आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?

आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ? तर आजच्या वर्तमान पुढील पत्रातील बातम्या वाचा. वर आस्मान कधी नव्हे तर याच वेळी फाटले . गंगा , यमुना नद्यांनी गेल्या पन्नास वर्षात आपली सीमा कधी ही ओलांडली नव्हती त्या नद्या शहरेच्या शहरे मंदिर मस्जिद उध्वस्त करत बेफामपणे वाहत आहेत भारताच्या खेळाच्या तय्यारीचे त्यांना कांही भान आहे का? हा प्रश्न पडतो. पण गेल्या महिन्या पासून या दोघांनी ही महान भारताच्या यशावर पाणी फिरवण्याचे कार्य अविरत केले . देशाची इभ्रत पणाला लावणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा दोनच आठवड्यावर येऊन ठेपल्या असताना सोमवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर, याच स्पर्धांच्या निमित्ताने उभारला जात असलेला पादचारी पूल कोसळून २३ मजूर जखमी झाले आणि देशाची लाज गेली.राष्ट्रकुल खेळांचे उद्धाटन समारंभ तसंच समारोप समारंभ होणा-या जवाहरलाल नेहरु मैदानाजवळच हा पूल आहे. या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना म्हणजे शरमेची बाब असल्याचे जनतेचे मत आहे.वेलिंग्टन - राष्ट्रकुल क्रीडानगरीतील प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच दिल्लीत सातत्याने येत असलेल्या पुरामुळे वेगाने होत असलेल्या कामावर प्रतिकूल परिणामही होत आहे. आता यात सुधारणा झाली नाही, तर स्पर्धाच रद्द होईल, असे न्यूझीलंडचे पथकप्रमुख डेव्ह करी यांनी सांगत राष्ट्रकुल संयोजकांची झोप उडवली
पण आपल्या कलमाडी अन्ड कंपनीने याला न भिता भारताची मान , शान जगभर उंचावण्या प्रयत्न चालू ठेवले यास दाद द्यायला पाहिजे. आज त्यांच्या जागी दुसरे कोणी असते आणि भारता शिवाय दुसरा देश असता तर कधीच स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करून बसला असता.
पण नाक काटले तरी दोन भोक शिल्लक आहेत याचा ज्या प्रमाणे अभिमान बाळगणारे असतात त्याच प्रमाणे खेळ नगरीत घाण , अस्वच्छता , मच्छर असले तरी काय झाले आम्ही प्रचंड बांधकाम तर केले.
हं आता नवीन बांधकाम झाल्यावर जागेवर मलवा सामानाचा कचरा तर पडणारच. नागरिकाने घर बांधले तर त्यास हा अनुभव येतोच मग खेलग्राम येथे घाण कचरा साचला ही ओरड चूक आहे हे फक्त , राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा प्रमुखच म्हणू शकतो. आणि केलेल्या कामाचे श्रेय घेवू शकतो.
२ वर्ष बांधकाम चालू असलेला नेहरू स्टेडीयम ला जाणारा पूल काल अचानक तुटला . माध्यमांनी प्रचंड गोंधळ घातला . असा गोंधळ घातल्याने देशाची नाचक्की होते हे या मिडिया वाल्यांना कोणी तरी सांगून त्यांच्या स्वातंत्र्यावर देशाच्या मान सन्माना साठी नियंत्रण घालणे आवश्यक आहे. आता आम्ही राहिलेल्या १२ दिवसात हा पूल पुन्हा उभा करत आहोत हे या खेलग्राम आणि देल्ही PWD इजिनिअर चा आत्मविश्वास तुम्हा आम्हा भारतीयात कधी येणार देव जाणे. दोन वर्षा पासून हा पूल बांधण्यात येत असताना तो तुम्ही नीट बांधला नाही , हा पत्रकारांचा पश्न आमच्या काबिलते वर अविश्वास दाखवणारा आहे. कोठे तरी एखादी पिन ढिली राहेली असेल म्हणून पूल कोसळला हे PWD इजिनिअर चे म्हणणे मान्य केले तर बाकी पूल चांगला नवीन डिझाइन चा होता त्यात खराबी नव्हती हे तर मान्य करा.

