यात आश्चर्य ते काय?

यात आश्चर्य ते काय?
धर्म आणि समाजजीवन या संबंधीच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी प्यू(Pew) नावाचे एक चर्चामंडळ (फ़ोरम) अमेरिकेत आहे.या मंडळाच्या संशोधन केंद्राने अमेरिकन नागरिकांच्या धर्मज्ञानासंबंधी नुकतेच एक सर्वेक्षण केले.
त्यांनी मुख्यत्वेकरून ख्रिश्चन धर्म आणि बायबल यांवर आधारित ३२ प्रश्नांची एक आवली तयार केली . ती ३४००(तीन हजार चारशे) अमेरिकन नागरिकांना पाठविली. या प्रश्नावलीत जगातील अन्य प्रमुख धर्म आणि धर्मग्रंथ यांवरही काही प्रश्न होते.तसेच" मी धार्मिक/अज्ञेयवादी/नास्तिक आहे."यांतील एक पर्याय उत्तरदात्याने निवडायचा होता.
आलेल्या उत्तरांच्या विश्लेषणावरून असे नि:संदिग्धपणे आढळले की :"धार्मिक व्यक्तींच्या धर्मज्ञानापेक्षा नास्तिकांचे धर्मज्ञान लक्षणीय प्रमाणात अधिक असते."
"हा निष्कर्ष धक्कादायक आहे, विस्मयकारक आहे."अशी प्रतिक्रिया कांही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
***
खरे तर या निष्कर्षात आश्चर्यकारक ते काय? कारण:
..
१. धार्मिकता आणि अज्ञान यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.
..
२.धर्मातील अनेक तत्त्वे अशी असतात की त्यांच्या सत्यतेसाठी कोणताही पुरावा नसतो .त्यांवर श्रद्धा ठेवण्याविना अन्य पर्याय नसतो. म्हणून धार्मिकांना श्रद्धाळू असावेच लागते. श्रद्धा ठेवली की चिकित्सक बुद्धी कुंठित होते.
..
३. बहुसंख्य धार्मिक व्यक्ती विचारवंत नसतात तर बहुसंख्य विचारवंत धार्मिक नसतात.
..
४. जागतिक लोकसंख्येत धार्मिकांचे प्रमाण ८०% + आहे; तर नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांत नास्तिकांचे प्रमाण ८०% आहे.
..
५.वरील सत्यविधान ३ वरून दिसते की नास्तिकांचा बुध्यंक(IQ) हा धार्मिकांच्या बुद्ध्यंकाहून मोठा असतो..(हे विधान वर्गाविषयी आहे. व्यक्तिविषयी नाही.)
..
६.बहुसंख्य धार्मिकलोक रूढी, परंपरा, कर्मकांडे, चर्च/देवळे यांतील सरमनात/ कथाकीर्तनात ऐकलेली मिथके/भाकडकथा, येशूने/देवाने , संतमहात्म्यांनी केलेले तथाकथित चमत्कार इत्यादि गोष्टींनाच धर्म मानतात. अधिक विचार करत नाहीत.धर्मग्रंथ/तत्त्वज्ञान वाचत नाहीत,वाचले तर अर्थ समजून घेत नाहीत.त्यामुळे त्यांचे धर्मज्ञान वरवरचे, यथातथाच असते.
..
७.एका विचारवंताने म्हटले आहे:"पूर्वी धार्मिक होतो. पण नंतर मी धर्मग्रंथ वाचले." हे पटण्यासारखे आहे.नास्तिकतेच्या प्रसारासाठी धर्मग्रंथ हे प्रभावी साधन ठरू शकते.हे ग्रंथ विचारपूर्वक अर्थ समजून वाचणार्‍या धार्मिकाचे परिवर्तन नास्तिकात होऊ शकते.त्यामुळे अनेक नास्तिकांना चांगल्यापैकी धर्मज्ञान असते.(हिंदूंच्या बहुतेक धार्मिकविधींचे मंत्र संस्कृत भाषेत असतात. तेव्हा अर्थ कळण्याचा प्रश्नच नसतो.)
..
वरील विवेचन लक्षात घेतले तर प्यू फोरमच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष धक्कादायक वाटू नये.

