नामस्मरणाय नमः

मिसळपाव या संकेतस्थळावरील एका चर्चेतून साभारः

प्रत्येक व्यक्तीमध्ये नीर्मीतीची शक्ती कमी जास्त प्रमाणात जागृत असते. Also it is given only as much to be used. लेखक चित्रकार हे कलाकृती नीर्मीतीमध्ये या शक्तीचा सतत व्यय करत असतात. ही शक्ती भरून येणे हे खूप महत्वाचे असते. अन्यथा "burnt out" स्टेज येऊ शकते.
ही शक्ती हळूहळू भरून कढता येते. नामस्मरण, स्तोत्र पारायण आदि उपाय करून मानसिक बळ पूर्ववत "replenish" करता येऊ शकतं.

शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष केले तर मला पडलेला प्रश्न असा
"नामस्मरण, स्तोत्रपठण आदि उपायांमुळे मानसिक बळ पूर्णपणे भरून काढता येते का? "

जाणकार उपक्रमींच्या मतांच्या प्रतीक्षेत.

Comments

आमंत्रित करा

ज्यांचा उल्लेख करून ही चर्चा सुरू केली आहे त्यांना कृपया उपक्रमावर आमंत्रित करा तरच चर्चेला रंगत येईल कारण विधान करणार्‍या बाईंचे स्पष्टीकरण महत्त्वाचे आहे.

मी त्यांना पूर्वी आमंत्रित केले होते असे वाटते पण त्यांनी मनावर घेतलेले नाही. असो. चर्चेला १०० प्रतिसाद येतील असा आशीर्वाद देते. ;-)

आमंत्रणाच्या अक्षता कुठे देता येतील?

शुचिताईंना आमंत्रणाच्या अक्षता कुठे देता येतील?

मिपावर

मिसळपावावरच देता येतील की खरड किंवा निरोपांतून.

अवांतरः
माझ्या मते, काही चर्चा इथे अधिक चांगल्या रितीने होऊ शकतात पण त्यासाठी ज्यांच्या संदर्भाने ही चर्चा सुरू झाली आहे त्यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न करायला हवा किंवा अशा चर्चा तिथेच सुरु करायला हव्यात. (? :-( ) मध्यंतरी शरद यांनी तेथे टाकलेली चर्चाही येथे येऊन करण्याविषयी मी त्यांना सुचवले होते पण लोक मनावर घेत नाहीत. त्यांनी तसे केले तर चर्चा साधक बाधक होतील कारण दोन्ही पक्षांना आपली मते मांडता येतील.

आम्हाला पावर नाय

मिपावरच्या माझ्या आयडीला खरड किंवा व्यनि पाठवायची पावर नाय. इथेच शुचि शुचि असे नामस्मरण केले तर त्याची भरपाई होईल का?

नामस्मरण

इथेच शुचि शुचि असे नामस्मरण केले तर त्याची भरपाई होईल का?

हाहाहाहा! करा करा. नामस्मरणाचा खराच फायदा होतो का ते तरी तपासून पाहता येतील.

खुलासा

तुमचा मिपावरचा आयडी काय ते तुम्ही दिलेले नाही आणि तुमच्या प्रतिसादाचे उथळ वाचन केल्यास इतरांचा गैरसमज होऊ शकेल म्हणून नमूद करतो की: वरील प्रतिसाद देणारे 'प्रेषक' यांचा उपक्रमवरील जुना आयडी 'टाईमपास' होता आणि मिपावरील 'प्रेषक' हा आयडी माझा होता.

आयडी बदलला आहे

गैरसमज होऊ नये म्हणून मी आता आयडी बदलला आहे.

अंधश्रद्धा प्रचार आणि प्रसार समिती

या चर्चेत मिसळपाव वर बरेच लेखन करणार्‍या एका महिलेच्या लेखांचा संदर्भ आला आहे. या महिला मिसळपाववर धार्मिक विषयांच्यावर लिहित असतात. त्यांच्या लेखनात अनेक उत्तम व विचार करायला लावणारे मुद्दे मला सापडले आहेत. तरीही त्यांचे लेखन हे सर्व साधारणपणे अंद्धश्रद्धा प्रचार व प्रसार समितीचे कार्य असावे असे राहून राहून वाटत राहते. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते का? वगैरे प्रश्न त्या चर्चेसाठी घेत असतात. या ठिकाणी त्यांच्या नामस्मरणाबद्दलच्या लेखनाचा संदर्भ आला आहे.
त्यानी म्हटल्याप्रमाणे
प्रत्येक व्यक्तीमध्ये नीर्मीतीची शक्ती कमी जास्त प्रमाणात जागृत असते. Also it is given only as much to be used. लेखक चित्रकार हे कलाकृती नीर्मीतीमध्ये या शक्तीचा सतत व्यय करत असतात. ही शक्ती भरून येणे हे खूप महत्वाचे असते. अन्यथा "burnt out" स्टेज येऊ शकते.

या विधानांच्या बद्दल शुद्धलेखन सोडले तर बाकी आक्षेप घेण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. कोणत्याही सृजनशील व्यक्तीबद्दल असे म्हणता येईल. यासाठी त्यांनी जो नामस्मरणाचा उपाय सुचवला आहे तो ही काही अंशाने योग्यच म्हणता ये ईल. परंतु या मागची कारणे काही निराळीच आहेत असे वाटते. या उपायामधून दोन चांगल्या गोष्टी अनुभवता येतात. एक तर स्मरणशक्तीला ताण दिल्यामुळे ती उजळून निघते व दुसरे म्हणजे या स्मरणावर लक्ष केंद्रित केले गेल्याने मनातील बाकी ताण तणाव पार निघून जातात.आता हे करण्यासाठी या स्मरणाला धार्मिक रंग देण्याची काहीही गरज आहे असे मला वाटत नाही. तुम्ही बरॅक ओबामा असे म्हणत राहिलात तरी तोच फायदा तुम्हाला होईल असे वाटते. यासाठी स्तोत्राच्याच पारायणाची आवश्यकता नाही कोणतेही काव्य मग ते अगदी स्वैराचाराचा पुरस्कार करणारे असले तरी, किंवा दुसर्‍या धर्मातील पुस्तके किंवा काव्य असले तरी या सर्वांचा तितकाच उत्तम फायदा त्या मनुष्याला होईल असे मला वाटते.

या लेखिकेने आपल्या लेखनातील धार्मिकता व अंधश्रद्धा यांचे मूलाधार काढून टाकले तर त्या खूपच वाचनीय व विचार करण्यासारखे लिहू शकतील असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

फोलपटे

या लेखिकेने आपल्या लेखनातील धार्मिकता व अंधश्रद्धा यांचे मूलाधार काढून टाकले तर त्या खूपच वाचनीय व विचार करण्यासारखे लिहू शकतील असे वाटते.

धार्मिकता व अंधश्रद्धा यांचे मूलाधार काढून टाकले तर त्यांच्या लेखनात काही राहील की नाही याची शंका वाटते.

अंप्रप्रस

अंधश्रद्धा प्रचार आणि प्रसार समिती हे नाव आवडले. चंद्रशेखर यांच्या प्रतिसादाशी बहुतांशी सहमत आहे.

एक तर स्मरणशक्तीला ताण दिल्यामुळे ती उजळून निघते व दुसरे म्हणजे या स्मरणावर लक्ष केंद्रित केले गेल्याने मनातील बाकी ताण तणाव पार निघून जातात.

स्मरणशक्तीला ताण दिल्याने ती उजळून निघते हे वाक्य खरे असले तरी ते नामस्मरणाने किंवा एकच गोष्ट घोळवल्याने कसे होऊ शकेल हे कळत नाही. म्हणजे कोणत्यातरी गुरुनामाचा जप केला तर गणित/ विज्ञान वगैरे विषयांतली स्मरणशक्ती वाढेल असे वाटत नाही. वाक्यातल्या दुसर्‍या भागाशी सहमती आहे. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित झाले की इतर गोष्टींचा विसर पडतो. तर मग ही तल्लीनता वाचन, संगीत, चित्रपट वगैरेंतूनही मिळू शकेल ना.

या लेखिकेने आपल्या लेखनातील धार्मिकता व अंधश्रद्धा यांचे मूलाधार काढून टाकले तर त्या खूपच वाचनीय व विचार करण्यासारखे लिहू शकतील असे वाटते.

त्यांनी कथा लिहून पाहावी असे त्यांना सुचवून झाले आहे पण अंप्रप्रसच्या कामातून उसंत नसावी.

बाकी, चंद्रशेखर उपक्रमावर पुन्हा लिहू लागले त्याबद्दल अभिनंदन!

नामस्मरण आणि स्मरणशक्ती

नामस्मरणाने स्मरण शक्ती उजळत नाही ती स्तोत्र किंवा स्मरणातील कोणत्यातरी काव्याचे पठण करण्याने वाढते. नाम स्मरणाने (कोणत्याही,बायकोचे नावही चालेल, फक्त धार्मिकच विषयाचे पाहिजे असे नाही) लक्ष दुसरीकडे केंद्रित हो ऊन आयुष्य़ातील इतर ताण तणाव कमी होतात असे मला म्हणायचे होते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

डाव्या शेपटीच्या

उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते का? वगैरे प्रश्न त्या चर्चेसाठी घेत असतात.
तिथे काही जण डाव्या शेपटीच्या मारुतीचे सोवळे किती कडक् असते याचीही चर्चा करत् असतात्.

'गण गण गणात बोते'चे पारायण

ही शक्ती हळूहळू भरून कढता येते. नामस्मरण, स्तोत्र पारायण आदि उपाय करून मानसिक बळ पूर्ववत "replenish" करता येऊ शकतं.

चर्चेचा विषय अतिशय चांगला आहे. आदरणीय यनावाला आणि शरदकाकांचे विचार जाणून घ्यावेसे वाटत आहे. तूर्तास आम्ही आमचे एक मित्र 'गण गण गणात बोते'चे पारायण करीत आहेत अशी कल्पना करीत आहोत. आलोच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पृच्छा

नामस्मरण आणि त्यामुळे मिळणारे फायदे ह्या विषयाचा मी पुर्ण समर्थक आहे. त्यामुळे, काही प्रश्न ह्या विषयासंबंधी असल्यास पृच्छा करावी.

कोणते फायदे?

फायदे कोणते ते तर सांगा.

अनेक फायदे- त्यातील काही

अनेक फायदे आहेत-
१. वेळ चांगला जातो. मनात काहीबाही विचार न येता, इश्वरासंबंधीचे पवित्र विचार निर्माण होतात व एक चांगली / निरुपद्रवी व्यक्ति समाजात घडते.
२. मंत्र, नाम, ऋचा ह्यात एक नादब्रम्ह असतो, ज्याने विशिष्ठ्य अशा लहरी निर्माण होऊन त्याच्या कंपनांनी मेंदूच्या ठराविक भागांत एक उर्जा निर्माण होते, जी सहाय्यकारी असते
३. नामस्मरणामुळे इश्वराच्या चांगल्या गुणांची मनात उजळणी होत राहते. चांगले गुण कोणते व वाईट कोणते हे ठरवता येणे हे ही आवश्यकच असते. रोलमॉडेल आवश्यक असतो; तो मिळतो.
४. ह्या विश्वाच्या पसा-यात आपण एकटे नसुन आपल्यामागे कोणीतरी दैवीशक्ति आहे ह्याची जाणीव होत राहते व ते मनाच्या आरोग्याला आवश्यक असते
५. इश्वर, नाम, ग्रंथसाहित्य, पुजा-अर्चा, देवळं, सगळं-सगळं-सगळं ह्यामागे जे अर्थकारण असते त्यावर जगणा-या व्यक्तिंना रोजगार मिळतो.

नारायण! नारायण!!

खालची गोष्ट सहज आठवली. तुमच्या विधानांशी डायरेक्ट संबंध नसेल बहुधा.

नारदाची एक गोष्ट इथे आठवली. नारदाला आपणच विष्णूचे सर्वश्रेष्ठ भक्त असल्याचा गर्व झाला होता. तो सतत तोंडाने नारायण-नारायण असा जप करत असे. कितीही कामे असोत, संकटे येवोत मी विष्णूनामाचा जप सोडत नाही अशा वल्गना करू लागला. त्याच्या बेगडीपणाला सर्व कंटाळले होते. अगदी विष्णूही. त्याने मग एकदा एक तुपाने काठोकाठ भरलेले पातेले नारदाला दिले आणि सांगितले यातला एकही थेंब न सांडता पृथ्वीपर्यंत घेऊन जा आणि माझे जे प्रिय भक्त आहेत त्यांच्यात शेवटचा थेंब संपेपर्यंत हे तूप वाट. हे तू करू शकलास तरच तू माझा सर्वोत्तम शिष्य. नारदाने पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि तो तुपाचे भांडे घेऊन पृथ्वीच्या रोखाने निघाला, तोंडाने अखंड नारायण-नारायण हा जप सुरू होता पण काम इतके सोपे नव्हते. तूप डुचमळायला लागले. कसाबसा पृथ्वीवर पोहोचला तर ते तूप वाटता वाटता जीव नकोसा झाला आणि हे सर्व करण्यात नारद नारायणाचा जप विसरला.

परत आल्यावर विष्णूला म्हणाला "बघा मी तुमचा सर्वोत्तम शिष्य आहे. मी तूप न सांडवता पृथ्वीवर नेले आणि वाटले." विष्णूने विचारले "पण तू माझे नाव घ्यायचे कसे विसरलास? तू तर म्हणायचास की कितीही संकटे येवोत, व्यग्रता असो माझ्या मुखातून विष्णूनामाचा जप सतत सुरू असतो. त्याचे काय झाले?" नारद खजील झाला तेव्हा विष्णूने सांगितले - "एकावेळी माणूस एकच काम उत्तम रित्या करू शकतो. जो लक्षपूर्वक आपले काम उरकत असतो त्याला तोंडाने माझा जप करण्याची गरज नाही." :-)

असो. कथा सहजच आठवली असे वर दिले आहेच.

अवांतरः

घासकडवींनी मिसळपावावर विड्या एक फुंकणे असा लेख लिहिला होता. मला नवीन सुचले आहे - काड्या एक लावणे. ;-)

छ्या

१. वेळ चांगला जातो. मनात काहीबाही विचार न येता, इश्वरासंबंधीचे पवित्र विचार निर्माण होतात व एक चांगली / निरुपद्रवी व्यक्ति समाजात घडते.

ईश्वरासंबंधीचे विचार पवित्र असतात हा दावा निराधार आहे.
व्यक्ती चांगली/निरुपद्रवी बनते हा दावा निराधार आहे.
व्यक्ती चांगली/निरुपद्रवी बनणे हा कदाचित समाजाचा फायदा असू शकतो पण त्यात व्यक्तीचा तोटाच आहे ;)

२. मंत्र, नाम, ऋचा ह्यात एक नादब्रम्ह असतो, ज्याने विशिष्ठ्य अशा लहरी निर्माण होऊन त्याच्या कंपनांनी मेंदूच्या ठराविक भागांत एक उर्जा निर्माण होते, जी सहाय्यकारी असते

निराधार.

३. नामस्मरणामुळे इश्वराच्या चांगल्या गुणांची मनात उजळणी होत राहते. चांगले गुण कोणते व वाईट कोणते हे ठरवता येणे हे ही आवश्यकच असते. रोलमॉडेल आवश्यक असतो; तो मिळतो.

ईश्वर या संकल्पनेची व्याख्या सांगितल्याशिवाय तो चांगला रोलमॉडेल असल्याचा दावा निराधार आहे.

४. ह्या विश्वाच्या पसा-यात आपण एकटे नसुन आपल्यामागे कोणीतरी दैवीशक्ति आहे ह्याची जाणीव होत राहते व ते मनाच्या आरोग्याला आवश्यक असते

साफ चूक! अशी स्वतःची फसवणूक करता येत नाही.

५. इश्वर, नाम, ग्रंथसाहित्य, पुजा-अर्चा, देवळं, सगळं-सगळं-सगळं ह्यामागे जे अर्थकारण असते त्यावर जगणा-या व्यक्तिंना रोजगार मिळतो.

असा रोजगार इतरही अनेक वाईट कृत्यांवर अवलंबून असतो.

फसवणूक ??

>>साफ चूक! अशी स्वतःची फसवणूक करता येत नाही

आपण जरा फसवणूकीची व्याख्या कराल काय ? (ज्याच्यात आपला फायदा ती आपली फसवणूक कशी काय? )

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

व्याख्या केली

तुमच्या प्रतिसादाला मी आजवर उत्तर दिले नव्हते. हा प्रश्न तेथेही आहे आणि तेथे आजच्या प्रतिसादात खुलासा केला आहे.

दुरुस्ती

देवाची व्याख्या या धाग्यातून देवाची व्याख्या -२ येथे काही उपधागे वेगळे काढण्यात आलेले दिसतात. तुमचा प्रतिसाद आता येथे आहे आणि त्याला माझे उत्तर येथे आहे.

साधारीकरण व व्याख्या

--ईश्वरासंबंधीचे विचार पवित्र असतात हा दावा निराधार आहे.
तुमचे दावे कोणते ते सांगा व् ते कसे "साधार" आहेत ते सौदाहरण पटवून द्या.- हेच इतर ठिकाणच्या तुमच्या "निराधार" कमेंटस् साठीही लागू.
--असा रोजगार इतरही अनेक वाईट कृत्यांवर अवलंबून असतो.-
"वाइट कृत्ये" ह्याची व्याख्या सांगा.

विषयांतर

तुमचे दावे कोणते ते सांगा व् ते कसे "साधार" आहेत ते सौदाहरण पटवून द्या.- हेच इतर ठिकाणच्या तुमच्या "निराधार" कमेंटस् साठीही लागू.

आम्ही काय प्रतिपादने करतो हा या धाग्याचा विषय नाही. तसे धागे आहेत आणि तेथे आधार देण्यात येतो.

"वाइट कृत्ये" ह्याची व्याख्या सांगा.

तोटा करणारे कृत्य ते वाईट कृत्य. येथे, "समाजातील काही लोकांचा फायदा करून इतर अनेकांचा तोटा करणारे कृत्य" असा अर्थ आहे.

थोडेसे एन्लायटमेंट

--आम्ही काय प्रतिपादने करतो हा या धाग्याचा विषय नाही.-- नाही, नाही मला तेच तर ऐकायचे आहे. थोडेसे एन्लायटमेंट करा बुवा.

नोप्स

तुम्हाला हवा तसा राडा करण्यासाठी तुम्ही स्वतःचा धागा सुरू करा.

धाग्याच्या विषयाशी पुर्णपणे संबंधीत

--ईश्वरासंबंधीचे विचार पवित्र असतात हा दावा निराधार आहे.
तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माफ करा.
वरील - "ईश्वरासंबंधीचे विचार पवित्र असतात हा दावा निराधार आहे." -हा तुमचा दावा ह्या धाग्याच्या विषयाशी पुर्णपणे संबंधीत आहे. ज्या तडफेने तुम्ही माझे मत ख्डून काढले त्याच तडफेने तुम्ही माझा विचार चुकीचा का आहे ते समजावणे विषयाशी असुसंगत कसे होते?

स्पष्टीकरण

"तुमचे दावे कोणते ते सांगा व् ते कसे "साधार" आहेत ते सौदाहरण पटवून द्या." अशी तुमची मागणी आहे.
आमचा दावा इतकाच की "तुमचा दावा निराधार आहे आणि त्याला आधार, पुरावे मिळाल्याशिवाय तो मान्य केला जाणार नाही". हा एक नकारार्थी दावा आहे.
"तुमच्या दाव्याला पुरावा/आधार नाही" या आमच्या विधानाला स्वतःला पुरावा/आधार लागत नाही. तुम्ही तुमच्या विधानांसाठी पुरावा/आधार देईपर्यंत असा दावा सत्य असतो.

नामस्मरणाचे आणखी काही 'फायदे '

(संबंधितांची क्षमा मागून! )

1. बाबा, बुवा, महाराज, अम्मा इत्यादींची चांदी होते. कारण तेच आपल्याला नामस्मरणाचे मंत्र देतात. त्या बदल्यात आपण आयुष्यभर त्यांची भाटगिरी करतो.
2. नामस्मरणाचे निमित्त करून बायको नवऱ्याशी वा नवरा बायकोशी संवाद टाळू शकतात. त्यामुळे घरात शांतता नांदते.
3. नामस्मरण करत राहिल्यास ऑफीसमध्ये काम करण्याची गरज पडत नाही. इतर सहकारी संभाळून घेतात.
4. बॉस ओरडला तरी नामस्मरण करत रहावे. बॉस आपोआप ताळ्यावर येईल.
5. नामस्मरण करत राहिल्यास लाच स्वीकारताना अपराधीपणाची भावना राहणार नाही.
6. नामस्मरणामुळे कित्येक असाध्य रोग बरे होऊ शकतात. (तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!) त्यामुळे डॉक्टर, हॉस्पिटल्स, खर्चिक तपासण्या, टाळता येतात. (मुळात असले रोग का जडले हे विचारू नये!)
7. नामस्मरणामुळे स्थितप्रज्ञवृत्तीची जोपासना होते. कुणी काहीही म्हणोत आपण कोरडे पाषाण!

ही यादी आणखी वाढविता येईल. तुर्तास येवढे पुरे!

भिऊ नकोस....

६ क्रमांकातील कंसातील वाक्य खरे म्हणजे क्र. ५ साठी आहे. :-)

नितिन थत्ते

मार्मिक वक्रोक्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रभाकर नानावटी यांनी लिहिलेले नामस्मरणाचे फायदे हे कल्पकतापूर्ण वक्रक्तिलेखनाचे उत्तम उदाहरण आहे.
* श्री नितीन थत्ते यांची :६ क्रमांकातील कंसातील वाक्य खरे म्हणजे क्र. ५ साठी आहे.
:-)

ही टिप्पणी अगदी समर्पक,वस्तुस्थितीची निदर्शक आणि कुणालाही पटावी अशी आहे.

उर्जेचं संतुलन

हो! मी वर दिलेल्या परिच्छेदातील विचारांशी सहमत आहे. जी शक्ती खर्च (एक्जॉश्ट) होते ती पुन्हा कमावताही (रीप्लेनिश करताही) येते. पण काही वेळ शून्य काळासाठी म्हणजे रिलॅक्सेशन साठी (कोणत्याही कार्यात, विचारात लिप्त न होण्यासाठी ) ठेवायला हवा.

उदाहरण द्यायचं म्हटले तर, तुम्ही एक छोटे नॅपकिन आपल्या चेहर्‍या समोर गोल-गोल फिरवत रहा. त्याची जेवढी आवर्तने एकामागून एक पूर्ण होत जात राहतील तेवढा वेळ तुम्हाला तुमच्या चेहर्‍यावर हवेची झुळूक येत राहणार. उन्हाळ्यात आपण वीज नसताना असे करतोच. त्यात आपण आपलीच उर्जा आपल्यासाठी खर्च करून स्वत:ला उश्णतेपासून होणारा त्रास कमी करत असतो.
हे केवळ एक ढोबळ उदाहरण होतं. म्हणायचं असं आहे कि मनाची उर्जा एका सततच्या कृतीत प्रवाहीत केली तर त्या उर्जेचे स्वरूप बदलून पुन्हा एका नव्या उर्जेत ती रुपांतरीत होवू शकते/ होते.

मी स्वत: खूप आळशी आहे. पण ह्या गोश्टी मात्र मला नकळत जमतात.

सोलर टोप

मध्यंतरी एक टोपी पाह्यला मिळाली. टोपीवर एक सोलर पॅनल होते व त्याला जोडलेला एक छोटा पंखा. उन्हात बाहेर असतांना हमखास वारा देखील प्राप्त होतो. संशोधक नामस्मरण करत बसता तर?

हा एकांगी दृश्टीकोन तर नाही ना?

संशोधक नामस्मरण करत बसता तर?
तुमचा प्रतिसाद विनोदी ढंगाचा असेल तर....
तर तो अदृश्य झाला असता.....!

तुमचा प्रतिसाद गंभीर असेल तर....
भौतिक जगातील उर्जेचा वापर करण्यासाठी विविध साधनं निर्माण करून त्यांचा आपल्या जीवनात वापर करणं हा वेगळा विशय आहे. व
मानसिक उर्जेचे संतुलन राखत त्यातून निर्माण होणार्‍या स्थितीचा वापर आपल्या जीवनात करणं हा वेगळा विशय आहे.
तुम्ही दोन विशयांमध्ये गल्लत करत आहात.