अश्या प्रकारे ब्रिटीश साम्राज्याच्या गुलाम राष्ट्रांचे १९३० मध्ये खेळ सुरु झाल्या पासून आज पर्यंत कोणास ही न मिळालेली गलथान कारभाराचे, अस्वच्छतेचे, भ्रष्ट्राचाराचे, खराब बांधकामाचे डोपिंगची सुवर्ण , रोप्प्य , ब्राझ पदके सर्वच्या सर्व भारताने स्पर्धा सुरु होण्या आधीच पटकाविली हा एक जागतिक ओलम्पिक विक्रम आहे. त्या करता भारताच्या महासत्तेचा ढोल बडवणाऱ्या मनमोहनच्या हस्ते आणि त्यास साथ देणाऱ्या अमेरिकन अध्यक्ष ओबामांच्या अध्यक्षते खाली एका खास समारंभात सुरेश कलमाडी ,शीला दीक्षित या दोघांचा विश्वखेळरत्न (अविश्वासू कोण कुजबुजते रे मणि अय्यर ? ) हा जगातील एकमेव जागतिक पुरस्कार देवून जागतिक गोरव करण्यात येणार आहे. पुण्याच्या ओसाड बालेवाडीच्या खेळ नगरीत हा भव्य,दिव्य नेत्रसुख आकाशातील रंगीबेरंगी रोषणाई, आणि फटक्याच्या आतिशबाजीने हा सोहळा कलमाडी स्टाईल रंगणार आहे.

Comments

जबरदस्त् टोला

ठणठणपाळ महोदय,
तुम्ही हाणलेले टोले जबरदस्तच् आहेत.

कलमाडी आणि कंपनी नेटाने कॉमनवेल्थ गेम्स चे प्रतिनिधित्त्व करत् आहेत.
देशाचा सन्मान महत्त्वाचा हे आम्हालाही मान्य आहे हो...
पण ६००-८०० कोटींचे बजेट असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स ने ६०,००० कोटी अंदाजे (सरकारी आकडे २२,००० कोटींच्या पुढे जात नाहियेत) एवढ्या मोठ्या प्रमाणावर बजेट कोसळवून कॉमन् मॅनची वेल्थ ही कॉमन-वेल्थ गेम्स च्या निमित्ताने कशी उधळली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांना हातावर हात् चोळत् बसण्याखेरीज कोणताही अन्य मार्ग नाही हेच् कलमाडी ऍन्ड कंपनी व काँग्रेस सरकारने दाखवून् दिले आहे.

हे लोक गंगा यमुना पेक्षा जास्त भयंकर् आहेत. असा भारत जगाच्या सामर्थ्यशाली राष्ट्रांच्या स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकावर येतो कसा हे न कळे :(

आहे खरे हताश होण्यासारखे

आहे खरी हताश होण्याची परिस्थिती.

आता फॉल्स सीलींगसाठीच्या टाईल्स पडल्या असल्याची बातमीदेखील आहे.

याचा अर्थ स्पर्धेसाठी भराभर बांधकाम करण्याच्या नादात गुणवत्तेची काळजी घेतली गेलेली नाही. काम करण्यासाठी (प्लॅनिंग, डिझाईन तपासणे, सुधारणा करणे) पुरेसा वेळ दिला जात नाही.
http://www.deccanherald.com/content/35799/work-overtime-dikshit-cwg-cont...

मजुरांबद्दल तर बोलूयाच नको. दुर्दैवी मजूर - त्यांना नुकसानभरपाई मिळेलही.

कॉन्ट्रॅक्टरांच्या टीमबद्दल फार सांगण्यासारखे दिसत नाही.
http://www.pnr.in/html/c-org-team.htm

मला वाटते...

कदाचीत मा. सुरेशजी कलमाडी आणि मा.मु. शिला दिक्षित यांचा "कॉमनवेल्थ"या शब्दाबाबत गैरसमज होऊन, त्या दोघांच्या मधली (आणि अर्थातच त्यांच्या मायमाउली काँग्रेसची) "कॉमन वेल्थ" असा काहीसा अर्थ झाला असावा. ;)

इतरत्र दिलेल्या माझ्या प्रतिसादातील, या संदर्भातील भागः

मला शीला दिक्षीत आणि दिल्ली सरकार आणि माननीय श्री. सुरेशीजी कलमाडीसाहेबांचे अभिनंदन करत प्रसिद्धीमाध्यमांचा निषेध करावासा वाटत आहे! आत्ताच एनडिटीव्हीवर वाचले... :

मा.मु.शीला दिक्षीत म्हणाल्या की, "कुठेतरी सिलींग गळाले, सिलींग टाईल पडली, फूटब्रिज पडला इतकेच काय ते तुम्हाला दिसत आहे. आम्ही (म्हणजे दिल्ली सरकार आणि अर्थातच माननीय श्री. सुरेशीजी कलमाडीसाहेब) १००० बसेससाठी पार्कींगची व्यवस्था केली, जेव्हढी व्यवस्था आख्या जगात कुठे नाही, त्याबद्दल मात्र काहीच कौतुक नाही!"