लेखनविषय: दुवे:

Comments

हं

शब्द
प्रेषक विकास (गुरू, 10/14/2010 - 21:10)

आपण दिलेला शब्द पाळायचे विसरलात, फाउल! तरी मी माझ्या शब्दाला जागत आपल्याला प्रतिसाद देण्याचे थांबवले आहे. धन्यवाद.

संदर्भ :
तसे असेल तर यापुढे, तुमचे विचार पटणार नाहीत तेव्हा मी केवळ "तुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही." इतकाच प्रतिसाद देईन. इति: रिकामटेकडा

तुमचा प्रतिसाद बिनडोकपणे लिहिलेला होता आणि त्यामुळे मला उत्तराची अपेक्षाच नव्हती. त्या प्रतिसादाचा निषेध करणे इतकाच माझा उद्देश होता.

पुनर्जन्माचे तत्त्व

हिंदू धर्मातील 'अवतार' (दशावतारासारखे मुख्य अवतार, मोहिनी वगैरे उपअवतार) हे incarnation चेच एक रूप आहे ना? हिंदू हा धर्म नाही - तर जीवनपद्धती आहे - असे म्हटले तर भारतातील ख्रिश्चन व मुसलमानांनाही हिंदू का मानू नये? (शीख, जैन आणि बौद्धांना हिंदू मानण्याचा प्रयत्न मागे झाला पण त्यांनी तो फेटाळला होता असे आठवते.) आणि 'हिंदू' महासभेने 'भारतातील मुसलमानांना' मिळालेल्या १/३ जमिनीविरोधात सर्वोच्च न्यायालयात का जावे?

अवश्य

हिंदू धर्मातील 'अवतार' (दशावतारासारखे मुख्य अवतार, मोहिनी वगैरे उपअवतार) हे incarnation चेच एक रूप आहे ना?
हो आहे ना... पण त्या वास्तव धरणारे जसे हिंदू असतात तसेच रुपकात्मक धरणारे अथवा अजिबात न धरणारे देखील हिंदू असू शकतात.

हिंदू हा धर्म नाही - तर जीवनपद्धती आहे - असे म्हटले तर भारतातील ख्रिश्चन व मुसलमानांनाही हिंदू का मानू नये?

अवश्य म्हणावे... माझ्यालेखी त्यात काहीच गैर नाही. त्यांची तयारी आहे का? ते काही जालावर कुठल्यातरी टोपणनावाने वावरत, "विकास" शब्दाचा अर्थ "निर्बुद्ध" असा लावत बरळण्याइतके सोपे आहे का? ;) हिंदू जीवनपद्धतीत/तत्वज्ञानात आणि त्या अर्थाने धर्मात, ख्रिस्ताला अथवा महंमदाला अनेकातला एक प्रेषित म्हणलेले चालू शकेल पण त्या त्या धर्मियांना तसे चालू शकेल का? हा प्रश्न हिंदूंना विचारण्या ऐवजी ज्यांना तुम्हाला हिंदू म्हणायची इच्छा आहे त्यांनाच आधी विचारले पाहीजे की तुम्हाला देखील हिंदू मानावे का? नाहीतर एकाच हाताने हवेत टाळी वाजवण्याचा फोल प्रयत्न ठरेल.

आणि 'हिंदू' महासभेने 'भारतातील मुसलमानांना' मिळालेल्या १/३ जमिनीविरोधात सर्वोच्च न्यायालयात का जावे?
ह्या चर्चेत एखाद्या संघटनेवर चर्चा चालू नसून एकूण धर्म या विषयावर चालू आहे. त्यात येथील निधर्मी मंडळींना हिंदूबद्दलच बोलायचे असल्याने ती अपेक्षेप्रमाणे हिंदू धर्मावर चालली आहे. संघटनेवर नाही.

