उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वटपौर्णिमेसारख्या सण/प्रथा मोडीत काढायला हव्यात का?
धम्मकलाडू
June 25, 2010 - 1:35 pm
आज वटपौर्णिमा. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. प्रार्थना करतात की सातही जन्मी हाच पती मिळावा. पण आजच्या जमान्यात ह्या अशा सणांना काही अर्थ राहिलेला नाही. मला तरी हे स्रियांच्या दास्यत्वाचे, गुलामगिरीचे एक चिन्ह वाटते. हे असे सण मोडीत काढायला नको काय? [ ह्या आजच्या आधुनिक स्त्रीला (सावित्रीला म्हणावे काय? धजत नाही.) वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना बघितले की हसूच येते.]
असो. तुम्हाला काय वाटते? मत मांडावे. तसेच वटपौर्णिमेशिवाय इतर प्रथा, सण खारिज करावेसे वाटत असल्यास/नसल्यास त्याबद्दलही सांगावे.
दुवे:
Comments
+१
एकदम सहमत. वटसावित्री काय? बहुतेक सर्वच रुढी व कुळाचार हे कालबाह्य, निरर्थक आणि निष्कारण झालेले आहेत् असे माझे स्पष्ट मत आहे. चन्द्रशेखर
सहमत आहे
वटपौर्णिमेसारख्या रुढींचे पालन म्हणजे मानवाच्या बुद्धीचा अपमान आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
हरकत नसावी
धम्मकलाडू यांच्याशी पूर्ण सहमत आहे.
परंतु मला वाटते की वटपौर्णिमा व त्यासारखे सण/प्रथा या सतिच्या प्रथेप्रमाणे समूळ टाकून देण्यापेक्षा किंवा सक्तीच्या करण्यापेक्षा करणार्याच्या इच्छेवर सोडावे.
(स्वानुभवः नुकतेच लग्न झालेल्या एखादीला असते हौस असे नवर्यासाठी काहीतरी 'स्पेशल' करण्याची! नव्याचे नऊ दिवस सरले की सगळे ठिकाणावर येत असतील...)
नवर्यासाठी?
>>नुकतेच लग्न झालेल्या एखादीला असते हौस असे नवर्यासाठी काहीतरी 'स्पेशल' करण्याची.....
१. वटसावित्रीच्या व्रतात नवर्यासाठी काय केलेले असते? ते तर जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून केले जाते. म्हणजे पत्नीच्या (पर्सीव्ह्ड) फायद्यासाठी केले जाते. (नव्या सासरच्या लोकांना इम्प्रेस करण्याची हौस मात्र असणे स्वाभाविक आहे. ते मात्र हरतर्हेने करण्यास काही हरकत नाही).
२. व्रत केल्याने काही होणार नाही हे उघडपणे मान्य असल्याचे म्हणून मग हौस म्हणून ते केल्याचे सांगण्यात काय हशील आहे?
माझे मत : असल्या व्रतांकडे दुर्लक्ष करावे. "या काळातही सगळं काही करत्ये हो !!!" असे कौतुक होत राहील तोपर्यंत हे प्रकार टिकूनच राहील. तसे करू नये म्हणजे न करणार्यांवर 'नवर्यावर प्रेम नसल्याचा आरोप होण्याचे' दडपण येणार नाही.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
सहमत
श्री धम्मकलाडू यांच्याशी सहमत आहे. घटस्फोटीत, परित्यक्ता महिलांना अशा सणांमुळे काय वाटत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देणार्या लोकांची कीव वाटते.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
असहमत
मॅरेथॉन/स्प्रिंटच्या विजेत्यांचा सत्कार होताना पराभूत खेळाडूंना/अपंगांना काय वाटत असेल?
हे मत आधी खरडवहीत दिले होते.
अखंड सौभाग्यवती, सात जन्मी तोच पती|
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
समजा पत्नीने हे व्रत केले. तिच्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या. तर या जन्मी तिचे निधन पतीच्या आधी होणार.ती पुनर्जन्म घेणार.समजा ५ वर्षांनी पती वारणार. मग तो पुनर्जन्म घेणार. समजा पहिल्या जन्मात पती ५ वर्षांनी मोठा होता. तो दुसर्या जन्मात पत्नीच्या वयाचा असणार. तिसर्या जन्मात तो पत्नीहून लहान असणार. असे होता होता सातव्या जन्मात पती पत्नी पेक्षा बराच लहान असणार. आकडेमोड करून पाहावी.
"क्षीणे पुण्ये"तत्त्वाने पुनर्जन्म-वयाचा हिशोब
मृत्यू पावल्यानंतर लगेच नवा जन्म होत नाही, असे गणित केल्यास जमते.
मृत्यू झाल्यावर पुण्य शिलकीत असल्यास काही काळापर्यंत लोक स्वर्गलोकात जातात, असे मानूया, आणि पुण्य तिथे खर्च केले जाते. पुण्याचा साठा संपताच व्यक्तीचा पुनर्जन्म होतो. "क्षीणे पुण्ये मृत्युलोकं विशन्ति ।"
स्त्री वटसावित्रीची पूजा करते (नवरा करत नाही) त्यातून तिला पुण्य मिळते. त्याची राशी 'क्ष' म्हणूया. पुरुष स्त्रीशिवाय कुठली पूजा करत नाही. जोडीने केलेल्या व्रतवैकल्यांची पुण्यराशी 'य' ही नवरा-बायको यांच्यापाशी सारखीच.
स्त्रीचा पुण्यसाठी = क्ष + य
नवर्याचा साठा = य
मृत्यूनंतर स्त्री स्वर्गात अधिक काळ राहाते ('क्ष' हा अतिरिक्त साठा संपेपर्यंत). अशा प्रकारे वयाचा हिशोब जुळू शकतो.
- - -
मात्र स्त्री स्वर्गात असते, पुरुष जिवंत असतो, तोवर तिला स्वर्ग नवर्याविना कंठावा लागतो. त्या काळी ती सौभाग्याची लेणी वापरू शकते काय? होय, म्हणूया. असे असूनही स्वर्गात ती विरहाने व्याकूळ होत असेल. नवर्याला सुद्धा वेगवेगळ्या सेवांपासून पृथ्वीतळावर वंचित राहावे लागत असेल. सवत करेल हो, पण धांदरटच शिवाय दुष्ट - भुकेला असेल बिचारा नवरा. तस्मात् अहेवपणी मरण यावे, पण त्यानंतर नवरा फार काळ वियोगात राहू नये, स्वर्गात लवकर यावा, अशा प्रकारची व्रत-मागणी करावी.
हे सर्व गणित म्हणजे विरंगुळा आहे, हे सांगणे नलगे.
माहितीची विनंती
प्रचलित आत्मा सिद्धांत कोणत्या धर्मग्रंथातील आहे? आत्म्यांमध्ये लिंगभेद असतो का?
प्रचलित सावित्री-आत्मासिद्धांत
बहुधा कुठल्यातरी लळितग्रंथातला असावा. (किंवा विरंगुळितग्रंथातला असावा.)
आत्म्याचा लिंगभेद भाषाभेदाप्रमाणे.
तो आत्मा - (मराठी) पुंल्लिंगी
उसकी आत्मा - (हिंदी) स्त्रीलिंगी
सावित्री ही हिंदीभाषक होती, आणि सत्यवान हा मराठीभाषक.
(हिंदीभाषक सर्वांना सावत्र वागणूक देतात, असे म्हणण्याची प्रथा हिंदीभाषक सावित्रीमुळे)
(मराठीभाषक रोखठोक सत्य बोलतात, हा समज मराठी सत्यवानापासून)
यम हा मात्र दाक्षिणात्य. (संदर्भ : यल्-यम्-यन्-वो-पी, शिवाय जाड मिशा.) तिथे कुठल्याशा भाषेत आत्मा नपुंसक. म्हणून "ही सावित्री पाठीमागे येऊन-येऊन या नपुंसकास का मागते आहे?" असा प्रश्न त्याला पडणे साहजिकच आहे.
