प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक

ज्यांचा तत्वज्ञानाशी संबंध असेल त्यांना प्रमाणाविषयी कल्पना असते. शिवाय ऊठ्सुठ ’ह्याला प्रमाण काय?’ असे विचारणारे ही प्रमाण शब्दाचा वापर करत असतात. अर्थात त्यांना त्याचा अर्थ पुरावा अशा अर्थाने अपेक्षित असतो. अनेकदा प्रमाण म्हणजे बहुतेकांना प्रत्यक्ष प्रमाणच अपेक्षित असते. व त्यातून वितंडवाद निर्माण होत राहतो, ह्यासाठी थोडे प्रत्यक्ष प्रमाणाचे विवेचन अयोग्य ठरणार नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक प्रमाणे वेगवेगळ्या संप्रदायांनी मानलेली आहेत. तरी त्यातील प्रमुख तीन म्हणजे , प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. ह्यातील फक्त प्रत्यक्ष प्रमाणालाच चार्वाकवादी कवटाळून बसलेले असतात. व तर्कदुष्टता करत असतात. त्याचे कारण आपण पाहणार आहोत.

सर्व आधुनिक विज्ञान हे ’अनुमान’ ह्या प्रमाणावर प्रामुख्याने आधारित आहे. कारण गणितीय सिध्दांत हा ह्या विज्ञानाचा बेस आहे. गणित अनुमानाशिवाय दुसरे काही नसते. अणुच्या घटकांचा शोध अनुमानानेच लागत गेला. प्रत्यक्ष एलेक्ट्रोन,प्रोटोन कोणाला दिसत नव्हते. डार्विनची अख्खी थेअरी जनुकीय समानते वरुन केलेले अनुमान नाही तर दुसरे काय ? इथे ही मास्यांचे , पक्षांचे अनुकुलन होतांना कोणी ही प्रत्यक्ष पाहू शकत नाही. बिग बन्ग थेअरी, कृष्णविवरांचा सिध्दांत ही खगोलीय अनुमाने आहेत. नारळीकरांना कृष्णविवर इंद्रियांना अनुभवायला आले असे घडलेले नाही. तेथे ते अनुमानाचाच आधार घेतात तरी ज्योतिषाला विरोध करतान मात्र ग्रहांचा परिणाम मनुष्यावर कसा होतो हे मला प्रत्यक्ष दाखवा म्हणून हट्ट धरतात. हे निव्वळ काही वैज्ञानिकच नाही तर प्रत्येक चार्वाकवादी (पुरोगामी/अंधश्रध्दा विरोधक) असाच दुराग्रह धरत असतो. ह्यामागील खरी गोम काय आहे ते आपण बघू.

ईश्वराने जगत निर्माण केले हे एक हेत्वाभास नसलेले अनुमान आहे. जसे प्रकाश हा किरणांच्या स्वरुपात आहे का द्र्व्याच्या स्वरुपात आहे हे जसे अनुमान आहे तसे. किंवा अणुच्या केंद्रका भोवती एलेक्ट्रोन फिरतो हे जसे अनुमान आहे. एलेक्ट्रोन्च्या निर्मितीचे किंवा त्याहून ही सूक्ष्म असलेल्या सब-एटोमिक पार्टिकल्सचे कारण सांगता येत नाही म्हणून एलेक्ट्रोनचे अस्तित्व कोणी नाकारत नाही. तसेच ईश्वराच्या जगत निर्मितीच्या अनुमानाबद्दल ही आहे. असा सरळ तर्क न स्वीकारता. बिग बन्ग, अमिनो असिड, इ. कल्पना चार्वाकवाद्यांना स्वीकाराव्याशा वाटतात. अंतिम कारण असणारे अनुमान श्रेष्ठ का चक्राकार फिरणारे अनुमान योग्य ह्याचे उत्तर निरनिराळ्या तत्ववेत्यांनी दिले आहे. हे सर्व वेगवेगळ्या संस्कृतीतले आहेत. वैदिक नाहीत. कांट, आरिस्टोटल, प्लॆटो, डेकार्ट हे वैदिक नाहीत.

आधुनिक चार्वाकवादी ह्यांपेक्षा स्वत:ला बुध्दिमान समजत असतील तर त्यांची दुर्बुध्दी त्यांना लखलाभ असो. ईश्वराला विरोध करण्याचे कारण एकच अनैतिक जगण्याकरता त्यांना ईश्वर नकोसा होतो. हे कारण छुपे असते. ह्यांना नीतिनियम नको असतात , आपली बुध्दि अहंकाराने ग्रस्त आहे हे त्यांना मान्य नसते, मृत्यूच्या अनामिक भीतिने ते सतत पछाडलेले असतात , कदाचित नरक असेल तर आपल्याला तिथे असह्य छळ सोसावा लागेल ह्याची त्यांच्या अंतर्मनामध्ये भीती असते(पूर्वजन्मीच्या नरकभोगाची ही आठवण ही असू शकते). अशा सगळ्या न्यूनगंडातून ते आम्हाला ईश्वर दाखवा, स्वर्ग दाखवा, आत्मा दाखवा असे प्रश्न करू लागतात. साधे ज्योतिषाचेच पहा. कुणी ही ज्योतिषी हे मान्य करेल की ज्योतिष हे ग्रहांचि स्थिति व त्याचे मानवांवर होणाऱ्या परिणाम ह्यातील अनुमानांवर आधारित आहे. ग्रहांचे कोणते ही किरण नाहीत जे मानवावर पडून परिणाम करतात. चाओस थेअरी ज्यांना परिचित असेल ते जाणतील की विश्वातील प्रत्येक छोट्या घटनेचा अनेक मोठ्या घटनांशी संबंध असतो. ह्या दृष्य अनुमानाच्या आधारेच भविष्या सांगितले जाते. त्यासाठी मग , पत्रिका, हात, संख्याशास्त्र,पत्ते इ. वापरले जातात. दृश्य अनुमान व भविष्याच्या सिध्दतेचा त्याला मिळणारा आधार ह्यावर ज्योतिष शास्त्र आधारित आहे. हे समजुन न घेता ग्रह लाखो किमी दूर आहेत, ते मनुष्यावर परिणाम कसा करतील , परिणाम होताना आम्हाला का दिसत नाही असे अनेक कुतर्क करत राहतात. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होतो हे निर्विवाद अनेकांनी सिध्द करून ही ते स्वीकारायची त्यांची तयारी नसते.कारण एकच धर्माविषयी आकस !

चार्वाकवाद्यांचे सतत एकच टुमणे असते. आम्हाला पाहायला द्या. एखाद्या प्रतिबंधित प्रयोगशाळेत जायला ही पात्रतेची आवश्यकता असते. कुणीही वेडगळ उठून तिथे जाउ शकत नाही. व मला प्रत्यक्ष दाखवाच म्हणू शकत नाही. तसेच स्वर्ग पाहाण्यासाठी ही काही पात्रतेची आवश्यकता आहे, योगातल्या सिध्दी मिळवण्यासाठी ही पात्रता आवश्यक आहे. पण पात्रता न मिळवता मला दाखवाच म्हणणारे , अणुभट्टीत शिरुन मला माझ्या शरिरावर किरणोत्सर्ग दाखवा म्हणणाऱ्या पेक्षा जास्त शहाणे नसतात. कर्मसिध्दान्त, ईश्वर, आत्मा, परलोक, ह्या भक्कम अनुमानाने सिध्द केलेल्या गोष्टी आहेत. चार्वाकवाद्यांची तर्काने ह्यांचे खंडंन करण्याची कुवत नसते(ह्यांचे सर्व तर्क हेत्वाभासस्वरुप असतात). मग ते मला प्रत्यक्ष दाखवाची रट लावतात. ज्योतिषांना ज्योतिष सिध्द करा म्हणणाऱ्यांनी आधी स्वत:च्या सवंगड्यांबरोबर कृष्णविवरांची यात्रा करुन , बिग बन्ग थेअरीला प्रत्यक्ष करावे व नंतर येऊन ज्योतिषाच्या सिध्दतेच्या गोष्टी बोलाव्यात.

साधे सूक्ष्मजीव पाहायला जर सूक्ष्मदर्शक लागतो, तर पारलौकिक गोष्टी पाहायला असाच पारलौकिक दर्शक लागेल हे ह्यांना समजू नये काय ? पण विज्ञाननिष्टेच्या नावाखाली सोयीस्करपणा करणाऱ्यांना कोण समजाउ शकेल ? ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने त्यांनी आधी समजून घ्यावीत व मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे. पण हे करण्यासाठी त्यांना चार्वाकवाद सोडावा लागेल त्याचे काय ?

Comments

श्रद्धा

डार्क मॅटर म्हणतात त्या विज्ञानवादी दृष्टीकोनाच्या संदर्भात तो प्रतिसाद होता, आईनस्टाइनचे देखील धर्माबद्दल अमुक एक मत होते किंवा नोबेल विजेत्यांचे असते तसे, असे असल्यास ते लोक विज्ञानवादी नाहीत असे काही? तसे असल्यास आस्तिकांमध्ये नैतिकता असतेच.

