बरहा आणि एनएचएम रायटर

न्यू होरायझन मिडीया या कंपनीने एनएचएम रायटर (NHM Writer) या नावाचे बरहासारखे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

http://software.nhm.in/products/writer

हे वापरायला बरहाइतकेच सोपे आहे पण बरहात नसणार्‍या २-३ महत्त्वाच्या गोष्टी यात आहेत.

१) विंडोजमधील "रिजनल लैंग्वेज सपोर्ट" एनेबल करणे म्हणजे डोक्याला एक ताप असतो. तो यात "आपोआप" सेट केला जातो. भल्याभल्यांना क्रमवार मार्गदर्शनही पुरत नाही.
http://in.hindi.yahoo.com/FAQ_English.htm#Enable_Indic_for_Windows_XP_&_...

अर्थात मायक्रोसॉफ्टची ओरीजिनल सीडी असली तरच युनिकोड आपल्या संगणकावर नीट दिसेल, पण ती सीडी बहुतेक वेळा हाताशी नसते. एनएचएमने ही खूप मोठी सोय केली आहे की रिजनल लँग्वेज सपोर्ट सीडी शिवाय यातूनच आपोआप उपलब्ध होतो.

२) नवीन भाषा किंवा की-बोर्ड लेआउट टाकणे खूप सोपे आहे.
३) स्क्रीनवर दिसत राहणारा दोन प्रकारचा की-बोर्ड नवीन लोकांना उपयोगी ठरू शकतो.

अर्थात मायक्रोसॉफ्टचा क्लिष्ट इंडिक सपोर्ट, गुगलचा साधा सोपा आयएमई, तर धपाधप वापरता येणारा बरहा या तिघांपुढे हे नवीन बाळ कितपत टिकेल ते सांगता येत नाही, पण मला मात्र हा पर्याय खूप उपयोगी वाटला.

मायक्रोसॉफ्टशी हातापायी करायची तयारी असेल तर सुशांत देवळेकर यांनी केलेले मार्गदर्शन सर्वोत्कृष्ट.
http://sites.google.com/site/yunikodatunmarathi/dharika

गुगलची सेवा नावाप्रमाणेच सोपी, पण ती काही लोकांना आवडत नाही.
http://www.google.com/ime/transliteration/

बरहाबद्दल काही बोलायलाच नको.
http://www.baraha.com/download.htm

पण वर दिलेला "एनएचएम रायटर" वापरून पहायला काय हरकत आहे?

Comments

इनस्क्रिप्ट शिका. सुखी व्हा.

इनस्क्रिप्ट शिका. सुखी व्हा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उपयुक्त चर्चा

छान चर्चा.
शंतनू, अजानुकर्ण, रिकामटेकडा बरेच काही शिकवत आहेत. धन्यवाद!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

+१

असेच म्हणतो.

एनएचएम

रायटर...मला कसे वापरायचे अजिबात समजले नाही...
ते जोवर माझ्या संगणकावर होते तोवर मराठी संकेतस्थळांची नावे (पानाच्या अगदी वर डावीकडे)जी देवनागरीत दिसायला हवीत..त्याजागी प्रश्नार्थक चिन्हे दिसत होती....म्हणून मी एनएचएम उडवलं...आता सगळं पूर्ववत दिसतंय.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

फ़ॉन्टफ़्रीडम

IL Infotech कंपनीने बनवलेलाकळफलक मला मराठीसृष्टीवर एका दुव्यावर सापडला. तो कळफलक संगणकावर बसवून आणि मग वापरून युनिकोडित देवनागरी बर्‍यापैकी लिहिता येत असली पाहिजे. अ किंवा ए वर चंद्र, हिंदी आणि मराठी ल आणि श, पाऊण य, नुक्ता, र्‍ह, र्‍य, अश्वातला अर्धा श, ही सर्व अक्षरे सहज टंकित करता येतात, असे दिसते आहे.. संस्कृत ख मात्र सापडला नाही. क्ष, ज्ञ ओम्‌ आणि हिंदीभाषकांच्या सोयीसाठी त्र साठी स्वतंत्र कळी आहेत. शिडी बहुधा विकत घ्यावी लागत असावी.---वाचक्‍नवी

रायटर वापरून पाहिला

रायटर वापरून पाहिला. उत्तम काम झाले. आधी विंडोजच्या सीडीअभावी नुसते चौकोन दिसत असत. आता सगळे काही नीट दिसते आहे.
धन्यवाद.

 
^ वर