उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
फेसबुक आणि मराठी संकेतस्थळे
सदस्य
September 18, 2010 - 2:00 pm
द हिंदू या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार फेसबुक या संकेतस्थळाचे बहुसंख्य सदस्य हे न्यूनगंडाने पछाडलेले असतात.
स्वतःविषयीच्या भ्रामक कल्पना, स्व-रतपणा आणि न्यूनगंड यांचे बेमालूम मिश्रण अनेक फेसबुककरांमध्ये आढळते. असे सदस्य फेसबुकवर दीर्घकाळ पडीक राहतात असे निरीक्षण मूळ संशोधनात नमूद केले आहे.
मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांबाबतही ही निरीक्षणे खरी मानता येतील का?
माझे मतः फेसबुक व मराठी संकेतस्थळे यांमध्ये तत्त्वतः फरक नाही. त्यामुळे फेसबुकवर पडीक राहणे व मराठी संकेतस्थळांवर पडीक राहणे, आणि सोबत स्वतःची आंतरजालीय प्रतिमा जोपासणे हा अशा सामाजिक न्यूनगंडाचाच प्रकार मानावा लागेल.
दुवे:
Comments
१००%
अगदी १००% सहमत!
लेख, प्रतिसाद नी स्वभाववैशिष्ट्यं
सदर लेख नी त्यावरच्या प्रतिसादांवरून उपक्रमींची कुठली स्वभाववैशिष्ट्यं दिसतात यावर कुणी प्रकाश टाकील काय?
संभाव्य कारणे
सामाजिक न्युनगंड असतो किंवा नाही याबद्दल मत मांडता येणार नाही. मात्र अनेक लोकांसाठी फेसबूक, ऑर्कुट, संकेतस्थळे या बाबी त्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग् झालेल्या पाहायला मिळतात व त्यामागील कारणांबाबत माझे अंदाज!
१. मनोरंजन - हे मनोरंजन कचेरीत कदाचित बेकायदेशीर असेलही, पण हे मनोरंजन करताना सदस्य आढळला तर त्या सदस्याची प्रतिष्ठा कमी होत नाही जसे याहू चॅटिंग किंवा पोर्नोग्राफी पाहताना आढळल्यास होते. (हे विधान संकेतस्थळांबाबत आहे, फेसबूकबाबत नाही. फेसबूकने बहुधा प्रतिमेला हानी पोहोचत असावी.)
२. मोरपीसे - आपण केलेल्या 'सुमार या शब्दापेक्षाही काही सुमार विशेषण असल्यास लागू होईल' अशा लेखनाला 'नोबेलच्या पातळीच्या लेखनाला मिळतील / मिळाव्यात' अशा सुखद प्रतिक्रिया येतात व चार आठ जणांशी 'आंतरजालीय मैत्रीसंबंध' अबाधित ठेवले व सर्वानुमते जो महान आहे त्याला त्याहून महान म्हंटले तर अशी शेकडो मोरपीसे मनावरून रोज फिरू शकतात या बाबीचा मोह!
३. मारामारी - इतरांची शाब्दिक मारामारी पाहायला मजा येते.
४. गंभीरपणे अभ्यास करणे - अनेक विषयांचा गंभीर अभ्यास व माहिती वाढवणे ही ओढ!
वगैरे!
चु. भु. द्या. घ्या.
उपक्रम जिंदाबाद
मुद्देसूद मुद्दे
मुद्देसूद यांनी मुद्देसूद मुद्दे मांडले आहेत. मुद्देसूद यांचे मुद्देसूद मुद्दे मांडल्याबद्दल आभार.
+
>>मारामारी - इतरांची शाब्दिक मारामारी पाहायला मजा येते
आम्हाला मारामारी करायला पण आवडते.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
माफ करा
नितिन् थत्ते,
जे आपण करताना दिसतच आहात ते मी करतो हे सांगण्यामुळे चर्चा पुढे गेल्यासारखी वाटत नाही हे मत मांडण्याबद्दल माफ करा.
उपक्रम जिंदाबाद