युथिफ्रोची समस्या श्रद्धेच्या व्याख्येशी निगडीत आहे, श्रद्धा म्हणजेच आस्तिकता असे काही नाही, आणि श्रद्धेची व्याख्या करता येत नाही, त्यामुळे युथिफ्रोची समस्या तर्काने सुटू शकत नाही.

?

आईनस्टाइनचे देखील धर्माबद्दल अमुक एक मत होते किंवा नोबेल विजेत्यांचे असते तसे, असे असल्यास ते लोक विज्ञानवादी नाहीत असे काही? तसे असल्यास आस्तिकांमध्ये नैतिकता असतेच.

त्याचे नेमके काय मत असल्याचा तुमचा दावा आहे?

युथिफ्रोची समस्या श्रद्धेच्या व्याख्येशी निगडीत आहे

आधीच्या प्रतिसादात चुकीचा दुवा दिला होता. युथिफ्रो समस्या येथे बघता येईल.

धर्म

युथिफ्रो ची समस्या मूळ प्रेमीस मधेच आहे.

श्रद्धेच्या संदर्भात - रूढ हिंदू समजुतींप्रमाणे सर्व गोष्टींचे कारण देवच आहे, पण म्हणून देवाने चांगल्याच गोष्टी बनवल्या पाहिजे असे नाही, त्याने जे बनवले त्यात चांगले-वाईट हा भेद करण्याचे ज्ञान देखील दिले आहे.

सायन्स अॅन्ड रिलीजन मधे आईनस्टाइन ने धर्माचे विश्लेषण करताना, स्वतःची अशी कॉस्मिक धर्म नावाची संकल्पना मांडली आहे, हि संकल्पना बौद्ध आणि स्पिनोझा मध्ये आढळते हे देखील त्याचे म्हणणे आहे. संकल्पना काय आहे ह्यापेक्षा त्याचा धर्म म्हणजे विज्ञानापेक्षा वेगळे काही असे मानणेच एकप्रकारे श्रद्धाळू असल्याचे द्योतक आहे. उगाच वादासाठी म्हणायचेच तर त्याने कॉस्मिक विज्ञान हि संकल्पना का मांडली नसावी तर विज्ञानाला अपेक्षित गुणधर्म त्यात सापडले नाहीत? मग "कॉस्मिक धर्म" वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध नसला तरी आईनस्टाइनचा त्यावर विश्वास होता.

कॉस्मिक संकल्पानेचा अर्थ विज्ञानिक दृष्ट्या काढणे किंवा श्रद्धावाददृष्ट्या वेगळा काढला जाऊ शकतो पण आईनस्टाइनला असलेला अपेक्षित अर्थ ("विज्ञान आणि धर्म" जे एकमेकाला पूरक असावेत पण दोघांपैकी एकाचे अस्तित्व न नाकारणे) लक्षात घेतला जाऊ शकतो.

*The individual feels the futility of human desires and aims and the sublimity and marvelous order which reveal themselves both in nature and in the world of thought. Individual existence impresses him as a sort of prison and he wants to experience the universe as a
single significant whole.

?

युथिफ्रो समस्या विचारते की नैतिकतेची व्याख्या देव ठरवितो की जे वर्तन मूळचेच नैतिक असते तेच करण्यास देव सांगतो? तुम्ही दिलेल्या फापटपसार्‍यात या प्रश्नाचे उत्तर नाही.

प्रयत्न

ठीक, तुमच्यासाठी थोडे अधिक समजावून सांगतो -
युथिफ्रो ची समस्या मूळ प्रेमीस मधेच आहे, त्यामध्ये चांगले ते देवच करतो व वाईटाची जबाबदारी कोण दुसऱ्याची आहे हे गृहीतक आहे. रूढ (श्रद्धावान) हिंदू धर्माप्रमाणे देव काहीच सांगत नाही, तो चांगल्या/वाईट सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे, त्याने दिलेल्या बुद्धीप्रमाणे मनुष्य गोष्टी चांगल्या किंवा वाईट ठरवतो.

आता मी आईनस्टाइनचा जो संदर्भ मी दिला तो वैज्ञानिक जर वैज्ञानिक नसलेल्या संकल्पनेला मान्यता देत असतील तर त्या कोणत्या? ह्या अर्थी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर होते. आता अश्या आईनस्टाइनला आपण विज्ञानवादी दृष्टीकोन वाला समजत नसाल तर मी आस्तिकतेमध्ये अनैतिक असे काहीच नसते असे म्हणेन.

अशा करेन कि आता आपल्याला हा पसारा समजला असेल.

नाही

रूढ (श्रद्धावान) हिंदू धर्माप्रमाणे देव काहीच सांगत नाही, तो चांगल्या/वाईट सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे, त्याने दिलेल्या बुद्धीप्रमाणे मनुष्य गोष्टी चांगल्या किंवा वाईट ठरवतो.

देवाने दिलेल्या बुद्धीतच नैतिकतेची व्याख्या दडलेली असते. देवाने इतर कोणती बुद्धी दिली असती तर तिच्यानुसार मनुष्याने नैतिकतेची व्याख्याच वेगळी केली असती. अशा प्रकारे, चांगल्या वर्तनाची व्याख्या देवाने मनमानीने केलेली आहे. अन्यथा, आज नैतिक समजल्या जाणार्‍या कृतींमध्ये विशेष काही नाही, त्यांना देवाने नैतिक ठरविले, इतकेच.
असा निष्कर्ष काढावा काय?

उत्तर

नैतिकतेची व्याख्या देव ठरवितो

क्षणभर जरी असे मानले की नैतिकतेची व्याख्या देव करतो तरी ती व्याख्या काही वेळा सापेक्ष तर काही वेळा निरपेक्ष असते हे देखील तो सांगतो, जसे खोटे बोलणे ही अनैतिकता सापेक्ष असू शकते पण बलात्कार करणे ही अनैतिकता निरपेक्ष आहे.

की जे वर्तन मूळचेच नैतिक असते तेच करण्यास देव सांगतो.

जे वर्तन मुळचेच नैतिक असते तेच करण्यास देव सांगतो असे मानल्यास जे अनैतिक आहे ते देव सोडून कोणी दुसरेच सांगत आहे असा अर्थ निघेल, जे इनव्हॅलिड ठरेल.

प्रति

"आस्तिक व्यक्ती अनैतिक वागूच शकत नाही, ज्याक्षणी एखादी व्यक्ती अनैतिक वागते त्याचक्षणी त्या व्यक्तीला नास्तिक ठरवावे" असा तुमचा दावा आहे ना?

क्षणभर जरी असे मानले की नैतिकतेची व्याख्या देव करतो तरी ती व्याख्या काही वेळा सापेक्ष तर काही वेळा निरपेक्ष असते हे देखील तो सांगतो, जसे खोटे बोलणे ही अनैतिकता सापेक्ष असू शकते पण बलात्कार करणे ही अनैतिकता निरपेक्ष आहे.

खोटे बोलणे कधी नैतिक असते आणि कधी अनैतिक असते ते ठरविण्याची बुद्धी (=आज्ञावली) देवच देतो ना? तसे असल्यास, प्रत्येक कृतीची नैतिकता देवच ठरवितो.

जे वर्तन मुळचेच नैतिक असते तेच करण्यास देव सांगतो असे मानल्यास जे अनैतिक आहे ते देव सोडून कोणी दुसरेच सांगत आहे असा अर्थ निघेल, जे इनव्हॅलिड ठरेल.

"जे वर्तन मूळचेच नैतिक असते तेच करण्यास देव सांगतो" हा पर्याय नाकारून तुम्ही "नैतिकतेची व्याख्या देव ठरवितो" हा पर्याय निवडला आहे काय? (मुळात, "जे वर्तन मूळचेच नैतिक असते तेच करण्यास देव सांगतो" हा पर्याय स्वीकारला असतात तरीही "जे अनैतिक असते ते लोकांच्या फ्री विलमुळे असते" असा अनैतिकतेचा उगम तुम्हाला देता आला असता. असो.)

:)

"आस्तिक व्यक्ती अनैतिक वागूच शकत नाही, ज्याक्षणी एखादी व्यक्ती अनैतिक वागते त्याचक्षणी त्या व्यक्तीला नास्तिक ठरवावे" असा तुमचा दावा आहे ना?

हे बरे झाले, आता मुळात जाता येईल. विज्ञानवादी असलेल्या माणसाने मी फक्त विज्ञानवादी आहे हा दावा केल्यास तो विज्ञानवादी होतो का असे मी विचारले होते, त्यावर डार्क मॅटर ह्यांनी नकारार्थी उत्तर दिले, त्यावर नितीन थत्ते किंवा आपण आक्षेप नोंदवला नाही त्याअर्थी डार्क मॅटर ह्यांच्या विधानास तुमचे समर्थन आहे असे मानतो. मग जर विज्ञानवाद्यांसाठी अमुक एकच व्याख्या आहे तर अस्तिकांसाठी फक्त "मी देव मानतो" असा दावा एवढीच व्याख्या केवळ सोयिस्कर नाही काय?

