वटपौर्णिमेसारख्या सण/प्रथा मोडीत काढायला हव्यात का?

आज वटपौर्णिमा. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. प्रार्थना करतात की सातही जन्मी हाच पती मिळावा. पण आजच्या जमान्यात ह्या अशा सणांना काही अर्थ राहिलेला नाही. मला तरी हे स्रियांच्या दास्यत्वाचे, गुलामगिरीचे एक चिन्ह वाटते. हे असे सण मोडीत काढायला नको काय? [ ह्या आजच्या आधुनिक स्त्रीला (सावित्रीला म्हणावे काय? धजत नाही.) वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना बघितले की हसूच येते.]

असो. तुम्हाला काय वाटते? मत मांडावे. तसेच वटपौर्णिमेशिवाय इतर प्रथा, सण खारिज करावेसे वाटत असल्यास/नसल्यास त्याबद्दलही सांगावे.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रामाणिक शंका

खालील भाषा पूर्णपणे अनौपरोधिक आहे. व्याजाची अपेक्षा नाही.

लग्नसंस्था असलेल्या समाजात काही कारणास्तव (निवड म्हणून, वैद्यकीय कारण किंवा इतर अपरिहार्यतेमुळे) अपत्यविहीन असलेल्या जोडप्यांचे विवाह हे एक कालबाह्य रुढीपालन आहे असा अर्थ आपल्या प्रतिसादातून निघू शकतो का?
लग्नाची वैज्ञानिक आवश्यकता किंवा सिद्धता समजावून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे, व फलज्योतिषाच्या तुलनेत लग्नसंस्था वेगळी कशी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हो

निवड म्हणून अपत्यविहीन असलेल्यांना विवाहाची आवश्यकता अत्यंत कमी भासेल पण मूल होणे वगळले तरी स्त्रीचे थोडेफार शोषण शक्य आहे. हॉर्मोन्समुळे त्या अधिक विश्वास टाकणार्‍या, वगैरे असतात (येथे २०-२५ प्रतिसादांचा उपधागा सुरू होईल अशी आशा आहे). शिवाय रजोनिवृत्तीनंतर तिची किंमत कमी होते (येथेही २०-२५ प्रतिसादांचा उपधागा सुरू होईल अशी आशा आहे). त्यामुळे लग्नाचा तिला थोडातरी फायदा होईलच.

हॉर्मोन्स

प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळ्या हॉर्मोन्सचे प्रमाण वेगवेगळे असते. असे काही हॉर्मोन्स असावेत काय की ज्यामुळे फलज्योतिषामुळे आपल्याला मानसिक आधार मिळतो असे एखाद्या व्यक्तीला वाटावे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शक्य आहे

हॉर्मोन्सचा परिणाम तर होतोच पण मेंदूतही फरक असू शकतात. प्रत्येकजण नास्तिक बनू शकतो असे डॉकिन्सला वाटते आणि 'देव आहे असे वाटण्याइतपतच काही लोकांची कुवत असते' हे मत त्याला आवडत नाही.

पण मग

हार्मोनल परिस्थितीमुळे अवैज्ञानिक लग्नव्यवस्था आपण निमूटपणे स्वीकारतो तसेच हार्मोनल परिस्थितीमुळे अवैज्ञानिक फलज्योतिष रॅशनलिस्ट लोकांना स्वीकारायला हरकत नसावी.

जर सद्यस्थितीतील अमेरिका (किंवा काही वर्षांनी भारत) यांचा लग्न-घटस्फोट-विभक्त होण्याचे प्रमाण असा संख्याशास्त्रीय विदा घेतला तर लग्नसंस्था थोतांड आहे हे सिद्ध करता येईल. मात्र माझ्या आईबाबांचा ३० वर्षांचा संसार त्यांच्या मते सुखाचा झाला या वैयक्तिक अनुभवाला प्रमाण मानावे (विज्ञान अशा वैयक्तिक अनुभवांना प्रमाण मानत नाही) की वैज्ञानिक प्रयोगांनी सिद्ध केलेल्या थोतांडाला हा एक प्रश्न उभा राहतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तसे नाही

हॉर्मोनमुळे पुरुष स्त्रीला फसवू शकतो, रजोनिवृत्तीनंतर सोडू शकतो म्हणून (ते टाळणारे) लग्न तिच्या फायद्याचे आहे. हाच युक्तिवाद पुढे चालवून तुमचा फलज्योतिषविषयक निष्कर्ष काढा.