विरंगुळा: कलमाडी इफेक्ट

ब्रिटिश प्रधानमंत्रीच्या 10, डौनिंग स्ट्रीट, लंडन येथील निवासस्थानाच्या कुंपणाची दुरुस्ती करण्यास तिथल्या अधिकार्‍याने इंग्लिश, स्कॉटिश व (अर्थात! ) भारतीय या तीन कंत्राटदारांना खर्चाचा अंदाज सांगण्यासाठी बोलविले.
इंग्लिश कंत्राटदार टेपने मोजून मापून व आकडेमोड करून खर्च 500 पौंड येईल असे अधिकार्‍याला सांगतो. " 200£ सामानासाठी, 200£ मजूरीसाठी व 100£ माझा नफा "
स्कॉटिश कंत्राटदारसुद्धा टेपने मोजतो, हिशोब करतो व शेवटी 600 पौंडाचा अंदाज सांगतो. " 250£ चे सामान, 250£ मजूरीचा खर्च व 100£ माझा नफा "
शेवटी भारतीय कॉंट्रॅक्टरची पाळी. हा टेपने मोजतही नाही व हिशोबही करत नाही. अधिकार्‍याच्या कानात " 1500 पौंड " असे कुजबुजतो. अधिकारी आश्चर्यचकित होऊन " अहो, तुम्ही काही मोजमाप घेतले नाही, काही गणित नाही. तरी एवढा मोठा खर्चाचा आकडा कसा?" परत एकदा भारतीय कॉंट्रॅक्टर त्याच्या कानात कुजबुजतो " 500£ मला, 500£ तुला व 500£
आपण इंग्लिश कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्यासाठी "
10, डौनिंग स्ट्रीटचा अधिकारी खुश! "Contract is yours!"

CWG व कलमाडी इफेक्ट असा असतो.

लाजिरवाणे आणि संतापजनक

गेल्या काही दिवसांपासून येणार्‍या 'कॉमनवेल्थ' संबंधीत बातम्या ऐकून जेवढे लाजिरवाणे झाले आहे तेवढे आजवरच्या इतिहासात भारताचे कधी झाले असेल असे वाटत नाही. आणि असं असूनही सर्व महान विभूती आमचा जणू काही संबंधच नाही असं दाखवत आहे. दिल्लीमध्ये सगळाच सावळा गोंधळ माजला आहे.
देव जाणे या काँग्रेसच्या राज्यात आणखी काय काय बघायला लागणार!!
आता कॉमनवेल्थचे प्रमुख मायकेल फेनेल यांनी आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांना तातडीच्या भेटीसाठी बोलावले आहे. बघू आता ते काय तारे तोडतात. असेही अनेक देशांचे खेळाडू येण्यास नकार देत आहेत. खेळ रद्द केलेत तर जास्त बरं होईल असं वाटतंय आता.
आपल्या सारखे सामान्य नागरिक मात्र संतापात कळफलक बदडण्याशिवाय आणखी काही करू शकत नाहीत :(

योग्य संताप

उपहास आवडला.. बराचसा पटलाही!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

>>उपहास आवडला.. बराचसा पटलाही!

+१.

ट्विट

नुकतीच वाचलेली एक ट्वीट :)

RT @waglenikhil : got this sms - suresh kalmadi tried to hang himself. But the ceiling collapsed!

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

इंटरप्रिटेशन

या गोष्टींचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन केले जाऊ शकते.

इंदिरा गांधींची राजवटदेखील भ्रष्ट समजली जात असे. त्या काळातल्या आशियाई खेळांमध्ये असे काही झाले नव्हते.

आशियाई खेळांसाठीच्या स्टेडिअमस् व इतर सोयींचे बांधकाम पूर्ण सरकारी पातळीवर केले होते. यावेळी प्रायवेट-पब्लिक पार्टनरशिपमुळे असे झाले असावे का?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

एशियाड

एशियाडमध्ये बाईंनी जातीने लक्ष घातले होते. यासाठी विविध क्षेत्रातील टॉपच्या व्यक्तींना बोलावले होते. भारतात रंगीत दूरचित्रवाणीची सुरूवातही तेव्हाच झाली.
कलमाडी असे काही करू शकतील अशी अपेक्षा ठेवणेही चूक आहे.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

फरक

१. बाईंच्यावेळी त्या ह्यात सर्वेसर्वा होत्या. आता प्रत्येक विभाग वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो व त्यावर कोणा एकाचा "अधिकार" नाही.

२. यावेळी पैसा बराच जास्त असल्याने अनेकांनी आपला सहभाग ह्या गोंधळात खास करवून घेतला आहे. त्यामुळे कित्येक कामांसाठी पैसे दिले आहेत मात्र अकाऊंटेबिलिटीच्या नावाने बोंब आहे . तिथे कोण अकांऊंटेबल आहे यात कोणाकडे कसलाही पायपोस नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सर्वेसर्वा

बाईंच्यावेळी त्या ह्यात सर्वेसर्वा होत्या.

जर केवळ कडवा सच म्हणून म्हणत असलात तर ते बरोबरच आहे. पण तसे आता नाही ही उणीव वाटत असेल तर असहमत. सार्वभौम राष्ट्रात केवळ घटना आणि कायदाच सर्वेसर्वा असायला हवे.

आता प्रत्येक विभाग वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो व त्यावर कोणा एकाचा "अधिकार" नाही.

PMO India

:)

“The best government is a benevolent tyranny tempered by an occasional assassination.” -- Voltaireक्ष्

नाही.

यावेळी प्रायवेट-पब्लिक पार्टनरशिपमुळे असे झाले असावे का?

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळे बांधलेले रस्ते, बिल्डिंगा यांच्या क्वालिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगळ्या लोकांची गरज असते. त्यांचे काम त्यांना करू देणे अथवा न देणे हे प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्टर ठरवत असतो. कॉन्ट्रॅक्टर चांगले निवडणे हे सरकारी संस्थेवर अवलंबून असते.

मी वर दिलेली लिंक पाहिल्यास लक्षात येईल की "पीएनआर इन्फ्रा" कॉन्ट्रॅक्टर (ज्यांना आता "ब्लॅक-लिस्ट" केले आहे!) ते लोक यात विशेष नैपुण्य असलेले नसावेत. इतकेच काय, त्यांना ब्रिज बांधण्याचे अनुभवही नसावेत. ते प्रायमरीली बिल्डिंग बांधणारे लोक आहेत. पुलाचे काम, मग ते अगदी फूट-ब्रिज असो, हे वेगळे असते. हे टेंडर त्यांना कसे दिले गेले ह्यावर कोणी प्रश्न विचारत नाही, हे आश्चर्य आहे.

सिव्हिल इंजिनीरिंगमधली आपल्याकडची एक अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे ह्या कंपन्या केवळ निविदा मिळवण्यासाठी ओळखीच्या पारंगत लोकांचे बायोडेटे/रेझुमी लावतात आणि नंतर त्यांना कामे न देता स्वतः कमी पैशात ती कामे करून घेतात. तेच क्वालिटी कंट्रोलचे. त्यामुळे हे असे झाले यात काही आश्चर्य नाही.

सर्व काम पी. डब्लू. डी. ने केले तर ते कदाचित अधिक चांगले होईल असे मानायला जागा आहे. पण त्यांच्याकडे काम वेळेत करण्याची शक्ती आहे का नाही, याबद्दल कल्पना नाही.
काम बरेच आधी सुरू व्हायला हवे होते असे वाटते.

सहमत +

वरील मुद्यांशी सहमत आहेच. थोडे अधिकः

तांत्रिक दृष्ट्या:

चित्राने वर म्हणल्याप्रमाणे तज्ञ आणि अनुभवी स्थापत्य अभियंत्यांचे नाव निविदेसाठी वापरले जाते. नंतर त्यांचा अनुभव आणि ज्ञानच काय त्यांना देखील घेतले जात नाही. अथवा घेतले तर ते नाम के वास्ते इतकेच. क्वालीती कंट्रोल वगैरे जर कोणी बोलले तर त्याला बाजूला सारणे हा अपवाद नसून नियम झाला आहे.

