हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी भाग २ - गांधीजींची हत्या नेहरूंनी केली?

पाळलेला राक्षस ऊर्फ पारा यांनी सुरू केलेल्या चर्चेचा दुसरा भाग

मिसळपाव संकेतस्थळावर नथुरामप्रेमींची एक चर्चा वाचनात आली. ती चर्चा वाचून वाटले की हलक्या मनोवृत्तीचे नथुरामप्रेमी आजही राजरोस नथुरामप्रेमाचे गोडवे गात असतात.

नथुराम मराठी नसता, ब्राह्मण नसता तर असे गोडवे या लोकांनी गायले असते का? असे गोडवे गाण्यामागे कोणती कारणे असावीत? या लोकांना काय सिद्ध करायचे आहे?

माझी पुस्ती...

शेखर गुप्ता यांनी एप्रिल २००५ मध्ये तत्कालीन सरसंघचालक कुप्पहळ्ळी सुदर्शन यांच्याशी केलेल्या चर्चेत , श्री श्री सुदर्शन यांनी असा आरोप केला आहे की गांधीजींना मारणारा नथुराम नव्हताच. ते अश्लाघ्य कृत्य नेहरू यांचे होते.

वाचा आणि मनसोक्त हसा.

दुवा

Comments

संभावना शास्त्रानुसार...

अगदीच नाही तरी, संभावना शास्त्रानुसार असे घडण्याची शक्यता/संभावना आहेच कि! :)

अवांतर -

Schrödinger(!!!) च्या अनुसार प्रत्येक क्षणाला जंगलातला सिंह पकडण्याची संभावना हि नॉन-झिरो आहे, पिंजरा लावा आणि वाट पहा सिंह स्वतः पिंजऱ्यात येईल.

असू शकते

अगदीच नाही तरी, संभावना शास्त्रानुसार असे घडण्याची शक्यता/संभावना आहेच कि! :)

चर्चेच्या प्रस्तावात मांडण्यात आलेला मुद्दा—"मोहन गांधींची हत्या तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री जवाहर नेहरु यांनी केली" हा जरी लोकापवादामुळे काही लोकांमध्ये रोषाची भावना निर्माण करु शकत असला तरी ही संभावना असु शकते. इतिहासातील उदाहरण पाहिले तर यावरुन या संभावनेला पाठबळ मिळते.

काही इतिहासकालीन उदाहरणे:

  • छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांच्याच विश्वासातल्या काहीजणांकडून जीवे-मारण्याचे प्रयत्न करण्यात आले होते
  • उत्तर भारतातील मोगल साम्राज्याचा बादशहा शहाजहाँ त्याची बेगम मुमताज हिला—यांना त्यांच्याच पोराने—औरंगजेबने मारले
  • नात्सी पक्षात प्रणेता आणि जर्मनीचा तत्कालीन फ्युऽरर, अॅडॉल्फ हिटलर यालादेखील सुमारे १७-१८ जीवे-मारण्याचा हल्ल्यांशी दोन-हात करावे लागले, त्याचे विश्वासूच यांमध्ये जास्त होते; कोलेनल(कर्नल?) स्टाफनबर्गचा अपवाद वगळता!
  • दुसर्‍या महायुद्धात फ्रान्सची बाजू लढवून ठेवणारा व नंतर माजलेली अराजकता नाहिशी करण्यासाठी एक प्रकारे हुकुमशाही मार्गानेच सत्ता बळकावून राष्ट्रपती बनलेल्या रोमेल द गॉलला देखील त्याच्याच विश्वासातील लोकांकडून जीवे-मारण्याच्या हल्ल्यांचा मरेपर्यंत सामना करावा लागला
  • प्रमोद महाजन यांची प्रविण महाजन यांच्याकडून हत्या (?) आणि नंतर प्रविण यांचादेखील गूढमयरीत्या मृत्यू (?)
  • इत्यादी इत्यादी

याव्यतिरिक्तही राजकीय व इतर घटनांमधील घडलेली अनेक उदाहरणे तुम्हाला आठवतील, ज्यामुळे प्रस्तुत संभावनेला अधिक पाठबळ मिळते किंवा तसा विचार मनात डोकावू शकतो. भारतामध्ये जे लोक काँग्रेसद्वेष्टे, काँग्रेसची विचारसरणी व कार्यप्रणालीचे द्वेष्टे, लोकशाहीद्वेष्टे, गांधीद्वेष्टे आहेत, त्यांना ह्या बाबी पटू शकतील, पण जे याउलटपक्षाशी संबंधित असतील किंवा -ला मानणारे असतील त्यांना ही संभावना क्षुद्र वाटेल व गांधी, नेहरु यांची मानहानी झाली आहे, असे मनोमन वाटून घेऊन अततायीपणे ते कुठल्याही थरापर्यंत पोहोचू शकतील.

मुळात—मोहन गांधींना नथुराम गोडसे करवी जवाहर नेहरुंनी ठार केले तसेच इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना सोनिया गांधी यांनी मारले, मोहम्मद जिन्नाची पाठराखण करता याअर्थी अडवाणी यांचे पाकिस्तानशी नाते असावे, इत्यादी इत्यादी असे अनेक विचार कित्येकांच्या मनात घोळत असतात. मनाची विषयाला तर्कसंगत-विश्लेषण करण्याची अनैश्चिक वृत्ती यामागे असते. जरी या बाबींना सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसले तरी असे आपण का म्हणू शकतो—कारण, राजकीय वृत्ती, धोका जाणवला की सत्ता जाईल ही भिती, सत्तेची लालसा, नाते/हित-संबंधांतील कटूता, मानसिक त्रास, मनोरुग्नता इत्यादी इत्यादी अनेक कारणे यासाठी आपण गृहीत धरु शकतो.

मी भारतवर्षातील एक सामान्य संविधानिक मान्यता असलेला नागरिक आहे, भारतातील कुठलाच पक्ष वा त्याची विचारसरणी वा त्याची कार्यप्रणाली मला पटत नाही किंवा मी त्यामुळे प्रभावित झालेलो असलो तरी त्याचा पुरस्कर्ता नाही आणि त्याचा अवलंब देखील करत नाही.

काही दिवसांपुर्वी हजामत करण्याच्या दूकानात (केश-कर्तनालय) असाच एक किस्सा कानी पडला होता. माझ्याशेजारी बसलेला काँग्रेसी मनोवृत्ती असलेला माणूस होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) काही लोक तेथे आले अन् त्यांनी बोलायला सुरुवात केली,
"आम्ही येथे सांस्कृतिक (?) अनुष्ठान करीत आहोत. आम्ही सुमारे १५० स्वयंसेवक आपल्या नगरात दाखल झालेलो आहोत. आम्ही हवे तर ऑर्डर देऊन हॉटेलातून जेवन मागवून घेऊ शकतो पण प्रत्येक भारतीयाच्या घरच्या पोळीचा एक घास तरी खाल्लेला आहे, ही जाणीव स्मरणात राहावी यासाठी आम्ही तुम्हा सर्व सोसायटीजनांना आवाहन करतो की आम्हाला २-३ दिवसांसाठी प्रत्येक घरातून किमान ५ पोळ्या, सकाळ-संध्याकाळ स्वेच्छेने बनवून द्याव्यात."
या त्यांच्या बोलण्यावर दूकानात असणार्‍या सोसायटीतील काहींनी त्यांच्या अडचणी, दिवाळी पिरेड, नोकरी, पाहुणे इत्यादी गोष्टी त्यांना ऐकवल्या. पण माझ्याशेजारी बसलेला "तो" माणूस म्हणाला,
"अरे तुम्हाला दुसरी काही कामं नाहीत काय?" कसलं काय नि कसलं काय, सगळं काय सत्तेसाठी आहे, हे माहितीये मला... आपण येऊ शकता आता, आमच्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा करु नका!"

येथे रिटे

येथे रिटे यांचे वाक्य आठवते.

"मन इतके खुले असू नये की मेंदू बाहेर सांडून जाईल"

पण गोडसे हा नेहरूंचा हस्तक होता ही कल्पना शोल्लेट आहे. अजून एक शक्यता पण असू शकेल. सावरकर, पटेल आणि नेहरूंनी मिळून नथुरामकरवी हत्या घडवली. पोलीसांनी सावरकरांना पकडले देखील पण सावरकर नेहरूंचे नाव सांगतील म्हणून मग सावरकरांना सोडून देण्यात आले. =))
नाहीतरी खुनाच्या कटाची माहिती मिळूनही पटेल गाफील राहिले असा आरोप लोहिया वगैरे करतच असत.
(अवांतर : विषय लिहिणे अनिवार्य असल्याची अटही माफ झालेली दिसते). :-)

नितिन थत्ते

पाश्चात्यांचं अंधानुकरण

अमेरिकेत असले कॉन्स्पिरसी थीयरीचे प्रवाद पंचेचाळीस वर्षांपूर्वीच झाले होते. माजी सरसंघचालकांकडून असलं पाश्चात्यांचं अंधानुकरण व्हावं हे आश्चर्याचं वाटलं. तेही इतक्या उशीरा! भारतातले विचारवंत निदान पाचदहा वर्षांत अमेरिकेतले विचार भारतात इंपोर्ट करतात. ताजा माल तरी मिळतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शब्दांची सुदर्शन चक्रे

हे सुदर्शन शब्दांची सुदर्शन चक्रे फेकण्यात पटाईत दिसतात! मागे हिंदूंनी आपले प्रजनन वाढवावे असा सल्ला त्यांनी दिला होता. परवा सोनिया गांधींबद्दलदेखिल काहीसे बडबडले!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

:)

खॉखॉखॉ .. खॉखॉखॉ ... हसत नाहिये ... हसण्या आधीच खोकला लागला :)

- (ह*र्‍या मनोवृत्तीचा प्रतिसादप्रेमी ) टारझन

सेनाइल सुदर्शन

सेनाइल सुदर्शन. दुसरे काय. पण सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत पशुवैद्य आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर