काय उत्तर द्यावे?

प्रा.मनोहर राईलकर,निवृत्त गणितविभागप्रमुख, एस्.पी. महाविद्यालय ,पुणे, यांनी एक प्रश्न विचारला आहे. त्याचे समर्पक उत्तर सुचत नाही. प्रश्न पुढील प्रमाणे:

"स.न.वि.वि.

खाली मी भूमितीमधला एक गुणधर्म दोन भाषांत (?) लिहीत आहे.
.....

ट्रँगलचा व्हर्टेक्स समोरील साइडच्या मिडपॉइंटला जॉइन करणार्‍या
सेगमेंटला ट्रँगलची मीडियन म्हणतात. ट्रँगलच्या सर्व मीडियन्स कंकरंट
असतात.

A reShakhand joining a shirobindu of a trikoN to the madhyabindu
of samoreel bajoo is called a Madhyaga of the trikoN. All the
madhyagas of a trikoN are ekasampaatee.

.....
पण, आपल्याला पहिलं वाक्य प्रतिष्ठित वाटतं. उलट, दुसरं वाक्य
गावंढळपणाचं वाटतं. आलंकारिक भाषेत बोलायचं तर पहिलं वाक्य म्हणजे
घोंगडीला शालजोडीचं ठिगळ लावल्यासारखं वाटतं. उलट, दुसरं वाक्य म्हणजे
शालजोडीला घोंगडीचं ठिगळ लावल्यासारखं वाटतं. असं का?
सध्या आपण पहिल्या वाक्यासारखं मराठी बोलतो. ते जाऊन दुसर्‍या
वाक्यासारखं इंग्रजी कधी बोलायला लागू? पहिल्याची प्रतिष्ठा लोपून ती
दुसर्‍या वाक्याला कधी मिळेल?"
.....
माझ्या मते भाषा बोलण्या/लिहिण्याचे हे दोन्ही प्रकार अप्रशस्त आहेत.
आपले काय मत आहे?...यनावाला.

लेखनविषय: दुवे:

Comments

रूलर-रूल्ड

दोन्ही प्रकार अप्रशस्त आहेत हे तर बरोबर.

पण (सध्याच्या जागतिक वास्तवामुळे) महाराष्ट्रात वाक्य मराठीत आणि तांत्रिक शब्द इंग्रजीत हे चालते. कारण तांत्रिक मूळ शब्द इंग्रजीत असणे हे 'अपेक्षित' असते. जर मराठी ही जागतिक रूलिंग भाषा असती तर इंग्लंडात दुसरे वाक्य चालेल असे आणि पहिले वाक्य गावंढळ वाटले असते.

चीन, ब्राझील आणि सौदी अरेबियातही असेच असावे असे वाटते.

नितिन थत्ते

सहमत आहे

दोन्ही प्रकार अप्रशस्त असले तरी पहिला प्रकार अधिक रुळलेला वाटतो. याचे कारण त्या संज्ञाना प्रतिशब्द नसणे किंवा तो तोंडात बसलेला नसणे किंवा वेळेवर न आठवणे.

मी ही घरगुती भाषेत अनेकदा

"गो गेट द पोळपाट-लाटणं." (लाटण्याला रोलिंग पिन असे का म्हणतात ते मला कळत नाही. पोळपाटाला काय म्हणतात माहित नाही.)

किंवा "गेट मुळा, दुधी अँड ऑनिअन्स प्लीज" (इथे मुळा आणि दुधी यांचे रॅडिश आणि बॉटलगॉड हे शब्द तोंडात न बसल्याने) असे म्हणते.

जेव्हा अशी वाक्ये लेखन करण्याच्या उद्देशाने लिहिली जातात तेव्हा अशी सरमिसळ होत नाही कारण जे लिहिले आहे ते सर्वांना समजावे हा एक उद्देश असतो आणि लिहिताना विचार करायला, शब्द आठवायला बराच वेळ असतो.बहुधा, वरील उदा. १ हे बोलीभाषेचे उदाहरण म्हणून अजून काही वर्षांनी खपवता येईल. ह. घ्या.

वरील दोन्ही वाक्प्रचारांचे समर्थन करायचे नाही हे लक्षात घ्यावे. हे नाईल म्हणतात त्याप्रमाणे दोन भाषा बोलणार्‍या लोकांचे होणारे साहजिक प्रकार आहेत. ते मुद्दामहून भाषा बिघडवण्याच्या उद्देशाने केलेले नसावेत.

साहजिकता

काय बरोबर आहे याला फारसे महत्त्व नाही, (किंवा दोन्ही चुक् आहे म्हणा) पण् कुठले साहजिक् कुठले आहे? माझे मत पहिले.

पहिले वाक्यं बोलायला मराठीत् वाक्य रचना करता आली पाहिजे त्यात् जितके माहित् असतील् तितके इंग्रजी शब्द घालणे अवघड् नाही.
पण् दुसरीत् इंग्रजीत् वाक्यरचना करता आली पाहिजे, पण् हे येतानाच इंग्रजीतील अनेक नेहमीचे शब्द मात्र माहित नसले पाहिजेत. हे काम मात्र अवघडच आहे (मुद्दाम् मजेशीर बोलायचे असेल तर् दुसरीचा वापर नाटकात-बोलण्यात मी पाहिला आहे.)

दुसरा मुद्दा, दोन मराठी बोलताना पुन्हा साहजिक मराठीत् वाक्यरचना करणार पण (मराठी प्रतिशब्दांच्या तुलनेने)रुळलेले इंग्रजी शब्द त्यात पेरणार हेही साहजिकच आहे. मराठी माणुस, त्याच्या मोडक्यातोडक्या इंग्रजीत एखाद्या इंग्रजीत् बोलु लागला तर् दुसर्‍या उदाहरणाप्रमाणे बोलु लागेल. सदाशिव पेठेतल्या (संबंधितांनी हलके घेणे) एखाद्या काका-आजोबांना हिंदी मनुष्याशी बोलताना पहा बरे, वो दुसरे उदाहरणके जवळ जाता है का नाही ते तुम्हीच मेरेकु सांगो.

-Nile

दोन्ही अप्रशस्त, पण

भूमितीविषयक ही दोन्ही वाक्ये त्या-त्या भाषेसाठी ठीक वाटत नाहीत.

प्रतिशब्द उपलब्ध असल्यामुळे अप्रशस्त वाक्यप्रयोग आहेत. प्रतिशब्द उपलब्ध नसते, तर दोन्ही वाक्ये ठीक आहेत.

प्रतिशब्द उपलब्ध नसते....

त्रिकोन आधी कि ट्रयांगल आधी हा बहुतेक महत्वाचा मुद्दा ठरतो.

म्हणजे जर इन्ग्रजी भाषूकांनी त्रिकोनाचा शोध लावला अस्ता तर कुठल्याही भाषेच्या लिपीत त्याला ट्रयांगल म्हटले तर काहीच हरकत नसावी.
आणि दुस्र्या भाषेत जर त्यांना प्रतिशब्द उपलब्ध असेल तर त्या भाषेत लिहीताना त्यानी तो प्रतिशब्द वापरला तरी हरकत नसावी.

पण जर इन्ग्रजी भाषूकांनी त्रिकोनाचा शोध लावला आहे आणि इन्ग्रजी मधेच तुम्ही trikon असे लिहीत असाल तर ते चुकीचे वाटते.

पण जेंव्हा त्रिकोन आधी कि ट्रयांगल आधी हे माहित नसेल तर मग use your own language words.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

बरोबर

नाईल यांच्याशी सहमत. शिवाय तांत्रिक मजकूर सोडला तर पहिल्या प्रकारचे वाक्य प्रतिष्ठित समजत नाहीत.

"तसा मी गॉडवर बिलिव्ह करत नाही पण एव्हरी मॉर्निंगला प्रेयरमात्र करतो."

हे वाक्य हास्यास्पदच समजतात.

नितिन थत्ते

कोण बोलले

"तसा मी गॉडवर बिलिव्ह करत नाही पण एव्हरी मॉर्निंगला प्रेयरमात्र करतो."

हे वाक्य हास्यास्पदच समजतात.

खरे आहे परंतु हे जर एखादी अमेरिकन/इंग्लीश (भारतीय वंशाची नाही किंवा कदाचित इथेच जन्मलेली भारतीय वंशाचीही*) व्यक्ती बोलली तर कदाचित तिचे कौतुक होईल.

* अनेकदा इथली मुले अगदी वरच्यासारखी नाही कारण ते ओढून ताणून बनवलेले वाक्य आहे पण अशी वाक्ये बोलतात. त्यांना कोणीही हसताना मी पाहिलेले नाही. परंतु आजकाल भारतातली नवी पिढीही अशीच वाक्ये बोलते हे पाहिलेले आहे. त्यांच्या बोलण्यावर अनेकांना हसू येत असावे.

पुन्हा अशा बोलण्याचे समर्थन नाही केवळ वस्तुस्थिती दाखवलेली आहे.

उत्तर बहुदा दिले गेले आहे

उत्तर बहुदा दिले गेले आहे. दुवा सापडत नाही आहे पण 'बच्चों की भावनाओंको समझो' असा वरुन आदेश आला आहे असे कुठे तरी वाचले होते. बहुदा निवृत्त असल्याने राईलकर सरांना कळाले नसावे. कृपया शिक्षकांनी काय तो खुलासा करावा.

कुठले वाक्य कोणाला प्रतिष्ठित अथवा अप्रतिष्ठित वाटते हे सापेक्ष आहे. वर्गात शिकवताना शिक्षकांनी जसे शिकवले असेल त्याप्रमाणे उत्तर द्यायचा प्रयत्न विद्यार्थी सर्वसाधारणपणे करतात. गणीताच्या शिक्षकाने वाक्यरचनेपेक्षा गणित नियम/ उत्तर हे चूक / बरोबर / समजले आहे यावर लक्ष द्यावे असे माझे प्रामाणिक मत. भाषेचे शिक्षकही अधिकृत अभ्यासक्रमानुसार शिकवत असणार. शिक्षकांनी पहील्याच परिक्षेनंतर त्यांना उत्तरपत्रीकेत कुठल्या भाषेत (देवनागरी, रोमन) कुठले शब्द (इंग्रजी अथवा मराठी) लिहलेले चालतील/ चालणार नाहीत याचा खुलासा विद्यार्थ्यांना करावा. गुण हवे असतील तर विद्यार्थी बरोबर लिहतील.

बाकी ह्या चर्चेला / लोकांना उत्तरे विचारण्याला काहीही अर्थ नाही. आपल्याला भाषेचे केवढे प्रेम, ज्ञान व कळकळ आहे याचे प्रदर्शन करायचा केविलवाणा प्रयत्न!

अर्थात उपक्रमावर अलिकडच्या काळात सतत अशुद्ध व काहीबाही (पुरेसा विदा / अभ्यास नसलेले) लेखन येत आहेत हे दिसले आहे. ते कोण आहेत हे त्यांना माहीत आहे, त्यांनी मांडलेली मते चुकीची आहेत, त्यांच्या सदस्यनामाला बट्टा लावणारी आहेत, त्यांच्या अशुद्धलेखनात भरपूर सुधारणेची गरज आहे हे त्यांना सांगीतले गेले आहे तरी श्रम घ्यायची तयारी नाही की प्रयत्नात प्रामाणीकता दिसत नाही, अश्या लेखकांच्या लेखनावर बहिष्कार टाकायचा मार्ग उपक्रमींनी स्वीकारावा अशी नम्र सूचना करावीशी वाटते.

अश्या लेखकांच्या लेखनावर बहिष्कार टाकायचा मार्ग

ज्ञानेश्वर यांच्या मराठी भाषेवर संस्कृत पंडितांनी अशीच बहिष्काराची भाषा केली. त्याचे परिणाम आज आठशे वर्षा नंतर दिसून आलेत

प्लीज स्पेअर अस

स्वतःची ज्ञानेश्वरांशी तुलना करुन आणखी विनोद करू नका प्लीज.

ज्ञानेश्वर

मराठी संकेतस्थळांवर प्रत्येक २ व्यक्तींमधला एक* ज्ञानेश्वर असतो.

* या आकड्यांचा खुलासा विचारू नये. केवळ अनुभवांती हे आकडे मिळालेले आहेत. ;-)

आणि

आणि दुसरा "अज्ञानेश्वर" असतो.

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

एकदा, दोनदा अनेकदा आणि बहुदा.

