफायदा घेत त्यांना काहीतरी खोटे काल्पनिक सांगून लुबाडणे अनैतिक.अशा भ्रामक गोष्टीवर खर्च न करता सुखाने जगणे अनैतिक नाही.
अध्याहृत
"यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्|"
मध्ये कर्ज न फेडणे अध्याहृत आहे असे वाटते. कारण आस्तिक लोक "कर्ज न फेडता मेल्यास नरकात जावे लागेल आणि/किंवा पुढच्या जन्मात त्याचा हिशोब चुकता करावा लागेल" असे आर्ग्युमेंट करत त्याला हे उत्तर असावे. खुशाल कर्ज काढा, तूप प्या, कर्ज बुडवा, मेल्यावर परत येणे नाही, (या वचनात नसले तरी) नरक वगैरे कविकल्पना आहेत, तेव्हा गो अहेड अँड हेल्प युअरसेल्फ असा संदेश असावा.
कर्ज झालंच पाहिजे.
कर्ज फेडून कोणाचं भलं झालं आहे? कर्ज फेडलेले पैसे अर्थव्यस्थेतून नाहीसे होतात. त्याजागी आणखी कर्ज केलं तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. कर्जाशिवाय मोठमोठे उद्योग सुरू होणं शक्य नाही. तेव्हा कर्ज झालंच पाहिजे, आणि ते फेडलं तरी त्यापेक्षा मोठं कर्ज पुन्हा घेतलं पाहिजे.
:)
गेम थिअरीमध्ये तेच योग्यच ठरते ;)
(जोवर इटरेटेड असतो तोवरच प्रिझनर्स डायलेमामध्ये प्रामाणिकपणा फायदेशीर असतो, शेवटच्या खेळीत विश्वासघात करणेच फायद्याचे असते!)
मला वाटले
ईश आपटे
" ऋणं कृत्वा घृतं पिबेत्" असे चार्वाकाचे वचन आहे ते अनैतिक आहे असा तुमचा समज आहे.
देव, आस्तिकता
देव, आस्तिकता ह्या गोष्टी लफडी करण्यासाठीच उभ्या केलेल्या आहेत.
अवांतर: ह्या ईश, चॉकलेटवाले गिरीश आणि पाकड्याग्रस्त अमोल देशमुख ह्यांना आचार्य पिवळे पितांबर ह्यांनी तिकडे घेऊन जायला हवे. काय डोकेदुखी आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
असफल
अहो, प्रगल्भवाडीत यनावालांना दोन लेखांमध्ये जितके प्रतिसाद मिळाले तितके विश्वास कल्याणकरांना सहा लेखांमध्येही मिळाले नाहीत. तिथे ईश, चॉकलेटवाले गिरीश आणि पाकड्याग्रस्त अमोल देशमुख यांचा निभाव लागेल काय?
तथाकथित विद्नानवादी
तथाकथित विद्नानवादी चॉकलेटचा मार्ग का स्वीकारतात, प्रतिसादाला चोख उत्तर देण्याऐवजी?
आपापि
'आचार्य पिवळे पितांबर' हे भारी आहे. पण हे 'त्यांना' कोण समजावून सांगणार?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
हा हा...
पण कदाचित असंही असेल की मंदबुद्धी संपादक पाहून अंबराचं जे होतं त्यालाच पीतांबर म्हणत असतील. तेव्हा कदाचित ती द्विरुक्ती नसेलही.
पीतांबरमधील पी दीर्घ की ऱ्हस्व हा वाद इथे अनुचित ठरणार नाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
पितांबर, पीतांबर
दोन्ही लागू.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
वैज्ञानिक?
विथ अ लिटील लॅटीटुड -
चरितार्थ विज्ञानाची कस धरणारे पण असतात आणि सारासार चिकित्सा करणारे पण असतात (किंवा अजून काही व्याख्या)...ह्यातील सगळ्यांनाच वैज्ञानिक दृष्टीकोन वाले म्हणणार का?
नुसत्या विज्ञानकथा
नुसत्या विज्ञानकथा लिहिणारे ही वैज्ञानिक असतात......... :)
नाही
नाही सगळ्यांनाच वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे म्हणता येणार नाही. जसेकी उपक्रमी विनायक गोरे. चरितार्थासाठी त्यांनी विज्ञानाची कास धरली असली तरी फल-जोतिष्यसारख्या सारख्या विषयांवर विश्वास ठेवतात त्यामूळे त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे म्हणणार नाही. आणखी एक उपक्रमी चरितार्थासाठी विज्ञानाची कास धरतात पण होमिओपथीवर श्रद्धा ठेवतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
आपण आज मेटाम्युसिल घेतले नाही का?
अधिक स्पष्टीकरणासाठी खालचा दुवा पहा.
अर्थ
ठीक
ठीक, मग हेच तत्व अस्तिकातेला लागू होते. आस्तिकता संपते जेंव्हा आस्तिकातेचे नियम पाळणे संपते. जसे तुम्ही इथे विज्ञानाचे सर्व नियम न पाळणाऱ्या माणसाला वैज्ञानिक दृष्टीकोनवाला समजत नाहीत तसेच माणूस आस्तिक नाही जेंव्हा तो आस्तिकतेचे नियम (धर्म/कर्म सिद्धांत) पाळत नाही. मग यनावाला ह्यांनी दिलेल्या आस्तिकांची टक्केवारी आणि देशातील अनैतिक वागण्याची टक्केवारी बघितल्यास त्या अनैतिक वागण्याची जबाबदारी ५% नास्तिकांवरच आहे असे म्हणायला हवे.
गल्लत
आस्तिकतेच्या नियमांवर विश्वास न ठेवणार्या/त्यानुरूप वर्तन न करणार्यांना आस्तिक म्हणायचे नसेल तर मग नास्तिकांचे प्रमाण ५% न राहता ५+बरेच जास्त असे होईल.
नितिन थत्ते
मुद्दाम
:) नक्कीच गल्लत, पण मग त्या जास्त प्रमाणातील नास्तिकांकडे अनैतिक वागण्याची जबाबदारी येते. व आस्तिक नैतिक आहेत असे सिद्ध होते.
व्याख्या
'आस्तिकतेमध्ये नैतिकता असतेच' अशी आस्तिकतेची व्याख्या तुम्ही मानली आहे काय? तसे असल्यास कृपया युथिफ्रो समस्या सोडवून दाखवावी.