बरहा आणि एनएचएम रायटर
न्यू होरायझन मिडीया या कंपनीने एनएचएम रायटर (NHM Writer) या नावाचे बरहासारखे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
http://software.nhm.in/products/writer
हे वापरायला बरहाइतकेच सोपे आहे पण बरहात नसणार्या २-३ महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत.
१) विंडोजमधील "रिजनल लैंग्वेज सपोर्ट" एनेबल करणे म्हणजे डोक्याला एक ताप असतो. तो यात "आपोआप" सेट केला जातो. भल्याभल्यांना क्रमवार मार्गदर्शनही पुरत नाही.
http://in.hindi.yahoo.com/FAQ_English.htm#Enable_Indic_for_Windows_XP_&_...
अर्थात मायक्रोसॉफ्टची ओरीजिनल सीडी असली तरच युनिकोड आपल्या संगणकावर नीट दिसेल, पण ती सीडी बहुतेक वेळा हाताशी नसते. एनएचएमने ही खूप मोठी सोय केली आहे की रिजनल लँग्वेज सपोर्ट सीडी शिवाय यातूनच आपोआप उपलब्ध होतो.
२) नवीन भाषा किंवा की-बोर्ड लेआउट टाकणे खूप सोपे आहे.
३) स्क्रीनवर दिसत राहणारा दोन प्रकारचा की-बोर्ड नवीन लोकांना उपयोगी ठरू शकतो.
अर्थात मायक्रोसॉफ्टचा क्लिष्ट इंडिक सपोर्ट, गुगलचा साधा सोपा आयएमई, तर धपाधप वापरता येणारा बरहा या तिघांपुढे हे नवीन बाळ कितपत टिकेल ते सांगता येत नाही, पण मला मात्र हा पर्याय खूप उपयोगी वाटला.
मायक्रोसॉफ्टशी हातापायी करायची तयारी असेल तर सुशांत देवळेकर यांनी केलेले मार्गदर्शन सर्वोत्कृष्ट.
http://sites.google.com/site/yunikodatunmarathi/dharika
गुगलची सेवा नावाप्रमाणेच सोपी, पण ती काही लोकांना आवडत नाही.
http://www.google.com/ime/transliteration/
बरहाबद्दल काही बोलायलाच नको.
http://www.baraha.com/download.htm
पण वर दिलेला "एनएचएम रायटर" वापरून पहायला काय हरकत आहे?
Comments
बरहा
मी लेख लिहीण्यासाठी बरेचदा वापरतो. बरहाची एकमेव अडचण म्हणजे ऍ किंवा ऑ गंडतात. मग तेवढी अक्षरे दुसरीकडून लिहून पेष्ट करावी लागतात. एनएचएममध्ये ही अडचण नसली तर फारच छान. वापरून बघतो.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
बरहाची एकमेव अडचण?
बरहामध्ये अ वर चंद्र येत नाही पण ऍ(~अ) आणि ऑ(~o) यायला हरकत नाही. --वाचक्नवी
खाली
सौरभ आणि वरदा यांनी युक्ती सांगितली आहेच. एकमेव म्हणजे मला जाणवलेली मुख्य, आणखी अडचणी असू शकतील.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
इनस्क्रिप्ट शिका
इनस्क्रिप्ट शिका व वापरा आणि सर्व इंटरओपरॅबिलिटी अडचणींपासून दूर राहा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मदत...
मला इनस्क्रिप्टसाठी जरा मदत करता का? कुठून मिळेल? कसे इन्स्टॉल करु? सगळीकडे कसे वापरावे?
बरहाला मी वैतागलोय. मोठे मोठे लेख लिहताना हात दुखायला लागतात. खूपदा अनावश्यक कळी दाबाव्या लागतात. इनस्क्रिप्टने हा त्रास कमी होईल का?
चांगले वेगवान टंकन करण्यासाठी कोणत्या प्रणालीची माहिती आहे का?
-सौरभ.
==================
+
कळा या लागल्या जीवा!
इनस्क्रिप्टचा लेआऊट येथे मिळेल.
विंडोज ऑपरेटिंग सिस्टमसाठीचा इनस्क्रिप्ट ट्यूटर येथे मिळेल.