प्रति: अवश्य

रुपकात्मक धरणारे

Oh, but of course the story of Adam and Eve was only ever symbolic, wasn't it? Symbolic?! So Jesus had himself tortured and executed for a symbolic sin by a non-existent individual? Nobody not brought up in the faith could reach any verdict other than "barking mad". - The Root of All Evil?
रूपकासमोर घंटा मात्र खरी बडवावी लागते ना? की घंटेचेही काही रूपक असते?

त्यांनाच आधी विचारले पाहीजे की तुम्हाला देखील हिंदू मानावे का?

मग देव न मानणार्‍यांना तुमचे लोक हिंदू का ठरवितात?क्ष्

शब्द

आपण दिलेला शब्द पाळायचे विसरलात, फाउल! तरी मी माझ्या शब्दाला जागत आपल्याला प्रतिसाद देण्याचे थांबवले आहे. धन्यवाद.

संदर्भ :
तसे असेल तर यापुढे, तुमचे विचार पटणार नाहीत तेव्हा मी केवळ "तुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही." इतकाच प्रतिसाद देईन. इति: रिकामटेकडा

खुलासा

तुमचे जे प्रतिसाद विचारहीन असतील त्यांच्याबाबतीत माझा निर्णय राखीव होता.

असे का?

तुमचे जे प्रतिसाद विचारहीन असतील त्यांच्याबाबतीत माझा निर्णय राखीव होता.
माझे आत्ताचे प्रतिसाद आपल्याला विचारहीन वाटत नाहीत अर्थात वैचारीक आहेत हे मान्य आहे असे समजू का?

शिवाय,आपल्या खालील वाक्यात काय दिसते?

तसे असेल तर यापुढे, तुमचे विचार पटणार नाहीत तेव्हा मी केवळ "तुमचे विचार चूक आहेत. ते कसे चूक आहेत ते मी काही येथे तुम्हाला शिकवत बसणार नाही." इतकाच प्रतिसाद देईन. इति: रिकामटेकडा

त्या व्यतिरीक्त, "प्रत्येकाने स्वतःला वाटते त्या प्रकारे शब्दांच्या व्याख्या केल्या तर संवाद शक्य नाही." हे वाक्य आपल्याला आठवते का?

धन्यवाद आणि शुभेच्छा!

धन्यवाद

तुम्हाला संवादात रस नसेल तेव्हा माझे प्रतिसाद केवळ तुम्हाला संवाद टाळण्यात रस घेण्यापासून परावृत्त करण्यासाठीच असतील.

कृपया

श्री. यनावालांना प्रश्न विचारावासा वाटतो:

कृपया प्रतिक्षा किजिये. आप कतार में हय. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

हॅहॅहॅ

कृपया प्रतिक्षा किजिये. आप कतार में हय. :)

अम्रिकेत नै?

अम्रिका

अम्रिका, भारत देश कुठलाही असला तरी यासाठी कतारमध्येच जावे लागते. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

विधाने ३, ४ आणि ५

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
क्र.३ हे सत्य विधान आहे हे थोड्याशा विचारान्ती सहज लक्षात येते.
..
विधान क्र.४ हे द गॉड डिल्यूजन (रिचर्ड डॉकिन्स) या पुस्तकातून घेतले आहे. टक्केवारी थोडी कमी अधिक असेल.
..
क्र.४ प्रत्यक्ष आकडेवारीवर आधारित असल्याचे पुस्तकात म्हटले आहे. म्हणून ते सत्य मानणे योग्य आहे.
..
क्र.५: वरील क्र.४ सत्य मानल्यावर हा तर्कसंगत निष्कर्ष निघतोच.

आश्चर्य

विधान क्र.४ हे द गॉड डिल्यूजन (रिचर्ड डॉकिन्स) या पुस्तकातून घेतले आहे. टक्केवारी थोडी कमी अधिक असेल.
..
क्र.४ प्रत्यक्ष आकडेवारीवर आधारित असल्याचे पुस्तकात म्हटले आहे. म्हणून ते सत्य मानणे योग्य आहे.

