सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण?

'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे.

दुवा

चर्चाप्रस्तावाचा हेतू उपक्रमींना याबाबत काय वाटते हे जाणून घेण्याचा आहे

  1. हे मत टिपीकल 'गेले ते दिन गेले' प्रकारचे आहे का?
  2. सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे का?

माझे मत, सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे असे आहे. मराठी संकेतस्थळांचेच जर उदाहरण घेतले तरी, फुटकळ लेखनालाही वा वा म्हणत फेटे-शेमले उडवणारे कमी नाहीत. अशा दर्जाहीन लेखनामुळे व अनाठायी स्तुतीस्तुमनांमुळे ट्रॅफिक वाढत असले तरी दर्जा खालावत चालला आहे. शुद्धलेखनाची तमा न बाळगले जाणारे लेखन, व्याकरण न पाळले जाणारे लेखन यांची भलावण मराठीचे प्राध्यापकच करत असतात. इंजिनियरांचा दर्जा कसा घसरत चालला आहे याचा प्रस्तुत संकेतस्थळावर 'विसुनाना' या सदस्यांनी दिलेला प्रतिसादही यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

तुमच्या मतांच्या प्रतीक्षेत आहे.

Comments

अरेरे

अरेरे.

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

शतकपूर्तीकडे यशस्वी वाटचाल -

ते समर्थन किंवा ती हेटाळणी योग्य किंवा अयोग्य हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही रसिकमान्य, वैचारिक, दर्जेदार गोष्टी आता संकुचित अवकाशात वावरतात असं म्हणता येईल का? हे एक प्रकारचं सुमारीकरण म्हणता येईल का?

संकुचित कोणी केले? ज्यांनी ज्ञानाची कवाडे मुक्त करायला हवी त्यांनी ती बंदच ठेवल्याने तर नाही ना?
माझ्या ओळखीच्या एका मुलीला तिचा आवाज काहीसा योग्य नाही असे म्हणून शास्त्रीय संगीत शिकण्यापासून परावृत्त केले गेले. गायचे ते पट्टीची गायिका होण्यासाठीच असा विचार असल्याने सुरांची ओळख हे लहानसे ध्येय तिच्या बाबतीत विचारातच घेतले गेले नाही.

आजकाल चित्रपटांसाठी गाणी कितीतरी लोक लिहीतात, पूर्वी काही ठराविकच नावे डोळ्यासमोर येत. आता लिहीणार्‍या काही थोड्या जणांची मक्तेदारी संपून अनेकांची चलती झाली हे मी लाँगटर्मसाठी चांगले समजते. आणि हल्लीची गाणी बरी असतात की.

दसर्‍याच्या लाख - लाख शुभेच्छा ..! तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत!

दसर्‍याच्या लाख - लाख शुभेच्छा ..! तुमच्या शुभकामना पुर्ण होवोत! काळजी घ्या - प्रेमाने पहा :)
कोणत्याही सणाप्रमाणे यावेळी हि समाजातील वेगवेगळे घटक एकत्र येतात त्यामुळे विचारांची आदानप्रदान होते.प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात.समाज हि एक मोठी ताकत असून ती कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा फार मोठी आहे हे यानिम्मित्त प्रत्येकाच्या मनावर ठसते.
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा, सोन्यासारख्या लोकांना ..!
आपल्या साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे हीच दसऱ्याची शुभेच्छा

 
^ वर