तुम्ही ज्याप्रमाणे "आस्तिक कोण" हा क्लेम व्हॅलिडेट करता त्याप्रमाणे "विज्ञानवादी कोण" हा क्लेम देखील व्हॅलिडेट करा ना. आणि निगेशन मधून करणार नाही एवढी अपेक्षा करतो. :)

हा पर्याय स्वीकारला असतात तरीही "जे अनैतिक असते ते लोकांच्या फ्री विलमुळे असते" असा अनैतिकतेचा उगम तुम्हाला देता आला असता.

मग फ्री विल चा दाता पण देवच आहे की :) मग तो अप्रत्यक्ष कारण आहेच की. देव नैतिक काय ते सांगतो हे असे समजल्यास तोच "सर्व गोष्टींचे" कारण आहे हे समजावे.

फरक

विज्ञानवादी असलेल्या माणसाने मी फक्त विज्ञानवादी आहे हा दावा केल्यास तो विज्ञानवादी होतो का

"विज्ञानवादी असलेल्या माणसाने" असे तुम्ही आधीच सांगितले आहे ना? मग तर त्याने दावा केला नाही तरी तो विज्ञानवादीच! तुमचा प्रश्न असा असावा: "एखाद्या माणसाने फक्त, 'मी विज्ञानवादी आहे' असा दावा केल्यास तो विज्ञानवादी ठरतो काय?" उत्तरः "नाही".

अस्तिकांसाठी फक्त "मी देव मानतो" असा दावा एवढीच व्याख्या केवळ सोयिस्कर नाही काय?

आम्हाला तीच व्याख्या अपेक्षित आहे, तुम्हालाच ती चालत नाही कारण देव मानणार्‍या व्यक्तींची अनैतिक कृत्ये जेव्हा आम्ही दाखवून देतो तेव्हा तुम्ही असे प्रतिपादन करता की 'त्या व्यक्ती आस्तिक नाहीतच'!

तुम्ही ज्याप्रमाणे "आस्तिक कोण" हा क्लेम व्हॅलिडेट करता त्याप्रमाणे "विज्ञानवादी कोण" हा क्लेम देखील व्हॅलिडेट करा ना. आणि निगेशन मधून करणार नाही एवढी अपेक्षा करतो. :)

विज्ञानवाद्यांकडून अशी अपेक्षा ठेवली जाते की ते त्यांची मते साधार दाखवू शकतात. म्हणून, 'मी विज्ञानवादी आहे' असे म्हणणार्‍या व्यक्तीने फलज्योतिषावर अविश्वास (=ईमान सिद्ध करणे ;) ) मान्य केला नसेल तर त्या व्यक्तीकडे फलज्योतिष्याच्या बाजूचे युक्तिवाद मागितले जातील. ते त्या व्यक्तीने उपलब्ध करून दिले नाहीत तर त्या व्यक्तीचा विज्ञानवाद्यांमध्ये स्वीकार होणार नाही.
'देव मानणे' हा मुळातच श्रद्धेचा भाग असल्यामुळे त्यात सिद्ध करण्यासारखे काही नाही. व्यक्तीने देवावर श्रद्धा जाहीर केली की झाले!

मग फ्री विल चा दाता पण देवच आहे की :) मग तो अप्रत्यक्ष कारण आहेच की. देव नैतिक काय ते सांगतो हे असे समजल्यास तोच "सर्व गोष्टींचे" कारण आहे हे समजावे.

तसे तुम्ही समजता की नाही?

प्रति:

तुमचा प्रश्न असा असावा: "एखाद्या माणसाने फक्त, 'मी विज्ञानवादी आहे' असा दावा केल्यास तो विज्ञानवादी ठरतो काय?" उत्तरः "नाही".

विज्ञानवाद्यांकडून अशी अपेक्षा ठेवली जाते की ते त्यांची मते साधार दाखवू शकतात. म्हणून, 'मी विज्ञानवादी आहे' असे म्हणणार्‍या व्यक्तीने फलज्योतिषावर अविश्वास (=ईमान सिद्ध करणे ;) ) मान्य केला नसेल तर त्या व्यक्तीकडे फलज्योतिष्याच्या बाजूचे युक्तिवाद मागितले जातील. ते त्या व्यक्तीने उपलब्ध करून दिले नाहीत तर त्या व्यक्तीचा विज्ञानवाद्यांमध्ये स्वीकार होणार नाही.

मग आईनस्टाइन पण नाही का विज्ञानवादी?

'देव मानणे' हा मुळातच श्रद्धेचा भाग असल्यामुळे त्यात सिद्ध करण्यासारखे काही नाही. व्यक्तीने देवावर श्रद्धा जाहीर केली की झाले!

:) मुळीच सिद्ध करण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त "श्रद्धाळू माणूस अनैतिक असतो" ह्याच्या वर दिलेल्या टक्केवारीस विरोध आहे/आक्षेप आहे.

तसे तुम्ही समजता की नाही?

मी श्रद्धेला मानतो देव वगैरे मी मानत नाही.

शंका

मग आईनस्टाइन पण नाही का विज्ञानवादी?

फलज्योतिष्यावर अविश्वास नाही असे त्याने जाहीर केले होते काय?

:) मुळीच सिद्ध करण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त "श्रद्धाळू माणूस अनैतिक असतो" ह्याच्या वर दिलेल्या टक्केवारीस विरोध आहे/आक्षेप आहे.

आमचे प्रतिपादन आहे की "माझी देवावर श्रद्धा आहे" असा दावा करणार्‍यांमध्ये आमच्यापेक्षा अधिक अनैतिकता असते. त्याला तुम्ही असा विरोध करता की "माझी देवावर श्रद्धा आहे" असे जाहीर केले तरी ते खरे आस्तिक नाहीतच. आस्तिकतेत नैतिकता अध्याहृत असते असा तुमचा दावा आहे.

मी श्रद्धेला मानतो देव वगैरे मी मानत नाही.

श्रद्धेला मानतो म्हणजे काय? त्या विधानाचा अर्थ 'लोक श्रद्धा ठेवतात' हे प्रतिपादन तुम्हाला सत्य वाटते असा आहे काय? (ते प्रतिपादन तर मीही मान्य करतो.)

फसवे प्रतिपादन

फलज्योतिष्यावर अविश्वास नाही असे त्याने जाहीर केले होते काय?

त्याबद्दल त्याने "लिहिले" नाही :). गंभीरपणे - म्हणजे फक्त फलज्योतिष्य मानले तरच त्याची विज्ञानवादी गटातून हकालपट्टी होणार? किंवा त्याचा विश्वास मग भले फलज्योतिष्यावर नसेल पण तो श्रद्धाळू असला तरी तो विज्ञानवादी?

आमचे प्रतिपादन आहे की "माझी देवावर श्रद्धा आहे" असा दावा करणार्‍यांमध्ये आमच्यापेक्षा अधिक अनैतिकता असते. त्याला तुम्ही असा विरोध करता की "माझी देवावर श्रद्धा आहे" असे जाहीर केले तरी ते खरे आस्तिक नाहीतच. आस्तिकतेत नैतिकता अध्याहृत असते असा तुमचा दावा आहे.

:) प्रतिपादन फसवे आहे, श्रद्धा आहे ह्याचा अर्थ "तो देव जे सांगतो तसेच आम्ही करतो" हा आहे, तसे असल्यास, यनावाला ह्यांनी दिलेल्या अनैतिक कृत्यांची जबाबदारी माणसावर नसून परमेश्वरावर येते, तसे असल्यास परमेश्वर असे कुठे सांगतो ह्याचा संदर्भ द्यावा लागेल किंवा "आस्तिक, परमेश्वरच आम्हाला ह्या(अनैतिक) रित्या वागण्यास सांगतो" ह्या विधानावर श्रद्धा ठेवावी लागेल. पण देव जर चांगले सांगत असेल आणि त्यावर श्रद्धा असलेला त्याच्या विरुद्ध वागत असेल तर तो आस्तिक कसा?

श्रद्धेला मानतो म्हणजे काय? त्या विधानाचा अर्थ 'लोक श्रद्धा ठेवतात' हे प्रतिपादन तुम्हाला सत्य वाटते असा आहे काय? (ते प्रतिपादन तर मीही मान्य करतो.)

म्हणजे श्रद्धा असू शकते व ती मीही ठेवतो, फक्त कुठे व का हा मुद्दा देवाशी निगडीत(निगडित?) नाही. त्यामुळे श्रद्धा असू शकते ह्यास माझा विरोध असणार नाही हे माझे प्रतिपादन आहे.

खुलासा

त्याबद्दल त्याने "लिहिले" नाही :).

मुद्दाम विरोधी लिहिण्याची आवश्यकता नाही. कोणाच्या प्रश्नाचे उत्तर देताना 'विरोध नाही' असे जाहीर केलेले नसल्यास काही अडचण येणार नाही.

गंभीरपणे - म्हणजे फक्त फलज्योतिष्य मानले तरच त्याची विज्ञानवादी गटातून हकालपट्टी होणार? किंवा त्याचा विश्वास मग भले फलज्योतिष्यावर नसेल पण तो श्रद्धाळू असला तरी तो विज्ञानवादी?

नाही, तुम्ही डार्क मॅटर यांना विचारलेल्या (विनायक गोरे यांच्याविषयीच्या) प्रश्नाच्या अनुषंगाने फलज्योतिष हे उदाहरण केवळ उपक्रमच्या संदर्भात दिले होते.
अन्यथा, श्रद्धाळूही चालणार नाही.

:) प्रतिपादन फसवे आहे, श्रद्धा आहे ह्याचा अर्थ "तो देव जे सांगतो तसेच आम्ही करतो" हा आहे, तसे असल्यास, यनावाला ह्यांनी दिलेल्या अनैतिक कृत्यांची जबाबदारी माणसावर नसून परमेश्वरावर येते, तसे असल्यास परमेश्वर असे कुठे सांगतो ह्याचा संदर्भ द्यावा लागेल किंवा "आस्तिक, परमेश्वरच आम्हाला ह्या(अनैतिक) रित्या वागण्यास सांगतो" ह्या विधानावर श्रद्धा ठेवावी लागेल. पण देव जर चांगले सांगत असेल आणि त्यावर श्रद्धा असलेला त्याच्या विरुद्ध वागत असेल तर तो आस्तिक कसा?

  1. यनावालांचा आरोप तसा नाहीच. ("अमुक कृत्य कराच/करूच नका" असे आदेश हिंदू धर्मात फारच कमी सापडतील असे मला वाटते.) जी कृत्ये करण्या/न करण्याबाबत देवाने मोकळीक दिलेली आहे त्यांपैकी अनैतिक कृत्ये आस्तिकांकडून अधिक प्रमाणात निवडली जातात, तीच अनैतिक कृत्ये नास्तिक कमी प्रमाणात करतात असा आरोप आहे.
  2. दुसरा मुद्दा असा की "देव (मनमानीने) म्हणतो तेच नैतिक" अशी तुमची नैतिकतेची व्याख्या आहे ना? म्हणजे, परमेश्वराने करण्यास सांगितलेल्या कोणत्याही कृतीस आम्ही अनैतिक म्हटले तर तुम्ही तिला नैतिकच ठरविणार आहात.

म्हणजे श्रद्धा असू शकते व ती मीही ठेवतो, फक्त कुठे व का हा मुद्दा देवाशी निगडीत(निगडित?) नाही. त्यामुळे श्रद्धा असू शकते ह्यास माझा विरोध असणार नाही हे माझे प्रतिपादन आहे.

मी विचारले होते की 'फ्री विल चा दाता पण देवच आहे .. तोच "सर्व गोष्टींचे" कारण आहे' हे तुमचे मत आहे की नाही?

संदर्भ?

("अमुक कृत्य कराच/करूच नका" असे आदेश हिंदू धर्मात फारच कमी सापडतील असे मला वाटते.)

हिंदू धर्मात काय-काय आज्ञावली किंवा नियमावली दिली आहे, आणि त्याचे संदर्भ काय हे जाणून घ्यायला आवडेल. हिंदू पद्धतीने विवाह करताना भटजीने हातावर पाणी सोडायला सांगितले की ते सुद्धा नियमावलीत मोडतं का नाही? या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर रिकामटेकडा यांना असं का वाटतं हे ही जाणून घ्यायला आवडेल.

खुलासा

विवाहासाठी हिंदूंच्या अनेक पद्धती आहेत, कोणत्याही पद्धतीने विवाह केला तरी त्या व्यक्तीला हिंदू म्हणता येईल. 'हातावर पाणी सोडणे' या पायरीचा सर्वच पद्धतींमध्ये समावेश असेल तर तिला नियमावलीत मोजावेच लागेल.

नाही.

मुद्दाम विरोधी लिहिण्याची आवश्यकता नाही. कोणाच्या प्रश्नाचे उत्तर देताना 'विरोध नाही' असे जाहीर केलेले नसल्यास काही अडचण येणार नाही.
नाही, तुम्ही डार्क मॅटर यांना विचारलेल्या (विनायक गोरे यांच्याविषयीच्या) प्रश्नाच्या अनुषंगाने फलज्योतिष हे उदाहरण केवळ उपक्रमच्या संदर्भात दिले होते.
अन्यथा, श्रद्धाळूही चालणार नाही.

:) एकूण, श्रद्धाळू चालणार नाहीत हे मला माहित आहे, पण तुम्ही आईनस्टाइन श्रद्धाळू(काही अंशी किंवा पूर्णपणे) होता हे उघडपणे मान्य/अमान्य करण्यास असमर्थ आहात काय?

यनावालांचा आरोप तसा नाहीच. ("अमुक कृत्य कराच/करूच नका" असे आदेश हिंदू धर्मात फारच कमी सापडतील असे मला वाटते.) जी कृत्ये करण्या/न करण्याबाबत देवाने मोकळीक दिलेली आहे त्यांपैकी अनैतिक कृत्ये आस्तिकांकडून अधिक प्रमाणात निवडली जातात, तीच अनैतिक कृत्ये नास्तिक कमी प्रमाणात करतात असा आरोप आहे.

"जी कृत्ये करण्या/न करण्याबाबत देवाने मोकळीक दिलेली आहे" ह्यामध्ये त्या "कृत्यांचा" आणि "देव मानतो" ह्या श्रद्धेचा संबंध कसा जोडता? देवाने मोकळीक दिली म्हणजे निर्णय घेताना आस्तिकता मधे येतच नाही.

दुसरा मुद्दा असा की "देव (मनमानीने) म्हणतो तेच नैतिक" अशी तुमची नैतिकतेची व्याख्या आहे ना? म्हणजे, परमेश्वराने करण्यास सांगितलेल्या कोणत्याही कृतीस आम्ही अनैतिक म्हटले तर तुम्ही तिला नैतिकच ठरविणार आहात.

नाही, मनमानी नाहीच, मी असे म्हणालो कि, तो काहीच सांगत नाही, तो जे सांगतो त्याचा "अर्थ/गैर अर्थ" फ्री विल मधून लावला जातो व त्याला नैतिकता/अनैतिकता म्हणतात. आणि "अमुक करा, अमुक करू नका" असे तुम्हाला देखील आढळले नाही, म्हणजेच तो असे काही सांगतच नाही हे आलेच की?

मी विचारले होते की 'फ्री विल चा दाता पण देवच आहे .. तोच "सर्व गोष्टींचे" कारण आहे' हे तुमचे मत आहे की नाही?

नाही.

ठीक

तुम्ही आईनस्टाइन श्रद्धाळू(काही अंशी किंवा पूर्णपणे) होता हे उघडपणे मान्य/अमान्य करण्यास असमर्थ आहात काय?

डॉकिन्सने जमविलेली माहिती अशी आहे की आईनस्टाईन आस्तिक नव्हता. वेगळी माहिती मिळाल्यास 'आईनस्टाईन विज्ञानवादी नव्हता' असे म्हणणे अवघड नाही.

"जी कृत्ये करण्या/न करण्याबाबत देवाने मोकळीक दिलेली आहे" ह्यामध्ये त्या "कृत्यांचा" आणि "देव मानतो" ह्या श्रद्धेचा संबंध कसा जोडता? देवाने मोकळीक दिली म्हणजे निर्णय घेताना आस्तिकता मधे येतच नाही.

"देवाने मोकळीक दिली" असे म्हणून आस्तिक लोक निर्धास्त होऊन काहीही करण्यास धजावतात, उपजत/संस्कारित नैतिकता बहुतांश नास्तिकांमध्ये अबाधित राहते.

तो काहीच सांगत नाही, तो जे सांगतो त्याचा "अर्थ/गैर अर्थ" फ्री विल मधून लावला जातो व त्याला नैतिकता/अनैतिकता म्हणतात.

कोणतीही कृती नैतिक आहे की अनैतिक त्याचा निर्णय नेमके कोण घेते?

प्रति:

डॉकिन्सने जमविलेली माहिती अशी आहे की आईनस्टाईन आस्तिक नव्हता. वेगळी माहिती मिळाल्यास 'आईनस्टाईन विज्ञानवादी नव्हता' असे म्हणणे अवघड नाही.

ठीक.

"देवाने मोकळीक दिली" असे म्हणून आस्तिक लोक निर्धास्त होऊन काहीही करण्यास धजावतात, आमची उपजत/संस्कारित नैतिकता आम्हाला नियंत्रित ठेवते.

कोणतीही कृती नैतिक आहे की अनैतिक त्याचा निर्णय नेमके कोण घेते?

देवाने मोकळीक दिली आहे ती कृतीला, काय नैतिक किंवा अनैतिक हे जाणण्याची बुद्धी दिली आहे, त्यापलीकडे काय नैतिक किंवा अनैतिक हे ठरवणे म्हणजे कृती करण्यासारखे आहे.

शंका

देवाने मोकळीक दिली आहे ती कृतीला, काय नैतिक किंवा अनैतिक हे जाणण्याची बुद्धी दिली आहे,

बुद्धी दिली म्हणजे नैतिकतेची यादीच वेष्टनात दडवून दिली की! (उदा., पाढे लिहिणारी आज्ञावली लिहिणे हे पाढे लिहिणेच असते.)

त्यापलीकडे काय नैतिक किंवा अनैतिक हे ठरवणे म्हणजे कृती करण्यासारखे आहे.

वाक्य समजले नाही.

माहिती

पाढे "असे" लिहितात अशी "माहिती" दिली, "असेच" लिही असे सांगितले नाही, त्या माहितीवर विचार करून कसे लिहावे ह्याला मोकळीक आहेच.

नाही!

त्या माहितीवर विचार करून कसे लिहावे ह्याला मोकळीक आहेच.

विचार करणारी, निर्णय घेणारी बुद्धी देवानेच दिली आहे म्हणजे नैतिकतेची व्याख्या त्यानेच लोड करून ठेवली आहे.

  1. देवानेच नैतिकतेची व्याख्या ठरविलेली असल्यामुळे परमेश्वराने करण्यास सांगितलेल्या कोणत्याही कृतीस आम्ही अनैतिक म्हटले तर तुम्ही तिला नैतिकच ठरविणार आहात.
  2. तीच बुद्धी नास्तिकांनाही दिलीच आहे ना? तर मग देवावर श्रद्धा न ठेवणारे कमी अनैतिक का असतात?

??

ठीक आहे,

१. रूढ श्रद्धावानाप्रमाणे, देवाने नैतिक/अनैतिक सगळ्यांचीच व्याख्या लोड करून ठेवली आहे. मग तुमचे पुढे मत काय आहे?
किंवा
१. कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे, फक्त ज्ञान दिले आहे, चिंतनाची/विचाराची कमतरता अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडते.

देवानेच नैतिकतेची व्याख्या ठरविलेली असल्यामुळे परमेश्वराने करण्यास सांगितलेल्या कोणत्याही कृतीस आम्ही अनैतिक म्हटले तर तुम्ही तिला नैतिकच ठरविणार आहात.

१. हो, तसेच असते, मग?
किंवा
१. आमची नैतिकतेची व्याख्या चुकत असेल तर ती तशी देवाने सांगितली नव्हतीच, आम्ही चुकीचा अर्थ लावला होता, त्याने बरोबरच सांगितले होते.

मग देवावर श्रद्धा न ठेवणारे कमी अनैतिक का असतात?

असे कुठे सिद्ध झाले आहे???

प्रति

१. रूढ श्रद्धावानाप्रमाणे, देवाने नैतिक/अनैतिक सगळ्यांचीच व्याख्या लोड करून ठेवली आहे. मग तुमचे पुढे मत काय आहे?
किंवा
१. कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे, फक्त ज्ञान दिले आहे, चिंतनाची/विचाराची कमतरता अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडते.

दोन्हीही परिस्थितींमध्ये, "स्वतःला आस्तिक म्हणविणारे अधिक प्रमाणात अनैतिक कृत्ये करताना दिसतात" या निरीक्षणाचे स्पष्टीकरण काय आहे?

१. हो, तसेच असते, मग?
किंवा
१. आमची नैतिकतेची व्याख्या चुकत असेल तर ती तशी देवाने सांगितली नव्हतीच, आम्ही चुकीचा अर्थ लावला होता, त्याने बरोबरच सांगितले होते.

तर मग आमची आणि तुमची नैतिकतेची व्याख्याच वेगळी आहे. आमची नैतिकतेची व्याख्या आम्ही ठरवितो, तुमची नैतिकतेची व्याख्या देवाने दिली आहे.
शिवाय, "स्वतःला आस्तिक म्हणविणारे अधिक प्रमाणात अनैतिक कृत्ये करतात" असे का?

असे कुठे सिद्ध झाले आहे???

"स्वतःला आस्तिक म्हणविणारे अधिक प्रमाणात अनैतिक कृत्ये करताना दिसतात" हे निरीक्षण आहे.

आणीबाणीला विरोध करून तुरुंगात गेलेले एकजात आस्तिक

* कारावासात असलेल्या गुन्हेगारांत नास्तिकांचे प्रमाण अगदी अत्यल्प (--->०)असते असे जगभरांतील सर्वेक्षणांत दिसून आले आहे.

होते. जयप्रकाश नारायण, चंद्रशेखर, "त्या"लोकांना ज्यांचे फाजील कौतुक आहे त्या दुर्गा भागवत अश्या असंख्य आस्तिकांची मांदियाळीच आणीबाणीच्या वेळी तुरुंगामध्ये होती. नास्तिकांनी आणीबाणीला विरोधच केला नाही की उगीच नास्तिकांवर गुन्हेगारीचा आरोप नको म्हणून इंदिरा गांधींनी त्यांना विरोध करूनही तुरुंगात टाकले नाही?

उत्तर व्यनिने किंवा जाहीर कसेही दिले नाही तरी चालेल.

?

आणीबाणी योग्यच नव्हती काय?

गम्मत?

हा प्रश्न तुम्ही गमतीने विचारला आहे का? तिरकसपणे विचारला आहे का? आणीबाणी योग्य होती असं तुमचं मत आहे का? कारण आणीबाणीत व्यक्तीस्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणावर घाला घातला गेला होता. व तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्याचा (कधी अतिरेकी वाटेल असा) पुरस्कार केलेला आहे.

तुमचं मत बदललं असेल तर तसं सांगा...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

नाही

तिरकसपणे नव्हे, मला गांभीर्याने वाटते की आणीबाणीचा निर्णय योग्यच होता. (अंमलबजावणीत अत्याचार घडणे शक्यच नाही असे नाही, परंतु, आणीबाणीनंतर त्यांची चौकशी करणे शक्य असते.)

कोलॅटरल ड्यामेज

आणीबाणीत झालेली व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, एकाच माणसाच्या हातात अमर्याद सत्ता इत्यादींमुळे देश आणि देशवासियांचं झालेलं नुकसान हे उपक्रमाच्या भाषेत कोलॅटरल डॅमेज म्हणायचं का?

का

आणीबाणीत झालेलं नुकसान समजण्यासाठी लागणारे रिसेप्टर्स श्री. रिकामटेकडा यांच्याकडे नाहीतच?

:)

आणीबाणी 'लेसर ऑफ टू इवल्स' होती असे मला वाटते. 'हुकूमशाहीत समाजाचे नुकसानच होते' हा दावा मला पटलेला नाही.
बाकी, 'देश आणि देशवासीयांचे नुकसान' म्हणजे नेमके कायकाय झाले त्याची माहिती कोठे मिळेल?

The best government is a benevolent tyranny tempered by an occasional assassination. - Voltaire

सवडीने लिहीते

सध्या व्यस्त आहे, वेळ मिळाला की लिहीतेच.

+१

:-) +१ प्रतिसाद

कॉम्प्लान घेणे विसरू नका

आणीबाणीत झालेली व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी, एकाच माणसाच्या हातात अमर्याद सत्ता इत्यादींमुळे देश आणि देशवासियांचं झालेलं नुकसान हे उपक्रमाच्या भाषेत कोलॅटरल डॅमेज म्हणायचं का?

उपक्रमाच्या भाषेबद्दल कोण बोलतंय :) तुम्हाला गळचेपी, अमर्याद सत्ता ह्यांच्याबद्दल कधीपासून? तिकडे सत्ताकेंद्राच्या आजूबाजूला थुईथुई करणाऱ्या खरडवहीराजकुमारींनी (किंवा खरडवहीराजकुमारांनी) इकडे खरडवह्यांतच हिंडणे बरे. (कॉम्प्लान घ्याच.)

आणीबाणीत झालेलं नुकसान समजण्यासाठी लागणारे रिसेप्टर्स श्री. रिकामटेकडा यांच्याकडे नाहीतच?

त्यांचे जाऊ द्या. पण तुमच्याकडे आहेत का? अशावेळी तिकडचे तुमचे वर्तन माहीत आहेच. (टोपणनावाचे काय झाले?) अंबिका सोनींनी गळचेपी, अमर्याद सत्ता ह्याबद्दल गप्पा कराव्यात :) असो. (कॉम्प्लान घेणे विसरू नका.)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मदत, हेल्प, एफ-१

>> उपक्रमाच्या भाषेबद्दल कोण बोलतंय :) <<
स्लँगबद्दल तुमची मतं आत्यंतिक असतील किंवा नसतील तरीही त्याबद्दल एक अभ्यासपूर्ण (=उपक्रमी) लेख लिहावात ही विनंती.

>> तुम्हाला गळचेपी, अमर्याद सत्ता ह्यांच्याबद्दल कधीपासून? <<
या वाक्याचा नक्की अर्थ काय? हे एक वाक्य आहे काय?

>> तिकडे सत्ताकेंद्राच्या आजूबाजूला थुईथुई करणाऱ्या खरडवहीराजकुमारींनी (किंवा खरडवहीराजकुमारांनी) इकडे खरडवह्यांतच हिंडणे बरे. <<
तिकडे म्हणजे कुठे? सत्ताकेंद्र म्हणजे काय? आणि तोच न्याय इथेही लावायचा काय?

>> (टोपणनावाचे काय झाले?) <<
तुम्हाला माहित नाही काय? तुम्हाला माहित नसेल तर मलाही माहित नाही.
व्यक्तीगत मालकीच्या आस्थापनांमधे मालकाने काय करावे हे सांगणारे इतर लोकं कोण? उदा: इथले माझे किंवा इतर कोणाचेही, कोणत्याही कारणासाठी/कारणाशिवाय प्रतिसाद मालक किंवा त्यांच्या आजूबाजूला थुईथुई करणार्‍या आयडींनी उडवले तरीही तक्रार का करायची? माझ्याकडे कोणी नारळ (वा काँप्लान) घेऊन आलेलं नाही, "या आणि लिहा".

>> (कॉम्प्लान घ्याच.) <<
माझा पोस्टल पत्ता माहित असेलच, पाठवून द्या; म्हणजे मी विसरण्याची शक्यताच नाही. ;-)

फरक

तुम्हाला माहित नाही काय? तुम्हाला माहित नसेल तर मलाही माहित नाही.

huh? धम्मकलाडू तिकडे संपादक नाहीत. तिकडे संपादकांना व्यवस्थापनात काही विशेष स्थान असते की बहुतेक सारे नुस्ते रबरस्टँपच असतात?

व्यक्तीगत मालकीच्या आस्थापनांमधे मालकाने काय करावे हे सांगणारे इतर लोकं कोण? उदा: इथले माझे किंवा इतर कोणाचेही, कोणत्याही कारणासाठी/कारणाशिवाय प्रतिसाद मालक किंवा त्यांच्या आजूबाजूला थुईथुई करणार्‍या आयडींनी उडवले तरीही तक्रार का करायची?

तक्रार करण्याचा हक्क आहे असे नाही, मालकांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा ठेवावी असेही नाही. परंतु, "मालकांनी मनमानी केली की विवेकी निर्णय घेतला?" या प्रश्नाविषयी स्वतःचे मत मात्र बाळगता येते.

उपरोक्त प्रतिसादातून नवीन माहिती मिळाली नाही.

>> धम्मकलाडू तिकडे संपादक नाहीत. <<
तिथे ही माहिती उघडच आहे, त्यामुळे हे वाक्य तिथे काय आणि इथे काय निरूपयोगी आहे.

>> तिकडे संपादकांना व्यवस्थापनात काही विशेष स्थान असते की बहुतेक सारे नुस्ते रबरस्टँपच असतात? <<
कल्पना नाही. मी कोणत्याही संस्थळावर संपादक नाही आणि मला त्या 'गॉसिप'मधे रसही नाही.

>> तक्रार करण्याचा हक्क आहे असे नाही, मालकांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा ठेवावी असेही नाही.<<
उत्तम.

>> परंतु, "मालकांनी मनमानी केली की विवेकी निर्णय घेतला?" या प्रश्नाविषयी स्वतःचे मत मात्र बाळगता येते. <<
माझा विचार हाच विवेक आणि इतरांचा तेवढा अतिरेक, हे मत एकापेक्षा जास्त लोकं बाळगू शकतात, याबद्दल तुमच्या मनात किंतू आहे काय?

नाही

तिथे ही माहिती उघडच आहे, त्यामुळे हे वाक्य तिथे काय आणि इथे काय निरूपयोगी आहे.

ते तेथे संपादक नसल्यामुळे "तुम्हाला माहित नाही काय?" हा प्रश्नच गैरलागू आहे आणि "तुम्हाला माहित नसेल तर मलाही माहित नाही" हे विधान निरर्थक आहे इतकेच माझे प्रतिपादन आहे. त्याऐवजी, "तेथील संपादकांनाच माहिती नाही आणि त्यामुळे मलाही माहिती नाही" असे उत्तर योग्य ठरले असते.

मला त्या 'गॉसिप'मधे रसही नाही.

मान्य! तुम्हाला केवळ "उपक्रमाच्या भाषेत कोलॅटरल डॅमेज" या गॉसिपमध्येच रस असेल ना?

माझा विचार हाच विवेक आणि इतरांचा तेवढा अतिरेक, हे मत एकापेक्षा जास्त लोकं बाळगू शकतात, याबद्दल तुमच्या मनात किंतू आहे काय?

किंतु नाही. वास्तविक त्यामुळेच तर, व्यक्तिगत मालकीच्या आस्थापनांमधेही मालकाने काय करावे त्याविषयीचे मत सारे लोक बाळगू शकतात.

अवांतर

मूळ चर्चेवर अवांतर होईल म्हणून मी माझा फक्त मुद्दा मांडतो, तुम्हाला हवी असल्यास आपण सर्व चर्चा खवतून किंवा नवीन लेखावर करू.

(अंमलबजावणीत अत्याचार घडणे शक्यच नाही असे नाही, परंतु, आणीबाणीनंतर त्यांची चौकशी करणे शक्य असते.)

यात आणीबाणी संपेल असं गृहितक आहे. जुलमी राज्यकर्ते सत्ता सहजासहजी सोडताना दिसत नाहीत. मग 'अरे पुन्हा संसारांच्या पेटवा मशाली' करावं लागतं.

'कायम आणीबाणीसदृश राजवटीत राहाणारी जनता लोकशाहीत रहाणाऱ्या जनतेपेक्षा अधिक सुखी असते' हा तुमचा वर्किंग हायपोथिसिस आहे का? कारण 'बेनेव्होलंट टिरनी बेस्ट असते - तेव्हा टिरनी तर सुरू करू, कधीतरी ती बेनेव्होलंट होईलच' असा तुमचा दृष्टीकोन वाटला.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अनेक चुका...

यनावालांच्या प्रतिसादात अनेक तांत्रिक चुका आहेत.

आपल्या देशात ९५%+ लोक आस्तिक, देव धर्म मानणारे आहेत.बहुसंख्य राजकारणी नखशिखान्त धार्मिक आहेत.

हे पटत नाही. जर चार्वाकवादी, नास्तिक लोकांना अनैतिक वागायचं असेल तर ते आपण आस्तिक असल्याचं ढोंग आधी करणार नाहीत का? आणि तुम्ही राजकारण्यांच्या जाहीर वागण्याबोलण्यावर विश्वास ठेवता? यनावालाशेठ, तुमने अनैतिकताकी दारू पियेलीच नई! तुम्ही आस्तिक असावेत असा संशय यायला लागला आहे. की तुम्ही शब्दप्रामाण्य मानायला लागलात? पण म्हणजे परत तुम्ही विज्ञानवादी निश्चितच नाही.

एकदा भारतातले बहुतेक सगळे लोक नास्तिक पण अनैतिकता लपवण्यासाठी आस्तिक म्हणवणारे असं मानलं की तुमच्या पुढच्या सगळ्या विधानांचा अर्थ लागतो. किंबहुना तो पुरावाच नाही का?

मला ईश आपट्यांच्या मतांविषयी शंका आहेत, पण म्हणून मी काही इतका ढिसाळ युक्तीवाद करणार नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

नोबॉल

यनावालांच्या प्रतिसादात अनेक तांत्रिक चुका आहेत.

सीझर्स वाइफ मस्ट बी अबव्ह सस्पिशन. निदान या संकेतस्थळावर तरी. :)

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

दुश्मन न करे दोस्तने वो काम किया है

असे यनावाला म्हणत असतील. राजेश घासकडवी "त्या" लोकांपैकी आहेत असे समजावे का?

हं

नववर्षाचा राडा असावा या अंदाजाने मी प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, या प्रतिसादावरून असे दिसते की तुमचा युक्तिवाद गंभीरपणे केलेला असावा.

चार्वाकवादी, नास्तिक लोकांना अनैतिक वागायचं असेल तर ते आपण आस्तिक असल्याचं ढोंग आधी करणार नाहीत का? आणि तुम्ही राजकारण्यांच्या जाहीर वागण्याबोलण्यावर विश्वास ठेवता? यनावालाशेठ, तुमने अनैतिकताकी दारू पियेलीच नई! तुम्ही आस्तिक असावेत असा संशय यायला लागला आहे. की तुम्ही शब्दप्रामाण्य मानायला लागलात? पण म्हणजे परत तुम्ही विज्ञानवादी निश्चितच नाही.

एकदा भारतातले बहुतेक सगळे लोक नास्तिक पण अनैतिकता लपवण्यासाठी आस्तिक म्हणवणारे असं मानलं की तुमच्या पुढच्या सगळ्या विधानांचा अर्थ लागतो. किंबहुना तो पुरावाच नाही का?

ही धडधडीत कॉन्स्पिरसी थिअरी आहे. ऑकॅमचा वस्तरा वापरू:

उपलब्ध माहिती: अनैतिक वागणूक करणारे लोक आस्तिकतेचा दावा करताना दिसतात.

अभ्युपगम १:
काहीही अधिक गृहीत धरू नये, ते लोक खरेच आस्तिक असल्याचे मानावे.
एकूण गृहीतके = ०

अभ्युपगम २:
गृहीतक १: अनैतिक वागणूक करणारे लोक वास्तविक नास्तिक आहेत.
गृहीतक २: अनैतिक वागणूक करणारे लोक खोटे बोलत आहेत.
एकूण गृहीतके = २

∴ अभ्युपगम २ ला अधिक गृहीतकांचा वापर करावा लागतो.

असल्या दाव्यांच्या बाबतीत, absence of evidence is evidence of absence ;)

धार...

तुमच्या ऑकॅमच्या वस्तऱ्याला थोडी धार काढावी अशी विनंती करतो. तुम्ही म्हटलेली गृहितकं मनुष्यस्वभावावरून जर येत असतील तर दुसरं गृहीतक हे गृहीतक रहात नाही. अनैतिक वागणूक करणारे सर्वच नास्तिक असो वा नसो, काही कारणाने आस्तिक म्हणवून घेतात. (यनावालांच्या तर्कक्रीडेतले यक्ष आणि गंधर्व आठवा) तसं असेल तर पहिलं गृहितक हेही गृहीतक रहात नाही. समाज एखादी गोष्ट करतो म्हणजे ती काही कॉन्स्पिरसी होत नाही.

लोक जे बोलतात ते खरं आहे हा नल हायपोथिसिस केव्हापासून झाला? ते शब्दप्रामाण्य झालं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तरीही

तुम्ही म्हटलेली गृहितकं मनुष्यस्वभावावरून जर येत असतील तर दुसरं गृहीतक हे गृहीतक रहात नाही.

"गृहीतक २: अनैतिक वागणूक करणारे लोक खोटे बोलत आहेत." हे विधान ऑब्विअस असल्याचे मनुष्यस्वभावावरून कोणत्या पायर्‍यांनी दाखविता येते? खोटे बोलून त्यांना काही अतिरिक्त लाभ असल्याचे सिद्ध करावे लागेल. आस्तिक असल्याबद्दल त्यांना कमी संशय, कमी शिक्षा, इ. काही लाभ प्राप्त होत असतील तर ठीक आहे.

अनैतिक वागणूक करणारे सर्वच नास्तिक असो वा नसो, काही कारणाने आस्तिक म्हणवून घेतात. (यनावालांच्या तर्कक्रीडेतले यक्ष आणि गंधर्व आठवा) तसं असेल तर पहिलं गृहितक हेही गृहीतक रहात नाही.

परंतु, पहिल्या गृहीतकाच्या बदल्यात, "अनैतिक वागणूक करणारे सर्वच लोक आस्तिक म्हणवून घेतात" हेही एक गृहीतकच आहे!

समाज एखादी गोष्ट करतो म्हणजे ती काही कॉन्स्पिरसी होत नाही.

अनैतिक नास्तिक अनैतिकतेला लपविण्यासाठी आस्तिकतेच्या मागे दडत असतील तर ती कॉन्स्पिरसीच ठरेल, मी तुमच्या प्रतिसादाला कॉन्स्पिरसी थिअरी म्हटले.
अधिक गृहीतके असलेला अभ्युपगम म्हणजेच कॉन्स्पिरसी थिअरी होय.

लोक जे बोलतात ते खरं आहे हा नल हायपोथिसिस केव्हापासून झाला? ते शब्दप्रामाण्य झालं.

शब्दप्रामाण्य म्हणजे 'दाव्याची तपासणीच न करणे'. नल हायपोथेसिसच्या विरुद्ध पुरावा उपलब्ध झाल्यास त्याचा अभ्यास करण्यात येतो आणि पुरावा योग्य असल्यास नल हायपोथेसिस नाकारण्यात येतो. "स्वतःला आस्तिक म्हणविणारे लोक खरेच आस्तिक आहेत" या विधानाच्या विरोधी पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. तोवर absence of evidence is evidence of absence हे तत्त्वच नल हायपोथेसिस ठरविते.

?

खोटे बोलून त्यांना काही अतिरिक्त लाभ असल्याचे सिद्ध करावे लागेल. आस्तिक असल्याबद्दल त्यांना कमी संशय, कमी शिक्षा, इ. काही लाभ प्राप्त

:) "बच्चे तो भगवान की देन होते हे" हे म्हणताना कितपत अस्तिकतेने म्हंटले जाते आणि कितपत "फायदा" ;) उठविण्यासाठी म्हंटले जाते(जात होते).

?

लाभ काय? नास्तिकांनी मुले प्रसविल्यास त्यांना शिक्षा आणि आस्तिकांना मात्र माफी अशी काही व्यवस्था होती काय?

गोंधळ

तुमच्या प्रतिसादातला तार्किक गोंधळ समजावून घ्यायला कष्ट पडतात. शब्दप्रामाण्य योग्य नव्हे हे एकदा सांगून लगेच पुढच्याच ओळीत 'जोपर्यंत शब्द तपासले जात नाहीत तोपर्यंत शब्द सत्यच मानले पाहिजेत असं काहीसं म्हणता...'

मनुष्यस्वभावावरून कोणत्या पायर्‍यांनी दाखविता येते?

मला दाखवण्याची गरजच नाही. अनैतिक लोक खोटं बोलू शकतील असा माझा अंदाज आहे. मुळात यनावालांनी काही कंजेक्चर्स मांडली आहेत. ती सिद्ध करणं, व पर्यायी कारणं चुकीची आहेत हे दाखवणं हे त्यांचं काम आहे.

कॉन्स्पिरसी थियरीसदृश वागणूक कॉन्स्पिरसी नसतानाही अनेकदा दिसू शकते. मॉब बिहेविअरमध्ये कॉन्स्पिरसीशिवाय अनेक सामायिक वागणूक घडताना दिसते. बॅंक बुडते आहे अशी अफवा उठली की धावत जाणारे, पैसे काढून घेणारे (व त्यामुळे खरोखर बॅंक बुडवणारे) हे काही कट कारस्थान करून जात नसतात.

"अनैतिक वागणूक करणारे सर्वच लोक आस्तिक म्हणवून घेतात" हेही एक गृहीतकच आहे!

कदाचित सगळ्या नास्तिक लोकांना आस्तिक म्हणवून घेण्याची गरज वाटत असेल - ते अनैतिक असोत वा नसोत. (ज्यांना शक्य होतं त्या) अनेक ज्यूंनी आपण जर्मन वंशाचे म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

असो. यनावालांनी मुळात 'सर्व राजकारणी तर नखशिखांत धार्मिक आहेत' असं विधान पुष्ट्यर्थ म्हणून दिलं तेव्हा गंमत वाटली. राजकारणी माणूस जे वागतो, बोलतो ते सत्य मानण्याची चूक कोणीच धादान्तवादी करत नाही, करू नये. सर्वसामान्य समाजाबाबतीतही थोड्या फार प्रमाणात हे लागू पडतं. तुम्ही गृहितकं वगैरे शब्द वापरले, तरी इथली सगळी विधानं ही कंजेक्चर्सच आहेत. कुठलीच खोडून काढण्याइतका विदा कोणाकडे नाही. उगाच कशाला तो वस्तरा बाहेर काढायचा?

ईश आपट्यांनी देखील 'अनैतिकता/स्वैराचार करता यावा यासाठी (काही) नास्तिकांनी देव नाकारला (व आपली मतं पटवून इतरांनाही नास्तिक केलं)' अशा प्रकारचा दावा केलेला आहे. यात 'सर्व नास्तिक स्वैराचारी आहेत' किंवा 'फक्त नास्तिक अनैतिक आहेत' ही विधानं यनावालांना कुठे दिसली?

९५% आस्तिक हेही पचायला जड जातं. आस्तिकतेमध्ये आहे - नाही असं काळंपाढरंपण नसून राखाडी छटा आहेत. नक्की कसल्या जोरावर ही रेषा आखलेली आहे? यनावालांनीच उत्तरं दिली तर बरं.

माझा मुद्दा असा आहे की आपट्यांचं बरोबर आहे असं नाही, तर यनावालांचा युक्तिवाद भोंगळ आहे. इतर शक्यता त्यांनी ध्यानात घेतलेल्या नाहीत. नैतिकता व आस्तिकता यांची मूळ लेखात नसलेली सांगड गृहीत धरलेली आहे.

असो. माझ्या मतांचं पुरेसं समर्थन दिलेलं आहे. तुम्हाला जर माझं पटलं तर ठीक नाही पटलं तर ठीक. यापुढे आणखी किती कळफलक झिजवायचा या मुद्द्यावर?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

खुलासा

तुमच्या प्रतिसादातला तार्किक गोंधळ समजावून घ्यायला कष्ट पडतात. शब्दप्रामाण्य योग्य नव्हे हे एकदा सांगून लगेच पुढच्याच ओळीत 'जोपर्यंत शब्द तपासले जात नाहीत तोपर्यंत शब्द सत्यच मानले पाहिजेत असं काहीसं म्हणता...'

तार्किक गोंधळ नाही, शब्दप्रामाण्य म्हणजे 'दाव्याची तपासणीच न करणे'. तपासणीची तयारी असल्यास त्याला शब्दप्रामाण्य म्हणता येणार नाही.

मला दाखवण्याची गरजच नाही. अनैतिक लोक खोटं बोलू शकतील असा माझा अंदाज आहे. मुळात यनावालांनी काही कंजेक्चर्स मांडली आहेत. ती सिद्ध करणं, व पर्यायी कारणं चुकीची आहेत हे दाखवणं हे त्यांचं काम आहे.

"दिसते तसे नाही" असा अंदाज तुम्ही मांडला आहे आणि ते गृहीतकच आहे. कंजेक्चर म्हणजे तुटपुंज्या पुराव्यावरून मोठा अंदाज बांधणे, उदा., करोडो सम संख्यांसाठी असे दिसते की त्यांना कोणत्यातरी दोन मूळ संख्यांच्या बेरजेच्या रूपात मांडता येते. त्यावरून गोल्डबाख कंजेक्चर हा नल हायपोथेसिस नाही काय?

कॉन्स्पिरसी थियरीसदृश वागणूक कॉन्स्पिरसी नसतानाही अनेकदा दिसू शकते. मॉब बिहेविअरमध्ये कॉन्स्पिरसीशिवाय अनेक सामायिक वागणूक घडताना दिसते. बॅंक बुडते आहे अशी अफवा उठली की धावत जाणारे, पैसे काढून घेणारे (व त्यामुळे खरोखर बॅंक बुडवणारे) हे काही कट कारस्थान करून जात नसतात.

ठीक, कॉन्स्पिरसीमध्ये समूहाने योजना आखावी लागते तसे येथे नाही. परंतु, लोक वैयक्तिक पातळीवर लबाडी करीत आहेत असा तुमचा दावा आहेच! त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे तुम्ही दिलेले नाहीत. कॉन्स्पिरसी थिअरी ऐवजी कारस्थान (हे असामूहिकही असू शकते) सिद्धांत म्हणू.

कदाचित सगळ्या नास्तिक लोकांना आस्तिक म्हणवून घेण्याची गरज वाटत असेल - ते अनैतिक असोत वा नसोत. (ज्यांना शक्य होतं त्या) अनेक ज्यूंनी आपण जर्मन वंशाचे म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ज्यूंना लाभ शक्य होता हे ज्ञात आहे. अनैतिक व्यक्तीने स्वतःला आस्तिक म्हणविल्यास लाभ होतो असे तुम्ही सिद्ध केलेले नाही.

यनावालांनी मुळात 'सर्व राजकारणी तर नखशिखांत धार्मिक आहेत' असं विधान पुष्ट्यर्थ म्हणून दिलं तेव्हा गंमत वाटली. राजकारणी माणूस जे वागतो, बोलतो ते सत्य मानण्याची चूक कोणीच धादान्तवादी करत नाही, करू नये. सर्वसामान्य समाजाबाबतीतही थोड्या फार प्रमाणात हे लागू पडतं. तुम्ही गृहितकं वगैरे शब्द वापरले, तरी इथली सगळी विधानं ही कंजेक्चर्सच आहेत.

"सर्व राजकारणी तर नखशिखांत धार्मिक दिसतात" या निरीक्षणावरून "सर्व राजकारणी तर नखशिखांत धार्मिक आहेत" असा नल हायपोथेसिस आहे. "गॅरेजमध्ये ड्रॅगन दिसत नाही" या निरीक्षणावरून "गॅरेजमध्ये ड्रॅगन नाही" असा नल हायपोथेसिस बनविता येतो.

ईश आपट्यांनी देखील 'अनैतिकता/स्वैराचार करता यावा यासाठी (काही) नास्तिकांनी देव नाकारला (व आपली मतं पटवून इतरांनाही नास्तिक केलं)' अशा प्रकारचा दावा केलेला आहे. यात 'सर्व नास्तिक स्वैराचारी आहेत' किंवा 'फक्त नास्तिक अनैतिक आहेत' ही विधानं यनावालांना कुठे दिसली?

एक उत्तर नक्की ठरवा: अनैतिक व्यक्ती स्वतःला आस्तिक म्हणवितात की नास्तिक?
तुम्ही कंसात 'काही' असा शब्द घातला आहे तो अस्थानी आहे. "अनैतिकता/स्वैराचार करता यावा यासाठी (काही) नास्तिकांनी देव नाकारला" म्हणजे "अनैतिकता/स्वैराचार करता यावा यासाठी (सर्व) नास्तिकांनी देव नाकारला" असा अर्थ योग्य आहे. "If देव नाकारला Then अनैतिकतेची इच्छा होती" असे ते विधान आहे.
मुळात, स्वतःला नास्तिक म्हणविणे खेळ नाही. "देव आहे" असे भय मनात असेल तर प्रकटपणे "देव नाही" असे म्हटल्याने अनैतिक वर्तणुकीचे धैर्य मिळणार नाही. त्यामुळे, "देव नाकारणे" हा निर्णय विवक्षित 'हेतूने' शक्य नाही.

९५% आस्तिक हेही पचायला जड जातं. आस्तिकतेमध्ये आहे - नाही असं काळंपाढरंपण नसून राखाडी छटा आहेत. नक्की कसल्या जोरावर ही रेषा आखलेली आहे? यनावालांनीच उत्तरं दिली तर बरं.

देवाची संभवनीयता ज्यांना ५०% पेक्षा अधिक वाटते ते सारे आस्तिक, ज्यांना ५०% पेक्षा कमी वाटते ते सारे नास्तिक.

माझा मुद्दा असा आहे की आपट्यांचं बरोबर आहे असं नाही, तर यनावालांचा युक्तिवाद भोंगळ आहे. इतर शक्यता त्यांनी ध्यानात घेतलेल्या नाहीत. नैतिकता व आस्तिकता यांची मूळ लेखात नसलेली सांगड गृहीत धरलेली आहे.

सांगड मूळ लेखात आहेच. "ईश्वराला विरोध करण्याचे कारण एकच अनैतिक जगण्याकरता त्यांना ईश्वर नकोसा होतो." असे आपटे यांनी लिहिलेले आहे.

माझ्या मतांचं पुरेसं समर्थन दिलेलं आहे. तुम्हाला जर माझं पटलं तर ठीक नाही पटलं तर ठीक. यापुढे आणखी किती कळफलक झिजवायचा या मुद्द्यावर?

तुमच्या निर्णयाचे दु:ख आहे.

अवतार

ईश आपटे आणि गिरीश हे 'राम' आणि 'परशुराम' सारखे २ अवतार तर नाहीत?
मी धार्मिक असल्याने मला हा प्रश्न पडलाय.

प्रत्यक्ष म्हणजे नक्की काय?

प्रत्यक्ष म्हणजे नक्की काय? हे लेखकाने स्पष्ट करावे अशी मी विनंती करतो.

मला त्याचा अर्थ स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले असा लागतो. पण दुर्दैवाने माझे स्वतःचे डोळे थोडे कमकुवत आहेत. लहानपणापासून चष्मा आहे, काय करणार? आता चष्मा लावून मला जे दिसतं ते प्रत्यक्ष की अनुमानित? कारण चष्मा चालत असेल तर सूक्ष्मदर्शकातून जे दिसतं त्याला प्रत्यक्ष का म्हणू नये असाही प्रश्न निर्माण होतो. मग सूक्ष्मदर्शंक चालत असेल तर दुर्बिणीने काय घोडं मारलंय? आणि आजकाल म्हणे दुर्बिणींनासुद्धा कोणी डोळे लावून बसत नाही. बघणारे आरामात कॉंप्युटर स्क्रीनवर बघतात. म्हणजे आली पुन्हा मध्ये एक यंत्रणा. आणि हे सगळं चालत असेल तर रेडिओ दुर्बिणीतून 'दिसतं' त्याला प्रत्यक्ष म्हणायला काय हरकत आहे? कारण प्रकाश शोधणाऱ्या दुर्बिणींना जे दिसतं तेच कमी अधिक प्रमाणात रेडिओ दुर्बिणी, एक्स रे दुर्बिणी यांतून दिसतं. मग स्क्रीनवर येणारं जे काही आहे ते अनुमानित आहे का? की प्रत्यक्ष?

आणि अक्षाअक्षात देखील फरक असतात म्हणे. काहींना योगबलसिद्ध शक्ती असते आणि त्यातून जग वेगळंच दिसतं. मग त्यावरून काय बरं अनुमान काढावं? छे, सगळा गोंधळच आहे.

ठीक आहे, काही गोष्टी प्रत्यक्ष आणि काही अनुमानित आहेत. कदाचित प्रयोगसिद्ध गोष्टींना अनुमानित म्हणत असतील. आता ईश आपटे जेव्हा हा लेख टंकतात, तेव्हा दर क्षणाला एलेक्ट्रोनच्या अस्तित्वाविषयीचे नियम लक्षावधी वेळा पडताळून पहात असतात. ईश्वराच्या अस्तित्वाचे अनुमानित नियम दर क्षणाला कुठचे तपासले जातात हे मात्र कळत नाही. कदाचित एलेक्ट्रोन हाच ईश्वर असेल. सर्व चराचरात असणारा... प्रत्येक मूलद्रव्याला त्याचे गुणधर्म देणारा... व ईश आपटेंचा कॉंप्युटर चालवणारा. दिसत नाही, पण अस्तित्व मान्य करावंच लागतं.

धन्यवाद ईश आपटे, तुम्ही आम्हाला नवीन दृष्टी दिली आहे - ईश्वर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एलेक्ट्रोन आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

^ वर