ज्या पद्धतीने कामे दिली जातात त्या पद्धतीमुळे कंत्राटदाराजवळ एकच कौशल्य असणे महत्वाचे असते, ते म्हणजे फिल्डींग लावणे... करप्शन इज व्हेरी इंपॉर्टंट इन लाईफ (सिआयव्हिआयएल) असे सिव्हिल इंजिनियरींग बद्दल कॉलेजच्या पहील्याच काही दिवसात विनोद म्हणून ऐकले होते. आता ते विनोदापेक्षा त्यावेळच्यापेक्षाही अधिक वास्तव झाले आहे. पर्ट-सिपिएम (पार्टी नाही!) चार्ट्स करून बांधकाम व्यवस्थापन त्याप्रमाणे करणे वगैरे काही प्रकार असावा असे वाटत नाही. कारण ही कामे किमान ३ आठवडे आधी पूर्ण व्हायला हवी होती, अगदी काही अडचणी समजून देखील.

प्रतिसादासाठी अवांतरः या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केले आहे. मात्र त्याचे किती पैसे आत्तापर्यंत दिले गेले, किती रिटेनेज होते हे देखील पाहीले तर बरेच काही समजू शकेल. तेच काँट्रॅक्ट्सच्या टर्म्स अँड कंडीशन्स, इतर तशाच पद्धतीच्या कामाच्या काँट्रॅक्ट्सशी तुलना करता, किती कंत्राटदारास "मैत्रीपूर्ण" होत्या यातून समजेल.

@नितिनः "आशियाई खेळांसाठीच्या स्टेडिअमस् व इतर सोयींचे बांधकाम पूर्ण सरकारी पातळीवर केले होते."

अंशतः सहमत. असे देखील ऐकलेले आहे की पुर्वीच्या भूकंपांमध्ये (भूज आणि किल्लारी) सरकारी इमारतींनी तग धरला होता इतर खाजगी इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पडल्या कारण त्यांनी अर्थातच बिल्डींग कोड्स पाळली नव्हती.

मात्र असे जरी असले तरी कामाचे व्यवस्थापन ही या संदर्भात पिड्ब्ल्यूडीची जबाबदारी आहे. त्यात निरीक्षण / इन्स्पेक्षन महत्वाचे असते. ९०-९१ साली मराविमच्या काही मोठ्या प्रकल्पांवर मी खाजगी उद्योगाकडून काम करत होतो. बिल्डर हे आमचे कंत्राटदार होते. प्रत्येक ड्रॉइंगची ऍप्रुवल प्रोसेस ही खूप कडक होती. मराविमच्या सिव्हील इंजिनियरींग खात्याकडून ज्यूनियर, सिनियर, एक्झिक्यूटीव्ह, सुपरीटेंडट, डेप्यूटीचीफ, इतक्या इंजिनियर्सकडून डिझाईन न्याहाळले जायचे. त्यात अनेक सुधारणा देखील सुचवल्या जायच्या. मग चीफ इंजिनियर्सचा शिक्का बसायचा. त्यात नडणे हा प्रकार किमान मी तरी अनुभवला नाही. नंतर साईटवर देखील काँक्रीट ओतायच्या आधी तपासणी होयची आणि रँडमली सळयांची (रिएन्फोर्समेंट बार्सची) लांबी, व्यास, त्यांचे एकमेकांपासूनचे अंतर वगैरे सर्व बघितले जायचे. चुकीचे वाटले तर होल्डवर ठेवून दुरूस्त करायला लावायचे आणि मगच कॉंक्रीट ओतले जायचे... आमची कंपनी देखील पैसा करताना क्वालीटीकडे दुर्लक्ष करत नसे...

मला सांगा यातील नक्की काय इन्स्पेक्शन म्हणून दिल्लीत झाले असेल आणि एकूणच आत्ताच्या काळात कुठल्याही पिड्ब्ल्यूडीज् मधे होत आहे?

इंदिरा गांधीच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही वृत्तीबद्दल जशी शंका येणार नाही तसेच त्यांचा देशप्रेमाविषयी पण कोणी शंका घेऊ नये. मात्र अशाच एकाधीकारशाहीतून सार्वत्रिक भ्रष्टाचार निर्माण होतो हे विशेष करून कम्युनिस्ट राष्ट्रांत आणि फरकाने विकसनशील समाजवादी राष्ट्रात होताना बघायला मिळेल. (प्रगत राष्ट्रात जेथे समाजवाद आहे तेथे खर्‍या अर्थाने लोकशाही आहे - एकाधीकारशाही नाही).

ह्या गोष्टी हळूहळू किडत गेल्या आहेत. बेडूक आता उकळत्या पाण्यात आहे.

 
^ वर