ओपनसोर्स
ओपनसोर्स चळवळ, त्याचे फायदे-तोटे, व त्याबद्दल सर्वकाही http://www.opensource.org/ ह्या सायटीवर वाचायला मिळते. आयटीमधे काम करणाऱ्या सर्वांना ह्या चळवळीची ओळख आहे.
ओपनसोर्स प्रणाली "मुक्तपणे कसाही वापर करायला मुभा" ते "फक्त वैयक्तिक वापराला मुभा" अशा टोकांमधे थोड्याफार फरकाने वापरता येते. त्या प्रणाली सोबत असलेल्या मिळणाऱ्या वापराची मर्यादा काय आहे हे समजुन घेऊन त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करु शकतो. सगळ्यात चांगला प्रकार म्हणजे अशा प्रणाल्यांसोबत त्याचा सोर्सकोडही दिला जातो..व तो कसाही बदल करुन वापरण्याचीही परवानगी असते. त्याचा व्यावसायिक उपयोगही करण्याची परवानगी दिली जाते. लिनक्स, ओपन ऑफिस अशी अनेक चांगली उदाहरणे असली तरी सोर्स्फोर्ज.नेट (sourceforge.net) वर अनेक चांगल्या दर्जाची उदाहरणे पाह्यला मिळतील.
जाहिरातीवर उत्पन्न मिळवुन लोकांना वापर विनामोबदला करु देणाऱ्या प्रणाल्या (गुगल, स्काईप) ह्या वर्गात मोडत नाहीत.
भारतात ही चळवळ कमी प्रमाणात असली तरी झपाट्याने चांगला बदल होतोय. गमभन, बरहा, इपिक ब्राऊजर असे ठळक माइलस्टोन आता दिसु लागले आहेत.
मला नेहमीच ह्या चळवळी मागील कार्यकारणभाव काय असु शकेल असा प्रश्न पडतो व दरवेळेस नवे उत्तर मिळते. एखादी व्यक्ति, संस्था एखादे सॉफ्टवेअर फुकट कसे देऊ शकते? हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर माझ्या पीसीला काय धोका होऊ शकतो? अशा साध्या प्रश्नांपासुन अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात (खऱ्या अर्थाने).
पण ज्या गोष्टी नजरेसमोर येतात त्यामुळे त्यातुन काही निष्कर्ष काढणे सोपे गेले व ते हे आहेत-
१. ब्रॅन्डींग व मार्केटींग - ह्यात स्वताचे व कंपनीचे दोघांचेही ब्रॅन्डींग करता येते. एखाद्या व्यक्तिने ओपनसोर्स सॉफ्टवेअर तयार केले असेल व त्यास २५ लोकांनी जरी वापरले असेल तर अशा व्यक्तिला स्वताचा सीव्ही (रेझ्युमी) वेगळा लिहिण्याची गरज नसावी.
कंपनी एखादे मिनी ओपनसोर्स सॉफ्टवेअर मार्केटमधे देऊन स्वतःच्या मोठया कमर्शियल सॉफ्टवेअरचे ब्रॅन्डींग करु शकते. सीमीत कालावधीचा वापर करण्याची मुभा असलेल्या सॉफ्टवेअरपेक्षा २-५ युझरला आयुष्यभर विना-मोबदला ते वापर करु दिले तर ते त्यांना जास्त सुरक्षित वाटते. एकदा अशी स्वय लागली की, आपसुकच कमर्शियल सॉफ्टवेअरची मागणी वाढते.
पॅरॅसाईट को-ब्रॅन्डींग हा ही त्यातीलच प्रकार.