ब्राव्हो!
जबरदस्त प्रतिसाद!
हॅट्स् ऑफ!
-निनाद
खी खी खी
हा मजेशीर प्रतिसाद वाचलाच नव्हता. ग्रेट!
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अगदी
<<यम हा मात्र दाक्षिणात्य. (संदर्भ : यल्-यम्-यन्-वो-पी, शिवाय जाड मिशा.)>>
अगदी अगदी तेव्हा अगदी हाच यम आठवतो
प्रकाश घाटपांडे
सातवा जन्म
"सातजन्म हाच पती द्या" असा वर देताना देवबाप्पा गणित करत नसावा असे यनांचे म्हणणे दिसते. शिवाय, पती हा पत्नीपेक्षा मोठाच हवा असा पूर्वनियमही त्यांना मान्य दिसतो.
पण समजा, देवाला गणित येत असेल आणि तोही पती हा पत्नीपेक्षा मोठा हवा असा पूर्वनियम पाळत असेल तर तो पत्नीला कशाला पुन्हा जन्माला घालेल पती आधी?
देवाला धादांतवादाशीही देणेघेणे नाही असे यनांना वाटत असावे.
;-)
देव
मुळात यनांना 'देव' ही संकल्पनाच मान्य नसावी त्यामुळे त्यात धादांतवाद येण्याचा प्रश्नच नसावा.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अं!
यनांनी सत्यवान सावित्रीच्या कथेला अनुसरून पुनर्जन्माचे गणित दिले ना. त्या मूळ कथेत देव आहे. आता यनांना पुनर्जन्मही मान्य नाही हे सांगाल तर ते मला माहित आहे पण इथे ते लागू नाही तेव्हा संदर्भांना सोडून चर्चा नको.
सहमत
मोडीत काढा नाहीतर चिल्लरमध्ये.
असो.
हळदीकुंकू, वटसावित्री वगैरेच्या निमित्ताने जुन्या बायकांना घराबाहेर पडायची मुभा मिळत असे किंवा स्वतःसाठी थोडा टैम. (आता प्लीज कोणी मला वडाभोवती फेर्या मारून कसला टैम ते विचारू नये. उत्तर माहित नाही.)
हे सण गेले तर नवे यावेत असे मला वाटते. ;-) वाटली डाळ, पन्हे, पुरणपोळ्या, मोदक, तिळाचे लाडू वगैरे खाण्यासाठी स्पेश्शल दिवस हवेत ना. (आता पुन्हा, मग खा की करून असे सांगू नये. आम्ही सगळेच पदार्थ करतो असे नाही. शेजार्यांनी देऊ केलेल्या फराळावरच आमचे भागते. ;-)
१.पिंपळ-सत्यवान (मेल्यावर नवर्याचे भूत, दुसरा जन्म घेण्यापूर्वी पिंपळाला लटकत असेल तर)
२.बुक्का-अबीर
३. घरमालका (हरतालकेच्या चालीवर)
असे सण चालतील.
पी.जे.बद्दल क्षमस्व.
एक सोडून
हे सण गेले तर नवे यावेत असे मला वाटते.
फक्त तो "कडवा चौथ" बंद झाला तर बरे होईल असे वाटते. म्हणजे ज्यांना पाळायचाय त्यांच्या विरोधात मी नाही आहे, ज्यांना जे करायचे आहे ते त्यांना करूंदेत... पण हिंदी सिनेमात त्यावरून अक्षरशः ऊत आल्याने असे म्हणत आहे. ;)
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार
मुळावर घाव
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ही प्रथा लवकरच नष्ट होईल...