एकदा, दोनदा, कितीदा, अनेकदा, बहुतेकदा हे शब्द वारंवारता किंवा आवृत्तीसंख्या सांगतात. या यादीत ‘बहुदा‘ येत नाही. बहुदा म्हणजे खूप देणारी व सर्वदा म्हणजे सर्वकाही देणारी.

पहिला, दुसरा, तिसावा, प्रथम, द्वितीय हे स्थानाची क्रमवारी सांगतात, तर एखादा, एखाददुसरा, कोणी एक ही ज्याची नक्की माहिती नाही अशा विशेष्याची संख्याविशेषणे असतात.

पहिल्यांदा, तिसर्‍यांदा, प्रथम हे वेळेची क्रमवारी सांगतात. सदा, सदासर्वदा हे वेळांची न मोजता येणारी संख्या.

एकदोन, दोनएक, दोनतीन, तीनएक, दहाबारा, पंचवीसएक, कित्येक ही अंदाजदर्शक संख्याविशेषणे. या यादीत ‘बहुतेक‘ येत नाही.

बहुतेक म्हणजे पुष्कळसे , बहुतांशी. पण कदाचित नाही.. या अर्थी वापरला जाणारा बहुतेक हा शब्द प्रमाण(माप) दाखवतो.

द्विधा(=दुभंग, डळमळीत), त्रिधा, त्रेधा, त्रिविध, विविध, बहुविध हे शब्द किती प्रकारचे किंवा किती प्रकारांनी ते सांगतात. (मराठीत मात्र, त्रेधा म्हणजे तिरपीट.)

आणि शेवटचा शब्द : बहुधा. अर्थ, बहुतकरून, बहुते(क)करून. हे क्रियाविशेषण अधिक शक्यता(मोस्ट प्रॊबेबल) सांगते. या अर्थाने बहुदा हा शब्द बहुधा वापरता येत नाही. --वाचक्‍नवी

दुसरे वाक्य वाचून

रंभोरु म्हणजे, बनाना ट्री थाईड वन, हे आठवले.

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

अरेच्चा

हे कसं काय विसरलो?

The Indian society is supposed to be divided in four varnas. The life of every male person is divided into four ashrams. A boy undergoes an Upanayan ritual at the age of 8 after which he is supposed to go to his Guru's place. He spends his childhood and teen age at Guru's place to learn different Vidyas. This is called brahmacharyashram. After Brahmacharyashram the young man comes back to his parental home. He then gets married and starts his Gruhasthashram.

हे बहुधा दुसर्‍या प्रकारचे वाक्य आहे. अशी वाक्ये सर्रास लिहिली जातात. स्वीकारलीही जातात. त्यांना गावंढळ म्हणण्याचा प्रश्नच नाही. प्रतिशब्द उपलब्ध नसल्याने (किंवा निर्माण न करता) मूळ तांत्रिक शब्द वापरले आहेत.

नितिन थत्ते

सहमत...

सहमत.

अनेक तांत्रिक शब्द हे जिथून उगम पावले तसेच वापरले जातात. वरील उदाहरणात संस्कृत असतील तर रोजच्या व्यवहारात वैद्यकीय व्यवहारातील तर अनेकच इंग्रजी शब्द आहेत... तसेच चर्चेत इतरत्र आलेला मुद्दा पण महत्वाचा आहे, जी मुले महाराष्ट्रात वाढलेली नाहीत, मराठी वातावरणात वाढलेली नाहीत त्यांच्या भाषेत आलेले परभाषेतील शब्द आणि मराठीतून शिकून पण ("स्टाईल" म्हणून ;) ) येणारे शब्द हे दोन वेगळे प्रकार आहेत.

ती भाशा अभारतीयांची असेल/ व्ह्यावी असे ते म्हणताहेत.

शास्त्र म्हणजे नीयम. नीयम म्हणजे नीसर्गाची सातत्यपूर्ण वर्तणूक. एखाद्या वीशयाच्या सततच्या अध्ययनातून निसर्गाची जी एक ठरावीक वर्तणूक सातत्याने आढळून येते. त्या वर्तणूकीला नीयम म्हणता येवू शकते. त्या नीयमांपासून शास्त्र विकसीत होवू शकते. ज्या भाशकांकडून एखादे शास्त्र वीकसित होत जाते, त्या त्या भाशेत नव-नव्या संकल्पनांना नावे दिली जातात.

'योग आसने' ह्या शास्त्रातील संकल्पना भारतीयांकडून रचल्या गेल्या. त्यामूळे परदेशातील संस्कृत भाशेव्यतीरीक्त मंडळींना त्यांच्या भाशेतील क्रियापदे , प्रत्यये लावत ते शास्त्र शिकता येते.
तसेच जे शास्त्र इंग्रजीमधून वीकसित झाले आहे ते इंग्रजी न जाणणारे त्यांच्या-त्यांच्या भाशेत त्यांच्या भाशेतील क्रियापदे , प्रत्यये लावत ते शास्त्र शीकू शकतात.

प्रा. मनोहर राईलकर ह्यांना, 'मराठी भाशकांकडून नव-नवे शास्त्र मराठी (किंवा एखाद्या भारतीय सामायीक ) भाशेतून विकसीत होवून ते शास्त्र सत्य-असत्य च्या चाचणीतून पास होत जावून त्या शास्त्राच्या पक्केपणामुळे त्यास प्रतीश्ठा प्राप्त व्हावी.' असे म्हणावयाचे असावे.

पहील्या प्रकारची भाशा भारतीयांनी/ मराठी भाशकाने इंग्रजीत विकसीत झालेल्या संकल्पना शीकल्यामुळे घडलेली आहे.
दुसर्‍या प्रकारची (भवीश्यातील) भाशा भारताबाहेरील (उदाहरणात इंग्रजी भाशा जाणणार्‍यांनी) मराठीत विकसीत झालेल्या संकल्पना शीकल्यामुळे त्यांच्याकडून घडू शकेल असे कयास करून लिहीली आहे. (त्यातील उदाहरण वाचकांना समजावे म्हणून ओळखीचे ठेवण्यात आलेले आहे.) आणी म्हणून राईलकरांची भाशा चूकीची अजीबात नाही. ते काय म्हणत आहेत तेच चर्चा-प्रस्तावकाला समजलेले नाही, असे मी म्हणेन.

