मराठी टंकलेखन प्रमाणीकरण

गेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे. परंतू मला माझ्या लॅपटॉप शिवाय मराठी टंकलेखन करावे लागले, तर मात्र गमभन, क्वीलपॅड किंवा बराहा सारखी इतर सॉफ्टवेअर्स वापरावी लागतात. दुर्देवाने प्रत्येक पध्धतीत थोडेफार व्हेरीएशन्स आहेत. सुरवातीला हौसेच्या दिवसात हे ठिकही होते, परंतू संगणक जगतात मराठीला जर सर्वमान्यता मिळवायची असेल तर मला वाटते, टंकलेखन पध्धतीत प्रमाणीकरणाची नितांत आवश्यकता आहे. जर प्रमाणीकरण नसेल तर मला नाही वाटत की मराठी टंकलेखन हौशी वर्तूळाबाहेर पडून सर्वसामान्यांपर्यत पोहोचेल.

मी iTRANS ही पध्धत वापरली आहे, आणि ती पध्धत मला आवडली, परंतू इतर पध्धतींबद्दल आपली मते असतील तर नक्कि मांडा.

महाराष्ट्र सरकार कडून माझ्या या बद्दल काही फार अपेक्षा नाहीत. राहूल भालेराव (लिनक्स वर SCIM पध्धतीत, रेड हॅट मधील राहूल भालेराव यांचे योगदान आहे), ॐकार जोशी सारख्या सर्वांना आपण यात निमंत्रित करून प्रमाणीकरणासाठी प्रयत्न करू शकतो.

हे सोपे तर नक्की नाही, परंतू शक्य नक्की आहे. काय म्हणता?

तुषार

विश्व जालावरील मराठी जग

Comments

इनस्क्रिप्ट प्रमाणीकृत

इनस्क्रिप्ट ओवरले प्रमाणीकृत आहे. इनस्क्रिप्ट शिका, वापरा. इनस्क्रिप्टचा प्रचार-प्रसार करा. इनस्क्रिप्ट सगळ्या ऑपरेटिंग सिस्टमांसोबत उपलब्ध असते. माझ्यामते इनस्क्रिप्ट सर्वोत्तम आहे. मी इनस्क्रिप्टच वापरतो. शिकायलाही फार वेळ लागणार नाही. मी आधी रेमिंग्टन कीबोर्ड लेआउट वापरायचो. पण तो विसरून इनस्क्रिप्ट शिकायला फारसा वेळ लागला नाही.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

इनस्क्रिप्ट सर्वोत्तम आहे.

शंभर टक्के सहमत.
मी सुद्धा इन्सक्रिप्टच वापरतो. केंद्र सरकार त्याच्या प्रसारासाठी व तांत्रिक सर्वोत्तमतेसाठी यशस्वीपणे प्रयत्न करते आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या संकेतस्थळावर खास टायपिंग शिक्षक आहे. याच्या मदतीने तुम्ही काही तासात बऱ्यापैकी मराठी टंकन शिकू शकता व काही दिवसातच सरावाने निष्णातही होऊ शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला मोफत सीडी ची सुद्धा नोंदणी करता येईल या सीडीत खास मराठी भाषेच्या संगणकीय वापरासाठी अनेक उपयोगी सॉफ्टवेअर्स सुद्धाआहेत.
तुषार यांनी
सरकार कडून माझ्या या बद्दल काही फार अपेक्षा नाहीत
असं म्हटलं आहे. पण सरकार हे आपलंच आहे. थोडं वाह्यात झालं म्हणून त्याला वाऱ्यावर का सोडायचं. त्याला शक्य होईल तितकं वठणीवर आणून काही कामं करून घ्यायची तयारी ठेवायला हवी.

टायपिंग शिक्षक -http://203.199.132.108/Marathi/mdownload98.html
उपयोगी सॉफ्टवेअर्स ची मोफत सीडी -http://203.199.132.108/Marathi/CDReqNonRegistered.aspx

मग आपण नक्की काय वापरतो

मला वाटायचे की गमभन, एस् सी आय एम् या मधे आपण inscript वापरतो, परंतू तुम्ही दिलेल्या लिंक वर दिलेला किबोर्ड लेआउट पुर्णपणे वेगवेगळे आहेत. इतर वेबसाइट्स वर बघीतले तर प्रत्येक ठिकाणी (गमभन, क्विलपॅड, एस् सी आय एम्) वेगवेगळा लेआउट आहे, मग प्रमाणीकरण आहे कुठे?