जग झपाट्याने बदलते आहे. वटपौर्णिमेसारखे सण लवकर कालबाह्य होणारच आहेत. त्याबद्दल काळजीचे कारण नाही. आता हेच बघा ना. गोर्यापान, सोनेरी केसांच्या बार्बी बाहुल्या बाजारात स्वस्तात मिळू लागल्यावर आपली ओबडधोबड लाकडी ठकी बाहुली मरून गेलीच ना? इंग्रजी भाषेच्या सोसापायी प्रादेशिक भाषांचा गळा आपण घोटतच आहोत. तर ते जाऊ देत. मला म्हणायचेय की जर वडाचे झाडच राहिले नाही तर त्याची पूजा कोण करणार? शहरात वडाची झाडे दिसत नाहीत. एकतर त्यांची मुळे इमारतींना त्रासदायक ठरतात आणि असली झाडे जागाही व्यापतात. इंग्रजांनी जेव्हा भारतात पक्क्या सडकांचे जाळे निर्माण केले तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूंना वड. पिंपळ, आंबा, कडुलिंब, चिंच, बाभूळ अशी देशी झाडे विचारपूर्वक लावली होती. आता एकीकडे अशी घनदाट सावली देणारी झाडे तोडून रस्त्याभोवतालची जागा विविध व्यवसायांसाठी वापरण्याची पद्धत आहे. अनेक लोक बाजारातून वडाच्या फांद्या विकत आणून घरी पूजा करू लागले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेही वडाची झाडे लवकर नष्ट होतील.
वटपैर्णिमा हा पुरुषी वर्चस्वाचा सण आहे, याबद्दल शंकाच नाही. आधुनिक महिला शिकलेल्या आहेत. त्यातून नवरा हा एक पशू असतो याबाबत बहुतेक स्त्रीवर्गाचे एकमत असते. असली पीडा सात जन्म कशाला गळ्यात बांधून घ्यावी त्यांनी? सध्या 'एकाच जन्मात सात जोडीदार मिळू देत' अशी प्रार्थना करण्याचे दिवस आहेत. एकवेळ मुलींना लांडे कपडे घालून पबमध्ये जाऊ द्यावे, पण त्या जडजड साड्या नेसवून उगाच नथ आणि दागिने घालून वडाला फेर्या मारायला पाठवण्यात काहीच शहाणपण नाही.
वड
>> अनेक लोक बाजारातून वडाच्या फांद्या विकत आणून घरी पूजा करू .....
वडाच्या फांदीचा मोल्ड बनवायला दिला आहे. पुढच्या वर्षी प्लॅष्टिकच्या वडाच्या फांद्यांचा धंदा करीन म्हणतो. तसेच हॅप्पी वटपौर्णिमेच्या ग्रीटिंगचाही धंदा करावा असे वाटू लागले आहे. आगाऊ मागणी नोंदवावी.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
चांगली कल्पना
खरोखरच धंदा करायचा असल्यास बाजूच्या संकेतस्थळावर जाहीरात करावी. :)
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
सहमत आहे
उत्तम कल्पना.
३% टक्के दराने 'तिथे' सुलभ कर्जही उपलब्ध करावे, घेणार्यांची रीघ लागेल. :)
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
नाय वो.
ते झैरात म्हणतायत ती त्या स्थळावर नाय..... आणखी दुसर्या स्थळावर . इ-खरेदी वैग्रे असते. पण तिकडे आमचा वावर कमी असतो.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
दोन्हीकडे
दुसरे (पांढर्या ठशातले) डोक्यात नव्हते. पण तिथेही चांगले खपू शकेल. आता दोन्हीकडे जाहीरात केल्यास ग्राहक वाढतील असे वाटते.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
मराठी माणूस धंद्यात मागे यामुळेच...