इनस्क्रिप्ट लेआऊट सर्व प्रमुख ऑपरेटिंग सिस्टमवर त्या सिस्टममार्फतच सपोर्ट केले जाते असा अंदाज आहे. (लायनक्सच्या सर्व फ्लेवरांवर आणि विंडोजवर केलेच जाते. म्याकबद्दल कल्पना नाही.)
जर फक्त वेबसायटींपुरतेच मराठी टंकलेखन करायचे असेल तर फायरफॉक्सचे अत्त्युत्तम इंडिक इनपुट एक्स्टेंशन उपलब्ध आहे. लायनक्सवर कीबोर्ड लेआऊट सेटिंग करताना इंडिक इनपुट वेगळे सेट करता येते जे फायरफॉक्सव्यतिरिक्त इतरत्रही वापरता येते.
अगदी थोड्या प्रयत्नाने इनस्क्रिप्ट चांगल्या प्रकारे वापरता येईल. अनावश्यक कळा निघून जातील. ;)
उत्तम व वेगवान मराठी टंकलेखनासाठी वापरा इनस्क्रिप्ट, इनस्क्रिप्ट, इनस्क्रिप्ट!
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
भय इथले संपत नाही...
इन्स्टॉल कसे करु हे अजून कळले नाही. पायरीपायरीने सांगता येईल का? लेआऊटचे पान बघितले. त्यावरच्या पीडीएफ फाईलने काय करायचे?
इनस्क्रिप्ट माझ्या विंडोज संगणकावर आधीच चढवलेले आहे का? ट्युटरचे पान उघडत नाही.
-सौरभ.
==================
+
चालवीसी हाती धरुनिया
विंडोजसाठी मी खात्रीने सांगू शकत नाही. पण प्रयत्न करुन सांगू शकतो. फारसे अवघड नसावे. श्री. बाबासाहेब जगताप, श्री. चित्तरंजन वगैरे सदस्यही इनस्क्रिप्ट वापरतात असे दिसते. येथे पाहा.
उबुंटुबाबतच्या पायऱ्या अत्यंत सोप्या आहेत. सिस्टम-प्रेफरन्सेस-कीबोर्ड लेआऊट मध्ये जाऊन तिथे 'इंडिया' साठीचा लेआऊट अॅड करायचा. आणि लेआऊट स्विचिंगसाठी एखादा कीस्ट्रोक असाईन करायचा. की झाले काम.
जीनोम पॅनेलवर सध्या चालू असलेला कीबोर्ड लेआऊट दिसण्याची सोय आहे. ते विजेट टाकले की आणखीनच काम सोपे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
झाले/शंका
लुसिड लिंक्समध्ये झाले.
कीबोर्ड लेआउटमध्ये कंट्री - इंडिया, व्हेरियंट - इंडिया हिंदी WX असे केले. मराठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे अडचण येईल का?
लेआउट बघितला त्यात A - ओ, E - आ असे आहे. प्रत्यक्षात टंकताना मा लिहायचा असेल तर म + A टंकावा लागतो. असे का होत असावे?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
डब्लू एक्स आणि इनस्क्रिप्टमध्ये फरक आहे
WX फोनेटिक प्रकारचा एक व्हरायंट आहे. व्हरायन्ट न निवडता, इनस्क्रिप्ट येते का ते पाहता येईल. (सध्या हॉपिसात असल्याने मी तात्काळ तपासणी करुन उत्तर देऊ शकत नाही.) तुम्हाला फोनेटिकच वापरायचा असेल तर मग गमभनचे अॅड ऑनही उपयुक्त आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आभार
व्हेरियंट न निवडता झाले. दुसरी अडचणही दूर झाल्यासाखी वाटते. आता लेआउटप्रमाणे टंकन होते आहे.
A - ओ, E - आ यांची सवय व्हायला वेळ लागेल असे वाटते. त्यात उपक्रमावर आलो की परत उलटे.
बाकी सर्व मस्त आहे. अनेक आभार.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
लिहिण्याची पद्धत इंग्रजी करावी
मराठी संकेतस्थळांवर इनस्क्रिप्ट वापरताना लिहिण्याची पद्धत इंग्रजी निवडावी. (डावीकडील कॉम्बो बॉक्स मध्ये)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
तसे केले
मराठी संकेतस्थळांवर इनस्क्रिप्ट वापरताना लिहिण्याची पद्धत इंग्रजी निवडावी. (डावीकडील कॉम्बो बॉक्स मध्ये)
तसेच केले. मात्र दोन्हीकडे वेगवेगळा लेआउट वापरावा लागत असल्याने इनस्क्रिप्टच्या लेआउटची सवय व्हायला काही काळ जावा लागेल असे वाटते. (म्हणजे उपक्रमावर आत्तापर्यंत जसे वापरत होतो तसेच.)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
अजून चालतोचि वाट माळ हा सरेना...
तो दुवा वाचला आहे. त्या दुव्यावर इनस्क्रिप्ट कसे चांगले आहे हेच सांगितलेले आहे. कुणीतरी इन्स्टॉल कसे करावे सांगेल काय?
श्री. चित्तरंजन किंवा श्री. बाबासाहेब जगताप यांनाच विचारावे लागणार असे दिसते.
-सौरभ.
==================
+
हे
भाषाइंडियाचे हे पान उपयोगी पडेल?
नाहीतर खास कोल्हापुर स्पेशल
ते ही न जमल्यास हा व्हिडियो पाहा
आपला
गुंडोपंत इन्स्क्रिप्टीक प्रयत्नवादी
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.. :-)
गुगलवर सर्चता शेवटी या पानावर जाऊन विंडोज एक्सपीसाठी कसे इन्स्टॉल करावे हे सचित्र बघून जमले.
वापरुन बघतो. त्यानंतर येणार्या अडचणी बघू...
-सौरभ.
==================
+
तेच
मी ही तसेच करतो. पण एनएचएममध्ये ही अडचण आहेच.
अपण बरहाला हे बदल करण्यासाठी सातत्याने प्रतिसाद दिला पाहीजे.
नक्की काय सांगायचे;
म्हणजे ऑ व ऍ मधील चंद्रकोर योग्य येण्यासाठी कोणते कॅरेक्टर एन्कोडींग काय असावे हे कुणी सांगेल का?
बरहा संपर्क पत्ता - baraha@hotmail.com
बरहा फिड बॅकसाठी येथे जा - http://htmlgear.tripod.com/guest/control.guest?u=baraha_sw&i=1&a=sign
-निनाद
बरहासाठीची मदत....
इथे पाहा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
बरहामध्ये...
बरहामध्ये चंद्रकोर देण्याची सोय उपलब्ध आहे राव. म्हणजे सगळं लिखाण बरहाने आणि केवळ चंद्रकोर आली की दुसरीकडून अक्षरे आणण्याचे काम तुम्ही इतके दिवस करत होता काय? किती कष्ट पडले असतील! :-(
कॅ लिहण्यासाठी k + shift `(१ च्या अलीकडे आणि टॅबच्या वरचे) + e दाबा आणि कॉ लिहण्यासाठी k + shift ` + o दाबा.
असंच shift ` + e दाबून ऍ लिहा आणि shift ` + o दाबून ऑ लिहा.
र्य लिहिण्यासाठी r + shift 6 + y + a वापरा. तसेच र्ह लिहिण्यासाठी r + shift 6 + h + a वापरा.
विकीवर मागे संपादने करताना मला ही माहिती मिळाली.
-सौरभ.
==================
+
बरोबर
बरोबर... बराहात ऍ आणि ऑ लिहिणे अजिबात अवघड नाही.
ऍ साठी ~e आणि ऑ साठी ~o एवढे पुरते.
र्य मधला अर्ध र लिहिताना मला बरेच दिवस अडचण यायची. Ry लिहिले तर त्यातला अर्धा र जवळपास दिसत नाही आणि ते अक्षर य सारखेच दिसते. नंतर r^y ची क्लृप्ती कळाल्यावर लिखाण सोपे झाले.
तरी हा एनएमएच रायटर एकदा वापरून पाहायला हवा.
हा अॅ कसा लिहितात?
बरहात व उपक्रमावर ऍ लिहिता येतो परंतु अॅ कसा लिहितात? कृपया की स्ट्रोक सांगावा.
जयेश
युनिकोड ५.२
तुम्ही लिहिलेला ॲ हा मला अ (२३०९)च्या पुढे ॅ (२३७३) असा दिसतो आहे. जुन्या युनिकोडमध्ये ॲ (२४१८) नाही. मला केवळ उबुंटूमध्येच ॲ (२४१८) वापरता येतो, विंडोज एक्सपीमध्ये दिसतही नाही. तो थेट टंकण्याची सोय उपक्रममध्ये नाही असे वाटते. मी लिनक्सच्या कमांड प्राँप्ट वर python -c "print unichr(2377)" असे लिहून किंवा गूगलचे ट्रान्सलिटरेट पान लिनक्समधून वापरून ॲ मिळवतो.
विंडोज एक्सपीमध्ये युनिकोड ५.२ कसे टाकायचे ते कोणी कृपया सांगू शकेल का?
झीरो विड्थ जॉईनरची अडचण
मला वाटते उबुंटू व विंडोज प्रणाल्यांमध्ये झीरो विड्थ जॉईनर कसे प्रिंट करावे याबाबत मूलभूत फरक असावेत.
खालील सावरकरीय बाराखडी तुम्हाला उबुंटू व विंडोज दोहोंवर सारखीच दिसते का?
अ, आ, अि, अी, अु, अू, अे, अै, ओ, औ, अं, अः, अॅ
झीरो विड्थ जॉईनरचे इंटरप्रिटेशन वेगवेगळे असल्याने तुम्हाला मध्ये 'नॉन प्रिंटेबल स्पेस' दिसत असावी.
ह्या अडचणीचे युनिकोड 5.2 शी काही देणेघेणे आहे की नाही याबाबत माझा अभ्यास नाही.
याबाबत मनोगतावरही चर्चा झाली होती पण त्याचा दुवा सापडला नाही. त्या दुव्यामध्ये मा. प्रशासक यांनी सावरकर पद्धतीने अ, आ, अि, अी लिहिण्याची सोय उपलब्ध करवून दिली होती
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शक्य आहे
वरील बाराखडी विंडोजमध्ये अचूक दिसते पण लिनक्समध्ये खराब दिसते.
याउलट, नव्या युनिकोडचे ॲ (२४१८) हे अक्षर लिनक्स मध्ये बघितल्यास ते विंडोजमध्ये दिसणार्या अॅ सारखे दिसते, तर ॲ (२४१८) हे अक्षर लिहिले की विंडोजमध्ये एका आयतात ०९७२ हे आकडे दिसतात (दशमान २४१८ = षोडशमान ९७२). विंडोजमध्ये दिसणार्या अॅ ला ९ बाईट लागतात तर नव्या युनिकोडचे ॲ (२४१८) हे अक्षर केवळ ३ बाईट व्यापते.
कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट सपोर्ट
मलाही आकडे आकडेच दिसत आहेत.
माझ्या विंडोजवर कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट सपोर्ट फॉर रिजनल लँग्वेजेस टाकलेला नाही. तुम्ही तो टाकलेला आहे का? (हे तपासण्याची उत्तम चाचणी म्हणजे फायरफॉक्सच्या टायटलबारवर चौकोन चौकोन दिसतात की देवनागरी अक्षरे दिसतात हे पाहणे. चौकोन दिसत असल्यास कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट सपोर्ट टाकलेला नसावा.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
तसे नसावे
मी कंसात मुद्दाम आकडेच टंकले आहेत. जर तुम्हाला आयतात आकडे दिसत असतील तर अडचण आहे. मी कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट सपोर्ट फॉर रिजनल लँग्वेजेस टाकलेला आहे तरी आयतात आकडेच दिसतात. माझ्या मते युनिकोड ५.२ टाकलेले नाही म्हणून एक्सपी मध्ये अडचण येते आहे.
टायटलबारमध्ये चौकोन नाही पण प्रश्नचिन्हे दिसतात.
कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट सपोर्ट टाकल्यावर अडचण येऊ नये
बहुदा कॉम्लेक्स स्क्रिप्ट सपोर्ट व्यवस्थित टाकला गेला नसावा. तो व्यवस्थित टाकल्यास टायटलबारमध्येही मंगल फॉन्टमध्ये देवनागरी अक्षरे दिसतात. मला सायंकाळी घरच्या मशीनवर थोडे प्रयोग करुन ते पडताळून पाहता येईल. इथल्या मशीनवर मला अॅडमिन अॅक्सेस नाही, पुरेसा वेळ नाही व विंडोजची सीडीही उपलब्ध नाही त्यामुळे लगेच उत्तर देता येत नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आयत की तरह मिल जाए कहीं
मला आयतातच आकडे दिसत आहेत. :)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सात खिडक्या
विंडोज ७ मध्ये मला दोन्ही प्रकारचे ॲ, अॅ योग्य प्रकारे दिसत आहेत.
अवांतरः विंडोज ७ चा बिल्ड ६.१ आहे (एक्सपीचा ५.x होता, विस्टा ६.० होता) त्यामुळे त्याला विंडोज ६ च म्हणावे असा युक्तिवाद वाचला होता.
विंडोजसाठीचा की स्ट्रोक
अ + ‍+ ॅ असे केल्यास अॅ उमटावा. उबुंटूवर मात्र तो व्यवस्थित दिसणार नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अॅ बाबत रिकामटेकडा यांना काम
अॅ प्रिंट करण्यासाठी गमभनच्या जावास्क्रिप्टमध्ये ऍ ऐवजी अॅ प्रिंट करावा अशी सुधारणा करता यावी. मात्र तोपर्यंत श्री. रिकामटेकडा एखादा जावास्क्रिप्ट ह्याक काढू शकतात. ;)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
क्या बात है!
अॅ प्रिंट करण्यासाठी गमभनच्या जावास्क्रिप्टमध्ये ऍ ऐवजी अॅ प्रिंट करावा अशी सुधारणा करता यावी. मात्र तोपर्यंत श्री. रिकामटेकडा एखादा जावास्क्रिप्ट ह्याक काढू शकतात. ;)
कर्णाशी सहमत आहे!
रिकामटेकडा यांनी खरंच हे मनावर घ्यावे अशी माझीही विनंती आहे.
आपला
गुंडोपंत
~काही सदस्य तर्कट असले तरी ते जेंव्हा जावास्क्रिप्ट का काय वापरून समाज उपयोगी काहीतरी घडवू लागतात, तेव्हा मला उपक्रमावर यावेसे वाटू लागते. हल्ली येथे तर्कटीपणा कमी झाल्याने मजा येत आहे. चर्चा करणे बरे वाटते!~
हे घ्या
या दुव्यावर उंदराच्या उजव्या कळीने टिचकी मारून फायरफॉक्सच्या वापरकर्त्यांनी बुकमार्क धिस लिंक वर टिचकी मारून वाचनखूण प्रणाली जपून ठेवावी. इंटरनेट एक्स्प्लोरर च्या वापरकर्त्यांना ऍड टू फेवरिटस हा पर्याय निवडावा लागेल. प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर कधीही E ही कळ दाबली की प्रतिसादातील सार्या ऍ च्या ऐवजी अॅ उमटतील. केवळ एकाच जागीचा ऍ बदलणारी प्रणाली बनविण्यासाठी मला थोडे गुगलावे लागेल. नव्या लेखनात सार्या ऍ च्या ऐवजी अॅ उमटविण्यासाठी ही प्रणाली वापरावी. प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर किमान एक E टंकणे आवश्यक आहे. एकदा प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर कितीही E टंकले तरी ते सारे बदलले जातील.
द्राविडी प्राणायाम?
ऍ ला रिप्लेस करुन त्याचे अॅ करण्याऐवजी थेट अॅ च इन्सर्ट करणारे सोपे जावास्क्रिप्ट करता आले असते का? म्हणजे अॅ हवा असला की मार बुकमार्कवर टिचकी, अशा पद्धतीचे?
(आपला हा प्रयत्न स्तुत्य होता पण रिक्वायरमेंटमध्ये लोच्या झाला हे मान्य करतो.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
समजले नाही
दर वेळी बुकमार्कवर टिचकी मारणे हे कुठूनतरी अॅ क्लिपबोर्डवर घेऊन ठेऊन हवे तेव्हा चिकटविण्यापेक्षा सोपे वाटले नाही.
पण हे मान्य आहे की सध्याच्या स्क्रिप्टमध्ये आहे त्याच प्रकारची सोय देणारे (एकदा चालू केल्यावर कधीही काम करणारे, म्हणजेच आहे तसाच फ्रंट एंड असलेले) जास्क्रि तुम्ही म्हणता तसेही (ऍ ला रिप्लेस करुन त्याचे अॅ करण्याऐवजी थेट अॅ च देईल असा बॅकएन्ड असलेले) लिहिता येईल आणि मोठ्या मजकुरासाठी त्याची उपयुक्तता अधिक जाणवेल. शिवाय एखाद्या लेखनात काही ऍ टिकवायचे असतील तरी ते उपयोगी पडेल. कर्सरची जागा नोंदविणारी जावास्क्रिप्टमधील सोय गुगलावी लागेल.
बुकमार्क टूलबार
विवक्षित बुकमार्क जर 'बुकमार्क टुलबार' वर घेतला तर बराच वेळ वाचेल. कर्सरची जागा शोधणे वगैरे अडचणी माझ्या ध्यानात आल्या नव्हत्या. अॅ साठी अ ‍ ॅ असे सरळ टंकायलाही फार वेळ लागत नाही.
तुमची आताची सोय सध्यापुरती उपयुक्त आहे असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वा!
वा!
रिकामटेकडेराव भारी आहात बरंका तुम्ही!
मजा आली!
आपला
गुंडोपंत
~वरवर भासवणारे काही सदस्य खरंच तर्कट आहेत का असा मला प्रश्न पडतो. ते जेंव्हा जावास्क्रिप्ट का काय वापरून चांगले काहीतरी घडवू लागतात, तेव्हा मला उपक्रमावर यावेसे वाटू लागते, मजा येते. आता चर्चा करणेही बरे वाटते!~
अनेक आभार
वा! ही सोय फारच सुरेख!!
श्री. रिकामटेकडा यांचे अनेक आभार!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
मनोगतावरील गम्मत
उपक्रमावर दिसणारा ऍ हा मनोगतावर अॅ सारखा दिसतो. मनोगतकारांनी फॉन्टमध्ये बदल करुन अचूक अक्षर दाखविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे मनोगतावरील अॅ हा अ + ‍+ ॅ असा संयुक्त नसून, एकाच अक्षराने बनलेला आहे. गरजूंनी मनोगतावर जाऊन सदस्यनामाच्या खिडकीत अॅ टंकण्याचा प्रयत्न करुन पाहावा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत
जपून हो! अख्खा धागाच उडायचा ;)
तेथे मी E टंकले तर मनोगतवर ॲ (हे अक्षर लिनक्सच्या वाचकांसाठी) अॅ(हे अक्षर विंडोजच्या वाचकांसाठी) दिसतो पण ते अक्षर येथे चिकटविले तर नुस्ता ऍ उमटला. पानाचा स्रोत तपासून पाहिला तर तेथे ऍ असतो पण पानावर लिनक्समध्येही अचूक दिसतो आणि विंडोजमध्येही! ही स्टाईलशीट (=शैलीसूची?) ची करामत असावी का?
फॉन्टमधील बदल
बहुदा मनोगतकारांनी उपक्रमावर वापरण्यात येणार्या CDAC-GISTYogesh ह्या फॉन्टमध्ये बदल करुन ऍ हे अक्षर योग्य पद्धतीने दाखवण्यासाठी वेगळा फॉन्ट बनवला असावा. पानांच्या स्रोतांची अधिक तपासणी केली असता शनिपार नावाच्या फॉन्टचा रेफरन्स तिथे दिसतो. पण शनिपार नावाचा फॉन्ट जालावर कुठे उपलब्ध नाही.
मनोगतकार बहुदा फॉन्ट एम्बेडिंग फॉर वेब (.EOT) या तंत्राचा वापर करुन डायनॅमिक फॉन्टचे सिम्युलेशन करत असावेत.
(हे जाणवण्याचे आणखी एक कारण म्हणजे, फक्त मंगल फॉन्ट जरी तुमच्या विंडोजमशीनवर असला तरी फायरफॉक्समध्ये मनोगत संकेतस्थळ हे योग्य फॉन्ट दाखवते [जो मंगल नाही]). फायरफॉक्सच्या अत्याधुनिक आवृत्तीमध्येही डायनॅमिक फॉन्टसाठी सपोर्ट नाही. त्यामुळे शनिपार या फॉन्टची EOT बनवून त्याद्वारे ही अक्षरे दाखवण्याचा मनोगतकारांचा प्रयत्न असावा. )
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शनिपार हे टोपणनाव
शनिपार हे डायन्यामिक फाँटचे टोपणनाव असावे. किंबहुना आहेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उबुन्टू बराहा मॅप
उबुन्टूसाठी बराहा उपलब्ध नसले तरी बराहा मॅप्स (हिंदी) मिळते. बराहाची सवय असणारे हे वापरू शकतात. मात्र ह्यात ऍ साठी ~ उमटवून, कळ सोडून मग e टंकावे लागते. ऑ साठी ~ उमटवून, कळ सोडून मग o टंकावे लागते. र्य साठी r^y. पण हा पायमोडका र् च दिसतो. पापणीच्या आकाराचा र् उबुन्टूत टंकता येतो का? असल्यास कसा?
बराहा मॅप्ससाठी आधी scim, व scim-m17n पॅकेजेस् स्थापित असणे गरजेचे आहे. मग ही फाईल उतरून घ्या. ती /usr/share/m17n ह्या सारणीत कॉपी करा :
sudo cp hi-baraha.mim /usr/share/m17n
SCIM बंद करून पुन्हा चालू करा. ही नवी की-मॅप त्यात हिंदी सेक्शनमध्ये दिसेल.
एससीआयएमचा प्रॉब्लेम
फ्लॅशप्लेअरची 10.1rc रिलीज उपलब्ध असताना मला एससीआयएमने फार त्रास झाला होता. जर एससीआयएम अॅक्टिवेटेड असेल आणि फ्लॅशआधारित काहीही चालू असेल, त्यावेळी जर कीबोर्डचे बटण दाबले तर संगणक हँग व्हायचा.
फ्लॅश आणि एससीआयएमच्या इनकंपॅटिबिलिटीबद्दल जालावर अधिक माहिती मिळावी.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आभार
अनेक आभार. करून बघतो.
मागे मी वाइन टाकून त्यातून बरहा पळवण्याचा प्रयत्न केला होता पण फाँट गंडत होते, मग सोडून दिले.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
र्य साठी
र + ् + & zwj; + य = र्य
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हे खूपदा वाचले .
् + & zwj; हे खूपदा वाचले. पण ् हे अक्षर कुठून आणणार? आणि मराठी टाइप करताकरताच मध्येच इंग्रजीत & zwj; टाइप करायचे? ते तसेच उमटणार. आणि त्यासाठी ब्राउझर कोणता, फ़ॉन्ट कोणता आणि संकेतस्थळ कोणते?--वाचक्नवी
शून्य लांबी जोडणक आणि हलन्त
कोणतेही ब्राउझर चालेल, मला उपक्रमच्या संदेशलेखन खिडकीचा अनुभव आहे. या खिडकीत लिहिताना लेखकाने फाँट ठरविला नसला तरी वाचकाच्या ब्राउझरमध्ये ठरलेला फाँट वाचकाला दिसतो.
इंग्रजीत ‍ किंवा ‍ टंकले की पूर्वपरीक्षणात ते जाऊन त्याऐवजी झीरो विड्थ जॉईनर येईल.
् टंकले की पूर्वपरीक्षणात ते जाऊन त्याऐवजी हलन्त ् येईल.
इनस्क्रिप्टमध्ये थोडे सोपे
एखादे व्यंजन तोडण्यासाठी (हलन्त) इनस्क्रिप्टमध्ये इंग्लिश कळफलकावरील d वापरता येतो. व्यंजनाशिवाय d दाबल्यास तो ् असा उमटतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बराहा ९.०
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संगणक क्षेत्रातील मला फारसे कळत नाही. बराहा युनिकोड २.०, बराह पॅड वापरतो.बराह् ८.० मधे "नवीन काय?"यात पुढील वाक्य आहे. कही उपयोग होईल तर पाहावे
The Marathi character अॅ (MARATHI LETTER CHANDRA A) can be obtained by typing ~a. See
ए सी टी असे स्पेलिंग असलेल्या इंग्रजी शब्दाचा उच्चार देवनागरीत लिहायचा झाल्यास त्यातील पहिले अक्षर (मला) बराह युनिकोड २.० मधे लिहिता येत नाही.