मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली.

सुप्रिया ताई पवार सुळे या भारताच्या नागरिक नाही.आणि त्या बद्दल चालू असलेलेली कोर्टबाजी चे प्रकरण वाचून, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली. जेथे आपणास सोनिया ही परकीय सून राजकारणात चालते, ही गोष्ट वेगळे आपल्या साहेबांनी त्यांच्या परकीय पणाला विरोध केला होता.पण सहकारी साखर सम्राटांच्या शिक्षण सम्राटांच्या तमाम बारामतीकरांच्या sorry महाराष्ट्राच्या भलेपणा साठी बेरजेचे राजकारण करत त्यांनी सोनियांना पवित्र करून घेतलं. आणि भारताची कृषी मंत्री झालेत. काय म्हणता यांच्याच काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या झाल्यात. साहेबाना बदनाम करण्यासाठी विदर्भाच्या,मराठवाड्याच्या राजकारण्यांनी टाकलेले हा डाव आहे. बारामती, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कोठे आत्महत्या केल्या का? मग साहेबाना का बदनाम करता .
तेथे सुप्रिया ताई तर आमच्या जनतेच्या शेतकऱ्याच्या जाणत्या राजाची एकुलती एक लाडकी अनिवासी भारतीय कन्या आहे. घार हिंडती आकाशी पर नजर तिची पिल्ला पाशी या न्यायाने जरी सुप्रिया ताई सिंगापूरच्या नागरिक झाल्या असल्या तरी बारामतीच्या पिल्लान वरील त्यांची माया कांही कमी झालेली नाही.या मायेच्या माये पोटी आणि पिताश्री ला मदत करण्या पोटी त्या बिचाऱ्या स्वतःचे आलिशान सिंगापूर मधील घरदार संसार पतीदेव सोडून महाराष्ट्राच्या रखरखीत उन्हात, वीज पाणी याची टंचाई असलेल्या भारतातील महाराष्ट्रातील बारामती करांच्या सेवे साठी निवडणूक लढवतात .आता या लढाईत त्या भारतीय नागरिकत्वाचा शुल्लक विचार कशाला करतील? आदनन सामी सारखे पाक कलाकार आपल्या देशात येवून मानसन्मान पैसा मिळवताच ना . बांगला देशी, पाकीस्थान घुसखोर तुम्हाला चालतात ना . मग साहेबाच्या लेकीने INCOME TAX चुकवण्या साठी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर काय बिघडले. आता जाणता राजा जागतिक क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झाला आहे.त्याच्या माघारी भारतीय क्रिकेट बोर्डाचा ,IPL (उगाच भलता विचार करू नका) चा कारभार पाहण्यासाठी कोणी तरी विश्वासू पाहिजे ना? आजच्या काळातच नाही तर काका-पुतण्याचे नाते पेशवाई पासूनच बदनाम झालेले आहे , त्यामुळे ताई पेक्षा अधिक विश्वासू साहेबाना कोण मिळेल. मराठी मानसं सारखे त्यांचे पाय ओढू नका. तीला कोर्ट कचेरीत अडकवून समाजसेवे पासून रोखू नका. हीच कळकळीचे विनंती. जय मराठी !!

Comments

ग्रह फिरले

पवारसाहेबांचे ग्रह फिरलेले दिसतात. आधी आयपीएल प्रकरण आणि आता हे.

पण दादांपेक्षा ताई बऱ्या (दगडापेक्षा वीट मऊ) असे प्राथमिक इम्प्रेशन वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ठणठणपाळ यांनी लेखन शीर्षक थोडेसे लहान करावे असे मनापासून वाटते

प्लीज शीर्षक लहान करा ना. वाचायला फार त्रास होतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

भीतीपोटी एक विचारणा..

ठणठणपाळजी,
तुम्ही अख्खा मजकूर औपरोधिक लिहिला आहेत. तुम्हाला त्याची भीती नाही का हो वाटत? त्या वटपौर्णिमेच्या धाग्यावर मी काही गंमतीचे लिहिले आणि एका उपक्रमी जाणत्यांनी मला लगेच 'औपरोधिक लिहू नका', अशी विनंती केली. आता तुमच्याकडून पण बहुधा काही स्पष्टीकरणे मागवली जातील कदाचित.

तर तुम्ही टीका करताना एक मुद्दा विचारात घेतलेला नाही. सुप्रिया यांनी अद्याप याचिकेवरील आपले स्पष्टीकरण न्यायालयापुढे सादर केलेले नाही. म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यातून ठोस निष्कर्ष काढणे इतक्यात बरोबर ठरणार नाही, असे आपले मला वाटते.

बाकी मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो, यात नवे काही नाही. शेवटी आपण खेकडे आहोत. ओढून ताणून आपल्या मधमाशा थोड्याच होणार आहेत. (मधमाश्यांतील सहकार आणि संवाद प्राणिसृष्टीत आदर्श मानला जातो म्हणून ते उदाहरण)

नाही

याला कॅन्सर झाला म्हणून गुटखाबंदी आली! पवार बॅशिंग मलाही आवडते (मू.ले.ची शैली खटकते).

वटपौर्णिमेच्या धाग्यात तुमचा उपरोध तुम्ही पुन्हा पुन्हा लिहित होतात असे मला जाणवले.

:-)

नक्की आक्षेप काय आहेत कळू शकेल काय?

जगातले बरेच देश पैशाच्या गुंतवणुकीवर (विशिष्ट रक्कम - मिलीयन डॉलर्समधे) तेथील रेसीडन्सी (नागरीकत्वाशी गल्लत करु नये) देतात. भारतासारख्या देशात इतके मोठे लुक्रेटिव्ह करीयर सोडून दुसर्‍या देशाचे नागरीकत्व सुळेताई घेतील असे अजिबात वाटत नाही.

दुसर्‍या देशाने रहायचा व्हिसा देणे अवैध आहे का भारतीय खासदारासाठी?

 
^ वर