मुद्दाम

तुम्हाला मुद्दाम असं टंकताना त्रास नाही का हो होत?

नितिन थत्ते

असेच

अगदी असाच विचार मी प्रत्येक वेळी करते...

नियम आणि सातत्य

'नियम आणि सातत्य' अशा विषयाधारित प्रतिसादात एकाच ओळीत 'विकसीत' आणि 'वीकसित', 'नीसर्गाची' आणि 'निसर्गाची' या एकाच शब्दाला वेगवेगळ्या पध्दतींनी लिहिण्याची हातोटी जबरदस्त आहे. सलाम.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

कौतुक

तुम्ही "नीयमाने" आणि "सातत्याने" र्‍हस्व-दीर्घाची जी विल्हेवाट लावता त्याचे सर्वांना अतीव कौतुक वाटत असावे.

मला वातते

सतिष यांनी नीयमांचे महत्वाचे मूद्दे मांदले आहेत. याहुन अधीक लीहिन्याची गरज भासत नाहि.

नम्‍र

"संत हा शब्द संत, सन्त किंवा सन् त असा कसाही लिहीलेला किंवा छापलेला दिसला की आमचे मस्तक नम्र, नम्‍र किंवा नम्‌र होते." - पुल.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

अहाहा.....!

सुंदर प्रतिसाद....!

-दिलीप बिरुटे
[रावले सतीश यांचा फॅन]

माझ्या लहानपणी..

माझ्या लहानपणी मी वापरलेले भूमितीचे पुस्तक उघडून पाहिले. त्यात दिलेल्या मजकुरात रेषाखंड, शिरोबिंदू आणि एकसंपाती हे शब्द नाहीत. त्यातले वाक्य असे आहे : त्रिकोणाचा कोनबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणार्‍या रेषेला मध्यगा म्हणतात. त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एकाच बिंदूतून जातात.
हे प्रमेय शिकताना आम्हाला काहीही अवघडल्यासारखे वाटले नव्हते.
त्या वेळच्या आमच्या कल्पनेप्रमाणे शिरोबिंदू म्हणजे फक्त त्रिकोणाच्या “पाया“समोर येणारा कोनबिंदू. आणि हा पाया नेहमीच कागदाच्या रुंदीला समांतर असायचा. --वाचक्‍नवी

रेषा आणि रेख

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.वाचक्नवी लिहितातः"माझ्या लहानपणी मी वापरलेले भूमितीचे पुस्तक उघडून पाहिले. त्यात दिलेल्या मजकुरात रेषाखंड, शिरोबिंदू आणि एकसंपाती हे शब्द नाहीत. "
हे ठीक आहे. पण नव्या व्याख्या अधिक व्यापक आणि अचूक आहेत. रेषा आणि रेषाखंड यांत भेद आहे. रेषेची लांबी अमर्याद असते,रेखाची लांबी सीमित असते. मध्यगा ही रेषा नसून रेख आहे.लांबीचे माप मर्यादित आहे. तिन्ही मध्यगा एकाच बिंदूतून जातात या ऐवजी एकसंपाती असतात असे म्हणतात ते योग्य आहे. अशा रेखांचा एकसंपातीपणा हा गुणधर्म म्हणून सांगणे सुलभ होते.
( श्री. वाचक्नवी यांनी लहानपणीचे पुस्तक अद्यापि जपून ठेवले आहे यावरून त्यांना भूमिती विषयाची विशेष आवड आहे असे दिसून येते. माझापण तो सर्वाधिक आवडीचा विषय आहे.)

जुनी

ही चर्चा आठवली.

नितिन थत्ते

उत्तर : अपर्णा लळिंगकर यांचे.

उपक्रमवर सदस्यत्त्व मिळालेले नसल्यामुळे 'अपर्णा लळिंगकर' यांनी लिहिलेले उत्तर कॉपी पेष्ट करत आहे. सदरील उत्तर त्यांनी प्रा.राईलकर सरांना पाठविलेच आहे.


ति प्रा राईलकरसरांस,

सा नमस्कार.

आपला मुद्दा लक्षात आला. मला असं वाटतं की तुम्ही दिलेली दोनही वाक्य वापरणं योग्य नाही. म्हणजे मला असं वाटतं की जे काही लिहायचं असेल ते कोणत्याही एकाच भाषेत लिहावं म्हणजे त्याचा ज्ञान म्हणून खरा उपयोग होईल. उदा. मला जर पाच भाषा येत असतील म्हणून मी एक वाक्य त्या पाचही भाषांची सरमिसळ करून लिहीलं तर ते मला समजेल पण बाकीच्यांना कितपत समजेल. आणि जरी माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते समजलं (कारण ते सुद्धा माझ्यासारखेच पाच भाषा येणारे) तरी त्याचा ज्ञानसंक्रमण आणि संवर्धनासाठी फारसा उपयोग नाही. कोणत्याही भाषेचा अभ्यासक एकाच भाषेत बोलणं किंवा लिहीणं योग्य आहे हेच सुचवेल. तुम्ही वर दिलेली दोन्ही वाक्य माझ्या लेखी भेळ-भाषा किंवा मिसळ-भाषा याआंतर्गत मोडतात. मी त्यांना मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहीलेले म्हणणार नाही. केवळ देवनागरी लिपीत लिहीलं म्हणजे मराठी नाही आणि रोमन लिपीत लिहीलं म्हणजे इंग्रजी नाही हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. जे लोक अशी भेळ-भाषा किंवा मिसळ-भाषा वापरातात त्यांना कोणतीच एक भाषा व्यवस्थित येत नसते.

यामुळे मी वरीलपैकी कोणत्याच वाक्यरचनेला पाठींबा देत नाही. याउलट जर कोणी वरील विधाने खालीलप्रमाणे देतील तर मला ते जास्त भावेल.

मराठी विधान: त्रिकोणाच्या शिरोबिंदूस आणि त्यासमोरील बाजूच्या मध्यबिंदूला जोडणार्‍या रेषाखंडाला त्या त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. त्रिकोणाच्या सर्व मध्यगा एकसंपाती असतात.

English Statement: Line segemnt joining vertex of a traingale and the mid-point of the side opposite to that vertex is called as median. All medians of a triangle are concurrent.

वरील दोन्ही विधानांमधून मला नक्की जे ज्ञान पोहोचवायचे आहे ते व्यवस्थित कोणत्याही एकाच भाषेत पोहोचत आहे असं मला वाटतं.

