एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
एक राष्ट्रकुल स्पर्धा १२ भानगडी
एक गाव बारा भानगडी ह्या ग्रामीण राजकारणावर आधारित मराठी सिनेमाची अखिल भारतीय आवृत्ती "एक भारतीय राष्ट्रकुल स्पर्धा आणि १२00 भानगडी" या नावाने जोरदार सांग्रसंगीत रीत्या जागतिक पातळीवर भारताच्या इभ्रतीची लक्तरे मांडत चालू आहे. कोण जास्तीत जास्त देशाची बदनामी करतो याची जणू स्पर्धा लागली आहे अश्या थाटात या स्पर्धेची सुरुवात स्पर्धा अधिकृत रीत्या सुरु व्हायच्या ७५ दीवस aadhich TVमिडिया, वर्तमान पत्रे, भारतीय संसद या ठिकाणी चालू झाली आहे. या स्पर्धे ची सुरवात खुद्द सत्ताधारी पक्षाच्या माजी केंद्रीय खेळ मंत्र्यांनी मणि शंकर अय्यर यांनीच केली हे अजून एक आश्यर्यचं आहे. राष्ट्रकुल स्पर्धा या राष्ट्रकुल स्पर्धा राहिल्या नसून फक्त ( Wealth Games ) पैश्या च्या प्रचंड भ्रष्ट्राचारच्या सार्वजनिक पैशाच्या स्वत:च्या वैयक्त्तिक स्वार्था साठी उपयोग करणाऱ्या स्पर्धा झाल्या आहेत असा घणघंणाती आरोप त्यांनी केला . तेंव्हा आज पर्यंत देशाच्या इज्जतीचा प्रश्न असल्या मुळे य गोष्टी वर ताक फुकून चर्चा करणारी TV माध्यमे, वर्तमान पत्रे मग सबसे पहले हमने इस भ्रष्ट्राचार का भांडाफोड किया करत या बदनामीच्या मारेथान स्पर्धेत उतरली. आणि पुढील दोन-अडीच महिने बातम्यांची काळजी मिटली म्हणत त्यांचा जीव भांड्यात का कोठे म्हणतात त्यात पडला. आता त्याच त्या जुन्या क्लीप दाखवून देशाच्या बदनामीची धुणे धुवण्यास सगळे मोकळे झाले. स्पर्धा भारतात भरवण्या पासून ते बटन रेली, बांधकाम, साहित्य खरेदी, टायलेट पेपर ( हे सुद्धा कमी पडले) य प्रत्येक बाबतीत घपला झाला .
हे कमी होते म्हणून लै न्गीक अत्याचाराच्या भानगडी समोर यायला सुरुवात झाली. महिला हॉकीत प्रशिक्षक एम. के. कौशिक यांच्याबद्दल लैंगिक शोषणाच्या तक्रारी झाल्याने हा माणूस इतकी वर्षे तिथे कसा राहिला याबद्दल आश्चर्य वाटते. महिला वेटलिफ्टर्सनीही त्यांच्या अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. क्रिकेटमध्ये आयपीएलची चौकशी चालूच आहे. अश्या तऱ्हेने जगात कोठेही स्पर्धेची जय्यत तय्यारी होत नसेल .
एव्हडे होवून संसदेत चर्चा होवून ही आपले मिस्टर क्लीन पंतप्रधान मनामोहनजी, सोनिया, राहुल यांच्या चेहऱ्या वरची रेष हलत नाही. जणू कांही देशाच्या इज्जतीशी यांचे कांही देणे घेणे नाही.
अखेर ही राष्ट्रकुल स्पर्धा काय आहे याचा अभ्यास केला तर ही स्पर्धा इंग्रज लोकांनी १९११ मध्ये आपल्या गुलाम देशातील खेळ प्रथम आयोजित केली होती.( In 1911, the Festival of the Empire was held in London to celebrate the coronation of King George V. As part of the festival an Inter-Empire Championships was held in )स्वत:च्या साम्राज्याच्या विजय मोठेपणा या साठी ही स्पर्धा आयोजित केली होती.
आपण स्वतंत्र होवून आज ६० वर्षे झाली .पण आपली मानसिक गुलामगिरी कांही कमी झाली नाही. आपण सार्वभोम स्वतंत्र राष्ट्र आहोत यामुळे या गुलामगिरी च्या स्पर्धेत का म्हणून भाग घ्यायचा याचा विचार आपल्या महान राजकारणी नेत्यांच्या मनात ही कधी आला नाही. उलट त्यांनी या स्पर्धा देशाचा स्वभिमान आणि देशगौरव या स्वरुपात भारतीयान समोर मांडल्या. खोटी देशभावना खोटा देशगौरव चा दिंडोरा पिटून जनतेच्या खऱ्या प्रश्न वरून लक्ष दुसरी कडे वळविण्या साठी या स्पर्धेचा दुरुपयोग केला गेला हाच या खेळाचा मुख्य उद्देश आहे.. जसा बाजारू क्रिकेट आणि देशभक्ती चा संबंध जोडून IPL खाली देशबांधव आणि देशाला लुटले. आज आपण नीट रस्ते बंधू शकत नाही, जनतेला १२-१२ तास अंधारात राहावे लागते, शिक्षणाचा बेंडबाजा वाजला आहे , सर्व देशात शेतकऱ्यांना खता साठी लाठ्या खाव्या लागत आहेत, शेतकरी,विद्यार्थी आत्महत्या करत आहे, अन्नधान्य याचा काळाबाजार जोरात चालत असून गरीबच काय मध्यम वर्गाला ही जगणे मुश्कील झाले, तरी पण बेशरमपणे भारत ही जगातील आर्थिक महासत्ता म्हणत नगारे पिटल्या जात आहेत. सत्या कडे दुर्लक्ष करून खोट्या राष्ट्रीयत्वाचा जयजयकार चालू आहे. भारताच्या गरीबीचे जगभरात धिडढोरा पिटणाऱ्या Slumdog सिनेमाचा निर्लज्जपणे जय हो जय हो म्हणत जयजयकार करत आहोत. या सिनेमाला जी बक्षिसे भेटलीत ती त्याने भारताची जगात बदनामी केल्या मुळे दिली आहेत पण आपल्याला हा देशगौरव वाटतो , लग्गान हा भारतीयांच्या इंग्रजावरील विजयाच्या सिनेमाला का दिली नाही. पण आजूनही आपणात राष्ट्रीयत्वा भावना नाही उपजली . याच मुळे देशाच्या नाक कापणाऱ्या भ्रष्ट खेळा कडेही ही आपण दुर्लक्ष्य करतो ही आपली शोकांतीका आहे.
Comments
नक्की कोणाविषयी तक्रार आहे?
स्पर्धा आयोजन करणाऱ्यांनी घोळ केले ही तक्रार आहे की टीव्ही मीडिया दे घोळ जगासमोर दाखवून भारताची लाज काढतात याबाबत आहे? कारण असे घोळ करणाऱ्यांबद्दल कदाचित तुम्हीदेखील तक्रार करालच ना? की ही लगान जिंकला नाही, उलट स्लमडॉग जिंकला याबद्दल तक्रार आहे? तुमचे लेख वाचताना नक्की मुद्दे कुठचे, नक्की पुरावे काय व तुम्ही नक्की त्यातून सिद्ध काय करण्याचा प्रयत्न करत आहात हे कळायला खूप त्रास पडतो. तुमची कळकळ पोचते, पण मुद्दा पोचत नाही हे दुर्दैव.
राष्ट्रकुल स्पर्धा व्हाव्यात असं मला वाटतं. त्या मुळात कशा सुरू झाल्या याने नक्की काय फरक पडतो? त्यात आयोजनात घोळ झाला तर माध्यमांनी ते बाहेर काढावं असं मला वाटतं. त्याने देशाची थोडी लाज जाईल, पण ती किंमत द्यायला हरकत नाही. बाकी लगान चांगला होता, स्लमडॉग अधिक चांगला होता, असंही मला वाटतं.
सुमारे पाच वर्षांनतर जर हा प्रश्न पूर्णपणे सुटला तर तुम्ही आनंद प्रदर्शन करणारा लेख लिहाल का? तुमच्याकडून काहीतरी आनंदी लेखन व्हावं असं मला मनापासून वाटतं. सतत चिडून राहाण्याइतकं हे जग वाईट नाही हो...
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
अभिनंदन
अ(एक)भि(राष्ट्रकुल)नं(स्पर्धा)द(१२)न(भानगडी)
(केवळ ५ शब्दांचे शीर्षक!!!)
शिर्षकाचे रंग
शिर्षकाने फसवल्यामुळेच आम्ही धागा उघडला. रंगरंगोटी पाहुन आमच्या चेहर्याचा रंग उडाला.
-Nile
व्यनीतुन् चिखलफेक
आमच्या प्रतिसादामुळे व्यथित होउन श्री ठणठणपाळ आम्हावर व्यनीतुन ठणठण करीत आहेत. जर स्वतःला खरच काही विधायक करणारे समजत असतील् तर् उघडपणे लिहावे, व्यनीतुन् वैयक्तीक टिप्पणी करु नये.
-Nile
धक्कादायक
;) ;) ठणठणपाळ ह्यांनी केवळ ५ शब्दांचे हे धक्कादायकच आहे. मीही अभिनंदन करतो!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आश्चर्य आहे...
पूर्ण देशावर यातील २ व्यक्तींची सार्वभौम सत्ता (इनडायरेक्टली का होइना!) चालते आणि १ व्यक्ती या देशाची अधिकृत प्रमुख आहे. पण देशाच्या प्रतिष्ठेच्या मुळावर उठलेल्या या प्रश्नावर या तिघांचे मौन धक्कदायक आहे..
||वाछितो विजयी होईबा||
बाळ उभा राहीला, आम्ही नाही पाहिला!!!
'आपल्या लेखाला शीर्षक देला आले, तेही छोट्या स्वरूपाचे', याबद्दल 'ठणठणपाळ' यांचे खूप-खूप कोतूक करीत आहे.
हे उपरोधाने लिहीले नाही आहे.
अजून बरीच प्रगती बाकी आहे.
स्पर्धा हव्याच
सध्या ज्या रितीने संसदेत आणि एकूणच देशात स्पर्धा आयोजकाविरुद्ध गदारोळ उडाला आहे तो पाहता लेखकाने भ्रष्टाचाराचा जो मुद्दा काढला आहे त्यावर येथील सदस्यात दुमत होईल असे वाटत नाही. पण म्हणून अशा रितीच्या "स्पर्धा" च आयोजित करू नये असे म्हणणे या देशातील युवा वर्गावर फार अन्यायकारक होईल. वर्षानुवर्षे मेहनत घेवून आपल्या क्रिडा कौशल्याचा कस दाखविण्याची त्यांची हीच संधी असते, जी त्यांना ४ वर्षातून एकदा मिळते. त्यांच्या या भ्रष्टाचारी संयोजक, मंत्रालय अधिकारी, खुद्द मंत्री आदींशी काहीही देवाणघेवाण नसते. विशीबावीशीतील तरुण-तरुणींना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अशा स्पर्धांची वाट पाहावी लागते.
त्यामुळे ज्यांच्यावर टीका करायची ते सर्वांकडून होईलच; पण रोगापेक्षा इलाज जीवघेणा होऊ नये.
बटबटीतपणा धूवून पाहिलं तर......
ठणठणपाल यांनी लेखन शैलीत प्रचंड सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारावर त्यांची बटबटीत शैली वरचढ होते. त्यामुळेच त्यांनी कितीही करून दुर्लक्षित बाबीकडे लक्ष वेधले तरीही, वाचकांच्या डोळ्यांना त्यांच्या लिखणाची बटबटतशैलीच दिसते. यात वाचकांचा दोश नाही.
'''रोगापेक्षा इलाज भयंकर' हा मांडलेला विचार, एका विचारा कडे दुर्लक्ष होवून मांडलेला दिसत आहे.
ब्रिटीश या देशातून निघून गेले तर, 'या देशाचे काय होणार?' असा विचार करणारे लोक ही या देशात स्वातंत्रपूर्व काळात होतेच. आपण स्वतंत्र झालेलो आहोत, मग आपण एक स्वतंत्र राष्ट्र असताना, ब्रिटीश एम्पायर कॉमनवेल्थ गेम्स का म्हणून आयोजित करायचे?
http://en.wikipedia.org/wiki/Commonwealth_Games#History
http://www.thecgf.com/games/story.asp
एखादा विचार मुळातच चूक असेल तर त्यातून जे निष्पन्न होणार तेही चूकीचे असणार, असे मी मानतो.
खेळ आयोजनाची तारीख जवळ येत असताना, भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या का बरं येताहेत? भ्रष्टाचार का बरे होतोय? असा विचार केला तर वाटतं ख्ररचं हा पैसा या देशात नवी धान्य कोठारे निर्माण करण्यासाठी वापरता आला असता तर? धान्य साठवण, वितरण व त्या संबंधित यंत्रणा यावर हा व एवढा प्रचंड खर्च झाला असता तर???
देशात कोणतेही आंतरराष्ट्रीय आयोजन होताना / होण्यापूर्वी सगळ्या यंत्रणेला , व्यवस्थेला एक चेतना, मार्गदर्शन करण्याचे काम त्या देशाच्या प्रमुखाचे असते, असायलाच हवे. त्या दृश्टीने मनमोहन सिंग यांनी काय केले आहे कां? वा ते काय करत आहेत का?
महासत्ता?
याच लेखात नाहि तर बर्याच लेखात असे वाचतो की भारताने जगातील आर्थिक महासत्ता होण्याचे टारगेट ठेवले आहे. डॉ. कलामांनी हे टारगेत २०२० पर्यंत दिले आहे वगैरे वगैरे. मात्र माझ्या माहीतीनुसार लक्ष हे महासत्ता होण्याचे नसून सध्यासारखे प्रगतीशील राष्ट्र न राहता प्रगत राष्ट्र होण्याचे आहे. (आणि तसेच हवे)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
पण, प्रगतीची व्याख्या भारतीय पद्धतीचीच असायला हवी.
'भारताने जगातील आर्थिक महासत्ता होण्याचे टारगेट ठेवले आहे.' मला हे टारगेट 'सामान्यांचा जिवघेणा घेणे' असे वाटते. प्रगती नेमकी कशामुळे होते? ह्या प्रश्नाकडे 'पाश्चात्यांनी दाखवलेल्या शास्त्रीय/ गणिती उत्तरावर' आधारलेले नसावे. पाश्चात्यांचे जे चांगले गुण आहेत ते स्विकारण्याकडेच भारताचा कल असावा.
म्हणजे?
प्रगतीची व्याख्या भारतीय पद्धतीची म्हणजे कळले नाहि. प्रगत राष्ट्र कोणास म्हणावे यासाठी आधीच अस्तित्त्वात असलेला सर्वमान्य निर्देश आहे.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
म्हणजे... थोडं थांबा!
आपला घोळ 'भारतीय पद्धतीची' ह्या शब्दांमुळे होत आहे. ह्या शब्दांएवजी नेमका कोणता शब्द वापरता येईल ह्यावर विचार करून मी स्वतंत्र लेख लिहीन वा नवा चर्चा प्रस्ताव ठेवीन. इथे ती चर्चा करणे शक्य नाही.
जरूर
वाट पाहतोय
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
यांच्या भ्रष्ट्र कारभाराचा बुरखा फाडला तर देशाचे जे नाव बदनाम
राष्ट्रकुल स्पर्धेतील म्हणा किंवा इतर भ्रष्ट्राचाराचे मराठी ब्लॉगर्स यांना वावडे आहे. यामुळेच मला तुम्ही केवळ भष्ट्राचारा बद्दलच बोलता जगात अनेक चांगल्या गोष्टी आहे त्या बद्दल बोला म्हणून मेल येतात माझे लिहिणे आक्रमकता शेली यावरच उपोरोधिक पणे लिहिले जाते पण माझे मुद्दे चूक आहेत हे कोणी म्हणत नाही, खोडत नाही. हिदी ब्लॉगर्स मध्ये यावर पोटतिडकीने चर्चा होते. आज http://www.pravakta.com/?p=12070 प्रव्रक्ता . COM वर खेल खेल में अरबों का खेल हा लेख वाचण्या सारखा आहे. भारत सरकार ने अपने देश में खिलाडियों को प्रोत्साहित करने के बजाए इस आयोजन में प्रतिभागी छः दर्जन देशों में प्रत्येक देश के खिलाडी को 33 करोड 12 लाख रूपए की राशि महज एथलीट ट्रेनिंग की मद में ही मुहैया करवा दी थी .याच वेळी आपल्या देशातील खेळाडूना वाऱ्यावर सोडले. खेळाची काय तय्यारी चालली किती पदके मिळणार या या बाबत गेल्या ५ वर्षात साधी चर्चा ही झाली नाही. सर्वात HIGHT म्हणजे स्पर्धा भारतात व्हाव्यात म्हणून चक्क रिश्वत दिली . आणि आता जनतेच्या देसभावनेला आवाहन करून बारात द्वार आयी है पहले शादी हो जाणे दो अशी भलावण केली जात. या वेळी गप्प बसणे कोणीही जागरूक नागरिक मान्य कसा करू शकेल . देश भावनेच्या नावा खाली यांना आपल्या पापावर पांघरून घालवायचे आहे. आजच शासनाच्या भ्रष्ट्र नीतीची सकाळ मध्ये बातमी आली त्यावर मी लिहिणारच आहे.
साईट ला जरूर भेट द्या http://www.pravakta.com भ्रष्ट्राचारी राजकारण्यांचे पाप उघड केले तर देशाचे नाव बदनाम होईल असे बोम मारल्या जात आहे. अशी ही बदनामी होत आहेच मग उलट यांच्या भ्रष्ट्र कारभाराचा बुरखा फाडला तर देशाचे जे नाव बदनाम झाले ते उज्ज्वल होईल येथे भ्रष्ट्राचाराला थारा नाही हा संदेश जगात पोहंचला जाईल आणि देशाचे भले होईल. अश्या स्पर्धा आयोजित करून खेळला प्रोहास्थान मिळते हा गेरसमज .आशियाड ने काय भले झाले याचा संदर्भ पहा. बडेजाव करून विकास होत नाही.
प्रश्नांची उत्तरे हवीत.
ठणठणपाळ,
'जगाला सुधारण्याआधी स्वतःमध्ये सुधारणा करायच्या असतात.'
'जगाला सुखी करण्याआधी स्वतःला सुखी कसे करायचे? मिळालेलं सुख कसे उपभोगायचे?'
- याचाच विचार करायचा असतो.
गौतम बुद्ध, महात्मा गांधी यांसारखी मंडळींनी आधी स्वतःमध्ये बदल घडवले मग ते जगाला आपल्या प्राप्त दृष्टीच्या प्रकाशकंदिलाने मार्गदर्शक म्हणून पूढे आले. तुम्हाला ही या जगाचे मार्गदर्शक व्हायचे आहे, हे आपल्या लिखाणावरून कळत आहेच. त्यासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा!
परंतु,
या जगात प्रत्येक गोष्ट चूकिची कशी आहे हे एखादी व्यक्ती आरडा-ओरड करून, आक्रस्ताळेपणाने सांगत असेल तर त्याला लोकांनी प्रेमाने डोक्यावर घ्यावे, असे आपले म्हणणे कां आहे ?
अंगाला दुर्गंधी असणारी व्यक्ती इतरांना 'सुगंध' व 'सुगंधाचे प्रकार' या विशयावर प्रवचन देवू शकते का?
कधी तुम्ही भारतीय असता, कधी तुम्ही मागासवर्गातील असता. हा वैचारीक भ्रष्टाचार नाही का?
तुम्ही सोडून, मराठी नेटकरी हे संयमी व शहाणे नाहीत. हे कसे?
शब्दांचा वापर ते आनंद घेण्यासाठी ते करतात. आपण जेवढी नकारात्मक उर्जा दुसर्यांकडे प्रसवणार तेवढीच नकारात्मक उर्जा आपल्याकडे परतून येणार. शब्दांचा वापर चिखल-दगडा सारखा केला तर ते ही आपल्याकडे तसेच परत येणार. हे ते जाणतात.
जग तुम्हाला वाईट प्रतिसाद देत आहे याचा दुसरा अर्थ काय?
कटू सत्य
सत्य हे कटू सत्य सांगणे हे THANTHANPAL चे कामच आहे. अंगाला दुर्गंधी असणारी व्यक्ती ....
समाजातील प्रदुर्षण घाण वास आपणास येत नाही, सामाजिक बांधिलकी नसल्या मुळे जग वाईट प्रतिसाद देत आहे हा दोष माझा नाही कधी तुम्ही भारतीय असता, कधी तुम्ही मागासवर्गातील असता. होय हे सत्य आहे. मी माज्या बांधवाना गळ्याशी लावायचे नाही तर तुम्हा सारखे पानेरीयन कुत्र्याला गळ्याला लावायचे का ?मग आपणास काय वाटते मी फक्त उच्च वर्णीय सारखे स्वत च्या मस्तीत समाजाशी फटकून राहावे हे शक्य नाही. इतके दीवस जे उपक्रमी येथे येत नव्हते ते उपक्रमावर येवून माझे म्हणणे मान्य करत आहेत हे तर दुखणे नाही
थांथांपाल साहेब तुम्ही दुर्लक्ष करा,
थांथांपाल साहेब तुम्ही दुर्लक्ष करा,
मागे मी सांगितल्या प्रमाणे, ज्या लोकांचे दोन वेळचे भागले आहे त्यांना AC रूम मधून टंकायला आणि दुसर्याच्या अंगावर चिखल उडवायला काय जाते ?
हजारो करोड रुपये त्या खेळापायी उडविले जात आहेत, आणि पुन्हा त्यात भ्रष्टाचार.
धन्य तो भारत देश.
माझ्या मते तर हा खेळ थांबविलाच पाहिजे, निदान त्या मुळे भारताचे एक कर्तव्य दक्ष देश म्हणून नाव होईल.
बाकी अशी खूप मोठी जनता आहे जी आपल्याशी सहमत आहे. पण ते इथे उपक्रमावर येऊन आपले म्हणणे मांडू शकत नाही.
ज्यांना दोन वेळचे भागविता भागविता १२-१४ तास कष्ट करावे लागते, सारखी वीज जाते, घरात संगणक नाही, सायबर काफे मध्ये जाऊन इंटरनेट परवडत नाही, ते कुठु येणार म्हणा उपक्रमावर ?
इथे फक्त तथाकथित विद्वान लोकच जास्त असतात.
एकानी तरी पुणे मुंबई मध्ये जाऊन गरिबांचे हलाखीचे जीवन स्वतः डोळ्यांनी बघितले आहे काय ?
जो माणूस महिन्याला ४०००-५००० कमवितो त्याचे काय हाल होत असतील यांना काय माहित. ?
माझ्या माहितीत एक लेथचा कारखाना आहे, तिथे सर्व कामगारांना ४-५ हजार रुपये पगार आहे,
कशी राहतात ते आपल्या कुटुंब बरोबर ते स्वतः डोळ्यांनी पहिले आहे मी.
हे लोक आपल्याला नावे ठेवतात कि आपण चिखल उडवीत असता .
अरे लोकांनो, चिखल घाण साफ करण्यासाठी त्यात उतरावेच लागते. (गाडगेबाबा तेच काम करीत होते.)
भारतात अजून काहीतरी चागले बघणार्यांना एक मानसिक आजार आहे असे खेदाने म्हणावे लागेल.
(जे काही थोडे फार चागले आहे ते तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी एक तर तुम्ही एखाद्या मंत्र्याचे जावई, भाच्चे, मेव्हणे,असायला पाहिजे किव्वा तुमच्या खिशात/बँकेत बक्कल पैसा पाहिजे, मग काय तुम्हाला भारतात जिकडे तिकडे स्वर्ग असल्याचा भास होईल.)
ज्यांच्या खिशात दमडा नाही त्यांना विचार भारत काय आहे,
गटार आहे हा भारत देश आणि सगळे गरीब लोक किडे आहेत किडे.
(राजकारणी तसेच वागवितात त्यांना )
Extra positive thinking is injurious to health.
कोणी काहीही बोलो, आम्ही वाचतो तुमचा एकेक शब्द.
ह्या लोकांना झळ पोहोचत नाही आणि त्यामुळे ह्यांना वेदना देखील कळत नाही.
ह्यातल्या एखाद्या च्या तरी घरात अतिरेकी येऊ दे, घरात धन्य आणायला पैसे संपू दे, उन्हाने त्वचा जाळू दे आणि पंखा लावायला वीज नसू दे मग ह्याची पांढरी त्वचा कशी गळून पडते बघा.
मग हे सुद्धा आक्रोश का काय ते, करतील.
हे सगळी लोक नाव ठेऊ शकतात कारण ते नाण्याच्या दुसर्या बाजूला आहेत.
बाकी देश विकायला काढला तर हेच लोक पुढे येऊन बोली लावतील.
जो ज्यादा भौकता है वो काटता नही!!!
उपक्रमावरील एक सदस्य ठणठणपाळही असे काहीसे काम करत असतात का?
त्यांची भाषा बरेचदा आक्रमक असते पण त्यांनी एक जनहित याचिकाही दाखल केली होती असे आठवते.
त्यांचा अनुभव काय आहे?
निनाद यांनी 'आता पुढची लढाई' या लेखात तुम्हाला काही विचारले होते, त्यांच्या प्रश्नांना तुम्ही अजून उत्तरे दिलेली नाहीत.
तुम्ही लिहीण्या व्यतिरीक्त काय करीत आहात? तुम्ही तुमच्या समाजासाठी काय करत आहात हे विचारत नाही पण, तुमच्या जन्मदात्या 'आई-वडिलांसाठी' काय केले आहे? वा काय करत आहात?
का त्यांनाही तुम्ही 'तुम्ही कसे चूक आहात?' हेच दाखवता? त्यांच्या म्हणजे दलित मात्यापित्याच्या पोटी जन्म आल्याचा तुम्हाला किती राग येतो? तो राग तुम्ही कसा व्यक्त करता? थोडं लिहा तरी ह्या बाबतीत.
आपणच अशी भाषा वापरायला लागलो तर एक गुंड आणि आपल्यात काय फरक ?
>> जो ज्यादा भौकता है वो काटता नही!!!
>> तुमच्या जन्मदात्या 'आई-वडिलांसाठी' काय केले आहे? वा काय करत आहात?
इथे उपक्रमावर (आणि इतर जसे कि मिपा, मिम ) असणारे सदस्य हे ज्ञानी, विचारवंत,समजदार आहेत अशी सर्वसामान्य समजूत आहे.
आणि ह्या चर्चा बरीच माणसे वाचत असतात आणि बाहेर त्याचे दाखले सुद्धा देतात.
जरी त्याची इथे नोंद झाली नाही तरी कुठे न कुठे त्याचा समाज मनावर थोडा का होईना फरक पडतोच
त्यामुळे सर्व सदस्यांनी आपली भाषा थोडी नियंत्रणात ठेऊन चर्चा करावी हि नम्र विनंती.
ह्या विश्वात सर्वात नालायक (अपशब्द वापरल्या बद्दल माफी) जमात कोणती असेल तर ती मनुष्य होय.
त्यामुळे उगाच इतर प्राण्यांची त्याला नावे ठेऊन त्या बिचार्या मुक्या प्राण्यांचा अपमान करू नये.
आणि आई वडिलांना तर अजिबात मध्ये खेचू नये हि कळकळीची विनंती.
हीच चर्चा शेकडो दिवसांनी देखील कोणीही वाचू शकतो.त्याच्या मनावर काय परिणाम होतील त्याचा अगोदर विचार करावा.
मतभेद वाट्टेल तितके असू द्यात. (किंबहुना मतभेद आहेत म्हणूनच तर कोणत्याही चर्चेचा उहापोह असतो)
पण जर आपणच अशी भाषा वापरायला लागलो तर एक गुंड आणि आपल्यात काय तो फरक ?
कृपया संपादकांनी ह्यात लक्ष घालावे.
तुम्ही तुमच्याच मातापित्याचा अपमान केला आहे. शरमेने त्यांची मन ख
त्यांच्या म्हणजे दलित मात्यापित्याच्या पोटी जन्म आल्याचा तुम्हाला किती राग येतो? तो राग तुम्ही कसा व्यक्त करता? या एकाच वाक्या वरून आपल्या पोटातील दुखणे स्पष्ट होते. दलित मातापित्याच्या पोटी जन्म घेणे हा या देशात कायद्याने गुन्हा आहे काय? आणि त्यांच्या पोटी जन्म घेतलाच तर त्यांची दुखे: समजतात हा जो आपला गेरसमज आहे तो आधी मनातून काढून टाका. व्यक्तीला इतरांची दुख: समजून घ्येण्या साठी एक संवेदनशील मन असाव लागत तुमच्या मात्या पित्यांच्या दुर्देवाने असे मन तुम्हाला नाही. नाही तर असले भंपक तुम्ही लिहिले नसते. हे लिहून तुम्ही तुमच्याच मातापित्याचा अपमान केला आहे. शरमेने त्यांची मन खाली झाली असेल की आपला पुत्र असले विचार करून मातृत्वाचा अपमान करतो म्हणून. निनाद च्या प्रश्नाच्या चोकश्या करण्याचा आपणास अधिकार नाही.सार्वजनिक आणि व्ययक्तिक बाबतीत फरक असतो.