विश्व जालावरील मराठी जग

प्रमाणीकरण आहे कुठे

गमभन, क्विलपॅड किंवा तत्सम ठिकाणी इनस्क्रिप्ट लेआऊट वापरत नाहीत. या सर्वांचे स्वतःचे वेगवेगळे लेआऊट आहेत. एससीआयएममध्ये फोनेटिक, इनस्क्रिप्ट व बोलनागरी किंवा आयट्रान्ससारखे स्युडो फोनेटिक लेआऊटही आहे.

कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर इनस्क्रिप्ट लेआऊट वापरत असल्यास विशिष्ट कळ दाबल्यास विवक्षित अक्षरच उमटेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तेच तर म्हणतो.

पण तेच तर केले पहीजे.

गचाळ मराठी

टायपिंग शिक्षक या नावाने वर दिलेले पान उघडून पाहिले. त्या पानावरचे मराठी इतके गचाळ आहे की त्या पानाचा मसुदा करणार्‍याला धड मराठी येत नसावे. त्या पानावर भाषेच्या किमान बारा चुका आहेत. त्यांतल्या काही अशा:
१) डाऊन लोड की डाउनलोड? नक्की ठरवलेले दिसत नाही.
२) मराठी भाषेचे ट्रू-टाईप फाँन्टस व कि-बोर्ड ड्रायव्हर की ट्रू-टाइप मराठी फ़ॉन्‍ट्‌स व की-बोर्ड ड्रायव्हर. फॉ वर अनुस्वार आणि शिवाय पुढे न्‌ . ’की’ला पहिली वेलांटी?
३) मल्टीफाँट की मल्टिफ़ॉन्‍ट्‌स? आता फाँट असा लिहिला, आधी फॉन्‍ट होता. शब्द नक्की कसा लिहायचे ते माहीत नसावे.
४) मराठीचे अक्षर जोडणी तपासनिस म्हणजे काय? गुजराथीत जोडणी म्हणजे शुद्धलेखन. हा शब्द येथे कसा? ’तपासनीस’मधील नी दीर्घ हवी.
५) सहाय्यक की साहाय्यक?
६) सॉर्टिंगमध्ये सॉ वर अनुस्वार? आणि टी दीर्घ?

ज्या मंडळींना शुद्ध मराठीची जाण नाही त्यांनी इन्‌स्क्रिप्टचा प्रचार कुठल्या तोंडाने करावा?--वाचक्‍नवी

होतील सुधारणा :)

टायपिंग शिक्षक या नावाने वर दिलेले पान उघडून पाहिले. त्या पानावरचे मराठी इतके गचाळ आहे की त्या पानाचा मसुदा करणार्‍याला धड मराठी येत नसावे.

हम्म ! जाऊ द्या हो. माफ करा त्यांना. शुद्ध मराठी शिकतील हळूहळू

त्या पानावर भाषेच्या किमान बारा चुका आहेत.
बारा चुका दिसत आहेत तेव्हा, आपण काढलेल्या चुका योग्यच असतील
याबद्दल एक उपक्रमी म्हणून माझ्या मनात कोणतीच शंका नाही. :)


ज्या मंडळींना शुद्ध मराठीची जाण नाही त्यांनी इन्‌स्क्रिप्टचा प्रचार कुठल्या तोंडाने करावा?

हम्म, खरंय ! होतील हो सुधारणा.

-दिलीप बिरुटे

सहमत

इनस्क्रिप्ट सर्वोत्तम आहे याच्याशी सहमत.

अर्थात इनस्क्रिप्टमध्येही काही त्रुटी आहेत... मात्र फायद्यांच्या तुलनेत फारच कमी. मी वापरलेल्या लिनक्सच्या सर्व फ्लेवर्सवर (उबुंटु, फेडोरा, सुसे, मँड्रिवा इ.) इनस्क्रिप्टसाठी आऊट ऑफ बॉक्स सपोर्ट आहे. त्यापूर्वी मी एससीआयएम वापरुन टंकलेखन करायचो... मात्र आता त्याची गरज वाटत नाही.

जाता जाता इनस्क्रिप्टमध्ये "ओम्" कसा लिहायचा याची युक्ती कोणी सांगेल का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फरक काय?

inscript आणि फोनेटिक यामध्ये फरक काय आहे?
इंग्रजी भाषेचे व्यवहारातले महत्व आणि वापर पहाता मला गमभन/बरहा यांना जास्त महत्व द्यावे वाटते. अर्थात प्रमाणीकरणाची गरज तर आहेच. मागे सुद्धा या बाबतीत चर्चा झाली आहे.


गुगल सुविधा

गुगलने नुकतीच एक चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे.

http://tinyurl.com/y989pcz

ही सुविधा मी अजून नीट वापरून पाहिलेली नाही. पण बहुधा फक्त फोनेटिक सपोर्टच असावा. गुगलने इन्स्क्रिप्टच्या पारड्यात आपले वजन टाकले नाही तर ती पद्धती अधिक चांगली असूनही मागे पडू शकते.

चांगले आहे

वापरून बघीतले पाहीजे

मान्य आहे

आपण संगणक घरी, कार्यालयात, मित्राकडे किंवा नेट कॅफे मध्ये वापरतो. इंग्रजी मध्ये टंकलेखन करताना सगळीकडे समान पध्धत असते, परंतू मराठीत मात्र ते शक्य नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही IME प्रस्थापीत करू शकत नाही. अशा वेळी गमभन/बरहा किंवा गुगल IME सारखे पर्याय योग्य आहेत असे मला वाटते. परंतू या सर्व पर्यायात प्रमाणीकरण नाही. म्हणून हा प्रपंच. मला स्वत:ला iTRANS पध्धत आवडते, कारण यात फार वेळ शिकण्यात जात नाही. मान्य आहे की इंग्रजी येणे जरूरि आहे आणि चित्तरंजन यांच्या म्हणण्याप्रमाणे जास्त कळा दाबाव्या लगतात, त्या मुळे टंकलेखनास जास्त वेळ लागतो, परंतू मला वाटते की ते प्रत्येक व्यंजनाला 'अ' जोडण्यामुळे असावे. प्रमाणीकरणामध्ये याचा पण विचार करता येईल. मला आठवते की उपक्रम यावर पण चर्चा झाली होती.

पुढे काय?

फरक

इनस्क्रिप्ट ओवरले वापरल्यास कमी कळा वापराव्या लागतात. उदा. चित्तरंजन हा शब्द लिहिण्यासाठी इनस्क्रिप्ट वापरल्यास एकूण ८ कळा वापराव्या लागतात. फोनेटिक वापरल्यास हाच शब्द लिहिण्यास १२ कळा दाबाव्या लागतात. थोडक्यात इनस्क्रिप्टमुळे, विशेषतः मोठा मजकूर लिहायचा असल्यास, भरपूर वेळ वाचू शकतो. तसेच डावी बाजू स्वरांसाठी व उजवी बाजू व्यंजनांसाठी अशी व्यवस्था लक्षात ठेवायला अधिक सोपी आहे.

अधिक माहितीसाठी आधी दिलेला दुवा तपासावा. तिथे लिहिले आहे:

इनस्क्रिप्ट ओवले में सब भारतीय लिपियों के लिए अपेक्षित कैरिक्टर होते हैं जैसा ISCII कैरिक्टर सैट द्वारा परिभाषित किया गया है। भारतीय लिपि वर्णमाला की एक तर्कीय संरचना होती है जो ध्वन्यात्मक गुणें से व्युत्पन्न होती है। इसस्क्रिप्ट ओवरले इस तर्कीय संरचना को प्रतिबिम्बित करता है। ओवरले ध्वन्यात्मक/आवृति महत्वों से भी इष्टमीकृत होता है। यह दो भागों में बांटा जाता है: स्वर पैड बाईं ओर और व्यंजन पैड दाहिनी ओर होता है।

स्वर पैड में, स्वर तदनुरूपी मात्राओं की शिफ्ट स्थिति में दिए जाते हैं। सब पांच छोटे स्वर निकट पंक्ति में दिए जाते है। जबकि उनके लंबे साथी ठीक ऊपर अनुरूपी कीज़ पर स्थित होते हैं। चूंकि स्वर े की अनुरूपी मात्रा नहीं होती इसलिए स्वर-छूट संकेत, हलन्त्, अनशिफ्ट स्थिति में दिया जाता है। हलन्त् का प्रयोग सयुक्त बनाने के लिए किया जाता है जब इस व्यंजनों के बीच टाइप किया जाता है।

एक संयुक्ताक्षर को टाइप करने में एकांत हस्तक्रिया का अभ्यास हो जाता है क्योंकि हलन्त् बायें पैड से टाइप किया जाता है जबकि अधिकांश व्यंजन दाहिने पैड से टाइप किए जाते हैं। इस प्रकार जब बहुत से व्यंजनों के बाद मात्रा टाइप करनी होती है तो इसी प्रकार एकांतर दस्तक्रिया घटित होती है। यह एक अक्षर की टाइपिंग पर्याप्त रफ़्तार से करता है।

व्यंजन पैड में 5 वर्गों के प्राथमिक कैरिक्टर निकट पंक्ति में शामिल होते हैं। महाप्राण व्यंजनों को उनके अल्पप्राण साथियों की शिफ्ट स्थितियों में रखा जाता है। ऐसे वर्ग के निरनुनासिक व्यंजन ऊर्ध्वाधर सन्निकट कीज़ के युगल में अन्तर्विष्ट होते हैं।

वर्गों के मुख्य नासिक व्यंजन बायें पैड की निचली पंक्ति में, संबंधित अनुस्वार और चन्द्रबिन्दु के साथ होते हैं। अन्य गैर-वर्ग व्यंजन दाहिने हाथ की शेष स्थितियों में, उनके तर्कीय संबंधों और उपयोग आवृत्तयों के अनुसार रखे जाते हैं।

स्पर्श टाइपिंग के लिए अपेक्षित सब कैरिक्टर निचली 3 पक्तियों में रखे जाते हैं। शीर्ष पंक्तियों में कुछ संयुक्त होते हैं जो दृश्य टाइपिंग में आसानी के लिए होते हैं। सुयुक्त कैरिक्टर कीज़ वास्तव में अनुरूपी मूल कैरिक्टर होते हैं।

की-बोर्ड की ध्वन्यात्मक वर्णात्मक प्रकृति के कारण, एक व्यक्ति जो एक भारतीय लिपि में टाइप कर सकता है वह किसी अन्य भारतीय लिपि में टाइप कर सकता है। तर्कीय ढांचे के कारण सीखने में आसानी होती है जबकि आवृति महत्व स्पर्श टाइपिंग में रफ्तार देते हैं। सब भारतीय लिपियों में स्पर्श-टाइपिंग और दृश्य-टाइपिंग दृश्य-टाइपिंग दृष्टिकोण से की-बोर्ड इष्टतम रहता हैं।

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

सहमत

की-बोर्ड की ध्वन्यात्मक वर्णात्मक प्रकृति के कारण, एक व्यक्ति जो एक भारतीय लिपि में टाइप कर सकता है वह किसी अन्य भारतीय लिपि में टाइप कर सकता है। तर्कीय ढांचे के कारण सीखने में आसानी होती है जबकि आवृति महत्व स्पर्श टाइपिंग में रफ्तार देते हैं। सब भारतीय लिपियों में स्पर्श-टाइपिंग और दृश्य-टाइपिंग दृश्य-टाइपिंग दृष्टिकोण से की-बोर्ड इष्टतम रहता हैं।

या विचारास सहमत आहे.

अर्थ सांगा

खालील वाक्यांचा सोप्या मराठीत अर्थ सांगावा.:
१. एक संयुक्ताक्षर को टाइप करने में एकांत(?) हस्तक्रिया का अभ्यास हो जाता है.
२. ओवरले ध्वन्यात्मक/आवृति महत्वों से भी इष्टमीकृत(?) होता है।
३. हलन्त्(?) का प्रयोग सयुक्त(?) बनाने के लिए किया जाता है जब इस(?) व्यंजनों के बीच टाइप किया जाता है।
४. ध्वन्यात्मक गुणें से व्युत्पन्न होती है।
५. सुयुक्त(?) कैरिक्टर कीज़ वास्तव में अनुरूपी(?) मूल कैरिक्टर होते हैं।
६. वर्गों के मुख्य(?) नासिक व्यंजन संबंधित(?) अनुस्वार के साथ होते हैं।
७. अन्य गैर-वर्ग व्यंजन उनके तर्कीय संबंधों और उपयोग आवृत्तयों(?) के अनुसार रखे जाते(की रखे गये?) हैं।
वगैरे वगैरे.--वाचक्‍नवी

प्रयत्न करून बघा

खालील वाक्यांचा सोप्या मराठीत अर्थ सांगावा.:
क्षमस्व. सांगता आला असता तर आधीच सांगितला असता. इनस्क्रिप्ट फारच सोयीचा आहे. प्रयत्न करून बघा.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.
 
^ वर