खुर्ची कोणी निर्माण केली? का केली?

खुर्चीची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. पण शब्दांत पकडता न येणारी ही संकल्पना त्या व्याख्यांच्या पलिकडे जाऊन दशांगुळं उरते. मला असं वाटतं की खुर्चीची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी खुर्ची निर्माण केली. मानवाचा जन्म झाल्यानंतर उत्क्रांती अवस्थेतून जात असताना चार पायांवरून दोन पायांवर चालायला लागल्यावर कधीतरी ही गरज निर्माण झाली असावी. ही गरज का निर्माण झाली असावी ह्याची काही कारणे आपण अंदाजू शकतो; उदा- त्याने खूप काळ शिकारी-गोळाकारक (गोळा करणारा) या भूमिकेत घालवला. अर्थातच हे काम उभ्याने, वाकून व चालत करायचं असल्यामुळे कधीतरी त्याचे पाय दुखले असतीलच. काही हुशार लोकांना असे वाटणे साहजिक आहे की, ह्या वणवणीपेक्षा अधिक कंफर्टेबल भुमिका घ्यायची असेल तर काही रचना असणं आवश्यक आहे. हाच सुतारकामाचा उदय तर नव्हे? आरामात बसण्यासाठी/ वावरण्यासाठीचं शास्त्र?

अर्थातच वरील विचार हा एक फार त्रोटक अंदाज आहे, त्यामुळेच खालील प्रश्न पडतात-

खुर्ची कोणी निर्माण केली? का केली?- त्यांना काय साधायचं होतं?
ज्यांच्या पर्यंत वरील शास्त्र पोहोचलं नाही ते लक्षावधी वर्षांपासुन तसेच "आदीवासी" राहीले- त्यांच्यात खुर्ची म्हणून काय वापरतात?

हे जर स्पष्ट झाले तर उपक्रमावर तरी "खुर्चीची व्याख्या" अधिक धारदार होईल असे वाटले म्हणून हा धागा.

Comments

आवडला

खूर्चीचा धागा आवडला.

पाय खूप न मुडपता बूड आणि पाठ टेकता येते आणि जिला (एकसंध) हलवता येते ती खूर्ची.

बघुया ही व्याख्या चालते का.

कोणी निर्माण केली?
विमान कोणी केले? (राईट बंधू की तळपदे का अगस्ती), मोटर कार कोणी केली, विजेचा दिवा कोणी शोधला (एडिसनचा दिवा हा जास्त काळ पेटणारा दिवा होता.), फोनचा शोध कोणी लावला इत्यादी गेल्या शतकातल्या शोधांबद्दल मला माहिती नाही. ऋषीचे कूळ, नदीचे मूळ (तसेच शोधाचे मूळ) शोधू नये म्हणतात कारण शेवटाच्या मागे काहीतरी असतेच.

मला असे वाटते की नैसर्गिक उंचवट्याच्या ठिकाणांपासून (दगड) ही कल्पना आली असणार.

प्रमोद

गंभीरपणे

"क्ष" संकल्पना कोणी निर्माण केली, याबद्दल युक्तिवादांची आणि चर्चेची चौकट देण्याकरिता हा धागा उपयोगी आहे. या संकल्पनेमध्ये त्या मानाने भावनांचा गुंता कमी आहे.

धाग्यातले लालित्य आणि हसरेपणा आवडण्यासारखा आहे, हे आलेच. परंतु गंभीरपणे चर्चेत उत्तर देण्याचासुद्धा प्रयत्न करेन. "नॉमिनलिझम" (संकल्पना नाममात्र आहेत असा वाद) आणि "कन्सेप्च्युअलिझम" (मनापुरते संकल्पना असतात, प्रत्यक्षात नसतात हा वाद) - तत्त्वज्ञानातले हे दोन प्रवाह विचारात घेता येतील.

(मात्र यात "क्ष संकल्पना", आणि "क्ष पिंड" हे दोन प्रकार आहेत, असे वाटते. शिवाय "[सुतारकामासारखा] क्ष हा व्यवसाय" हा वेगळाच प्रकार असावा. यापैकी फक्त "क्ष संकल्पना" निवडेन असे वाटते.)

व्याख्या अधिक धारदार हवी

पाय खूप न मुडपता बूड आणि पाठ टेकता येते आणि जिला (एकसंध) हलवता येते ती खूर्ची.

माझ्याकडे या व्याख्येत फिट बसणारी वस्तू आहे. पण मी तिला 'सोफा' म्हणतो. हे म्हणजे एखाद्याला खूप भाविक हार घालतात, नमस्कार करतात म्हणून त्याला देव म्हणण्यासारखं आहे. व्याख्या कशी नेटकी असावी.

ऋषीचे कूळ, नदीचे मूळ (तसेच शोधाचे मूळ) शोधू नये म्हणतात कारण शेवटाच्या मागे काहीतरी असतेच.

ही नकारात्मक भूमिका झाली. एखादी वस्तू आहे, याचा अर्थ तिचा शोध कोणीतरी लावलाच असला पाहिजे, नाही का? खुर्च्या आपोआप कशा तयार होतील?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सोफा

माझ्याकडे या व्याख्येत फिट बसणारी वस्तू आहे. पण मी तिला 'सोफा' म्हणतो. हे म्हणजे एखाद्याला खूप भाविक हार घालतात, नमस्कार करतात म्हणून त्याला देव म्हणण्यासारखं आहे. व्याख्या कशी नेटकी असावी.

सोफा ही खूर्चीच आहे. :) माझ्या व्याख्येत धारदारपणा आहे. नेटकी आहे. खूप लोक ज्या गोष्टीस खूर्ची म्हणतात त्या गोष्टीला अनुरूप आहे.
सर्व लोक ज्याला खूर्ची म्हणतात त्याला कदाचित सामावून टाकणारी नसेल. पण मला काय त्याचे. मी बोलताना या व्याख्येला धरून बोललो म्हणजे झाले.

तुमच्या देव रूपकात मात्र ते नाही.

दुसरा मुद्दा: मूळ शोधू नये कारण प्रयत्न असफल होतात असे त्या म्हणीतून दिसते. वेळ जाण्यासाठी नदीची मुळे शोधायला माझी काहीच हरकत नाही. (मजा पण येते.)

दुसरे रूपक: संगणकाच्या व्याख्येत वीज वापर आवश्यक ठरवला तर पास्कलचे प्रयत्न त्यात येत नाहीत. ट्रान्जिस्टर अनिवार्य ठरवला तर वॉल्व वाले येत नाहीत, मायक्रोचिप अनिवार्य ठरवली तर ट्रान्जिस्टर वाले येत नाहीत (ही मालिका चालूच राहू शकते.) आणि प्रत्येक व्याख्येने झालेल्या संगणकाचे मूळ वेगवेगळे येते. ही अगदी हल्लीची गोष्ट ज्याच्या ऐतिहासिक पुराव्यांचा साठा भरपूर आहे. पण नेमके मूळ (प्रत्येक व्याख्येतील संगणकाचे वेगवेगळे) मला माहित नाही. तेंव्हा खूर्ची सारख्याची काय गोष्ट करता?

प्रमोद

व्यापक

सर्व लोक ज्याला खूर्ची म्हणतात त्याला कदाचित सामावून टाकणारी नसेल.

नाही, उलट ती अतिव्यापक आहे असं माझं मत आहे. त्यात सोफाच नव्हे तर पाठ असलेला पलंग, हॅमॉक, दोन मदारींचा उंट हेही येतात (उंटाला तर चार पायही असतात). मग त्या त्या वस्तुंच्या व्याख्या करायला पंचाईत येते.

तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रत्येक पदार्थात एक खुर्चीपण कमी-अधिक प्रमाणात असतं? सोफ्यामध्ये ते (समजा) ६०% टक्के असेल. ज्या गोष्टी सर्वसामान्यपणे खुर्च्या म्हटल्या जातात त्यांच्यात ते (समजा) ९५% किंवा अधिक असेल... तसं असेल तर ते विचार करण्याजोगं आहे. (टक्केवारीचे आकडे महत्त्वाचे नाहीत)

संगणकाच्या बाबतीत - इंका संस्कृतीत धाग्यांच्या सहाय्याने लेखन, नोंदणी, (व बहुधा आकडेमोडही) करायचे. त्या खिपू धाग्यांनाही संगणक म्हणता येईल की.

In his book, Signs of the Inka Khipu, ..., Dr. Urton said he had for the first time identified the constituent khipu elements. The knots appeared to be arranged in coded sequences analogous, he said, to "the process of writing binary number (1/0) coded programs for computers."

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विषयांतर | रेड इंडियन आदिवासी जमात

दक्षिण अमेरिकेतील पेरु-बोलेव्हिया सीमेजवळील अँडीज् पर्वतरांगांमध्ये असलेल्या आल्टिप्लॅनो नामक पठारावर (१३००० फीट उंच) वास्तव्य करत असणार्‍या रेड इंडियन आदिवासी जमातीच्या लोकांच्या पूर्वजांबद्दल आपण बोलत आहात का? कारण तेथेच पूर्वी "नाजका" नामक नगर होते व तेथील राजाला "इंका" संबोधले जाई.

विषयांतर असले तरी विषय निघालाच आहे म्हणून मला माहित असलेलं खाली करतो:

» "पंपा" नामक अजुनही जगभर उत्सुकतेचा विषय बनून राहिलेल्या रस्त्यांसदृश्य प्रचंड भौमितिय व एकसंध आकृत्या याच परिसरात आहे. यांनाच "इंकाचे रस्ते" असेही म्हणले जाते.
» अँडीज् पर्वतरांगांमध्ये येथे नजीकच असलेल्या पिस्को नामक डोंगरावर सुमारे ८२० फीट उंच असलेली त्रिशुलसदृश्य आकृती दिसते. जगभरातील पर्यटक या डोंगरावर अवतरलेल्या त्रिशुलाला बघण्यासाठी येतात. सुमारे १२ मैलांच्या अंतरावरुन देखील ही त्रिशुलसदृश्य आकृती स्पष्ट बघता येते.
» क्विपू - बीजगणितीय गणने करण्यासाठी हा सुमारे २ ते २.२५ फीट लांब असू शकणारा दोरखंड या जमातीच्या लोकांकडून प्राचिन काळापासून आजही वापरला जातो. या दोरखंडामध्ये ठराविक अंतरावर गाठी असतात. गाठी अन् त्या गाठींमधील मोकळी जागा म्हणजे ० आणि १ अशी द्विमानसदृश्य पद्धति गणना करण्यासाठी हे लोक वापरतात.
» टिटिकाका सरोवर (अवकाशातून हे सरोवर पाहिल्यावर त्याचा जग्वार/मांजरासदृश्य आकार दिसतो) - १२२ मैल लांब, ३५ मैल रुंद आणि ७०० फीट खोल असे हे जलाशय आहे. याच सरोवरशेजारी असलेल्या—एका गतप्राचिन तिह-वानाको (Tiahuanaco) नामक शहारात (टिटिकाकापासून १० मैल लांब) इंकापूर्व जमात "टायटाबो" पूर्वी वास्तव्य करायचे, जेथे शेकडो टन वजनाच्या कित्येक दगडांपासून बनवलेल्या इमारती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.
--> १९३२ साली "द ग्रेट आयडल ऑफ तिहवानाको" असे नंतर नामकरण झालेली २४ फीट उंचीची अन् सुमारे २० टन वजन असणारी मूर्ती, जी लाल दगडात कोरलेली होती, ती एका संशोधनात सापडली. मूर्तीवर सांकेतिक लिपीत डॉ. हेरबिजर यांच्या १९२७ सालच्या सिद्धांताशी* मिळतीजुळती माहिती आढळून आली. मला कित्येक दिवसांपासून पडलेले हे एक कोडे आहे की ती माहिती थिया (Thia) बद्दलची अथवा त्यासंदर्भातील निरिक्षणे दर्शवणारी तर नसेल ना?
» येथेच, एकाच सलग दगडातून कोरलेले १६.५ फीट लांब व १०.५ फीट उंच असलेले "Sun Gate" आहे. पाषाणाचे वजन १२ किंवा अधिक टन वर्तविले जाते. या गेटवरील गणेशपट्टीवर (किंवा चौकटीच्या वरच्या बाजूवर) तीन ओळींत मांडलेले एकूण ४८ चौरस आहेत. प्रत्येक चौरसात अंतराळात संचार करणार्‍या देवतेसदृश्य प्रतिमा बघावयास मिळते.
» तिहवानाको टिटॅम्बो शहरांनजिकच साक्सा-वामान शहर असल्याचीही माहिती आहे. येथे अशी एक दंतकथा रुढ आहे की ओरियाना नावाची देवता होती जीला ४० अपत्ये होती. आश्चर्याची बाब ही एक त्या सर्वच ४० अपत्यांच्या हाताला प्रत्येकी ४ बोटे होती. (च्यायला, एलिअन्स तर नसावेत?) याच साक्सा-वामान नजीकच्या परिसरात एक प्राचिन किल्ला आहे, जेथे एक खोबण आहे, तेथे काही दशकांपूर्वी काही शास्त्रज्ञांनी त्या खोबणीत होकांयत्र ठेऊन त्याच्या साह्याने निदर्शने घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना होकायंत्रातील सुई दिशाहीन फिरताना निदर्शनास आले होते, नंतरही अनेकांना हा प्रत्यय आला, शेवटी असे कळाले की या खोबणीतून गूढरीत्या, नैसर्गिक किरणोत्सार होत असतो. याविषयी अशी प्राचिन समजूत प्रचलित आहे की, येथील सैनिक लढाईला जाण्यापूर्वी या खोबणीत हाताची मुठ घालत असत, ज्यामुळे त्यांना लढण्यासाठी एक प्रकारची अलौकिक शक्ति प्राप्त होत असे.

* ~ पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात पृथ्वीभोवती एक उपग्रह २८८ दिवसांत ४२५ प्रदक्षिणा पूर्ण करीत असे, नंतर तो फुटून चंद्र झाला.

संदर्भ?

वरचे संदर्भ कुठे वाचलेत?

देव छे! परग्रहावरील अंतराळवीर या पुस्तकात का?

परग्रहावरील अंतराळवीर?

नाही. एरिक व्हॉन डॅनिकेनच्या पुस्तकांत तसेच त्यांच्याबद्दल वाचतांना ह्या गोष्टींबद्दल वाचनात आले आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरसुद्धा "इंकाच्या रस्त्यां"बद्दल पूर्वी डॉक्युमेंट्री पाहिली होती, परिणामी उत्सुकतेपोटी संदर्भात अधिक माहिती मिळवून ती कशीबशी संकलित करुन इथे मी पोस्टलीय... प्रस्तुत पुस्तक, लेखक, परिचय?

देव छे!

देव छे! परग्रहावरील अंतराळवीर हे चॅरिएटस ऑफ द गॉड्सचेच भाषांतर आहे. लेखक बहुधा सुभाषचंद्र नाडकर्णी. (चू. भू.दे.घे.)

अच्छा!

मी मुळ "कॅरिओट्स ऑफ गॉड्स" हे पुस्तक वाचले आहे. त्याचा [दुवा].

माझ्या वरील प्रतिसादामध्ये समाविष्ट असलेल्या काही गोष्टींसाठी हे पुस्तक शिवाय असे आंतरजालावर थोड्याप्रमाणात उपलब्ध असलेले छोटे-मोठे दस्तावेज आणि काही डॉक्युमेंट्रीज आहे, पण मुळात मला लिहून ठेवण्याची सवय असल्याने मी या गोष्टी समजावून घेतांना आधी असबंधरीत्या लिहिलेल्या आहेत व नविन काही निदर्शनास आले तर त्याची भर घालत असतो किंवा आंतरजालावर लगेच लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो.

उत्तम माहिती, पण अवांतर

मी विशाल.तेलंग्रे यांना नम्र विनंती करतो की इतक्या माहितीचा खजिना मूळ विषयाशी संबंध नसताना अवांतर मांडू नये (एखाददोन ओळी ठीक आहे). स्वतंत्र लेख लिहावा. त्यावर वेगळी चर्चा होऊ शकेल. पण इथे विषयांतराने चर्चेला अडथळा होईल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कुतूहलजनक

विशाल, ह्या सर्व नोंदी खूप कुतूहलजनक आहेत. इंटरर्नेटवर शोधल्या व अजुन माहीती वाचत् आहे.

व्यापक

नाही, उलट ती अतिव्यापक आहे असं माझं मत आहे. त्यात सोफाच नव्हे तर पाठ असलेला पलंग, हॅमॉक, दोन मदारींचा उंट हेही येतात (उंटाला तर चार पायही असतात). मग त्या त्या वस्तुंच्या व्याख्या करायला पंचाईत येते.

जास्त व्यापक असू दे. व्याख्येत बसणार्‍या सर्व नैसर्गिक आणि मानव निर्मित वस्तुंना मी खूर्ची म्हणायला तयार आहे. (दोन मदारींच्या उंटाच्या पाठीवर खूर्ची असते असे म्हणीन.) यातील काहीं विशेष खूर्च्या आहेत. त्यांच्या अधिक विशेषत्वानुसार त्यांची नावे वेगवेगळी होतात. सोयीनुसार ती वापरीन. पण त्यांचे खूर्ची हे सामान्य नाम मी दूर करणार नाही. (उदा. माणूस शब्दाची काही व्याख्या होते. त्या व्याख्येनुसार असणार्‍या सर्वांना मी माणूस म्हणून संबोधणे बंधनकारक नाही. मी त्यांना 'राजेश माणूस' न म्हणता नुसते राजेश म्हणीन. त्यामुळे राजेश यांचे माणूसपण संपत नाही.)

तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रत्येक पदार्थात एक खुर्चीपण कमी-अधिक प्रमाणात असतं?

नाही. मला माझ्या व्याख्येशी अशी प्रतारणा करायची नाही.

प्रमोद

खुर्ची?

खुर्ची देवानच निर्माण केली (सगळं जग् केलं अगदि तस्स्च) असं काही आस्तिकांसारखं मानलं तर् उपप्रश्नः-
१.देवानं खुर्ची आधी निर्माण् केली की माणुस्?
१.१म्हणजे,माणसाला बसायला खुर्ची बन्वली की खुर्चीवर् बसायला माणूस् बन्वला(रिकामी खुर्ची बरी दिसेना म्हणून्)
की स्वतःला बसायला खुर्ची बनवली?
२.देवानं खुर्ची "का" निर्माण् केली?
३.बनलेली पहिली खुचर्ची दगडाची होती, शुद्ध/मिश्र धातुची होती कि लाकडाची?
की काहि प्राणिज् वस्तुहुन् बनचवली?
दगडाची असेल् तर् ती क्कुणा॰या टाळलक्यात हाणुन् ती बहुपयोगी म्हणुन् वापरली का?
४.काही थोर्थोर् कवी आणि ऋषी हे "हवेची उषी" बन्वायचे(असं ऐकलय) तशीच् "हवेची खुर्चीही" बनवु शकत् अस्तील् काय्?
५.टेबल् आधी की खुर्ची?
६.टेबल आणि खुर्ची ह्या वस्तुंचं लग्न् कधी लागलं?(ह्यांचा एकत्रित् वापर् कधी सुरु झाला?)
७.खुर्चीला सर्वप्रथम् "मान्" कधी मिळाला?(म्हंजे "चव्हाणांची खुर्ची गेली" किंवा "चव्हाणांना खुर्ची मिळाली" अस वक्प्रचार् कधी सुरु झाला?)
हा वक्प्रचार एतद्देशिय् आहे की फारसी/अरबी कल्चर् वरुन् घेतलाय् की पाश्चात्त्य?
७.१खुर्चीसाठी भांडणं कधी सुरु झाली?

८."आराम खुर्ची" नस्ताना टकले विद्वान/ढुड्ढाचारी लोक् नक्की कुठं बसुन् गप्पा ठोकत्?
९.खुर्चीचं मूळ्/आदिम् रूप् एखादा दगड/दगडी उंचवटा असावा असं पकडलं, तर खुर्चीला पाय् कधी फुटाले?
पाय् असलेली खुर्ची प्रथम् कधी/कशि बनली?
त्याच खुर्चीला हात कधी फुटले?
१०खुर्चीच्या हाताचा जन्म आधी झाला की खुर्चीच्या पायाचा?
११सध्याच्या खुर्च्यांमध्ये अजुन् काय् सुधारणा करण्यास वाव् आहे? अजुन कुठली गोष्ट् वादढवल्यानं/बदलल्यानं तुम्हाला खुर्ची अधिक् उप्युक्त् वाटेल्?
माझ्या सूचना:- खुर्चीला छोटासं छत् असावं.लहान् मुलाच्या नजरेतुन् बघा मस्त् वाटॅल्.
१२शेवटचं:-
भविष्यातल्या खुर्च्यात् काय् होइल् असं तुम्हाला वाटत्?(लावा कल्पनाशक्ती.
कल्पना करा की तुम्ही एखाद्या अगदि sci-fi,लै भारी अशा हॉलिवूडपटाचे लेखक/दिग्दर्शक् आहात्. )

१३ माझा तर्कः-
माणुस् दगडावर् पाय् टेकवुन् बस्ला असावा अगदि प्रथम्.--झाला खुर्चीचा जन्म.

किंवा:_
माणूस शांत बसलेल्या लाडाक्या पाळिव् प्राण्याच्या पाठिवर् पाय् (एकाच बाजुला)मोकळे सोडुन् बसला असावा आणि त्याला खुर्चीची आयडीया आली असावी.
कदाचित मग् खुर्ची-पाळिव् प्राणी ह्यात् साम्य भासलं असाव्.
माणूस् प्राण्यावर् बसलेला असतानाच ,प्राणी हलु लागताच, त्याच्या डोक्यात् आलं असावं "अशीच आपली खुर्चीही ऑटोम्याटिक हलली तर्?" आणि ऑटोम्याटिक हलणार्‍या खुर्चीचा झाला जन्म्...म्हंजे खुर्चीला लागली चाकं. किंवा चक्क "वाहन्" ही आयडीया मानवाच्या डोक्यात आली.
क्काय? पटतय का?

आपलाच,
मनोबा.

हे पटत नाही

खुर्ची देवानच निर्माण केली (सगळं जग् केलं अगदि तस्स्च)

तसं मानलं तर मग पुढचे प्रश्न उद्भवतच नाहीत ना. मग देवाने हे जग एक नॅनोसेकंदापूर्वी निर्माण केलं, खुर्च्या व त्यांवर बसलेले आपण, व आपल्या मनातल्या आठवणी - यांसकट असंही मानता येतं. देवाला आधी-नंतर करण्याची काय गरज? अहो, काळाची कल्पनाच देवाने निर्माण केली असेल तर काय घ्या?

पण तुम्ही उगाचच सोपा प्रश्न कठीण करत आहात असं वाटतं. कदाचित उपक्रमावरच्या सर्व चर्चांप्रमाणे देव, श्रद्धा, अंधश्रद्धा, आस्तिक या विषयांकडे वळवण्याचा हा हीन प्रयत्न असेल... मुळात सोप्या गोष्टीची व्याख्या करू असं म्हटलं, तर आधी देवाची व्याख्या करायला सांगताहात. हद्द आहे तुमची.

माणुस् दगडावर् पाय् टेकवुन् बस्ला असावा अगदि प्रथम्.--झाला खुर्चीचा जन्म.

हे पटत नाही. तसा तो झाडावरही बसायचा. किंबहुना माणूस जेव्हा माकड होता तेव्हाही बसायचा. त्यावेळी जन्म झाला का? म्हणजे वेद अपौरुषेय तशी खुर्ची अमानवी (पाशवी म्हणत नाही) का?

समजा माणसाविषयीच बोललो... तरी त्या क्षणी त्या दगडाचं खुर्चीत रूपांतर झालं? तेव्हा तो दगड असायचा थांबला, किंवा त्याला खुर्चीपणाचे नवीन गुणधर्म प्राप्त झाले का? अचानक इतर तसे दिसणारे दगडही खुर्ची बनले का? पण मग शोध कोणी लावला हा प्रश्न अनुत्तरितच राहातो. तसं असेल तर मग व्याख्या कोण करणार? आणि व्याख्या नसेल तर आपण खुर्ची वापरणार तरी कशी?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

नक्कीच!

>>.... म्हणजे वेद अपौरुषेय तशी खुर्ची अमानवी (पाशवी म्हणत नाही) का?
असं मानलं तर बहुतेक् प्रश्न पटकन् सुटतील्(किंवा सोडुन् देता येतील.)
बाकी, चर्चेला कुठेच नेण्याचा माझा प्रयत्न नाही/नसतो. जे पटकन डोक्यात आलं, ते लिहिलं. कुणाला काही "हीन् प्रयत्न" वाटल्यास माझा इलाज नाही.

आणि ते देव वगैरे सोडलं तरीही खुर्चीशी संबंधित् काही शंका आल्या त्या तशाच आहेतः-

......
३.बनलेली पहिली खुचर्ची दगडाची होती, शुद्ध/मिश्र धातुची होती कि लाकडाची?
की काहि प्राणिज् वस्तुहुन् बनचवली?
दगडाची असेल् तर् ती क्कुणा॰या टाळलक्यात हाणुन् ती बहुपयोगी म्हणुन् वापरली का?
४.काही थोर्थोर् कवी आणि ऋषी हे "हवेची उषी" बन्वायचे(असं ऐकलय) तशीच् "हवेची खुर्चीही" बनवु शकत् अस्तील् काय्?
५.टेबल् आधी की खुर्ची?
६.टेबल आणि खुर्ची ह्या वस्तुंचं लग्न् कधी लागलं?(ह्यांचा एकत्रित् वापर् कधी सुरु झाला?)
७.खुर्चीला सर्वप्रथम् "मान्" कधी मिळाला?(म्हंजे "चव्हाणांची खुर्ची गेली" किंवा "चव्हाणांना खुर्ची मिळाली" अस वक्प्रचार् कधी सुरु झाला?)
हा वक्प्रचार एतद्देशिय् आहे की फारसी/अरबी कल्चर् वरुन् घेतलाय् की पाश्चात्त्य?
७.१खुर्चीसाठी भांडणं कधी सुरु झाली?

८."आराम खुर्ची" नस्ताना टकले विद्वान/ढुड्ढाचारी लोक् नक्की कुठं बसुन् गप्पा ठोकत्?
९.खुर्चीचं मूळ्/आदिम् रूप् एखादा दगड/दगडी उंचवटा असावा असं पकडलं, तर खुर्चीला पाय् कधी फुटले?
पाय् असलेली खुर्ची प्रथम् कधी/कशि बनली?
त्याच खुर्चीला हात कधी फुटले?
१०खुर्चीच्या हाताचा जन्म आधी झाला की खुर्चीच्या पायाचा?
११सध्याच्या खुर्च्यांमध्ये अजुन् काय् सुधारणा करण्यास वाव् आहे? अजुन कुठली गोष्ट् वादढवल्यानं/बदलल्यानं तुम्हाला खुर्ची अधिक् उप्युक्त् वाटेल्?
माझ्या सूचना:- खुर्चीला छोटासं छत् असावं.लहान् मुलाच्या नजरेतुन् बघा मस्त् वाटेल्.
१२शेवटचं:-
भविष्यातल्या खुर्च्यात् काय् होइल् असं तुम्हाला वाटत्?(लावा कल्पनाशक्ती.
कल्पना करा की तुम्ही एखाद्या अगदि sci-fi,लै भारी अशा हॉलिवूडपटाचे लेखक/दिग्दर्शक् आहात्. )

पैकी प्रश्न क्र.११ बद्दल् खालच्या एका प्रतिसादतली अदृश्य खुर्ची भन्नाट् वाटाली.