मागील पानावरुन पुढे

हाच युक्तिवाद पुढे चालवून तुमचा फलज्योतिषविषयक निष्कर्ष काढा.

हॉर्मोनमुळे फलज्योतिषावर विश्वास ठेवणे फायद्याचे आहे. फलज्योतिषावर विश्वास न ठेवल्याने हार्मोनिक इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतो. (हे काहीसे ओसीडी प्रमाणे मानावे.) त्यामुळे एक कल्ट मानसोपचार म्हणून रॅशनलिस्ट लोकांनी फलज्योतिषाला मान्यता देण्यात चूक काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कारण आणि परिणाम

हॉर्मोनमुळे फलज्योतिषावर विश्वास ठेवणे फायद्याचे आहे.

असे कोणी सांगितले? फलज्योतिष खोटे असूनही त्याच्यावर विश्वास ठेवावेसे वाटू शकते, एवढेच मी सांगितले.

फलज्योतिषावर विश्वास न ठेवल्याने हार्मोनिक इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतो.

हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे फलज्योतिषावर विश्वास ठेवावेसे वाटू शकते. यावर तुम्ही चॅटेलियर तत्त्व लावीत आहात का?

(हे काहीसे ओसीडी प्रमाणे मानावे.)

??

त्यामुळे एक कल्ट मानसोपचार म्हणून रॅशनलिस्ट लोकांनी फलज्योतिषाला मान्यता देण्यात चूक काय?

बालपणीच्या घटनांची स्मृती जागृत करून पहा. कल्ट उपचारांना वैज्ञानिक स्वीकृती नाही.

विचार करण्यालायक

विचार करण्यायोग्य मुद्दे. विचार चालू आहे. (थोडक्यात मी सध्या निरुत्तर आहे. काही मुद्दा मिळाला की पुन्हा खुसपट काढीन.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दुरूस्ती

कल्ट उपचारांना वैज्ञानिक स्वीकृती नाही.

कॅथार्सिस् वैज्ञानिक स्वीकृती नसतानाही वापरला जातो. कृपया उलटे संदर्भ देऊ नयेत.

प्रतिसाद चुकीच्या जागी आला आहे त्याबद्दल क्षमस्व.

ठीक

वापरला जातो हे समर्थन अग्राह्य आहे. अनेक हाय इम्पॅक्ट व्यक्ती अवैज्ञानिक वागतात.

कारण

वापरला जातो कारण कॅथार्सिस सायकिऍट्रीच्या अभ्यासक्रमातील एक भाग आहे. मनोविकारतज्ञ स्वतःच्या मनाने वापरत नाहीत.

ठीक

तुमच्या माहितीवर विसंबून निषेध; चौकशी करतो. एमबीबीएसला वाचले त्या पुस्तकात केवळ एका ओळीत उल्लेख होता की खूप मोठ्या दु:खद घटनेनंतर पेशंटला रडायला लावले की बरे वाटते, कदाचित हा प्लॅसिबो परिणाम असेल. बालपणीचे अत्याचार 'आठविण्यास' मदत करणे वगैरे व्याख्या नव्हती.

वैज्ञानिक की अवैज्ञानिक

एखादे वागणे वैज्ञानिक की अवैज्ञानिक हे कसे ठरते? ;)
ज्याला जसे वाटते तसा तो वागतो.. त्यांच्या मेंदूतून निघालेले विचाररूपी संदेश त्याच्या विविध अवयवांना एखादी क्रिया करायला लावतात त्याला आपण वागणे म्हणतो मग कोणतेही वागणे अवैज्ञानिक कसे?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगला प्रश्न

स्वतःच्या विचारशक्तीचा आणि उपलब्ध ज्ञान/माहितीचा पूर्ण वापर न केल्यामुळे निष्कर्ष चुकू शकतात. अवैज्ञानिकतेचे निदान इतरांनी करून ते सिद्ध केल्यास आणि त्या व्यक्तीने दिल्या गेलेल्या युक्तिवादांचा विचार केल्यास त्या व्यक्तीस पटते.

उपधागा

पण असे लग्नसंबंध हे म्युच्युअल बेनेफिट्सवर आधारित नाहीत असे दिसते. पुरुषांना अशा लग्नसंबंधांतून काय फायदा? याच चर्चेत आधी पुरुष पशू व गाढवे आहेत अशी मुक्ताफळे वाचली आहेत. विवाहातील अपयशांनाही पुरुषांना घाऊक जबाबदार धरले आहे. पण तुमच्या प्रतिसादांतून लग्नाचा (कायदेशीर व इतर) फायदा स्त्रियांना होतो असे दिसते. मग गर्रीब ब्बिच्चाऱ्या पुरुषांनी या फंदात पडायचेच कशाला? त्यांनी सुस्पष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून अशा अवैज्ञानिक प्रथांचा विवेकवादी विरोध सुरु करायवयास हवा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एक कारण

भाड्याने गर्भाशये मिळणे सोपे नाही. शिवाय ते मूल वाढविण्यात डिविजन ऑफ 'लेबर' बरे पडेल असे वाटते. अपत्य नको असेल तर केवळ खात्रीची सहचरी म्हणूनच पुरुषांचा फायदा होईल, अधिक मागणी असलेली सहचरी लग्नाशिवाय तयार होणार नाही (कारण त्यात तिचा फायदा आहे), बाकी काही फायदा मला सुचत नाही.

विवाहसंस्थेचा इतिहास

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक याबाबतीत वाचनीय आहे. http://marathipustake.org/

कित्त्येक सस्तन प्राण्यात एक शक्तिमान नर व जास्त माद्या असा कुटुंब प्रकार आढळतो. माणसाच्या बाबतीत पूर्वी 'प्रजापती' संस्थेत असेच चालत असावे. त्यामुळे कित्येक नर हे समाजातून दूर फेकले जायचे.
एकास एक विवाह हा त्यावरील उपाय असावा.

प्रमोद

खुलासा

आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वैवाहीक जीवनातील अपयशाचे कारण नवरा असतो, असे मला वाटते. या नवर्‍याची पूजा बांधली जाणे हे या महिलांना वेदनादायक वाटत असणार. या वेदनेच्या तीव्रतेविषयी मला माहीत नाही. त्या तीव्रतेची कल्पनाही मी करण्याची माझी इच्छा नाही. तीव्रता कमी असणेही शक्य आहे. त्या वेदनेमुळे वटसावित्रीपौर्णिमेचा विरोध केला जावा असे मत मी मांडलेले नाही.

तुमचा कल्पनाविलास चालू द्या.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

मी बाई लाडाची, कैरी पाडाची

या कल्पनाविलास कोण? सौ. कि मिस्? आणि मी कधी 'केल्या'?

माझा युक्तिवाद पूर्णपणे तर्कशुद्ध आहे.

१. लग्नसंस्थेला वैज्ञानिक आधार नाही. (प्रयोगशाळेत यास्तव काही प्रयोग झाले आहेत काय हे मला माहीत नाही.)
२. लग्नसंस्था ही फलज्योतिष व जातीव्यवस्थेप्रमाणेच जुनाट आहे.
३. लग्नसंस्था स्त्रियांच्या शोषणास कारणीभूत ठरते. (हुंडाबळी, करिअर ओरिएंटेड स्त्रियांच्या महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागते, नको असलेल्या मुलांना जन्म द्यावा लागणे वगैरे)

माझा प्रतिसाद आपल्याला 'कल्पनाविलास' का वाटला? या ज्या कोणी कल्पनाविलास आहेत त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही.

माझ्या प्रतिसादातील दुसरा भाग आपण (सोयीस्कररीत्या?) दुर्लक्षिलेला आहे काय?

जर परित्यक्ता स्त्रियांना दुसऱ्या बायका वटपौर्णिमेचे व्रत करतानाचे पाहून मानसिक त्रास होत असेल तर दुसऱ्यांचे लग्न होताना पाहून कैकपटीने मानसिक त्रास होत असेल असे आपणास कां वाटत नाही?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दुर्लक्ष

माझ्या प्रतिसादातील दुसरा भाग आपण (सोयीस्कररीत्या?) दुर्लक्षिलेला आहे काय?

होय. दुर्लक्षिलेला आहे.

माझा प्रतिसाद आपल्याला 'कल्पनाविलास' का वाटला?

'कल्पना करवत नाही' यावरून घटस्फोटिता/ परित्यक्ता यांच्या वेदनेमुळे वसापौ करू नये असा जावईशोध माझ्या विधानांतून लावल्यामुळे. तेच लॉजिक वापरून शुभेच्छा देणार्‍यांची किव येते असे म्हणूनही त्या 'शुभेच्छा देणार्‍यांची किव' येऊ नये म्हणून वसापौ साजरी करू नये हा शोध लावला नाही म्हणून विसंगतीही जाणवली.

