भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?

राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्थीतिची जाणीव झाली. प्रकरण आपल्या अंगावर शेकणार आहे हे लक्षात आल्यावर तडकाफडकी संयोजन समितीच्या ४ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता मोठे शार्क मासे वाचवण्याची damage control An effort to minimize or curtail damage or loss. मोहीम जनतेच्या देशभावनेस आवाहन करत सुरु झाली आहे. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा आणि याकरता पहेली जाहिरात सहारा उद्योग या बदनाम उद्योग समूहास हाताशी धरून सरकारनेच सुरु केली हे लहान मुलगा ही सांगील.
बारात घर के द्वार पर आयी है, पहले बारातीयोका का स्वागत करो , शादी धूमधाम से हो जाने दो , फिर आपकी जो भी शिकायत है घरके अंदर बेठ कर सुल्झायेगे अब देश के इज्जत का सवाल है अशी भाषा करत आपल्या पापा वर पांघरून घालण्याचा प्रयत्न जोमदारपणे केला जात आहे पण यावेळी दुलहन के घर वालोका चारित्र्य या बाबत मात्र सोयीस्कर रीत्या दुर्लक्ष करा म्हणून सूचित केले जात आहे. याच वेळी १९८२ च्या asiad game 1982. च्या खर्चाचा हिशोब आज १९१० मध्ये २८ वर्षानंतरही पूर्ण झाला नाही अशी धक्कादायक माहिती खुद्द सरकारी प्रव्रक्त्यानेच सांगितली आणि ये तो होता ही राहता अशी बेजबाबदार विधाने ही केली.
देशभावना आणि भ्रष्ट्राचाराची सांगड घालून भारतीय जनतेला मूर्ख बनवता येते हे या मतलबी नेत्यांना चांगलेच अवगत झाले आहे. याचे उत्तम उदाहरण IPL चे भ्रष्ट्र आयोजन . आणि जेंव्हा हा भ्रष्ट्र क्रिकेटचा भोपळा फुटला तेंव्हा ललित मोदींचा बळी देवून आपले राजकारणी नेते सही सलामत सुटले नाही तोच हा नवा घोटाळा उजेडात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या दृष्टी ने समाधानाची बाब म्हणजे सोनिया कॉंग्रेस यात अडकली आहे. यामुळे राष्ट्रवादी नेते गालातल्या गालात हसत ख़ुशी जाहीर करत आहे. आपला नवरा मेला तरी हरकत नाही सवत रंडकी झाली या प्रकारे हे वागणे आहे.देशाच्या बदनामीचे सोयरे सुतक कोणाला नाही.
परकीय देशात अश्या स्पर्धा आयोजित करताना खेळ खेळाडू यांना मध्यभागी ठेवून स्पर्धेचे आयोजन केले जाते, खेळ खेळाडूंच्या विकासास सर्वोच्च प्राधान्य देवून ५-७ वर्ष आधी संभाव्य खेळाडूंची निवड करून अत्यंत कठोर सराव सुरु केला जातो. जात,प्रांत,धर्म राजकारण दूर ठेवत हे प्रशिक्षण कोणतीही दयामाया न दाखवता सुरु होते. स्पर्धा सुरु होण्याच्या ८-९ महिने सर्व क्रीडांगणे तय्यार होवून देशातील स्पर्धकांना तेथे सराव करून घेतल्या जातो . तेंव्हा कोठे पदकांची लयलूट यजमान देशाचे खेळाडू करतात. आणि आपण स्पर्धा महिन्यावर आल्या तरी अजून खेळाडूंची संभाव्य यादी सुद्धा जाहीर करू शकत नाही. क्रीडांगणे धड पणे बांधू शकत नाही. तरी पण अर्धा प्याला भरलेला आहे हे पहा म्हणत जनतेलाच शहाणपणा शिकवला जात आहे , आणि भ्रष्ट्राचारावर पांघरून घातल्या जात आहे.