यावरून एक किस्सा आठवला. मी केंब्रीजमध्ये असताना आमच्या एका तासाला आम्ही गणितातील विविधा भाषांतील पारिभाषिक शब्दांविषयी चर्चा करत होतो. म्हणजे ते शब्द त्या संकल्पनेचा अर्थ नैसर्गिकरित्या त्याभाषेत कसा पोहोचवतात याविषयी बोलत होतो. इंग्रजी मध्ये ट्रॅपेझिअम हा एक चौकोनाचा प्रकार आहे. मराठीत त्याला समलंब चौकोन असं म्हणतात. आमची चर्चा ट्रॅपेझिअमपाशी आल्यावर मी त्यांना आपला समलंब चौकोन हा शब्द सांगीतला आणि तो शब्द त्याप्रकारच्या चौकोनाचा गुणधर्म (या चौकोनाची समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असते आणि दुसरी जोडी समांतर नसते. म्हणजे त्या चौकोनाच्या लंबांची एकच जोडी समान असते. म्हणून समलंब चौकोन) कसा स्पष्ट होतो ते सांगीतले. सगळ्यांना खूप नवल वाटलं आणि आनंदही झाला. आमच्या व्याख्यात्यांनीतर मी याचा असा अर्थ कधीच बघीतला नव्हता हे सुद्धा आवर्जुन नमूद केलं. हा किस्सा इथे सांगण्याचा हेतू असा की जर मी भेळ-भाषेत माझे आकलन ठेवले असते तर मला नाही वाटत की हा मराठी परिभाषेचा श्रीमंत पैलू समजला असता. मी फक्त ट्रॅपेझीअम असंच म्हणत राहीले असते. :-) खरंतर इंग्रजी ट्रॅपेझिअम या चौकोनाच्या प्रकाराच्या व्याख्येत अजुनही तेवढी स्पष्टता नाही. म्हणजे काही पाठ्यपुस्तकांमध्ये हे स्पष्टच दिलेलं नाही की ट्रॅपेझिअमला समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असते की कमीत कमी एक जोडी. काही ठीकाणी कमीत कमी एक जोडी समांतर असं म्हंटल्यामुळे आयत, चौरस, समांतरभूज चौकोन हे सगळेच ट्रॅपेझिअम होतात. पण मराठीतील समलंब चौकोनाची व्याख्या आणि परिभाषा इतकी स्पष्ट आहे की त्यात वर नमूद केलेला गोंधळ निर्माण होत नाही.

धन्यवाद,

अपर्णा

ता. क.

वर बर्‍याच जणांचं म्हणणं आहे की तांत्रिक शब्द इंग्रजीत असावेत. मला असं वाटतं की हे इंग्रजी माध्यमात ताम्त्रिक विषय शिकलेल्या लोकांचं विधान काहीसं आळसाचं आणि दुजाभाव करणारं वाटतं. कारण आपल्या भाषेत जो पर्यंत आपण तांत्रिक शब्द प्रयत्नपूर्वक आणत नाही तोपर्यंत ते रूजणार नाहीत आणि वाढणार नाहीत. मग आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी आधी इंग्रजीचाच आधार घ्यावा लागेल. म्हणजे आधी मातृभाषेत नीट शिक्षण नाही त्यात इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी पळापळ. घरात मदत नसल्याने आणि शाळेत शिकवण्याचा आनंद असल्याने त्यांची बिचार्‍यांची ससेहोलपट.
जपानी भाषा खरंतर खूप अवघड आहे असं म्हणतात. पण सगळं अद्ययावत तंत्रज्ञान आणि तांत्रिक परिभाषा जपानी भाषेत भाषांतरीत होत असते. तेच चायनीज आणि तैवानी, कोरीअन भाषांच्या बाबतीत. त्यांच्या कडच्या मायक्रोसॉफ्ट्च्या संगणक प्रणाली मॅंडरीन मध्ये असतात. आणि आपण तांत्रिक शब्द इंग्रजीत असायला पाहीजे याचं समर्थन करतोय. गंमत आहे नाही.

कुतूहल

जपानी भाषा खरंतर खूप अवघड आहे असं म्हणतात. पण सगळं अद्ययावत तंत्रज्ञान आणि तांत्रिक परिभाषा जपानी भाषेत भाषांतरीत होत असते. तेच चायनीज आणि तैवानी, कोरीअन भाषांच्या बाबतीत. त्यांच्या कडच्या मायक्रोसॉफ्ट्च्या संगणक प्रणाली मॅंडरीन मध्ये असतात. आणि आपण तांत्रिक शब्द इंग्रजीत असायला पाहीजे याचं समर्थन करतोय. गंमत आहे नाही.

येथे नेमक्या किती जपानी भाषा, चीनी भाषा आणि कोरियन भाषांमध्ये भाषांतर घडते? नेमका आकडा नसला तर योग्य संदर्भांच्या आधारे अंदाजे आकडाही चालेल. :-)

असहमत

इंग्रजी ट्रॅपेझिअम या चौकोनाच्या प्रकाराच्या व्याख्येत अजुनही तेवढी स्पष्टता नाही. म्हणजे काही पाठ्यपुस्तकांमध्ये हे स्पष्टच दिलेलं नाही की ट्रॅपेझिअमला समोरासमोरील बाजूंची एकच जोडी समांतर असते की कमीत कमी एक जोडी. काही ठीकाणी कमीत कमी एक जोडी समांतर असं म्हंटल्यामुळे आयत, चौरस, समांतरभूज चौकोन हे सगळेच ट्रॅपेझिअम होतात. पण मराठीतील समलंब चौकोनाची व्याख्या आणि परिभाषा इतकी स्पष्ट आहे की त्यात वर नमूद केलेला गोंधळ निर्माण होत नाही.

व्याख्या ही करण्यावर असते. आम्हाला शिकविलेल्या व्याख्यांनुसार अ स्वेअर इज अ स्पेशल रेक्टँगल विच इज अ स्पेशल पॅरेलेलोग्राम विच इन टर्न इज अ स्पेशल ट्रॅपेजिअम. वेन आकृतींनी एकात एक वर्तुळे काढून सांगता येते की चौरस हा विशिष्ट प्रकारचा आयत असतो, आयत हा विशिष्ट प्रकारचा समांतरभुज चौकोन असतो आणि समांतरभुज चौकोन हा विशिष्ट प्रकारचा समलंब चौकोन असतो.
बाकी चालू द्या.