जर रिचर्ड डॉकिन्स यांचे हे म्हणणे सत्य असेल तर आपण त्यांचे (त्यांच्या मालकीच्या संकेतस्थळाच्या नावाने त्यांच्या संकेतस्थळावर लिहीले गेलेले) खालील विधान देखील सत्य मानणे योग्य समजता का?

Hinduism and Buddhism offer much more sophisticated worldviews (or philosophies) and I see nothing wrong with these religions.

नक्की?

ते विधान केवळ रिबट करण्यासाठीच दिले आहे ना? माझे रिबटल येथे पहाता येईल. या धाग्यावर काही भारतीय निधर्मींची मते आहेत.
बाकी, 'विश्वासार्ह व्यक्तीची आकडेवारी घ्यावी पण निष्कर्ष तपासूनच पहावेत' वगैरे न्युआन्सेस तुम्हाला शिकवीत बसणार नाही.

असमर्थ

क्र.३ हे सत्य विधान आहे हे थोड्याशा विचारान्ती सहज लक्षात येते.

हे कळले नाही. एखादे विधान सत्य आहे किंवा नाही यासाठी पुरावा लागतो. इथे सर्वेक्षण असेल तर तो पुरावा मानता येईल. अन्यथा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे देखील "थोड्या विचारांती" लक्षात येते. पण तो विचार कुठल्या तर्कांवर आधारलेला आहे, ते तर्क सुसंगत आहेत का या गोष्टीही महत्वाच्या आहेत.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

बुद्धीमत्ता आणि ज्ञान

बुद्धिमत्तेबाबत कुठलाही निष्कर्ष काढण्यापूर्वी, हे सांगणे महत्वाचे आहे, की सदरची चाचणी केवळ धर्माबाबतच्या ज्ञानासाठी होती. एकूण ज्ञानाबाबत नाही. अमेरिकेतील नागरिकांच्या माहितीची पातळी पडताळून पाहण्यासाठी एखादी चाचणी केली, तर तिचे निष्कर्ष आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही गटांना एका पातळीत आणतील असे वाटते. त्यामुळेच नास्तिक लोकांना स्वतःच्या अनास्थेचे स्पष्टीकरण करण्यासाठी धर्मांचा अभ्यास करावा लागतो. धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांना ही निकड नसते. साहजिकच पेवच्या (किंवा प्यूच्या-मला नक्की उच्चार माहिती नाही) पाहणीत त्यांनी बाजी मारली, यात खरोखरच नवल नाही. भारतात अशी चाचणी घेतली तरी निष्कर्ष वेगळे येतील, याची खात्री नाही.

धार्मिकता आणि अज्ञान यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.

यांसारखी दर्शनी खरी वाटणारी मात्र तपशीलात गोंधळ करणारी अनेक वाक्ये मांडता येतील.
उदा.
पुरुष आणि सामर्थ्य (शक्ती) यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.
शिक्षण आणि बेरोजगारी यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.

ही वाक्ये जेवढी खोटी तेवढीच अज्ञान आणि आस्तिकता यांचे साहचर्यही खोटे आहे. अशा कुठल्याही दोन गोष्टी एका गाठोड्यात कोंबून त्यांचे सामान्यीकरण कसे करता येणार?