तसही "खुर्ची " ही अगदी अनादी काळापासुन् वापरात असलेली वस्तु वाटते. खरं तर् "खुर्ची" ही "वस्तु" नाही तर् "संकल्पना " जास्त् आहे.
त्याचं मूळ् शोधत बसुन हाताला नक्की काय लागेल ह्याबद्दल शंकाच आहे.
"खुर्ची कोणी निर्माण केली? का केली?"
ह्याच चालीवर खालचे प्रश्न विचारता येउ शकतातः-
१.भांडं/भुगणं/पातेलं/पात्र कुणी निर्माण् केलं?
२.झेंडा कधी/कुणी निर्माण् केला?
३.चप्पल/वाहाणा/खडावा/पायताण् कुणी निर्माण केलं?
४.भाला कुणी निर्माण केला?
५.धागा कुणी निर्माण केला?
६.प्रार्थना पद्धत कुणी निर्माण केली?
७.पाककला कुणी निर्माण केली?
८.वस्त्रं कुणी निर्माण केली?
९.दाढी/shaving करायची पद्धत किंवा केश कर्तन कुणी निर्माण केली?
१०.मद्य कसं निर्माण झालं?
११.लेखन/चित्रकला कुणी निर्माण केली?
१२.शेतीकाम कसं सुरु झालं?
१३.गणित कसं बनलं?
१४.भाषा कशा बनल्या?
१५.झोका कसा बनला?
१६टेबल कसा बनला?
१७चादर कशी बनली?
१८पांघरूण् कसं बनलं?
१९.प्रातर्विधी झाल्यावर् हात आणि अवयव स्वच्छ करावेत् हे संकेत कशे बनले?
२०.दहन/दफन् विधी कसे सुरु झाले?
२१उशी कुणी बनवली?
२२ संगीतातलं कुठलही वाद्य (टेक्नो-वाद्यं सोडुन) कसं बनलं?(तबला/वीणा/पावा/बासरी/सनई/बॅगपायपर्/ड्रम/ढोल्/ताशे कशे बनले)

जवळ जवळ ह्यातल्या प्रत्येक् गोष्टीच्या उत्तराची सुरुवात "माणुस आदिम अवस्थेत असताना....." ह्या लायनीनं सुरु होते आनि त्याची आदिम गरज् अधोरेखित होते.

आपलाच,
मनोबा.

टाइम मशीन बनवावी लागेल!

सर्वप्रथम खूर्ची कोणी बनवली अन् त्यामागे त्याचा काय हेतू होता, हे जाणून घेण्यासाठी मला टाइम मशीनद्वारे* भूतकाळाचा प्रवास करुन व्यवस्थित शहानिशा करावी लागेल-कारण मी १९९२ मध्ये जन्मलोय आणि त्यापूर्वीपासूनच खूर्ची ही संकल्पना समाजात बर्‍याच ठिकाणी बघता येत होती असा संदर्भ मला अनेकदा, माझ्यापेक्षा वयाने मोठ्यांशी अमुक गोष्टींबद्दल चर्चा करताना ऐकायला मिळालाय अन् जेव्हापासून मला कळायला लागले, तेव्हापासूनची खूर्ची मी बघतो आहेच, आता हे जे काय लिहिले आहे, ते सुद्धा खूर्चीवर बसूनच टंकलय! टाइम मशीनव्यतिरिक्त सध्या तरी सर्व मार्ग धुसर दिसताहेत. दुसरा मार्ग असू शकतो, इतिहासात डोकावण्याचा—खूर्चीच्या इतिहासाबद्दल एखादे पुस्तक नजीकच्या ग्रंथालयात मिळते का, ते पहावे लागेल. आणि तिसरा मार्ग, ज्यावर मी म्हणावा तितकासा विश्वास ठेवत नाही—पहिल्या किंवा आदिकालीन खूर्चीसदृश्य वस्तूचे काही अश्मावशेष शोधावे लागतील मग त्यांचे कार्बनच्या C१६ आयसोटोप वा तत्सम प्रक्रियांद्वारे वय ठरवले जाईल, त्यामुळे ती खूर्ची कधी तयार केली गेली होती, हे तरी किमान कळू शकेल, नाही?

* ~ टाइम मशीन बनवण्याबद्दलची इत्यंभूत माहिती कुठे मिळेल? किमान किती वेळेमध्ये मी भूतकाळातल्या इच्छित कालावधीत, इच्छित ठिकाणी पोहोचू शकेल? मला कित्येकदा राहून-राहून असे वाटते की भूतकाळात जाऊन स्वतःलाच ठार करुन पहावे, जर मी तसे केले, तर मग मी इथे वर्तमानकाळात जिवंत कसा असेन? (स्टीफन हाँकिंगलादेखील ही बाब उमगल्यावर तो स्वतःशीच पुटपुटला असेल, "च्यायला!")

महाभारतात

खुर्चीचा, सिंहासनाचा उल्लेख नाही असे वाटते. (संदर्भः गौरी लाड यांचा निबंध [पण खात्री करून सांगेन])

खुर्ची कोणी निर्माण केली?

परग्रहावरून कोणा अंतराळवीराने आणून दिली नसेल तर पृथ्वीवरल्या माणसानेच.

का केली?- त्यांना काय साधायचं होतं?

उभं राहून पाय दुखले की बसायला परंतु आणखी एक साधायचे असेल ते असे की ज्यावेळेस माणसे जमिनीवर (बहुधा) मांडी ठोकून बसत त्यावेळी त्यांच्यापासून वेगळेपणा आणि उच्चता दाखवण्यासाठी खुर्ची वापरली गेली असेल.

ज्यांच्या पर्यंत वरील शास्त्र पोहोचलं नाही ते लक्षावधी वर्षांपासुन तसेच "आदीवासी" राहीले- त्यांच्यात खुर्ची म्हणून काय वापरतात?

दग्गड! आय मीन, उच्चासनासाठी शिळेचा वापर करत असतील.

सध्या मी हीची निर्गुण, निराकार म्हणून पूजा करायचे ठरवले आहे.

काहीतरीच काय!

सध्या मी हीची निर्गुण, निराकार म्हणून पूजा करायचे ठरवले आहे.

मी ज्या खूर्चीवर बसून टंकतो आहे, मुळात तीचा रंग लाल आहे, तील चार पाय आहेत, तीला मी डोळ्यांनी व इतर अवयंवाद्वारे देखील अनुभवू शकतो. मग तीला तुम्ही निर्गुण, निराकार कसे म्हणू शकता? आणि पूजा करणे म्हणजे काय? काही धार्मिक चिकित्सा करण्याचा तुमचा यामागील उद्देश्य तर नाही?

निर्गुण, निराकार

निर्गुण, निराकाराची पूजा करणारेही शेवटी गुण आणि आकारांवर येऊन ठेपतात तर मग मी खुर्चीला निर्गुण, निराकार म्हटले तर काय फरक पडतो. तसेही चित्रातल्या खुर्चीचे गुण आणि आकार मला नेमका सांगता येत नाही. म्हणून निर्गुण, निराकार म्हटले आहे.

पूजेचा अर्थ घासकडवीच चांगला सांगतील. त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे असे कळते. ;-) परंतु पूजा कशी करावी ही चर्चा अवांतर असावी.

बाकी, मी तुमच्या खुर्चीची पूजा करण्याचे ठरवलेले नाही. मी वरील चित्रातील खुर्चीची पूजा करायचे ठरवले आहे. तुमची खुर्ची वेगळी, माझी खुर्ची वेगळी. (पक्षी: तुमचा देव वेगळा, माझा देव वेगळा.)

साकार, सगुणा, सुरूपा

पूजेचा अर्थ घासकडवीच चांगला सांगतील. त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे असे कळते. ;-) परंतु पूजा कशी करावी ही चर्चा अवांतर असावी.

पूजाविषयक चर्चा इथे अवांतर होईल याबाबत शंकाच नाही. पण पूजा करण्यासाठी साकार, सगुणा(णे)ची आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही दिलेली खुर्ची पूजेस पात्र वाटते (खुर्चीचीच पूजा करायची झाली तर..) एवढंच म्हणतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

निराकार निर्गुणी खुर्ची

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्वारं!

माझ्या निष्ठा बदलल्या. आता तुमच्या चित्रातल्या खुर्चीची पूजा सुरु.

पण...

पण खाली असलेले सगुण-साकार गटारीचे झाकण उघडे हवे ना?

मॉर्फिंग

फोटोशॉप किंवा गिम्प किंवा इतर तत्सम सॉफ्टवेअर वापरुन चिकित्सा करुन (मॉर्फिंग!) मुळ छायाचित्र बदलण्याचा हा असला हल्ली सर्राऽस वापर होताना दिसणारा प्रकार आहे.

यावरुनच मागे इंडिया टिव्ही वरदेखील साईबाबांच्या छायाचित्राला काही सॉफ्टवेअर्सच्या मदतीने बोलते करुन टिआरपी वाढवण्याची खूळचट घटना पाहण्यात आली होती, तीची आठवण झाली. नंतर इतर इ-मिडिया चॅनेल्सनी या इंडिया टिव्हीचा चांगलाच समाचार घेतला! :P

यात खूर्ची लपलेली आहे.

पहिल्यांदा पाहिल्यावर हा मॉर्फिंगचा प्रकार वाटला.
मात्र या निर्गुणीत सगुणी लपलेली आहे. बसलेल्याच्या पायाच्या आणि पाठीच्या प्रोफाईल मधे जमीनीत घट्ट रुतवलेली खूर्ची असावी.
अनिसने कडे अश्या खूर्च्या आहेत. त्यावर बसलेला माणूस हाती काठी घेऊन अधांतरी बसल्यासारखा वाटतो.

प्रमोद

टिप्पण्या (गंभीर व्याप्ती नसलेल्या)

खुर्चीची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे.

मान्य. अनेक शब्दकोशांत व्याख्या सापडते.

पण शब्दांत पकडता न येणारी ही संकल्पना त्या व्याख्यांच्या पलिकडे जाऊन दशांगुळं उरते.

सांगता येत नाही. व्याख्यांमध्ये काही फरक असतो, असे म्हणायचे असावे.

मला असं वाटतं की खुर्चीची व्याख्या तेच सांगू शकतील ज्यांनी खुर्ची निर्माण केली.

"तेच" असे ठीक नसावे. सुतार आणि गिर्‍हाईक या दोघांच्या व्याख्येत फरक असेल, तर पैकी सुताराचीच व्याख्या मान्य होईल, असे काही म्हणता येत नाही. आता गिर्‍हाईक खुर्ची मागवण्याच्या क्रियेतून खुर्ची "निर्माण" करतो, असे म्हटले तर वेगळी गोष्ट. पण तसे असल्यास ऐतिहासिक निर्मात्याचा संदर्भ न घेता आजच्या गिर्‍हाइकाला त्याची व्याख्या विचारली तर पुरे.

मानवाचा जन्म झाल्यानंतर उत्क्रांती अवस्थेतून जात असताना चार पायांवरून दोन पायांवर चालायला लागल्यावर कधीतरी ही गरज निर्माण झाली असावी.

मान्य.

ही गरज का निर्माण झाली असावी ह्याची काही कारणे आपण अंदाजू शकतो; उदा- त्याने खूप काळ शिकारी-गोळाकारक (गोळा करणारा) या भूमिकेत घालवला. अर्थातच हे काम उभ्याने, वाकून व चालत करायचं असल्यामुळे कधीतरी त्याचे पाय दुखले असतीलच. काही हुशार लोकांना असे वाटणे साहजिक आहे की, ह्या वणवणीपेक्षा अधिक कंफर्टेबल भुमिका घ्यायची असेल तर काही रचना असणं आवश्यक आहे. हाच सुतारकामाचा उदय तर नव्हे? आरामात बसण्यासाठी/ वावरण्यासाठीचं शास्त्र?

सुतारकामाचा उदय हा फार व्यापक प्रकार आहे. पलंग, टेबल, बांधकामाच्या तुळया या सर्व सुतारकामाच्या उदयाशी संबंधित आहेत. खुर्चीपासून वेगळेपण सांगता येत नाही.

खुर्ची कोणी निर्माण केली? का केली?- त्यांना काय साधायचं होतं?

चांगले प्रश्न आहेत. याबाबत एक इतिहास असा आहे :
कोणी - पहिली खुर्ची निमाण करणारा विश्वकर्मा.
का - खुर्ची निर्मिण्याच्या विशुद्ध हेतूने. विश्वकर्मा उपभोगशून्य निर्माता आहे. (उपभोगशून्य निर्माते आपल्या अनुभवातही असतात. राष्ट्रपती भवनांचे निर्माते राष्ट्रपती भवनांचा वापर करत नाहीत.)
काय साधायचे होते - खुर्चीचा निर्माण साधायचा होता.
या आख्यायिकेनुसार उत्तरे संपूर्ण असली, तरी व्याख्या धारदार करण्यास फारशी मदत होत नाही.

ज्यांच्या पर्यंत वरील शास्त्र पोहोचलं नाही ते लक्षावधी वर्षांपासुन तसेच "आदीवासी" राहीले- त्यांच्यात खुर्ची म्हणून काय वापरतात?

ज्यांच्यापाशी खुर्ची नाही ते खुर्ची म्हणून काहीच वापरत नाहीत. (आता बूड टेकवायला दगड, सतरंज्या वगैरे वापरत असतील. पण "बूड टेकवणे"="खुर्ची म्हणून वापरणे" नव्हे. फास लावून आत्महत्या करणारा मनुष्य खुर्ची नसल्यास पलंगावरून उडी मारू शकतो. पण हा वापर सुद्धा "खुर्ची म्हणून वापर" नाही.)

हे जर स्पष्ट झाले तर उपक्रमावर तरी "खुर्चीची व्याख्या" अधिक धारदार होईल असे वाटले म्हणून हा धागा.

प्रतिटिप्पण्या, तितक्याच गांभीर्याने

सुतार आणि गिर्‍हाईक या दोघांच्या व्याख्येत फरक असेल, तर पैकी सुताराचीच व्याख्या मान्य होईल, असे काही म्हणता येत नाही.

पण खुर्च्यांच्याच निर्मितीआधी सुतार आणि गिऱ्हाइक असा स्वच्छ, रेखीव फरकच नव्हता. द्वैत नव्हतं. संकल्पनेच्या निर्मितीसाठी निव्वळ ग्रहण आवश्यक होतं. किंबहुना एखाद्या खुर्चीसदृश दगडाचा वा ओंडक्याचा वापर करणे व खुर्ची (संकल्पना) बनवणे या कृती वेगळ्या नव्हत्या. या अद्वैतातूनच खुर्च्या निर्माण झाल्या. सुतार व ग्राहक असं द्वैत नंतर आलं.

या आख्यायिकेनुसार उत्तरे संपूर्ण असली, तरी व्याख्या धारदार करण्यास फारशी मदत होत नाही.

तुमची आख्यायिका 'ज्याने बूड दिलं तो खुर्ची देतोच' या स्वरूपाची वाटली. ही आख्यायिका सत्य असेल तर व्याख्येची आवश्यकताच नष्ट होते त्याचं काय? कारण हा सगळा व्याख्येचा उपद्व्याप खुर्च्या कशा तयार झाल्या, त्या वेगवेगळ्या का असतात, व वेगवेगळ्या असल्या तरी त्यांमध्ये काही सामायिक गुणधर्म आहेत का हे पहाण्यासाठी आहे. जर 'आहे हे असं आहे' असंच उत्तर असेल तर या चर्चेतून 'पटलं तर घ्या नाहीतर चपला घालून चालू पडा' याशिवाय काहीच पर्याय रहात नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

गरज

गरज ही शोधाची जननी हा शब्दप्रयोग ऐकला नाही काय?

रग्गड प्रोटीन पण फायबर नाही. त्यात शिकार करताना गुडघे निकामी.

एन्ड् लेट देअर बी खुर्ची

अजून एक खुर्ची! (अवांतर!)

चोवीस तास इंटरनेटवर बसणार्‍यांसाठी.......


Funny Chair

पर्याय

१० इंचाचे नेटबुक 'कोठेही' वापरता येते.

खरा उपयोग

+1

श्री सहज यांनी दाखवलेला खुर्चीचा खरा उपयोग आवडला
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

इतिहास माहित नाही पण

कालच वाचले ("जाळ्यातील चंद्र" - म.वा. धोंड) त्याप्रमाणे भारतातील सर्वसामान्य घरात खुर्ची इ.स. १९०० पूर्वी सहसा दिसत नसे.
तसेच खाटही (कॉट) नसे. आजारी पडलेल्या व्यक्तीसाठी बाजले/खाटले/खाट आणि त्याला तपासायला आलेल्या दागदरासाठी बसायला खुर्ची
शेजारपाजार्‍यांकडून तात्पुरती उसनी (चुकून कुणाकडे असेल तर) / भाड्याने आणवली जात असे.
(ते पटले.)

त्यामुळे 'खुर्ची' ही वस्तू निदान भारतात तरी केवळ सत्ताधारी/उच्चवर्गीय लोकांची मालमत्ता होती असा निष्कर्ष निघू शकतो.

हिस्टरी ऑफ चेअर, भारतीय इंजिनीयर

तुमच्या प्रश्नाचे समाधान विकीपेडीयावरील हिस्टरी ऑफ चेअर ह्या लिंकवर ब-यापैकी होते, असे वाटले. खूर्ची हा प्रकार भारतीय नाही हे समजायला तितका खुलासा पुरेसा आहे असेही वाटले.
सध्या भारतात वापरल्या जाणा-या मोल्डेड खुर्च्या, सरकारी कार्यालयात एकेकाळी ज्या खुर्च्या दिसत त्या सोडल्यातर, ज्या टिल्टींग, हाईट ऍडजस्टमेंट, अशा सुविधा असलेल्या खुर्च्या ईंडोनेशिया, चीनच्या बाजारातून आयात केलेल्या असतात. भारतीय इंजिनीयर खुर्च्यांचे डीझाइन सुद्धा करु शकत नाहीत असेही दिसते.
का? चे उत्तर इतरांनी चांगले दिले आहे.

हे ही पहा.

किर्लोस्करांच्या लोखंडी खुर्च्या

लक्षमणराव किर्लोस्करांनी जेंव्हा किर्लोस्करवाडीला आपला कारखाना सुरू केला तेंव्हा पहिल्या काही वर्षातच घडीच्या लोखंडी खुर्च्यांचे उत्पादन चालू केले होते. या खुर्च्यांची गुणवत्ता एवढी चांगली होती की अशा काही खुर्च्या अजून वापरात असलेल्या माझ्या पाहण्यात आहेत. सध्या बाजारात असलेला चिनी माल बघून भारतीय इंजिनीयरांबद्दल असे सर्वसामान्य विधान रुचले नाही. भारतात नीलकमल नावाची कंपनी अतिशय सुंदर मोल्डेड प्लॅस्टिकच्या खुर्च्या बनवत असते. या कंपनीची उत्पादने श्री असामीअसामी यांनी वापरून बघितल्यास त्यांचा गैरसमज दूर होण्यास मदत व्हावी.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वर्जीनल डीझाइन भारतीय नाहीच

झोकात किर्लोस्कर लिहिलेल्या खुर्च्या मी ही वापरलेल्या आहेत. त्या मनातून जरी नाहीशा झाल्या नसतील तरी घरी- ऑफिसातून तरी नक्कीच हद्दपार झाल्या आहेत. तासभर मोल्डेड खुर्च्यांवर बसले तर स्ट्याटीक शॉक लागतो. नीलकमलचे वर्जीनल डीझाइन भारतीय नाहीच. हे वाचावेत.

ओरिजिनल डिझाईन

चिनी उत्पादक बनवत असलेल्या खुर्च्यांचे ओरिजिनल डिझाईन चीनमधले असते हा गैरसमज आहे. चिनी मोल्डेड खुर्च्यांवर जरा जोराने कोणी बसले तर त्यांचे पाय फाकतात असा अनुभव आहे. मी नीलकमल खुर्च्या खूप वर्षे वापरल्या आहेत मला तरी विद्युत झटका अजून बसलेला नाही. असामीअसामी टेरेलीन कपडे वापरत असावेत. ते वापरल्यास कोणत्याही मोल्डेड खुर्चीवर झटका बसू शकतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

नाही.

--चिनी उत्पादक बनवत असलेल्या खुर्च्यांचे ओरिजिनल डिझाईन चीनमधले असते हा गैरसमज आहे.- असे मी म्हणालोच नाही. तेथे त्या खुर्च्या तयार होतात. आणि कदाचित चीनी डिझाइन असेलही.- भारतीय इंजिनीयर लोकांचे मात्र ते डीझाइन नक्कीच नाही.

कविता

मी तर मागे एक खूर्चिवर कविताच केली होती. कवितेचं नावही होतं खुर्चि ?(दुवा मनोगत.कॉम वर उघडेल)
त्यावरून काहि मदत होतेय का बघा. :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

खुर्ची - अजून एक व्याख्या

खुर्ची आणि देव ह्यांच्या संकल्पणेत एक मेजर फरक म्हणजे पंचद्न्यानेंद्रियाला जाणवनारे अस्तित्व.

तसेच खुर्ची मधे कोंबडी आधी की अंडं आधी ह्याप्रमाणे एक गोम आहे. खुर्ची म्हणजे नेमकी कधीची खुर्ची म्हणायची आहे. आजच्या खुर्चीची व्याख्या
आणि १०० वर्षापुर्वीच्या खुर्चीच्या व्याखेत त्याच्या अपीअरंस मधे बराचसा फरक जाणवेल. औद्योगीक क्रांती नंतर खुर्चीची एक अशी व्याख्या करणे थोडं अवघड झालं आहे.
गरजेनुसार ही व्याख्या बदलत गेली आहे. आधी खुर्चीला चार पाय वगैरे असावीत आता ते असतीलचं अस नाही.

तसेच खुर्चीची व्याख्या ही मी पहिलेल्या खुर्चींपैकीच असेल. मी जर चारंच पायांची खुर्ची पहिली असेल तर माझी व्याख्या ही तशीच बनेल.

तर खुर्चीची व्याख्या ही तीच्या दोन गुणांनुसार आपण अशी करू शकू.

दिसणे : -
१. अशी वस्तु जीच्यावर आप्ले बूड टेकवले अस्ता ती वस्तू ज्या लोकांसाठी (टार्गेटेड युजर्स ) बनवली गेली आहे त्यांचे पाय ती वस्तु ज्या सरफेसवर ठेवली आहे त्याच्यावर टेकु शकतील. (उंची हा गुणधर्म इथे मांडला आहे. अपवाद :- हौशी लोंक इथे वगळावेत , ते काहीही उंची ठेवू शकतात )
२.त्या वस्तुवर बूड टेकवले असता तुमची (टार्गेटेड युजर्सची) पाठ टेकू शकेल (पाठ टेकवता येउ शकेल अशी ती वस्तू बनवली असावी).
३.त्या वस्तुवर बूड टेकवले असता तुमचे (टार्गेटेड युजर्सची) हात व्यवस्थीत ठेवायला जागा असू शकेल.
४. त्या वस्तूचे वजन असे असावे की टार्गेटेड युजर्स त्याला सहज हलवु शकतील(लंगड्यासाठी बनवली असेल तर तीला चाके असावीत वगैरे..).
५. त्यावस्तुवर साधारण पणे १ टार्गेटेड युजर बसावा.
६. ही वस्तु अशा मटेरीअल पासून बनवली असावी की टार्गेटेड युजर्स ती विकत घेउ शकतील (सोन्याची सुद्धा बनवता येउ शकेल पण ती राजें सारख्या व्यक्तींसाठी असेल) .
७. ती वस्तू दिसायला (रंग, आकार) ठीक असावी (कमी ओबडधोबड असावी)

वापर :
१. ह्या वस्तूचा प्रमुख वापर बूड व पाठ टेकवण्यासाठी असावा.
२. ही वस्तु व्यवस्थीत टिकाउ असावी जेणेकरुन तीचा उपभोग बरेच दिवस व्हावा (टार्गेटेड युजर्स वापरू शकतील..)
३. तीच्यावर बसल्यावर (बूड टेकवल्यावर) आपण उभे राहुन आलेला शरीरावर्चा ताण कमी व व्हावा.

जी वस्तू वरील गुणदर्मात अधीक बसु शकेल तीला आपण आजच्या काळात खुर्ची म्हणु शकू.
सर्वचं गुण मिळत नसतील तर आपण तीला कमी अधीक प्रमाणात खुर्ची म्हणु.

उदा. उंट- ही वस्तू खुर्ची ह्या प्रकारात मोडत नाही (फारच कमी गुण मिळतात , वरील व्याख्येनुसार.उंची,आकार,प्रमूख वापर,किंमत इत्यादी मधे ही वस्तू योग्य बसत नाही)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

व्याख्या की वर्णन?

मुळात हा धागा खुर्चीची व्याख्या करण्याऐवजी, त्याच्या आधीची प्राथमिक पायरी म्हणून तिचा कोणी शोध लावला हे विचारण्यासाठी होता. ज्यांनी शोध लावला त्यांनाच व्याख्या विचारता येईल हे गृहितक होतं. पण तुम्ही थेट व्याख्येवरच उतरलात. ठीक आहे.

तुम्ही दिलेल्या अटी बऱ्यापैकी मर्यादा घालणाऱ्या आहेत. सहस्रबुद्धेंनी दिलेली व्याख्या अतिव्यापक होती तर ही व्याख्या खूपच जाचक वाटते.

- मुळात खुर्ची ही कोणीतरी कोणासाठीतरी बनवलेली वस्तू असं तुम्ही गृहित धरलेलं आहे. त्यात टार्गेटेड युजर आहे. हे गृहितक तितकंसं पटत नाही. कोणीही वापर करणार नसलं तरी खुर्ची असू शकते. आता एखाद्या चित्रात आपण खुर्ची बघतो. ती कोण वापरतं? पण तरी ती खुर्चीच असते.
- पाय खालच्याच पृष्ठभागाला टेकणे हे काहीसं ताणल्यासारखं वाटतं. आता लहान मुलांसाठी उंच खुर्च्या असतात. त्यात त्यांचे पाय जमिनीला टेकावेत याऐवजी त्यांचे हात टेबलापर्यंत पोचावेत अशी रचना असते. ती खुर्ची का नाही?
- काही खुर्च्यांना नसते जमिनीवर पाय टेकायची सोय. आता बारजवळ बसण्यासाठी खुर्च्या असतात. किंवा काही रेस्टॉरंट्समध्ये मी पाहिलेल्या आहेत (माझ्या घरापासून चालत पंधरा मिनिटांच्या अंतरात अशी दोन रेस्टॉरंट्स आहेत.) सामान्य माणसांचे पाय जमिनीवर टेकत नाहीत. पाय टेकवण्यासाठी त्या खुर्च्यांनाच दांडे असतात. त्या खुर्च्या नाहीत का?
- आरामखुर्चीत माणूस बसल्यावर पाय टेकेलच असं नाही. किंबहुना काहींना पाय जमिनीला समांतर ठेवण्याची सोय असते.
(पाय टेकण्याची अट उंट वगैरे गोष्टी निकालात काढण्यासाठी घातली असावी असं वाटतं - वरची इतकी उदाहरणं आहेत त्यामुळे मी ती रद्दबातल ठरवतो आहे)
- काही खुर्च्यांना पाठ टेकण्याची सोय नसते. टायपिस्ट्स साठी खुर्च्या डिझाइन केलेल्या मी पाहिल्या आहेत - त्यात फक्त बूड व नडगी टेकायला जागा असते.
- 'त्यावस्तुवर साधारण पणे १ टार्गेटेड युजर बसावा' हे तर काहीच कळलं नाही. ही बनवणाऱ्याची अपेक्षा आहे की नक्की काय? साधारणपणे १ म्हणजे नक्की किती? मी रॉकिंग चेअर्स बघितल्या आहेत. त्यावर आई व बाळ बसतं. मी विमानातल्या खुर्च्यांवरून माझ्या एक वर्षाच्या मुलाला मांडीवरून घेऊन गेलो आहे. आम्ही साधारण एक कसे काय? काही लोक इतके जाड असतात की त्याना विमानाच्या दोन खुर्च्या वापराव्या लागतात. ही पुन्हा सोफा निकालात काढण्याची क्लृप्ती वाटते.
- बरं व्याख्या जाचक असली तरी काही बाबतीत ती व्यापक आहेच. हॅमॉक किंवा एका माणसाच्या पलंगाला तुम्ही खुर्ची म्हणाल का? ते तुमच्या व्याख्येत व्यवस्थित बसतात (पाय टेकण्याच्या अटीशिवाय).

मला तर असा दाट संशय येतोय की तुम्ही ज्या खुर्च्या म्हणून म्हटलेल्या वस्तू पाहिल्या आहेत त्यांचं तुम्ही वर्णन केलेलं आहे - व्याख्या नव्हे. मला असंही वाटतं की तुम्हाला बसणं या क्रियेची व्याख्या खुर्ची ही संकल्पना न वापरता करावी लागेल. काहीसं भक्तिभावाची व्याख्या देव ही संकल्पना न वापरता करावी लागावी तसं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

खुर्ची - स्पष्टीकरण

व्याख्या म्हणजेच गुणधर्म सांगणे. एका वाक्यातच ती हवी अशी रीक्वायरमेंट आहे का ?