मूळ प्रश्नाचे उत्तरः दोन्ही प्रकार अप्रशस्त आहेत. भूमितीचे इतके प्राथमिक ज्ञान इंग्रजीतून शिकावे लागण्याची मराठी भाषकांना किंवा ज्यॉमेट्रीचे इतके प्रायमरी नॉलेज मराठीतून लर्नण्याची इंग्रजी भाषकांना आवश्यकता वाटू नये.

पुन्हा अपर्णा लळिंगकर....

प्रियाली,
>>तेच चायनीज आणि तैवानी, कोरीअन भाषांच्या बाबतीत.>>

यातील भाषांच्या या शब्दा आधी ’या’ हे अक्षर किंवा शब्द टंकायचा राहीला आहे. इतकं मराठी टंकायची सवय नसल्याने मधुन मधुन अशा चुका होतात. बाकी आपल्याला माहीती असलेली सांखिकी प्रा राईलकर जरूर देवू शकतील. मी सांखिकी नाही तर प्रत्यक्ष चायनीज, जॅपनीज, कोरीअन आणि तैवानी लोकांना त्यांच्या त्यांच्या भाषां मधील संगणक प्रणाली वापरताना पाहीलं आहे. आता त्यांच्या भाषांमध्ये तांत्रिक परिभाषा तयार केल्याशिवाय तर हे होणे शक्य नाही. त्यामुळे हा संकल्पनेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरायला हरकत नाही.

रिकामटेकडा,

सहमती असायलाच पाहीजे याचा आग्रह नाही. त्यामुळे चिंता नाही. व्याख्या जरी आपण करत असलो तरी गणितातील मूलभूत व्याख्या ह्या वैश्विकच असायला हव्यात. तुम्ही जे चौरसाचं उदाहरण दिलं आहे ते बरोबर आहे. पण समांतरभुज चौकोनाला समलंब चौकोन म्हणून आपण आपल्या इंग्रजी भाषेत शिकलेल्या गणिती संकल्पनांचा घोळ दाखवुन देता आहात. चूक आपली नाही. मातृभाषेतून शिक्षण न-घेतल्या्चा परिणाम आहे. याच्याशी सुद्धा असहमत असायला माझी पूर्ण सहमती. :-)

चुकीची माहिती

चूक आपली नाही. मातृभाषेतून शिक्षण न-घेतल्या्चा परिणाम आहे. याच्याशी सुद्धा असहमत असायला माझी पूर्ण सहमती. :-)

मी दहावीपर्यंत मराठीतूनच शिक्षण घेतले आहे. पुस्तक लिहिणार्‍यांवरच इंग्रजी भाषेत शिकलेल्या गणिती संकल्पनांचा प्रभाव असणे शक्य आहे. परंतु, मुळात, समांतरभुज चौकोनाला समलंब चौकोन म्हटल्यास काय आभाळ कोसळेल तेच अपर्णा लळिंगकर यांनी स्पष्ट केलेले नाही.

माझा प्रश्न

प्रत्यक्ष चायनीज, जॅपनीज, कोरीअन आणि तैवानी लोकांना त्यांच्या त्यांच्या भाषां मधील संगणक प्रणाली वापरताना पाहीलं आहे. आता त्यांच्या भाषांमध्ये तांत्रिक परिभाषा तयार केल्याशिवाय तर हे होणे शक्य नाही.

माझा प्रश्न असा आहे की चीनमध्ये एकापेक्षा अधिक अधिकृत भाषा आहेत. आपण त्यापैकी किती चीनी भाषांत संगणक प्रणाली वापरताना पाहिले आहेत? मी आधीच सांगितल्याप्रमाणे मला सांख्यिकीचे आकडे नसतील तरी चालेल. संदर्भ मात्र हवेत.

पुन्हा अल

प्रियाली,
चीन मध्ये एका पेक्षा जास्त अधिकृत भाषा आहेत. पण त्यातील ९०% लोक ह्या मॅंडरीन भाषेचा वापर करतात. म्हणून चीन मधील तांत्रिक परिभाषा आणि संगणक प्रणाली मॅंडरीन मध्येच केलेल्या आढळतात. मला स्वत:ला मॅंडरीन किंवा इतर चायनीज भाषा येत नसल्याने त्यांच्या मधील फरक ओळखता येणार नाही .......म्हणजे त्या भाषां मधील संगणक प्रणाली दिसल्या तरी मला त्या चायनीजच वाटतील. त्याअर्थी मी म्हणाले. चीनमधल्या किती भाषांच्या संगणक प्रणाली आहेत या सांख्यिकी पेक्षा ते वापरले जाते हे महत्त्वाचे. म्हणजे मराठीत तांत्रिक परिभाषा येणे अवघड असू नये. सुदैवाने संपूर्ण जगभरात आपल्या देशाला गणितीय संकल्पनांच्या देणगीदाराच्या रूपात पाहतात. त्यामुळे आपल्या भाषां मधील पारिभाषिक शब्द हे अतिशय उत्तम आणि चपखल आहेत. आता अल्जेब्रा हा शब्द अरेबिक भाषेतून आलेला आहे. आपण आपल्याभाषांत त्याला बीजगणित म्हणतो. बीजगणित हा शब्द त्याला चपखल बसतो. आता अरेबिक मध्ये अल्जेब्रा = अल+ जेब्रा (अल चा अर्थ तो असा होतो मग जेब्रा चा असा कोणता अर्थ असेल की जो गणनाशी जोडला तरी मूळ गणित किंवा बीजगणित याच्याशी जोडला जातो?

चीनी भाषा

चीन मध्ये एका पेक्षा जास्त अधिकृत भाषा आहेत. पण त्यातील ९०% लोक ह्या मॅंडरीन भाषेचा वापर करतात.

म्हणजेच मँडेरिन ही त्यांची राष्ट्रभाषा किंवा सामायिक भाषा मानता येईल. तसे असल्यास मराठी प्रतिशब्द वापरण्याचे खूळ कशासाठी?

मला स्वत:ला मॅंडरीन किंवा इतर चायनीज भाषा येत नसल्याने त्यांच्या मधील फरक ओळखता येणार नाही .......म्हणजे त्या भाषां मधील संगणक प्रणाली दिसल्या तरी मला त्या चायनीजच वाटतील.