येथे ज्ञान म्हणजे केवळ विज्ञान (शास्त्र) हाच भाग घेतलेला दिसतो. बुद्धी ही अनेक प्रकारची असते. साहित्यिकाची प्रतिभा, चित्रकाराची कल्पकता, वास्तुविशारदांचा विचार ही बुद्धीचीच रुपे आहेत. त्यांच्यासाठी नास्तिकता ही पहिली अट असू शकत नाही. किंबहुना, आस्तिकता व ज्ञान हे परस्परछेदक असू शकत नाही. तसे नसते, तर जगातील ८० टक्के लोक धार्मिक असतानाही (लेखात म्हटल्याप्रमाणे) जगाचा व्यवहार बिनबोभाट चालू शकला नसता. शिवाय धार्मिक असणे आणि आस्तिक असणे, यांतही फरक आहेच.
आस्तिकता व ज्ञान या एकमेकांशी न जुळण्याचा प्रश्न केवळ वैज्ञानिकांपुढे उभा राहू शकतो. नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांत नास्तिकांचे प्रमाण ८०% आहे या वाक्याची संगती अशी लागू शकते. एकूण नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये (शांतता, अर्थशास्त्र इ.) आस्तिकांचे प्रमाण किती आहे, हे त्यादृष्टीने पाहणे रसप्रद ठरेल. शांततेचे पारितोषिक मिळवणार्‍यांमध्ये आस्तिकच नाही तर धार्मिक व्यक्तीही आहेत.

खुलासा

अमेरिकेतील नागरिकांच्या माहितीची पातळी पडताळून पाहण्यासाठी एखादी चाचणी केली, तर तिचे निष्कर्ष आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही गटांना एका पातळीत आणतील असे वाटते.

शास्त्रज्ञांतील आस्तिकांचे प्रमाण बघता या भाकिताविषयी मला खात्री नाही.

पुरुष आणि सामर्थ्य (शक्ती) यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.

शिक्षण आणि बेरोजगारी यांचे साहचर्य स्वयंसिद्ध आहे.

तुम्हाला "शिक्षण आणि रोजगार" म्हणावयाचे आहे असे मला वाटते. आणि त्यातही (पुरुष-सामर्थ्यप्रमाणेच) केवळ साहचर्यच नसून (साहचर्य तर आहेच पण) कारणमीमांसाही आहे.

येथे ज्ञान म्हणजे केवळ विज्ञान (शास्त्र) हाच भाग घेतलेला दिसतो.

आक्षेप पटला.

किंबहुना, आस्तिकता व ज्ञान हे परस्परछेदक असू शकत नाही. तसे नसते, तर जगातील ८० टक्के लोक धार्मिक असतानाही (लेखात म्हटल्याप्रमाणे) जगाचा व्यवहार बिनबोभाट चालू शकला नसता.

!कुंग जमातीला वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगावे लागते, त्यांच्यात धार्मिक रूढी खूपच कमी आहेत, अन्यथा ते भुकेने मरतील. असे कार्ल सगानने म्हटले आहे. आज समाजात धर्म आहे कारण धर्म ही भरल्या पोटीची बाब आहे. सुबत्ता असल्यामुळे खेळ परवडतात.

शिवाय धार्मिक असणे आणि आस्तिक असणे, यांतही फरक आहेच.

देवाचे/आत्म्याचे अस्तित्व मानल्यावर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न (=धर्म) न करणारी व्यक्ती पास्कलच्या जुगारानुसार चूकच म्हणावी लागेल. स्पिनोझाचा देव हा अपवाद मला मान्य आहे.

शांततेचे पारितोषिक मिळवणार्‍यांमध्ये आस्तिकच नाही तर धार्मिक व्यक्तीही आहेत.

या निरीक्षणावरून तुम्ही काय निष्कर्ष सुचवीत आहात?

काही नाही

या निरीक्षणावरून तुम्ही काय निष्कर्ष सुचवीत आहात?

काही नाही. नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांमध्ये ८०% नास्तिक असतात, म्हणून नास्तिक लोक अधिक बुद्धीमान असतात या निष्कर्षाला उत्तर म्हणून हे वाक्य टाकले आहे. बुद्धीमत्ता आस्तिकता किंवा नास्तिकता यांवर अवलंबून असत नाही, हे दाखविण्यासाठी. या वाक्यावरून आस्तिक माणसे अधिक शांततावादी असतात, असा निष्कर्ष कोणी काढणार असल्यास तोही अर्थातच चूक असेल.

:)

आस्तिक माणसे अधिक शांततावादी असतात, असा निष्कर्ष कोणी काढणार असल्यास तोही अर्थातच चूक असेल.

संस्थळांचे निरीक्षण केले तर कदाचित तसाच निष्कर्ष येऊ शकेल ;)
मला असे वाटते की टोकाची कौर्ये किंवा टोकाचे दयाळूपणा दाखविण्यासाठी भावनाप्रधानतेची आवश्यकता असते आणि धार्मिकांच्यात ती अधिक असते.
With or without religion, good people can behave well and bad people can do evil; but for good people to do evil — that takes religion. -- Steven Weinbergक्ष्

मजेशीर चर्चा

चर्चा व प्रतिसाद आवडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वेड पांघरून पेडगावला

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अहो आरागॉनजी, एखादे विधान सत्य मानण्यासाठी ग्रंथप्रामाण्यच हवे का? आपण स्वत: विचार करू शकतो ना? चला, विचार करूया.
*बहुसंख्य धार्मिक माणसे विचारवंत नसतात.
हे विधान सत्य आहे अथवा असत्य आहे.
समजा ते असत्य आहे. तर "बहुसंख्य धार्मिक माणसे विचारवंत असतात'' हे सत्य मानावे लागेल.आपण आजूबाजूल पाहातो, ऐकतो,वाचतो प्रत्यक्ष अनुभवतो. तसेच याच कृती मोठ्या प्रमाणावर् संपर्क माध्यमांद्वारे करतो तेव्हा काय दिसते? लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक बारा बारा तास रांगेत वेळ घालवतात. ते सर्व धार्मिक असतातच.त्यांतील बहुसंख्य विचारवंत असतात असे तुम्हाला वाटते काय? कुंभमेळ्यात पुण्यस्नान करण्यासाठी दशलक्षावधी धार्मिक गर्दी करतात त्यांतील बहुसंख्य विचारवंत असतात का? तुम्हीच तटस्थपणे विचार करा.
आता " हे सर्व खरे धार्मिकच नव्हेत.खरा धर्म कोणाला कळलाच नाही." असली वाक्ये बोलू नका. जे रूढ आहे, बहुप्रचलित आहे त्याविषयीच ही चर्चा आहे.
तर" बहुसंख्य धार्मिक माणसे विचारवंत नसतात" या विधानाच्या सत्यतेसाठी ग्रंथाधार आवश्यक आहे का?
मूळ वचन असे आहे:"जो धार्मिक असतो तो तो विचारवंत नसतो आणि जो विचारवंत असतो तो कधी धार्मिक नसतो. " यात अपवादाची शक्यता गृहीत धरून थोडी सुधारणा केली आहे. हे विधान कोणाही सुबुद्ध व्यक्तीला पटण्यासारखे आहे. आता वेड पांघरून पेडगावला जायचे ठरवले तर निरुपाय आहे.

दुरुस्ती

न्या. चंद्रचूड सिद्धिविनायकाला जात, न्या. भगवती (हे अजून भक्त असावेत), डॉ. सुरी भगवंतम (काही काळ), कलाम (हे अजून भक्त असावेत) हे ससाबाचे भक्त होते, कलामांनी अम्माला मिठी मारली, सध्याच्या राष्ट्रपतींच्या अंगात येई (आताही येत असावे), न्या. कृष्ण अय्यर हे महर्षी महेश योगीने काही काळ प्रभावित झाले होते.

आणखी थोडे श्रद्धाळू विचारवंत

धर्मानंद कोसंबी यांचा भुताखेतांवर, अद्भूत शक्तींवर विश्वास होता असे त्यांचे आत्मचरित्र वाचल्यावर जाणवते. दुर्गाबाई भागवतांचा पुनर्जन्मावर विश्वास होता. बाकी, आठवले की आणखी काही विचारवंत नक्कीच मिळतील.

मला वाटते

दुर्गाबाई भागवतांचा पुनर्जन्मावर विश्वास होता.