नितीनजी,
अहो एकीकडे लोक हा सण संपेल कसा, याबद्दल विचारमंथन करत असताना तुम्ही नेमका लवकर बंद पडेल, असा धंदा उघडायचा विचार करताय. त्यातून समजा प्लॅस्टिकच्या वडाच्या फांद्या आणि ग्रीटिंग कार्ड घेतलीच तर तीही सात जन्म वापरतील आपले लोक. त्यापेक्षा माझे ऐका. आपण दोघे मिळून व्हॅलेंटाईन डे, पब डे, लिव्ह-इन-रिलेशनशिप डे (याच चालीवर नागपंचमीला नाग डे म्हणावे का?) अशा सणांसाठीचे खास कपडे, भेटकार्डे व वस्तू विकूया. एकतर हे कपडे आखूड असल्याने कापड कमी लागते आणि फॅशनसाठी लोक कितीही पैसा मोजायला तयार असल्याने विकणार्याचा फायदा. मैत्रिणींना कधी एकदा भेटकार्ड आणि गुलाब देतोय, अशी घाई असलेली गाढवे हे आपले मुख्य गिर्हाईक असेल. सरकारने वाईनपाठोपाठ धान्यापासून अल्कोहोल तयार करायलाही उत्तेजन दिले आहे. आपण त्याचीही एजन्सी घेऊ. वर्षभर मागणी. काय म्हणता? :)
:)
हॅ हॅ हॅ..... तुम्ही पण ना....
आपल्या प्लॅस्टिकच्या फांद्या चायनीज वस्तू सारख्या. आदल्या दिवशी संध्याकाळी घरी आणल्यावर पूजा होईपर्यंत कशाबशा टिकतील अशा. पुढच्या वर्षी सुद्धा वापरता येणार नाहीत. ग्रीटिंग वर साल छापले की काम झाले. दरवर्षी नवीन घ्यायलाच लागतील.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
पशू
हे बघा! आणि लोक म्हणतात की स्त्रियांना नवरे पशू वाटतात!!! ;-)
पशूवरून आठवले
पशूवरून आठवले, पोळा ह्या सणाबद्दल आपले काय मत आहे? वटपौर्णिमा रद्द करून पोळाच भव्यपणे साजरा करायला हवा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नवे ते हवे...
पोळासुद्धा लवकरच बंद पडणार आहे. परवाच मी वर्तमानपत्रात वाचले, की भारतातील पशुधनाचे प्रमाण चिंताजनक कमी होत चालले आहे. काही काळ ट्रॅक्टर डे साजरा होईल, पण लाखो शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली आत्महत्या करत असताना असले सण कोण साजरा करणार? व्हॅलेंटाईन डे, लिव्ह इन रिलेशनशिप डे, अनमॅरिड कपल्स डे, द ग्रेट गटारी, हाय-बाय डे (नववर्ष) असे सण येणार आहेत. 'जुने ते सोने' असे न मानता 'नवे ते हवे' असा बदल झाला आहे. :)
संदर्भ
या हलक्याफुलक्या धाग्यात कृपया औपरोधिक लिहू नका. तुमचे या धाग्यातील सारेच प्रतिसाद औपरोधिक आहेत.
अन्यथा "लाखो शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली आत्महत्या करत असताना" या दाव्याचा संदर्भ मागावा लागेल.
अरे देवा! हे चर्चेचे व्यासपीठ की न्यायालयाचे खंडपीठ?
रिकामटेकडाजी,
माझ्या लेखनातील उपरोध आपल्याला इतका का बोचावा बरे? तो काही इथल्या कुणाला उद्देशून नाही. सध्याच्या स्थितीवरची उपहासगर्भ टिप्पणी म्हणा हवं तर. धागा जितका हलकाफुलका तितकाच विनोदही हलकाफुलका घ्यावा, ही आपल्यालाही विनंती.
असो. आपल्या आवाहनाचा आदर करत मी आता या चर्चेत औपरोधिक लिहित नाही.
एक विनंती : भारतात गेल्या दहा वर्षांत एकंदर किती शेतकर्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत, याची अचूक आकडेवारी कुणी सांगेल का? (दहा वर्षे म्हणण्याचे कारण आंध्र प्रदेशातील मागची निवडणूक रेड्डींनी त्या मुद्द्यावर जिंकली होती आणि चंद्राबाबूंच्या हातातून सत्ता खेचून घेतली होती. म्हणजे हा विषय किमान दशकभर जुना असावा.)
