हस्तलिखित साखळीपत्रांतील लिपी आणि आकड्यांची कूट-नोंद
प्रस्तावना : साखळीपत्र हा वाचकांसाठी काही नवा विषय राहिलेला नाही. गेल्या काही दशकांत ह्या विषयाच्या अभ्यासाची व्याप्ती ही फार वाढलेली दिसून येते. विविध विषयांच्या अभ्यासकांसाठी साखळीपत्रांमधील रोचकता ही केवळ भावुकता किंवा सनसनाटीपुरतीच मर्यादित राहिलेली नसून त्याही पलीकडील अनेक विषयांच्यावर आज चर्चा होतांना दिसते. ह्यात मुख्यत: साखळीपत्रांतील लिपी, भाषा, उपयोजिलेले काव्यप्रकार अशा; थोडक्यात, भावुकता किंवा सनसनाटीहून भिन्न अशा विषयांवर मोठ्या प्रमाणात अभ्यास होतांना दिसून येतो. उपक्रमाच्या दिवाळी २००९ आणि दिवाळी २०१० या अंकांमध्ये काही विद्वानांची विश्लेषणाची आणि माहितीप्रदानाची पद्धत अभ्यासता, ह्याच अनुषंगाने उपक्रमावर साखळीपत्रांबाबत हा लेख मी पाठवून देत आहे.
साखळीपत्रांबद्दल असा एक दावा असतो, की त्यातील नावे, पत्ते, आकडे, हे सर्व तपशील तंतोतंत बरोबर असतात. या चमत्कृतीपूर्ण दाव्यांमुळे अनेक वादविवाद झालेले आहेत. काही लोक भावुक किंवा थरारक हेलकाव्यांसाठी अशी साखळीपत्रे वाचतात, तर काही लोक हे असे तपशील धादांत खोटे आहेत, असे सिद्ध करण्याच्या हेतूनेच साखळी पत्रांची छाननी करतात.
पोस्टातले साखळीपत्र मिळताच बावचाळलेली मंडळी मी खुद्द आपल्या डोळ्यांनी बघितलेली आहेत. तसे पोस्टखात्याचे अगम्य शिक्के असलेले (किंवा ईमेलमधल्या सर्व्हरांच्या आकड्यांची अगम्य माळ असलेले) इंग्रजी भाषेतले निनावी पत्र काहीसे गूढ वाटण्याची शक्यताही आहेच. या सार्यामागची मूळ तत्त्वे शोधलीत, तर त्यातील कारणभाव उमगेल, आणि त्यात गूढ असे काहीही नाही असे लक्षात येईल. एका साखळीपत्राबाबत एक मनुष्य फौजदारी तपास करू लागला, त्याची कथा नंतर कधी सांगता येईल.
काही चिकित्सकांच्या अशा अशास्त्रीय दृष्टिकोनामुळे तारतम्याचा अभाव असलेली चिकित्सा झाली असल्याचे ध्यानात येते. खर्याखोट्याचे निराकरण करण्याकरिता तारतम्याने वास्तवचिकित्सा करणे अभिप्रेत आहे. म्हणून साखळीपत्रांपैकीसुद्धा हस्तलिखित पत्रे मिळवून लिपीशास्त्र, भाषाशास्त्र आणि एकूणच चिह्नशास्त्र हे तीन विषय साखळीपत्रांच्या अभ्यासास अपार साहाय्य करू शकतात.
अभ्यासासाठी हस्तलिखित साखळीपत्र : पुढील हस्तलिखित साखळीपत्राच्या साक्षात उदाहरणाने हा लेख लिहिलेला आहे.
यामधील इंग्रजी भाषा ही गत २०व्या शतकातल्या ऐतिहासिक इंग्रजी भाषेशी जवळीक साधणारी आहे. तरी इंग्रजीभाषाभ्यासक म्हणून मला स्वतःलाही या भाषेची फोड करणे कठिण नाही असे लक्षात आले. माझ्या स्वतंत्र दृष्टिकोनातून या हस्तलिखित साखळीपत्राबाबत जे काय दृष्टोत्पत्तीस येते, ते मी येथे मांङत आहे.
लिपीशास्त्रचिकित्सा :
या साखळीपत्रात कोणत्या लिपीत लेखन केलेले आहे? ब्राह्मी लिपीजन्य वेगवेगळे प्रकार बघता (देवनागरी, तमिऴ, ग्रंथ, थाई) यांच्यापैकी कुठल्याच लिपीत हे नाही, हे कोणीही सहज सांगू शकेल. लिपीशोधाची भौगोलिक मर्यादा वाढवता, यातील मोकळी चिह्ने बघून ग्रीक किंवा रोमन लिप्यांची आठवण येऊ शकते. सुरुवातीचे "छोटे डेल्टा" अक्षर बघून आपण ग्रीकमध्ये मजकूर वाचू लागल्यास फार अर्थ लागत नाही. मात्र कॅपिटल अक्षरे नसली तरीही लिपी रोमनशी साधर्म्य साधते, हे थोड्या अभ्यासानंतर आपल्या लक्षात येते. अधिक हस्तलिखिते तपासता असे दिसते, की अन्सियल (किंवा उन्सियल uncial) लिपी आहे. असे समजते की ग्रीक आणि रोमन दोन्ही लिप्यांचे उन्सियल प्रकार आहेत. हे ग्रीक उन्सियलचे विविध प्रकार :
उन्सियल लिपी
रोमन आणि ग्रीक उन्सियलमध्ये फरक :
उन्सियल लिपी ही मुळात ग्रीक ग्रंथ लिहायला वापरली जात असे. मात्र असाही एक विचार आहे, की ही लिपी जुन्या रोमन मोडी (जोडलेल्या अक्षरांच्या) लिपीवरून विकसित झाली. अन्य प्रकारच्या सुलेखन शैलींमध्ये प्रत्येक अक्षर लिहिताना लेखणी अनेक वेळा उचलावी लागे. उन्सियल लिपीत मात्र प्रत्येक अक्षर लेखणीच्या एक-दोन फराट्यातच लिहिले जाते. यामुळे लेखनाचा वेग वढत असला, तरी अक्षरांचे आकार काहीसे बदलतात. पूर्वीच्या उन्सियल लिपीमध्ये दोन शब्दांमध्ये मोकळी जागा सोडत नसत. इसवी सनाच्या सहाव्या सातव्या शतकानंतर शब्दांमध्ये जागा सोडल्या जाऊ लागल्या. आपल्या उदाहरणाच्या साखळीपत्रात शब्दांमध्ये जागा सोडलेल्या दिसतात, त्यावरून असे दिसते, की हे पत्र इ.स. ६०० काळाच्या नंतरच लिहिले गेले आहे.
साखळीपत्राचे भूगोलशास्त्रविषयक विश्लेषण :
वरील लिपीचे तक्ते बघून पत्राच्या मसुद्यात "houston" असा एक शब्द दिसतो. अन्य बहुतेक शब्द जसे वीरकरांच्या इंग्रजी-मराठी शब्दकोशात सापडतात, तसा हा शब्द मात्र सापडत नाही. हे एखाद्या वाचकाला गूढ वाटू शकते. तरी भूगोलाच्या संदर्भग्रंथांची छाननी केल्यास असे दिसते, की या शब्दाचे नानोच्चार आणि नानार्थ आहेत. न्यूयॉर्क शहरामध्ये ही लिपिचिह्नावली "हाउस्टन" अशी उच्चारतात, आणि "हाऊस्टन स्ट्रीट" नावाचा एक मोठा हमरस्ता त्या शहरात आहे. टेक्सास नावाच्या राज्यात मात्र या लिपिचिह्नावलीचा उच्चार "ह्यूस्टन" असा होतो. वाचक सुजाण आणि अभ्यासू असला, तर आजूबाजूच्या शब्दांवरून या नानार्थांपैकी कुठला निवडावा, ते कळू शकते. "सेकंड (याबद्दल पुढे) बॅप्टिस्ट चर्च ऑफ" असे असल्यामुळे "ह्यूस्टन" हाच पर्याय निवडला जातो. "सेकंड बॅप्टिस्ट चर्च ऑफ ह्यूस्टन" ही जागा खरोखरातच आहे, हे जिज्ञासूंना कळून आचंबा वाटेल :
सेकंड बॅप्टिस्ट चर्चचा दुवा
परंतु येथे सांगितलेल्या तटस्थचिकित्सेच्या भूमिकेमधून बघता काहीच गूढ वाटणार नाही. मात्र अधिक अभ्यासाने कळते की यातही पाच प्रकार आहेत - वुडवे, वेस्ट, नॉर्थ, साउथ, सिप्रस. म्हणजे भौगोलिकाभ्यासाची सूक्ष्मता किती अधिक असल्याशिवाय चिकित्सा योग्य तर्हेने होत नाही, हे कळते.
साखळीपत्रातील आकड्यांचे कूटलेखन :
वरच्या परिच्छेदात "दुसरा (सेकंड)" असा उल्लेख आला आहे, मात्र "२" किंवा "2" असे चिह्न हस्तलिखितात कुठेही दिसत नाही. मात्र "||" अशी चिह्ने दिसतात. अभ्यासू चिकित्सकांना जाणवेल, की आकडे शब्दांमध्ये बेमालूम मिसळणारी ही रोमन कूटलिपी आहे. ही कूटलिपी अतिशय सुंदर होती, पण अरबांनी हिंदू आकडे इंग्रजांना शिकवले, तेव्हापासून आकड्यांचे हे कूटलेखन लुप्तप्राय झालेले आहे. क्वचित एखाद्या घटिकायांत्रिकाभ्यासकाला हे कूटलेखन माहीत असते. याबद्दल सांगोपांग अभ्यास करायला वेळ लागेल, पण त्यातील प्रमुख तत्त्वे येथे वाचता येतील :
रोमन संख्यांच्या कूटलिपीची तत्त्वे
या हस्तलिखितात केवळ उन्सियल अक्षरे दिसत असली तरी त्यांच्यापैकी "free number" या चिह्नावलीपुढे लिहिलेले कूटाकडे आहेत, हे चाणाक्ष वाचकाला सहज कळेल. मराठी संकेतस्थळावरील वाचकांस सुलभ जावे, म्हणून त्यातील काही आकडे मराठी कंसांमध्ये मी देत आहे :
I = (१) = १
DCCC = (५००)+(१००)+(१००)+(१००) = ८००
CCL = (१००)+(१००)+(५०) = २५०
पुढील आकडा हा येथील वाचकांनी सरावासाठी कूटप्रश्न म्हणून सोडवावा. उपरोक्त आकड्यांच्या विवेचनामध्ये आणि दुव्यामध्ये दिलेल्या माहितीवरून वाचक स्वत: प्रयत्न करून पुढील आकड्याची पडताळणी करू शकतील, आणि तशी त्यांनी स्वत: आकड्याची पडताळणी करून पहावी ही अपेक्षा आहे.
पारंपरिक तर्हेने कॅन्सरची माहिती देताना कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे, हे आवर्जून लिहिले जाते. आजवर मी बघितलेल्या हस्तलिखित साखळीपत्रांमध्ये एकदाही कॅन्सर झालेल्या अवयवाबद्दल उल्लेख झालेला नाही. हा साखळीपत्रांत गाव-पत्ता आणि आकड्यांबद्दल अन्य माहिती अतिशय अचूकपणे नोंदवली जाते. हे कसेकाय शक्य होते ह्या विषयावर कर्करोगशास्त्राभ्यासकांनी विचार करावा, चिकित्सकांनी चिकित्सा करावी.
उपसंहार :
एकुणात काय, तर पूर्वी म्हटल्याप्रमाणे ह्या विषयातील चमत्कृती आणि दाव्यांस बाजूस ठेवून तीमागील मीमांसा सर्वांगाने अभ्यासिली जाण्यास हवी; जेणेकरून वास्तवाचा अभ्यास होवून सत्यता काय आहे हे आपोआप स्पष्ट होईल. ह्याने अनेक अनुत्तरीत गूढ अशा प्रश्नांची उकलही होईल आणि दाव्यांबाबतच्या सत्यासत्यतेविषयी ठाम निष्कर्षासही येतां येईल.
- - -
संदर्भ :
(चिकित्साविषयक मार्गाचे दिग्दर्शन करण्यासाठी - यांचे तर्क शब्दशः वापरल्यामुळे त्यांचे शतशः धन्यवाद) नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास. लेखक : हैयो! हैयैयो! http://diwali.upakram.org/node/111
(उन्सियल लिपी) http://en.wikipedia.org/wiki/Uncial_script
(रोमन आकड्यांची कूटपद्धती) http://www.novaroma.org/via_romana/numbers.html
हस्तलिखित साखळी पत्र : लेखक "धनंजय" यास स्वप्रयत्नोपलब्ध
Comments
_/\_
pwnd
क्ष्
अप्रतिम
हस्तलिखीतावरील कष्टपुर्वक लिहिण्य़ाची कला, त्याला लागणारी एकतानता, अर्थपुर्ण रचना केवळ अप्रतीम!!!
या संस्थळावरील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्यांनी या विषयावर काम करायला पुढे यावे.
माझ्या पूर्वजांना आलेली साखळीपत्रे याची नोंद कोठे मिळू शकेल का?
विनंती
सहज यांना विनंती की हस्तलिखित साखळीपत्र तज्ञांच्या प्राग येथील जागतिक सभेचा वृत्तात येथे प्रसिद्ध करावा.
साखळीपत्र केंद्र
तुमच्या जवळच्या साखळीपत्र केंद्रावर वृत्तांत उपलब्ध आहे. कृपया तिथे जाउन जरुर अनुभव घ्या.
तरी मी माझ्या पहील्या परदेशभेटीचे प्रवासवर्णन जरुर लिहीन.
:-))
:-))
ROTFL
लेख आवडला
अतिशय छान, सोप्या भाषेत उकल करून सांगितलेला अभ्यासपूर्ण लेख. ह्या विषयावर अजून मीमांसा वाचायला आवडेल. पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा!
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
तुमची ही मागणी
>ह्या विषयावर अजून मीमांसा वाचायला आवडेल.
तुम्ही सकारात्मकपणे पहायला तयार आहात असे वाटून लिहितो.
सारासार बुद्धीच्या पलिकडे साखळीपत्रग्रंथांचे सत्य आहे असे पटले तर आपण मान्य करायला तयार आहात म्हणून मी उत्तर देण्याच्या भरीला पडलो. उरला प्रश्न तर्कशुद्धतेचा - साखळीपत्रातील लेखन हे खरोखरच त्या त्या व्यक्तीला लागू पडते कि नाही ही तर्कशुद्धतेची कसोटी आहे असे मानावे लागेल. ती जर कोणी करायला तयार नसेल तर मी काय करणार तुम्ही करायला तयार आहात. मी तशा कसोट्या करून बसलोय. पण मी त्याबाबत बोलू इच्छित नाही कारण ज्याने त्याने आपले साखळीपत्र पाहिल्याशिवाय त्याचा विश्वास बसणे शक्य नाही असा माझा अनुभव आहे. असे म्हणणारे अनेक आहेत की सहज तुमचे अनुभव असतील लाख पण मला साखळीपत्राचा जोवर अनुभव येत नाही तोवर मी ते थोतांड मानणार. म्हणून मी ज्याचा त्याने अनुभव घ्यावा असे वारंवार म्हणतो. गणिताने वा तर्काने इतकी साखळीपत्रे लिहिणे, त्यांना साठवण करायला लागणारी जागा उपलब्ध असणे शक्य नाही आदि तर्क म्हणून बरोबर आहेत पण साखळीपत्रग्रंथांच्या सत्यते पुढे ते फिके पडतात.असा अनुभव आहे. तो आपण घेणार काय असा प्रश्न आहे.
+१
सहमत अहे.
रेबेका नावाच्या पंधरा वर्षीय मुलीस थरथर जाणवेल असा दावा केला आहे. ती थरथर जाणवली अशी दुसर्या बाप्तिस्ट चर्चात जाऊन रेबेका कडून खात्री करून न घेताच, अशी थरथर जाणवणारच नाही असे परस्पर ठरवणे ही स्यूडो-चिकित्सा झाली.
एक शंका: त्या हस्तलिखितात एक आकडा सांगून त्याला बोलवा असे म्हटले आहे. त्याचा नीटसा खुलासा झाला नाही. तो कुठल्या देवाचा क्रमांक होता का? या क्रमांकाचा देव तो विशिष्ट रोग बरा करण्याची युक्ती जाणतो असे आहे का?
नितिन थत्ते
ह्यात
ROTFL?
मला लोळून हसण्यासारखे काहीच दिसले नाही. :(
लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे याबद्दल शंकाच नाही.
+१
सहमत आहे. लोळून हसण्याआधी प्रत्यक्ष अनुभवाने साखळीपत्रांची विविध अंगांनी परीक्षा फावल्या वेळात करायला नको काय? हे काम आपण टाळल्याने, आपणांस हसण्यावरी नेण्यात फक्त रिता वेळ घालवायचा आहे, असा समज होतो.
धनंजयांच्या व्यासंगाला साष्टांग दंडवत!
पु.लं.
लेख वाचून पु.लं. च्या लेखांची आठवण झाली
एकदम मस्त +1
चन्द्रशेखर
धोरण
या संदर्भात उपक्रमाचे धोरण स्पष्ट होणे महत्वाचे आहे असे वाटते. मात्र पूर्वैतिहासावरून असे होईल याची शक्यता कमी वाटते. धोरणात जर हे विषय बसत नसतील तर यावर लेख येणार नाहीत. अर्थात टीआरपी वाढवण्यासाठी धोरण अस्पष्ट ठेवणे फायद्याचे असेल तर गोष्ट वेगळी.
--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/
मस्त :)
माहितीपूर्ण लेखन आहे.
-दिलीप बिरुटे
विनोद
हा विनोद असेल तर मला अजिबात कळला नाही.
आवडला
लेख आवडला. ;-) तसे काहीजण "गल्ली चुकली" असे म्हणू शकतील असे वाटते.
बाकी, धनंजय यांच्या व्यासंगाला __/\__ परंतु ही मला साखळीपत्रांची भलावण आणि जाहीरात वाटली.
विडंबने करताना मूळ कृतीचा संदर्भ द्यावा/ दिला जातो असे वाटते. हे केल्याने विडंबन असल्याचे स्पष्ट कळते आणि नवख्या वाचकांचा गैरसमज होत नाही. हा संकेत उपक्रमावर मोडलेला का आढळतो आहे याचे कारण कळत नाही. अशाप्रकारची स्पष्टता बाळगण्याबाबत केसुगुर्जींचा हात कुणी धरू शकत नाही असेही वाटते.
संदर्भसूचीत संदर्भ दिलेला आहे :-(
संदर्भसूचीत संदर्भ दिलेला आहे :-(
पण विडंबनापेक्षा हा लेख गंभीर आहे. केसुगुर्जींसारखा "()" घालण्यासारखे हे विडंबन नाही. मूळ लेखातल्या युक्तिवादाची चौकट मुळीच बदललेली नाही.
"२+२=५" हे "१+१ = ३"चे विडंबन नव्हे. मात्र "२+२≠५" हे समाजातील वावरामुळे अधिक ओळखीचे असेल, तर त्याची आठवण आल्यामुळे, त्याचा प्रत्यय आल्यामुळे "१+१=३" मधील तर्कविसंगती पटकन लक्षात येते. हे करताना दोन्ही तर्कांच्या पायर्या अगदी-अगदी समांतर असल्याच पाहिजे.
- - -
लेखाचा गंभीर अर्थ असा : "संदेशाचे अर्थग्रहण आणि विश्लेषण" आणि "संदेशवाहन यंत्रणेचा अभ्यास" यांच्यात फरक केला जाऊ शकतो. या बाबतीत चर्चा उपक्रम दिवाळी अंकामधील लेखाखाली निष्फळ होत होती. (उपक्रम दिवाळी २००९ मधील अनुभव आहे.) चर्चा त्या लेखाखाली केली असती, तर पूर्वदूषितग्रहाचाच आरोप माझ्याबाबतीतही पुन्हा उपस्थित झाला असता.
रेबेका टावबर हिच्या कॅन्सरबद्दल, प्रार्थनेच्या निकडीबद्दल, आणि मोफत पेजर-क्रमांकांबद्दल मराठी संकेतस्थळांवर आजवर कुठलाच पूर्वग्रह प्रसिद्ध झालेला नाही. या उदाहरणाचे विश्लेषण केले तर कमीतकमी पूर्वदूषितग्रहाच्या मुद्यावर आपण अडखळणार नाही.
पूर्वग्रह नसलेल्या वाचकांनाही अनुभवावरून सहज कळून येते, की रेबेका टावबर हिच्या आजाराबद्दल माहितीची छाननी करताना लिपीशास्त्रातील काही सत्ये आधी वाटतात तितकी उपयोगी पडत नाहीत. उन्सियल सुलेखनाबाबत लिपीशास्त्रातील सत्यांचा पाठपुरावा करणे योग्यच आहे, असे मत असले तरी. (या बाबतीत वरील लेखात कुठल्याही प्रकारे विडंबन नाही.). लिपीच्या अभ्यासातून मिळणारी फलिते वेगळी. रेबेका टावबर हिच्याबद्दल जी बातमी हस्तलिखितात आहे, तिच्या खरेखोटेपणाबद्दल मात्र लिपीशास्त्रातले कुठलेच फलित नाही. त्यासाठी वेगळे विश्लेषण करावे लागेल. "वेगवेगळ्या विश्लेषणांची फलिते वेगळी असतात, आणि कुठले विश्लेषण करायचे ते निवडणे इतके काही कठिण नाही" या बाबतीतही लेख विडंबनात्मक नाही.
"हस्तलिखित इ.स. ६०० नंतर लिहिले गेले" हे साक्षात सत्य आहे. पण रेबेका टावबरबाबत खरे-खोटे कळण्याबाबत हे सत्य फारसे उपयोगी पडत नाही. हे जरी विडंबनाच्या दिशेने जात असले, तरी मुद्दा गंभीरच आहे. जर अन्य कुठलेच विश्लेषण उपलब्ध नसते, तर हे तुटपुंजे विश्लेषण स्वीकारलेच असते. चिकित्सेबद्दल गंभीर मुद्दा असा, की "अधिक फलदायी विश्लेषण उपलब्ध असताना तुटपुंज्या विश्लेषणात आडकणे ही कार्यक्षम पद्धत नव्हे".
(मागे सेंट्रिफ्यूगल फोर्स कल्पनेचे विश्लेषण करताना मी असेच एक तर्कविसंगत कथानक प्रस्तुत केले होते. त्यात नाट्यमयता-लालित्य वगैरे थोडेसे होते. म्हटल्यास कॉलेजकुमारांच्या बोलण्याच्या पद्धतीचे विडंबनही होते. मात्र तर्कविसंगतीचे निदर्शन पुरते गंभीरच होते. तसेच येथे.)
विडंबन कुठे - तर मराठीत सहज वाटणार नाही असे समास आणि संधी केलेले आहेत. तितपत शुद्ध विडंबन.
अरेरे!
अरेरे! माझा निष्काळजीपणा. चूक झाली. सॉरी! :-(
केसुगुर्जींचे नाव फक्त स्पष्टतेसाठी घेतले. तुमची संदर्भसूची पाहिली असता, तिच स्पष्टता दिसली. गैरसमज नसावा.
लेख आवडला
लेखाचा गंभीर अर्थ असा : "संदेशाचे अर्थग्रहण आणि विश्लेषण" आणि "संदेशवाहन यंत्रणेचा अभ्यास" यांच्यात फरक केला जाऊ शकतो. या बाबतीत चर्चा उपक्रम दिवाळी अंकामधील लेखाखाली निष्फळ होत होती. (उपक्रम दिवाळी २००९ मधील अनुभव आहे.) चर्चा त्या लेखाखाली केली असती, तर पूर्वदूषितग्रहाचाच आरोप माझ्याबाबतीतही पुन्हा उपस्थित झाला असता.
एकदम पटले.
लेखातील सहजता आणि हळूहळू लक्षात येणारे मुद्दे दोन्ही फारच छान.
प्रमोद
मस्त विडंबन
तालेवार माध्यमात बरळता येतं, तर अतिशय त्रोटक, मर्यादित माध्यमात उच्च कलाकृती निर्माण करता येते. माध्यम हाच संदेश वगैरे गोष्टी फारच थोड्या वेळा लागू पडतात. बहुतांश वेळा या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नसतो. ही गोष्ट अतिशय समर्पकपणे वरील विडंबनपर लेखात मांडली आहे. तुम्ही जरी 'बऱ्याच बाबतीत हे विडंबन नाही' असं म्हणण्याचा प्रयत्न केलेला असला तरी निव्वळ संकल्पनांतरातून जर मूळ विचाराचा फोलपणा लक्षात येत असेल तर मी त्याला विडंबनच म्हणेन.
व्यासंगाबद्दल इतरांनी केलेल्या प्रणामात माझाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
दोन अर्थ
"चांगल्या दर्जाच्या मूळ लेखनाशी साधर्म्य साधून पण विपर्यास करून खिल्ली उडविणे" आणि "मूळच्याच निरर्थक लेखनाची विसंगती ठळक करणे (रिडक्शिओ ऍड ऍबसर्डम)" या दोन्ही प्रकारांना विडंबन म्हणतात असे मला वाटते. "हे विडंबनच नाही" असे म्हटले तर दुसरा अर्थ नाकारावा लागेल.
मूळ आक्षेप
सहमत आहे.
नाडीपट्टीतील लिपी तामीळ आहे की नाही हा नाडिग्रंथांवरील दुय्यम आक्षेप आहे. खूप संशोधन करून ती तामीळ/ब्राह्मी/खरोष्टी/हिब्रू आहे असे दिसून आले तरी त्याचा मूळ आक्षेपांना उत्तर म्हणून फारसा उपयोग नाही. हेच धनंजय यांना दाखवायचे आहे.
नितिन थत्ते
दोन शब्द तरी हवेत असे वाटते
दोन शब्द तरी हवेत असे वाटते.
दोन प्रकारांचे हेतू आणि फलिते वेगवेगळी असल्यामुळे ध्वनिसाधर्म्यामुळे गोंधळ होऊ नये.
च्यामारी!
आता तो लेख वाचावा लागणार! :-)
-Nile
अनेक दिवसांनी उपक्रमवर चक्कर टाकता
[ लेख प्रतिसादांत हलविण्यात आला आहे.--संपादक ] मित्र हो,
आज अनेक दिवसांनी उपक्रमवर चक्कर टाकता पुर्वीचे लेखन वाचले. त्यात हैयोंहैयैयोनी प्रकाशकाका घाटपांड्यांना उद्देशून केलेले खालील आवाहन पुन्हा जागृत करून त्यावर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. या धाग्याला उपसून काढायला आणखी एक कारण असे की उपक्रमवर दिवाळी२०१० अंकात नाडीग्रंथ अभ्यासकार्यावर जन्मदिनांक व नवग्रहांची नाडीताडपट्यातील मांडणीवरील हैयोंचा लेख प्रकाशित झाल्यावर प्रकाशकाकाच्या नाडीवरील प्रकाशित पुस्तकातील माहिती लेखांशिवाय त्यांनी नाडीताडपट्यांची त्यांच्या तमिळजाणकारांकडून कसून तपासणीकरून हैयोंचे म्हणणे साधार खोडून काढायला व त्यावर अधिक अभ्यासपुर्ण लेखन करण्यास ते विचारमग्न होत असावेत असा कयास बांधून वाट पाहिली गेली. अद्याप नाडीग्रंथांवरील त्यांचे आणि अन्य विचारवंतांचे वेळ, गरज, पैसे व पुस्तक न मिळणे आदि कारणांनी मौन संपले नाही असे वाटून या धाग्याने त्यांना प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा आहे.
श्री. घाटपांडे सरांनी तथा इतर उपक्रमकरांनी माझ्या सूचनेबाबत आपले विचार व्यक्त करावेत. शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.
हैयो या ध्याग्यावरील प्रतिक्रियेत म्हणतात,
उपक्रमावरील आपल्या पुस्तकांत उल्लेखल्याप्रमाणे श्री. घाटपांडे सर स्वत: नाडिकेंद्रांस भेटी देऊन आलेले आहेत. श्री. घाटपांडे सर स्वत: नाडिज्योतिष-नाडिग्रंथम ह्या विषयाची सत्यासत्यता जाणून आहेत असे त्यांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण मतांवरून वाटते. आणि एक फलज्योतिषचिकित्सक तथा अभ्यासक ह्या नात्याने नाडिज्योतिष हा विषय आपल्याला वर्ज्य नाही असे प्रतिपादनही त्यांनी मागे एकदा मजजवळ केले होते. त्यांनी नाडिकेंद्रांशी पत्रव्यवहारदेखील केला असल्याचे वाचल्याचे स्मरते. ते स्वत: एक फलज्योतिषाभ्यासक आहेतच, तथा एक चिकित्सक ह्या नात्याने त्यांचा ह्या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे असे जाणून आहे. त्यांच्या विचारांना प्रमाणवाक्यता प्राप्त आहे हे मी पाहातोच आहे.
तरी श्री. घाटपांडे सरांनी स्वत: अथवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कोणी प्रातिनिधिक पुढाकार घ्यावा; श्री. ओक सर आणि त्यांच्याप्रमाणे मते बाळगणारी इतर मंडळी ह्यांस नाडिकेंद्रात घेऊन जावे आणि नाडिज्योतिषाचे खरे स्वरूप उघड करून ह्या मंडळींची सर्वांची दिशाभूल झाली असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिद्ध करावे. पूर्वीप्रमाणेच अहवाल सादर करावा. इतरही कोणा व्यक्ति अथवा संस्थेस नाडिज्योतिषाच्या सत्यासत्यतेबद्दल शंकाकुशंका असतील तर त्यांनी ते श्री. घाटपांडे सरांचेकडे सादर करावेत. असे केल्याने ह्या कार्यास एक सामुहिक प्रतिनिधित्व प्राप्त होईल.
सदरील शोधाभ्यासात नाडिज्योतिषाप्रमाणे जातकास सांगण्यात आलेले भविष्य हे खरोखरच कथनाप्रमाणे सत्य ठरते काय? ह्या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा:
१. नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय;
२. लेखन केले असल्यास
अ. ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते,
ब. त्या भाषेस काही व्याकरण आहे काय,
क. व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा;
३. लेखनामध्ये खरोखरच भविष्यकथन केलेले असते काय,
४. त्यायोगे जर कां नाडिपट्टीमध्ये संबंधित जातकाचे नांव, त्याच्या जन्मदात्यांचे नांव, त्याचे जातकम (कुंडली/पत्रिका) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या गोष्टीचा शोध घेण्यात यावा.
असे विषय ह्या शोधाभ्यासानिमित्ते चर्चिल्या जावेत. हे मुद्दे सिद्ध झालेच तर तेथून पुढे ’भविष्यकथन बरोबर येते की नाही’ हा विषय चर्चिल्या जाऊ शकतो.
श्री. घाटपांडे सरांनी तथा इतर उपक्रमकरांनी माझ्या सूचनेबाबत आपले विचार व्यक्त करावेत. शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.
प्रश्न
स्वागत आहे.
हैयो यांनी दिवाळी अंकात दिलेल्या संशोधनपर लेखाचे विडंबन धनंजय यांनी केले होते ते आपण पाहिले असेलच.
नसल्यास वाचावे. म्हणजे वर दिलेल्या प्रश्नांपैकी १ व २ ची उत्तरे मिळून जातील.
त्या विडंबनातून पुढे आलेली गोष्ट म्हणजे १ व २ हे प्रश्न नाडीग्रंथ आणि त्यातील भविष्यकथन यांचा खरेखोटेपणा पडताळण्याच्या दृष्टीने ट्रिव्हिअल आहेत.
प्रश्न ३ आणि ४ यावर चर्चा करणे शक्य नाही कारण त्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना "स्वतः अनुभव घ्या" असे पालुपदात्मक उत्तर आपण देता.
नितिन थत्ते
कृतिशून्य, शब्दांपुरते..
-
श्री. धनंजयांचे उपरोक्त विडंबन वाचनात आले होते. त्यातील वक्रभणन, निराकृती आणि एकूण विरोध लक्षात येवून लोळून लोळून हासलो होतो. असो. आता विषय निघालाच आहे, तर येथे त्याविषयी काही मुद्दे मांडतो.
वितर्कशास्त्रामध्ये वितर्क कसा असावा ह्याचे काही आडाखे आहेत, हे आपण जाणून असा. एकाद्या विषयावर वितर्क करतांना काहीजणांजवळील मुद्दे सारे संपतात, आणि तरीही वितर्काची विलक्षण खुमखुमी बिचारी जिरत नाही. असे लोक मूळ वितर्कास विचलित करण्याच्या प्रयत्नांत भिन्न असा वितर्क करतात. ह्या (स्वत:च्याच) भिन्न वितर्कावर (स्वत:चाच) विश्वास नसल्याने अशा लोकांचा वितर्क विनोदाच्या अथवा विडंबनाच्या आड सामोरा येतो. श्री. धनंजयांच्या विडंबनाचे थोडेअधिक असेच होते आहे.