मला वाटते दुर्गाबाईंनी त्यांच्या प्लँचेटच्या अनुभवावरून "आठवले तसे" या पुस्तकात लिहीले आहे.

Bengal’s transport minister, Subhas Chakraborty (CPIM)

कम्युनिस्ट राज्यकर्त्यांबद्दलचा हा लेख पण वाचनीय आहे.

मुद्दा

यनावालाजी,
इथे मुद्दा (म्हणजे माझ्या उडालेल्या प्रतिसादातील मुद्दा) हा होता की अशा चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही. आपण चर्चाप्रस्ताव टाकता आणि अंतर्धान पावता. नंतर आपल्याला सोईचे वाटले तर आपण प्रतिसाद देता अन्यथा देत नाहीत. (उदा. या चर्चेतील श्री. धनंजय यांच्या एकाही मुद्याला प्रतिसाद देण्याची तसदी आपण घेतलेली नाही.) मग नेहेमीप्रमाणे चर्चा भरकटते आणि विज्ञानावादी-श्रद्धावाले यांच्यात आणखी एक कलगी तुरा होतो. असे किती वर्षे चालणार?

आता " हे सर्व खरे धार्मिकच नव्हेत.खरा धर्म कोणाला कळलाच नाही." असली वाक्ये बोलू नका.

मी प्रतिसाद देईपर्यंत थांबलात तर बरे. माझा प्रतिसाद काय असेल तो ओळखून आधीच प्रतिवाद करायचा असेल तर माझी गरज नाही. दोन्ही बाजू आपण समर्थपणे लढवताल असा विश्वास आहे. ;)

बहुसंख्य धार्मिक माणसे विचारवंत नसतात

अशा प्रकारची विधाने गोंधळ वाढवतात. बहुसंख्य म्हणजे किती? ४९%, ५१%, ७६%, ८१%? जोपर्यंत सर्वेक्षणाचा विदा नाही तोपर्यंत अशा विधानांना फारसा अर्थ रहात नाही.

याच धर्तीवर आणखीही विधाने करता येतील.
बहुसंख्य ललितवाचन करणारी माणसे कल्पनाविलास करतात.
बहुसंख्य खेळाडूंना दुखापती होतात.
बहुसंख्य पोलिस चोर नसतात.
बहुसंख्य सैनिक विचारवंत नसतात.
बहुसंख्य पोलिस विचारवंत नसतात.

जर विज्ञानाची कास धरायची असेल तर तर्क अचूक हवा आणि सबळ पुरावा हवा.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

बाकी...

बाकी असले सारखे सारखे लेख आणि चर्चा वाचल्यावर खरच पटते, "फॅनॅटीक्स हॅव नो रिलीजन"!

हा धागा आताच पाहिला

मिसळपावावर हा धागा आताच पाहिला.

:-) एंजॉय!

या

या दोन संकेतस्थळांचे 'तुझं माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना' असे झाले आहे. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

उपयुक्त दुवा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली यांनी जो दुवा वाचावा असे सुचविले तिथे जाऊन लेख आणि प्रतिसाद वाचले. उपक्रमावरील "यात आश्चर्य ते काय?'' मधे जी सात विधाने आहेत (क्र.१ ते ७) त्यांतील काहींचे, विशेषतः क्र.५चे , पुष्टीकरण त्या दुव्याच्या वाचनाने त्वरित होते.सर्व उपक्रमींनी त्या दुव्यावरील लेख आणि प्रतिसाद वाचावे; म्हणजे क्र.५ मधील तथ्याचे रोकडे प्रत्यंतर येईल. एका उपयुक्त दुव्याचे दिग्दर्शन केले त्याप्रीत्यर्थ प्रियाली यांना धन्यवाद!!

छान चर्चा आणि प्रतिसाद...!

चर्चा, प्रतिसाद वाचनीय आहेत. धन्यवाद. :)

-दिलीप बिरुटे

 
^ वर