काल-परवा भारताच्या अर्थमंत्र्यांनी भारतीय संसदेत इमानदारीपणाच्या,प्रामाणिकपणाच्या चिंधड्या उडवत बँकांचे हजारो करोडो रुपये बुडवून देशाच्या प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या मोठ्या उद्योजकांची नावे जाहीर करण्यास नकार दिला. यावरूनच भ्रष्ट्राचार किती खोलवर रुजला आहे याची कल्पना येते. जेंव्हा सामान्य माणूस अडचणीत येतो आणि बँकाचे पैसे भरण्यास वेळ मागतो तेंव्हा मात्र हेच सरकार , बँका त्या माणसास रस्त्यावर आणण्याची भाषा करत त्यास आत्महत्त्या करण्यास मजबूर करतात. DRT च्या माध्यमातून अश्या कर्जदाराच्या करोडोच्या मालमत्ता केवळ १०-१२ लाखात विकून परत त्यास परेशान करत बसतात, या मालमत्ता विक्रीत प्रचंड भ्रष्ट्राचार होतो बँका पासून सर्व जण यात सामील असतात.पण सरकार या कडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. ह्याच मालमत्ता विकत घेणारे त्या मालमत्ता ७०-८० लाखाला विकून मालामाल होतात. याच मालमत्ता प्रामाणिकपणे विक्री केल्या तर कर्ज संपूर्ण फिटून , कर्जदारास लाखो रक्कम मिळेल पण लक्षात कोण घेतो. लहान कर्जदाराची ,शेतकऱ्यांची नावे वर्तमान पेपरात जाहीर करून तयान आत्म्हत्त्यास प्रवृत करणारे सरकार, संसदेत मात्र निर्लज्जपणे मोठ्या उद्योगपतींनी किती कर्ज बुडवले आणि त्यांची नावे सांगण्यास निर्लज्जपणे नकार दिला. ह्या बुडवलेल्या पैशाचा कांही % वाटा नक्कीच यांना मिळत असणार या मुळे नावे जाहीर करत नाही एकीकडे माहिती अधिकाराच्या गप्पा मारावायाच्या आणि दुसरीकडे संसदेतच भ्रष्ट्राचारी , बँक पैसा बुडवणाऱ्या उद्योगपतींना पाठीशी घालावयाचे हे फक्त भ्रष्ट्र इंडिया राजकारणीच करू शकतात. अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले) प्रेषक लॉजिकल यांच्या लेखात म्हंटल्या प्रमाणे .....
"all animal ara equal but some are more qual than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अ‍ॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

भ्रष्टाचार

ठणठणपाळ यांनी काही योग्य मुद्दे मांडले आहेत.
उदा. कर्जे बुडवणार्‍या बड्या उद्योजकांना संरक्षण/उत्तेजन आणि सामान्य शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना मात्र देशोधडीला लावणे.

बाकी भ्रष्टाचार आणि राष्ट्रभावना यांबाबत येथे उद्बोधाक चर्चा झालेली आहे. तेथील धनंजय यांच्या मतांशी सहमत आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सहमत

धनंजय यांची लिंकमध्ये दिलेल्या चर्चेमधली मते पटली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्रतिसाद

ठणठणपाळ यांनी योग्य मुद्दे मांडले आहेत.....
पण जनता लाचार व् नेते बेशरम आहेत...कलमाडी मुलाखतीत म्हणाले आरोप सिद्ध होवू द्यात्..मग् बघु...

खेळ् होतील..लोक् विसर तील् ..तेलगी..व् अनेक् उदाहरणे आहेत्...

सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी

सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी

"राष्ट्रकुल' गैरव्यवहारांच्या चौकशीचे पंतप्रधानांचे आदेश :
कलमाडींना खासदारपदावरून मुक्त करावे - डॉ. वैद्य :
श्रेष्ठींनी सांगितल्यास पद सोडू - कलमाडी :
त्रिभूवन दरबारी यांची हकालपट्टी :
'कॅग' किंवा न्यायालयीन चौकशीस तयार - कलमाडी :
कलमाडींनी सादर केलेला 'ई-मेल' बनावट :
कलमाडी एकाकी; कॉंग्रेसने सोडली साथ :
भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती :
राष्ट्रकुलच्या दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची सूचना :
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कलमाडींकडून स्पष्टीकरण मागविले :
कलमाडींना उत्तरासाठी उच्चायुक्तालय तयारीत :
भारतीय उच्चायुक्तालयातूनच नाव सुचविले :
आता तोंडाला कुलूप... स्पर्धा संपेपर्यंत! :
अय्यर यांचे विधान देशविरोधी - कलमाडी:
कलमाडी तर खेळाला लागलेली जळू - परगतसिंग :
बांधकामातील गैरव्यवहारांशी आमचा संबंध नाही :

अंग्रेजों के जाने के बाद भारत में गुलाम परम्पराओं को जीवित रखने

गुलाममंडल खेल और नेहरू स्टेडियम
इसका नाम नेहरू स्टेडियम बिल्कुल ठीक ही रखा गया है, क्योंकि अंग्रेजों के जाने के बाद भारत में गुलाम परम्पराओं को जीवित रखने के सबसे बड़े अपराधी नेहरू ही हैं। http://www.pravakta.com/?p=12153
वे स्वयं को गर्वपूर्वक भारत में अंतिम अंग्रेज कहते थे। इसी प्रकार वे स्वयं को जन्म से हिन्दू, कर्म से मुसलमान और विचारों से ईसाई मानते थे। जो लोग इस तमाशे के समर्थक हैं, वे सब नेहरूवादी गुलाम मानसिकता के शिकार हैं। मणिशंकर अय्यर ने जीवन में बस यही अच्छा काम किया है कि वे इस सर्कस के विरोधी हैं।

पण दुर्देवाची गोष्ट अजून या खर्चाचा हिशोब आजही पूर्ण झाला नाही

मेरा देश महान आहे.१९८२ साली आशियाड स्पर्धा दिल्ही मध्ये पर पडल्यात. त्याला आज २८ वर्ष पूर्ण झाली आहेत . पण दुर्देवाची गोष्ट अजून या खर्चाचा हिशोब आजही पूर्ण झाला नाही. आणि हे फक्त भारतातच घडू शकत . विकासाचे खोटे फुगे फुगवा, भ्रष्ट्राचार करा , आणि २८ -३० वर्ष हिशोब देवू नका. तुम्ही हिशोब मागितला की देशाच्या इज्जतीची भीती घातली जाते. तुम्हालाच देशद्रोही ठरवले जाते.
बीजिंग ओलंपिक की आधिकारिक रिपोर्ट जारी

चीन ने को वर्ष 2008 के बीजिंग ओलंपिक से जुड़ी एक आधिकारिक रिपोर्ट जारी की है जिसमें इससे जुड़े सभी विवरण दिए गए हैं। यह रिपोर्ट रविवार को जारी की गई। इसमें ओलंपिक की योजना, आयोजन और जश्न का पूरा ब्यौरा दिया गया है। इसमें बोली लगाने से खेलों के समापन तक के अनुभवों को जिक्र किया गया है। बीजिंग ओलंपिक के दो साल पूरे होने के मौके पर यह रिपोर्ट जारी की गई है। इसे चार संस्करणों में जारी किया गया है। बीजिंग ओलंपिक आठ अगस्त, 2008 को शुरू हुआ था।

भ्रष्टाचार मुक्ती आणि आपण

भ्रष्टाचार अगदी आता हॉट असलेला विषय . जिकडे तिकडे भ्रष्टाचारापासून भारत मुक्त कसा होईले ह्याचाच विचार सुरु आहे . फेसबुक वर तर मोफत सल्ला केंद्र सुरु झाले आहे भ्रष्टाचार मुक्त भारत कसा होईल ह्याचा. भारतात भ्रष्टाचार का बोकाळलाय ह्याची कारणे आणि त्या वरचा उतारा देण्यात येतोय. भ्रष्टाचार आघाडीत जो पक्ष आघाडीवर आहे तो पोटतिडकीने बोलतोय आणि विरोधी पक्ष ( तेवढाच भ्रष्टाचारी ) पण आक्रमकतेने लोकांना संघटीत करतोय आणि वाट बघतोय कधी एकदा वल्डकप संपतोय याची. कारण सर्व कार्यकर्ते प्रथम क्रिकेट आणि नंतर बाकी अशा मूड मध्ये आहेत.
भ्रष्टाचाराचे मूळ जर शोधले आणि त्यावर उपाय केला तरच भ्रष्टाचार नष्ट होऊ शकतो. आणि भ्रष्टाचाराचे मूळ आहे आपल्या मानसिकतेत. मी कोणतेही उपाय सुचवणार नाही किवा सल्ला पण देणार नाही . पण विचार करा आणि मूळ शोधून ते नष्ट करा.

पण विचार करा आणि मूळ शोधून ते नष्ट करा. ?

कुणाला सांगता आहात ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

विचार करा

सर्वाना. मी सुद्धा आहे ह्यात. मी विचार करतो आहे , आणि मानसिकता बदलायचा प्रयत्न सुद्धा करतोय.

ठीक :)

छान !
तुम्हाला शुभेच्छा !

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर