आता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.

वाचा!! आणि विचार करा!! खरच आपण अतिरेक्यान विरुद्ध, दहाषदवादा विरुद्ध लढण्यास तय्यार आहोत का? आज ६३ वर्षा नंतर ही काश्मिरी जनता मनाने भारतीय होवू शकली नाही हे सत्य आहे. यास पाकीस्थान कारणीभूत आहे हे रडगाणे आपण किती दीवस गाणार आहोत . पाक पेक्षा आपल्या सरकारची कच खावू धोरणे या दुरावास्थेस कारणीभूत आहेत. नक्षलवाद्या विरुद्ध सैनिक कार्यावाई ची अतिरेकी भाषा वापरणारे भारत सरकार काश्मीरला अजून अधिक स्वायत्तता सोन्याच्या ताटात पेश करत आहे.
भारतातील इतर राज्यांपेक्षा काश्मीर अधिक स्वातंत्र स्वायत्त आहे. तरीही अजून काय पाहिजे.

मुस्लीम व्हा, नाहीतर काश्मीर सोडा!
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
मुस्लीम धर्म स्वीकारा, नाहीतर काश्मीरमधून बाहेर पडा, अशी धमकी मुसलमानांनी शिखांना दिल्यामुळे काश्मीर खो-यात एकच खळबळ उडाली आहे.
काश्मीर खो-यात सध्या सरकारविरोधी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिखांनी सहभागी व्हावे अथवा येथून निघून जावे, असे निनावी पत्रक शीख समाजाच्या अनेक नेत्यांना पाठवण्यात आले आहे. येथे राहून येथील सर्व फायदे आपण घेता, पण आंदोलन करण्यात मात्र मागे राहता, हे योग्य नाही, असा आरोप या पत्रकात शिखांवर करण्यात आला आहे.
अर्थात शीख हे लढवय्ये असल्यामुळे त्यांनी तेथेच खंबीरपणे या दुष्ट शक्तींविरुद्ध लढा द्यायचा असे ठरवले आहे. अली शहा गिलाणी या फुटीरतावादी नेत्यांनी मात्र सांगितले की, हे पत्र म्हणजे खोडसाळपणा आहे. शिखांनी घाबरायचे अजिबात कारण नाही.
शीख घाबरले नसले तरी, भारतीयांनी चिंता व्यक्त करावी अशीच परिस्थिती असल्याचे दिसते आहे. स्थानिक तरुणांना हाताशी धरून तेथे सतत हिंसाचार माजवण्याची मोहीम पाकिस्तानही गुप्तहेर संघटनेने चालवली आहे.
आश्चर्य म्हणजे शिखांना आलेल्या या धमकीबाबत काश्मीर सरकार अथवा केंद्र सरकार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत अद्याप काही मत व्यक्त केलेले नाही.
गेली काही वर्षे पाकिस्तानात हिंदूंना आणि शिखांना मुस्लिमांच्या छळाला तोंड द्यावे लागते आहे. यामुळे शेकडो कुटुंबे बेकायदा भारतात आली आहेत. आता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.

Comments

हे वाचा

हे वाचा
ते असा का करू शकतात त्याचा हे मूर्तिमंत उदाहरण
तो नेहरू सुद्धा त्यांच्यातलाच होता.
>> I am by culture a Muslim, and I am a Hindu only by accident of birth.- Prime Minister
Jawaharlal Nehru

>>त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय.
त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो.

खरे दुश्मन इथले राजकारणी लोक आहेत,
सत्तेसाठी हा देश सुद्धा विकून खातील, एवढेच नाही तर त्यांचे तळवे सुद्धा चाट्तील, हि लोक.

त्या लोकांचा काय डाव आहे ते इथून कळेल

घंटा

कोणत्यातरी फालतू पुस्तकाचे संदर्भ चालणार नाहीत.

सहमत

तुमच्याशी पुर्ण सहमत पुस्तकाऐवजी काहितरि ठोस मत मांडा

स्पष्ट करा

तुमच्या पहिल्या लिंकचा उद्देश समजला नाहि कृपया स्पष्ट करावे

काही काळजी करू नका विजू भाऊ,

काही काळजी करू नका विजू भाऊ,
everthing is fine .
आणि उद्देश वगेरे काही नाही हो, कोणीतरी आपले उगाचच नावे ठवत आहे आणि मी टाळ्या पिटत आहे.
एकदम मस्त चालेले आहे, काश्मिरात,
तिथे मुल्सिम आणि हिंदू, सिख एकदम गुणा गोविंदाने राहत आहेत,
काश्मीर मधली जनता आता पूर्णपणे आपल्या बाजूने आहे,
आणि आपल्या हुशार, मातब्बर, कणखर (अश्या अनेक विशेषणांनी नटलेल्या ) राजकारण्यांनी एकदाचा तोडगा काढलाच आहे.

तव्हा मस्त खा,प्या आणि झोपा , विचार करूच नका.

आणि हो,
जर विचार करायचाच असेल तर
हि एक प्रतिक्रिया वाचा ,
http://www.misalpav.com/node/13500#comment-228186
(आपल्या देशाचा असा अपमान! हे देशद्रोही नाहींत?
प्रेषक सुधीर काळे दि. शनी, 21/08/2010 - 12:33.)

आणि हो फोटो पाहून शेवटी ते 'मेरा भारत महान' वगेरे म्हणायला सुद्धा विसरू नका, बरं का !

१२५ कोटी जनसंख्या असलेल्या देशातील ५-५० लाख माणस दुर्घटनेत मेली

खासदार पगारावरून भांडत होते , जेथे भारतासारख्या बलाढ्य देशाचा पंतप्रधान एक शीख आहे , तेंथे काश्मीर मध्ये भारतीय लढवय्या शीख लोकांना एक तर मुस्लीम धर्म स्वीकारा, नाहीतर काश्मीरमधून बाहेर पडा, अशी धमकी मुसलमानांनी शिखांना दिल्यामुळे काश्मीर खो-यात शीख समाजात एकच खळबळ उडाली आहे. याचे कोणास सोयरे सुतक नव्हते.आणि मुर्दाड सरकार संरक्षण देण्याची भाषा करत होते. तर दुसरीकडे अमेरिकेचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्रोमन यांनी भोपाळ प्रकरण बंद करा डाऊ वरील कार्यवाई रद्द करा, नाही तर जागतिक बँके कडून मिळणारे कर्ज ( मदत नव्हे ) रोकण्यात येईल.असा मेल नियोजनाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालियांना पाठवला . पण या धमकी कडे दुर्लक्ष करत मनमोहन सरकार अणु विधयक पास करण्यात मगशुल होते. १२५ कोटी जनसंख्या असलेल्या देशातील ५-५० लाख माणस दुर्घटनेत मेली तर या घुबडांचे फावणारच आहे. त्यांच्या प्रेतावरचे रक्त शोषण्यास हे तय्यारच आहे. देशाची एव्हढी बरबादी करून सुद्धा अणु करार मुळे देश अमेरिकेच्या संहारक अस्त्रे कारखानदाराच्या दावणीला बांधल्या मुळे जगात मनमोहनच उत्कृष्ट पंतप्रधान असल्याचे ढोल अमेरिका पिटत आहे , आणि आपण त्यावरच खुश आहोत.

अभिप्राय

शिख् पण् अतिरेकी होतेच्..एकेकाळी..खलिस्तान्

 
^ वर