कालबाह्य प्रथा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"जग झपाट्याने बदलते आहे. वटपौर्णिमेसारखे सण लवकर कालबाह्य होणारच आहेत. त्याबद्दल काळजीचे कारण नाही."
या श्री योगप्रभू यांनी मांडलेल्या विचाराशी शत प्रतिशत सहमत. अशा प्रथा अल्प कालावधीतच मोठ्याप्रमाणात बंद पडतील हे निश्चित. तशी लक्षणे आजच दिसत आहेत.
कसे मोडीत काढणार?
कसे मोडीत काढणार? कायदा करून? बळजबरीने? चळवळ करून?
जेव्हा एखादी प्रथा कालबाह्य झाली आहे असे समाजातल्या बहुसंख्य वर्गाला वाटायला लागते तेव्हा ती प्रथा आपोआप मोडीत निघते. समाजातल्या तथाकथित उच्च वर्गापासून सुरु होऊन खालच्या स्तरापर्यंत ही वाटचाल होते.
मानवी बुद्धीचा अपमान आहे असे वसुली म्हणतात - सगळ्या मानवांची बुद्धी सारखी का समजता? जे लोक अशा प्रथा पाळतात त्यांच्या बुद्धीचा आवाका तेवढाच आहे असे नाही वाटत? जसाजसा शिक्षणाचा प्रसार होईल, लोकांचे जग विस्तारत जाईल तसेतसे लोक वेगळा विचार करायला लागतील आणि नकोश्या प्रथा मोडीत काढतील (हा सार्वत्रिक अनुभवच आहे)
वटसावित्रीचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर या प्रथेमध्ये असे कुठेही विदित नाही की पूजा केली नाही, तर देव कोपेल, पतीला त्रास होईल, प्रसंगी त्याचा मृत्यु होईल वगैरे. (हा माझा समज आहे, कदाचित चुकीचा असेल - मला पूजेत नक्की काय लिहिले आहे माहित नाही) झालेच तर वृक्षपूजन होते आहे, तेव्हढ्यासाठी तरी वडाची झाडे टिकवली जात असतील तर तो अप्रत्यक्ष फायदाच म्हणायचा...
समांतर उदाहरणच द्यायचे झाले तर सतीची प्रथा ही वाईटच होती. त्यामुळे चळवळी करून आणि कायदा करून ती प्रथा बळजबरीने बंद करणे बरोबर होते. पण वटसावित्रीबद्दल असे म्हणता येणार नाही. तस्मात ही आणि अश्या काही इतर प्रथा हळूहळूच अस्तंगत होणार.. सक्तीचे येथे काही काम नाही.
यात स्त्रियांना कमी लेखायचा कुठेही हेतु नाही हे स्पष्टपणे नमूद करू ईच्छितो. या प्रथेला माझा पाठिंबा आहे असेही समजू नका. माझ्या पत्नीने कधीही वटपौर्णिमेची पूजा केलेली नाही आणि त्याबद्दल मला कधीच काहीही वाटलेले नाही. पण या चर्चा वायफळ आहेत असं मला वाटतं.
फांद्या
>>तेव्हढ्यासाठी तरी वडाची झाडे टिकवली जात असतील
फांद्या तोडून घरी नेण्याने काय टिकवली जाणार?
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
होय अपमानच आहे
बुद्धीचे प्रकार नाहीत. 'बुद्धी' ही सारखीच आहे. त्याचे प्रमाण मात्र कमी जास्त आहे. आणि अशा रुढींचे पालन करणे म्हणजे करणार्याला जो काही बुद्धीचा अंश मिळाला आहे त्याचा अपमान करणे ह्या मताशी मी ठाम आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
गणेशोत्सवाबद्दल काय मत आहे?