२. बिझनेस मिळवणे- लोकांना सवय लागणे, त्या सॉफ्टवेअरचा वापर करुन त्यातील खास फिचरची सवय लागणे, हा सगळ्यात मोठा फायदा. त्यामुळे कमर्शियल युझसाठी मोठ्या कंपन्या अशा ओपनसोर्स कंपुला, किंवा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊ शकते कारण त्यांना लाजेखातर किंवा, त्यांच्या स्वतःच्या ब्रॅन्डींगची काळजी असल्यामुळे ओपनसोर्स सॉफ्टवेअर वापरता येत नसते. उदा. ड्रुपल जर एखाद्या व्यावसायिक संस्थेला वापरायचे असेल तर ड्रुपल त्यास आठकाठी आणू शकते. तसेच स्वतःहूनच अशी संस्था ड्रुपलवाल्यांना त्यांच्यासाठी काही खास फिचर असलेले कमर्शियल ड्रुपल करुन घेईल. म्हणजेच येथे ड्रुपलला आपसुकच नवा बिझनेस मिळतोय.
३. युनिव्हर्सिटीतील विद्यार्थांनी प्रोजेक्ट करणे व त्यातुन निर्माण झालेले सॉफ्टवेअर ओपनसोर्स म्हणून देणे. हा प्रकार भारतात व्हायला अजुन काही दशकं लागतील.
४. एखाद्याची घातक अशी मोनोपली मोडून काढण्यासाठी निर्माण केलेली प्रणाली. मग समाजात त्यामागे असलेल्या संस्थांना एक वलय प्राप्त होते. सन, ओपन ऑफिस, मायक्रोसॉफ्ट अशी उदाहरणे ह्यात आहेत. सरळ-सरळ लढाई लढता येत नसेल तर आडून वार करुन मग त्याद्वारे इतर बिझनेस मिळवणे हा उद्देश असणे हे ही मला वाटते.
इतरही नोबल कारणे असतील, वरवर नोबल दिसणारी कारणे असतील, पण एकंदरीतच माझ्यामते "व्हाट इज इन इट फॉर मी" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय जगातील कोणतीही व्यक्ति अशा लश्करी भाकऱ्या भाजायला जाणार नाही.
Comments
अंशत: असहमत
दिलेली चारही कारणे पटली.
कॅनॉनिकलमध्ये शटलवर्थ पैसे ओततो म्हणून तर उबुंटू वाढते आहे.
काही दुरुस्ती: ओपनसोर्स हे मोफत असतेच असे नाही. ओपनसोर्स म्हणजे जेव्हा उत्पादन दिले जाईल तेव्हा त्याचा सोर्सही दिला जाईल. 'ओपनसोर्स असणे' या गुणधर्माचे निर्बंध 'उत्पादन मोफत असावे की नाही' याविषयी नाहीत.
फायरफॉक्स मध्ये गूगल जाहिरातीची जागा विकत घेते.
ओपनसोर्स म्हणजे...
---ओपनसोर्स म्हणजे जेव्हा उत्पादन दिले जाईल तेव्हा त्याचा सोर्सही दिला जाईल.--- हे जरा विस्तृत करुन सांगा.
उदाहरण
रेड हॅट एंटरप्राईज हे खूप चांगले उदाहरण आहे. रेड हॅट लिनक्सचे फेडोरा हे उत्पादन वैयक्तिक वापरासाठी मोफत आहे, ओपनसोर्ससुद्धा आहे. रेड हॅट एंटरप्राईज हे व्यावसाईक उत्पादनही मोफतचे ओपनसोर्सच आहे. परंतु त्यात काही बदल करून देण्यासाठी, नियमित दुरुस्ती पुरवण्यांसाठी (अपडेट) रेड हॅट पैसे आकारते. त्यांचे ट्रेडमार्क (व्यवसायनाम?) वापरण्यासाठीसुद्धा पैसे द्यावे लागतात.
कमर्शियल ओपनसोर्स
ओके. "रेड हॅट एंटरप्राईज हे व्यावसाईक उत्पादनही मोफतचे ओपनसोर्सच आहे." ही वेगळी छटा आहे. वर अशीच एक छटा दिली आहेच. मी अशीही एक प्रणाली पाहिली आहे की जी कमर्शियल ओपनसोर्समधे येतात. ह्यातील नुसते ओपनसोर्स वापरले तर् ते इतके स्लो परफॉर्म करायचे की, वैताग यायचा. त्यांना संपर्क साधला तर ते म्हणाले की, बदल करुन द्यायला पैसे द्या!
पूर्णपणे खरे नाही
हे किंचित खरे असले तरी उबुंटूच्या वाढीमागे ते एकमेव कारण नाही. (या वाक्यावर असहमती असल्यास वाद घालता येईल.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत
+१.
एकमेव कारण नक्कीच नाही. कदाचित हे व्हाइस्-व्हर्सा असेल. म्हणजे, उबुंटू लोकांच्या सहभागाने वाढत आहे, म्हणून शटलवर्थ पैसे ओतत असेल.
||वाछितो विजयी होईबा||
काही स्टेक्स मिळणार?
खरे आहे, त्यामुळे त्याला काही स्टेक्स मिळणार असतील तर चांगलेच आहे.
राहूनच गेले...
राहूनच गेले...खालील प्रश्न-
अशी ओपनसोर्स सदृश चळवळ इतर क्षेत्रात आहे का? असा विचार केला तर काही उदाहरणे डोळ्यासमोर येतात- मोफत शस्त्रक्रिया, पानटपरीवाला जाणाऱ्या-येणाऱ्यासाठी एक गायछापची पुडी काऊंटरवर ठेऊन देतो. सेल ह्या प्रकारात येईल का? - काईंड ऑफ!
मोफत शिबिरे
बर्याच मोठ्या रुग्णालयांकडून मोफत तपासणीची शिबिरे आयोजित होतात. उदा. हाडांसाठी प्रसिद्ध अशा रुग्णालयाकडून मध्यमवयीन+ लोकांसाठी अस्थिभंग तपासणी, इतर मोठ्या रुग्णालयांकडून हृदयाची/रक्तातील साखरेची तपासणी, अशी शिबिरे आयोजित केली जातात. मग त्यामध्ये जे रुग्ण सापडतील, त्यातील बरेच जण हे त्या रुग्णालयांचे भावी ग्राहक बनतात आणि मोफत शिबिरांचे अर्थाकारण यशस्वी होते.
ओपनसोर्स सॉफ्टवेअर अशाच अर्थकारणावर चालत असावे.
||वाछितो विजयी होईबा||
ओपनसोर्स आणि फ्री सॉफ्टवेअरमध्ये गल्लत
बरहाचे संकेतस्थळ तपासले. बरहाचा कोड उपलब्ध नाही. म्हणजे ते मोफत वापरासाठी उपलब्ध आहे, पण बरहाने ऍ ऐवजी अॅ प्रिंट करावे असे मला वाटत असेल तर त्यासाठी आवश्यक तो बदल करण्यासाठी त्यांच्या कोडमध्ये मला बदल करता येणार नाही.
ओपन सोर्स मध्ये सोर्स कोड हा तपासणी/सुधारणा-बदल करण्यासाठी उपलब्ध करवून दिला जातो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
यु ह्याव ऍन आय ऑफ इगल!
--ओपन सोर्स मध्ये सोर्स कोड हा तपासणी/सुधारणा-बदल करण्यासाठी उपलब्ध करवून दिला जातो.---
सहमत!
बरहा ख-या अर्थाने ओपनसोर्स नाही. त्यावर जाहिरातीही नसल्यामुळे मला तसे वाटत होते. यु ह्याव ऍन आय ऑफ इगल!
चांगला विषय
चांगले मुद्दे.
ओपन सोर्स देण्यामागची कारणे काय असावीत याबद्दलचे विचार वाचलेत. सगळी कारणे पटली.
तुमच्या कारणात काही कारणे कदाचित जोडता येतील.
कमी जबाबदारी:
ओपन सोर्स (अगदी गुगल/सन वाल्यांचे नसले तरी) देण्यामधे जबाबदारी कमी असते. म्हणजे काही बग निघाला तर घेणारा त्याचे वाईट वाटून घेत नाही. तो त्या डेवलपमेंट प्रोसेसचा एक भाग समजला जाऊ शकतो. (टेस्टींग). यामुळे विकणार्याला जेवढे सपोर्ट साठी माणसे ठेवावी लागतात ती सगळी वाचतात. मग या अनुभवाचा विकणारे सॉफ्टवेअर करताना उपयोग करता येईल.
स्वतःसाठी केलेले दुसर्यांना देणे:
स्वतःसाठी केलेली सॉफ्टवेअर्स जर का विक्रियोग्य (मार्केट अगदी लहान असेल तर) नसतील तर ती फुकट देणे. आपल्या कडचे शिवाजी, बरहा ही कदाचित यातील उदाहरणे असतील.
जनचळवळ म्हणूनः
एकदा ओपनसोर्स झाले की त्यात कोणीही सहभागी होऊ शकतो. लोकांमधे बरेचदा काम करण्याचे पोटेन्शियल असते पण विकण्याचे नसते. काम करायला व त्याचा अनुभव घ्यायला लोक तयार होऊ शकतात. एखादी गोष्ट फुकट मिळते तर तीस मदत करावी असे वाटणे साहजिक आहे त्यातून असे घडत असावे.
देणगी मिळवून चालवणे:
जनचळवळी देणग्यांवर (मेहनत वा पैसा) चालतात. हल्ली मात्र देणगीवर फायदेशीर व्यवसाय करणारे लोक आहेत. ते जनचळवळसदृश्य दृश्यपटल ठेवतात. पण देणग्यातील पैसा कधी कधी अमाप असू शकतो.
मला तसा सॉफ्टवेअर क्षेत्राचा ताजा अनुभव बिलकूल नाही. पण समाजात इतर अशाच घडत असलेल्या गोष्टींवरून थोडाफार अंदाज बांधला जातो.
जालातील काही उदाहरणे.
विकी, गुटेनबर्ग जनमेहनतीवर चालते. सध्याच्या काही एन् जी ओ या देणग्यांवर चालतात.
आपल्या येथेच मराठी स्पेलचेकर (शंतनु), उपक्रम, मनोगत चालवणारे आहेत.
तुमच्या म्हणण्यानुसार अजून इकडे ते वारे आले नसतील पण येण्याचे प्रयत्न करण्याची गरज मात्र आहे.
प्रमोद
टेरीफिक पॉइंट!
..कमी जबाबदारी:
ओपन सोर्स (अगदी गुगल/सन वाल्यांचे नसले तरी) देण्यामधे जबाबदारी कमी असते. म्हणजे काही बग निघाला तर घेणारा त्याचे वाईट वाटून घेत नाही. तो त्या डेवलपमेंट प्रोसेसचा एक भाग समजला जाऊ शकतो. (टेस्टींग). यामुळे विकणार्याला जेवढे सपोर्ट साठी माणसे ठेवावी लागतात ती सगळी वाचतात. मग या अनुभवाचा विकणारे सॉफ्टवेअर करताना उपयोग करता येईल....
टेरीफिक पॉइंट! ही शक्यता आहे
...देणगी मिळवून चालवणे:
जनचळवळी देणग्यांवर (मेहनत वा पैसा) चालतात. हल्ली मात्र देणगीवर फायदेशीर व्यवसाय करणारे लोक आहेत. ते जनचळवळसदृश्य दृश्यपटल ठेवतात. पण देणग्यातील पैसा कधी कधी अमाप असू शकतो....
ही अंदरकी बात जास्त भावते.
