फेसबुक आणि मराठी संकेतस्थळे

द हिंदू या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार फेसबुक या संकेतस्थळाचे बहुसंख्य सदस्य हे न्यूनगंडाने पछाडलेले असतात.

दुवा

स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पना, स्व-रतपणा आणि न्यूनगंड यांचे बेमालूम मिश्रण अनेक फेसबुककरांमध्ये आढळते. असे सदस्य फेसबुकवर दीर्घकाळ पडीक राहतात असे निरीक्षण मूळ संशोधनात नमूद केले आहे.

मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांबाबतही ही निरीक्षणे खरी मानता येतील का?

माझे मतः फेसबुक व मराठी संकेतस्थळे यांमध्ये तत्त्वतः फरक नाही. त्यामुळे फेसबुकवर पडीक राहणे व मराठी संकेतस्थळांवर पडीक राहणे, आणि सोबत स्वतःची आंतरजालीय प्रतिमा जोपासणे हा अशा सामाजिक न्यूनगंडाचाच प्रकार मानावा लागेल.

Comments

अंशतः सहमत

फेसबुकच्या बाबतीत पटले, तेथे केवळ अहो रूपम् व्यवहार चालतो. चर्चासंकेतस्थळांविषयी मात्र पटले नाही.

अहो रूपम् अहो ध्वनि

अहो रूपम् असे व्यवहार चालणार्‍या मराठी चर्चासंकेतस्थळांच्या सदस्यांबाबत हे निरीक्षण लागू होईल का?

लागू होईल का?

एक दोन उदाहरणे द्या. म्हणजे स्पष्ट होइल.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कसली उदाहरणे?

कसली उदाहरणे हवी आहेत ते सांगा. म्हणजे स्पष्ट होईल.

आणखी एक लेख

एक रोचक लेख वाचनात आला

दुवा

?

लेख वाचून गैरसमज झाला आहे का?

ज्यांचा सेल्फ एस्टीम कमी असतो ती आणि स्वतःवरच प्रेम करणारी मंडळी फेसबुकावर जास्त काल घालवतात आणि स्वतःची प्रमोशनल माहिती सारखी अपडेट करतात असे म्हटले आहे.

उपक्रमसारख्या मराठी संकेतस्थळावर सेल्फ प्रमोशन असे काही नसते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सेल्फ प्रमोशनचे प्रकार

थत्तेकाका, सेल्फ प्रमोशन हे फक्त स्वतःची थेट जाहिरातबाजी करुनच करता येते का? उपक्रमासारख्या संकेतस्थळांवर एम्बेडेड सेल्फ प्रमोशन करणे अशक्य आहे काय? स्वतःची विशिष्ट अशी आंतरजालीय प्रतिमा जोपासणे एवढा निकष पाळला तर हवी तशी जाहिरातबाजी होऊ शकते.

असे व्यक्तव्य

असे व्यक्तव्य (जे द्न्यानपुर्ण आहे) उपक्रम व इतर मराठी संकेतस्थळांवर वेळ दिल्याशिवाय करता येईल का?

फालतु विषय

असल्या फालतु विषयाच्या चर्चेचा धागा सुरू करून श्री. टाईम पास एम्बेडेड सेल्फ प्रमोशनच करत आहेत असे वाटते. त्याचा काही उपयोह होईल असे वाटत नाही. श्री. टाईम पास यांना त्यांची प्रतिमा उपक्रमवर उज्वल करण्याची इच्छा असेल तर एखादा अभ्यासपूर्ण लेख लिहिल्यास ते जास्त आवडेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

फालतू का बरे?

हा विषय फालतू का वाटावा बरे? मराठी संकेतस्थळसदस्यांमध्ये असणाऱ्या न्यूरॉटिक बिहेविअरचा अँगर हा एक पैलू इथे दिसत आहे की काय? ;)) ;) ;)

मान्य

चला आम्ही नार्सिसिस्ट आणि लो सेल्फ एस्टीम वाले असल्याचे कळले. :)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अध्यात्मिक उन्नती

अशा सेल्फ रियलायझेशनमुळे तुमची अध्यात्मिक उन्नती झाली आहे. शुभेच्छा.

फरक

फेसबुकवर २५ आयडी घेऊन मज्जा करता येत नाही. :)
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

अद्न्यानात सुख

अद्न्यानात जितके सुख असते ते द्य्नानी माणसाला कधीच कळणार नाही.

सुवर्णा यांची मदत

ज्ञ कसा लिहायचा त्याबाबतीत सुवर्णा यांनी केलेली मदत तुम्हालाही उपयुक्त ठरेल.

दुवा.

चूक

का म्हणे? फेसबुकवर प्रत्येकी एकच आयडी मिळेल असे रेशनिंग आहे काय?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

उपक्रमावर

उपक्रमावर आयडी तयार करणे फेसबुकपेक्षा कमी कटकटीचे आहे.
याशिवाय फेसबुकवर चर्चा/लेख होत नाहीत त्यामुळे एका आयडीने चर्चा टाकायची, दुसर्‍याने वा! वा! म्हणायचे, तिसर्‍या आयडीने विरोधकांच्या चर्चांमध्ये खुसपटे काढायची, चौथ्याने धागा भरकटवायचा या सर्व गमतीजमती मराठी सायटींवरच शक्य आहेत.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

कोण म्हणतं नाही होत म्हणून...

एका आयडीने चर्चा टाकायची, दुसर्‍याने वा! वा! म्हणायचे, तिसर्‍या आयडीने विरोधकांच्या चर्चांमध्ये खुसपटे काढायची, चौथ्याने धागा भरकटवायचा या सर्व गमतीजमती मराठी सायटींवरच शक्य आहेत.

कोण म्हणतं? मी स्वतः असं महिनोनमहिने दळलेलं दळण बघितलं आहे. एक कोणीतरी जुनं भावुक हिंदी गाणं टाकतो. मग वीसेक लोकं त्याला रिस्पॉन्स देऊन आवडलं, आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या इ. इ. म्हणतं, मग कोणीतरी त्याच धाग्यावर दुसरं गाणं टाकतं, मग गरीबीचा विषय निघतो, आणि चर्चा वाढते... तिकडे धागा भरकटवणं ही नॉर्मच होते. कारण मुळात विषय नसतोच.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कळले नाही

हे फेसबुकवर झाले की मराठी सायटीवर कळले नाही.
फेसबुकवर असेल तर मला नवीन आहे. सुदैवाने माझे फेसबुकवरील मित्रमैत्रिणी असे वागत नाहीत. :)

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

फेसबुकवर झालंय

एक मात्र आहे की फेसबुकवर मित्र मैत्रिणी अधिक सूज्ञपणे निवडण्याची संधी असते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

एक मात्र आहे की फेसबुकवर मित्र मैत्रिणी अधिक सूज्ञपणे निवडण्याची संधी असते.

+१
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

मराठी संकेतस्थळांवरील मैत्री

मराठी संकेतस्थळांवर जो गळ्यात पडेल त्याला मित्र म्हणण्याची सक्ती असते का?

लंगडी कारणे देऊ नका

उपक्रमावर आयडी तयार करणे फेसबुकपेक्षा कमी कटकटीचे आहे.

लंगडी कारणे देऊ नका. मूळ वाक्य "फेसबुकवर २५ आयडी घेऊन मज्जा करता येत नाही." असे होते. मज्जा करणे उपक्रमावर सोपे आहे असे नव्हते.

याशिवाय फेसबुकवर चर्चा/लेख होत नाहीत त्यामुळे एका आयडीने चर्चा टाकायची, दुसर्‍याने वा! वा! म्हणायचे, तिसर्‍या आयडीने विरोधकांच्या चर्चांमध्ये खुसपटे काढायची, चौथ्याने धागा भरकटवायचा या सर्व गमतीजमती मराठी सायटींवरच शक्य आहेत.

कारण तुम्ही मराठी सायटींवरच पडीक असता. फेसबुकवर पडीक राहल्यास तिथेही दिसतील.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

संपादक महाशय

संपादक महाशय,

कारण तुम्ही मराठी सायटींवरच पडीक असता. फेसबुकवर पडीक राहल्यास तिथेही दिसतील.

याला असलेला प्रतिसाद काढलात मात्र हे वाक्य आपल्याला वैयक्तिक वाटले नाही का?
काढायचे तर सर्व वैयक्तिक प्रतिसाद काढा. असे बायस्ड संपादन कशासाठी?

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

बायस्ड संपादन नको

काढायचे तर सर्व वैयक्तिक प्रतिसाद काढा. असे बायस्ड संपादन कशासाठी?

बायस्ड संपादन नको असे माझेही मत आहे.

फेसबुकवर प्रत्येकी एकच आयडी

माझ्या माहितीप्रमाणे फेसबुकवर प्रत्येकी एकच आयडी मिळेल असे रेशनिंग नाही.

रेशनिंग

रेशनिंग आहे असे मी म्हटले नव्हते. दोन्हींचे स्वरूप वेगळे आहे त्यामुळे इथे नकली आयडींचा सुळसुळाट जास्त असतो.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

सहमत

इथे नकली आयडींचा सुळसुळाट जास्त असतो.

सहमत

"द हिंदू" = ट्याब्लॉइड रुप

एक खुसखुशीत विनोदी लेख "द हिंदू" ने टाकुन दाखवुन दिले की, पाने भरण्यासाठी त्यांनाही ट्याब्लॉइड सदृश लिखाण करावे लागते.

का?

हा लेख तुम्हाला खुसखुशीत विनोदी का वाटला?

सिरीयस

तुम्हाला तो सिरीयस का वाटला?

पहले आप

आधी त्यांनी पृच्छा केली आहे.

सहमत

आधी त्यांनी पृच्छा केली आहे.

सहमत

प्रश्न-प्रतिप्रश्न

प्रश्नाचे उत्तर प्रतिप्रश्न होऊ शकतो.

नाही

तो र्‍हेटॉरिकल असता तर चालले असते.

तो लेख सिरियस?

आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या- तुम्हाला तो लेख सिरियस का वाटला?

पहले आप

आधी त्यांनी पृच्छा केली आहे.

सहमत

आधी त्यांनी पृच्छा केली आहे.

सहमत

माहितीपूर्ण

चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
मनातल्या मनात : देवा, उपक्रमाची अशीच भरभराट होऊ दे...!

-दिलीप बिरुटे

धन्यवाद

मराठी संकेतस्थळाचे संपादक या नात्याने तुमचे काही अनुभव शेअर करता आल्यास उत्तम.

संपादक या नात्याने दोन शब्द...!

>>>मराठी संकेतस्थळाचे संपादक या नात्याने....
च्यायला, असे आहे होय. संपादक या नात्याने म्हणाल तर संकेतस्थळावरील सदस्य 'मुझे कुछ कहना है' या भावनेने मराठी संकेतस्थळावर वावरतात. आपल्या भाव-भावनांची नोंद घ्यावी असे कुठे तरी त्यांना वाटत असते. म्हणून सार्वजनिक संकेतस्थळावर ते 'वेगवेगळे आयडी' धारण करुन वावरत असतात. आपल्या लेखनाला चार प्रतिसाद यावेत. कोणीतरी कौतुक करावे ही भावना त्यांची असते. आपल्या सुप्त गुणांना वाव संकेतस्थळावर मिळतो. कधी कधी या सुप्त गुणांचा अतिरेक होतो.लेखनातून वाट्टेल ते लिहिल्या जाते तो एक प्रकारच्या भावनांचा निचराच होत असतो. अशा वेळी संपादकांना त्या भावनांच्या निच-याची कचरा काढला प्रमाणे योग्य विल्हेवाट लावावी लागते, असे संपादक म्हणून मला वाटते. आंतरजालीय प्रतिमेचा म्हणाल तर ते काही पटत नाही. मराठी संस्थळावर मानपानाची गरज नसते, संस्थळावरील आयडींपेक्षा लेखन ही तुमची प्रतिमा असते. असो, आपण आम्हाला या निमित्ताने जी दोन शब्द लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल मराठी संस्थळावरील एक पडीक आयडी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद....!

-दिलीप बिरुटे

मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर

प्रोफेसर बिरुटे, प्रतिसादाखातर धन्यवाद. मराठी संकेतस्थळचालकांच्या मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरबद्दल आपले काय मत आहे?

तथास्तु!!!

>>>मनातल्या मनात : देवा, उपक्रमाची अशीच भरभराट होऊ दे...!

आमीन्...........

मंडळी, विषयांतर टाळावे

चर्चाप्रस्तावाचे शीर्षक जरी फेसबुक वि. मराठी संकेतस्थळे असे तौलनिक असले तरी चर्चाप्रस्ताव मराठी संकेतस्थळांपुरता मर्यादित ठेवून विषयांतर टाळण्याची कृपा करावी.

+१

'चिंता करीतो मराठी स्थळांची' हा कळवळा आणून जिथे तिथे टिपे गाळणार्‍यांनी इथे थोडे आवरते घेतले तर बरे होइल.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सहमत

'चिंता करीतो मराठी स्थळांची' हा कळवळा आणून जिथे तिथे टिपे गाळणार्‍यांनी इथे थोडे आवरते घेतले तर बरे होइल.

सहमत

सोशल नेटवर्किंगचा अतिरेक

या पेक्षा सोशल नेटवर्किंगचा अतिरेक अशी चर्चा केल्यास जास्त सकारात्मक होईल असे वाटते. सोम्या, गोम्या, पम्या, रम्या अशी अनेक नावे आणि स्थळे यांचा अतिरेक झालाय असे वाटते. अर्थात आपल्याला त्यापासून वेगळे राहण्याचा अधिकार स्वतःलाच आहे. पण अरे पीएसपीओ नही जानता असे नको.

म्हणजे काय

प्रतिसाद समजला नाही. सोम्या, गोम्या, पम्या ही कोणाची नावे आहेत? रम्या नावाचे एक उपक्रमी सदस्य आहेत असे दिसते.

भांडू नका

सुजनहो,

इथे भांडू नका. गंभीर विषयावरील चर्चेचे सोवळे सर्वांनीच पाळावे. वसंत लिमये व आरागॉर्न एकमेकांच्या खोड्या काढत आहेत असे वाटते.

परंपरेचा अपमान...

मराठी लोकांना भांडू नका असे सांगणे, हा त्यांच्या परंपरेचा अपमान आहे. (ह. घ्या)

^ वर