सध्या जगात ज्याला सायन्स म्हटलं जातं ते शास्त्र प्रगत व प्रचलित आहे म्हणून तेच आणि तेवढेच जग आहे. हा दृश्टीकोन तोकडा आहे. तिबेट मध्ये अजूनही काही मंडळी आहेत जे संस्कृत मंत्र व योगाभ्यासाच्या जोरावर हवेत ही उडू शकतात. स्वतःचं शरीर त्यांना हवे तसे उश्ण किंवा थंड करू शकतात. ते देखील जग खरं आहे. फक्त सध्या सायन्सचे प्राबल्य (वरचढपणा) जास्त आहे म्हणून ते अध्यात्मिक जग झाकोळलेले भासत आहे.

तिबेट कशाला?

तिबेट मध्ये अजूनही काही मंडळी आहेत जे संस्कृत मंत्र व योगाभ्यासाच्या जोरावर हवेत ही उडू शकतात. स्वतःचं शरीर त्यांना हवे तसे उश्ण किंवा थंड करू शकतात.

महाराष्ट्रात प. वि. वर्तक यांचाही हवेत उडण्याचा दावा होता. (ते मंगळ का शुक्रावरही जाऊन आले म्हणे!)
महर्षी महेश योगी यांचाही हवेत उडण्याचा दावा होता.

मंगळ कशाला?

महाराष्ट्रात प. वि. वर्तक यांचाही हवेत उडण्याचा दावा होता. (ते मंगळ का शुक्रावरही जाऊन आले म्हणे!)

ते मंगळावर जाऊन आले होते. ;-)

पण उडण्याचे दावे सामान्य लोकही करतात. दोन पेग प्यालावर अनेकांची विमाने हवेत तरंगत असतात म्हणे. ;-)

:)

त्याने शरीर उश्णसुद्धा होते!

संपादित

मजकूर संपादित.

व्यक्तिगत रोख असणारे किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारे कोणतेही लेखन करू नये. सातत्याने असे लेखन करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होऊ शकते याची नोंद घ्यावी.

एक विनंती...

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

...श्री.पा.रा यांस.
कृपया अशा प्रकारचे काही लिहू नये. श्री.रावले यांचे प्रतिसाद विषयाला धरूनच असतात.ते एका वाचनात पूर्णपणे समजणे अवघड असते. लक्षपूर्वक वाचून त्यावर विचार केल्यास समजू शकेल.

निर्मितीची शक्ती म्हणजे काय

प्रत्येक व्यक्तीमध्ये नीर्मीतीची शक्ती कमी जास्त प्रमाणात जागृत असते.

या वाक्यामधील निर्मितीच्या शक्तीची व्याख्या काय आहे?

नामस्मरणापेक्षा व्यायाम उत्तम

नामस्मरणापेक्षा व्यायाम करावा असे माझे मत आहे. दंडबैठका काढाव्यात. जोर मारावेत. (सूर्यनमस्कार करताना तर नामस्मरण आणि व्यायाम दोन्हींचा फायदा.) पण पायी फिरणे आणि धावणे आदी एरोबिक व्यायाम केल्याने चित्तवृत्ती फारच प्रसन्न होते, मन सकारात्मक विचार करू लागते असा अनुभव आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

घाम करी काम?

व्यायाम करून घाम गाळण्यापेक्षा निवांत बसून नामस्मरण करणे अधिक 'कम्फर्टेबल' असावे.

उत्तम

अगदी उत्तम सुचना.

नसावे

नामस्मरण, स्तोत्रपठण आदि उपायांमुळे मानसिक बळ पूर्णपणे भरून काढता येते का? "

नसावे. पण काहीजणांना उपयोग होत असावा.

स्वाध्यायासाठी!

१) श्री. शं. गो. तुळपुळे ह्यांचे 'द डिव्हाइन नेम इन् इंडियन ट्रॅडिशन' हे पुस्तक.

२) श्री. आदम खान ह्यांचा हा लेख.

तुम्हालाही

नामस्मरणाचे इतर उपयोग

या संकेतस्थळावर नामस्मरणाचे इतरही उपयोग दिले आहेत. यातील सॉल्ट वॉटर रेमेडीसह नामस्मरणाचा वापर उपयोगी आहे.

 
^ वर