जर परित्यक्ता स्त्रियांना दुसऱ्या बायका वटपौर्णिमेचे व्रत करतानाचे पाहून मानसिक त्रास होत असेल तर दुसऱ्यांचे लग्न होताना पाहून कैकपटीने मानसिक त्रास होत असेल असे आपणास कां वाटत नाही?

अन्याय्य प्रथांविषयी संताप वाटणे आणि मत्सर यांना मी दोन वेगळ्या गोष्टी मानत असल्याने त्रास होत असेल असे वाटत नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

प्रामाणिक शंका

अन्याय्य प्रथांविषयी संताप वाटणे आणि मत्सर यांना मी दोन वेगळ्या गोष्टी मानत असल्याने त्रास होत असेल असे वाटत नाही.

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्यास चाललेली पाहून परित्यक्ता स्त्रियांच्या मनात येणाऱ्या भावना व लग्न करण्यास चाललेली मुलगी पाहून परित्यक्ता स्त्रीच्या मनात येणाऱ्या भावना यांचे मत्सर व संताप हे वर्गीकरण आपण कसे केलेत? अशा भावना मोजण्याचा बॅरोमीटर कोणत्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे?

मी ही शंका अत्यंत प्रामाणिकपणे विचारत आहे हे गरज नसतानाही नमूद करतो. (माझ्या प्रामाणिक शंका अनेकांना खोडसाळ वाटतात.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शंकासमाधान

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्यास चाललेली पाहून परित्यक्ता स्त्रियांच्या मनात येणाऱ्या भावना व लग्न करण्यास चाललेली मुलगी पाहून परित्यक्ता स्त्रीच्या मनात येणाऱ्या भावना यांचे मत्सर व संताप हे वर्गीकरण आपण कसे केलेत?

वडाची पूजा करणार्‍या बायका पतीचे श्रेष्ठत्व ऍब्सोल्युट आहे, याचा गौरव करतात. याच पतीने परित्यक्ता महिलेस टाकून दिलेले असते. पतीने केलेल्या अन्यायाचा असा जळजळीत अनुभव असूनही 'पतीचे श्रेष्ठत्व ऍब्सोल्युट' असा गौरव करणार्‍या प्रथेविषयी संताप येणे स्वाभाविक आहे.

लग्न करण्यास चाललेल्या मुलीचा पती चांगला असू शकतो. विवाह आनंदात जाण्याची शक्यता असते. आपल्या जीवनात असे सुख मिळण्याची शक्यताही नसल्याने परित्यक्ता महिलेस मत्सर वाटणेही शक्य आहे. पण विवाहसंस्थेविषयी पूर्णपणे नकारात्मक मतही झालेले असू शकते. तेव्हा वर्गीकरण फारसे ग्राह्य नाही.

अशा भावना मोजण्याचा बॅरोमीटर कोणत्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे?

प्रयोगशाळेत असे उपकरण असू शकेल. नसेलही. कल्पना नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

तुम्हारा चुक्याच

(मी स्वतः वडाला किंवा कोणत्याच झाडाला फेऱ्या घातल्या नसल्याने नक्की कल्पना नसली तरी) वडाची पूजा करणाऱ्या बायका आपापल्या पतीचे श्रेष्ठत्त्व अधोरेखित करत असाव्यात. पती या पदाचे नव्हे. (जन्मोजन्मी हाच पती मिळू दे रे वडा).

याच पतीने परित्यक्ता महिलेस टाकून दिलेले असते.

दुर्दैवाने येथे स्लिप ऑफ टंग झालेले दिसते. तुमच्या प्रतिसादातून फेरीवाली स्त्री आणि परित्यक्ता स्त्री यांचा पती एकच आहे असा चुकीचा अर्थ निघत आहे. मी तो तसा नाही असे गृहीत धरून परित्यक्ता स्त्रीचा पती हा फेरीवाल्या स्त्रीपेक्षा वेगळा आहे असे मानतो.

लग्न करण्यास चाललेल्या मुलीचा पती चांगला असू शकतो. विवाह आनंदात जाण्याची शक्यता असते. आपल्या जीवनात असे सुख मिळण्याची शक्यताही नसल्याने परित्यक्ता महिलेस मत्सर वाटणेही शक्य आहे.

हाच न्याय वडाला फेऱ्या घालणाऱ्या बाईबाबतही लावता येईल की. ती स्वखुशीने फेऱ्या मारत आहे म्हणजे तिचा पती चांगलाच असल्याची ग्यारंटी! अशा बायकांविषयी परित्यक्तांना मत्सरच वाटायला हवा. उलट लग्न करण्यास चाललेल्या मुलीचा पती चांगला असू शकतो यामध्ये पुन्हा यदृच्छा व ते अवघड संख्याशास्त्रीय गणित आले. त्यात संताप या भावनेला बेनेफिट ऑफ डाऊट देता येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

.

दुर्दैवाने येथे स्लिप ऑफ टंग झालेले दिसते.

नाही. ज्या पतीला वसापौ साजर्‍या करणार्‍या स्त्रिया ऍब्सोल्युट मानतात त्याच पतीने काही स्त्रियांना टाकून घातलेले असते. येथे 'पती' हा शब्द जगातील सर्व पतींचा प्रतिनिधी म्हणुन वापरला आहे.

ती स्वखुशीने फेऱ्या मारत आहे म्हणजे तिचा पती चांगलाच असल्याची ग्यारंटी!

ती स्वखुशीने मारते आहे की पीयरप्रेशरमुळे की परंपरेच्या ओझ्यामुळे ते कसे कळले? स्वखुशीने फेर्‍या मारत असली तरी तिचा पती चांगला
असेलच असे नाही.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

पतीप्रतिनिधी

अच्छा म्हणजे तुमचा पती या पदावर राग आहे. त्या पदावर कोण व्यक्ती बसलेली आहे, त्या व्यक्तीचे वेगवेगळे गुणदोष असू शकतात, कदाचित तो बायकोशी चांगलाही वागू शकत असावा याच्याशी देणेघेणे नाही. हे थोडेसे hating in the plurals प्रकारचे वाटते.

ती स्वखुशीने मारते आहे की पीयरप्रेशरमुळे की परंपरेच्या ओझ्यामुळे ते कसे कळले?

मत्सर आणि संताप यामधला फरक ज्या बॅरोमीटरमुळे मोजता येतो त्या बॅरोमीटरमुळे. ;)

स्वखुशीने फेर्‍या मारत असली तरी तिचा पती चांगला असेलच असे नाही.

पण तिच्यासाठी तो चांगलाच आहे ना. त्यामुळेच ती स्वखुशीने फेऱ्या मारते आहे. तिचा पती बाह्यजगात दुर्गुणी म्हणून नावाजलेला असला तरी 'he is a good husband' असे तिला वाटते ना. मग तिचा पती वाईट कोणत्या अर्थाने?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वरशिपिंग इन् प्लुरल्स

हे थोडेसे hating in the plurals प्रकारचे वाटते.

नाही. नवरे चांगले असू शकतात. सर्वच चांगले नसतात. नवर्‍यांना देवत्व देऊ नये. थोडक्यात loving in plurals मान्य नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

वटवटसावित्री

वटपौर्णिमा हे वरशिपिंग हे प्लुरल्स नाहीच. ती बाई आपल्या (बहुदा) एकमेव पतीचीच सातजन्माची कामना मनात ठेवून पूजा करत आहे. त्यामुळे ती पती या पदाऐवजी पती या पदावरील एकाच व्यक्तीचा गुणगौरव करत आहे. हे सिंग्युलरच झाले. प्लुरल कसें? (से वर टिंब)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

प्लुरल

यावेळचा पती. त्याचे पुढचे सात अवतार. प्रत्येक जन्माच्या वपौ मध्ये सात अवतारांची पूजा. ७*७*७*७*७...>१

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

सामान्यीकरणास विरोध

आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वैवाहीक जीवनातील अपयशाचे कारण नवरा असतो, असे मला वाटते

अशा प्रकारच्या जनरलायझेशन्सना माझा पूर्ण विरोध आहे. जर काही पुरावे नसतील तर अशी पूर्वग्रदूषित विधाने मागे घ्यावीत व पुनर्विचार करावा असे लेखकाला नम्रपणे सुचवावेसे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नोटेड

अशा प्रकारच्या जनरलायझेशन्सना माझा पूर्ण विरोध आहे.

विरोध नोट केलेला आहे.

जर काही पुरावे नसतील तर अशी पूर्वग्रदूषित विधाने मागे घ्यावीत व पुनर्विचार करावा असे लेखकाला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

नम्रपणे सुचल्याबद्दल धन्यवाद. पुनर्विचार सुरू आहे. विधान मागे घेण्याची आवश्यकता वाटत नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

चिअर्स

अनेक प्रथा कालबाह्य असल्या तरी त्या गतानुगतिकते मुळे टिकून आहे. हा एक इनर्शियाच आहे. जन्मोजन्मी हाच पती लाभो या समजुती पोटी हे सण साजरे केले जातात का? उपवास काय पुण्य मिळवण्याच्या हेतुने केला जातो का? अनेक अंधश्रद्धा वा कालबाह्य रुढी परंपरा या तुलनात्मक निरुपद्रवी असतात. त्याला लगेच मानसिक गुलामगिरी, हा तर मानवी बुद्धीचा अवमान अशी तर्ककर्कश व समाजाविन्मुख भुमिका घेउन विरोध करण्यापेक्षा त्यात हळू हळू समयोचित बदल करण्यास प्रवृत्त करणे हे अधिक प्रगल्भतेचे आहे असे मला वाटते. अंनिस चा होळी लहान करा पोळी दान करा हा कृति कार्यक्रम याच धोरणाशी सुसंगत आहे. अनेक गोष्टी कालबाह्य असल्या तरी सामाजिक नोंद वा त्यातील सौंदर्य जतन करण्यासाठी टिकून ठेवल्या जातात. समूह जीवन् सुकर व्हाव म्हणुन काही संकेत अलिखित स्वरुपात निर्माण झाले त्यातलाच काही भाग पुढे रुढी परंपरा झाल्या.
अनेक म्हणी वाक्यप्रचार आजच्या काळात कालबाह्य वा अप्रस्तुत वाटत असल्यातरी भाषेत रुढ आहेत. काहींना त्यात कालबाह्यता दिसेल तर काहींना भाषा सौंदर्य. हा ज्याच्या त्याच्या मेंदुच्या जडणघडणीशी निगडीत आहे.
हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान त्यांच्या तर्ककर्कशतेमुळे समाजापासुन तुटुन पडतात म्हणुन त्यांचे महत्व नाकारण्यात अर्थ नाही कारण त्यानी देखील काही विचार दिलेला असतो. समाजाच्या तो पचनी पडायला वेळ लागतो
उत्तम कांबळेंच्या प्रथा अशी न्यारी पुस्तकात देवाला हातभट्टीची चतकोर चपटी नैवेद्याला लागते अशी पण एक प्रथा नोंद आहे.
शेवटी समाज हा विविध स्तरातील असल्याने त्याला एक मापदंड लावता येणार नाही. कालबाह्य झालेल्या क्रुर प्रथा परंपरा बंद करण्यासाठी प्रबोधन व कायदा यानी संयुक्तपणे काम केल्यास त्या आटोक्यात येतील. सतीच्या प्रथेच उदाहरण याबाबत देता येईल.
दारु पिताना चिअर्स असे म्हणुन ग्लासाला ग्लास आपटुन आनंद साजरा करण्याच्या प्रथेला काय बुद्धीप्रामाण्य निकष लावणार ?
असो ! वटपौर्णीमेच्या या ' धाग्या' नी करमणुकीची 'वसुलि' झाली.
प्रकाश घाटपांडे

चीअर्स

दारु पिताना चिअर्स असे म्हणुन ग्लासाला ग्लास आपटुन आनंद साजरा करण्याच्या प्रथेला काय बुद्धीप्रामाण्य निकष लावणार ?

ही प्रथा 'तिकडून' आलेली असल्याने ग्लासांच्या किणकिणण्याने श्रवणयंत्रणेतील विशिष्ट ग्रंथी जागृत होऊन मद्यानंदी टाळी लागण्यास पोषक वातावरण तयार होते असे त्याचे समर्थन होऊ शकते.

उदा. आपल्याकडे वाढदिवसाच्या वेळी असलेली औक्षणाची प्रथा आता गावंढळ ठरुन केक कापून मेणबत्त्या फुंकण्याची मॉडर्न प्रथा रुढ होत आहे. कदाचित दोन्ही प्रथा सारख्याच निरर्थक असतील पण 'तिकडून' आलेली प्रथा आपल्याला प्रगतीचे व बुद्धीप्रामाण्याचे लक्षण वाटते ही मला मानसिक गुलामगिरी वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

मेणबत्ती/दिवा मालविण्याच्या कृतीच्या सांकेतिक अर्थामुळे आमचे औक्षणच करतात. टोळभैरवांकडून स्वतःच्या तोंडाला केक लावून घेऊन, लाथा खाऊन वर शिवाय हाटेलात नेण्यापेक्षा मी आदल्या दिवशी घरी पळत असे. औक्षणात पैशे मिळतात (केसात तांदूळ टाकतात हाच काय तो तोटा).
आयुष्यातील अजून एक वर्ष वाया गेल्याचे दु:ख वाटते. त्यात मुळात साजरे करण्यासारखे काय आहे?

टोपी पहनके फूल खिला है

(केसात तांदूळ टाकतात हाच काय तो तोटा).

हा तोटा होऊ नये म्हणूनच आपल्या पूर्वसुरींनी धार्मिक अधिष्ठान देऊन मंगलप्रसंगी टोप्या घालण्याची पद्धत सुरु केली होती. मात्र त्यात काही वैज्ञानिक तथ्य नसल्याने ती पद्धत बंद झाली आणि केसात तांदूळ अडकू लागले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उपयोग नाही

टोपीनेही केसांचा भांग बिघडणारच ना?

समाजाविन्मुख भुमिका

वट्पौर्निमेला विरोध 'समाजाविन्मुख भुमिका' कशी ठरते?

मुळ प्रस्तावाशी असहमत

जेव्हा एखादी प्रथा कालबाह्य झाली आहे असे समाजातल्या बहुसंख्य वर्गाला वाटायला लागते तेव्हा ती प्रथा आपोआप मोडीत निघते. समाजातल्या तथाकथित उच्च वर्गापासून सुरु होऊन खालच्या स्तरापर्यंत ही वाटचाल होते

सहमत आहे.. अगदी वटपौर्णिमेचं उदाहरण घ्या. पूर्वी महिला दिवसभर उपास करीत आता शहरांत सर्रास केवळ पूजा होऊ पर्यत महिला उपवास करतात. हळूहळू हे ही कमी होईलसं वाटतं.

मुळ चर्चाप्रस्तावाशी असहमत. सामाजिक दृष्ट्या सणांचं महत्त्व अजूनहि अबाधित आहे. त्याचे स्वरूप कसे असावे ह्यावर चर्चा करता येईल मात्र ते कसे असावे याचे सरकारने नियम घालणे चुकिचे वाटते. समाजातील बहुमताला पटले की ते बंद होईल. ज्या प्रथा जाचक / अन्यायकारक आहेत त्यावरही कायद्याने बंदी घालण्यापेक्षा/बरोबरच समाजप्रबोधन अधिक फायद्याचे/गरजेचे ठरावे.

बाकी असे सण बंद करायचे म्हणजे काय? त्याविरूद्ध कायदा करायचा की वडाच्या झाडाला दोरी बांधणार्‍या स्त्रियांविरूद्ध खटला भरायचा/अटक करायची की वटपौर्णिमेला स्त्री जमावबंदी आणायची का एखाद्या 'लाल'सेनेच्या गुंडांकडून झाडआंभोवती गस्त घालायची की प्रत्येक झाडाभोवती कुंपणे घालायची? जर उद्या कोणि हा सण साजरा करावा म्हणून सक्ती करत असेल तर त्याला विरोध करता येईल/करावा.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

उगाच आपले काहीही

'लाल'सेनेच्या गुंडांकडून

हाहाहा. उगाच आपले काहीही ;) लाल सेना किंवा डावी मंडळी असल्या गोष्टीत पडत नाही असे वाटते. त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा कशा पूर्ण करता येतील ह्याची चिंता आहे, असे वाटते. स्कर्ट घालणाऱ्या मुलींच्या मांडीवर ब्लेड मारणे, वॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मुलींना मारहाण वगैरे कामे करणाऱ्या शिवसैनिकांना किंवा श्रीरामसेनेच्या नरवीरांना किंवा त्यांना मानणाऱ्या सज्जनांना हे काम तुम्हाला आउटसोर्स करता येईल. विचारून बघा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

:)

अहो पण वटपौर्णिमा हा हिंदु सण पाळू नये म्हणून ते वीर इथे कसे येतील? (अर्थात पालिका निवडणूका जवळ आल्यावर जिथे "अर्थ" असेल तिथे ते अश्या गोष्टीही करतीच म्हणा ;))

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पूर्ण धागा वाचत नाही का?

सरकारने नियम घालावे असे मू.ले.ने प्रतिपादिले आहे का?

या प्रतिसादात मी विरोधाचा एक मार्ग सांगितला आहे.

धुळीतल्या टापांच्या खुणा

>मला तरी हे स्रियांच्या दास्यत्वाचे, गुलामगिरीचे एक चिन्ह वाटते. हे असे सण मोडीत काढायला नको काय?

चिह्न आहे हे पटलं. पण म्हणून ते मोडीत काढलं पाहिजे हा तर्क कळला नाही. हे म्हणजे वेढा घालून बसलेल्या शत्रुसैन्याच्या घोडेस्वारांच्या धुळीतल्या टापांच्या खुणा दररोज् पुसत राहाण्यासारखं आहे. शत्रूचाच नाश केला तर त्या खुणा वार्‍याने आपोआपच मिटणार नाहीत का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

तू छुपा था कहाँ, मैं अकेला यहाँ

शत्रूचाच नाश केला तर त्या खुणा वार्‍याने आपोआपच मिटणार नाहीत का?

हाच युक्तिवाद मी येथे केला आहे. त्याला पुष्टी देणारे मत दिल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

थोडा टाइमपास...थोडी चर्चा.

>>असे सण मोडीत काढायला नको काय ?
प्रतिसाद वाढविणारे, संकेतस्थळावर सदस्यांची हालचाल वाढविणारे, कै च्या कै चर्चा होणारे, पुरोगामी अशा संस्थळावर उद्या अशा चर्चा मोडीत काढायला हव्यात असा पर्याय येऊ शकतो. त्यामुळे अशा चर्चा आणि असे सण मोडीत काढायला नको असे वाटते.

>>वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना बघितले की हसूच येते
'हसू' हे व्यक्तिसापेक्ष असते. कोणाला कशाचे, तर कोणाला कशाचे हसू येते. मला चर्चा प्रस्तावाचे हसू येते. पण, 'हसून' वटपोर्णिर्मिच्या प्रतिसादाकडे वळू या.

पती आपला सर्वस्व आहे असे मानून त्याच्याबरोबर सुखदु:खे भोगण्यास, त्याच्या प्रापंचिक कार्यात सतत सोबत आहे. पतीसाठी संकटे झेलणारी, पतीवर खूप प्रेम करणारी अशी 'सावित्री' आजच्या काळात असल्यास कोणा पतीला वाईट वाटणार नाही. 'पती' सर्वस्व मानण्याचा काळ नाही. पत्नीने पतीच्या सुखदु:खात सोबत असलेच पाहिजे असा विचार कालबाह्य होत आहे. स्त्रीला दुय्यम स्थान देणारा पुरुषी विचार आता मागे सोडला पाहिजे, असे कोणी म्हटले तरी त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. जन्मोजन्मीचे जाऊ द्या. एका जन्मी तरी या सणाच्या निमित्ताने 'स्त्री पुरुषांचे' प्रेम वाढत असेल, कुटूंबवत्सलता निर्माण होत असेल तर अशा उत्सवाकडे पाहण्याची आमची तरी दृष्टी तशी स्वच्छ आहे.

सावित्रीच्या कथेतून त्या काळी स्त्रिया आपला पती निवडत असायच्या. [असा एक संदेश दिसतो] वराचा शोध घेता घेता 'सावित्रीला' सत्यवान गुणाने आवडावा. त्याच्यावर मोहित होऊन त्याच्याशी लग्न करण्याचा विचार तिने तिच्या पालकांना बोलून दाखवावा. लग्न झाल्यानंतर वर्षभराने पती मरणार आहे असे कळूनही मी त्याच्याशी लग्न करीनच असा निश्चय करणारी, आपले राजवैभव सोडून नवरा,सासू,सासरे यांच्या सेवेत प्रिय होते. आता इथे नवर्‍याची काय सेवा करायची, सासू-सासर्‍यांचे स्त्री च्याआयुष्यात काय महत्त्व असे म्हणता येऊ शकेल. ती काय गुलाम आहे, नोकर आहे, असेही म्हणता येऊ शकेल. 'जिथे पती मी तिथे' हा संदेश आजच्या काळात चालणार नाही. साक्षात यमाशी संवाद् करुन अतिशय चतुराईने आपला पती मिळवणार्‍या स्त्रीची कथा थोतांड असेल पण त्यामागील विचार, भाव समजून घेता आला तर सण-उत्सवाचा एक नवा अर्थ आपले आयुष्य सुखी करेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

ठीक

त्यांच्यावर टीका करण्यासाठी अशी खुसपटे काढण्याची गरज नाही. ते अंबाबाईला जातात.
विज्ञानवाद्यांच्या बोधिवृक्षांवर टीका करायची असेल तर येथे अजून एक उदाहरण आहे.

आभारी आहे

परंपरा, प्रथा, सण वगैरे वगैरे कालबाह्य झाल्यास नष्ट होतीलच. त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता नाही, असे एकंदर मत दिसते. चर्चा यशस्वी करणाऱ्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर