बर्न ए भगवद्गीता!

खालील चित्रातील मजकूर वाचून त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे, ते नमूद करावे.
सूचना: चर्चेमुळे ज्या क्षणी संस्थळाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे असे दिसून येईल, त्या क्षणी हा चर्चा-प्रस्ताव हटवण्यासाठी संपादक-मंडळाला पूर्ण अधिकार आहेत.


burn_a_bhagvad_gita
चित्र स्रोत: ट्विटर | संदर्भ दुवा: [http://twitpic.com/3kwrax]

Comments

विकत घेऊन

चित्र दिसत नाही.

पुस्तके विकत घेऊन जाळणार असतील तर प्रकाशकांचा फायदा होईल असे वाटते. नसल्यास प्रकाशकांनी कायद्याची मदत घ्यावी.

असो.

फक्त त्या चित्राखाली विश्वहिंदुपरिषदेचा ष्टांप का आहे ते कळले नाही.

:)

चित्र दिसत नाही.

तुमच्या (आणि माझ्याही) कार्यालयातून ती साईट बंद असावी.
ती बातमी येथेही वाचता येईल.

नसल्यास प्रकाशकांनी कायद्याची मदत घ्यावी.

पुस्तके विकत घेऊन जाळणार असतील तर खुशाल जाळावीत असे माझ्या एका स्वाध्यायी मित्राचे मत आहे.

फक्त त्या चित्राखाली विश्वहिंदुपरिषदेचा ष्टांप का आहे ते कळले नाही.

म्हणजे चित्र दिसते आहे की!
--
माझी प्रतिक्रिया: ज्यांना बायबल जाळायचे त्यांनी बायबल (विकत घेऊन/स्वतः छापून) जाळावे.

कार्यालयात नाही

तुमच्या (आणि माझ्याही) कार्यालयातून ती साईट बंद असावी.

घरातूनच पाहिले. चर्चेतले चित्र दिसले नाही.

म्हणजे चित्र दिसते आहे की!

लेखात दिलेली लिंक वापरून पाहिले.

पुस्तके विकत घेऊन जाळणार असतील तर खुशाल जाळावीत असे माझ्या एका स्वाध्यायी मित्राचे मत आहे.

माझी कोणत्याही प्रकाशनाशी किंवा प्रकाशकांशी ओळख नाही. ;-)

ज्यांना बायबल जाळायचे त्यांनी बायबल (विकत घेऊन/स्वतः छापून) जाळावे.

अंशतः सहमत. स्वतः छापायचेच झाले तर आपल्याला हवे ते छापून विकावे की. जाळायचे कशाला?

अगदी हेच!

फक्त त्या चित्राखाली विश्वहिंदुपरिषदेचा ष्टांप का आहे ते कळले नाही.

अगदी हेच!

हेच म्हणतो

फक्त त्या चित्राखाली विश्वहिंदुपरिषदेचा ष्टांप का आहे ते कळले नाही.

हेच म्हणतो. बहुधा स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी विहिंपचाच हा डाव असावा असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:)

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

साल्वेशन आर्मी

हा दुवा साल्वेशन आर्मी चा आहे त्यात. हैदराबाद कचेरीचा उल्लेख दिसत नाही.

प्रमोद

हा कोणाचा तरी चावटपणा वाटतो.

काय प्रतिक्रिया देणार, पूसता?
दुर्लक्श करणार. हा कोणाचा तरी चावटपणा वाटतो. 2 जानेवारी पर्यंत वाट पाहुया.

शीर्शका मध्ये भगवदगीता लिहीताना 'द्' च्या नंतर 'ग' यायला हवा होता. हा विचित्र वर्ण (कॅरॅक्टर) मला आवडला नाही.

?

>>शीर्शका मध्ये भगवदगीता लिहीताना 'द्' च्या नंतर 'ग' यायला हवा होता. हा विचित्र वर्ण (कॅरॅक्टर) मला आवडला नाही.

आम्हाला पण दुर्लक्श, शीर्शक असे विचित्र लिहिलेले शब्द आवडत नाहीत. =))

अवांतर : ख्रिश्चन लोक बघा काय काय करीत आहेत असे दाखवण्यासाठी विहिंप प्रभृती अशी पत्रके प्रसारित करतात म्हणून त्यांचा ष्टांप असावा.

नितिन थत्ते

प्रश्नचिन्हाला उत्तर

वर्णासंदर्भातील प्रतिसाद हा संकेतस्थळाचे काम पहाणार्‍यांसाठी होता. तो चर्चा प्रस्तावकाच्या लेखनशैलीवर केलेली 'आगावू टिका-टिपण्णी' नव्हती. वर्णाचे दिसणे सुटसुटीत व स्पश्ट असायला हवे. वाचताना ते 'भगवद्रीता' असे दिसते.

अवांतर :
मराठीत 'ऍ' हा स्वर स्विकारला गेलेला आहे. ज्याला तुम्ही 'ष्टांप'* म्हणताहात, त्याला 'स्टॅम्प' असे मराठीत स्पश्ट उच्चारता येते व देवनागरीत लिहीताही येते. मराठीत त्याला 'शिक्का', 'ठप्पा' असे म्हणतात.

*(शी काय घाणेरडी ओळख आहे 'ष' ची. म्हणे! 'पोटफोड्या श' नव्हे, 'पोट फाटलेला व त्यामुळे पोटावर टाके पडलेला 'श')

जोडाक्षरे

>>वर्णासंदर्भातील प्रतिसाद हा संकेतस्थळाचे काम पहाणार्‍यांसाठी होता. तो चर्चा प्रस्तावकाच्या लेखनशैलीवर केलेली 'आगावू टिका-टिपण्णी' नव्हती. वर्णाचे दिसणे सुटसुटीत व स्पश्ट असायला हवे. वाचताना ते 'भगवद्रीता' असे दिसते.

तसे सूचित करणारे आपल्या प्रतिसादात काही दिसले नव्हते.

भगवद्गीता हा शब्द तुम्ही म्हणता तसा दिसण्यासाठी संकेतस्थळाचे काम पाहणार्‍यांनी काही करायची आवश्यकता नाही. तुम्ही फाफॉ वापरत असाल तर त्यात टूल्स-ऑप्शन्स-कंटेण्ट-फॉण्टस् & कलर्स् मध्ये मंगल फा फॉण्ट सेट केला की तुम्हाला हवा तसा "द्गी" दिसतो. (मंगल फॉण्टची अक्षरे एकूणात गचाळ दिसतात). संकेतस्थळाच्या चालकांनी बहुधा सीडॅकचा योगेश फॉण्ट ठेवला आहे. त्यात उभी जोडाक्षरे दिसतात. :) :(

>>'स्टॅम्प' असे मराठीत स्पश्ट उच्चारता येते

हो. आणि स्पष्टही उच्चारता येते.

नितिन थत्ते

अरे वा! ह्या वेळी विशय भरताना '?' टाकले नाही.

तसे सूचित करणारे आपल्या प्रतिसादात काही दिसले नव्हते.
तुम्हाला माझ्या प्रतिसादातून काहि कळले नव्हते तर तुम्ही 'असे का लिहीले आहे?' असे विचारायला हवे होते. तुम्ही तसे तुमच्या पहिल्या उपप्रतिसादाआधि विचारले होते का?

हो. आणि स्पष्टही उच्चारता येते.
'ष' ची व्याख्या माझ्या लेखी काय आहे हे मी वर सांगितले होते तरीही हा प्रतिसाद...का बरे?
मी अंतरजालावर, उपक्रमवर मनोरंजनासाठी येतो, जमलंच तर काही शिकायला मिळाले तर शिकायला येतो. पण मी स्वत:ला मोफत कोणाकडून 'शिकवून घ्यायला' येत नाही. आजपर्यंत मीच माझा गुरू आहे. श्री. नितिन थत्ते, तुम्हाला माझे 'गुरू' व्हावेसे का वाटते?

शिशोंके घरमें रहनेवाले

--आम्हाला पण दुर्लक्श, शीर्शक असे विचित्र लिहिलेले शब्द आवडत नाहीत. =))

:-) शिशोंके घरमें रहनेवाले दुसरोंके घरपर पत्थर फेका नही करतें,

अवांतरः म्हण बदलली आहे

:-) शिशोंके घरमें रहनेवाले दुसरोंके घरपर पत्थर फेका नही करतें,

कृपया नोंद करावी. वरील म्हण बदलली आहे - शिशोंके घर में रहनेवाले, बेसमेंटमें कपडे बदलते है|*

* संदर्भः गोलमाल-३ नावाचा भयानक चित्रपट.

आम्हाला पण दुर्लक्श, शीर्शक असे विचित्र लिहिलेले शब्द आवडत नाहीत.

सहमत आहे आणि त्याबरोबर त्यांचे दिलेले स्पष्टीकरण, त्या अनुषंगाने येणारे लेख वगैरेही आवडत नाहीत.

बहुतेक

बहुतेक ह्याची एक प्रत विहिप ला पाठविली असेल. विहिप ने ती आपल्या फाईलला लावलेली असावी.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

थंडी वाढते आहे

काहीही प्रतिक्रिया नाही. थंडी वाढते आहे. पेटवा शेकोटी. बाकी रिटेशी सहमत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्टांप

तो स्टांप रिशीव्ड असावा. असे पत्र विहिंपला अधिकृतपणे मिळाले असे दिसण्या/भासण्यासाठीचा.

अशा कॉप्या जाळणे पर्यावरणविरोधी असावे. एखादी कॉपी डाउनलोड करून त्याच्या हव्या तितक्या कॉप्या बनवून फोल्डर उडवणे अधिक श्रेयस्कर-सांकेतिक-संतुलित ठरले असते.

गूगलवर उपक्रम

हाहाहा!

एखादी कॉपी डाउनलोड करून त्याच्या हव्या तितक्या कॉप्या बनवून फोल्डर उडवणे अधिक श्रेयस्कर-सांकेतिक-संतुलित ठरले असते.

भारी!! या ऐडियेने बशींची जाळपोळ, गाड्यांवर दगडफेक वगैरे सर्व रोखता येईल. ;-)

+१

स्वस्त आणि मस्त पर्याय.

किंवा एखादी स्क्रिप्ट चालवता येईल.

-> १. कॉपी बनवा->
| २. डिलीट करा->
| ३. स्मृतिपटलावर त्या ठिकाणी रँडमनंबरचा नांगर फिरवा->
| ४. आटी घेऊन १ वर जा -|
|--------------------<-|

याने काही प्रमाणात वीज खर्च होईल, त्यामुळे काहीतरी जळल्याचे समाधानही मिळेल.

+५१२!

बॅश स्क्रिप्ट्स प्रोग्रॅम करताना बरेचवेळा ग्रेप > पाइप > ऑक > सेड > कट > रीडायरेक्ट/एरर रीडायरेक्ट वापरताना असाच काहीसा अल्गोरिदम वापरल्याचा मला अनुभव आहे! :P*

---

अवांतर: (वर आलेल्या काही प्रतिसादांना अनुसरून—वैयक्तिक टिप्पणी म्हणून गृहीत धरू नये, प्लीज!)
१. शब्द-संदर्भ: ;) भगवद् गीता लिहितात कसे ते मला माहीत नाही! घरात श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी लिहिलेले "भगवद्गीता - जशी आहे तशी" हे पुस्तक आहे, पुस्तकाच्या शीर्षकात त्यांनी पाय मोडलेला द (?) म्हणजेच काहीसा "द्" असा दिसणारा वापरलाय आणि हा "द्" व पुढील "गी" हे शब्द एकमेकांना जोडून आहेत—याबाबतीत आपण (म्हणजे मी!) अज्ञानी आहोत, हे मान्य! :D*
२. "ऍ" च्या बाबतीत सांगायचे झाले तर आम्ही आयबस, स्किम इत्यादींसारख्या इंटेलिजेन्ट इनपुट पद्धती वापरणारे, एमसेव्हन्टीनएन डिरेक्टरी मध्ये हवे असलेले युनिकोड कॅरेक्टर्स असणारी ठराविक माइम फाइल हलवली की काम फत्ते—उपक्रमच्या "ऍ" पेक्षा आमचा (म्हणजे माझा!) "अॅ" चांगला दिसतो, हे ठीक. बाकी रुपये दर्शवण्यासाठी बनवले गेलेले सांकेतिक चिन्ह "₹" आमच्याकडे दिसते, या चिन्हाला युटीएफएट सपोर्ट मिळालाय, आम्ही (म्हणजे मी!) जी सिस्टीम वापरतो, तीच्या अगदी नवीन इन्स्टॉलनंतर लगेच हे कसलाही बाहेरून डाउनलोड केलेला फॉन्ट स्थापित न करता दिसू लागले, तुमच्याकडे दिसते आहे का, डब्बा दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या सिस्टीमची नवीन आवृत्ती बघावी लागेल बहुधा!

* ~ स्मायलींमध्ये रोमन चिन्हे वापरली नसती तर आमच्या (म्हणजे माझ्या!) चेहऱ्यावरचे (की चेहर्‍यावरचे?) हावभाव तुम्हाला कळायला अवघड गेले असते.

पर्याय

पुस्तक जाळण्याविषयी नितिन थत्ते यांनी दिलेले विश्लेषण मला पटते.
पुस्तक जाळणे हा भावना दुखावण्याचा प्रयत्न असतो. घरात काहीही करून समाधान मिळणार नाही. पर्यावरणाला जपून (किमान हानी करून) द्वेष व्यक्त करण्यासाठी कोणत्यातरी (अभिव्यक्तिस्वातंत्र्यसमर्थक) देशातील डोमेन घेऊन त्यावर भावना दुखविणारे साहित्य प्रकाशित करणे सोयीचे ठरेल. म्हणजे, पुस्तक जाळण्याबद्दल जी काय शिक्षा मिळाली असती ती तशीच भोगावी लागू शकेल पण साईट बंद करणे अवघड होईल! शिवाय, इंटरनेटवर अशी बंदी घालणे अशक्यच असते (उदा).

त्यांना माफ करा

ते काय करत आहेत त्यांना ठाऊक नाही. भगवान त्यांना माफ करा.

चालायचंच!

पुस्तकं जाळण्याला विरोध आहे म्हणून विरोध. ते पुस्तक भगवद्गीता आहे की कुराण की बायबल यामुळे काहीच फरक नाही पडत नाही.

'ऐसपैस गप्पा' मधील दुर्गाबाईंचे विधान आठवले. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती त्याचा दुर्गाबाईंनी याच भावनेतून निषेध केला होता.

बिपिन कार्यकर्ते

+

सहमत आहे. परंतु....

मनुस्मृती जाळण्याच्या आंबेडकरांच्या भूमिकेविषयी कुरुंदकरांनी विस्तृत विवेचन केले आहे. गीता जाळणे (किंवा मनुस्मृती जाळणे) म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरील गीतेची प्रत्येक प्रत शोधून ती जाळणे असे नाही. जाळणे हे प्रतिकात्मक असते. आणि त्या पुस्तकातल्या विचारांचा निषेध म्हणून ते जाळले जाते. त्याशिवाय आपला अनेक विचारांना विरोध असेल पण म्हणून आपण प्रत्येक पुस्तक जाळत नाही. ज्या विचारांना आपला विरोध आहे पण "त्या पुस्तकातले विचार योग्य आणि कालातीत आहेत" असे म्हणून खूपसे लोक त्या पुस्तकाला (त्यातल्या विचारांना) कवटाळून आहेत "त्या लोकांचा निषेध" करण्याचा विचार पुस्तक जाळण्यामागे असतो. [दुर्गाबाई "त्या लोकां"पैकी होत्या की कसे हे मला माहिती नाही. त्यांनी निषेध का केला होता ते माहिती नाही].

नितिन थत्ते

रद्दी

म्हणुनच "अमुकतमुक" जाळतोय असे म्हणुन फक्त रद्दी कागदच जाळावेत असे आमचे मत् झाले आहे.

-Nile

कुरुंदकरांचे विश्लेषण पटण्यासारखे

या घटनेबाबत कुरुंदकरांचे विश्लेषण पटण्यासारखे आहे.

एकूणात "ऐसपैस गप्पां"मधले "आंबेडकर यांना समजलेला बौद्धधर्म"* याबाबत विश्लेषण मला पटत नाही, आणि त्या अनुषंगाने "जाळलेली मनुस्मृतीची प्रत" याबाबत विश्लेषणही पटत नाही.

मनुस्मृतीमधील बरेचसे मुद्दे ग्राह्य आहेत असा "ऐसपैस गप्पां"मधील संदर्भ आहे. काही प्रमाणात तरी - पण पुरत्या नव्हे - दुर्गाबाई "त्या लोकां"पैकी होत्या, असे आपण म्हणू शकतो.

*अवांतर असल्यामुळे पांढर्‍या ठशात : आंबेडकरांनी आचरलेला बौद्धधर्म आणि अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्धधर्म वेगळा होता, याबाबत काही शंका नाही. दुर्गाबाईंचे हे विवेचन ठीकच आहे. पण धर्म प्रवाही नाहीत असे त्यांनी या बाबतीत धोरण घेतलेले दिसते, ते त्यांच्याच संशोधनाशी विसंगत दिसते. म्हणजे "दीक्षा ही सामूहिक असू शकत नाही, वैयक्तिक असावी लागते" वगैरे कर्मकांडांतले तपशील त्या धर्मपीठाच्या अधिकारवाणीने ठरवतात, ते पटत नाही. आंबेडकरांनी चालना दिलेल्या पंथाच्या विचारसरणीत बौद्ध विचारांचा इतका मोठा प्रभाव आहे, की बौद्ध धर्माच्या चालू पंथांपैकी तो मानायला काहीच हरकत नाही, असे मला वाटते. आंबेडकर हे बौद्धधर्माचे केवळ अभ्यासक नव्हते, तर त्यात कालानुरूप बदल घडवून आणून तो आता व्यवहार्य करायची त्यांची खटपट होती. या बाबतीत आंबेडकर तटस्थ नव्हते, हे एकदा लक्षात घेतले, की बर्‍याच गोष्टींचे विश्लेषण बदलले पाहिजे.
दुर्गाबाईंना कित्येकदा बिगर-तटस्थ व्यक्तींच्या समजुतींचे विश्लेषण उत्तम जमते. उदाहरणार्थ : गोंड समाजामध्ये रामायण-महाभारताबद्दल अतिशय वेगळ्या आख्यायिका आहेत, याबद्दल त्या सांगतात. या बदललेल्या कथानकांत गोंड समाज उठून दिसतो, गोंडांच्या सामाजिक रूढींना बदललेली कथानके लागू आहेत, हे त्या सांगतात. "गोंडांना असा कुठला हक्क नाही, गोंड चुकले" वगैरे मुद्दे त्या मुळीच उपस्थित करत नाहीत. मात्र नागर समाजात महाभारत समजण्यासाठी अमुक एक संहितेचा वापर केलाच पाहिजे, अशा प्रकारचा हट्ट त्या धरतात. अशा वेळी त्यांची मते वाचताना भकास वाटते.
आता या बाबतीत दुर्गाबाई बिगर-तटस्थ आहेत असे जाणून मी दुर्गाबाईंबद्दल माझे विश्लेषण बदलू नये काय? बदलावे. तसे माझे विश्लेषण मी बदललेलेच आहे. आपल्या आयुष्यातल्या क्रियाशील घडामोडींबाबत मनुष्य तटस्थ कसा असू शकेल? दुर्गाबाई बिगर-तटस्थ आहेत याबाबत विषाद नाही. मात्र "अमुक बाबतीत माझ्या भावना आणि माझी जीवनपद्धती गुंतल्यामुळे मी तटस्थ राहाणार नाही" याबद्दल आंतरिक जाणीव असायला पाहिजे. ती आंतरिक जाणीव न होता त्यांना स्वतःची भूमिका तटस्थ वाटते. याबद्दल मला मनीं वाटें उदास.
*

प्रतिसाद उडवणे/ लेख अप्रकाशित करणे > पुस्तक जाळणे

पुस्तकं जाळण्याला विरोध आहे म्हणून विरोध.

भुमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. जालीय विरोधी लेख/चर्चा/प्रतिसाद अप्रकाशित करणे व पुस्तक जाळणे यात फारसा फरक नसावा. पुस्तके जाळल्याने ते पुस्तक नष्ट होते असे घडत नाही. पण जालावरील लिखाणाची बरेचदा प्रत बनवून ठेवलेली नसल्याने ते कायमचेच नष्ट होण्याचा संभव असतो.

अवांतर: या चर्चेत दुर्गाबाई अजून कशा दिसल्या नाहीत असा विचार करत असतांनाच बिपिन यांचा प्रतिसाद वाचला.
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

इंग्रजीचा वापर

एक गोष्ट मात्र कळाली- विश्व हिंदू परीषदही इंग्रजीचा वापर करते- ष्टांपावरुन कळते.

पुस्ती

वरील माझ्या प्रतिसादांच्या अनुषंगाने एक पुस्ती जोडावीशी वाटते.

गीता/मनुस्मृती जाळण्यामागची भूमिका सांगितल्यावरसुद्धा माझा ख्रिश्चन चर्चने गीता जाळण्याला विरोध आहे. गीता/मनुस्मृती जाळायचीच असेल तर ती हिंदूंनीच जाळावी. कारण ज्या विचारांचा निषेध करायचा आहे त्याने हिंद्वेतरांना काही त्रास होत नाही.

नितिन थत्ते

+१ सहमत.

+१ सहमत.

डेव्हिल्स ऍडव्होकेट :-)

मी डेव्हिल्स ऍड्व्होकेट काय म्हणून व्हावे? मला हे पुस्तक जाळणे वगैरे प्रकार प्रगतिशील किंवा कार्यक्षम वाटत नाहीत.

- - -

पण तरी : "हिंद्वेतरांना काही त्रास होतो की नाही" हे हिंद्वेतरांना विचारावे.

थोडेसे ऍब्सर्ड करून तुमचे वाक्य सांगतो : मनुस्मृती जाळायचीच असेल तर ती "मनुवाद्यां"नीच जाळावी. गीता जाळायचीच असेल तर ती "गीताभक्तां"नीच जाळावी. .

१) बर्‍याचशा धर्मग्रंथांतली विधाने वैश्विक असतात - म्हणजे धर्मग्रंथाच्या अंतर्गतच "हा सर्वांचाच=तुझाही धर्मग्रंथ" असा उल्लेख असतो.
२) एखाद्या जमातीलाच मर्यादित म्हणून एखादा धर्मग्रंथ असतो, त्या जमातीतले लोक अन्य जमातीतल्या लोकांशी व्यवहार करतातच बहुधा.
म्हणजे म्लेंच्छांशी स्पर्श/भोजन/शरीरसंबंध व्यवहारांबद्दल निषेध एखाद्या हिंदू स्मृतिग्रंथात असतात, ते फक्त हिंदूंनीच आचरण्याबाबत आहेत, असे म्हणूया. पण हिंद्वेतराला हिंदूंशीही स्पर्श/भोजन/शरीरसंबंधाचा व्यवहार करावासा वाटू शकतो. त्यात सुख आहे, आणि निषेधामुळे व्यवहार होत नाही, त्याचे दु:ख आहे. अशा परिस्थितीत "हिंद्वेतराला त्रास नाही" असे ठासून कसे काय म्हणता येईल?

शब्दछळ

हा उगाच शब्दछळ वाटतो :)

>>मनुस्मृती जाळायचीच असेल तर ती "मनुवाद्यां"नीच जाळावी. गीता जाळायचीच असेल तर ती "गीताभक्तां"नीच जाळावी.
१००% (मनुवादी ची व्याख्या करावी लागेल, तरीदेखील तुमच्या भाषेत "ते लोक" अशी असू शकते")

>>हिंद्वेतराला हिंदूंशीही स्पर्श/भोजन/शरीरसंबंधाचा व्यवहार करावासा वाटू शकतो. त्यात सुख आहे, आणि निषेधामुळे व्यवहार होत नाही, त्याचे दु:ख आहे. अशा परिस्थितीत "हिंद्वेतराला त्रास नाही" असे ठासून कसे काय म्हणता येईल?

ह्या कारणांसाठी ते लोक गीता जाळत आहेत काय? हे विशेष आहे :)

असहमत

गीता/मनुस्मृती जाळण्यामागची भूमिका सांगितल्यावरसुद्धा माझा ख्रिश्चन चर्चने गीता जाळण्याला विरोध आहे. गीता/मनुस्मृती जाळायचीच असेल तर ती हिंदूंनीच जाळावी. कारण ज्या विचारांचा निषेध करायचा आहे त्याने हिंद्वेतरांना काही त्रास होत नाही.

ज्याला या ग्रंथातील विचारांचा त्रास होऊ शकतो असे लोक जाळण्याचा निर्णय घेण्यास उद्युक्त होऊ शकतात असे वाटते. हा त्रास नेमका कसा उद्भवेल हे सांगता येणे कठिण आहे. (उदा. धर्मग्रंथातील एखाद्या विधानाचा दुरुपयोग करून इतर धर्मीयांवर टीका करणे किंवा त्यांना त्रास देणे. आमच्या बायबलात देव हा एकच असतो म्हणून तुम्ही अनेक देवांना मानणारे निर्बुद्ध आहात अशा टैपचे वाक्य मला एकांनी सुनवले होते. मला व्यक्तिशः काही फरक पडत नसला तरी असे वाक्य ऐकल्यावर चवताळून उठणारे लोक असावेत असे वाटते.) येथे धनंजय यांचा प्रतिसाद पटतो.

असो

अवांतरः

मी खरे म्हणजे धनंजय यांना +१ असे लिहून सहमती देणार होते पण तेवढ्यात त्यांच्या प्रतिसादातील "वातत" असा शब्द पाहिला. मराठी भाषेत असा शब्द असल्याचे मला आठवत नाही (तशी माझी भाषा कच्चीच म्हणून चू. भू. दे. घे. असे लिहिते.) परंतु "वातत" हा टायपो असल्यास उगीच त्यावरून उपक्रमावर आणि मनोगतावर चर्चासत्र सुरु होऊन लोकांचे वेळ वाया जाऊ नयेत आणि धनंजय यांना सुधारणा करण्यास वेळ मिळावा म्हणून मी उपप्रतिसाद देत नाही.

कारण

प्रियालींनी सांगितलेल्या कारणासाठीच इथे प्रतिसाद दिला आहे.

धनंजय यांच्या वरील प्रतिसादाशी सहमत आहे. हिंदूंच्या ग्रंथांचा हिंदवेतरांना त्रास होऊ शकतो हे मान्य.

माझ्या प्प्रतिसादाचा रोख "तुम्ही तुमच्यातल्या दलितांवर अन्याय करता म्हणून आम्ही मनुस्मृती जाळतो" असा स्टॅण्ड ख्रिस्ती लोकांनी घ्यायला विरोध आहे.

नितिन थत्ते

उद्देश

"ख्रिश्चनांवरील अत्याचाराचा पाठिंबा करणारी पुस्तके म्हणून जाळतो" असे त्यांनी स्पष्टच सांगितले आहे की!

-१

त्यांनी सांगितले असले तरी गीतेत आणि मनुस्मृतीत म्लेच्छांवर/यवनांवर अत्याचार करा असे सांगितलेले नाही. सांगितलेले कारण खोटे आहे.

नितिन थत्ते

सहमत

१००% सहमत आहे!
गीतेत आणि मनुस्मृतीत म्लेच्छांवर/यवनांवर अत्याचार करा असे सांगितलेले नाही, हे बरोबर.
नितिनरावांशी सहमत होतांना आनंद झाला.
अशी वेळ आमच्यावर फार फार क्वचित येते :)
आणि त्यात त्यांचा भाव हिंदुत्त्ववादी झाल्याने (की भासल्याने?) अजून खास आनंद झाला. ;)

माझा कोणताही ग्रंथ जाळण्याला विरोध नाही फक्त विकत घेऊनच जाळा म्हणजे झाले... त्यातही गीताप्रेस च्या आवृत्त्या स्वस्त असतात त्या जाळून मजा येणार नाही.

गीता पूर्वार्धात म्हणते की -
विषाद - त्यांनी व्यक्त केला आहेच
आत्मज्ञान आणि समता - आत्मज्ञानाविषयी मी साशंक आहे. कुराण आणि गीता एकाच पातळीवर आणून समता त्यांनी दाखवलीच आहे.
स्वधर्म सोडू नका - आशा आहे की हे आपला सोडणार नाहीत.
फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करा. - आशा आहे की जाळल्यावर राखेकडून त्यांची काहीही अपेक्षा नसेल.
चित्तवृत्तींचा निरोध साधावा - पोपने निरोधाला मान्यता दिली आहेच. पण येथे चित्तवृत्तींचा निरोध असल्याने ते जरा गोंधळण्याची शक्यता आहे - आशा आहे की हे ही ते घडवत असतील.
सातत्ययोग व्हावा - सातत्याने गीता जाळल्यातर प्रकाशकांचा मोठ्या फायदा होण्याची शक्यता आहे.
समर्पणयोग - चर्चला मिळत असलेली सर्व मदत गीतेच्या प्रति खरेदी करण्यात समर्पीत व्हावी.

हा झाला पूर्वार्ध आवडल्यास गीतेचा उत्तरार्धही देईन.

बाकी या जाळपोळखोर लोकांना ख्रिस्ताची शिकवण किती कळली आहे, ते त्या आकाशातल्या बापालाच माहिती...
आपला
गुंडोपंत

ख्रिस्त?

>>बाकी या जाळपोळखोर लोकांना ख्रिस्ताची शिकवण किती कळली आहे, ते त्या आकाशातल्या बापालाच माहिती...

ख्रिस्ताचा आणि रोमन कॅथलिक चर्चचा संबंध किती याबाबत साशंक आहे.

नितिन थत्ते

दा विंची कोड

ख्रिस्ताचा आणि रोमन कॅथलिक चर्चचा संबंध किती याबाबत साशंक आहे.

हं, डॅन ब्राउनच्या दा विंची कोड मध्येही ख्रिस्त धर्मातील पंथांचा आपापसातील वाद दिसतो.

जाळण्या जाळण्यातला फरक

जाळणे हे कधी प्रतिकात्मक असते तर कधी खरोखरचे असते.

१. हल्ली मला एक चित्रकार भेटला त्याने स्वतःची चांगली पेन्टींग्ज जाळून टाकली. त्यांचे फोटो होते म्हणून ती मला पहायला मिळाली. ही पेंटिंग्ज आर्तता दाखवणारी होती. दुसर्‍यांपर्यंत आर्तता पोहोचू नये, किंवा नको ती आठवण म्हणून ती जाळली. हे खरे जाळणे झाले. मालकी त्याची, निर्णय त्याचा पण आपल्याला हळहळ वाटते.

२. एका चित्रपटात (जब वी मेट) नायिका नायकाला सोडून गेलेल्या प्रेयसीच्या फोटोला आग लावायला सांगते. आता आठवण सोडून दे, नवीन आयुष्य जगायला लाग हा त्यातला भाव. हे जाळणे म्हटले तर खरे (इतर फोटो नसतील तर) म्हटले तर प्रतिकात्मक. हे जाळणे समजू शकते.

३. मनुस्मृती आंबेडकरांनी जाळली ती निश्चित प्रतिकात्मक होती. इतर प्रती शिल्लक आहेत (बहुतेक मनुस्मृतीच्या प्रतिमा जाळण्यासाठीजास्त) अशा वेळी ती जाळून काही मिळवायचे नव्हते. नं.२ मधील नवीन अध्याय चालू करा या पद्धतीचे ते जाळणे आहे. याच बरोबर इतरेजनांना त्यात इशारा आहे. त्यात काही गैरनाही.

४. एखाद्या समाजाने आपलेच ग्रंथ जाळणे. मोहमदाच्या वेळी असे काहीसे घडले. धर्मपरिवर्तन (इस्लाम मधे आल्यावर) अनुयायांनी आपल्या पूर्वीच्या दैवतांचा त्याग त्यांना मोडून केला. हे करणे काहीसें नं.१ च्या जाळण्यासारखे आहे. (बामियान बुद्धाबाबत असे म्हणू शकू का?)

५. दुसर्‍यांच्या मालकीची पुस्तके/चिन्हे जाळणे (उदा. हिंदू देवालयांची मोडतोड.) हे वरील चारही प्रकारांपेक्षा वेगळे आहे. तिथे दहशत जाणवते.

६. काही ख्रिश्चनांनी केलेली कुराण/गीता (यातील गीता जाळणे ही बातमी खोटी असायचा संभव आहे.) जाळायचा प्रयत्न. हे प्रतिकात्मक असले तरी त्यात कधीतरी नं.५ ची आठवण करून देते.

तुमच्या विरोधाचे कारण कदाचित असे असावे.

प्रमोद

जाती-पोटजाती

--कारण ज्या विचारांचा निषेध करायचा आहे त्याने हिंद्वेतरांना काही त्रास होत नाही.
असहमत!

हिंदूंच्या जाती-पोटजाती इतक्या वैतागवाण्या आहेत की, धर्मांतर केले की, त्यांना ख्रिश्चन म्हणून सामावुन कसे घ्यायचे हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी निषेध करण्याचे ठरवले असावे.

जाळ बाबा जाळ

काय जाळायचे ते जाळा. . (मागच्या आठवड्यात फार थंडी होती तेंव्हाच का नाही सुचलं, शेकोटीला आलो असतो)

भगवद्गीता जाळल्याने आम्ही तुमच्या सारखी डोक्यात राख घालून घेउ असे वाटतं असेल तर विचार सोडून द्या . . काही काम नसले तरी असल्या फडतुस गोष्टीत लक्ष द्यायला वेळ नाही आम्हाला. .

राम राम _/\_

गीता किंवा महाभारतात.....

गीता किंवा महाभारतात कोठेही ख्रिश्चनांविरुद्ध काही लिहिल्याचे दिसले नाही किंवा त्या काळात ख्रिस्ती धर्म अस्तित्वात होता की नाही ह्याचा काही पुरावा उपलब्ध आहे का हे ही पहावे लागेल. जरी त्या काळात हिंदू व ख्रिस्ती धर्म अस्तित्वात असले तरी ते एकमेकांना माहित होते की नाही याबाबत शंकाच वाटते.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

जाळा

जाळुनी किंवा पुरुनी टाका. केशवसुतांनी सर्व धर्मीयांना केलेले आवाहन्.

 
^ वर