>>- मुळात खुर्ची ही कोणीतरी कोणासाठीतरी बनवलेली वस्तू असं तुम्ही गृहित धरलेलं आहे. त्यात टार्गेटेड युजर आहे. हे गृहितक तितकंसं पटत नाही. कोणीही वापर करणार नसलं तरी खुर्ची असू शकते. आता एखाद्या चित्रात आपण खुर्ची बघतो. ती कोण वापरतं? पण तरी ती खुर्चीच असते.

चित्रातील खुर्ची ही खरी खुर्ची नस्ते. आपण येथे खर्‍या (जिला भौतीक अपीअरन्स आहे) अशा खुर्चीबद्दल बोलत आहोत.
चित्रातील खुर्ची ही जर मोकळी असेल तर तर त्या मोमेंट ला कुणी वापरतही नसेल , खरी खुर्ची सुद्धा बर्‍याचदा रिकामी असते नाही का ?
चित्रात खुर्ची जरी रिकामी असेल तरीही त्यामागे एक टार्गेटेड युजर असावा.

- पाय खालच्याच पृष्ठभागाला टेकणे हे काहीसं ताणल्यासारखं वाटतं. आता लहान मुलांसाठी उंच खुर्च्या असतात. त्यात त्यांचे पाय जमिनीला टेकावेत याऐवजी त्यांचे हात टेबलापर्यंत पोचावेत अशी रचना असते. ती खुर्ची का नाही?

ती सुद्धा खुर्चीच आहे. पण १.कुठल्याही हॉटेल, घर , ऑफीस मधे अशा खुर्च्यांचे प्रमाण बाकींच्या खुर्च्यांच्या संख्येत किती असते ?
२. अशा खुर्च्यांचे बूड जर लहान मुलांच्या बुडाएवढे असेल तर तो टेबल मोठ्या माणसांसाठी बनवला गेला असुन फक्त लहान मुलांची सोय त्या
टेबलवर व्हावी म्हणुन ओरिजीनल खुर्ची मधे ते केलेले मॉडीफिकेशन असेल. तीही खुर्चीच पण मॉडीफाइड खुर्ची ! ती खुर्ची बाकी गुणधर्मांमधे व्यवस्थीत उतरत
असेल तर ती खुर्ची.

* इथे प्रत्येक ठीकाणी हे लक्शात घ्यावे की कुठलाही ओब्जेक्ट हा खुर्ची किंवा न-खुर्ची ह्यामधे मोडता येत नाही. तीला आपण "कित्तपत" खुर्ची म्हणु शकतो
हे आपण ठरवु शकतो.

- काही खुर्च्यांना नसते जमिनीवर पाय टेकायची सोय. आता बारजवळ बसण्यासाठी खुर्च्या असतात. किंवा काही रेस्टॉरंट्समध्ये मी पाहिलेल्या आहेत (माझ्या घरापासून चालत पंधरा मिनिटांच्या अंतरात अशी दोन रेस्टॉरंट्स आहेत.) सामान्य माणसांचे पाय जमिनीवर टेकत नाहीत. पाय टेकवण्यासाठी त्या खुर्च्यांनाच दांडे असतात. त्या खुर्च्या नाहीत का?

-- * इथे हे लक्शात घ्यावे की कुठलाही ओब्जेक्ट हा खुर्ची किंवा न-खुर्ची ह्यामधे मोडता येत नाही. तीला आपण "कित्तपत" खुर्ची म्हणु शकतो
हे आपण ठरवु शकतो.

>>आरामखुर्चीत माणूस बसल्यावर पाय टेकेलच असं नाही. किंबहुना काहींना पाय जमिनीला समांतर ठेवण्याची सोय असते.
१. ह्यात टार्गेटेड युजर हा "झोप्लेला माणुस" हा आहे(साधारणपणे जमीनीला समांतर झाल्यावर झोप ठीक येते (ग्रावीटीचे नियम..)) . २. ही एक प्रकारची मॉडीफाइड खुर्ची आहे.

>>काही खुर्च्यांना पाठ टेकण्याची सोय नसते. टायपिस्ट्स साठी खुर्च्या डिझाइन केलेल्या मी पाहिल्या आहेत - त्यात फक्त बूड व नडगी टेकायला जागा असते.

ही वस्तु जर खुर्चीचे बाकी गुण व्यवस्थीत पार पाडत असेल तर ती कमी अधीक प्रमाणात खुर्चीच आहे.

>>- 'त्यावस्तुवर साधारण पणे १ टार्गेटेड युजर बसावा' हे तर काहीच कळलं नाही. ही बनवणाऱ्याची अपेक्षा आहे की नक्की काय? साधारणपणे १ म्हणजे नक्की किती? मी रॉकिंग चेअर्स बघितल्या आहेत. त्यावर आई व बाळ बसतं. मी विमानातल्या खुर्च्यांवरून माझ्या एक वर्षाच्या मुलाला मांडीवरून घेऊन गेलो आहे. आम्ही साधारण एक कसे काय? काही लोक इतके जाड असतात की त्याना विमानाच्या दोन खुर्च्या वापराव्या लागतात. ही पुन्हा सोफा निकालात काढण्याची क्लृप्ती वाटते.

१ टार्गेटेड युजर म्हणजे एका माणसाचं बुड. तो माणुस आपल्या मांडीवर, डोक्यावर.. इ. जर कुणाला बसवून घेत असेल तरीही खुर्चीवर एकच माणुस बसलेला
अस्तो बाकीचे लोक हे त्याच्या मांडीवर बसालेले असतात.
विमाणाची खुर्चींचा टारगेटेड युजर हा जाड माणुस नसुन अवरेज युजर असतो. ( टारगेटेड युजर हा फार महत्वाचा मुद्दा आहे)

>>मला तर असा दाट संशय येतोय की तुम्ही ज्या खुर्च्या म्हणून म्हटलेल्या वस्तू पाहिल्या आहेत त्यांचं तुम्ही वर्णन केलेलं आहे - व्याख्या नव्हे. मला असंही वाटतं की तुम्हाला बसणं या क्रियेची व्याख्या खुर्ची ही संकल्पना न वापरता करावी लागेल. काहीसं भक्तिभावाची व्याख्या देव ही संकल्पना न वापरता करावी लागावी तसं.

व्याख्येत जेंव्हा तुम्ही "चार पाय असणारी.." असं म्हणता तेंव्हा तुम्ही तीचे वर्णनच केले असते . मी त्याना फक्त अनुक्रमाने दिले आहे एवढेच.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

सहमत

इथे हे लक्शात घ्यावे की कुठलाही ओब्जेक्ट हा खुर्ची किंवा न-खुर्ची ह्यामधे मोडता येत नाही. तीला आपण "कित्तपत" खुर्ची म्हणु शकतो हे आपण ठरवु शकतो.

हे आधीच लिहायचं ना, मग मी इतर फालतू तक्रारी केल्या नसत्या! या बाबतीत आपलं १००% एकमत. मी जे आक्षेप घेतले होते त्यात खुर्ची या वस्तुची व्याख्या करण्याऐवजी त्या संकल्पनेची व्याख्या आवश्यक आहे असं म्हणायचं होतं. मग त्या संकल्पनेचं प्रत्येक वस्तुमध्ये काही ना काही प्रमाणात अस्तित्व असू शकतं. काहींमध्ये ते ९०-९५ टक्क्यापेक्षा अधिक असतं - त्यांना बहुतेक सर्व जण खुर्ची म्हणतात. काहींमध्ये ते खूपच कमी असतं. एकदा हे तत्व मान्य केलं (तुम्हाला ते मान्य दिसतंय) की ती टक्केवारी कशी ठरवली जाते व खुर्ची म्हणण्यासाठी नक्की किती टक्केवारी असली पाहिजे हे तितकंसं महत्त्वाचं नाही. बाकीचे आक्षेप दुय्यम होतात. कारण खुर्ची केवळ उदाहरण म्हणून घेतली होती.

मला असं वाटतं की प्रत्येक वस्तू ही सर्व संकल्पनांच्या लिनियर कॉंबिनेशनने बनलेली असते. (मुळात काही संकल्पना इतर संकल्पनांच्या लिनियर कॉंबिनेशन असू शकतात) त्या वस्तूच्या वर्णनासाठी जो शब्द वापरला जातो तो एक अॅप्रॉक्झिमेशन असतो. गुणधर्मांच्या अवकाशातल्या काही भागाला आत घेणारा व उरलेला भाग बाहेर ठेवणारा एक खोका. या खोक्याची लांबी-रुंदी किंवा व्याप्ती खरं तर, प्रत्येकासाठी वेगळी असते. त्यामुळे नक्की मर्यादा कुठे आहे याबद्दल (या लेखात झाले तसे) वाद होऊ शकतात, घालता येतात.

वर्तुळ या संकल्पनेची व्याख्या करणं सोपं आहे. पण खुर्ची किंवा देव यांची व्याख्या करणं कठीण आहे. इतर अनेक संकल्पनांचा त्यांमध्ये थोडा थोडा अंश आहे.