नफा
उबंटूसारख्या संस्थांना नफा होतो का? मासॉसारख्या व्यावसायिक कंपन्या आणि उबंटूसारख्या ओपनसोर्स कंपन्या यांच्या उलाढालीची तुलना बघायला आवडेल.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
जमणार नाही
कॅनॉनिकल ही मार्क शटलवर्थ यांच्या पूर्ण मालकीची खाजगी कंपनी आहे. त्यामुळे ती कोणत्याही शेअर बाजारात नोंदलेली नाही. आणि मार्क शटलवर्थ यांच्याकडे १००% मालकी असल्याने कंपनीची आर्थिक स्थिती उघड करण्यास ते बांधील नाहीत, असे या दुव्यावर झालेल्या चर्चेतून दिसून येते.
मार्क शटलवर्थ यांच्या या मुलाखतीत ते म्हणतात की, 'कॅनोनिकल ला जराही फायदा होत नाही.' अर्थात, कॅनॉनिकल ही तोट्यात चालणारी कंपनी आहे.(कर्जबाजारी नाही, पण 'ना नफा-ना तोटा' अशीही नाही.)
उलटपक्षी, मासॉ चे एकच उद्दीष्ट आहे.
||वाछितो विजयी होईबा||
अडोब पीडीएफ
ओपन ऑफिसमधे अडोब पीडीएफ आधी आले. त्यामुळे ते मायक्रोसॉफ्टला ऑफिसमधे टाकावे लागले; अर्थातच ह्याचा अर्थ असा की, मायक्रोसॉफ्टला मोठ्या प्रमाणात un-अर्थ करावे लागले असेल.
अडोबी पीडीएफ ऑफिसात??
काही तरी गफलत होते आहे. अडोबी रीडर फुकट असले तरी ते ओपन ऑफिस / मासॉ ऑफिस बरोबर येत नाही.
||वाछितो विजयी होईबा||
सेव्ह ऍज
सेव्ह ऍज करुन आपल्याला पीडीएफ मधे कन्व्हर्ट करता येते. ओपन ऑफिसमधे ही सुविधा आधी आली मग ऑफिस २००७ मधे आली. (आणावी लागली)
ओह्
कोलगेट हे टूथपेस्टशी, झेरॉक्स हे फोटोकॉपीशी आणि अडोबी हे पीडीएफशी समानार्थी शब्द झाले आहेत.
||वाछितो विजयी होईबा||
अडोबी फोटोशॉपमधे उघडता येते
तसे वाटायचे कारण म्हणजे ओपन ऑफिसमधे तयार केलेली पीडीएफ अडोबी फोटोशॉपमधे उघडता येते व् एडीट करता येते. अन्य साधने वापरुन उदा- नायट्रो, केलेली पीडीफ मला मागील वेळी अडोबी फोटोशॉपमधे उघडता आली नव्हती व संदेश आला की, ही पीडीएफ चालणार नाही, दुसरी आणा!
सेव ऍज
ओऑ आणि मासॉव यांच्यात पीडीएफ 'बनविण्याची' सोय असते, त्याचा उल्लेख असावा. अर्थात, ती सोय आधी कोणी दिली ते मला स्मरत नाही.
चर्चा आवडली
चर्चा आवडली. विश्लेषण आणि पुरवणी विश्लेषणे पटण्यासारखी आहेत.
**(सुरुवातीला "चर्चा रोचक " असे लिहिले होते. म्हणजे माझ्यासाठी तरी "रोचक" हा शब्द स्तुती म्हणून सुचतो. मात्र मी खुद्द तो शब्द कधीकधी "रोचक [पण]" असा वापरतो. म्हणून वाक्य बदलले.)**
लेख
ओपनसोर्सवर एक वाचनीय लेख.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
इतर मित्रांनाही पाठवला
लेख वाचला व इतर मित्रांनाही पाठवला आहे. चांगली माहिती!
उदाहरणे
ओपनसोर्सची ११ यशस्वी उदाहरणे.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com