म्हणजेच चीनी भाषेत ट्रँगलचा व्हर्टेक्स समोरील साइडच्या मिडपॉइंटला जॉइन करणार्‍या सेगमेंटला ट्रँगलची मीडियन म्हणतात. ट्रँगलच्या सर्व मीडियन्स कंकरंट असतात अशी मँडेरिन विभक्तीप्रत्यय आणि क्रियापदे घेऊन वाक्यरचना केली असेल तरी तुम्हाला कळणार नाही. असे असताना लोक चिनीजपानी भाषांची उदाहरणे का बरे घेतात?

चीनी?

चिनी असा उच्चार अधिक सवयीचा आहे.

गलतीशे मिष्टेक

चीनने, चीनला असे विभक्तीप्रत्यय लावताना ची र्‍हस्व होत नाहीसे वाटते पण चिनीमधला चि मी देखील र्‍हस्व लिहिल्याचे आठवते. चिनी हे सवयीचे असावे; बरोबर का चूक ते मला माहित नाही*. सुधारणेबद्दल धन्यवाद. :-)

* कोणी खुलासा केला तर आवडेल.

खुलासा

जेव्हा नामाचे प्रत्ययापूर्वी सामान्यरूप होते तेव्हा नामातला (बहुधा) उपान्त्य दीर्घ इकार-उकार र्‍हस्व होतो. सामान्यरूप केले नाही तर तो र्‍हस्व होत नाही. पाटील-पाटीलने/पाटिलाने/पाटलाने. नागपूर-नागपुराला/नागपूरला.
परकीय देश-ग्रामनामाचे प्रत्ययापूर्वी सहसा सामान्यरूप करत नाहीत. पण केले तर ब्राझीलमध्ये/ब्राझिलामध्ये, चीन-चीनने/चिनाने अशी रूपे होतील.
नामापासून विशेषण किंवा भाववाचक नाम करताना उपान्त्य स्वर र्‍हस्व होतो.
उदा. वकील-वकिली, चीन-चिनी, पंढरपूर-पंढरपुरी, वगैरे. हे सर्व बदल उच्चारसुलभतेसाठी होतात, ज्याचे उच्चार मुळातच बरे आहेत त्याला नियम लक्षात ठेवायची गरज नसते.
परवापासून् उपक्रमावर सामायिक हा शब्द तीनदा वाचला. तीनही वेळा तो समाईक किंवा सामाईक अशा चुकीच्या अर्थाने वापरला गेला होता. सामायिक हा शब्द मराठीत फारसा वापरला जात नाही, पण वापरलाच तर तो सामयिक असा हवा. त्याचा अर्थ एकतर समयासंबंधी असा (तुला: सामाजिक, सामरिक), किंवा समयासमयाने असा होईल. (तुला: नियतकालिक). या उलट, समाईक किंवा सामाईक म्हणजे दोन किंवा अधिक वस्तूंमध्ये समान किंवा संयुक्त मालकीचा असण्याचा गुण.--वाचक्नवी

दोन लादलेले शब्द

चीनी शब्दाबद्दल का घोळ का झाला कोणजाणे पण चिनी असाच वापर यापूर्वी केलेला आहे.

सामाईक या सुधारणेबद्दल धन्यवाद. आता हे दोन लादलेले शब्द वापरले जातील. ;-) ह. घ्या.

त्यानिमित्ताने या चर्चेचीही आठवण झाली आणि चिनी जपानी भाषा येत नसल्याचे अतीव दु:ख झाले. मराठी जगतातला प्रत्येक विचारवंत (खाली राईलकरांनीही जपानी भाषेबद्दल लिहिले आहेच.) चिनी-जपानी भाषांवर अवलंबून आहे हे कळल्याने डोळे भरून आले. ;-)

तुलना

जपानी भाषा खरंतर खूप अवघड आहे असं म्हणतात. पण सगळं अद्ययावत तंत्रज्ञान आणि तांत्रिक परिभाषा जपानी भाषेत भाषांतरीत होत असते. तेच चायनीज आणि तैवानी, कोरीअन भाषांच्या बाबतीत. त्यांच्या कडच्या मायक्रोसॉफ्ट्च्या संगणक प्रणाली मॅंडरीन मध्ये असतात. आणि आपण तांत्रिक शब्द इंग्रजीत असायला पाहीजे याचं समर्थन करतोय. गंमत आहे नाही.

मराठी आणि जपानी/फ्रेंच/कोरियन यांची सरळ तुलना करता येणार नाही असे वाटते. एका देशाची एक भाषा आणि एका देशातील २६ भाषांपैकी एक भाषा यांचा आवाका फार वेगवेगळा होतो. जपानी माणूस मातृभाषेत शिकला की सगळ्या जपानमध्ये कुठेही त्याला त्या शिक्षणाचा उपयोग करता येईल. भारतात तांत्रिक शाखेतील उच्चशिक्षण मातृभाषेत द्यायला सुरूवात केली तर विविध प्रांतातील लोकांना एकत्र काम करणे अशक्य होईल. माझ्या तमिळ सहकार्‍याशी बोलताना समलंब चौकोन हा शब्द वापरून चालणार नाही, ट्रॅपेझियम हा शब्द वापरावा लागेल.

भारतात इंग्रजी ज्ञानभाषा आहे आणि राहील याचे हे एक मुख्य कारण आहे.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

अल यांचा प्रतिसाद

आरागॉर्न यांना,

आपल्या प्रतिसादा बद्धल धन्यवाद. भारतात उच्च शिक्षणामध्ये इंग्रजीला पर्याय नाही हे खरे आहे. पण मी मूळ प्रश्नाच्या संदर्भात लिहीले होते. मूलभूत शालेय शिक्षण हे मातृभाषेतून मिळाले तर भाषेच्या संकल्पना अधिक चांगल्या तयार होतात. तसेच गणिताच्या परिभाषा या नैसर्गिकरित्या आकलन होऊ शकतात. कालच ओंकार भारद्वाज या नेट-मित्राने गणिती संकल्पना निर्मिती आणि मातृभाषेतून शिक्षण याचा मेंदूविज्ञानातील नेचर या मासीकात छापून आलेला संशोधन लेख वाचायला पाठवला.

http://www.nature.com/nrn/journal/v7/n8/full/nrn1980.html

शेवटचा परिच्छेद - वाचावा

असे इतरही अनेक लेख सापडतील. यावरून मातृभाषेचे गणित शिक्षणातील स्थान महत्त्वाचे आहे हेच स्पष्ट होते.

सहमत

मातृभाषेचा माणसाच्या विचार आणि आकलन पद्धतींवर परिणाम होतो याच्याशी सहमत आहे. कुठल्या भाषेतील परिणाम अधिक चांगला होतो हा संशोधनाचा मुद्दा आहे. यावर आणखी दुवे.

दुवा १
दुवा २

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे याबद्दल दुमत नाही. फक्त प्रत्येक वेळी मराठीची तुलना फ्रेंच/जपानी/कोरियनशी केली जाते, ते तितकेसे बरोबर नाही एवढाच मुद्दा आहे.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

थोडी असहमती

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावे याबद्दल दुमत नाही.

मातृभाषेतून शिक्षणापेक्षा मुलाच्या आसपास आजूबाजूचा समाज जी भाषा* बोलतो त्या भाषेतून मुलांना शिक्षण देणे अधिक फायद्याचे होईल असे वाटते.

* ही भाषा मातृभाषा असण्याचे प्रमाण मोठे असावे परंतु तसा "निसर्गाचा नियम" ;-) नाही.

संपूर्ण सहमत;

मातृभाषेतून शिक्षणापेक्षा मुलाच्या आसपास आजूबाजूचा समाज जी भाषा* बोलतो त्या भाषेतून मुलांना शिक्षण देणे अधिक फायद्याचे होईल असे वाटते.
या विधानाला माझे पूर्ण अनुमोदन. मातृभाषेतून शिक्षण मिळाले तरच मुलांना समजते ही एक निव्वळ कविकल्पना आहे. असे भाग्य(?) सगळ्यांचे नसते. त्यामुळे मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे असला खुळचट आग्रह धरू नये. --वाचक्‍नवी

चुकीचे विधान

जपानी भाषा खरंतर खूप अवघड आहे असं म्हणतात. पण सगळं अद्ययावत तंत्रज्ञान आणि तांत्रिक परिभाषा जपानी भाषेत भाषांतरीत होत असते.

जपानी भाषेत बर्‍याच परकीय शब्दांचे भाषांतर होत नाहि केवळ लिप्यंतर होते.
मुळ भाषेतल्या शब्दाला प्रतिशब्द नसल्यास तो तसाच वापरला जातो फक्त त्यासाठी "काताकाना" ही वेगळी "लिपी" वापरली जाते. जसे पेन हे जापनिझ मधेही "पेन" असते. बॉलपेन हे (ल आणि ऑ नसल्याने) "बोरूपेन" होते. वगैरे वगैरे

तेव्हा तुमचे वरील विधान पूर्णतः चुकीचे आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पूर्वप्राथमिक शाळेत जपानी

पुण्यातील व्हिक्टोरिया किड्‌स प्री-प्रायमरी स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अगदी प्ले-ग्रुपच्या वर्गापासून जपानी शिकवतात. केजीतल्या मुलांना जपानीबरोबर संस्कृतही शिकवले जाते. बहुसंख्य मुले मराठीभाषक. ती घरी मराठी बोलतात. ती जेव्हा पहिलीत जातील तेव्हा हिंदी-इंग्रजीबरोबरच त्यांना संस्कृत आणि जपानी भाषांचेही जुजबी ज्ञान झालेले असेल.--वाचक्‍नवी

ति प्रा राईलकरसरांस?

राईलकरसरांसाठी 'ति प्रा' हे संबोधन वापरण्याचे कारण?

एक तर ते अशुद्ध आहे. तीर्थरूप वापरण्यासाठी ती.प्रा. हवे. दुसरे म्हणजे ते चुकीचे आहे. तीर्थरूप हे संबोधन आई व वडील यांसाठीच वापरले जाते.

ती फ़ॉर आईवडील

तीर्थरूप हे आईवडिलांसाठीच वापरले जाते ही गोष्ट खरीच. इतर वडील माणसांसाठी तीर्थस्वरूप(ती.स्व.) वापरायला लागते. राईलकर सरांच्या बाबतीत जर ते आपल्या आईवडिलांच्या जागी असतील तर ती.स्व. लिहायला हवे होते.

ती आणि प्रा यांचा अनुक्रम वर आला आहे असाच मराठीत लिहिला जातो. परंतु कधीकधी इंग्रजी लिहितालिहिता, डॉ आणि प्रा यांचा अनुक्रम कसा असावा याबद्दल मनात नेहमी शंका राहून जाते. मला वाटते की, अमेरिकन पद्धतीनुसार डॉ अगोदर येते आणि ब्रिटिश पद्धतीनुसार आधी प्रा. कुणी योग्य पद्धत काय असावी हे शोधून सांगेल? --वाचक्‍नवी

ती फॉर वडील मंडळीस

तीर्थरूप आई वडिलांसाठी वापरले जाते याच्याशी सहमत. वडीलमंडळींसाठी तीर्थस्वरुप वापरले जाते त्यामुळे ते ती तेच असावे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रो. डॉ.

अमेरिकन पद्धतीनुसार डॉ अगोदर येते आणि ब्रिटिश पद्धतीनुसार आधी प्रा. कुणी योग्य पद्धत काय असावी हे शोधून सांगेल?

'प्रोफेसर' होण्याकरता 'डॉक्टरेट्' मिळवावीच लागते. (भारतात लोक स्वतःला प्रोफेसर 'म्हणवुन् घेतात' ही बाब निराळी). अमेरीकेत मी तरी कुणाला प्रोफेसर असताना डॉ. लावताना पाहिलेले नाही. (अमेरीकेत अनेक डॉक्टरेट लोक नावाआधी डॉ. लावतातच असे नाही.)

(आम्ही विद्यार्थी प्रोफेसर असेल तर तसेच संबोधतो, पुर्ण प्रोफ नसेल् तर् मात्र डॉ. असे संबोधतो, अपवाद फक्त अ‍ॅडव्हाईजरचा.)

प्रोफेसर डॉ. असे जर्मन सीस्टीम मध्ये लावतात असे ऐकले आहे.

-Nile

 
^ वर