मुळात 'कोणी शोध लावला' हा प्रश्नदेखील मग थोडा दुय्यम होतो. एखादी संकल्पना काळी पांढरी मानली - काल नव्हती, आज आहे - तर त्याबाबतीत शोध लावण्याबद्दल विचार करता येतो. मात्र आदीम काळापासून खुर्ची संकल्पनेशी थोडं थोडं साधर्म्य दाखवणाऱ्या वस्तू असल्या तर आताचं खुर्चीचं अस्तित्व आणि विविधता ही उत्क्रांतीतून येते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उद्देश

हे नक्की कोणत्या धाग्याचे विडंबन होते? देव कोणी निर्माण केला? का केला? या धाग्याचे विडंबन वाटले परंतु बहुतेक सर्व चर्चा 'खुर्चीची व्याख्या' या विषयाभोवतीच घुटमळते आहे. त्यामुळे त्यात देवाची व्याख्या या धाग्यावर टीका केली जात असल्याचा भास होतो आहे. (की, "देवाची व्याख्या अवघड/अशक्य आहे म्हणून ती न मागताच चर्चा करावी/चर्चाच करू नये" हेच प्रतिपादन करायचे आहे?)

उद्देश

हे नक्की कोणत्या धाग्याचे विडंबन होते? देव कोणी निर्माण केला? का केला? या धाग्याचे विडंबन वाटले

हो. त्याच धाग्याचं विडंबन होतं. पण उद्देश - संकल्पना, त्यांचा शोध लावणे, व त्यांच्या व्याख्या करणे - म्हणजे नक्की काय याबाबत चर्चा करण्याचा होता.

व्याख्या नसेल तर चर्चाच नाही, किंवा व्याख्येच्या अभावीच (म्हणजे परस्परांना त्या संकल्पनेविषयी काहीच सहमती नसताना) चर्चा असे काळे-पांढरे पर्याय मी मानत नाही. स्पष्ट व्याख्या न करता (किंवा व्याख्या स्पष्ट न करता) आपण खुर्चीविषयी, टीकेविषयी किंवा विडंबनाविषयीही बोलू शकतोच की.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

असहमत

स्पष्ट व्याख्या न करता (किंवा व्याख्या स्पष्ट न करता) आपण खुर्चीविषयी, टीकेविषयी किंवा विडंबनाविषयीही बोलू शकतोच की.

आधी, व्याख्येची व्याख्या सांगा. :)
चर्चा नेमकी कोणत्या संकल्पनेविषयी आहे तेच नक्की केले नाही तर चर्चा शक्यच नाही. "नक्की करणे म्हणजेच व्याख्या ठरविणे" असा अर्थ मी वापरतो आहे. ही व्याख्या तात्पुरती असू शकते आणि चर्चेसोबत तिला बदलण्याची आवश्यकता असू शकते. वर्णनात्मक व्याख्येऐवजी यादीत्मक व्याख्याही स्वीकारली जाऊ शकते.
उदाहरणार्थ, "राजकारण्यांची खुर्चीलोलुपता" हा चर्चाविषय अनेक संस्थळांवरील एक आवडीचा विषय आहे. तेथे सहभागी सदस्यांचे, खुर्ची या संकल्पनेविषयी एकमत असते, ती व्याख्या त्या चर्चेपुरती मर्यादित असते. कामचलावू का होईना, व्याख्या आवश्यकच असते.

व्याख्या

आधी, व्याख्येची व्याख्या सांगा. :)

Definition being nothing but making another understand by words what the term defined stands for. --Locke.
[1913 Webster]

किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ शक्य तेवढ्या सोप्या व संक्षिप्त शब्दांत (रुपात) समजावून सांगणे, म्हणजेदेखील व्याख्या असे आपण म्हणू शकतो. पण ही अशी अर्थपूर्ण व्याख्या अवतरण्यासाठी किंवा लोकांनी (सर्व नसले तरी चालतील) तीला मान्यता देण्यासाठी तीच्या जडणघडणीच्या काळात सर्व बाबींवर: मुख्यतः ज्या गोष्टीची व्याख्या तयार करण्याचे काम चालू आहे—त्या गोष्टीचा ज्ञात इतिहास, शी संबंधित ऐतिहासिक व आजतागयत(?) श्राद्धिक तथा अंधश्राद्धिक पैलू, विज्ञानातील संकल्पनांचा आधार व मेळ, कोणत्या भाषेत व्याख्या हवी आहे किंवा इतर भाषांमध्ये आधीपासुनच उपलब्ध असलेल्या व्याख्येशी सहमतता/असहमतता, विविध संदर्भ, गोष्टीचे इत्यंभूत वर्णन—ज्याआधारे ती गोष्ट मनातल्या-मनात पुर्वज्ञात-ज्ञानाच्या आधारे (किंवा एखादेवेळी नसले तरी हरकत नसावी) कल्पिता येऊ शकेल; अशा आणि यासारख्या मुद्द्यांवर समाजातील तत्सम् गोष्टीबद्दल अधिक ज्ञान असणार्‍यांमध्ये वेळोवेळी चर्चा व तोवर केलेल्या सर्व चर्चेच्या निकषांचा व निष्कर्षांचा आणि त्यांतून गोष्टीच्या व्याख्येसाठी शक्य तितका पाठपुरवठा होऊन ती व्याख्या अवतरु शकेल काय व तीतून तत्सम् गोष्ट प्रेरित होईल की नाही, याविषयी किमान बोलणे होणे तरी आवश्यक असते, जेणेकरुन व्याख्या अवतरल्यानंतर म्हणजेच एकूणच ती बनण्यासाठी ज्यांनी खूप कष्ट घेतले, त्यांचे मन जेव्हा तृप्त होते; तेव्हा जनमानसात व्याख्येला फारसा प्रतिकार सहन करावा लागत नाही.

देवाची वा खुर्चीची व्याख्या मला काहीअर्थी पटलेल्या व कित्येक दिवसांपासून ज्यांसंबंधात चर्चा चालू आहे, अशा गोष्टींचा व्याख्या:

देवाची व्याख्या:
A being conceived of as possessing supernatural power, and to be propitiated by sacrifice, worship, etc.; a spirit; a divinity; a deity; an object of worship; an idol.
[1913 Webster]

खुर्चीची व्याख्या:

बसण्यासाठी/बुड टेकण्यासाठी जी मुलतः वापरली जाते, अशी गोष्ट किंवा आसन या शब्दाची समानार्थी प्रतिकृती (वाक्य-संदर्भ: आसनस्थ होणे).
या गोष्टीची व्याप्ती जरा मोठी आहे, त्यासाठी मला खुर्चीसदृश्य विविध प्रकारांचे वर्णन, प्रकाशचित्रे तथा त्यांचा इतिहास माहिती करुन तुम्हाला सांगावा लागेल. मी घरात जीवर बसतो ती खुर्ची; बसमध्ये ज्यावर मी नेहमी बसतो ती खुर्ची; कॉलीजमध्ये मॅऽमच्या केबिनमध्ये मॅ‍ऽम जीवर बसतात ती आरामदायी नरम लादी असलेली खुर्ची, ऑफिसातील वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या, दवाखान्यांत पहायला मिळतात, त्या बाकासारख्या दिसणार्‍य़ा खुर्च्या इत्यादी इत्यादी...

काही मजकूर संपादित. प्रतिसाद देताना व्यक्तिगत रोखाची वाक्ये टाळावीत.

कोणाला उद्देशून?

हा प्रतिसाद कोणत्या प्रतिसादाला उद्देशून आहे?
"व्याख्या नसेल तर चर्चाच नाही" या मताला विरोध नसेल तर हा प्रतिसाद अनावश्यक आहे. विरोध असेल तर हा प्रतिसाद गैरलागू आहे.

मजकूर संपादित. प्रतिसाद देताना सार्वजनिक शिष्टाचारांत न बसणारे शब्द वापरू नयेत.

माझे मत

@विशाल.तेलंग्रे - मूळ धागा हा खुर्ची कोणी निर्माण केली? का केली? असा होता, त्यामध्ये तर्कदृष्ट्या खुर्चीच्या व्याख्येवर चर्चा होणे अनपेक्षित आहे. त्यामुळे हे अवांतर आहे, तरीदेखील अशाप्रकारच्या चर्चा होऊच नये अशी काही सोय नाही/नसावी.देवाची व्याख्या तर खूपच अवांतर आहे.

@ रिकामटेकडा - माझ्यामते हि चर्चा देवाची व्याख्या ह्या वळणाने गेली हे देवाची व्याख्या ह्या धाग्याचे यश आहे असे म्हणावे लागेल. उपक्रमी व्याख्येशिवाय चर्चा करण्यास तयार नाहीत हे एकार्थी उत्तमच आहे. त्याचे विडंबन होणे हा स्वघोषित बुद्धिवादी लोकांचा आवडता छंद आहे, तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे किवा त्यास विडंबनकार हि पदवी देऊन त्यांचा गौरव करणे हे 'उचित'. (हे माझे मत)

स्वघोषित बुद्धिवादी कोण आहेत?

अन्य लोकांना "बुद्धिवादी" म्हणून "हे लोक अहंमन्य आणि खरे तर मूर्ख आहेत" असे ध्वनित करण्याची पद्धत मराठी संकेतस्थळांवर सामान्य आहे.

त्यामुळे "बुद्धिवादी" ही "अहंमन्य मूर्ख" या नव्या अर्थाची शिवी आहे हे तर आता सगळ्यांनाच ठाऊक आहे.

असे असताना स्वतःला शिवी देणारे कोण लोक आहेत? अजूनकोणमी हे "स्वयंघोषित" म्हणतात तर कुतूहल वाटले. नावे न सांगता ज्या ठिकाणी स्वयंघोषणा झाली आहे, त्या ठिकाणचा दुवा दिला तरी चालेल.

नाहीतर अजूनकोणीमी यांनी "तुच्छतेच्या हेतूने काही लोकांची यादी बनवली आहे" असे प्रतिभेचे श्रेय स्वीकारावे.

 
^ वर