आपणांस काय म्हणावयाचे आहे ते सरलतेने न मांडतां वक्रभणित कथा करणे ह्यास आंग्लभाषेमध्ये beating around the bush असे म्हणतांत. नाडिग्रंथांच्या संदर्भात "प्रात्यक्षिक आपल्यासाठी नव्हेच" असे विधान करणार्या श्री. धनंजयांनी (प्रात्यक्षिकाच्या अभावामुळे) स्वत:च्याच वितर्कावर अविश्वास निर्माण होवून विडंबनाच्या आडून तो मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्या प्रयत्नास beating around the bush असेच म्हणावे लागते. नाडिग्रंथांच्या चर्चेच्या संदर्भाशिवाय पाहतां श्री. धनंजय ह्यांचा हा प्रयत्न स्तुत्य; परंतु संदर्भासह पाहतां, पूर्वोपस्थित तथ्ये आणि वक्रभणित वितर्क ह्यांमध्ये मेळ असणे आवश्यक असल्याचे विस्मरण त्यांस झाले असावे असे दिसते. बहुधा म्हणूनच आपला लेख कुठे कुठे विडंबनात्मक नाही (आणि पर्य्यायाने कुठे कुठे तो विडंबनात्मक आहे) हे श्री. धनंजय नंतर नमूद करताहेत. असो. सदरील विडंबन कृतिशून्य असल्याने केवळ शब्दांपुरते उरले आहे - त्यापलिकडे त्यास अधिक वैशिष्ट्य नाही.
अधिक काय लिहिणे..! श्री. घाटपांडे आणि इतरांच्या आतापावेतोच्या नाडिग्रंथ चिकित्सेबद्दल मी जो गंभीर मुद्दा पूर्वीपासून मांडत आलेलो आहे, तोच आपल्या विडंबनपर लेखामध्ये श्री. धनंजयांनीही मांडला आहे. तो असा: अधिक विश्लेषण उपलब्ध असताना तुटपुंज्या विश्लेषणात अडकणे ही कार्यक्षम पद्धत नव्हे. ह्या माझ्या मुद्द्यास जोवर विरोध नाही, तोवर चालू द्या...!
-
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
परत एकदा
तुम्ही आणि ओक नाडी ग्रंथाविषयी जे दावे करीत असता त्यांना घेतल्या जाणार्या अनेक आक्षेपांपैकी नाडीपट्टीवरील लिपी कोणती हा एक आक्षेप आहे.
मूळ दावा "नाडीग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच कोणा ऋषींनी कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे" हा आहे.
नाडीपट्टीवरील लिपी कोणती हा ट्रिव्हिअल आरोप आहे. त्यामुळे तुम्ही ती क्ष लिपी असल्याचे सिद्ध केल्याचा दावा केला तरी त्यातून वरील मूळ दाव्याच्या पुष्ट्यर्थ काहीच निष्पन्न होत नाही.
धनंजय यांच्या विडंबनातून सांगितलेली ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तेव्हा इकडचे तिकडचे दावे न करता मूळ दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही करता आले (प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या सल्ल्याखेरीज) तर पहा.
नितिन थत्ते
ये रे माझ्या मागल्या..
ये रे माझ्या मागल्या..
श्री. थत्ते, आपण तीन विविध गटांच्या विधानांची निष्कारण मिसळ करताहांत. नाडिग्रंथप्रेमी, नाडिग्रंथविरोधक आणि तटस्थाभ्यासक ह्यांत कोणाचे काय दावे आहेत, दावे आहेत की नाहीत किंवा कसे, हे आधी आपण जाणून घ्यावे.
माझ्या माहितीमध्ये, "नाडीग्रंथात हजारो वर्षांपूर्वीच कोणा ऋषींनी कल्पांतापर्यंत (मानवजात अस्तित्वात असेपर्यंत) जन्माला येणार्या प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवलेले आहे" असा अभ्यासांती दावा ह्यापैकी कोठल्याही पक्षाकडून झालेला नाही. किंबहुना, मी आठवण करून देवू इच्छितो, "असे कसेकाय होते बुवा" ह्या स्वरूपांत मुळांत नाडिग्रंथविरोधकांनी स्वत:च स्वत:स पाडून घेतलेला हा एक अनुभवशून्य आणि त्यामुळेच कौतुकास्पद असा प्रश्न होय. हे मी ह्यापूर्वीही निदर्शनास आणून दिलेले आहे. अभ्यासामध्ये अशा दाव्यांचा विचार करण्याने मूळ अभ्यासास बाधा पोहोंचते. श्री. थत्ते, आपणही अशा विधानांवर (अभ्यासाशिवायच) विश्वास ठेवाल असे वाटले नव्हते, हो! असो.
आपणांस आठवत नसल्यास: श्री. घाटपांडे ह्यांनी त्यांच्या लेखात केलेल्या आरोपांची तपासणी करण्याकरिता मी त्यांस काही प्रश्न विचारले होते, त्यापैकी हे काही प्रश्न होत. श्री. घाटपांड्यांच्याकडून काहीही उत्तरे न मिळाल्याने पुढे मी स्वतः शोध घेवून माझे म्हणणे मांडले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. मी स्वतः "मी काही सिद्ध केले आहे" असे म्हटलेले नाही, तथापि, आपणांस तसे म्हणावयाचे असल्यास माझा प्रत्यवाय नाही.
निष्पन्न काय होते अथवा काय नाही, हे आपण एकहाती ठरवू नये. धन्यवाद.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
धन्यवाद
खुलाश्याबद्दल धन्यवाद.
जर "नाडीग्रंथात/नाडीपट्टीत सर्व माणसांचे भविष्य (कोण्या द्रष्ट्या ऋषींनी) शेकडो/हजारो वर्षांपूर्वीच नोंदवून ठेवलेले आहे"
असा नाडीप्रेमी/नाडीअभ्यासक/नाडीकेंद्रांचे संचालक यांचा दावाच नसेल तर.....
१. सदर व्यक्तींचा अथवा गटांचा नक्की दावा काय आहे?
२. आपण स्वतः (हैयो हैयय्यो आयडी)* आणि शशिकांत ओक (हा आय डी)* हे वारंवार "स्वतः अनुभव घ्या/स्वतः अनुभव घेतल्याशिवाय बोलू नका" असे भारंभार लेख/प्रतिसाद लिहून सांगता तेव्हा आपण नक्की "कशाचा अनुभव घ्यायला सांगत असता"** ते स्पष्ट करावे.
*आपण बर्याचदा वकीली पद्धतीने युक्तिवाद करता (असे मला वाटते/मला भास होतो/माझा समज झाला आहे) म्हणून कंसातील 'आयडी' हे शब्द घातले आहेत.
**हे स्पष्ट करताना
अ. काय अपेक्षेने तेथे जावे?
ब. तेथील संचालकांशी साधारण काय व्यवहार करणे अपेक्षित आहे?
क. तो व्यवहार केल्यावर अनुभव घेणार्याने कशाची अपेक्षा करावी. (उदा. संचालक अथवा तेथील व्यक्ती नाडीवरील मजकूर वाचून दाखवतील, भविष्य सांगतील वगैरे)
नितिन थत्ते
+१
काहीतरी 'घडते' असा दावा लादण्यात आलेला आहे आणि मुळात तोच खोटारडा आहे. बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतो की तसे काही घडतच नाही!
आम्हाला पडलेला अनुभवशून्य प्रश्न असा की काही लोक इतके फसविले जावेत इतके निर्बुद्ध कसे?
बरोबर.
बरोबर.
'असे कसेकाय होते बुवा' हा अज्ञानातून आलेला एक अफलातून कौतुकास्पद प्रश्न आहे. तसे काही घडत नसेलच तर खरा काय, खोटा काय, दावा तरी कसाकाय असणार? द्वेषा-प्रेमापोटी स्वतः तुम्ही किंवा श्री. घाटपांड्यांनी जरी हा दावा केलात, तरी मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे मी अशा दाव्यांचा विचारही करणार नाही - मीही त्यास खोटाच म्हणेन.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
चर्चाच संपली
ठीक आहे, मी तुमच्या दाव्याला असत्य म्हणतो. मी स्वत: म्हणतो की "असे काही घडतच नाही" आणि त्या विधानाला तुम्ही असत्य म्हणता. वाद संपला.
परंतु, नाडीविरोधी विधानांमुळे मला काहीही आर्थिक लाभ होत नाही. नाडीप्रसारातून तुम्हाला काही आर्थिक लाभ होतो की नाही ते अजूनही तुम्ही स्पष्ट केलेले नाही. सबब, जाहिरातबाजीचा तुमच्यावरील आरोप अद्याप अनुत्तरित आहे.
गल्लत.
गल्लत.
तो माझा दावा नाही. पूर्वी सांगितलेप्रमाणे तो मी विचारांतही घेतलेला नाही. त्यास तुम्ही सत्य म्हटले काय, न म्हटले काय - माझा काही संबंध नाही.
तुमचा-माझा 'वाद' असा कधी होता असे मला आठवत नाही. तुमचा वाद नाडिग्रंथप्रेमींशी आहे - तो संपला असे तुम्ही म्हटल्यास मला आनंदच आहे, संपला नाही असे म्हटलांत तरीदेखील आनंदच आहे.
हा बिनडोक प्रश्न/आरोप अनुत्तरीत राहणेच इष्ट; कारण ह्याचे काहीही उत्तर दिले तरी तुमच्या अभ्यासकार्याशी त्याचे काहीएक घेणेदेणे नाही. अशा परमभैताड प्रश्नांमुळे तुमच्या अभ्यासकार्यास बाधा येवू नये ह्या शुभेच्छा.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
आहे
"'असे कसेकाय होते बुवा' हा अज्ञानातून आलेला एक अफलातून कौतुकास्पद प्रश्न आहे." असे तुम्ही म्हटलेले आहे. हा प्रश्न तुम्हाला स्वतःला पडलेला आहे की नाही? त्या प्रश्नातच 'असे होते' हा दावा दडलेला आहे.
या विषयाची माहिती असूनही जे नाडी'शास्त्राचे' शत्रू नाहीत ते माझे शत्रू आहेत.
बिनडोक का म्हणता? म्हणायचेच असेल तर शशिओक यांना मी बिनडोक म्हटले तर पिरपीर का करता?
ज्यांना अभ्यास करावयाचा असेल त्यांना त्या उत्तराशी देणेघेणे असणे योग्य आहे. जर तुमचे उत्तर होकारार्थी असेल तर तुमचे दुकान चालावे म्हणून त्यांनी फुकट कष्ट करावेत अशी तुमची अपेक्षा त्यांना पटणे अवघड जाईल असे मला वाटते. म्हणूनच, तुम्ही नकारार्थी उत्तर देणे आवश्यक आहे.
मला नाडीथोतांडाचा अभ्यास करावयाचा आहे हा गोड साक्षात्कार तुम्हाला कधी झाला? तुमचे दुकान बंद पाडणे इतकाच माझा उद्देश आहे.
If you're not with me, then you're my enemy. - संदर्भ
नाही.
नाही.
< क्वोट् > उपक्रमावर वाद-विवाद-चर्चा अवश्य कराव्यात परंतु कृपया, एकमेकांना शेलक्या विशेषणांनी संबोधू नये. - संपादन मंडळ < / क्वोट् > ;-)
माझे दुकान असल्याचा साक्षात्कार तुम्ही कधी करून घेतलांत? ;-)
श्री. रिकामराव टेकडे, तुमचे आयडी सिद्ध करा म्हटलो नव्हतो मी! ;-) असो. तुमच्या भासांतील मुळात नसलेले दुकान तुमच्या कल्पनेनेच घरी बसूनच(!) बंद पाडा! इथून पुढे ते बंद पडेपर्यंत अप्रतार्किक बरळू नका! धन्यवाद. ;-)
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
पळू नका
तुम्ही माझ्या प्रश्नाला बिनडोक असे संबोधिले आहे, तो प्रश्न बिनडोक असल्याचे सिद्ध करा.
तुमचे/तुमच्या मित्रांचे दुकान असल्याच्या आरोपाचा तुम्ही इन्कार केला नाही. संशय आहे, खात्री नाही की आर्थिक लाभ होत असावा.
"आयडी सिद्ध करणे" म्हणजे काय?
"दुकान नाही" असे प्रतिपादन येथे केलेले नाहीत.
अप्रतार्किक म्हणजे काय?
मी बरळतो हे सिद्ध करा.
पुढं व्हा..
खीखीखी..बरं अनुत्तरीत तर अनुत्तरीत! तोवर तुमचे चालू द्या..
"नाड्या घ्या नाड्या...स्वस्त टिकाऊ भविष्य सांगणार्या हैयो नाड्या!"
आमचं उत्तरः "पुढं व्हा"
बिनडोक कसा काय?
हा प्रश्न बिनडोक कसा काय? नाडीचा प्रचार करण्यापुर्वी तुम्हाला त्यातुन आर्थिक लाभ होतो की नाही हे स्पष्ट केलेच पाहिजे. नाहीतर तो 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' होतो. बरोबर की नाही? तुम्हीच सांगा वकील साहेब.
नामसाधर्म्य - गोंधळ नको
बहुतेकांना माहिती असेलच. तरीही ज्यांना अजूनही माहिती झाले नसेल त्यांच्यासाठी हे निवेदन.
"विनायक " नावाने मी पूर्वी लिहित असे. पूर्वीचे श्री. बेसनलाडू हे सध्या "विनायक" नावाने लिहीत असल्याने मी आता "विनायक गोरे" नावाने लिहितो. गोंधळ होऊ नये म्हणून हा प्रतिसाद. बाकी चालू द्या.
प्रश्न
रिकामटेकडा यांच्याशी उपचर्चा चालू द्या पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. म्हणजे तुमच्या आणि ओक यांच्या लेखांचा विषय तरी काय असतो हे कळून येईल.
नितिन थत्ते
आपले आपण ठरवावे.
आपले आपण ठरवावे.
शोधा, म्हणजे सापडेल.
खरेतर ह्या सार्या प्रश्नांची उत्तरे आपली आपणच ठरवावीत. मी अथवा इतर कोणी आपणांस निर्देश द्यावेत आणि आपण ते पाळावेत, ह्यांस बुद्धीप्रामाण्यवाद म्हणतां येणार नाही असे मला वाटते.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
प्रश्न टाळू नका.
प्रश्न टाळू नका.
तुम्ही आणि ओक यांनी लिहिलेल्या लेखांवरून वाचकांचा तसा दावा असल्याचा समज झाला असेल तर "नुसते तसा दावा केलेला नाही" असे म्हणून पळता येणार नाही. त्या भारंभार लेखांचे स्पष्टीकरण द्यावेच लागेल. अन्यथा "केवळ आर्थिक कमाईसाठी वाचकांना नाडीकेंद्रावर बोलावणे" या हेतूनेच तुम्ही लेख लिहिता हा काही वाचकांनी उपस्थित केलेला आक्षेप खरा मानावा लागेल.
नितिन थत्ते
प्रश्न टाळणे.
प्रश्न टाळणे.
तुमचे प्रश्न हे एकट्या माझ्यासाठी नाहीत, त्यामुळे मी ते टाळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मी प्रथमतः तुम्हांस स्वतःची उत्तरे स्वतः शोधण्यास सुचवितो आहे.
स्पष्टीकरण लेखांतून मिळेलच. त्याहीपुढे, स्वप्रयत्नांतून मिळेल. लेखांत लिहिलेल्या विषयांच्या बाबत स्पष्टीकरण हवे असल्यास तसे कळवावे.
तुमच्यासारख्या प्रामाणिक वाचकांची चित्तभ्रांति व्हावी, बुद्धीभ्रम व्हावा, मूळ विषयाबाबत मूढता निर्माण व्हावी ह्या उद्देशानेच तर त्या वाचकांनी ते अप्रस्तुत आक्षेप उपस्थित केले आहेत. आपण ते आक्षेप खरे-खोटे काहीही मानले तरी मला काहीएक प्रत्यवाय नाही. परंतु ते तसे मानण्यात त्या वाचकांची आणि तुमच्यासारख्या प्रामाणिक वाचकांची दोहों पक्षांची हारच आहे.
धन्यवाद.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
शीर्षक संपादित
ओकांच्या दुकानात काय माल विकत मिळतो ते जाणण्याची जवाबदारी आमची?
---
उपक्रमावर वाद-विवाद-चर्चा अवश्य कराव्यात परंतु कृपया, एकमेकांना शेलक्या विशेषणांनी संबोधू नये. - संपादन मंडळ
हॅ हॅ हॅ
अच्छा इथे 'शेलके' विशेषण वापरले होते काय? ;)
संपादकीय टिप्पणी आवडली.
कुमारी रेबेका टावबर, व मूळ साखळीपत्र
कुमारी रेबेका टावबर यांच्यासंदर्भात हस्तलिखित पत्रातली पूर्वोपस्थित तथ्ये आणि आणि त्याबद्दल अभ्यास असा हा लेख आहे.
या लेखात तुम्हाला वक्रोक्ती कुठे भासली हे विशद करून सांगाल काय? या लेखात दिलेली कुठली माहिती चुकलेली आहे, असे तुम्हाला आढळून आले आहे? (उदाहरणार्थ उन्सियल लिपीबद्दल माहिती, ह्यूस्टन बद्दल भौगोलिक माहिती, यांच्यात चूक झाली आहे काय?) तथ्य तपशिलांत जर चूक झाली असेल, तर त्याबद्दल सुधारणा येथे देणे आवश्यकच आहे, आणि मी ती देईनच.
कुमारी रेबेका टावबर हिच्याशी प्रत्यक्ष भेट घेतल्याचा वृत्तांत जरूर लिहावा. कॅन्सरमुळे तळमळणार्या या खंबीर बालिकेची भेट झाल्यानंतर तुम्ही लोळून मुळीच हसला नसता.
कुमारी रेबेका टावबरबद्दल तुम्हाला सहानुभूती नाही, यात पूर्वदूषितग्रहाचा कुठला भाग आहे काय? हा पूर्वग्रह बाजूला ठेवून कुमारी टाववर हिच्याबाबतीतच्या पत्राबद्दल विचार करावा, ही विनंती.
माहिती आणि तर्क.
आपण दिलेल्या माहितींत काही चूक झाली असावी असे मी म्हणत नाही. नाडिग्रंथांच्या चर्चेच्या संदर्भाशिवाय पाहतां आपला प्रयत्न स्तुत्य असल्याचे मी पूर्वीही नमूद केले आहे. तथापि येथील नाडिग्रंथांच्या चर्चेच्या संदर्भांत (पूर्वीच्या प्रतिसादांत लिहिलेप्रमाणे) आपला तर्क लागू नाही असे मात्र मी म्हणेन. बाकी चालू देणे.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
तर्क??
तुमच्या कुठल्याच मुद्द्याला तर्क लागू होत नाही हे सांगणे हाच या लेखाचा उद्देश असावा.
अस्थानी
ओक यांचा वर दिसणारा प्रतिसाद हा मूलत: स्वतंत्र लेख म्हणून प्रथम प्रकाशित झाला होता. त्यावर मी वरील प्रतिसाद दिला होता. परंतु आता तो लेख उडवून येथे प्रतिसादांसह हलवल्यामुळे माझ्या प्रतिसादातील "हैयो यांनी दिवाळी अंकात दिलेल्या संशोधनपर लेखाचे विडंबन धनंजय यांनी केले होते ते आपण पाहिले असेलच." हे वाक्य त्यात दिलेल्या दुव्यासह अथानी दिसत आहे.
त्यामुळे हे वाक्य माझ्या प्रतिसादातून उडवावे.
(अवांतर: सदर लेख येथे प्रतिसाद म्हणून डकवणे पटले नाही. वेगळा लेख असेल तर लेखक दुराग्रही आहे असा सदस्यांचा समज होईल. पण येथे प्रतिसाद म्हणून डकवल्याने लेखक मूर्ख आहे असा सदस्यांचा समज होईल. एका सदस्याबद्दल इतर सदस्यांचा गैर(?)समज होईल असा बदल संपादकांनी/प्रशासकांनी करणे योग्य नाही).
नितिन थत्ते
जुना प्रश्न
मारुती कांबळेचं काय झालं !!!!
नितिन थत्ते
फिरते विक्रेते
जो पर्यंत ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर येत नाही तो पर्यंत शशि ओक आणि हैयो ह्या दोघांनाही मराठी स्थळांवरील फिरते विक्रेते समजावे. आणि चर्चा करण्यात वेळ दडवू नये. (मुंबईत लोकलमधे वगैरे जे विक्रेते येतात त्यांच्याशी आपण वाद घालत नाही) इन् द मीन टाईम, उपक्रम व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करुन ह्या दोघांनी ऑफिशियल बिल्ले बनवुन घ्यावेत आणि इथे वावरताना ते त्यांच्या शर्टाला(आयडीला) लावावेत जेणे करुन नव सदस्यांना ह्याची कल्पना येईल.