असे वाटत नाही हो. ह्या गणेशोत्सवाबद्दल काय म्हणता? सार्वजनिक गणेशोत्सव उच्चवर्गापासून सुरू होऊन 'बहुसंख्य' वर्गामुळेच वाढतो आहे. ह्या गणेशोत्सवावर बंदी घालायला हवी. जे करायचे ते घरात करा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हेटाळणी
जे ही प्रथा पाळतील त्यांच्यावर टीका करून, त्यांना कमी लेखून दडपण आणता येईल.
विचारपूर्वक प्रतिसाद
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
वा ! श्री.चिनार यांनी छान प्रतिसाद लिहिला आहे. त्यांचे विचार समतोल आहेत. कुठेही दुराग्रह दिसत नाही. अशा प्रथा कायद्याने बंद पाडा असे कोणीही म्हणणार नाही. त्या आपोआपच कालांतराने बंद पडणार आहेत. मात्र थोडे फार जनप्रबोधन केल्यास कालावधी कमी होऊ शकेल.
+१
सहमत आहे.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
पुरुषांची मंगळागौर
वटसावित्रीवरून पुरुषांची मंगळागौर आठवली. ही नवीच प्रथा आहे.
सध्याच्या काळात मुंबई आणि पुण्यात ही नियमितपणे साजरी होत असते. अमेरिकेतही हिचे फ्याड आल्याचे कळते.
ही पारंपरिक मंगळागौर.
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
सगळेच हिंदू सण बंद करा.
असे केले की, नागपंचमीच्या दिवशी न कुटले-चिरले-भाजले-तळलेले असूनही केवळ उकडून केलेले धिंड्यांसारखे चविष्ट पदार्थ खायला मिळणार नाहीत. ऋषिपंचमीला कुणाच्यातरी परसदारात उगवलेल्या भाज्यांचा आस्वाद घेता येणार नाही. दिवाळीत शंकरपाळी, अनरसे, कडबोळी आणि चिरोटे यांचा कंटाळा येईपर्यंत आनंद उपभोगता येणार नाहीत. श्रावण महिन्यात आणि गणपतीच्या दिवसांत घरांत शिजलेले व सामिष नसलेले अन्नही रुचकर असू शकते याचा साक्षात्कार होणार नाही. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना विश्रांती मिळणार नाही. एकादशी-चतुर्थी आणि आठवड्याच्या उपवासांच्या दिवशी घरांत नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे बनणार नाही. शिंगाडा, राजगिरा, वर्याचे तांदूळ कुणी पिकवणारच नाही. होळी-द्वादशी-श्रावणशुक्रवारी होणारा पुरणावरणाचा स्वयंपाक विसरावा लागेल. मार्गशीर्षातल्या धुंदुर्मासादरम्यान पहाटे उठून देवळात जाऊन केलेल्या काकडआरतीची मजा मिळणार नाही. मग फटाके नको आणि नववर्षाचा गुढी पाडवाही नको. नको भाऊबीज आणि नको नारळी पौर्णिमा. आणि मग वर्षातून निदान साडेतीनवेळा, आणि त्याव्यतिरिक्त गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्राजवळ गेल्याप्रीत्यर्थ क्वचितच करायच्या सोनेखरेदीचा आनंदही टाळता येईल.
फारसे बिघडणार नाही, दुसर्यांचे मोहरम काहींच्या इदी, ईस्टरे, नाताळे, बुद्धपूर्णिम्या, शिवजयंत्या वगैरे दिवशीच काय ते नाचून घ्यावे लागेल, एवढेच. एक मात्र होईल, सणांच्या मिशाने होणार्या वयस्कर स्त्रियांच्या स्नेहभेटी आणि तिथे करायच्या चहाड्याचुगल्या-कुचाळक्या बंद झाल्या की त्यांच्या जीवनांतला राम संपेल.--वाचक्नवी
हेडॉनिजम
चव आवडते तर अन्न बनवून खावे की! त्यासाठी धर्म कशाला हवा?
मुळावर घाव
हे विश्लेषण चुकीचे आहे. हे झाडाचा त्रास होतो म्हणून फांद्या तोडण्यासारखे झाले. स्त्रियांच्या दास्यत्वाचे आणि गुलामगिरीचे मूळ कारण विवाहसंस्था हे आहे. लग्नसंस्था मोडून काढली की स्त्रिया मुक्त आणि स्वतंत्र होतील. जातीव्यवस्था, फलज्योतिष यासारख्या अवैज्ञानिक प्रथा केवळ जुनाट आहेत म्हणून योग्य मानण्यात अर्थ नाही त्याचप्रमाणे लग्नसंस्था जुनाट आहे म्हणून योग्य मानण्यात काहीही अर्थ नाही. लग्नसंस्थेला कोणतेही वैज्ञानिक अधिष्ठान नाही. प्रजननयोग्य स्त्री पुरुषांच्या शरीरसंबंधानंतर संतती होते असा सोपा जैवशास्त्रीय सिद्धांत आहे. त्यासाठी लग्न केलेले असणे आवश्यक नाही. किंबहुना प्रगत विज्ञानाने संततीप्राप्तीसाठी पुरुषाशी प्रत्यक्ष संबंध ठेवण्याचीही स्त्रीला गरज नाही हे सिद्ध केले आहे. ज्या गोष्टीला वैज्ञानिक अधिष्ठान नाही ती गोष्ट योग्य मानणे हा मानवी बुद्धीचा अपमान आहे. उपक्रमासारख्या पुरोगामी संकेतस्थळावर लग्न हा शब्दही उच्चारला जावा याची मला उपक्रमी म्हणून शरम वाटते.
ये हुई ना बात! सपशेल सहमत आहे. एखादीचे लग्न होते आहे हे पाहून अशा महिलांना काय वाटत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यापेक्षा अशा महिलांच्या भावनांचा योग्य तो आदर राखण्यासाठी लग्न करु नये.
वांझ, किंवा पुत्रहीन महिलांच्या भावनांचा मान राखण्यासाठी डोहाळेजेवण, बारसे किंवा बाळंतपणच टाळावे.
मृत्यू पडणाऱ्या सर्व जीवितांच्या भावनांचा मान राखण्यासाठी प्रत्येकाने ताबडतोब मरुन जावे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
खो खो
सहमत आहे. लग्नच मोडले म्हणजे न रहेगा बास न बजेगी बासुरी. :)
मोडले?
मोडले? (स्लिप दिसते.) मोडण्यापर्यंतच जायचेच कशाला. लग्नच करू नका. अविवाहित राहा असे श्री. अक्षय ह्यांना सांगायचे आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
स्लिप
स्लिप नाही. पीजे मारण्याचा प्रयत्न केला. लग्न मोडले म्हणजे लग्नाची प्रथाच मोडली...
जीवशास्त्रीय विषमता
शारिरिक रचनेतील फरकांमुळे स्त्रियांचे शोषण होऊ शकत असल्यामुळे शोषणाचा विरोध करणारा करार आवश्यक आहे.
शोषण होणारच नाही ना मग करार कायकू?
जर लग्नच झाले नाही तर स्त्रियांचे शोषण कसे काय होईल हे समजले नाही. की तुम्हीही अवैज्ञानिक, जुनाट रुढीस्वरुप लग्नसंस्थेचा पुरस्कार करत आहात?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
दहा मिनिटे विरुद्ध नऊ महिने
लग्नसंस्था नसलेल्या समाजात मूल प्रसविण्याची, वाढविण्याची जवाबदारी एकट्या स्त्रीवर पडेल. तिच्या मेहनतीचे परिमार्जन करण्याचे उत्तरदायित्व लग्नामुळे किमान काही प्रमाणात तर पुरुषावर येते. मूल निर्माण करण्यात त्याचाही तिच्याएवढाच जीवशास्त्रीय फायदा असतो. लिवइन नात्यात तसा काही करार केल्यास ते लग्नापेक्षा काही वेगळे राहील का?
औपरोधिक भाषेचा वापर केल्यास सव्याज परतफेड स्वीकारण्यास तयार रहावे.