निबंध स्पर्धा २०१०

मधुसूदन सत्पाळकर स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध-स्पर्धेचे आयोजन

मैत्रेय उद्योग परिवाराचे संस्थापक कै. मधुसूदन सत्पाळकर ह्यांच्या १२ ऑक्टोबर ह्या स्मृतिदिनी गेल्या वर्षापासून राज्यव्यापी निबंध-स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही त्यांच्या सातव्या स्मृतिदीनी एक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लोकशाहीची सर्वसामान्य व्याख्या सारेच जाणतात. तरीही आज प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात त्याविषयी शंका आहे. ती शंका आम्हाला जाणून घ्यायची आहे. कदाचित त्यातूनच लोकशाही सशक्त आणि सुदृढ बनण्याचे मार्ग सापडतील आणि लोकशाही समृद्धिची स्वप्नं पाहणार्‍या सामान्य जनतेला दिशा मिळेल. यासाठी या निबंध स्पर्धेचे विषय आहेत ’भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले?’ व ’लोकशाही समृद्धिसाठी राजकीय मानसिकता बदलण्याचे मार्ग.’

यापैकी कोणत्याही एका विषयावर आपण सुमारे २५०० ते ३००० शब्दमर्यादेत लिहून २०ऑगस्ट २०१० पर्यंत आमच्याकडे पाठवावेत. मान्यवर परीक्षकांकडून निवडल्या गेलेल्या निबंधास प्रथम क्रमांक (रु. १५,०००/-), द्वितीय क्रमांक( रू. १०,०००/-) आणी तृतीय क्रमांक (रू. ५,०००/-) अशी रोख रकमेची पारितोषिकं स्मृतिचिन्हासह दिली जातील.

हा समारंभ १२ ऑक्टोबर २०१० रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत थाटात साजरा होईल. याच कार्यक्रमात याच दोन विषयांवर मान्यवरांच्या सहभागाने परिसंवाद होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा अधिकाधिक यशस्वी करावी.

संपर्क: मैत्रेय मास कम्युनिकेशन सर्विसेस प्रा. लि.

पारधी हाऊस,तिसरा मजला, एम.जी.रोड, जैनमंदिरासमोर, बॅंक ऑफ इंडियाच्या वर,

विलेपार्ले (पू), मुंबई- ४०० ०५७ फोन (०२२) २६१०१०१६, २६१५०३५८

फोनवर संपर्क साधण्याची वेळ: सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

ही माहिती, मला मैत्रेय प्रकाशनाशी संबंधित असे माझे मित्र श्री. मनोज आचार्य ह्यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.

Comments

अबब

परीक्षेत किती गुण मिळणार याचा अंदाज करताना मी निबंध वगळून बेरीज करायचो. निबंधाचे विषय वाचले की माझ्या हाताला घाम येई. कसं काय लिहितात हो अशा विषयांवर?

कखग

हरकत नाही तुम्ही निबंध शब्दाला प्रतिसाद समजुन लिहा बरे!

मग सांगा काय लिहू अन किती लिहू असे होतेय का? ३००० शब्द अपूरे पडत आहेत किंवा एकापेक्षा जास्त निबंध, आय मिन प्रतिसाद लिहायला परवानगी दिली पाहीजे इ विचारांचे काहूर वगैरे ;-)

त्यापेक्षा

खरं सांगितलं तर रिकामटेकडापंतांना निबंध स्पर्धेचे प्रचारक म्हणुन घ्यायला हवे. एक् ओळीवरुन् अनेकांकडुन् पानेच्यापाने निबंध ते सहजी लिहुन् घेउ शकतात्. ;-)

-Nile

:-)

सहमत आहे :-)

रिकामटेकडे यांनी भाग घ्यावा.

निबंधस्पर्धेत रिकामटेकडा यांनी भाग घ्यावा. निबंधाला बक्षीस मिळेलच यात शंकाच नाही. पण, शब्दछळ आणि शब्दांच्या कसरती पाहून परिक्षक घायाळ झाले नाही तर राहिले काय ! ;)

देव साहेब, निबंध स्पर्धेची माहिती दिल्याबद्दल आभारी......!

-दिलीप बिरुटे

पिन

निबंधाचे विषय वाचले की माझ्या हाताला घाम येई. कसं काय लिहितात हो अशा विषयांवर?

मला वाटायचे की लांबलचक शब्दांची रीघ लावण्यासाठी काही लोकांना फक्त पिन मारणे पुरेसे असते. (हे आमच्या एका जुन्या मित्रांवरून अनुभवाचे बोल) निबंधाचे विषय पिन मारण्याचे काम करत नसतील हे पटवून घेणे कठिण वाटते.

मित्र

मित्र ओळखीचे वाटतायत :)

मलाही

मित्र ओळखीचे वाटतायत

मलाही..पण राहू द्या उगीच कशाला 'पंगा'?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

काय सांगता..

परीक्षेत किती गुण मिळणार याचा अंदाज करताना मी निबंध वगळून बेरीज करायचो.

मग सध्याचा हा बदल कशाने?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कोणता बदल?

मी प्रतिक्रिया देतो. निबंध लिहिण्यात मला खूप कष्ट वाटतात. पत्त्यांचा बंगला पाडण्यातील मौज निबंधलेखनात येत नाही.

पळपुटेपणा?

याला पळपुटेपणा म्हणायचे का?
दाखवा ना लिहून...

आपला
गुंडोपंत
~ मी तर मागेही म्हणालोच होतो, स्वतः काही लिहायचे नाही आणि इतरांनी लिहिले की त्यावर इतक्या चोची मारायच्या की लेखकाने लिहिणेच बंद केले पाहिजे, त्यातली जमात ही!~

नाही

माझ्याकडे कौशल्य कमी आहे. शिवाय मला विषयच समजला नाही.

स्वतः काही लिहायचे नाही आणि इतरांनी लिहिले की त्यावर इतक्या चोची मारायच्या की लेखकाने लिहिणेच बंद केले पाहिजे

चुकीचे लिहिण्यापेक्षा काहीही न लिहिणे चांगले.

अरेरे

चुकीचे लिहिण्यापेक्षा काहीही न लिहिणे चांगले.
नशीब बल्ब चा शोध लावतांना त्या शास्त्र्ज्ञांबरोबर असली भंपक अवैज्ञनिक लोकं नव्हती. कारण त्यांनी त्याला चुकीचा प्रयोग करण्यापेक्षा न केलेलाच बरा असे सल्ले दिले असते!

आपला
गुंडोपंत

तसे नव्हे

अहो, त्यांचे लेखन मला चूक वाटते हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यांना ते चूक वाटत नाही म्हणून ते लिहितात. मला ते चूक असल्याचे वाटते म्हणून मी लिहू शकत नाही. जाणूनबुजून चूक लिहिण्याचे समर्थन होऊ शकत नाही. त्यांच्या मतांमध्ये चुका असल्याची शक्यता कोणी सुचविल्यानंतर बहुदा त्यांनाही वाटत असेल की "असे लिहायला नको होते" ("लिहिण्याची दुर्बुद्धी का झाली?" या अर्थाने नव्हे! ;) ).
मला जे योग्य वाटते ते मी लिहितोच पण या निबंधांचे विषयच मला समजलेले नाहीत.

विषय नीट कळले नाहीत.

विषय दोन वेगवेगळे आहेत की एकच आहे? म्हणजे या पैकी एकाच विषयावर निबंध लिहायचा आहे की 'भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले?’ व ’लोकशाही समृद्धिसाठी राजकीय मानसिकता बदलण्याचे मार्ग.’ असे दोन मुद्दे लक्षात घेऊन त्याआधाराने निबंध लिहायचा आहे?

नाहीतर फोनवरुन चौकशी करुन बघतो.

-सौरभ.

==================

+

 
^ वर