मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले

मराठी शाळांना परवानगी न देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करून मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. हजारो विद्यार्थी पालकांसह स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी १९ जूनच्या परिपत्रकाची राज्यभर होळी केली आणि मराठी माध्यमातून शिकण्याच्या मूलभूत हक्कासाठी रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले.
गेल्या आठवड्या पासून हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठींब्या शिवाय गाजत आहे. आता आपणच लढा दिल्या शिवाय मराठीची अवेहलाना थांबणार नाही हे जेंव्हा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या लक्षात आले तेंव्हा सर्व शिक्षण प्रेमींनी एकत्रित येवून स्वतः:च आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षा कडे पाठिंब्याची भिक न मागता स्वबळावर लढविण्याचे ठरविले. महाराष्ट्रा मध्ये मराठीचा मुद्दा वापरून अनेकांचे महाल राजवाडे , गढ बांधून झाले आहे,पण मराठीची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस खालावतच आहे. आधी ती राजदरबारा बाहेर फाटकी वस्त्रे घालून उभी तरी होती. या राजकीय आंदोलनां मुळे तीला नवीन वस्त्रे मिळण्या ऐवजी तीला अजून कसे निवस्त्र केले जाईल याचा महाराष्ट्रातील शिक्षण खात्याने चंगच बांधला. आणि त्यातून त्यांनी एक अजब फतवा काढून मराठी शाळांना परवानगी नाही असे फर्मान काढले एवढेच नव्हे तर राज्यात हजारो विना परवाना चालणाऱ्या इंग्रजी शाळांना आळा घालण्या ऐवजी मराठी शाळा चालवल्या तर रुपये एक लाख दंड आणि तरीही बंद नाही केल्या तर रोज रुपये दहा हजार दंड आकाराला जाईल अशी धमकी दिली . यावेळी मराठीच्या तव्यावर लोणकढी साजूक बेळगावी तूप घालून पुरणपोळी उत्सव साजरा करत ढेकर देणारे आणि आमची जगात कोठेही शाखा नाही म्हणत मराठीचे खरेखुरे कैवारी आम्हीच आहोत अशी वाघ की सिंह गर्जना करणारे या फतव्याशी आपला जणू कांही संबंध नाही अश्या वृतीने आपआपल्या गुहेत घोरत पडले होते. कारण बहुतेक बहुसंख्य विनापरवाना चालणाऱ्या इंग्रजी शाळां बरोबर यांचे जाणता राजाच्या शब्दात सांगायचे झाले तर तोडपाणी झालेले असेल .
अखेर मराठी शिक्षण प्रेमी जनतेनेच स्वत: च आवाज उठवला हे बरे झाले. आपणही यात सामील होवू या !!

Comments

जरा मदत करा बरं...!

ठणठणपाळ, १९ जूनचे काय परिपत्रक होते जरा शोधण्यासाठी मदत करा बरं आणि सापडले तर मराठी संकेतस्थळावरील लोकप्रिय मराठी अशा मिसळपाव मराठी संकेतस्थळावर ''मराठी शाळा बंद करण्याबाबत...चर्चा करण्यासाठी येता आले तर या बरं !

मी सकाळपासून १९ जूनचे परिपत्रक काय आहे ते शोधतोय. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर १९ जूनचे सर्व परिपत्रक चाळले पण वरील विषयी काही सापडेना. :(

+१

असेच म्हणतो. नुकतेच 'तिकडे' तो जी आर नसून सर्क्युलर असावे असा नवा गोंधळ उडाला.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अर्रर्र...!

>>>नुकतेच 'तिकडे' तो जी आर नसून सर्क्युलर असावे असा नवा गोंधळ उडाला.
अर्रर्र...! अशी गडबड दिसते तर..! पण ते शासनाचे पत्र आहे तरी काय ?
संस्थाचालकांचे काही हितसंबंध गुंतल्यामुळे त्यांनी आंदोलन कर्त्यांना 'मराठी भाषेची' 'मराठी शाळांची होणारी गळचेपी' अशी गोळी दिली तर नसेल अशी शंका येत आहे !

-दिलीप बिरुटे

मराठी शाळांच्या बचावासाठी

गोदवरी शाळा हि ला बन्द् करनयचा शाळांच्या सन्चलकचा दवा आहे. कुरपया ती वचावन्या मदत् करावी.गोदवरी शाळा,कोकनीपाड,दहिसर्(पु),मुबई-४०० ०६८

 
^ वर